शरीरात लपलेला खेकडा- कर्करोग आणि होमिओपॅथी – भाग एक / The Crab Hidden in the Body – Cancer and Homeopathy – Part One

Dorctor Pic By Dr. Ajay HanmaneJanuary 8, 2024 Cancer General Information Homeopathic and Cure

शरीरात लपलेला खेकडा- कर्करोग आणि होमिओपॅथी – भाग एक

 

  ‘आनंद’ चित्रपटातील राजेश खन्नाच्या आजारपणाचे नाव                           “लिम्फोसारकोमा ऑफ द इंटेस्टाइन ” हे डॉक्टर भास्कर बॅनर्जी अतिशय गंभीरपणे सांगतात. आणि त्याच चित्रपटांमध्ये होमिओपॅथी शेवटच्या स्टेजला पण काहीतरी करामत करू शकते असा विश्वास अमिताभ बच्चन यांच्या वाक्यातून निदर्शनाला येतो.

‘आनंद’ चित्रपटाने प्रभावीपणे ‘कॅन्सर /कर्करोग ‘ या आजाराचं गांभीर्य सर्वसामान्य लोकांच्या निदर्शनास आणून दिले आणि त्यानंतर अवघ्या पण 40-50 वर्षात कर्करोग आपल्या आसपास इतक्या झपाट्याने आणि आक्रस्ताळपणे हातपाय पसरेल असं वाटलंही नव्हतं. आता ‘आनंद’चा आजार केवळ सिनेमा पुरता मर्यादित राहिलेला नाही.

जागतिक आरोग्य संघटनेच्या 2020 सालच्या अहवालानुसार जगभरात त्यावर्षी जवळजवळ 18.1 कोटी माणसांमध्ये कर्करोगाचे निदान करण्यात आलं. भारतात दर 9 व्यक्तींमागे एका व्यक्तीला आयुष्यात कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर कर्करोग होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते, असा अंदाज आहे.त्याशिवाय 2020 च्या तुलनेत 2025 पर्यंतच्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये 13 ते 14 % वाढ होण्याचा धोका असल्याचे सांगितले गेलं आहे.

कर्करोगाचे निदान झालेल्या अनेक व्यक्तींच्या बाबतीत, ‘साधं सुपारीच्या खांडाचे देखील व्यसन नव्हतं’ किंवा ‘अगदी नेहमीत शिस्तबद्ध, साध आयुष्य होतं’ ,अशी वाक्य आपण अनेकदा ऐकतो. ही विधान खरी देखील असतात, पण तरीही त्या व्यक्तीला कर्करोग का व्हावा ? असा साहजिक प्रश्न पडतो. याचे उत्तर स्वीकारायला थोडं कटू आहे, ते पचवणं गरजेचं आहे.

ते असं की, पेशी असलेल्या प्राण्यांमध्ये कर्करोग होण्याची “शक्यता” असतेच. शरीरातल्या ठराविक पेशींमध्ये काही घटक, काही ठराविक कारणांमुळे उत्तेजित होत असतात. अशा घटकांना काबूत ठेवण्यासाठी शरीरात नैसर्गिक यंत्रणा असते. मात्र ही यंत्रणा अयशस्वी होते, तेव्हा पेशी आपला ठरलेला जीवनक्रम बदलतात आणि याचं पर्यवसान ‘ कॅन्सर ‘ सारख्या आजारात होतं. मात्र कर्करोग  होण्याची शक्यता काहींमध्ये अधिक प्रमाणात असते तर काहीमध्ये कमी प्रमाणात असते. ही शक्यता वाढण्यासाठी अनुवांशिकते पासून ते बाह्य रसायनांपर्यंत अनेक घटक कारणीभूत असतात.

होमिओपॅथीमध्ये,जी नैसर्गिक यंत्रणा पेशींना काबूत ठेवते त्या यंत्रणेवरती यशस्वीरित्या उपचार केले जातात. त्यामुळे पेशी आपलं ठरलेलं जीवनक्रम बदलत नाहीत. त्याच्यामुळे कॅन्सर झालेल्या व्यक्तींमध्ये आरोग्याची गाडी पुन्हा रुळावर येण्याची शक्यता दाट असते.

