त्वचारोग व होमिओपॅथी – भाग एक
त्वचाही शरीरातील सर्वात मोठा अवयव आहे. त्वचा ही पंचज्ञानेंद्रियांपैकी एक असून शरीराची “संरक्षक भिंत” अशीच त्वचेची ओळख म्हणता येईल.
वातावरणातील बदलणारे तापमान, आर्द्रता, जिवाणू, विषाणू, बुरशी व किरणोत्सर्गापासून शरीराच्या बचाव करण्याचे मुख्य कार्य त्वचाच पार पाडत असते.
त्वचेला निसर्गाने प्रत्येक मनुष्यास दिलेला “नैसर्गिक पोशाख”जरी म्हटले तरी प्रत्येकाच्या त्वचेत बराच फरक असतो. कुणाची त्वचा काळी, कोणाची गोरी, कोणाची खरबरीत, तर कोणाची गुळगुळीत किंवा तेलकट असते. देश, प्रांत, वातावरण यानुसार त्वचेचा रंगही बदललेला दिसून येतो.
एखाद्याची सुंदर त्वचा व कांती जशी इतरांना आकर्षित करते, त्याचप्रमाणे त्वचारोग झालेला मनुष्य मात्र एकटा पडतो, कारण त्वचा रोगाविषयी समाजमनात आजही अनेक गैरसमज आहेत.
संपूर्ण शरीराचे फक्त एक बाह्य आवरण दिसत असलेली त्वचा ही प्रत्यक्षात तीन आवरणात विभागली आहे.
•बाह्य आवरण
• अंत:त्वचा
• चरबीचा थर
निरोगी त्वचा ही मृदू पातळ व तेजस्वी दिसते. तिच्यावर आलेले लव व केससुद्धा पातळ आणि विरळ असतात. त्वचेवर अनेक सूक्ष्मजंतू वास करीत असतात, मात्र त्यामुळे नेहमीच त्वचेचे विकार उद्भवत नसतात कारण साधारण त्वचेची नैसर्गिक प्रतिकारशक्ती, काळानुरूप त्वचेचा बदलणारा स्तर, त्वचेतून वेळोवेळी स्निग्धांश पाझरने यासोबत काही द्रव्य हे सूक्ष्म जीवाणूंपासून त्वचेचे रक्षण करीत असतात.
त्वचारोग म्हटलं की जीवनभरासाठी हा रोग जडला असा सर्वसाधारण समज आहे. अशा रुग्णांना बाहय उपचार आणि प्रभावी औषधे काही काळासाठी आराम देत असली तरी कालांतराने त्वचेचा हा त्रास पुन: पुन्हा उद्भवत असतो. त्वचेचा रोगी अनेक उपचार घेऊन कंटाळलेला असतो. अतितीव्र औषधोपचारामुळे त्वचेच्या रोगासोबत त्याला इतर त्रास देखील सहन करावे लागतात.
त्वचेचा रोग हा जीवघेणा नसला तरी सर्वांना आकर्षित करणारी निरोगी त्वचा अशा रुग्णांना समाजापासून दूर करीत असते किंवा अशा रुग्णांना समाजात मिसळताना अवघडल्यासारखे वाटते. हा रोग ‘लागट’ असावा काय? अशी त्या मागची मुख्य भीती असते.
साधी खाज, बुरशी, विषाणूमुळे होणारे आजार,जिवाणू पासून होणारे त्वचारोग, त्याचप्रमाणे सोरायसिस, विटीलिगो (Vitiligo) कोड, मानसिक तणावांमुळे निर्माण होणारा न्यूडरमेटाईटिस ( Neurodermatitis) लायकेन प्लॅनस ( Lichen Planus) या सर्व रोगांकडे बघण्याचा होमिओपॅथिक चिकित्सा शास्त्राचा दृष्टिकोन हा इतर चिकित्सा शास्त्रांपेक्षा,आधुनिक वैद्यक शास्त्रापेक्षा वेगळा आहे.
