“उलुशी खिचडी साजूक तूप, वेगळं राहायचं भारीच सुख ” असं एकत्र कुटुंबात राहणाऱ्या सुनेला वाटणं अगदी साहजिक होतं, त्यापेक्षाही मोठ्या माणसांच्या धाकाशिवाय एकटं राहायला मिळणार ही चैन वाटायची तो काळ साधारणपणे 80-90 च्या दशकातला.
त्यानंतर नोकरी निमित्त दुसऱ्या शहरात स्थायिक होण्याचे प्रमाण वाढत गेलं. तसतसं विभक्त कुटुंब पद्धती वाढू लागली. त्यामुळे वेगळं राहणं ही चैन अनेक कुटुंबांना विनासायास मिळाली.
या सगळ्यांकडे पाहिलं की, एकटेपणा ही चैन किंवा सुख वाटतं. पण आपण आता करण्याच्या साथीतून बाहेर पडलेली पिढी आहोत आणि या दीर्घकाळ चाललेल्या साथीत प्रत्येकालाच कधी ना कधी हा एकटेपणा अंगावर आला होता. करोनाची साथ गेली. आयुष्य पूर्व पदावर आलं. आपला प्रवास पुढे सुरू राहिला. पण हा ‘एकटेपणा’ तसाच घर करून राहिला आहे.
‘एकटेपणा’ वाटण्याचं प्रमाण इतकं जास्त आहे की, जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) याची दखल घेऊन एकाकीपणा ही एक नवीन साथच आहे, असं म्हणावं लागलं !
म्हणूनच त्याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे.
माझा एक पेशंटची मुलगी नुकतीच कॅनडाला उच्च शिक्षणासाठी गेली. आईकडून लाडावलेल्या त्या मुलीला सुरुवातीला तिथे सगळ्यांशी जुळवून घेताना बराच त्रास झाला. भारतातही ती फारसं बाहेर पडायची नाही. ती भली की तिचं शिक्षण भलं !. त्यासाठी कॉलेज एवढंच तिचं विश्व होतं. तरीही ती कॅनडात एकटी पडली.
कुणावर विश्वास ठेवावा ?
कुणाशी बोलावं ?
तिला काहीच उलगडत उलगडा होत नव्हता.
आपल्या एकटेपणाबद्दल सांगताना ती म्हणाली की, कोल्हापूरच्या पेठेतून बाहेर पडल्यावर कॅनडात रस्त्यावर सहसा कोणीच माणूस न दिसणं, इथून ‘एकटं वाटणं’ सुरू झालं.
‘एकट असणं (बिंइंग अलोन) आणि एकाकीपणा (लोनलीनेस)’ यात फरक आहे.
आपण कोरोनामध्ये आपापल्या घरात बंद होतो तेव्हा आपलं एकटे होतो.
समाजापासून मित्र नातेवाईकांपासून पण इंटरनेटच्या कृपेमुळे सगळ्यांच्या संपर्कात राहण्याचा पर्याय आपल्याकडे होता.
त्यामुळे प्रत्येक कुटुंब आणि व्यक्ती घरात आली असली तरी त्यांना ‘एकाकीपणा ‘ जाणवला असेलच असं नाही.
त्या मुलीच्या आयुष्यात घराचे दार उघडलं तरी बोलायला कोणी नव्हतं.
तिचं जेवणात लक्ष आहे की नाही ? हे बघायला कोणी नव्हतं. पण आई-बाबा आणि भारतातले मित्र-मैत्रिणी दूरसंचार क्रांतीमुळे तिच्याशी जोडलेले होते. त्यामुळे मनात ‘ एकाकीपणाने’ घर केलं नाही किंवा ती पोकळी जाणवली नाही.
याउलट ‘एकाकीपणाच्या’ अवस्थेत, “मला कोणी समजून घेत नाही”, “माझी कुणालाच गरज नाही”, “माझ्या असण्या- नसल्यानं कुणालाच फरक पडत नाही”, “मला कुणाच्याच आयुष्यात प्राधान्याचं स्थान नाही”, या प्रकारचे तीव्र विचार मनात येत राहतात.ही खूप तीव्र भावना असते.