मुळात ही यंत्रणा बिघडण्याची साठी कारणीभूत असणारे जे शारीरिक दोष (मायाझम)असतात, त्या शारीरिक-अंतर्गत दोषांमुळेच ही यंत्रणा बिघडते. त्यावर होमिओपॅथीमध्ये अनेक गुणकारी औषधे आहेत. त्यामुळे ही बिघडलेली यंत्रणा पुन्हा नैसर्गिकरित्या काम करू लागते.

 

मुळात कर्करोग हा एक आजार नसून अनेक आजारांचा समूह आहे. या सगळ्या आजारांमध्ये एक गोष्ट समान आहे ती म्हणजे, पेशींची अवाजवी आणि अस्वाभाविक वाढ.

पेशी म्हणजे सर्व सजीवांच्या शरीरातला मूलभूत घटक. विविध पेशींच्या ठराविक रचनेतून आणि कार्यातून, विविध अवयव तयार होतात.आपल्याकडे धार्मिक, पौराणिक कथांमध्ये, निर्मिती करणारा ब्रह्मा, पोषण रक्षण करणारा विष्णू, नाश करणारा शिव, असं “त्रिमूर्तीचे” महत्त्व कथन केलं आहे.

अगदी या तत्त्वावर शरीरातील पेशींचा आयुष्य क्रम चालतो. पेशींची निर्मिती, त्यांचे कार्य आणि थकलेल्या- जखमी झालेल्या पेशींचे मृत्यू.

 

गर्भधारणेपासून हळूहळू पेशींची संख्या वाढत जाऊन प्रथम गर्भाचे अवयव तयार होतात. नंतर ते अवयवांची वाढ होते. जेव्हा शरीराला जेव्हा शरीराला नवीन पेशींची गरज असते तेव्हा शरीरात अस्तित्वात असलेल्या पेशींचे विभाजन होऊन नवीन पेशी तयार होतात. पेशींची संख्या वाढलेली पर्यायाने त्या-त्या अवयवांची देखील वाढ होते. अनेकदा मृत्यू पावलेल्या पेशींची जागा भरून काढून अवयवांचे कार्य सुरळीतपणे चालू ठेवण्यासाठी नवीन पेशींची निर्मिती होते.

उदाहरणार्थ लालपेशी साधारणपणे दर चार महिन्यांनी तयार होतात. आतड्याच्या पेशी दर चार दिवसांनी, तर मेंदूच्या पेशी आयुष्यभरात एकदाच तयार होतात.

मात्र, एका ठराविक मर्यादेपर्यंत पेशींची संख्या वाढली की, नवीन पेशी तयार करण्याचं काम थांबवणारी यंत्रणादेखील पेशींमध्येच असते. याशिवाय एका अवयवाच्या पेशी दुसऱ्या अवयवात वाढू शकणार नाहीत किंवा नेमून दिलेले ठराविक कार्य करतील यावर लक्ष ठेवणारी यंत्रणादेखील प्रत्येक पेशींमध्ये किंवा पेशींच्या समूहात असते.

 

पेशींवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा ही सर्व यंत्रणा असते, पेशीकेंद्रामध्ये (न्यूक्लियस) पेशीकेंद्र म्हणजे एका अर्थी प्रत्येक पेशीचा मेंदूच. एखादं उपकरण कसं चालवाव यासंबंधी सगळ्या सूचना जशा उपकरणांमध्ये जोडलेल्या पत्रकात दिलेल्या असतात. त्याप्रमाणे पेशी केंद्रामधल्या गुणसूत्रांमध्ये (क्रोमोझोम्स) सगळ्या सूचना दडलेल्या असतात.

