वंश वाढवण्याच्या नैसर्गिक उर्मी बरोबरच आपलं मायेचं, आपलं असं स्वतःचं मूल हवं असा बहुतेक जोडप्यांचा आग्रह असतो. पण जेव्हा काही कारणांमुळे किंवा अनेक प्रयत्नानंतरही मूल होत नाही तेव्हा जोडप्यांमध्ये कमालीचं नैराश्य येतं.
जननक्षमते मागील समस्येमागे दरवेळी उपचार करता येण्याजोगी किंवा उपचार नसलेली शारीरिक कारणे असतात तसेच मानसिकही आणि जीवनशैलीशी निगडित ही कारणं असतात. हा आजकालच्या तरुण पिढीसाठी कळीचा मुद्दा आहे.
21 व्या शतकात जरी विवाहसंस्था शाबूत असली तरीही, तरुणाईचा लग्न-संस्थेकडे बघण्याच्या दृष्टिकोनात अमुलाग्र बदल झाला आहे. आजच्या तरुण पिढीचे लग्नाचे वय पुढे गेलेलं असलं. तरीही लग्नाआधी अनेकांची “अफेयर्स” झालेली असतात. त्यांना शरीरसंबंधाचा अनुभव असतो. त्यामुळे तिशी नंतर ते बाळाचा विचार सुरू करतात. तोवर लैंगिक आकर्षणातील ओढ संपून एक प्रकारचं “बर्नआऊट फिलिंग” आलेलं असतं.
स्त्रियांच्या बाबतीत विचार करता 29 – 30 वर्षानंतर जननक्षमता कमी व्हायला सुरुवात होते. तर 35 वर्षानंतर ती झपाट्याने कमी होते. भारतीय तरुणींमध्ये ही समस्या अतिशय ठळकपणे दिसून येते.
वंध्यत्वाच्या उपचारांसाठी दवाखान्यात आल्यावर सुरुवातीला गर्भधारणा राहण्याची शक्यता असलेल्या दिवसात संबंध ठेवायला सांगण्यात येतं. पण त्या गोष्टीचा अनेकदा पुरुषांवर ताण येऊन त्यांना ‘लैंगिक ताठरतेची’ समस्या सुरू होऊ शकते.
तसेच आयव्हीएफ आणि आय.यु.आय. सारखे उपचार करण्यास बऱ्याचदा जोडपी, त्यातल्या त्यात पुरुष तयार नसतात. त्यांची मानसिकता तयार होईपर्यंत बराच काळ निघून जातो आणि प्रेग्नेंसी / गर्भधारणा राहण्यात अडचण येवून त्या केसेस अवघड होत जातात.
बऱ्याचदा पती-पत्नी पैकी दोघांच्याही वैद्यकीय चाचण्यांमध्ये कोणताही दोष दिसून येत नसला तरी गर्भधारणा राहत नाही. अशावेळी त्या ‘जोडप्यांचे नातं नेमकं कसं आहे ” ? हे तपासण्याची गरज असते. म्हणजे समाजात वावरताना जरी त्यांच्यामधील परस्परसंबंध उत्तम दिसत असले तरी प्रत्यक्षात समागमाचं / सेक्स प्रमाण अत्यल्प असू शकतं. यामागे अनेक कारणे असू शकतात.
नोकरीनिमित्त पती-पत्नी वेगवेगळ्या शहरांमध्ये असणं, दोघं आय.टी.सारख्या क्षेत्रात असतील तर कामाचा प्रचंड ताण असणं, पुणे मुंबई सारख्या शहरात घर असेल आणि एकत्र कुटुंब असेल तर पुरेसा एकांत न मिळणं अशी वेगवेगळी कारण असू शकतात.