‘एकाकीपणाच्या’ अवस्थेत व्यक्ती एकटी असेलच असं नाही. भरल्या घरातही एखाद्याला हा “एकाकीपणा” जाणवू शकतो.
एका पेशंटला समुपदेशन करताना, एका अठरा वर्षाच्या मुलांनं आपल्या एकाकीपणाचे वर्णन करताना सांगितलं की, ” रात्रीच्या वेळी मला इतकं एकटं वाटतं की मग कडाक्याची थंडी असली तरी पंखा जोरात लावून झोपतो…… जेणेकरून मला निदान बोचऱ्या हवेच्या अस्तित्वाची तरी जाणीव होईल.”
या वाक्यातूनच त्याच्या एकाकीपणाची भयान तीव्रता अंगावर येते.
माणूस हा मुळातच सामाजिक प्राणी आहे.
तो आदिमानव काळापासूनच कळपात राहिलेला आहे. आपल्याला माणसाला मुळातच सहजीवनाची खूप सवय असते. त्यामुळे एकटं राहणं हे ही सुदृढ मनाला कधीच जमत नाही. त्यामुळे ‘एकाकीपणा’ तर मनावर आघातच करतो.
सुचिता ही तिशीतली तरुणी पुण्यात नोकरी करायची आणि तिचा नवरा नगरला आपल्या आई वडिलांबरोबर राहायचा. तिला बदली मिळत नव्हती आणि त्याला पुण्याला बदली घ्यायला तयार नव्हता. वन बीएचकेच्या घरात तिला खूप एकटं वाटायचं. सुरुवातीला तासभर फोनवर बोलणारा तिचा नवरा आता पाच दहा मिनिटात फोन आटपायचा. मग तिला घरातली शांतता बोचू लागायची. एकदा रात्री वीज गेल्यावर तिचा जीव गुदमरला सुरक्षिततेसाठी गच्च बंद केलेले दारं-खिडक्या आणि आतला अंधार, ही भीती तीनं त्या रात्री अनुभवली. आपल्याला काही झालं तर,
अनोळखी जागेत आपल्याला कोण मदत करेल ?
कुठे जायचं ?
या प्रश्नाने तिच्या मनात काहूर उठवलं.
अशा असंख्य सुचिता कामाच्या निमित्ताने जोडीदारापासून वेगवेगळ्या राहतात आणि मग हा’ एकाकीपणा’ एक प्रकारची भीती घेऊन येतो.
मिथिलाच्या घरची परिस्थिती थोडी वेगळी होती. तिचा नवरा हा मोठ्या कंपनीत मोठ्या उद्यावर कामाला होता. त्याच्या लग्नाला आता वीस वर्षे झाली होती. मुलं आपापल्या कामात होती.घरात सगळ्या कामांसाठी बाई होती. सगळेजण सकाळी नऊला कामासाठी बाहेर पडायचे आणि रात्री यायची कुणाचीच वेळ निश्चित नव्हती. सुरुवातीला तिने भरपूर सिनेमे वेब सिरीज बघितल्या. नंतर त्यातही तिला रस वाटेनासा झाला. सगळं घर टापटीप राहायचं कारण पसारा करायलाच कुणी दिवसभर घरी नसायचे. सगळ्यांचा दिवसभरात काहीतरी निरोप देण्यासाठी फोन व्हायचा.
पण तू कशी आहेस ?
तू जेवलीस का ? हे विचारायला कुणालाच वेळ नसायचा. मुलं मोठी होईपर्यंत ती घरातून फारशी बाहेर पडलीच नव्हती, त्यामुळे आता छंद नव्हते. तिला मध्येच वाटून जायचे की, यापेक्षा एकत्र कुटुंब असतं तर बरं झालं असतं. निदान सासू-सासर्यांमुळे घरात जाग राहिली असती. मुलं- नवरा सुट्टीच्या दिवशी सुद्धा आपापल्या कामात आणि फोनवर मग्न असायचे. मिथिलाच्या मनाचा एकाकीपणा असा वाढत वाढत गेला की, तिला खाण्यापिण्यात, टीव्हीमध्ये माणसांमध्ये, रस वाटेनासा झाला. तिचा एकीपणा तिच्या आयुष्यात अशा प्रकारे आधी विमनस्कता आणि नंतर (डिप्रेशन) नैराश्य घेऊन आला.
