लहानपणापासून मुलांना प्रेम, आदर व सुरक्षितता मिळाल्यास, ‘ आपण प्रेम करण्याजोगे आहोत ‘ हा विश्वास त्यांच्या मनात जागृत होतो. पालकांचं प्रोत्साहन, पाठिंबा यामुळे मुलांना आपल्यातल्या क्षमता, चांगले गुण ओळखता येतात. साहजिकच त्यांना स्वतःबद्दल योग्य विश्वास व चांगली स्व-प्रतिमा निर्माण होण्यास खूप चांगली मदत होते.
मुलांची स्व-प्रतिमा –
“तुझ्या डोक्यात दगड भरलेत की काय? अरे गाढवा किती वेळा त्याच त्याच चुका करशील गणितात? एवढा मंद मुलगा आजवर मी पाहिला नाही” !!! वगैरे वगैरे तन्मय चे वडील नेहमीप्रमाणे त्याच्या वर गरजले आणि त्याच्या गणितात ही आणखीन चुका व्हायला लागल्या.
रागाच्या भरात शिस्त लावताना ओरडताना किंवा अभ्यास घेताना बहुतेक सर्वच पालक आपल्या मुलांना विविध भूषण विशेषण देत असतात,. “मूर्ख ,नालायक, बावळट, धांदरत, खोटारडा, लबाड वगैरे वगैरे या विशेषणांची यादी लांबजाचक आणि प्रसंगी अतिशय ‘हीन आणि अपमानास्पद ‘ असते. त्यातून आपल्या रागाला तर वाट मिळते पण कधी असा विचार करतो का की आपल्या मुलांवर याचा काय परिणाम होत असेल?
‘तारे जमीन पर‘ या चित्रपटात, लहान मुलांचे भाव-विश्व त्याचबरोबर,जोडले गेलेली त्याची मानसिकता, या सगळ्यांकडे बघण्याचा पालकांचा दृष्टिकोन, याचे एक सुंदर चित्र रेखाटले आहे.
बऱ्याचदा पालकांना असं वाटतं की, आम्ही मुलांना चांगल्या प्रकारे समजावून घेतो म्हणजे त्यांच्या प्रत्येक कृती मागे त्यांची मानसिकता आम्ही जाणतो .
हे एवढं सोपं आहे !! तर “नाही” असेच म्हणावं लागेल, कारण म्हणजे
आपलं मूल वयानं मोठं होत असताना, वेगाने त्याचं व्यक्तिमत्व ही आकार घेत असतं. मुलांच्या मनात स्वतः विषयी एक ‘प्रतिमा’ तयार होत असते. आपण एक व्यक्ती म्हणून कसे आहोत? याबद्दलच्या त्यांच्या मनातल्या प्रतिमेला ‘स्व-प्रतिमा’ म्हटले असे म्हणतात.
मुलांची ‘स्व-प्रतिमा’ ही त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि पायाभूत घटक असतो. कुठल्याही मुलाच्या मनात ही प्रतिमा तयार नसते. साधारणपणे दीड वर्ष वयापासून आपण एक वेगळी व्यक्ती आहोत, आपल्याला एक स्वतंत्र नाव आहे ,एक वेगळे अस्तित्व आहे, हे मुलांना जाणवू लागते.
आपण मस्ती केली, पाणी सांडलं मातीत हात घातला की आई ‘वेडा मुलगा’ म्हणते आणि पटकन घास घेतला, आईचं ऐकलं की ‘शहाणा राजा’ म्हणून आई पटकन जवळ घेते, यातला फरक मुलांना कळायला लागतो.
लहानपणी मुलांना, आपण एक व्यक्ती म्हणून कसे आहोत ? याची काहीच कल्पना नसते. आई वडील, घरातल्या बाहेरच्या, इतर वडीलधाऱ्या व्यक्ती, उदाहरणार्थ शाळेतील शिक्षक इत्यादी. आपल्याला कसे वागवतात? काय म्हणतात? यावरून मुलांची ‘स्व-प्रतिमा’ (Self Image) तयार होत असते,म्हणजेच त्यांची मुलांची ‘स्व-प्रतिमा’ आई-वडील व इतर व्यक्तिमत्त्वांच्या अभिप्रायावर अवलंबून असते.