मानसिक कारणांचा विचार करता पुरुषाच्या मनात समागमाचा / सेक्सचा वा अन्य कुठल्याही गोष्टीचा ताण चिंता असेल तर त्याची परिणीती “कॉर्टिसोल”(Cortisol) हे संप्रेरक / हार्मोन जास्त प्रमाणात वाढले जाते. त्याचा नकारात्मक परिणाम ‘लिंगाच्या ताठरतेवर’ होतो किंवा ‘शीघ्रपतनाची समस्या’ उद्भवते.
जीवनशैलीतील वेगवेगळ्या घटकांचा जननक्षमतेवर थेट परिणाम होतो, ते म्हणजे सतत बाहेरचं “प्रोसेस फूड” खाल्ल्याने त्याचा गर्भधारणेवर नकारात्मक परिणाम होतो.
याउलट रोजच्या आहारात ताजी फळे, भाज्या,प्रथिने यांचे प्रमाण जितकं जास्त तितकी जननक्षमता गर्भधारणा सुधारते. फळांमध्ये आणि भाज्यांमध्ये असलेल्या “अँटिऑक्सिडंट’ मुळे वीर्याचा दर्जा सुधारतो हे लक्षात आलं आहे.
आहारा इतकाच महत्त्वाचा वाटा हा “व्यायामाचा “ठरतो. नियमित व्यायामाचा बाकी अवयवांप्रमाणेच जननेंद्रियाच्या आरोग्यालाही फायदा होतो. स्त्रियांमध्ये मासिकपाळीचे चक्र सुरळीत होण्यास तसेच वेगवेगळ्या हार्मोन्सची / संप्रेरकांची पातळी संतुलित राहण्यास व्यायामामुळे मदत होते.
वेगवेगळ्या व्यसनांचा “कामेछेवर आणि कामजीवनावर” थेट परिणाम होतो. जननक्षमतेशी संबंधित समस्यांचा विचार करता जोडप्यांपैकी एकाची किंवा दोघांची जीवनशैली निर्वसणी आहे की नाही याचा बराच प्रभाव पडतो.
अल्कोहोल आणि तंबाखूच्या सेवनामुळे पुरुषांच्या बाबतीत शुक्राणूंच्या प्रमाणावर स्पर्म काउंट आणि त्यांच्या वाहन क्षमतेवर (Motility) थेट परिणाम होतो. तर स्त्रियांमध्ये या व्यसनामुळे पाळीच चक्र बिघडून ओव्हूलेशनच्या (Ovulation) प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात.
त्यामुळे बाळाचा विचार करत असताना किंवा एरवी निरोगी कामजीवनाची अपेक्षा ठेवताना व्यसनांपासून दूर राहणं केव्हाही चांगलं.
वाढत्या वजनाचा मुद्दाही गर्भधारणेच्या समस्येत मोठी भूमिका बजावतो. “बॉडी शेमिंगला” विरोध करत स्वतःच्या शरीराला आहे तसं स्वीकारण्याचा हल्ली ट्रेड असला तरी शरीरावरील अतिरिक्त चरबी ही गर्भधारणेवर / जननक्षमतेवर थेट परिणाम करते.
म्हणजे आपल्या समाजात लठ्ठपणाची समस्या मोठ्या प्रमाणात दिसत आहे. याचा थेट संबंध जननक्षमतेशी/गर्भधारणेची आहे. लठ्ठपणामुळे वीर्यातील शुक्रजंतूंचं प्रमाण घटतं.
तरुणांमध्ये मधुमेह आणि उच्चरक्तदाबाचे प्रमाण लक्षणीय वाढत चाललं आहे. कोणत्याही प्रकारचा व्यायाम नाही, वेगवेगळी व्यसन आणि त्यात मोबाईल आणि ओटीटी प्लॅटफॉर्मची मिळालेली जोड त्यामुळे तरुणाईला लठ्ठपणाच्या समस्येने ग्रासलेले दिसत आहे. मोबाईलच्या व्यसनामुळे शरीर संबंधाची इच्छा – लिबीडो (Libido) कमी होत आहे त्यामुळे अनेक जोडप्यांना मूल हवं असलं तरी त्यासाठी शरीर संबंध ठेवण्याची त्यांची इच्छा नसल्याचे दिसून येतं.
