पाळी सुरूच झाली नाही तर ? ….आधार होमिओपॅथीचा !!! / If the Menses Does Not Continue? …. HOMOEOPATHY will Assist !!!

Dorctor Pic By Dr. Ajay HanmaneSeptember 30, 2024 Female Problems General Information Homeopathic and Cure Mental Health Sexual Problems

 

पाळी सुरूच झाली नाही तर ? ….आधार होमिओपॅथीचा !!!

 ‘मासिकपाळी ‘  हा स्त्रियांच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक. आल्यावर नकोशी वाटणारी आणि नाही आली तर काळजी करायला लावणारी पाळी, स्त्रियांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी अगदी जवळीक साधणारी आहे.
महिन्याचे ते चार दिवस जरी अगदी नकोसे असले तरी पाळी सुरूच न होणे किंवा अनियमित असणे जास्त त्रासदायक ठरते.
पूर्वीच्या काळी पाळी आली की, स्त्री गर्भधारणा होण्यास सक्षम आहे असे समजून लगेच तिचे लग्न देऊ लावून दिले जायचे. अजूनही अनेक समाजात विशेषतः ग्रामीण भारतात बालविवाहाची प्रथा आहे. मुलीचे लग्न अगदी लहान वयात लावले जाते आणि पाळी व्यवस्थित येईपर्यंत आई-वडिलांकडेच राहून नंतर सासरी जाते.
एकूण काय, मुलीच्या जन्माचा व लग्नाचा एकमेव उद्देश प्रजनन हाच समजला जातो !  अर्थात निदान शहरी भागात तरी ही मानसिकता कमी होत आहे.
पाळीभोवती शारीरिक आणि मानसिकच नव्हे तर दुर्दैवाने सामाजिक आरोग्य देखील जोडलेले आहे. पूर्वी आपल्याकडे मुलीला पाळी यायला लागले की, घरात गोड करून पाळी साजरी केली जायची. म्हणजे एकदा का पाळी यायला लागली की, ती स्त्री म्हणून ‘परिपूर्ण’ आहे असे समजले  जायचे.
परंतु पाळी न येणारी मुलगी सुद्धा सामान्य आयुष्य जगू शकते, हे अजूनही मुलींच्या पालकांना पटतच नाही, तर इतरांचा विचारच नको.
परवाच आमच्या स्वयंपाकाच्या मावशी सांगत होत्या, की ‘ नुकतेच दोन महिन्यापूर्वी मुलाचे लग्न झाले आहे. पण सुनेला पाळी व्यवस्थित येतच नाही. लग्नाआधी तिने ही गोष्ट आमच्यापासून लपवून ठेवली. ‘ त्यांच्या बोलण्यात थोडी चीड, फसवणूक झाल्याची भावना होती. खरे तर पाळीही वैयक्तिक गोष्ट आहे.
कदाचित अनियमित पाळी ही सासरच्यांना मुद्दाम सांगायचं अशी गोष्ट आहे असे सुनेला वाटले नसेल. अथवा तेवढी मोकळी तिला अजून वाटत नसेल ….. कदाचित तिच्या या बाबतीत काही वैद्यकीय तपासण्या झालेल्या असतील मात्र तिला ती माहिती स्वतःचीच मर्यादित ठेवायची असेल.
त्यामुळे सुनेला न बघता, तिच्याशी न बोलता परस्पर तिच्या सासूला अर्धवट माहिती देणे नैतिकदृष्ट्या योग्य नव्हते. त्यामुळे ‘सुनेला घेऊन या’ एवढे बोलून मी विषय थांबवला.
 पाळी योग्य वयात सुरु न होण्याची अनेक कारणे आहेत.
  • अचानक वजन वाढणे,
  • असंतुलित संप्रेरके संप्रेरकांची कमतरता,
  • ताणतणाव,
ही त्यातील काही महत्त्वाची कारणे.
या विषयावर पालकांची चर्चा करून होमिओपॅथिक उपाय करणे सहज शक्य असते.
त्याचबरोबर त्याच्याशी निगडित असलेल्या आरोग्यावर होणाऱ्या इतर दुष्परिणामांची माहिती मुलीला आणि पालकांना ही देणे गरजेचे असते.
उदाहरणार्थ –
  • असंतुलित संप्रेरके (पीसीओएस – पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम ) असलेल्या  स्त्रियांना मधुमेहाचा धोका अधिक असतो.
  • तीन-चार महिन्यातून एकदा पाळी येणाऱ्या स्त्रियांमध्ये अवाजवी रक्तस्त्राव होणे, रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी खालावणे अशा समस्या निर्माण होतात.
  • तसेच त्यांना पुढे गर्भाशयाचा कर्करोग होण्याची शक्यता इतर स्त्रियांपेक्षा अधिक असते.
त्यामुळे होमिओपॅथिक औषधांच्या साहाय्याने वेळेच्या वेळी पाळी आणणे या इतर परिणामांना प्रतिरोधात्मक ठरू शकते.