मानवी शरीराचा बारकाईने आणि काळजीपूर्वक अभ्यास केल्यानंतर डॉक्टर सॅम्युअल हॅनिमान यांच्या असे लक्षात आले की, आनुवंशिक गुणधर्मासह आई-वडिलांकडून मिळालेली ही शरीररुपी भेट आयुष्यभर निरोगी आणि रोगी अवस्थेतही अवस्थेतही वातावरणातील विविध घटकांचा प्रतिकार करून शरीर लक्षणांच्या माध्यमातून माहिती देत असते. पण वर विचार करणारे याकडे दुर्लक्ष करीत असतात. डॉक्टर सॅम्युअल हॅनिमान यांनी या विषयावर महत्वपूर्ण प्रयोग करून अवयवांमध्ये विकृती निर्माण होण्यापूर्वी रोगावर प्रतिबंध घालणारी अनेक औषधे होमिओपॅथिक चिकित्सा शास्त्रामध्ये शोधली आहेत.
जेव्हा व्यक्तीचे शारीरिक, मानसिक आध्यात्मिक आणि आणि सामाजिक आरोग्य चांगले असते तसेच बाह्य वातावरणातील घटकांशी संबंध येऊनही त्याचे शरीर कोणतेही लक्ष निर्माण करीत नाही तेव्हा, त्या व्यक्तीची शारीरिक अवस्था निरोगी आहे असे समजतात. या निरोगी अवस्थेत सर्व पेशी अवयव संस्था सुरळीत आणि शिस्तबद्ध कार्य करीत असतात. त्यावेळी वातावरणातील जीवजंतूंचा त्याचप्रमाणे बाह्य घटकांचा शरीरावर कोणताही दुष्परिणाम होत नसतो.
पण या उलट रोगीअवस्थेत,पेशींपासून ते अवयवांपर्यंत आणि नंतर सर्व संस्थांमध्ये (Systems) असंतुलन निर्माण होत असते. शारीरिक व मानसिक स्तरावर लक्षणे निर्माण होऊ लागतात म्हणजेच आत्मा शरीर आणि मन (Mind- Body- Soul Axis) हे तीनही घटक एकमेकांच्या सहकार्याने काम करीत असतात व ते काम चैतन्यशक्तीच्या (Vital Energy) माध्यमातून होत असते, त्यात बिघाड झाल्याने शरीरातील अवयवांमध्ये अस्थीरता निर्माण होते.
त्रिदोष या रोगदोषाच्या(Psora+ Sycosis + Syphylis) प्रभावात आल्यामुळे शरीराचे कार्य नियंत्रणात ठेवणाऱ्या चैतन्यशक्तीचे (Vital Energy) कार्य बिघडते. जर शरीराची प्रतिकारशक्ती ( Immune system) चांगली असेल तर शरीर स्वतःहून या रोगदोषांना दूरीकरणाच्या ( Elimination) माध्यमातून तसेच नैसर्गिक स्रावाच्या आणि त्वचेवरील पुरळ यांच्या माध्यमातून बाहेर टाकण्याची प्रक्रिया करीत असते यालाच शरीर ” नैसर्गिक शुद्धीकरण प्रक्रिया” असे म्हणतात.
सर्व त्वचारोग हे मानवी शरीरातील अंतर्गत तणावाचे, कार्याचे व रोगाचे पर्यावर्तक असतात. म्हणूनच त्वचेला ‘पारदर्शक आरसा‘ म्हटले जाते, कारण मानवी शरीरात सुरू असलेल्या हालचाली तसेच निरनिराळ्या रोगांच्या विविध छटांची प्रतिमा ही सर्वप्रथम त्वचेवर दिसून येत असते.
होमिओपॅथिक उपचार सुरू असताना जर रुग्णाच्या शरीरावर पुन्हा पुरळ किंवा त्वचारोग आल्यास आणि रुग्णाने पूर्वी बरा झालेला त्वचारोग पुन्हा उत्पन्न झाला असे सांगितल्यास हा नवीन त्वचा रोग नसून त्वचेच्या माध्यमातून निघालेला आंतरिक रोग असतो. तसेच उपचार सुरू पुढे सुरू ठेवल्यास त्वचारोग पूर्णतः बरा होतो.
कोणत्याही प्रकारची त्वचारोग मुळापासून दूर करण्यासाठी उपचार पद्धती ही बाह्य स्वरूपाची नसावी तर ती वैयक्तिक आणि आंतरिक रोगदोष बरा करणारी अशी होमिओपॅथिक चिकित्सा पद्धतीप्रमाणे असावी.