वास्तविक आपल्या शरीरातल्या सगळ्या पेशींमध्ये एक सारखीच माहिती असते. पेशींना ठराविक सूचना देण्यासाठी त्यापैकी कोणत्या विशिष्ट माहितीचा वापर केला जातो यावर प्रत्येक पेशींच आणि त्यापासून तयार होणाऱ्या अवयवांचे कार्य ठरतं.

उदाहरणार्थ फुफुसाच्या पेशी एका ठराविक माहितीचा वापर करतात तर आतड्याच्या पेशी वेगळ्या इतर माहितीचा वापर करतात. म्हणूनच फुफुसांच्या पेशींचं आणि आतड्यांच्या पेशींचे कार्य वेगवेगळे असतं.

 

या सगळ्या यंत्रणेमुळे आपल्या शरीरातील एकही अवयव मर्यादेबाहेर वाढत नाही. त्याचप्रमाणे प्रत्येक अवयवातल्या लाखो- करोडो पेशी त्यांना नेमून दिलेलं काम शिस्तबद्ध पद्धतीने आणि नियम न मोडता करू शकतात. त्यासाठी लागणारी पोषणमूल्यं, ऊर्जा हे देखील योग्य प्रमाणात, योग्य पद्धतीने सगळ्या पेशींपर्यंत पोहोचू शकतं.

मात्र पेशी जेव्हा नियम मोडून अवाजवी आणि अस्वाभाविक प्रमाणात वाढतात, एका अवयवातून दुसऱ्या अवयवात स्थलांतर करतात आणि नियम पाळणाऱ्या पेशींच्या कामात अडथळा निर्माण करतात तेव्हा त्या ठरतात “कर्करोगाच्या पेशी”.

या पेशींच्या पेशीकेंद्रातील सूचना देणाऱ्या यंत्रणेमध्ये म्हणजे  जणूकांमध्ये  बिघाड झालेला असतो. त्यामुळे कर्करोग हा एका अर्थी जनुकांचा (जेनेटिक)  आजार आहे. कर्करोगाला कारणीभूत असणारे अनेक अनेक मार्गांनी जनुकांवर विपरीत परिणाम करणारे असतात.

 

ज्या जनुकीय बदलांमुळे कर्करोग होण्याची शक्यता निर्माण होते ती जणुकं मुख्यत्वे तीन प्रकारची असतात. या जणूकांमधील बदलांना “कर्करोगाचे चालक” असे म्हणतात.

यापैकी पहिला प्रकार म्हणजे ‘प्रोटो- ऑकोजिन्स’. ही जणुकं पेशींच्या सर्वसाधारण वाढीमध्ये आणि विभाजनामध्ये सहभागी असतात. मात्र, या जनुकांमध्ये बदल झाले किंवा ही जणुकं नेहमीपेक्षा अधिक उत्तेजित झाली की ती कर्करोगाला कारणीभूत ठरणारी जणुकं म्हणजेच “ऑकोजिन्स” बनतात. ज्या पेशींची वाढ थांबून नाश व्हायला हवा, अशा पेशींनादेखील ही “ऑकोजिन्स” वाढण्यासाठी आणि विभाजनासाठी उत्तेजन देत रहातात.

दुसऱ्या प्रकारची जणुकं म्हणजे ट्यूमर सप्रेसर, (गाठरोधक) जणुकं. ब्रेकमुळे धावणारी गाडी थांबवली जाते, त्याचप्रमाणे पेशींच्या विभाजनावर ब्रेक लावून ते थांबवण्याचे काम हे जणुकं करतात. जिथे या ब्रेक लावणाऱ्या जनुकांमध्ये बिघाड / बदल होतो तिथे त्या पेशींचे विभाजन होतच राहतं आणि पेशींची संख्या प्रमाणाबाहेर वाढते.