काही स्त्रियांमध्ये दिसते ते  Premature Ovarian Failure म्हणजे अंडाशयाची क्षमता अत्यंत कमी असल्याने संप्रेरके कमी तयार होतात आणि त्यामुळे पाळी येत नाही. परंतु योग्य निदान झाल्यास होमिओपॅथिक औषधांच्या साह्याने नियमितपणे आणता येते.
या स्त्रियांमध्ये संप्रेरकांच्या कमतरतेमुळे ठरणारे दुष्परिणाम (हाडे ठिसूळ होणे, रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढणे) हे देखील होमिओपॅथिक औषध उपचारामुळे टाळता येते.
एवढेच नव्हे तर कृत्रिम गर्भधारणा पद्धतीने (IVF) त्यांना गर्भधारणा देखील होऊ शकते.
काही स्त्रियांमध्ये गुणसूत्रे बदल दिसून येतात. अशांमध्ये पाळी न येण्याबरोबर इतर काही जटिल आजार असू शकतात.
उदाहरणार्थ ‘टर्नर सिंड्रोम’  या जनुकीय आजारात पाळी न येण्याबरोबरच हृदयाचे काही आजार दिसून येतात. त्याचे निदान झाल्यास आरोग्याची काळजी योग्य प्रकारे घेतली जाऊ शकते.
मानसिक स्वास्थ्याचा देखील पाळीशी जवळचा संबंध आहे. नैराश्यासारख्या (डिप्रेशन) काही मानसिक व्याधींमध्ये पाळी अनियमित येते.तसेच या व्याधींवर दिलेल्या आधुनिक (ऍलोपॅथिक) औषधांचाही पाळीवर परिणाम होतो. मात्र  होमिओपॅथिक औषध उपचारामुळे बरे झाल्यावर पाळी पूर्ण नियमित होते.
  • अत्यंत ताणतणाव,
  • नोकरीतल्या समस्या,
  • नातेसंबंधातले तणाव,
  • अत्यंत जवळच्या व्यक्तींचा मृत्यू,
  • एवढेच नव्हे तर कधी कधी महत्त्वाच्या वा स्पर्धा परीक्षांच्या वेळी ही पाळी चुकण्याची समस्या बऱ्याचदा दिसून येते.
म्हणूनच तणाव मुक्तीसाठी योग, ध्यानधारणा बरोबरच होमिओपॅथिक उपचार हे मानसिकच नव्हे तर शारीरिक स्वास्थ्यासाठीही महत्त्वाचे आहे.
पाळी न येणाऱ्या बऱ्याच मुली आई-वडिलांबरोबर तपासायला आलेल्या असतात. त्यांच्या आई-वडिलांची अशी इच्छा असते की, एकदा हिची पाळी सुरू झाली की, लग्न लावून देता येईल.
दुर्दैवाने अनेक आई-वडिल पुढील फक्त लग्न, मुले यांची चिंता करत असतात. “डॉक्टर, तिच्या इतर आयुष्यावर, शारीरिक, बौद्धिक क्षमतेवर याचा काही दूरगामी परिणाम होणार नाही ना ? “असे विचारणारे फारच कमी असतात.
तर बऱ्याच स्त्रिया ही गोष्ट त्यांच्या नवऱ्यापासून, सासरच्या लोकांपासून लपवून ठेवतात. वंध्यत्वावर उपचार करायची, खर्च करायची त्यांची तयारी असते. विनंती एकच, पाळीची समस्या कोणाला सांगू नका !
म्हणजे पाळी न येण्याबाबत इतके सामाजिक पाश आहेत की, आपल्याला तिथे स्वीकारले जाणार नाही, या भीतीने त्यांचा लपंडाव सुरू असतो.
अशी ही पाळी ! बरीचशी वैयक्तिक, थोडी कौटुंबिक आणि थोडीशी सामाजिक !!
पाळी स्त्रीवरच्या कौटुंबिक आणि सामाजिक दबावाचा विषय होऊ नये हे खरे, परंतु त्याच वेळी  मासिक पाळीच्या समस्या मोकळेपणाने स्वीकारणे ही गरजेचे आहे.
समस्या स्वीकारली तरच तिच्यावर होमिओपॅथीने उपाययोजना करणे शक्य आहे. ती लपवून ठेवली तर तिच्यातून मार्ग तर निघणार नाहीच, पण आजूबाजूचा दबाव आणि त्याबरोबरीने मानसिक ताणतणाव वाढेल.
जोपर्यंत पाळी विषयाचे गैरसमज दूर होत नाहीत, तोपर्यंत ती कुजबुजच ठरेल. ही कुजबूज थांबवून योग्य तिथे खुलेपणाने बोलता हवे यावे यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागतील.

डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ) HHF, ICR Kolhapur,
चैतन्य होमिओपॅथीक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4, HDFC बॅंकेजवळ,
शाहुपुरी, व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123
रविवारी बंद  

कृपया पुढील लेख वाचा  —

—————————————————————————————-

If the Menses Does Not Continue? …. HOMOEOPATHY will Assist !!!

