पालकत्व आणि होमिओपॅथी / Parenting and Homoeopathy

Dorctor Pic By Dr. Ajay HanmaneJuly 15, 2024 Academic Problems Behaviour problems Children Problems Children's Illness General Information Homeopathic and Cure Mental Health Mental Health Psychiatry

 

पालकत्व आणि होमिओपॅथी

ऑफिस मधून कंटाळून आलेल्या ऐश्वर्याने दारात पाय ठेवला, तेव्हा घरात घरभर पसाराच पडला पसारा होता. दारात बूट-मोजे अस्ताव्यस्त, पलंगावर ऊनोचे पत्ते, बोर्ड गेमची कार्ड्स, अस्ताव्यस्त कपडे, टेबलावर ज्यूसचे ग्लास, तसेच आपल्याच वयाचा ‘टीनएज’ मित्र रोहित बरोबर हर्ष व्हिडिओ गेममध्ये गर्क होता. इतक्यांदा सांगून देखील आज ही रोजचे दृश्य पाहून ऐश्वर्याचा फ्युज उडाला.
मुलांचं काहीही न ऐकता तिने ‘आधी खोली साफ करा ‘  म्हणून सांगितलं. कसं-बसं देणं दिल्यासारखं आवरताना हर्ष काहीतरी पुटपुटला आणि त्यावर रोहित फिसकन हसला. ऐश्वर्याला तो अपमान वाटला. तीन दोघांनाही रागावल्यावर रोहित घरी जाण्यासाठी सॅक उचलायला लागला. त्यामुळे भडकून हर्ष उद्धटपणे काहीतरी बोलला. मग मायलेखांचं युद्धच पेटलं.
ऐश्वर्याने त्याच्या चुकांचा पाढा वाचला. त्यानेही, ‘कायम तुझच का ऐकायचं ? तू माझ्या आवडीचे पदार्थ सुद्धा करत नाहीस.’ वगैरे वगैरे काढलं. वादाला फाटे फुटत गेले.” असा वागणारा असशील तर तुझ्या वाढदिवसाला नवीन ड्रेस आणणार नाही “, पर्यंत आई पोहोचली.
त्यावर, “मग मी पण तुझा नवा ड्रेस कापून टाकीन,” या हर्षच्या उलट उत्तरावर भडकून ऐश्वर्याने एक झापड ठेवून दिली. मात्र हर्ष रडला नाही. आव्हान दिल्यासारखा छाती पुढे करून मख्खपणे उभा राहिला.
 हातबल झालेल्या ऐश्वर्यालाच आता संतापन रडायला येत होतं.
परवा परवापर्यंत गोंडसपणे आपल्या मागे मागे करणारा लाडका मुलगा हल्ली खुन्नस का देतो ?
आज आपल्यालाही हात उचलला गेला. वागायचं तरी कसं याच्याशी ?
वयात येणाऱ्या मुलांचं वागणं असंच असतं का ? ती वैतागलीच.
अखेरीस तिने ‘चैतन्य होमिओपॅथिक क्लिनिक’मध्ये तिच्या फॅमिली डॉक्टरना फोन लावला आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी भेटण्याची वेळ ठरवून दिली. 
ती म्हणाली, “डॉक्टर, हल्ली हर्षशी कस वागायचं कसं हेच कळेनाच झालं आहे नक्की. इतका गोड मुलगा अचानक उद्धटपणे खुन्नस का देतोय ?
अभ्यासाचा आळस, शिस्त नाही , त्यात आता तर सुट्टीच. त्याच्या बाबाशी जरा बरा वागतो. पण आईशी वैर का ? काय करू मी ?
ऐश्वर्याचे प्रश्न आणि आवेष शांत झाल्यावर डॉक्टरांनी सांगितलं की, “एवढी कासावीस होऊ नका. शिंग फुटण्याच्या या वयात बऱ्याच मुलांचं असं वागणं बदलतं. आई वळण लावते याचाही राग असतो.”
मी (डॉक्टरांनी) त्यांना पुढे समजावत सांगितलं की, “अन्न, वस्त्र, निवारा या गरजा नंतरची आपली गरज काय असते ? तर स्वतःची ओळख. तशीच आपल्या जगात महत्त्वाचं असणं ही सुद्धा मुलांचीसुद्धा भावनिक गरज असते. 
