मुलांमधील बंडखोर वृत्ती आणि होमिओपॅथी / Rebellious Behavior in Children and Homoeopathy 

Dorctor Pic By Dr. Ajay HanmaneApril 8, 2024 Anxiety Behaviour problems Children Problems General Information Homeopathic and Cure Mental Health

मुलांमधील बंडखोर वृत्ती आणि होमिओपॅथी

निखिलच्या आई आईने जवळ त्याला जवळजवळ ओढतच केबिनमध्ये आणलं आणि त्याला समोरच्या खुर्चीत बसवलं. “मला नाही यायचं आत. मला बाहेरच थांबायचय.” किंचाळून निखिल आईच्या हाताला हिसडा देऊन बाहेर पडला.
“निखिल बऱ्या बोलणं आत येतोयस ? का देऊ एक फटका ?”असे म्हणून त्याच्या आईने त्याला मारले.
“डॉक्टर, बघा हे असं चाललेलं असतं रोज. घरी प्रत्येक गोष्टीत याचा नकार. उलट बोलायचं, उलट वागायचं त्याच्या वागण्याला आम्ही खूप कंटाळलो आहे.” निखिलच्या आईने त्याच्यासमोर हात टेकले होते.
एका तेरा वर्षाच्या मुलाला घेऊन आई-वडील “चैतन्य होमिओपॅथिक क्लिनिक “मध्ये आले होते. ” तो अतिशय हुशार पण बंडखोर वृत्ती. प्रत्येक गोष्टीत वाद घालणारा. विरोधाला विरोध करणारा. एकही संवाद त्याच्याशी धड करता येत नाही. आमचा साध्या बोलण्याचे रूपांतरही वादतच होते.”
आताही तुमच्याकडे यायला स्पष्ट नकार दिला. म्हणाला, “मला नाही तुम्हा पालकांना ट्रीटमेंट ची गरज आहे.”
काही वेळा मुलांमध्ये नकारात्मकता मानसिक समस्येचे रूप धारण करते. या याला समस्येला “ओपोझिशनल डिफाइन डिसऑर्डर ( Oppositional Defined Disorder – ) ” असे म्हणतात.
अशी बंडखोर वृत्तीची असणारी मुलं त्यांच्या वयाला, अपेक्षित पेक्षा जास्त नकारात्मक, आक्रमक, विरोधी आणि ते आवेशपूर्ण पूर्ण वागतात. या समस्या अगदी अपवादात्मक नाहीत.
 मुलांमधील नकारात्मकता  त्यांची विरुद्ध आणि वेगळी वागण्याची वृत्ती, हा बहुसंख्या पालकांच्या डोकेदुखीचा विषय असतो. वैतागलेले, गोंधळलेले पालक कधीकधी गोंजारून, कधी मारून किंवा शिक्षा करून मुलांना आज्ञाधारक बनवण्याचा असफल प्रयत्न करतात. पण बऱ्याचदा अशा वागण्याने मूलं अधिकच बंडखोर होताना दिसते.
या मुलांना हाताळायचं कसं हे समजण्यासाठी पालकांना मुलांची मानसिकता, त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्वाची टप्पे माहीत असण्याची गरज असते.
लहान मूल साधारणतः वर्ष-दीड वर्षाचं झालं की, त्याच्या वागण्यातून आपल्याला त्याची वेगळी अभिव्यक्ती जाणवू लागते. या वयात मुलांना सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीबद्दल खूप कुतूहल असते. प्रत्येक गोष्ट स्वतः हाताळून पाहायची असते.  प्रत्येक काम स्वतः करायचं असतं. सोफ्यावर उडी मारू नको म्हटलं की, हमखास उडी मारून पाहायचे असते.
भराभर कपडे घाल म्हटलं की, घरभर पळून आईची दमछाक करून सोडायची. मी काचेच्या ग्लास मधूनच दूध पिणार. मी बाबांच्या सारखं चमच्यानेच खाणार. मला आज नवा फ्रॉक घालायचा आहे. म्हणून स्वतःच्या मनाप्रमाणे वागण्यासाठी हेका धरायचा, इत्यादी इत्यादी अशी त्यांची सर्वसाधारण रूप असतात.
आपण एक वेगळी व्यक्ती आहोत. आपल्यालाही स्वतःच्या अशा आवडीनिवडी आहेत, वेगळी मत आहेत, याची त्यांना जाणीव व्हायला लागते.
 ही ” स्व “ची जाणीव त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाचा एक महत्त्वाचा टप्पा असतो. त्यातूनच त्यांची “स्व-प्रतिमा (Self Image)” तयार होणार असते.