पालकांना मात्र त्याची पुसटशीही कल्पना नसते. कधी कधी आपल्या अति-काटेकोरपणामुळे तर कधी मुलांनी सुधारावं म्हणून पालक मुलांना सतत त्यांच्या चुका दाखवत असतात. त्यांच्यावर टीका करतात, त्यांना मूर्ख, बावळट, वेंधळा, आळशी असे हिणवून आपल्या रागाला वाट करून देतात. दुर्दैवाने पालकांच्या या अभिप्रायावर मुलांचा शंभर टक्के विश्वास बसतो. आपण बावळटच आहोत, आपल्याला काहीच जमणार नाही, कोणतीच गोष्ट आपण छान करू शकणार नाही, अशी त्यांची ठाम समजूत होते. त्यामुळे त्यांचा सगळा आत्मविश्वासच खचून जातो.
पालकांच्या अशा सततच्या दृष्टीने मुलांच्या मनात स्वतःबद्दलची हीन आणि दुबळी प्रतिमा तयार होते. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा पाया डळमळीत होतो.
संस्कारक्षम वयात मुलांची मानसिकता, जडणघडण होण्यामध्ये त्यांच्या आई-वडिलांची भूमिका नेहमीच परिणामकारक ठरते, मग ती सकारात्मक असो वा नकारात्मक. दोन्हीच्या भूमिकांचे परिणाम ही त्यांच्या मुलांबरोबरच्या नात्यात परिवर्तित होत असतात.
पालकांचे आपल्या मुलाबरोबरचे असलेले नाते, त्याचबरोबर ओघानं आलेल्या एकमेकांबद्दलचा बद्दलच्या अपेक्षा, भाव-भावना या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि त्या कधीच बोलल्या जात नसतील किंवा चुकीच्या पद्धतीने व्यक्त होत असतील, तर मुलांवर त्यांचे गंभीर परिणाम होत राहतात. म्हणजे काय एक ते संवाद होतच नाही अथवा संवादाचे रूपांतर वादात होते. मग हळूहळू मुलांची मानसिकता बिघडत जाते.
त्यांच्या त्यांचा स्वतःकडे पालकांकडे आणि पर्यायाने समाजाकडे बदलण्याचा दृष्टिकोन नकारात्मक होऊ लागतो आणि सर्व घटनांचे परिवर्तन नंतर वाईट गोष्टींमध्ये सवयीमध्ये होतं.
उदाहरणार्थ, समाज विघातक वर्तवणूक – आई-वडील कुठल्या प्रकारे मुलांशी संवाद सांगतात साधतात, त्याचा सरळ परिणाम मुलांच्या वर्तनावर, विचार पद्धतीवर, आत्मविश्वासावर, भावनिक स्वास्थ्यावर, दुसऱ्या व्यक्तीबरोबरच्या वागण्या-बोलण्याच्या पद्धतीवर होतो.
स्वतःच्या आई-वडिलांसोबत आता देखील ते स्वतःला असुरक्षित समजू लागतात. या सगळ्यांचा परिणाम, शेवटी त्यांच्या शाळेतील वागणूक, प्रगतीवर होतो. म्हणून पालक आणि मुल यांच्यामध्ये प्रेमाचं आणि विश्वासाचं नातं असणं गरजेचं असतं.
मुलांशी बोलणं म्हणजे, ‘तुला काय हवंय? काय नको’ ? हे नव्हे. तसेच त्यांना कपडे खेळणी व या पुस्तका वगैरे हे आणून देणं इतकं सोपं तर नक्कीच नाही, कारण मुलांच्या भावनिक व मानसिक गरजा यापेक्षा भिन्न व अधिक असतात.
