नक्की होमिओपॅथी तुम्हाला वाचवू शकते (Part-2) / Surely Homoeopathy can save you (Part-2)

Dorctor Pic By Dr. Ajay HanmaneMay 12, 2023 General Information Homeopathic and Cure

नक्की होमिओपॅथी तुम्हाला वाचवू शकते (Part-2)                                                          

होमिओपॅथी कशी असते ?

    समरूपता हे होमिओपॅथिच मूलतत्त्व. रुग्णाचा आजार आणि औषध या दोन्हीतील ‘समरूपतेच्या’ आधारे होमिओपॅथी मध्ये उपचार केले जातात.
‘होमिओपॅथिक’ चे   जनक डॉक्टर हॅनीमान यांच्याकडे जाते.
होमिओपॅथी नैसर्गिक तत्त्वांवर आधारित आहे. साहजिकच ही तत्व सार्वत्रिक सार्वकालिक (Universal All Time) आहेत.

   ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ याचा विचार खऱ्या अर्थानं फक्त होमिओपॅथीतच केला जातो. कुठल्याही रोगाच्या नावावर नव्हे तर रुग्णाच्या वेगळेपणावर आधारित औषध दिलं जातं. व्यक्तीचं हे वेगळेपण, आजाराच्या काळात अगदी प्रामुख्याने व्यक्त होतं. प्रत्येक व्यक्तीचा औषधांना प्रतिसाद वेगवेगळ्या असतो कारण प्रत्येकाची ग्रहणक्षमता – Susceptibility वेगवेगळी असते. एवढेच काय एक व्यक्तीतही, ती रोगी अवस्थेत व निरोगी अवस्थेत बदलणारी असते.
रोगी अवस्थेत इतर कुठल्याही औषधापेक्षा मानवी शरीर होमिओपॅथिक औषधाला अधिक प्रतिसाद देत, असं अनुभवाने सिद्ध झाले आहे.

होमिओपॅथीचे वैशिष्ट्य असं आहे की ‘एकच औषध अनेक तऱ्हेच्या रोगांवर गुणकारी असू शकतं’.   होमिओपॅथीच्या प्रत्येक औषधाला त्यांची एक स्वतंत्र ओळख असते. स्वतंत्र व्यक्तीमत्व व वेगळेपण असतं. त्यामुळे एक औषध दुसऱ्या औषधाची जागा घेऊ शकत नाही. म्हणून कुठल्याही रुग्णासाठी सर्वाधिक योग्य असं शोधणं हे होमिओपॅथीच्या डॉक्टरांसाठी एक आव्हान असते. होमिओपॅथिक शास्त्राचा वापर करणे ही एक ‘कला’ च (ART)आहे असं म्हणता येईल.

1) समः समम॒ शमयति – (Law of Similia) – सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटर हाच होमिओपॅथीचा पायाभूत सिद्धांत आहे. सोप्या भाषेत “काट्याने काटा काढणे”. सर्व औषधी पदार्थांमध्ये ती निरोगी व्यक्तीला दिली तर रोगाची लक्षणे निर्माण करण्याची शक्ती होमिओपॅथिक औषधांमध्ये असते. रुग्णात जी लक्षणे आढळतात तशीच लक्षणे निरोगी व्यक्तीत ज्या औषधामुळे निर्माण होतात ते औषध दिलं जातं. रुग्णाचा आजार आणि औषध यात समरूपता असावी लागते. लाक्षणिक साधर्म्यावर आधारित या उपचार पद्धतीत उपलब्ध लक्षण समूहांशी सर्वाधिक समरूप असलेलं औषध रुग्णाला दिलं जातं.