 

तिसऱ्या प्रकारात डीएनए दुरुस्त करणारी जणुकं येतात. कोणत्याही यंत्रात काही बिघाड झाला तर ते टाकून देण्यापूर्वी आपण दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे पेशींमधल्या डीएनए मध्ये बिघाड झालेला आढळला तर तो दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला जातो. हे काम करतात डीएनए तंदुरुस्त करणारी जणुकं. मात्र काही कारणांमुळे या जनुकांमध्येही बदल घडले (म्युटेशन) तर ही जणुकं इतर जनुकांमध्येही बदल घडवतात. अनेकदा हे बदल नक्की कशामुळे झाले हे देखील सांगणे अवघड असतं. “ध” चा “मा” झाल्यावर अर्थाचा अनर्थ होतो नेमका तसाच प्रकार म्युटेशन मुळे घडू शकतो. किंवा कपाटबोली भाषेत जसा  शब्दातील “क” गाळला जाऊन “पाट” हा शब्द उरला तर त्याचे जसे अनेक अर्थ होऊ शकतात, तसंच प्रकार इथेही होतो.

 

अशा कोणत्याही जनुकीय बदलांमुळे पेशींना मिळणाऱ्या संदेशात बदल घडले की पेशी नियमबाह्य वागायला लागतात आणि कर्करोगाची शक्यता वाढते. संख्येने आकाराने वाढलेल्या या अतिरिक्त पेशी जिवंत राहण्यासाठी अन्नपुरवठा, पोषणद्रव्य यांची मागणी करायला लागतात. मग आजूबाजूच्या रक्तवाहिन्यांना नवनवीन फाटे फुटतात, त्यातून कर्करोगाच्या पेशीची ही मागणी पुरवली जाते. या रक्तवाहिन्यांमधून कर्करोगाच्या पेशी एका अवयवातून दुसऱ्या अवयवात प्रवेश करतात. शरीरातल्या एका जागेवर दुसऱ्या जागी कर्करोग पसरणे याला ” मेटॅस्टासिस ” म्हणतात. ‘मेटा’ म्हणजे “पल्याड” आणि “स्टासिस” म्हणजे “स्थिरता “. त्या दोन शब्दांवरून “स्थिरतेच्या पल्याड” असलेल्या अशा रोगाचं म्हणजे, कर्करोगाचं निदान केले जातं. कर्करुग्णांच्या मृत्यू मागे 90 टक्के वेळा ” मेटॅस्टासिस ” कारणीभूत ठरतो.

 

माणसांचं स्थलांतर सहज, सोपं नसतं, तसं कर्करोगांच्या पेशींचे स्थलांतरित सोपं नसतं. कर्करोगांच्या पेशी आधी त्यांच्या मूळ गाठी बसून वेगळ्या होतात. त्या दरम्यान त्यातल्या अनेक पिशवी मरतात. त्यातून वाचलेल्या पेशी धडपड करून व रक्तवाहिन्यांमध्ये प्रवेश करतात. अरुंद रक्तवाहिन्यांमधून प्रवास करताना चेपल्यामुळे, रक्तवाहिन्यांच्या भिंतींना धडकल्यामुळे अनेक पेशी जखमी होतात. रोगप्रतिबंधक कार्यप्रणालीमुळेही या घुसखोर पेशींचा काही प्रमाणात बंदोबस्त केला जातो. या सगळ्यांमधून वाचलेल्या चिवट पेशी ठराविक अवयवापाशी पोहोचल्यानंतर रक्तवाहिन्यांमधून बाहेर पडून प्रवास थांबवतात आणि नवीन जागी मुक्काम ठोकतात. अनेकदा या पेशींना नवीन जागा मानवत नाही आणि त्या मरतात. ज्या पेशी आजूबाजूच्या वातावरणाशी जुळवून घेऊन जिवंत राहतात आणि वाढतात त्यांच्यामुळे नवीन अवयवात कर्करोगाच्या पेशींची वाढ तयार व्हायला लागते.

उदाहरणार्थ स्वादुपिंडाच्या कर्करोग शेजारीच असलेल्या यकृतात पसरतो तर फुफुसाच्या कर्करोगाचा रोगाच्या पेशी प्रवास करत मेंदूपर्यंत जातात आणि तिथे मुक्काम करतात. काही कर्करोग रक्त आणि रसवाहिन्यांमार्फत अधिक क्षमतेने पसरतात, तर काही कमी प्रमाणात पसरतात.