Menstruation is an integral part of women’s life. Menstruation, which feels unwanted when it comes and causes worry when it doesn’t, is closely related to women’s physical and mental health.
Although those four days of the month are very undesirable, non-continuation or irregular periods are more troublesome.
In earlier times, when a woman got her period, she was thought to be capable of conceiving and immediately got married. Child marriage is still practiced in many societies, especially in rural India. A girl is married off at a very early age and stays with her parents until her period is regular and then goes to her in-laws.
All in all, the only purpose of a girl’s birth and marriage is considered to be procreation ! Of course, at least in urban areas, this mentality is decreasing.
Not only Physical and Mental health but unfortunately also Social Health is linked around Menstruation.
Earlier, when a girl started her period, the period was celebrated by making sweets in the house. That is, once she started Menstruating, she was considered Perfect’ as a Woman.
But the fact that a Non-Menstruating girl can lead a normal life is still not acceptable to the girls’ parents, let alone others.
Just the other day, our cook’s aunt was saying, ‘My son got married two months ago. But the daughter-in-law does not get her periods properly. She hide this from us before marriage. ‘There was a bit of annoyance in his words, a feeling of being cheated.
In fact, Menstruation is also a personal thing. Perhaps the daughter-in-law did not think that irregular Menstruation was something to deliberately mention to her In-laws. Or she doesn’t feel that free yet…..maybe she has had some medical tests but she wants to keep that information to herself.
So it was not morally right to give partial information to the mother-in-law without seeing the daughter-in-law or talking to her. So I stopped the topic by saying ‘Bring Daughter-in-law‘.
There are many reasons why Menstruation may not start at the right age.
  • Sudden weight gain,
  • Imbalanced hormones, lack of hormones,
  • Stress,
These are some of the important reasons.
Homeopathic remedies are easily possible by discussing this matter with the parents.
At the same time, it is necessary to inform the girl and the parents about the other side effects on health associated with it.
For example,
  • Women with imbalanced hormones (PCOS – Polycystic Ovarian Syndrome) have a higher risk of diabetes.
  • In menstruating women once in three-four months, problems such as excessive bleeding and low hemoglobin levels occur.
  • They are also more likely to develop ovarian cancer later than other women.

Therefore, Homoeopathic medicines can counteract these other side effects of regular Menstruation.

Premature Ovarian Failure seen in some women means that the capacity of the ovaries is very low and the hormones are not produced due to which there is no Menstruation.
But if properly diagnosed it can be brought about regularly with the help of Homoeopathic Medicines.
The side effects of hormone deficiency in these women (brittle bones, high blood cholesterol) can also be avoided by Homoeopathic Treatment.
Not only this, they can also get pregnant through artificial insemination (IVF).
Chromosome changes are seen in some women. In such cases there may be some other complex diseases along with absence of Menstruation.
For example,
in the genetic disease ‘Turner syndrome’, along with amenorrhea, some heart diseases are seen. If it is diagnosed then the health care can be taken properly.
Mental Health is also closely related to Menstruation.
Menstruation occurs irregularly in some Mental disorders like depression. Similarly, Modern  Medicines given for these disorders also affect Menstruation. But after recovery from that disease due to Homoeopathic Medicinal treatment, periods become completely regular.
  • Due to extreme stress,
  • Job problems,
  • Relationship stress,
  • Death of very close people, not only this, but sometimes
  • During important or competitive exams, this problem of missing periods is often seen.
Hence Yoga, Meditation along with Homoeopathic Treatment for stress relief is important not only for Mental but also for Physical Health.
Many girls who do not get period come to check with their parents. Her parents wish that once her period starts, the marriage can be arranged.
Unfortunately, many parents worry only about marriage and children.
“Doctor, won’t this have some far-reaching effect on her other life, physical, intellectual abilities?”
Many women hide this from their husbands and in-laws. They are ready to spend on infertility treatment. One request, don’t tell anyone about the Menstrual Problem !
That is, there are so many social loops around Non-Menstruation that they keep hiding for fear of not being accepted there.
This is the turn! A lot personal, a little family and a little social !!
It is true that menstruation should not be a subject of Family and Social pressure on a Woman, but at the same time, it is necessary to freely accept Menstrual Problems.
Only if the problem is accepted, it can be remedied by Homoeopathy. If it is kept hidden, it will not get out, but the surrounding pressure will increase and the Mental Stress will increase with it.
Until the Misconceptions about Menstruation are cleared, it will remain a whisper. We have to try to stop this whispering and speak openly where appropriate.

Dr Ajay Hanmane
M.D.(Hom) HHF, ICR Kolhapur,
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4, Near HDFC Bank,
Bhaskar Plaza Vyapari Peth, Shahupuri
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
Mobile No. 7738667123
Sunday Closed.

Please Read Next Article-

Back To Top