काही मुलांना आपोआप समजते की, चांगुलपणामुळे, इतरांना मदत केल्यामुळे जगाकडून ओळख, कौतुक मिळतं. तशा सकारात्मक पद्धतीने ती वागत जातात. काही मुलांना मात्र त्यांच्या स्वभावामुळे, घरातल्या बाहेरच्या वातावरणामुळे किंवा कशाहीमुळे असेल इतरांकडून मनासारखं महत्त्व मिळत नाही. ओळख मिळवायचा रस्ता हुकतो. तेव्हा ‘स्वतःची ओळख’  याबद्दल ते एखादा समज करून घेतात. 
म्हणजे, “काही मुलांचा समज मी बॉस आहे. माझं सगळ्यांनी ऐकलेच पाहिजे. मला काही सांगायचं नाही,”असा काहीतरी होतो.
शाळेत दादागिरीतून मुलांना मिळणारा मोठेपणा पाहूनही ‘मी  जिंकलो तरच मोठा’ हे पक्क असतं. घरातल्या एखाद्या आरडाओरड करणाऱ्या व्यक्तीचा दबदबा असेल, सगळे भिऊन त्यांचं ऐकत असतील, तर मान देत असतील, ते पाहूनही मुलांची ती महत्त्व ” सिग्निफिकन्स “ ची व्याख्या बनते.
तुमचा मुलगा प्रत्येक वेळी असं वागत नसणार. तुम्ही अधिकारवाणीने काही सांगायला गेलात की, ‘बॉस मी आहे, मला नाही सांगायचं,’ हे वर येत असणार.
मुलांच्या मनाला मनातला ‘पॉवर गेम’ – मी जिंकणारच’  हे जाग झाल्यावर, विरोध, भांडण ही गरज बनते. कारण युद्ध झाल्याशिवाय ते जिंकणार कसे ? भांडण करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली किंवा केली, की ते पुन्हा पुन्हा जिंकणार, सिद्ध होणार. तर मुलं काय करतात, वाद सुरू झाल्यावर तुमच्या नकळत तुमच्या हातात एक तलवार सारतात, जी तुम्ही घेणारच हे त्यांना माहीत असतं.
कालच्या भांडणात, ” तू माझ्या आवडीचे पदार्थ करत नाहीस….मी तुझा ड्रेस कापून टाकेन…..’चा घाव तुमच्या वमीऀ लागला.अशी दुखावणारी, चीड आणणारी वाक्य म्हणजे मुलांना तुमच्या हातात सारलेली तलवार होती. ती घेऊन तो जोरजराने वार करून त्याला लढायला म्हणजेच जिंकायला संधी देत गेलात. हे तुम्हाला कळलच नाही. तुम्ही तलवार घेतल्यावर तो तयारीतच होता. तुम्ही बेसावध…..त्याच्या अनपेक्षित वारांनी घायाळ, हतबल झाला होता. आणि तुमचा मुलगा जिंकला. आता पुढच्याही वेळी तो हेच तंत्र वापरून त्याच्या समजाप्रमाणे महत्त्व मिळवणार आणि तुम्ही खवळता आणि महाभारत सुरू होते आणि प्रत्येक भांडणानंतर तुम्हालाच असाह्य हरल्यासारखे वाटतं.
“त्यासाठी काय केलं पाहिजे ?” असं ऐश्वर्याने विचारले.
“त्यासाठी तुम्हाला तुमच्या मुलाची जिंकण्याची गरज समजून घेतली पाहिजे. तो तुम्हाला त्रास देण्यासाठी असं वागत नाही.
“सिग्निफिकन्स”  मिळविण्याच्या नैसर्गिक गरजेतून हे घडते. त्यामुळे तो तलवार हातात देणार आहे, हे लक्षात ठेवून  तुम्ही सावध राहायचं. अजिबात तलवार घ्यायची नाही.
मुलगा आता मोठा दिसायला लागला असला तरी अजून लहानच आहे ! जसं इमारतीचे बांधकाम झाले आहे, पण मेंदूचं वायरिंग चालू आहे. त्यामुळे या संवेदनशील टप्प्यावर स्वतःची ओळख सकारात्मकतेने कशी निर्माण करता येते याचा अनुभव द्यायला हवा.”