उदाहरणार्थ स्तणाचा कर्करोग बहुतांश वेळा स्थानिक असतो तर प्रोस्टेट ग्रंथीचा, स्त्री- पुरुष बीजांडाचा किंवा यकृताचा कर्करोग अधिक वेगाने पसरतो.

 

कर्करोगा विषयी अधिक माहिती पुढील भागात आपण पाहू. 

 

डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ) HHF, ICR Kolhapur,
चैतन्य होम्योपैथिक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4, HDFC बॅंकेजवळ,
शाहुपुरी व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल– 7738667123

कृपया पुढील लेख वाचा  —

 

————————————————————————-

The Crab Hidden in the Body – Cancer and Homeopathy – Part One

 

Doctor Bhaskar Banerjee says very seriously that the name of Rajesh Khanna’s illness in the movie ‘Anand’ is “Lymphosarcoma of the Intestine” . And in the same films, Amitabh Bachchan’s words show the belief that Homoeopathy can work wonders even at the last stage .

The movie ‘Anand’ effectively brought the seriousness of the disease ‘ Cancer’ to the attention of the general public and then it was never thought that in just 40-50 years cancer would spread around us so rapidly and aggressively. Now the disease of ‘Anand’ is not limited only to Cinema.

According to the World Health Organization’s 2020 report, around 18.1 crore people were diagnosed with Cancer worldwide that year. It is estimated that one out of every 9 people in India may develop Cancer at some stage in their life. Apart from this, there is a 13 to 14 % increase in Cancer patients by 2025 as compared to 2020.

In the case of many people diagnosed with Cancer , we often hear the phrase ‘wasn’t even addicted to simple betel nuts’ or ‘always had a disciplined, simple life’ . These statements are also true, but why should that person get Cancer ? This is a natural question. The answer to this is a bit bitter to accept, it needs to be digested.

That is, animals with cells have a “Potential” to develop Cancer . Certain elements in certain cells of the body are stimulated for certain reasons. The body has a natural mechanism to control such factors. But when this system fails , the cells change their normal life cycle and this results in diseases like ‘Cancer’ . But the possibility of Cancer is more in some and less in others. Many factors, from genetics to environmental chemicals, contribute to this increased likelihood.

In Homoeopathy, the natural mechanisms that control the cells are successfully treated. So the cells do not change their life cycle. Due to this, there is a high possibility of getting the car of health back on track in the Cancer patients.

Basically, it is the physical defects (Miasm) which are responsible for the breakdown of this system. There are many effective medicines in Homoeopathy. So this damaged system starts working again naturally.

 

Basically Cancer is not a single disease but a group of many diseases . One thing that all these diseases have in common is the excessive and abnormal growth of cells.

Cells are the basic building blocks of all living organisms. From the specific structure and function of various cells, various organs are formed. In religious and mythological stories, we have the importance of “Trimurti” narrated as Brahma the Creator, Vishnu the Sustainer, Shiva the Destroyer.

Even on this principle, the life cycle of the cells in the body works. Cell formation, function and death of exhausted-injured cells.

 

From conception, the number of cells gradually increases and the first fetal organs are formed. Later it becomes the growth of organs. When the body needs new cells, existing cells in the body divide to form new cells. An increase in the number of cells also increases the number of organs. Often, new cells are formed to replace the dead cells to keep the organs functioning properly.

For example, red blood cells are normally produced every four months. Gut cells are formed every four days, while brain cells are formed only once in a lifetime.

However, once the number of cells increases to a certain limit, the cells also have a mechanism that stops the production of new cells. In addition, each cell or group of cells also has a mechanism to ensure that the cells of one organ cannot grow into another or perform a specific function.

 

The system that controls the cells is all the systems, in the cell center (Nucleus) The cell center is, in a sense, the brain of each cell. All instructions on how to operate a device are given in the leaflet attached to the device. Similarly, all the instructions are hidden in the chromosomes in the cell center.