‘करिअरमध्ये आणि आर्थिक दृष्ट्या स्थिरस्थावर झाल्याशिवाय मूल होण्याचा विचार करायला नको’ हा विचार योग्य असला तरी काही वेळा त्याचा अतिरेक केल्यानेही नंतर मूल होण्यात अडचणी उद्भवू शकतात.
म्हणजे कोणाला घराचं स्वप्न पूर्ण करायचं असतं, तर कोणाला परदेशी जाण्याचं … पण स्वप्न पूर्ण करण्याच्या नादात वय वाढल्याने वंध्यत्वाची समस्या उद्भवू शकते याचा विचार जोडप्याने निश्चितपणे करायला हवा.
याचबरोबर दुसरं टोक म्हणजे, कुटुंब नियोजनाच्या साधनांबद्दल पद्धतशीरपणे पेरण्यात आलेले गैरसमज !!!
‘लग्नानंतर पहिल्या वर्षात मुल होऊ दिलं नाही तर मूल होण्यात अडचणी येतात ‘ हा सगळ्यात मोठा गैरसमज असून लग्न झालेल्या आपल्या मुला मुलींनी लगेच चान्स घ्यावा म्हणून ज्येष्ठ पिढीने हा समज मुद्दाम समाजात रुजवलाय असं अनेक डॉक्टरांचे म्हणणं पडतं.
जागतिक आरोग्य संघटनेच्या डब्ल्यू.एच.ओ.(WHO) व्याख्यानुसार, ‘कोणतीही कुटुंब नियोजनाची साधनं न वापरता वर्षभर सातत्यपूर्ण शरीर संबंध ठेवून ही गर्भधारणा न राहणं या स्थितीला वंध्यत्व म्हणता येऊ शकतं.
बऱ्याच जोडप्यांची अशी समजूत असते की, कुटुंब नियोजनाची साधने वापरणे बंद केलं की लगेच गर्भधारणा होईल !! प्रत्यक्षात यासाठी काही महिने किंवा वर्षभराचा कालावधी लागू शकतो.
यामुळे जोडप्यांपैकी कुणाला बाकी कुठल्या लैंगिक समस्या नसतील, शारीरिक व्याधी नसतील आणि वय 35 च्या पुढे असेल तर आपल्याला वंध्यत्व आहे असा परस्पर समज करून घेणं चुकीचं तर आहेच पण त्यामुळे विनाकारण न्यूनगंड आणि नैराश्य बळावू शकतं.
जीवनशैलीचा अन्य मुद्द्यांचा विचार करता तरुणाईमध्ये आणि विशेषतः पुरुषांमध्येही टाईट जीन्स वापरण्याची फॅशन असली तरी पॅन्ट्समुळे जननेंद्रियाची उष्णता वाढू शकते. त्यामुळे मोकळे, सैलसर कपडे वापरावेत. हीच गोष्ट अंतर्वस्त्रांनाही लागू होते. अंतरवस्त्र ही शक्यतो कॉटनची असावीत. याशिवाय कामाचा विचार करता अनेक जणांना लॅपटॉप मांडीवर घेऊन बसण्याची सवय असते. याचा परिणाम जनमक्षमतेवर होतो, त्यामुळे हे टाळलेले चांगलं.
याशिवाय खूप गरम पाण्याने अंघोळ केल्याने ही वृषणांवर / टेस्टीजवर परिणाम होऊन शुक्राणूंचे प्रमाण घटू शकतं. त्यामुळे वर्षभर अगदी थंड पाण्याने नाही पण कोमट पाण्याने स्नान करणं चांगले.
