तारुण्याचे वळणबिंदू आणि होमिओपॅथी / Puberty and Homeopathy

Dorctor Pic By Dr. Ajay HanmaneDecember 2, 2024 Behaviour problems Homeopathic and Cure Mental Health

  तारुण्याचे वळणबिंदू आणि होमिओपॅथी

सर्वसाधारणपणे जे मानसशास्त्रीय लेख लिहिले जातात त्यात समस्येचं स्वरूप, त्याचं विश्लेषण, उपाय यांची चिकित्सा असते.
समुपदेशनातील ” भावनानिष्ठ “ हे  एक तंत्र आहे. यात मुख्यतः आपल्या भावनिक प्रक्रिया बदलण्यावर भर दिला जातो. समस्याग्रस्तांचा संवाद ज्या व्यक्तीबरोबर तुटलेला आहे, त्या व्यक्तीच्या भूमिकेत समुपदेशक शिरतात आणि ती व्यक्ती स्वतःच्या मनात काय विचार करत असेल ते बोलून दाखवतात. एरवी आपल्याला स्वतःचीच बाजू बरोबर वाटत असते. दुसरी बाजू समोर आल्यानं, त्याही बाजूत तथ्य आहे हे लक्षात येतं.
आपण काय केलं पाहिजे याबद्दलची वेगळी चर्चा समस्याग्रस्ताशी  करण्याची  गरजच पडत नाही. दुसऱ्या व्यक्तीच्या स्वगतातच आपण काय करायला पाहिजे, याची उत्तर दडलेली असतात. फक्त ती अंतर्मुख होऊन शोधावी लागतात. 
आपल्या सगळ्यांना रेडिमेड उत्तरांची इतकी सवय लागलेली आहे, की स्वतः विचार करून उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला जात नाही. पण स्वतः शोधलेली उत्तर ही रेडिमेड उत्तरांपेक्षा जास्त फलदायी असतात आणि बदलाला प्रवृत्त करणारी असतात.
मानवी नात्यांमध्ये संबंध इतके गुंतागुंतीचे आणि संमिश्र असतात की एकच एक उत्तर किंवा उपाय सरसकट सगळ्यांनाच लागू होत नाही. म्हणून थेट उपाय न सांगता पालकांनी आत्मनिरीक्षण करून पावलं उचलावीत, हा उद्देश या लेखा मागचा आहे.
आत्तापर्यंत पालकांची बाजू मांडणारं लेखन बरेचसे  वाचण्यात आले असतील , परंतु तरुणांची बाजू पालकांपुढे मांडणारे लिखाण खूप कमी झालं आहे. पालकांची बाजू आजवर अनेकदा मांडली गेली असताना आत्ताच्या नवीन पिढीची काही बाजू असू शकते, ती चूक-बरोबरच्या फूटपट्ट्या न लावता पालकांनी ऐकणे गरजेचे आहे. वैचारिक भिन्नतेमुळे पालक आणि तरुण मुलं-मुली एकमेकांपासून कडून वारंवार दुखावले जाण्याचे, त्यांच्यात दरी निर्माण होण्याचे प्रसंग कमी व्हावेत ही या लेखा मागची अंतिम अपेक्षा आहे.
कारण एकमेकांनी अंतर्मुख होण्यासाठी तारुणाईची दुसरी बाजू समजून घेणे हे महत्त्वाचं आहे.
तरुण पिढीची मनोगतं ही तारुण्याची स्पंदन आहेत. ती पालकांना ती आवडो किंवा न आवडो, ती तुमच्या वैयक्तिक मतांशी जुळणारी असो किंवा नसो, पालक किंवा नागरिक या नात्याने तुम्हाला त्यांच्याशी आज ना उद्या सामना करणं भाग आहे. तरुण पिढीला तसं वाटतंय याचा स्वीकार करायचा की नाही ते तुम्हाला ठरवायचं आहे. तुम्ही त्याच्याकडे डोळेझाक करणार असाल, तर या समस्या नाहीतच असं म्हणणार असाल किंवा चूक बरोबरच्या फूटपट्ट्या लावून त्यांना वाटते ते कसं चूक आहे असं ” जजमेंट ” (Judgement) करणार असाल, तर तुम्ही तरुण पिढीपासून भावनिकदृष्ट्या अधिक लांब जाल. तुमच्यातली मानसिक दरी आणखीनच वाढत जाईल. ती सांधायची असेल तर पहिलं म्हणजे तरुण पिढीच्या या भावना आहेत, ही त्यांची मत आहेत हे मान्य करा.