आत्मविश्वास वाढणार असतो. स्वतःच्या हाताने सांडत सांडत का होईना पण जेवता येऊ लागल्यानंतर त्यांना कोण आनंद होतो, पण आपल्या भोवती भाताची शिते सांडून आईचे काम दुप्पट करतो किंवा दूध पिताना काचेचा ग्लास फुटला तर इजा होईल या गोष्टी त्यांना ठाऊक नसतात. त्यामुळे इतरांची गैरसोय होते. इतरांना त्रास होतो हे कळण्याचे त्यांचं वय नसतं.

 पण पालकांना मात्र मुलांच्या या वागण्याचा राग येतो. आपलं मूल मुद्दाम उलट वागून आपल्याला त्रास देत आहे. उद्धटपणाने वागते आहे असे वाटून पालक चिडतात. पुढे मूल हाताबाहेर जाईल या भीतीनेच कोवळ्या बाल वयातच मुलांना शिस्त लावू पाहतात. पण चुकीच्या पद्धतीने आणि आवश्यक नसताना शिस्तीचा बडगा वापरल्याने मुलांची नकारात्मकता वाढण्याची शक्यता असते. म्हणून पालकांनी काही विशेष गोष्टीचा भान ठेवायला हवं.
वयाच्या एक दीड वर्षापासून ते साडेतीन वर्षापर्यंत मुलं खूप नकारात्मक वागतात. हा त्यांच्या विकासातला खूप महत्त्वाचा टप्पा आहे. याचा उगाचच बाऊ केला, त्याची चर्चा मुलांसमोर केली तर वागण्यात हमखास वाढ होते.
मुलं दमलेली, भुकेलेली असतील, आजारी वा मनाने अस्वस्थ असतील तर, त्यांच्यामध्ये नकारात्मकता वाढते. अशावेळी पालकांनी अधिक प्रेमाने व संयमाने वागणं योग्य असतं.
लहान मुल असताना त्यांच्या नकाराकडे दुर्लक्ष करून, त्यांचं लक्ष विचलित करून, हसत खेळत त्यांच्याकडून पाहिजे ती गोष्टी करवून घेणे यातच पालकांचे खरं कसब आहे.
” चल दात घास किंवा खेळणी आवर”  असे हुकून देण्यापेक्षा, “जेवल्यावर आपण काय केलं पाहिजे ? किंवा मी दहा अंक मोजेपर्यंत कोण खेळणे आवरते ? अशा तऱ्हेने  सांगितलेल्या गोष्टी करण्यात मुलांना गंमत वाटते.
जेव्हा मुलांची सुरक्षितता धोक्यात असते, उदाहरणार्थ मुलं सुरी बरोबर खेळत असेल, तर पालकांनी ठामपणे प्रतिबंध करणे गरजेचे असते. पण कारणांशिवाय मुलांवर खूप बंधनं घालणे, सोप्यावर पाय ठेवू नको, रेडिओला हात लावू नको, मोठ्याने बोलू नको, असे खूप नियम घातल्याने मुलांमध्ये नियम मोडण्याची प्रवृत्तीच वाढू लागते.
अति शिस्त, सतत टिका, कडक शिक्षा यामुळे मूल अधिक बंडखोर बनण्याची शक्यता असते.

मुलांमधल्या अशा बंडखोर व्यक्तीला वैद्यकीय परिभाषेत “ओपोझिशनल डिफाईंड डिसऑर्डर (ODD)” असे म्हटले जाते..