मूल होत नसेल तर आजही बहुतांश वेळा स्त्रियांना जबाबदार धरलं जातं. वास्तविक वंध्यत्वाच्या समस्येत पहिल्यांदा पुरुषांची वीर्य तपासणी करणे अपेक्षित असतं कारण ती सहजा सहजी होणारी प्रक्रिया असते. याचा थेट संबंध पुरुषत्वाशी जोडण्यात येत असल्याने अनेक पुरुष त्याला तयार नसतात.
संशोधनाच्या अहवालानुसार 20 ते 30 ℅ प्रकरणांमध्ये मूल होण्यासाठी पुरुष जबाबदार असतात तर 20 ते 30 ℅ प्रकरणांमध्ये स्त्री आणि पुरुष या दोघांमधील अक्षमता वंध्यत्वासाठी कारणीभूत ठरते.
जनमक्षमतेच्या संदर्भात पुरुषांच्या समस्यांचा विचार करता शीघ्रपतन आणि लैंगिक ताठरतेची समस्या ही दोन प्रमुख कारणं वंध्यत्वामध्ये प्रकर्षाने आढळतात. लैंगिक ताठरतेची समस्या असलेल्या पुरुषांना बऱ्याचदा गोळ्या खाऊन सेक्स/ समागम करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र सेक्स ही काही यांत्रिक क्रिया नाही, त्यामुळे “फोरप्लेद्वारे-(FOREPLAY) नैसर्गिकरित्या” लिंग उत्तेजित झालं तरच गोळीचा फायदा होतो हे जोडप्याने समजून घेणे आवश्यक आहे.
स्त्रियांचा विचार करता योनीआकर्ष (Vaginismus) किंवा वेदनामय संभोग ( dyspareunia, sexual pain disorder) या शारीरिक, मानसिक व्याधींमुळे समागम / सेक्स होऊ शकत नाही. सेक्स विषयी भीती, चिंता असेल तर समागम / सेक्स दरम्यान स्त्रीच्या योनीमार्गातील स्नायु तिच्या नकळत आकुंचित पावतात. परीणामी लिंगाचा योनीमार्गात प्रवेश होऊ शकत नाही. या व्याधी मनोकायिक (सायकोसोमेटिक) प्रकारात मोडणाऱ्या आहेत. बऱ्याचदा पत्नीला योनीआकर्ष (Vaginismus) किंवा वेदनामय संभोग ( Dyspareunia) समस्या असेल तर प्रयत्न करूनही समागम / सेक्स न जमल्याने पतीला लैंगिकता ताठरतेची समस्या उद्भवू शकते. या समस्येवर उपचार घेण्याच्या ऐवजी अनेक जोडपी आपल्याला वंध्यत्वाची समस्या असल्याचा निष्कर्ष काढून मोकळे होतात.
जीवनशैलीत काही छोटे-मोठे बदल करून तर कधी योग्य वैद्यकीय मदत घेत जननक्षमता सुधारणा आणि जननेंद्रियांशी संबंधित काही समस्या असतील तर त्यावर उपचार करणे होमिओपॅथिक औषध उपचारांनी शक्य आहे. गरज आहे ती कामजीवनाकडे सहजपणे पाहण्याची.
अंतिमतः ज्या जोडप्यांना मूल हवाय त्यांना ते न होण्यामागे केवळ शारीरिक कारणांबरोबरच मानसिक कारणे देखील असतात. जीवनशैलीशी निगडित अनेक गोष्टींचा जसा बारकाईने विचार करावा लागतो त्याचप्रमाणे वरवर गर्भधारणेशी संबंधित न वाटणाऱ्या जीवनशैलीतल्या अनेक गोष्टी जननक्षमतेवर थेट परिणाम करतात.
होमिओपॅथी उपचार पद्धतीत स्त्री आणि पुरुष दोघांनाही एकाच वेळी वंध्यत्वाच्या उपायांसाठी औषध घ्यावे लागते. त्यांचा मानसिक आणि शारीरिक गोष्टींचा अत्यंत बारकाईने अभ्यास करून त्यांच्या पर्सनॅलिटीला योग्य असे औषध शोधून काढावे लागते. त्यामुळे दोघांचेही आरोग्य निरोगी राहून जननक्षमता वृद्धिंगत होते आणि गर्भधारणा नैसर्गिकरित्या राहते.