2) The Single Remedy (Law of Simplex) – होमिओपॅथी मध्ये एकाच वेळी एकच औषध दिलं जातं. प्रत्येक होमिओपॅथिक औषध हे स्वतंत्रपणेच परिणामासाठी सिद्ध झालेला असतं. कुठल्याही रुग्णाच्या विशिष्ट परिस्थितीत जास्तीत जास्त “लक्षणसाधर्म्य” असणारं एकच एक सुयोग्य औषध शोधणं ही कलाच(ART)  असते. ते नेमकं औषध दिलं तरच रुग्ण बरा होतो अन्यथा तात्पुरता आराम वाटतो. होमिओपॅथी मध्ये अनेक औषधांचं मिश्रण दिलं जात नाही कारण प्रत्येक औषधाची क्रिया भिन्न असते.

एकाहून अधिक मिश्रण आमचं औषध दिल्यास भिन्न प्रकारची क्रिया होऊन अपेक्षित परिणाम साधला जात नाही. म्हणून  विविध औषधांचे मिश्रण करणं हे अशास्त्रीय  आहे. कोणत्या औषधांचा नेमका काय परिणाम झाला आहे, हे ठरवता येत नसल्याने पुढील उपचारासाठी मिळणारी दिशा कळत नाही. एकाहून अधिक औषधांचे मिश्रण हे नवीन औषध ठरतं.

होमिओपॅथिमध्ये एका रुग्णासाठी केवळ एकच औषध वापरलं जातं असं नाही, काही आजारांमध्ये एकापेक्षा अधिक औषधांची गरज भासू शकते. मात्र ती एकत्र न देता एका औषधाचे कार्य संपल्यानंतर दुसरं औषध- लक्षणं अनुरूप दिले जातं. एका विशिष्ट लक्षण समूहासाठी एकच औषध योग्य औषध असल्याने होमिओपॅथिक औषध बदलणं हा (ऑपरेशनच्या निर्णया इतकाच) महत्त्वाचा निर्णय असतो. तो पूर्ण विचारांनी व खात्रीपूर्वक घ्यावा लागतो.

3)  कमीत कमी मात्रा  (Law of Minimum) 
होमिओपॅथिक औषधांची सुयोग्यता ही केवळ औषध निवडीपूर्ती मर्यादित नसते तर योग्य  मात्रेत् DOSE औषध देणं ही महत्त्वाचं असतं. योग्य मात्रा म्हणजे कमीत कमी डोस (Dose). होमिओपॅथीचा भर हळुवार उपचारांवर असतो.म्हणून किमान पण अतिशय वाजवी अशी मात्रा वापरली जाते. म्हणजे होमिओपॅथीची मात्रा इतकी कमी असावी की ज्यामुळे व्यक्तीच्या मूळ संतुलन शक्तीवर अवाजवी परिणाम न होता आवश्यक तितकाच होईल. अशा किमान मात्रेमुळे, डोसमुळे कुठलाही विपरीत परिणाम शक्यतो टाळला जातो. ‘औषधांची सवय जडणं’ ही टाळलं जातं. आवश्यकतेहून अधिक डोस शरीरावर दुष्परिणाम होण्याची दाट शक्यता असते. मनुष्याचे आरोग्य हे परिपूर्णसंतुलनावर आधारित असते. किरकोळ गोष्टींनीही ते ढळू शकतं. परंतु ते औषधांच्या किमान मात्रेने, डोसमुळे पुन्हा साधता येतं, म्हणजेच एक ‘कला’(ART) मानली जाते. रुग्णांच्या संभाव्य तक्रारीविषयी अगोदरच दक्ष असणं, त्याची आगाऊ काळजी घेणे आणि त्यानुसार कमीत कमी मात्रेची उपाययोजना करणे याला होमिओपॅथीमध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे.

