किडनी, कॅन्सर आणि होमिओपॅथी
कित्येकदा दुर्धर विकारांवर डायलेसिस, शस्त्रक्रियांसारखे पर्याय दिले जातात, त्यासाठी आधुनिक वैद्यकशास्त्राचा पर्याय दिला जातो. पण कित्येक विकारात आता होमिओपॅथीने शस्त्रक्रियेला फाटा देत मानवी आयुष्य वाढविण्यासाठी योगदान दिले आहे.
अखेरच्या टप्प्यातील रुग्णांचेही आयुष्य होमिओपॅथीची औषधप्रणाली आणि पथ्यपाणी सांभाळल्यास वाढू शकते, हे संशोधनाअंती समोर आले आहे.
सद्यस्थितीत कोणताही साईड इफेक्ट्स नसलेली आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असलेल्या होमिओपॅथी उपचारप्रणालीकडे लोक कोविड च्या उद्रेकानंतर बऱ्याच प्रमाणात वळू लागले आहेत.
वास्तविक किडनी फेल्युअर आणि कॅन्सरला माणूस जरा जास्तच घाबरतो. सर्वसामान्यांच्या आवाक्यात नसलेले औषधोपचार आणि होणारी आर्थिक कोंडी यामुळे रुग्णांचे कुटुंब ही हबकून जाते. कदाचित म्हणूनच अशा विकारात इतर औषधोपचाराला प्राधान्य दिले जाते; पण तिथेही एकीकडे उपचार होत असताना दुसरीकडे त्या औषधांचे दुष्परिणाम ही जाणवू लागतात.
त्यानंतर अखेरच्या टप्प्यात हा रुग्ण पुन्हा होमिओपॅथीकडे वळतो आणि विकार नियंत्रणात आणताच त्या रुग्णाचे आयुष्य वाढविण्यात मग होमिओपॅथी योगदान देते.
किडनी फेल्युअर अर्थात किडनी खराब होणे यामध्ये प्रामुख्याने क्रॉनिक किडनी डिसीज (CKD) याला काही कारणे आहेत. यामध्ये —
- वेदनाशामक गोळ्यांचा अतिवापर
- अनुवंशिकता,
- जन्मजात असलेला दोष आणि
- शरीर विरोधी प्रतिकारशक्ती निर्माण होणे यांचा समावेश होतो.
अर्थात अशा रुग्णात होमिओपॅथी औषधे आणि पथ्य पाण्यामुळे हे विकार पूर्णपणे बरे होऊ शकतात.
अगदी किडनीचा कमी झालेला आकारही या औषधी उपचाराने व्यवस्थित होऊ शकतो.
किडनी फेल्युअर मध्ये —
- लघवीवाटे प्रथिने वाहून जाणे,
- रक्तातील युरियाचे प्रमाण वाढणे,
- क्रियाटिनींची पातळी वाढणे,
आदी लक्षणे दिसून येतात.
अशा विकारांवर होमिओपॅथीची औषधप्रणाली उपयुक्त असून संशोधनातून-
- किडनीचा आकार व्यवस्थित होणे,
- लघवीवाटे प्रथिने वाहण्याचे प्रमाण नियंत्रित करणे,
- क्रिएटिनींची पातळी कमी ठेवणे शक्य झाले आहे.
त्यामुळे किडनी बदलण्यासाठी आवश्यक असणारी शस्त्रक्रिया करण्याची गरज नसते. तसेच डायलेसिसचीही गरज नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
किडनी विकार प्रामुख्याने नेफ्रोटिक सिंड्रोम हा महत्त्वपूर्ण ठरतो. यामध्ये
- किडनीतील प्रथिनांचा हानी, गमावणे (Loss),
- तसेच अंगाला सूज येणे,
- वारंवार सर्दी- खोकल्याचा त्रास होणे,
- पातळ शौचास होणे, आदी त्रास सुरू होतो.
अर्थात हा विकारही या उपचार प्रणालीने पूर्णपणे बरा होतो.
किडनी फेल्युअर रोखण्यासाठी प्रामुख्याने-
- तेलाचा वापर कमी करा,
- मांसाहार टाळा,
- मिठाचा वापर कमी करा,
- तळलेल्या पदार्थाचा वापर कमी करावा,
ही पथ्य पाळल्यास नेफ्रोटिक सिंड्रोम चा रुग्ण पूर्णपणे बरा होतो.
पण त्यासाठी औषधोपचारासोबत पथ्यपाणीही सांभाळले पाहिजे. हे पाळल्यास रुग्ण दीड – दोन वर्षात पूर्णपणे विकार मुक्त होऊ शकतो आणि तोही कोणत्याही शस्त्रक्रिया आणि औषधांमुळे होणाऱ्या साईड इफेक्ट शिवाय !!!