प्रत्येक मुलाचा स्वभाव खूप वेगळा असतो. काही मुलं जात्याच खूप हटवादी आणि बंडखोर असतात, तर काही आज्ञाधारक आणि मवाळ. पण बऱ्याचदा असं दिसतं की, चुकीच्या पालकत्वामुळे मुलांमधील नकारात्मकता वाढत जाऊन त्यांच्यात बंडखोर वृत्ती म्हणजेच  “ओपोझिशनल डिफाईंड डिसऑर्डर (ओ.डी.डी) बळावते.
साधारण शाळेतल्या पाच ते पंधरा  वयाच्या मुलांमध्ये ही समस्या आढळते. या समस्येची ठोस कारणं जरी माहीत नसली तरी मुलाचा मूळचा अडमुठा स्वभाव, पालकत्वाच्या सदोष पद्धती आणि घरचं वातावरण अशा अनेक गोष्टी याकरता जबाबदार असतात, असं अभ्यासक मानतात.
या समस्ये बरोबर मुलांमध्ये अतिचंचलता, अध्ययन  अक्षमता, भावनिक अस्थिरता अशा अनेक  समस्याही आढळतात.
मुलं मोठी होताना मुलांना शिस्त किंवा वळण लावण्याच्या बाबतीत अनेकदा पालकांच्या वर्तवणुकीत सातत्याने सातत्य नसते. कधी पालक मुलांच्या अवास्तव मागण्या पूर्ण करतात, त्यांच्यावर लाडाचा, खेळण्याचा वर्षाव करतात, तर कधी काही वेळा केवळ वर्चस्व किंवा अधिकार गाजवण्यासाठी मुलांच्या प्रत्येक गोष्टीला नकार देतात. अधिक क्षुल्लक कारणांवरून मुलांना वेडेवाकडं बोलतात, रागावतात, मारतात. रागाच्या भरात मुलांना मूर्ख’, “गाढव “, “बेअक्कल “,  अशी दुषणं दिली जातात.
शिस्तीच्या नावाखाली, “नीट वागला नाहीस तर बोर्डिंगला टाकू”,अशा धमक्या दिल्या जातात.
पालकांच्या अशा वागण्याने मुलं दुखावतात. पालकांच्या या मनमानीचा त्यांना राग येतो, तिरस्कार वाटतो, मग मनातला राग बंडखोरीतून व्यक्त होऊ लागतो. जी गोष्ट पालकांना आवडणार नाही किंवा जास्तीत जास्त मन:स्ताप होईल त्याच गोष्टी मुलं करू लागतात. यात आपण स्वतःच्या आयुष्याचे नुकसान करतो याची त्यांना भान राहत नाही.
शिवाय त्या घरातलं अशांत तणावपूर्ण वातावरण, मोठ्या माणसांची शिस्तीबाबत एक वाक्यता नसणं, पालकांमधल्या मानसिक समस्या –  उदाहरणार्थ अति राग, नैराश्य, इत्यादी अनेक गोष्टी मुलांना बंडखोर बनवण्यास कारणीभूत ठरू शकतात.
बंडखोर वृत्ती ही समस्या असणाऱ्या मुलांच्या काही लक्षणे प्रामुख्याने दिसतात–
 •आक्रास्ताळेपणा व भावनांवर ताबा नसतो,
 •मोठ्या माणसांशी व इतरांशी वाद घालणे, मुद्दाम विरुद्ध वागणं किंवा असहकार दर्शवणे,
  •इतरांना त्रास होईल, राग येईल अशी वर्तवणूक,
•इतरांना दोष देणं,
•सूडबुद्धी,
•तापटपणा,
•अपशब्द वापरणे,
•मुद्दाम अवज्ञा करणे, नियम मोडणं,
•स्वतःच्या चुकांचं खापर दुसऱ्यावर फोडणे…
मुलांमधील ही आव्हानात्मक समस्या हाताळताना पालकांनी काही गोष्टी कटाक्षाने पाळणं हितकारक ठरतं.
1) ही मुलं मुद्दाम नकारात्मक किंवा त्रास होईल अशी वागत असल्याने संयमणे व प्रेमाने वागण्याने पालकांची कसोटी लागते.
 2) रागावलेल्या मुलांवर आणखी रागावल्याने  विसंवाद वाढतो किंवा शिस्त लावण्याचा प्रयत्नही व्यर्थ असतो. त्यापेक्षा दैनंदिन व्यवहारात काही नियम ठरवल्याने रोजचा वाद टळतो.
उदाहरणार्थ-  दात घासल्यावरच दूध मिळेल, दररोज अर्धा तास टीव्ही पाहायचा इत्यादी….अर्थातच अशा नियमात सातत्य व ठामपणा असणे आवश्यक असतं.
 3) मुलांना शिस्त लावताना अति जाचक नियम, शारीरिक शिक्षा, अपमानास्पद वर्तवणूक कटाक्षाने टाळावी.शिस्तीत सातत्य व एक वाक्यता हवी.
4) मुलांना एक व्यक्ती म्हणून प्रेमाने व आदराने वागवावे. त्यांच्या भावनांना व इच्छांना व्यक्त करण्याची संधी द्यावी.
काही वेळा अशा समस्या खूप उग्र स्वरूप धारण करतात. अशावेळी समुपदेशन, वर्तणूक उपचार अशा औषधोपचारांची गरज असते. अशा मुलांना होमिओपॅथिक औषधे उपचारांनी खूप फायदा होतो.
होमिओपॅथी मध्ये मनुष्याच्या स्वभावाचा, व्यक्तिमत्त्वाचा सखोल अभ्यास करून औषधे निवडली जातात. त्यामुळे मुलांच्या मनातील असुरक्षितता, राग, नकारात्मकता कमी होऊन त्यांना मानसिक दृष्ट्या अधिक संतुलित होण्यास मदत होते.
होमिओपॅथीमध्ये या समस्येवर  अत्यंत गुणकारी औषधे आहेत ती लक्षण साधम्याऀवरुन देता येतात.

डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ) HHF, ICR Kolhapur,
चैतन्य होमिओपॅथीक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4, HDFC बॅंकेजवळ,
शाहुपुरी, व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123
रविवारी बंद  

कृपया पुढील लेख वाचा  —


Rebellious Behavior in Children and Homoeopathy

Nikhil’s Mother almost dragged him into the cabin and seated him in the front seat. “I don’t want to come in. I want to stay outside.” Screaming, Nikhil shook his Mother’s hand and came out.
“Are you coming in to talk to Nikhil ? Otherwise I will slap you ? So his Mother slapped him.
“Doctor, look, it’s been like this every day. It’s been denied in everything at home. We’re so tired of his behavior of saying the opposite, acting the opposite.” Nikhil’s Mother become helpless in front of him.
Parents came to “Chaitanya Homeopathic Clinic” with a thirteen year old son. ” He is very intelligent but has a Rebellious Attitude. Arguing about everything. Opposing the opposition. No dialogue can be attempted with him. Even our conversion to plain speaking was controversial.”
Even now he flatly refused to come to you. “You parents need treatment, not me,” he said.
Sometimes negativity in children takes the form of Psychological problems. This problem is called “Oppositional Defined Disorder”.
Children with this rebellious attitude tend to be more negative, aggressive, antagonistic, and impulsive than expected for their age. These problems are not at all exceptional.
Negativity in children, their opposite and different behavior, is a headache for many parents. Frustrated, confused parents try unsuccessfully to make children obey, sometimes by humming, sometimes by hitting or punishing.
But often with such behavior children seem to become more rebellious. But to understand how to handle these children, parents need to know the Mentality of the children, the important stages of their personality development.
When the child is usually one and a half years old, we start to feel different expressions from his behavior.
Children at this age are very curious about everything around them. Everything has to be handled by oneself. Every work has to be done by oneself.
If you don’t want to jump on the sofa, you definitely want to jump. When she told me to wear full clothes, she used to run around the house and leave her exhausted. I will drink milk from a glass. I will eat with a spoon like Dad. I want to wear a new frock today.  They become obstinate to act according to one’s own Mind. So this is common pattern in  these children.
We are a different person. They start to realize that we also have our own likes and dislikes, different opinions.
This awareness of “Self”(” स्व “) is an important stage in their personality development. From that, their “Self-Image”(“स्व-प्रतिमा”) will be formed.
Confidence will increase. Who is happy after being able to eat, even if it is spilled with his own hands, but he doubles the Mother’s work by spilling a bowl of rice around him, or does not know the harm caused by breaking a glass while drinking milk. It causes inconvenience to others. They are not old enough to know that others are suffering.
But parents are angry with this behavior of children. Your child is causing you trouble by deliberately acting contrary. Parents get angry because they feel that they are being rude.
Youngsters try to discipline children at an early age, fearing that the child will get out of control. But using the discipline rules incorrectly and unnecessarily is likely to increase children’s negativity. So parents should be aware of something special.
From the age of one and a half to three and a half years, children behave very negatively. This is a very important stage in their development. If this is discussed in front of children, there is a definite increase in behavior.
If children are tired, hungry, sick or upset, negativity increases in them. In such a case, parents should behave with more love and patience. The real skill of parents is to ignore their rejection, distract them, laugh and play and get them to do what they want when they are young.
Instead of saying, “Let’s brush our teeth or play time,” kids have fun doing things like, “What should we do after dinner ? Or who’s going to stop playing until I count to ten ?”
When children’s safety is at risk, for example if children are playing with knives, parents need to take firm precautions.
But putting too many rules on children for no reason, such as don’t step on the easy, don’t touch the radio, don’t talk loudly, the tendency to break the rules increases in the children.
Excessive discipline, constant criticism, harsh punishments are likely to make the child more rebellious.