एक सुजाण व जबाबदार पालक या नात्याने त्याला / तिला योग्य वेळी समजून घेणे, व त्या पूर्ण करणे हे सर्वात महत्त्वाचे अवघड काम आहे.
अशा मुलांचा आत्मविश्वास एकदा डळमळला की, कुठलीही नवी गोष्ट शिकायला कचरतात. कुठलीही जबाबदारी, कुठलीही काम अंगावर घ्यायला घाबरतात. अभ्यास चांगला झाला असूनही वर्गात उत्तर द्यायचं टाळतात, कारण आपलं चुकीचं आहे आणि आपल्याला शिक्षक ओरडतील, मुलं हसतील अशी त्यांची पक्की समजूत होते. परीक्षेची त्यांना भीती वाटते. ही मुलं स्पर्धेत भाग घ्यायला तयार नसतात. आपली क्षमता नसताना कशाला स्वतःचा हस करून घ्या ! या भावनेने प्रत्येक ठिकाणी मागे मागेच राहणं ही मुल पसंत करतात.
एकंदरीत या मुलांचं व्यक्तिमत्व विकास, त्यांची क्षमता,त्यांचे ध्येय, त्यांचे भवितव्य या सगळ्यांसाठी त्यांची कमकुवत ‘स्व-प्रतिमा‘ खूपच मारक ठरते.
आजची बहुसंख्य कुटुंब, विभक्त- न्यूक्लिअर फॅमिली (Nuclear Family) पद्धतीत मोडणारी असतात. त्यामुळे घरात फक्त आई वडील, दोघेही कामानिमित्त घराबाहेर, संध्याकाळी घरी आल्यावर खूप दमलेली, नेमकं त्यावेळी मूल त्यांच्याशी बोलायला गेले, “आपण नंतर बोलु, मी उद्या बघते / बघतो चालेल? किंवा फारच झालं तर, अरे काय आल्या आल्या कटकट चालली आहे! कळत नाही का मी दमलोय /दमली आहे ते !!! अशी उत्तर ऐकायला मिळतात. पण साहजिकच मुले दुखावली जातात, कारण बहुदा पालकांचा “उद्या” नंतर त्यांना सहसा येतच नाही.
आपल्या मुलांनी बोलण्यासाठी आपल्याकडे वेळ मागणे हा केवळ त्यांचा हक्कच नाही तर त्यांची भावनिक गरज आहे. हे आई-वडिलांचे लक्षात येत नाही.
थोडक्यात काय, आपण आई-बाबांना नकोशी झालोय का ? , आपल्यावर मुळीच प्रेम करत नाहीत असे तत्सम गंभीर स्वरूपाचे नकारार्थी विचार त्यांच्या मनात नकळतपणे घर करू लागतात. त्यांची दखल वेळीच घेतली गेली नाही तर,हे विचार कायमचे मनात राहून त्यातून चुकीचं अर्थ निघू शकतात. त्यामुळे नात्यांमध्ये जवळीत निर्माण होण्यास घातक ठरू शकते.
म्हणूनच पालकाने सुरुवातीपासून मुलांची ‘स्व-प्रतिमा’ बळकट व चांगली विकसित व्हावी याकरता अतिशय जागृतता दाखवावी लागते. लहानपणापासून मुलांना पालकांकडून प्रेम आदर सुरक्षितता मिळाल्यास आपण प्रेम करण्याजोगे आहोत हा विश्वास त्यांच्या मनात जागृत होतो .
पालकांचा प्रोत्साहन, पाठिंबा यामुळे मुलांना आपोआप आपल्यातल्या क्षमता चांगले गुण ओळखता येतात. साहजिकच त्यांना स्वतःबद्दल योग्य विश्वास व चांगले स्वप्न निर्माण होण्यास खूप मदत होते.