म्हणजे, “आज्ञा सोडणं, चुका काढणं, हे मुलांचे ‘ट्रिगर’ असतात. ते थांबवायचे. मला तुझ्याशी वाद घालण्यात रसच नाही असे स्पष्ट सांगायचं. तुम्ही त्याला वादात हरवू शकत नाही हे मान्य केलं तरी चालेल. तुम्ही तुमची तलवार म्यान केल्यावर, “आता कसं जिंकणार ?” यानं तो भांबावतो.
लढण्याशिवायचा दुसरा पर्याय सुचवण्याची हीच योग्य वेळ, म्हणजे मला थोडी मदत हवी आहे, करणार का ? म्हणून छोट्या-मोठ्या जबाबदाऱ्या द्यायच्या. त्यावर त्यांचे कौतुक करावं. या वयाच्या मुलांना जबाबदारी घ्यायला आवडतं. त्यातून मोठेपणा, कौतुक, ओळख, विश्वास मिळाल्यावर ‘पाॅवर गेम’ ची गरज कमी होते. 
म्हणजे, “त्याला लहान समजायचं नाही आणि जबाबदारी पार पडल्याचे कौतुक करायचं…… मग पुढची जबाबदारी द्यायची.” तुम्ही तुमच्या मुलावर हात उगारला तोही त्याच्या मित्रासमोर ! त्याबद्दल ‘अनकंडिशनल सॉरी’ नक्कीच म्हणायला हवं.आपण मोठे आहोत म्हणून हात उचलणं हे न्याय्य नाही. त्याला दुखावल्याबद्दल तुम्हालाही वाईट वाटते, हे त्याच्याशी आवश्यक बोला. कारण तू मला दुखावलंस मग मीही तुला दुखावणार असा ‘हर्ट गेम’ पण नकळत घडत असतो. कालचा प्रसंग आठवूण पाहिला तर तुम्हाला ‘पॉवर’ आणि ‘हर्ट’  हे दोन्ही दिसतील.
ऐश्वर्याने विचारलं की, “ही थिअरी मोठ्यांनाही लागू पडते का ? ” 
मी म्हटलं, ”अर्थातच ! मोठ्या माणसांची ‘स्व-ओळख’  जेव्हा लहानपणीच्या सोयीच्या व्याख्यांमध्येच अडकून बसते, तेव्हा असंच घडतं. जवळच्या नात्यांमध्ये दोघांनी एकमेकांच्या हळव्या, दुखऱ्या जागा नेमक्या माहीत असतात. घरातल्याच कशाला, सामाजिक नात्यात ताण येतो तेव्हाही ‘पॉवर’ आणि ‘हर्ट’ खेळ येऊच शकतो.”
तेव्हा मोठ्यांनी स्वतः स्वतःला प्रश्न विचारावे लागतात.
 उदाहरणार्थ –
  • ‘असं वागण्यामध्ये मागे माझी गरज काय आहे ? 
  • समोरच्या व्यक्तीची गरज काय आहे ?
  • वागण्यातून एकमेकांना नेमका संदेश कुठला जातोय ? आणि 
  • मला यातून परिणाम काय हवंय ?’ 
या प्रश्नांची उत्तरे शोधायची सवय लागली की, चक्रांची गरगर थांबते. ही थिअरी समजून घेताना, वापरताना प्रत्येकाचा अंदाज, प्रत्येकाची समज ही वेगवेगळी असणार, हे नक्की ! मोठी माणसं निरागस नसतात. त्यामुळे उपाय ही थोडे वेगळे करावे लागतात….. “
त्यानंतर मी त्यांना होमिओपॅथिक औषध दिले आणि पुढच्या वेळेस हर्षला घेऊन येण्यास सांगितले. त्यालाही समुपदेशन बरोबर होमिओपॅथीक औषधांची गरज आहे असे सांगून पाठवून दिले.
‘ पालकत्व ‘ ही अनेकांच्या आजच्या काळात खूप आव्हानात्मक वाटणारी गोष्ट आहे. त्यात मूल नुकतंच पौगंडावस्थेत अर्थात ‘ टीनएजमध्ये ‘ प्रवेश केलेलं असेल तर त्याच्या बोलण्यात, वागण्यात पडणारा फरक इतका वेगळाच घडतो, की  पालक गोंधळून जातात.
त्यावेळी हा असा कसा वागू शकतो ? ऐवजी ‘कशामुळे’  असा वागतो ?
या प्रश्नाचे उत्तर शोधायचा प्रयत्न केला की, मुलांच्या अनाकलनीय वागण्याचे अर्थ लागू शकतात.
त्याचबरोबर पालकांनी स्वतःला प्रश्न विचारणे, निरीक्षण आणि प्रयोग करून उत्तर शोधावं लागतं आणि त्याला होमिओपॅथी औषध उपचारांची जोड दिल्यास हा प्रश्न लवकरात लवकर सुटू शकतो.

डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ) HHF, ICR Kolhapur,
चैतन्य होमिओपॅथीक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4, HDFC बॅंकेजवळ,
शाहुपुरी, व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123
रविवारी बंद  

कृपया पुढील लेख वाचा  —

————————————————————–

Parenting and Homoeopathy

When Aishwarya, who was bored from the office, stepped in the door, the house was full of chaos.
Boots-socks messy at the door, Uno cards on the bed, board game cards, messy clothes, glasses of juice on the table, and Harsh was stuck in video games with his ‘Teenage’ friend Rohit. Even after saying so many times, Aishwarya’s fuse blew after seeing this daily scene.
Without listening to the children, she said ‘Clean the room first’. Harsh mumbled something while he was trying to give, and Rohit, his friend, smiled at that. Aishwarya felt that insult. After getting angry with both of them, Rohit started picking up the bag to go home. Infuriated by this, Harsh said something rudely. Then the war of Mother-Son started.
Aishwarya read his mistakes. He also said, ‘Why should I listen to you forever ? You don’t even do my favorite dishes.’ Etc. Etc.. The debate broke out.
“You won’t get a new dress for your birthday if you behave like that,” Mom reached out.
“Then I will cut your new dress too,” retorted Aishwarya with a slap. But Harsh did not cry. He stood firm, thrusting his chest forward as if in challenge.
Aishwarya, who was weak, was now crying in anger.
Why does the lovely boy who follows you so cutely until the next day give a damn now ?
Today we were also raised. How to deal with it?
Is this the behavior of children coming of age? She was annoyed.
Finally she called her Family Doctor at ‘Chaitanya Homoeopathic Clinic’ and they made an appointment the next day.
She said, “Doctor, I really don’t know how to deal with Harsh these days. Why is such a sweet boy suddenly rude ?
Laziness in studies, no discipline, only vacations now. Treats his dad a little better.
But why animosity towards his mother ? What can we do ?” me
After Aishwarya’s questions and enthusiasm calmed down, the doctor said, “Don’t be so cocky. Many children change their behavior at this age of puberty. They are also angry that the Mother makes a change.”
I (the doctor) further explained to them that, “What is our need after the needs of food, clothing, shelter ? Then SELF-IDENTITY. Similarly, to be important in our world is also an emotional need of children.
Some children automatically understand that by being good, by helping others, they get recognition and appreciation from the world. They behave in such a positive way.
Some children, however, do not get as much importance from others, either because of their Temperament, the Environment outside the home or something else. The road to recognition is lost.
Then they get a sense of ‘SELF-IDENTITY’.
I mean, something like, “Some kids think I’m the boss. Everyone has to listen to me. I don’t have anything to say.” Even after seeing the bigness that children get from being bullied in school, ‘big only if I win’ is sure. If a screamer in the house dominates, everyone listens to them in fear, even if they see them, that importance of children becomes the definition of “significance”.
Your child may not behave this way every time. If you go to say something with authority, ‘I’m the boss, I don’t want to say no’, it will come up.
When children wake up to the ‘power game’I will win, conflict, conflict becomes a necessity. Because how will they win without a war ?
A situation is created or made to fight, that they will win again and again, prove. So what do kids do, when an argument starts, they unknowingly put a sword in your hand, which they know you will take.