Such rebelliousness in children is called “Oppositional Defiant Disorder (ODD)” in medical terminology.

Every child has a very different personality. Some children are naturally very stubborn and rebellious, while others are obedient and soft. But it is often seen that due to wrong parenting, negativity increases in children and leads to oppositional defiant disorder (ODD).
This problem is found in children aged 5 to 15 in normal school. Although the exact causes of this problem are not known, the researchers believe that many things like the child’s stubborn nature, faulty parenting methods and the home environment are responsible for it.
Along with this problem, many problems like hyperactivity, learning disability, emotional instability are also found in children.
As children grow older, there is often no consistency in parenting behavior when it comes to discipline. Sometimes the parents fulfill the unreasonable demands of the children, shower them with pampering, playing, and sometimes they deny everything to the children just to assert dominance or authority.
For more trivial reasons, children are talked crazy, angry, beaten. In anger, children are called ‘stupid’, ‘ass’, ‘stupid’.
In the name of discipline, threats such as “boarding if you don’t behave well” are given.
Such behavior of parents hurts children. They get angry and hate this arbitrary behavior of their parents, then the anger in the Mind starts to express itself through rebellion.
Children start doing the things that the parents will not like or that will cause maximum Hurt. They don’t realize that they are harming their own lives. Moreover, turbulent and stressful environment in the home, lack of discipline by adults,
psychological problems in parents – for example excessive anger, depression, etc. can cause children to become rebellious.
Some of the symptoms of children with rebellious attitude problem are mainly–
Aggression and lack of control over Emotions,
•Arguing with adults and others, deliberately acting contrary or uncooperative,
•Behavior that will cause trouble, anger to others,
Blaming others,
•Vengeance,
• Warmth,
•Using profanity,
• Willfully disobeying, breaking rules,
Blaming others for one’s mistakes…
While dealing with this challenging problem in children, it is beneficial for parents to follow a few things carefully.
1) As these children deliberately behave in a negative or disruptive manner, patience and love are tested by parents.
2) Getting even more angry at angry children increases conflict or even attempts at discipline are futile. Rather, by setting some rules in daily life, daily disputes are avoided.
For example – you will get milk only after brushing your teeth, watching TV for half an hour every day etc… Of course, consistency and firmness is necessary in such a rule.
3) When disciplining children, overly oppressive rules, corporal punishment, abusive behavior should be carefully avoided. Discipline should be consistent and coherent.
4) Treat children as individuals with love and respect. Give them a chance to express their feelings and wishes.
Sometimes such problems take a very serious form. In such cases, counseling, Behavioral therapy and Medication are needed. Such children benefit greatly from the treatment of Homoeopathic Medicines.
In Homeopathy, Medicines are selected after a thorough study of human nature and personality. Therefore, the insecurity, anger, negativity in the Mind of Children is reduced and helps them to become more Mentally balanced.
Homoeopathy has very effective Medicines for this problem which can be given based on the symptoms.

 

Dr Ajay Hanmane
M.D.(Hom) HHF, ICR Kolhapur,
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4, Near HDFC Bank,
Bhaskar Plaza Vyapari Peth, Shahupuri
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
Mobile No. 7738667123
Sunday Closed.

Please Read Next Article-