त्यामुळे असे म्हणता येईल,
डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ) HHF, ICR Kolhapur,
चैतन्य होम्योपैथिक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4
शाहुपुरी व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123
रविवारी बंद
कृपया पुढील लेख वाचा —
संसाराचा बिघडला ताल “नादाने”,
साधला समतोल होमिओपॅथीचा उपचाराने ||
Along with the natural urge to procreate, most couples insist on wanting a child of their own, their own. But when for some reasons or after many attempts a child does not come, couples get extremely depressed.
Fertility issues often have treatable or non-treatable Physical causes, as well as Psychological and lifestyle factors. This is a key issue for today’s young generation.
Even though the institution of marriage is intact in the 21st century, there has been a drastic change in the attitude of the youth towards the institution of marriage. The marriageable age of today’s young generation has passed. Still, many people have “Affairs” before marriage. They have an experience of carnal intercourse. So after 30 they start thinking about baby. Then the attraction of sex ends and a kind of “Burnout Feeling” comes.
In the case of women, fertility begins to decline after 29-30 years. But after 35 years it decreases rapidly. This problem is very prominent among Indian girls.
When you come to the clinic for infertility treatment, you are initially told to have intercourse during the most fertile days. But it can often stress men and cause them to have ‘Erectile’ problems.
Also, many couples, including men, are not ready to undergo treatments like IVF and IUI. A long time passes before their mentality is formed and those cases become difficult due to difficulty in maintaining pregnancy.
Often the pregnancy does not survive even though no defect is found in the medical tests of both husband and wife. In such a case, it is necessary to check the ‘Relationship of the couple’. That is, even if the relationship between them looks good while walking in the society, the amount of intercourse / sex may actually be very low.
There may be many reasons behind this. If you are in a field like I.T., there may be different reasons like heavy work pressure, if you have a house in a city like Pune, Mumbai and if you have a family together, you may not get enough privacy.
Considering the psychological reasons, if a man is worried about the stress of intercourse/sex or any other thing, his hormone “cortisol” is increased in excess. It has a negative effect on ‘penile erection’ or causes ‘problem of Premature Ejaculation’.
Different lifestyle factors have a direct impact on fertility, such as the constant consumption of outside “processed food” that negatively affects pregnancy .
On the contrary, the higher the amount of fresh fruits, vegetables, protein in the daily diet, the better the fertility and pregnancy . Antioxidants in fruits and vegetables have been found to improve sperm quality.
“Exercise” is as important as diet. Regular exercise benefits the health of the genitals as well as the rest of the body. Exercise helps to regulate the menstrual cycle and balance the levels of various hormones in women.
Different addictions have a direct impact on “play and work life”. Whether or not one or both of the couples have lifestyle issues has a lot of influence when it comes to fertility issues.
Alcohol and Tobacco consumption directly affect sperm count and motility in men. In women, due to this addiction, the menstrual cycle is disturbed and the process of ovulation is obstructed.
So it’s always good to stay away from addictions when you’re thinking about a baby or looking forward to a healthy work life.
The issue of weight gain also plays a major role in pregnancy problems. Despite the current trade of accepting one’s body as it is against “Body Shaming” , excess body fat directly affects pregnancy /fertility.
This means that obesity is a big problem in our society. It is directly related to fertility/pregnancy. Due to obesity, sperm count in semen decreases.
The prevalence of diabetes and high blood pressure is increasing significantly among the youth. No form of exercise, various addictions and the addition of mobile and OTT platforms are causing the youth to suffer from the problem of obesity. Due to mobile phone addiction, libido is decreasing, so many couples want to have a child, but they don’t want to have sex.
Although the idea of ’don’t think about having a child until you are financially and career stable’ is correct, sometimes overdoing it can lead to difficulties in having a child later.