अशी मुलं नववीत नवनवीन क्षेत्रात स्वतःला आजमावून बघण्यास उत्सुक असतात. एखाद्या कामात व स्पर्धेत अपयश आल्यास ना उमेद न होता ती पुन्हा पुन्हा प्रयत्न करायला तयार असतात. मुलांची चांगलीच ‘स्व-प्रतिमा’ त्यांना उत्तम ध्येय यासाठी लागणारी प्रयत्न करण्याची जिद्द व चिकाटी देते आणि परिणामी त्यांच्या उज्वल भविष्यासाठी कारणीभूत ठरते.
मुलांच्या डळमळीत आत्मविश्वासाला बळकट करण्यासाठी, त्यांच्या स्वभावाचा अभ्यास करून त्यांना विविध होमिओपॅथिक औषधे देता येतात. या औषधांमुळे कॅल्केरिया कार्ब, अर्जंटम नायट्रिकम, बरायटा कार्ब ,ऑरम मेट इत्यादी अशी लक्षण साधर्म्यावरून होमिओपॅथिक औषधे देता येतात.
होमिओपॅथीमध्ये असंख्य औषधे असून ज्यामुळे मुलांची ‘स्व-प्रतिमा’ बळकट होऊन आत्मविश्वास वाढण्यास प्रभावीपणे काम करतात .
होमिओपॅथिक चिकित्सा शास्त्रानुसार अशा मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करून निवडण्यात आलेले प्राकृतिक औषध (Constitutional Medicine) या मुलांच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा घडवून त्यांची ‘स्व-प्रतिमा’ बळकट करते.
डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ)
चैतन्य होम्योपैथिक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4
शाहुपुरी व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123
रविवारी बंद
कृपया पुढील लेख वाचा –
आधुनिक उपचार पद्धती आणि होमिओपॅथी उपचार पद्धती मधील फरक
————————————————————————————–
Children’s Self-Image —
“Are you full of stones in your head? Oh donkey, how many times will you make the same mistakes in math? I have never seen such a slow boy” !!! Etc. Etc. Tanmay’s father insisted on him as usual and he started making more mistakes in his math’s.
While scolding while disciplining in anger or while studying, most of the parents give their children various nicknames. “The list of adjectives such as stupid, worthless, stupid, stupid, liar, liar, etc. is long and sometimes verses ‘inferior and humiliating“. It makes us feel angry, but do we ever think about the effect it will have on our children?
In the movie ‘Tare Zameen Par’, a beautiful picture is drawn of the emotions and world of children, their mentality, and the attitude of parents towards all this.
Often parents think that we understand our children well, that is, we know the mentality behind their every action.
It’s that simple!! Then you have to say ‘NO‘, because !!!
As your child grows up, his personality is rapidly taking shape. An ‘Image’ is formed in children’s mind about themselves. How are we as a person? Their Mental Image of this is called ‘Self-Image’.
Children’s ‘Self-Image’ is a very important and fundamental factor in their personality development. This image is not ready in the mind of any child. Generally, from the age of one and a half years, children start to realize that they are a separate person, they have a separate name, a separate existence.
Children start to know the difference between having fun, spilling water and putting your hands in the soil, mother saying ‘crazy’ and quickly taking the grass, listening to mother saying ‘wise king’ and mother holding her close as ‘king’.
As children, how are we as a person? It has no idea. Parents, outsiders, other elders, eg. school teachers etc. How are you treated? What do you say? From this, children’s ‘Self-Image’ is formed, that is, their children’s ‘Self-Image’ depends on the feedback of parents and other personalities.
But the parents have no idea about it. Sometimes because of their over-strictness and sometimes because of the children’s improvement, parents constantly point out their mistakes. Criticize them, call them stupid, stupid, blind, lazy and vent their anger. Unfortunately, children believe this opinion of parents one hundred percent. They have a firm belief that we are stupid, we will not be able to do anything, we will not be able to do anything well. So all their confidence is exhausted.
Such constant gaze of parents creates an inferior and weak image of themselves in the minds of children. Therefore, the foundation of their personality is shaken.