4) होमिओपॅथिक औषधांचे प्रमाणीकरण (Doctorin of Drug Proving) —
होमिओपॅथिक ज्यांचे औषधी गुणधर्म सिद्ध झालेले आहेत अशीच औषधे दिली जातात. या सिद्धीकरणाच्या अथवा प्रमाणीकरणाच्या प्रक्रियेला ड्रग प्रूव्हिंग(Drug Proving) असे म्हटले जाते.  होमिओपॅथिक  रुग्णात जी लक्षणे आढळतात तीच, तशीच लक्षणे ज्या औषधामुळे निरोगी व्यक्तीत निर्माण होतात तेच औषध दिलं जातं. प्रत्येक औषध स्वतःच्या वैशिष्ट्यानुसार रोगलक्षण निर्माण करतं. निरोगी व्यक्तीला औषध दिलं असता, औषधाची शक्ती कळून येते व उपचार क्षमतेची माहिती मिळते.
विविध वयाच्या, वेगवेगळ्या देहस्वभावाच्या स्त्री-पुरुषांना ठराविक पद्धतीने औषध देऊन त्यांच्या लक्षणांची त्यांच्या परिणामांची नोंद केली जाते. सखोल सर्वांगीण निरीक्षण व अभ्याससानंतरच औषधांच सिद्धीकरण केलं जातं. लक्षण ही निसर्गतः रोगभाषा ( Disease) व औषध भाषा (Remedy)असतात. या नोंदीतूनच औषधांची विश्वसनीय निवड करता येते. हे सिद्धीकरण प्राण्यांच्यावर नव्हे माणसांवरच करणं आवश्यक असतं, कारण एकाच औषधाचा माणसांवरील व प्राण्यांवरील परिणाम वेग वेगळा असू शकतो. प्राण्यांवरील प्रयोगात सूक्ष्म लक्षणे कळून येत नाहीत. त्यापेक्षा म्हणजे मानसिक परिणाम प्राणी सांगू शकत नाहीत. हे सिद्धीकरण रुग्णांवर करता येत नाही. केवळ आणि केवळ निरोगी माणसांवरच करावा लागतो लागतं.

5)  जुनाट व्याधींचा सिद्धांत ( Theory of Chronic Disease) — होमिओपॅथीचे उपचार सुरू केल्यानंतर प्रारंभी डॉक्टर हॅनीमान यांच्या ध्यानात आलं की, सर्वोत्तम व सुयोग्य होमिओपॅथिक औषध दिल्यानंतरही काही रुग्ण ठराविक काळानंतर पुन्हा लक्षण उद्भवल्याने उपचारासाठी येत असत. या  प्रश्नांवर उत्तर शोधण्यासाठी जुनाट आजारांचा सुमारे 12 वर्षे सखोल अभ्यास केला. तेव्हा मूलप्राकृतिक दोषांमुळे जुनाट व्याधी निर्माण होतात हे लक्षात आले. या मूलप्राकृतिक दोषांवर  (CONSTITUTIONAL DEFECT)उपचार करूनच जुनाट व्याधींवर नियंत्रण मिळवता येतं.

6)   जीवन शक्तीचा सिद्धांत   (Theory of Vital Force) —
होमिओपॅथी मध्ये सजीवातील चैतन्यशक्ती वर भर दिला जातो. मानवी अस्तित्व हे शरीर, मन व आत्मा MIND, Body & Soul या तीन गोष्टींनी सिद्ध होतं. चैतन्यशक्तीला डॉक्टर हॅनीमान  यांनी व्हाइटल फोर्स (Vital Force) असं नाव दिलं.

   आरोग्यपूर्ण अवस्थेत हे चैतन्यतत्व सर्व कार्य व संवेदना सुरळीत ठेवत असतं. जेव्हा चैतन्यतत्त्वाचे संतुलन ढळते तेव्हा प्रेरणाशक्तीत गुणात्मक बदल होतात व ते काही असाधारण अशा शारीरिक मानसिक लक्षणांमधून व्यक्त होतात. म्हणजे या लक्षणांची गोळा बेरीज केली असता कोणताही रोग अथवा आजार दिसून येतो. उपचारांद्वारे हे चैतन्यतत्व आवश्यक तेवढं उत्तेजित करून पुनश्च संतुलन साधल जातं. जर हे चैतन्य तत्व कमालीचे क्षण झाल असेल तर कुठलाही उपचार शक्य होत नाही. रुग्णांवरील उपचारासाठी चैतन्यशक्ती, व्हाइटल फोर्स संकल्पनेचा वापर करणार होमिओपॅथी हे एकमेव शास्त्र आहे.