In yesterday’s fight, “You don’t do what I like…I’ll cut off your dress…” hurt you deeply. Such a hurtful, annoying sentence was a sword in your hand to the children. By giving him a chance to win. You didn’t know it. He was wounded by his unexpected blows. And now he won the same way Supposedly it gains importance and you get agitated and the Mahabharata begins and after every fight you feel like an unmitigated loser.
“What should be done for that ?” Aishwarya asked.
“For that you need to understand your son’s need to win. He is not acting like this to annoy you. It is from a natural need to gain ‘significance’.
So you have to be careful, remembering that he is going to hand over the sword. Don’t take the sword at all. The boy is big now.”
Even though it is still small ! As the building is done, but the wiring of the brain is going on. So, at this sensitive stage, one should experience how one can create one’s identity.”
I mean, “Disobeying, making mistakes, are the ‘triggers’ of children. Stop it. Make it clear that I’m not interested in arguing with you. It’s okay to admit that you can’t beat him in an argument.
After you’ve sheathed your sword, “Now how ? This is the right time to suggest an alternative to fighting, I mean, I need a little help, will you ? , when trust is gained, the need for ‘Power Games’ is reduced.
That is, “He doesn’t want to be small and appreciate the responsibility done… then give the next responsibility.” You raised your hand on your son in front of his friend ! We should definitely say ‘unconditional sorry’ for that. It is not fair to raise our hands because we are big. Talk to him that you are also sorry for hurting him. Because you hurt me, then I will hurt you too, the ‘Hurt Game’ happens unconsciously. If you recall yesterday’s episode, you will see both ‘Power’ and ‘Hurt’.
Aishwarya asked, “Does this theory apply to adults too ?”
I said, “Of course!” This is what happens when an adult’s ‘SELF-IDENTITY’‘ becomes trapped in the convenient definitions of childhood. In close relationships, both of them know exactly each other’s sensitive and painful places. Even when there is tension in social relations at home, ‘Power’ and ‘Hurt’ play can occur.”
Then adults have to ask themselves questions.
For example –
  • ‘What is my need behind such behavior ?
  • What is the need of the other person ?
  • What is the exact message going to each other from the behavior ? And
  • What results do I want from this ?
Once you get into the habit of finding answers to these questions, the chakras stop spinning. While understanding and using this theory, everyone’s guess, everyone’s understanding will be different, for sure ! Big men are not innocent. So the solution has to be a little different…”
I then gave him Homoeopathic Medicine and asked him to bring Harsh next time. He was also sent away saying he needed counseling along with Homoeopathic Medicines.
‘Parenting’ is something that many people find very challenging these days. If the child has just entered adolescence i.e. ‘Teenage’, the difference in his speech and behavior is so different that the parents get confused.
How can he act like this at that time ? Instead of acting like ‘why’ ?
Trying to find the answer to this question, the mysterious behavior of children can be understood.
At the same time, parents have to ask themselves questions, observe and experiment to find the answer and if they add Homoeopathic  Treatment to it, this problem can be solved as soon as possible.

Dr Ajay Hanmane
M.D.(Hom) HHF, ICR Kolhapur,
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4, Near HDFC Bank,
Bhaskar Plaza Vyapari Peth, Shahupuri
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
Mobile No. 7738667123
Sunday Closed.

Please Read Next Article-