डॉ. अजय हनमाने
एम. डी. (होमिओ)
चैतन्य होम्योपैथिक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4
शाहुपुरी व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123
रविवारी बंद
कृपया पुढील लेख वाचा —
त्वचारोग व होमिओपॅथी – भाग 2
————————————————————————————–
The skin is also the largest organ in the body. Skin is one of the five senses and can be called the “protective wall” of the body.
The main function of the skin is to protect the body from the changing temperature, humidity, bacteria, viruses, fungi and radiation in the environment.
Although the skin is called the “Natural Garment” given by nature to every human being, everyone’s skin is very different. Some have dark skin, some fair, some rough, some smooth or oily. Skin color also changes depending on the country, region, environment.
Just as one’s beautiful skin and radiance attract others, a person with skin disease becomes lonely, because there are still many misconceptions about skin disease in the society.
The skin, which appears to be only one outer covering of the entire body, is actually divided into three layers.
•Outer cover
• Intradermal
• Fat layer
Healthy skin looks smooth and radiant. Her hair and hair are also thin and sparse. Many microbes live on the skin, but they do not always cause skin disorders because the natural immunity of the skin, the changing layer of the skin over time, the secretion of lipids from the skin from time to time along with some substances protect the skin from the microbes.
There is a general belief that Skin Disease is a lifelong disease. Although external treatment and effective drugs provide temporary relief to such patients, the skin problem reoccurs over time. A skin patient is tired of many treatments. Along with the skin disease, he also suffers from other problems due to intensive treatment.
Although the skin disease is not life-threatening, the attractive healthy skin may alienate such patients from society or make it difficult for such patients to socialize. Should this disease be ‘Contagious’? Such is the main fear behind that.
The approach of Homoeopathic medicine is to look at all diseases like simple itch, Fungi, viral diseases, bacterial dermatitis, Psoriasis, vitiligo-(code), Neurodermatitis caused by Mental stress, Lichen Planus, unlike other medical sciences. It is different from modern medicine.
After careful and careful study of the human body, Dr. Samuel Hahnemann realized that, this bodily gift received from parents along with genetic traits is transmitted throughout life through resistance to various environmental factors in healthy and diseased states through body symptoms.
But those who think above are ignoring this. Dr. Samuel Hahnemann conducted important experiments on this subject and discovered many medicines in Homoeopathic medicine that prevent diseases before they develop in the organs.
When a person is in good physical, mental, spiritual and social health and when his body does not cause any attention despite the interaction with the factors of the external environment, then the physical state of the person is considered to be healthy.
In this Healthy state, all the cells and organ systems are functioning smoothly and in a disciplined manner. At that time, the organisms in the environment as well as the external factors do not have any adverse effects on the body. But on the other hand, in a diseased state, from cells to organs and then in all systems, there is an imbalance. Physical and mental symptoms start to appear, i.e. Mind-Body-Soul Axis, all the three elements are working in cooperation with each other and that work is done through Vital Energy.
Due to the effect of Tridosha (Psora + Sycosis – Syphylis), the function of Vital Energy which controls the body function is impaired. If the immune system of the body is good, then the body itself is doing the process of removing these diseases through elimination and through natural secretions and rashes on the skin, this is called “natural cleansing process“.
All skin diseases are the internal stress, function and disease variables of the human body. That’s why the skin is called a ‘transparent mirror’, because the image of the movements going on in the human body as well as the various shades of various diseases are first seen on the skin.
If a rash or dermatitis reoccurs during homeopathic treatment and the patient states that previously cured dermatitis has recurred, it is not a new skin disease but an internal disease originating through the skin. Also, if the treatment is continued, the skin disease is completely cured.
The treatment method for rooting out any type of skin disease should not be external but it should be like homeopathic medicine which cures individual and internal disease.
Dr. Ajay Hanmane
M. D. (homeo)
Chaitanya Homeopathic Clinic
Bhaskar Plaza- F4
Shahupuri Traders Peth
Near Railway Gate Bhaji Mandai
Kolhapur- 416001
Mobile- 7738667123
Sunday Closed
Please Read Next Article–
Skin Disease & Homoeopathy – Part 2