7) Doctrine of Dynamisation — होमिओपॅथीचा भर किमान मात्रेवर, डोसवर असतो. किमान मात्राही प्रभावी ठरावी यासाठी डॉक्टर हॅनीमान यांनी पोटनटायझेशन प्रक्रियेचा शोध लावला. सक्षमीकरण किंवा सबलीकरण म्हणजे नैसर्गिक पदार्थांमध्ये नैसर्गिक अवस्थेत क्षीण स्वरूपात, सुप्तस्वरूपात असणाऱ्या औषधी गुणवैशिष्ट्यांना जागृत करून प्रचंड अशा प्रभावि क्षमतेपर्यंत नेले जाते. त्यासाठी प्रमाणबद्ध गतीकरण प्रक्रिया वापरले जाते. ज्याला पोटेन्सी असे म्हटले जाते. या सूक्ष्म सक्षमीकरणामुळे औषधांची कार्यक्षमता वाढून त्यांचा परिणाम लवकरात लवकर मिळतो. तसेच तो  सखोल व दीर्घकाळासाठी होतो. सूक्ष्मिकरणामुळे अगदी विषारी द्रव्य औषधेही रामबाण औषध सारखी उपयोगात आणता येतात.

 

डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ)
चैतन्य होम्योपैथिक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4
शाहुपुरी व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123
रविवारी बंद  
Please Read -नक्की होमिओपॅथी तुम्हाला वाचवू शकते (Part-3)
———————————————————–
Surely Homoeopathy can save you(Part-2)
How is Homoeopathy?
      Homogeneity is the Homeopathic principle. In Homeopathy, the patient is treated on the basis of ‘similarity’ between both the Disease and the Medicine.
The fatherhood of ‘Homeopathy’ goes to Dr. Hahnemann.
Homeopathy is based on natural principles. Obviously these principles are Universal All Time.
     ‘Person as much as nature’ is considered in true sense only in Homoeopathy. Medicine is given based on the uniqueness of the patient and not on the name of any disease. This uniqueness of the individual is expressed mainly during illness. Each person’s response to drugs is different because everyone’s susceptibility is different. What’s more, even in one person, it varies between diseased and healthy states.
     Experience has proven that the human body responds more to Homoeopathic medicine than any other medicine in the diseased state.
      The hallmark of Homoeopathy is that ‘one medicine can be effective against many diseases’. Each Homoeopathic medicine has its own identity. There is individuality. So one medicine cannot replace another medicine. So finding the most suitable one for any patient is a challenge for Homoeopathic doctors. It can be said that the practice of Homoeopathy is an ‘Art’.
    1) Law of Similia – Similia Similibus Curator is the basic principle of Homoeopathy. Simply put, “fork with a fork”. Among all medicinal substances, Homoeopathic medicines have the power to produce symptoms of disease when administered to a healthy person. A medicine is given which produces similar symptoms in a healthy person as in the patient. There has to be a match between the patient’s disease and the medicine. In this method of treatment based on symptom analogy, the drug most similar to the available symptom group is given to the patient.
       2) The Single Remedy (Law of Simplex) – In Homoeopathy, a single remedy is given at a time. Each Homoeopathic medicine is independently proven to be effective. Finding the single most “symptomatic” drug for any patient’s particular situation is an art. Only if the right medicine is given, the patient gets cured, otherwise there is temporary relief.
      Homoeopathy does not give a combination of many medicines because each medicine has a different action. If more than one combination of our medicine is given, the desired effect is not achieved due to different mode of action. So it is unscientific to mix different medicines. Since it is not possible to determine which drugs have had the exact effect, the direction of further treatment is not known.
      A combination of more than one drug is a new drug. In Homoeopathy not only one medicine is used for a patient, some diseases may require more than one medicine. But instead of giving them together, after the action of one drug is over, the other drug is given according to the symptoms.
    Since only one medicine is suitable for a particular set of symptoms, changing Homeopathic medicine is an important decision (as much as the decision to operate). It has to be taken with full thought and conviction.
      3) Law of Minimum 
The suitability of Homoeopathic medicines is not only limited to the choice of medicine but also the right administration of the medicine.