Actually all the cells in our body have the same information. The function of each cell and its organelles depends on which particular information is used to send specific instructions to the cells.

For example, cells in the lung use one specific information, while cells in the intestine use a different information. That is why the functions of lung cells and intestinal cells are different.

 

Due to all these mechanisms, no organ in our body grows beyond the limits. Similarly, millions of cells in every organ can do their assigned work in a disciplined manner and without breaking the rules. The nutritional values, energy needed for that can also reach all the cells in the right amount, in the right way.

But cells become “cancer cells” when they break the rules and grow excessively and abnormally, migrate from one organ to another and interfere with the functioning of normal cells.

There is a malfunction in the signaling system in the nucleus of these cells. Therefore, cancer is a genetic disease. Many of the cancer- causing agents have adverse effects on genes in a number of ways.

 

 

Genetic changes that lead to cancer seem to be of three main types . Changes in these genes are called “cancer drivers” . The first of these types are ‘proto-oncogenes’. These seem to be involved in the normal growth and division of cells. However, when these genes are mutated or overstimulated, they become so-called ” oncogenes” that cause cancer . These ” oncogenes” continue to stimulate growth and division even in cells that should have stopped growing and died.

Another type is tumor suppressor, (anti-clotting) . Brakes stop a moving car, just as they act as brakes on cell division. Where there is a malfunction / change in these brake genes, the cells continue to divide and the number of cells increases excessively.

 

A third type involves DNA repair. We try to repair any device before discarding it if there is any malfunction. Similarly, if damage is found in the DNA in the cells, an attempt is made to repair it. It acts like DNA repair. But due to some reasons these genes are also changed (mutations) and these seem to cause changes in other genes as well. Often it is difficult to say exactly what caused these changes. Mutation can cause the same kind of loss of meaning as “ध” becomes “मा” in dialect. Or if the”क”in the word “कपाट” is removed and the word “पाट” is left, it can have many meanings, as it happens here.

 

Any such Genetic change alters the message the cells receive, causing the cells to behave abnormally and increase the risk of Cancer . These extra cells, which have increased in number and size, start demanding food supply and nutrients to survive. Then the surrounding blood vessels burst, supplying this demand of the Cancer cell. Through these blood vessels Cancer cells enter from one organ to another. The spread of Cancer from one place in the body to another is called “Metastasis” . ‘Meta’ ‘मेटा’means “Palayad” “पल्याड”and ” stasis” “स्टासिस” means “stability””स्थिरता “. Those two words are used to diagnose a disease that is “beyond stability “ “स्थिरतेच्या पल्याड“, i.e. cancer. 90% of cancer deaths are caused by “Metastasis”.

 

Migration of human beings is not easy, just like the migration of Cancer cells is not easy. Cancerous cells first separate from their original tumors. During that time many of the bags die. The surviving cells struggle and enter the blood vessels. As the force travels through the narrowed blood vessels, many cells are injured as they collide with the walls of the blood vessels. These infiltrating cells are also managed to some extent by the immune system. After reaching a certain organ, the tissue cells that survive all of this stop traveling and settle in a new place after exiting the blood vessels. Often these cells do not adapt to a new place and die. Cells that survive and grow by adapting to the surrounding environment begin to form Cancer cell growth in the new organ.

For example, pancreatic Cancer spreads to the adjacent liver, while Lung Cancer cells travel to the Brain and stay there. Some Cancers spread more efficiently through the blood and lymphatic vessels, while others spread less.

For example, breast Cancer is often localized, while Cancer of the prostate, ovarian, or liver spreads more rapidly.

 

We will see more information about cancer in the next section.

Dr Ajay Hanmane
M.D.(Hom)HHF,ICR Kolhapur,
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4,Near HDFC Bank,
Bhaskar Plaza Vyapari Peth,
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
Mobile No. 7738667123
Sunday Closed.

Please Read Next Article-