The role of parents is always effective in shaping the mindset of children at the formative age, be it positive or negative. The consequences of both their roles are changing in their relationship with their children.
A parent’s relationship with their child, as well as the mutual expectations and feelings that come with each other, are very important and if they are never spoken or expressed in the wrong way, they continue to have serious effects on children. It means that there is no dialogue at all or the dialogue turns into an argument. Then gradually the mentality of children deteriorates.
Their changing attitude towards themselves towards parents and in turn towards the society starts to become negative and the transformation of all events then becomes a habit in bad things.
For example, Socially Disruptive Behavior– the way parents communicate with their children, has a direct impact on children’s behavior, thinking, self-confidence, emotional well-being, and the way they interact with other people.
Even with their own parents, they feel insecure. All of these ultimately affect their behavior and progress in school. Therefore, it is necessary to have a relationship of love and trust between parents and children.
Talking to children means, ‘What do you want? What don’t you want? Not this. Also, it is certainly not that easy to bring them clothes, toys, books, etc., because the emotional and mental needs of children are different and more.
As a wise and responsible parent, understanding him/her at the right time and fulfilling them is the most important and difficult task.
Once the confidence of such children is shaken, they hesitate to learn any new thing. They are afraid to take any responsibility, any work. Despite studying well, they avoid giving answers in class, because they are sure that they are wrong and that the teacher will shout at them and the children will laugh at them. They fear the exam. These children are not ready to participate in the competition. Why make yourself laugh when you don’t have the ability! With this feeling, the child prefers to stay behind in every place.
Overall, their weak ‘Self-Image’ is very deadly for these children’s personality development, their abilities, their goals, their future.
Most of the families today are divided into nuclear families. So only the parents are in the house, both of them are out of the house for work, when they come home in the evening, very tired, that’s when the child goes to talk to them, “Let’s talk later, I’ll see you tomorrow / I’ll see you? “आपण नंतर बोलु, मी उद्या बघते / बघतो चालेल? किंवा फारच झालं तर, अरे काय आल्या आल्या कटकट चालली आहे! कळत नाही का मी दमलोय /दमली आहे ते !!! , but of course the kids are hurt, because they usually don’t get after their parents’ “tomorrow”.
It is not only a right for your children to ask you for time to talk, but also an emotional need. Parents do not notice this. In short, negative thoughts of a similar serious nature like if we are unwanted by our parents and do not love us at all, unconsciously start building in their minds. If they are not taken care of in time, these thoughts can remain in the mind forever and lead to wrong interpretation. Therefore, it can be harmful to build intimacy in relationships.
Hence parents have to be very vigilant from the beginning to make the ‘Self-Image’ of the children strong and well developed. If children receive love, respect and security from their parents from childhood, they develop the belief that they are lovable.
Parents’ encouragement and support helps children to automatically recognize their abilities and good qualities. Of course, it helps them to have good self-belief and good dreams.
Such children are eager to try themselves in new and innovative fields. They are ready to try again and again without any hope if they fail in a task or competition. A good ‘Self-Image’ of children gives them the courage and persistence to strive for better goals and consequently leads to a brighter future for them.
To strengthen the shaky confidence of children, various homeopathic medicines can be given after studying their temperament. Due to these drugs, Homoeopathic medicines like Calcarea Carb, Argentum Nitricum, Baryta Carb, Aurum Met etc. can be given by analogy.
Homoeopathy has a number of medicines that work effectively to strengthen children’s ‘self-image’ and boost self-confidence.
According to Homoeopathic medicine, the natural medicine chosen after studying the personality of such children improves the personality of these children and strengthens their good image.
Dr. Ajay Hanmane
M. D. (Homeo)
Chaitanya Homeopathic Clinic
Bhaskar Plaza- F4
Shahupuri Vyapari Peth
Near Railway Gate Bhaji Mandai
Kolhapur- 416001
Mobile- 7738667123
Sunday Closed
Please read the following article –