     Adequate dose is minimum dose. Homoeopathy focuses on gentle treatment, so minimal but very reasonable doses are used.
      That is, the dose of Homoeopathy should be so small that it will do just what is needed without unduly affecting the basic balancing power of the individual. Due to such minimal amount, any adverse effect due to dosage is avoided as much as possible.
     ‘Drug addiction’ is avoided. More than the required dose is very likely to cause side effects on the body. Human health is based on perfect balance. Even minor things can cause it to fall. But it can be remedied by a minimum amount of medicine, dosage, that is, Homoeopathy is considered as an art. Being aware of the potential complaint of the patients, taking care of it in advance and taking minimum measures accordingly is of unique general importance in Homoeopathy.
         4) Doctorin of Drug Proving –
Homoeopathic medicines are given as medicines which have proven medicinal properties. This process of verification or validation is called Drug Proving.
      Homeopathic medicine is given the same symptoms as it causes in a healthy person. Each drug produces its own characteristic symptoms. When a medicine is given to a healthy person, the potency of the medicine is known and information about the healing potential is obtained.
Men and women of different ages, different constitutions are given medicine in a certain way and their symptoms and results are recorded. Medicines are approved only after thorough comprehensive observation and study. Symptoms are in nature the language of disease and the language of medicine. It is only from this record that reliable selection of medicines can be made. This validation should be done on humans and not on animals, because the same drug may have different effects on humans and animals. Subtle symptoms are not detected in animal experiments. Rather, the mental effects cannot be predicted by animals. This proof cannot be done on patients. It should be done only on healthy people.
          5) Theory of Chronic Disease – After starting the treatment of Homoeopathy, Dr. Hahnemann noticed that even after giving the best and suitable Homoeopathic medicine, some patients would come for treatment after a certain period of time due to recurrence of symptoms. To find answers to these questions, chronic diseases were studied intensively for about 12 years. Then it was realized that, chronic diseases are caused due to fundamental defects. Chronic diseases can be controlled only by treating these underlying defects.
       6) Theory of Vital Force —
Homoeopathy focuses on the vitality of the living organism. Human existence is proved by three things, body, mind and soul. Dr. Hahnemann named Chaitanya Shakti as Vital Force.
In a healthy state, this vitality keeps all functions and senses in order. When the balance of consciousness is disturbed, there are qualitative changes in the motivational force and they are expressed in some extraordinary physical and mental symptoms. That is, when these symptoms are summed up, any disease or illness is seen. Through treatment, this vitality is stimulated and re-balanced.
     If this Chaitanya Tattva is at an extreme moment, no treatment is possible. Homeopathy is the only science that uses the concept of vital force to treat patients.
  7) Doctrine of Dynamisation –– Homoeopathy emphasizes on minimum quantity, dose. Dr. Hahnemann invented the process of potentization to make even the smallest amount effective. Potentization  is the awakening of the latent medicinal properties of natural substances in their natural state, in a weakened form, to a greater potency.
   A proportional acceleration procedure is used for this. That is called potency. This subtle potentisation increases the efficiency of medicines and gives them their effect sooner. Also it is deep and long lasting.
Micronization can make even toxic drugs useful as panaceas.
Dr Ajay Hanmane
M.D.(Homeo)
Chaitanya Clinic
1st Floor, F4,
Bhaskar Plaza Vyapari Peth,
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
Mobile No. 7738667123
Sunday Closed
Please READ -Surely Homoeopathy can save you (Part-3)