That is, someone wants to fulfill the dream of home, while someone wants to go abroad.
At the other extreme, there are systematic misconceptions about family planning tools !!!
Many doctors say that ‘ If you don’t allow a child in the first year after marriage, there will be problems in having a child ‘, this is the biggest misconception and many doctors say that the older generation has deliberately instilled this notion in the society so that their sons and daughters who get married should take a chance immediately.
According to the World Health Organization (WHO) definition, ‘ Infertility is the absence of pregnancy through continuous sexual intercourse throughout the year without the use of any family planning methods.
Infertility is the condition of non-pregnancy without the use of family planning tools. Many couples believe that they will get pregnant immediately if they stop using family planning tools ! In reality, this may take a few months or even a year.
Because of this, if one of the couple has no other sexual problems, no physical ailments and is above 35 years of age, it is not only wrong to assume that we are infertile, but it can lead to unnecessary inferiority complex and depression.
Considering other lifestyle issues ,Tight Jeans are fashionable among youth and especially among men, but Pants can increase Genital Heat. So loose, loose clothes should be used. The same thing applies to underwear . Underwear should preferably be of cotton. Apart from this, many people have a habit of sitting with a Laptop on their lap while thinking about work. It Affects Fertility, so it is better to avoid it.
Also bathing with very hot water can affect the testicles/testes and reduce the sperm count. So it is better to bathe with warm water rather than cold water throughout the year.
Even today women are often held responsible if they do not have children. In actual infertility problems, men should first undergo semen analysis as it is a relatively easy procedure. Many men are not ready for it as it is directly associated with masculinity.
According to research reports men are responsible for childbearing in 20 to 30 ℅ cases while in 20 to 30 ℅ cases Male and Female impotence is responsible for infertility.
When it comes to male fertility issues , Premature Ejaculation and Erectile Dysfunction are two major causes of Infertility . Men with Erectile Dysfunction are often advised to have sex with pills. But SEX is not a Mechanical Act, so couples need to understand that the pill only works if the penis is stimulated “Naturally through Foreplay.”
Another thing is that one-third of the men in the society are suffering from premature ejaculation problems, but many men are not aware that Homoeopathy is a sure remedy for it. They don’t go to the doctor just out of hesitation.
Regarding women , Vaginal Contractions (Vaginismus) or Painful Sex (dyspareunia, sexual pain disorder) cannot have sexual intercourse due to Physical and Mental disorders. If there is Fear, Anxiety about Sex, the muscles in a woman’s vagina contract unconsciously during intercourse / sex. As a result, the penis cannot enter the vagina. These diseases are classified as Psychosomatic.
Often the wife has a problem of Vaginismus or Painful intercourse (Dyspareunia) and the husband may have erectile dysfunction due to the inability to have sex despite trying. Instead of seeking treatment for this problem, many couples are free to conclude that they have an infertility problem.
Fertility improvement and some problems related to genital organs can be treated with Homoeopathic Medicine Treatment by making some minor lifestyle changes and sometimes taking proper medical help. What is needed is to look at work life easily.
Ultimately couples who want children have not only Physical but also Psychological reasons for not having them. Just as many lifestyle factors need to be carefully considered, many seemingly unrelated lifestyle factors directly affect fertility.
In Homoeopathic Treatment, both Men and Women have to take medicine for infertility treatment at the same time. Their Mental and Physical aspects have to be studied very closely and a medicine suitable for their personality has to be found out. So both of them stay healthy and fertility increases and pregnancy happens naturally.
So it can be said,
Dr Ajay Hanmane
M.D.(Hom)HHF,ICR Kolhapur,
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4,
Bhaskar Plaza Vyapari Peth,
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
Mobile No. 7738667123
Sunday Closed.
Please read the following article –
संसाराचा बिघडला ताल “नादाने”,
साधला समतोल होमिओपॅथीचा उपचाराने ||