 

हे मान्य करणं म्हणजे त्यांच्या मताला संमती देणं नव्हे. पण त्यांना तसं वाटू शकतं, या वस्तुस्थितीचा स्वीकार करणं. हा स्वीकार, की पुढच्या पायरीवर साधकबाधक चर्चा करता येते. परंतु ती मान्य करण्यासाठी तरुण पिढीला आपल्यापेक्षा वेगळं वाटू शकतं हे स्वीकारावं लागेल. त्यासाठी  ‘ ऐकून घेण्याची मानसिकता ‘  जोपासावी लागेल किंवा विरोधी विचार स्वीकारण्याची खुली जीवनदृष्टी ठेवावी लागेल. 
 तरुण पिढीच पालकत्व हे दिवसेंदिवस आव्हानात्मक होत चाललेलं आहे. हा टप्पा पालकांसाठी अवघड आणि नाजूक असतो. पालकांसाठी ते महत्त्वाचे स्थित्यंतर असतं. मुलं सज्ञान झालेली असतात. त्यांना स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचे धुमारे फुटलेले असतात. एका स्वतंत्र आणि वेगळ्या व्यक्तीत त्यांचे रूपांतर होत असतं  किंवा झालेलं असतं. वळण लावण्याचं वय निघून गेलेलं असतं. आपण सांगू ते मुलं ऐकत नाहीत, तरीही मुलांमधील गुंतवणूक थांबवता येत नाही. अशी अवघड अवस्था पालकांची असते. मुलांच्या बोलण्यामुळे किंवा कृतीमुळे दुखावलेले पालक घरोघरी आढळून येतात. 
काही मुलांपासून भावनिक दृष्ट्या तोडले जातात, तर काही मुलांच्या पाठी जाऊन स्वतःची फरपट करून घेतात. ही दोन्ही टोकं न गाठता त्यातील सुवर्णमध्ये गाठण्याचं आणि स्वतःच मानसिक स्वास्थ्य सुस्थितीत ठेवण्यासाठी ठेवण्याचं खडतर आव्हान पालकांपुढे असते. ते होमिओपॅथिक उपचार पद्धतीमुळे  शक्य होऊ शकतं.
या आजच्या लेखात मी एक मंत्र नमूद करत आहे, की ज्याचा उपयोग तरुण पिढीशी सामंजस्य प्रस्थापित होण्यासाठी तुम्ही करू शकाल. याचबरोबर होमिओपॅथिक उपचार पद्धती ही चालू ठेवणं अत्यंत गरजेचे आहे.
या मंत्राचे नाव आहे– HOPE
H- (हेल्दी डिटॅचमेंट) Healthy Detachment –                     निरोगी विलगता-
आपल्या मुलांशी आपलं नातं कितीही घट्ट जोडलेलं असलं, तरी पालक मुलांच्या नात्यात कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर मूल वैचारिकदृष्ट्या आणि भावनिकदृष्ट्या आपल्यापासून विलग होणे अपरिहार्य आहे. विलगतेचा हा टप्पा आज ना उद्या येणार, याची मानसिक तयारी करणं आणि कटूता न बाळगता त्याचा स्वीकार करणं, म्हणजे निरोगी विलगता होय. ही आधीपासूनच जोपासली, तर पालक आणि मूल दोघांनाही स्वतंत्र अवकाश मिळू शकतो आणि अंतरावर राहून निरोगी नातं जोपासता येत.
O- (ओपन कम्युनिकेशन) Open Communication- 
खुला संवाद –
अनेकदा पालक-मुलांच्या तणावलेल्या संबंधाचे मूळ हे विसंवादात असतं. कितीही तणाव आले, चढ-उतार आले, तरी मुलांशी संवाद ठप्प करू नका.  मुलांशी संवादाचा एक मार्ग बंद झाला, तर दुसरा शोधा. संवाद जितका खुला, मोकळा होईल तेवढे तुमचे नातेसंबंध सुधारतील, हे लक्षात ठेवा.
P- पॉझिटिव्ह रिनफोर्समेंट (Positive Reinforcement)-        धन प्रबलीकरण-
अनेकदा पालक मुलांमधील कमतरता उगाळत बसतात. तुलनेनं त्यांची बलस्थानं फार कमी वेळा बोलून दाखवतात. पालक आपल्यावर सतत टीका करतात असं वाटून मुलं भावनिकदृष्ट्या दुरावतात आणि न्यूनगंडाचे बळी होऊ शकतात. हे टाळायचे असेल तर मुलांमधल्या सकारात्मक गोष्टींची आवर्जून दखल घ्या आणि त्या बोलून दाखवा.
E -Empathy- सह-अनुभूती-
‘तुमच्या मुलांना एक बाजू आहे आणि ती त्यांच्या दृष्टीने खरी आहे’ हे लक्षात ठेवलं ठेवलंत, तर त्यांची बाजू “चूक-बरोबर”असं निदान न करता “ऐकून घेण्याची मानसिकता”  तुमच्यात निर्माण होऊ शकेल तुमच्यातल्या संवादाचे अनेक दरवाजे त्यामुळे उघडले जातील.

 एकदा पालक झालं, की आयुष्यभर पालकत्व निभावून न्यावं लागतं, मग मुलं कितीही मोठी झाली तरीही !

हा एक न संपणारा प्रवास आहे.  होमिओपॅथिक उपचारांमुळे आपल्यातील अंतदृष्टी शोधणं आणि त्याच्या आधारे स्वतःच्या मुलांबरोबरचे संबंध विस्कळीत झालेले संबंध सुधारणं हे  पालकांना शक्य होतं.

 होमिओपॅथिक उपचारामुळे आपल्या सगळ्यांचा हा प्रवास सुखद होवो आणि अनेक आनंदाचे वळणबिंदू या प्रवासात येऊन ही शुभेच्छा !

डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ) HHF, ICR Kolhapur,
चैतन्य होमिओपॅथीक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4, HDFC बॅंकेजवळ,
शाहुपुरी व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123
रविवारी बंद

कृपया पुढील लेख वाचा  —

————————————————————–

              Puberty and Homeopathy

In general, the psychological articles that are written contain the nature of the problem, its analysis, and treatment of the solution.
“Emotional”(” भावनानिष्ठ “) is a technique in counseling. It mainly focuses on changing our Emotional processes.
Counselors step into the role of the person with whom the problem has broken down and talk about what the person is thinking. This is why we feel that our own side is right. As the other side comes out, it is realized that there is truth in that side as well. There is no need to have a separate discussion with the problem person about what we should do. The answer to what we should do is hidden in the other person’s soliloquy. You just have to look for it inwardly.

 

All of us are so used to ready-made answers that we don’t try to think and find the answer ourselves. But self-discovered answers are more productive and change-promoting than ready-made answers.
Relationships in human relationships are so complex and complex that one single answer or solution does not apply to all. So parents should introspect and take steps without giving direct solutions, this is the purpose behind this article.
Until now, much has been read on the side of parents, but there is very little on the side of the youth before their parents. While the parents’ side has been presented many times before, there may be some side of the new generation, it is important for the parents to listen to it without making the right-wrong boundaries. The ultimate hope behind this article is that parents and young boys and girls are often hurt by each other due to ideological differences, and that there is a gap between them.
Because it is important to understand the other side of adolescence in order to be introverted.
The passions of the young generation are the pulse of youth. Whether parents like it or not, whether it matches your personal views or not, as a parent or citizen you have to deal with them sooner or later. You have to decide whether to accept that the younger generation feels that way or not.
If you turn a blind eye to them, say that these are not problems, or “judge” how wrong they think they are, you will distance yourself Emotionally from the younger generation. The Mental gap between you will increase further. If it is to be achieved, the first step is to accept that these are the feelings, these are the views of the younger generation.

 

 

Acknowledging this does not mean assent to their views. But accepting the fact that they may feel that way. Accepting this, the pros and cons of the next step can be discussed. But to accept it, we have to accept that the younger generation may feel different from us. For that, one has to cultivate a ‘Listening Mindset’ or have an open outlook on life to accept opposing views.
Parenting is becoming more and more challenging for the younger generation. This stage is difficult and delicate for parents. It is an important transition for parents. Children are conscious. They are full of independent personality. They become or become a separate and distinct person.
The age of twisting is over. Children don’t listen to what we say, but investment in children cannot be stopped. Parents are in such a difficult situation. Parents who are hurt by their children’s words or actions are found in every home.
Some are emotionally cut off from their children, while others are withdrawn and self-absorbed. Parents face the tough challenge of balancing these two extremes and maintaining their own Mental Health. It can be possible with Homoeopathic Treatment.
In this today’s article I am mentioning a Mantra that you can use to establish rapport with the younger generation. Along with this, it is very important to continue the Homoeopathic Treatment.
The name of this mantra is– HOPE
H- Healthy Detachment-
No matter how close our relationship with our children is, at some point in the parent-child relationship, it is inevitable that the child will become Emotionally and Psychologically detached from us. Mentally preparing for this stage of detachment to come sooner or later and accepting it without bitterness is a healthy detachment. If this is cultivated in advance, both the parent and the child can have their own space and cultivate a healthy relationship through distance.
O- Open Communication –
Often, strained parent-child relationships are rooted in conflict. No matter how much tension, ups and downs, do not stop communication with children. If one way of communicating with children is closed, find another. Remember that the more open the communication, the better your relationship will be.
P-  Positive Reinforcement-
Parents often exaggerate the shortcomings of their children. Comparatively, their strengths are rarely spoken about. Feeling that parents are constantly criticizing them, children become Emotionally detached and can become victims of inferiority complex. To avoid this, make sure to notice and talk about the positive things in children.
E -Empathy-
Keeping in mind that ‘your children have their own views and it’s true to them’, you can develop a “listening mindset” without judging their side as “right or wrong” and it will open many doors of communication between you.
Once you become a parent, you have to carry out parenting for the rest of your life, no matter how big the children are!
It is a never ending journey. Homoeopathic Treatment enables parents to find insight within themselves and repair damaged relationships with their own children based on that.
May this journey be pleasant for all of us due to Homoeopathic Treatment and wish you many happy turning points in this journey !

Dr Ajay Hanmane
M.D.(Hom) HHF, ICR Kolhapur,
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4, Near HDFC Bank,
Bhaskar Plaza Vyapari Peth,
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
Mobile No. 7738667123
Sunday Closed.

Please Read Next Article-