‘एकाकीपणा’ हा शब्द स्वतः एकटा येत नाही, तर तो अनेकदा उदासीनता विमनस्कता, भीती (फियर) दुष्चिंता (एन्झायटी) हे मानसिक आजार घेऊन येतो.
पस्तीशी मधली रवीना शाळेपासूनच एकदम हुशार व चुणचुणीत मुलगी होती. आयआयटी म्हणून पदवी घेऊन बाहेर पडल्यावर परदेशात गेली. तेव्हाच आई-बाबा लग्नासाठी मागे लागले होते. पण करिअरमध्ये अडथळा होईल, म्हणून नंतर बघू, असं म्हणून तिने लग्न टाळलं. नंतर राहून गेलं. कितीही यश मिळालं तरी, तुमचे शरीर तुमच्या गरजांबद्दल बोलल्याशिवाय राहत नाही. आता तिला जोडीदाराबरोबरच आईपणाची ओढ लागली होती. पण तिला तिच्या बरोबरीचा, तिच्या अपेक्षांवर खरा उतरेल असा जोडीदार दिसत नव्हता. दिवसभर खूप काम असायचे की, किंबहुना एकटेपणाच्या भीतीने ती स्वतःला कामात बुडवून घ्यायची.
पण असं किती काळ चालणार होतं ?
आपलं पुढे कसं होणार ?
आपलं आयुष्य एकटे राहणार का ?
हे विचार तिला सतत त्रास द्यायचे. दणदणीत पगार मिळणाऱ्या तिला, आपल्या मुलांच्या मागे धावाधाव करणाऱ्या मैत्रिणींचा हेवा वाटायचा. या सततच्या अतिविचार करण्यामुळे (ओव्हर थिंकिंगमुळे) तिचा’एकटेपणा’ हा दुष्चिंता (एन्झायटी) घेऊन आला.
फक्त जोडीदार नसणं- हे एकमेव एकाकीपणाचे कारण आहे का ?
माझी एक रुग्ण पेशंट घटस्फोटानंतर माहेरी परत आली. तिच्या लग्नाचा अनुभव इतका वाईट होता की, लग्न तुटल्याची सल, जोडीदार नसण्याचे कोणतेही दुःख तिच्या मनात नव्हतं. ती माहेरी आल्यानंतर तिला, का परत आलीस ? असं जरी कोणी तोंडावर बोललं नाही तरी, तिला स्वीकारलं गेलं आहे असे तिला जाणवत नव्हतं. तिच्या करिअरमध्ये ती खुश होती. पण घरी तिला जे पूर्वीसारखं प्रेम, आपुलकी पाहिजे होती ती मिळत नव्हतं. आणि त्यातून तिला ‘एकाकीपणा’ आला होता. प्रेम, दया, प्रशंसा समानभूती (एम्पथी) या सगळ्या माणसाच्या मूलभूत मानसिक गरजा आहेत. त्या पूर्ण होणं मानसिक स्वास्थ्यासाठी गरजेचं आहे. या गरजा समाजात पूर्ण होतातही, पण त्यापेक्षा जास्त त्या घरातून पूर्ण होण्याची अधिक गरज आणि अपेक्षा असते. नेमकं तिला तेच मिळत नव्हतं. तिच्या पूर्वायुष्यातून बाहेर पडण्यासाठी आईने पाठीवर फिरवलेला मायेचा आणि धीर देणारा हात हवा होता, तिच्या कामाची दखल घेत कौतुकाने दिलेली शाब्बासकीची थाप हवी होती. दैनंदिन आयुष्यात तिच्याबरोबर झालेल्या बऱ्या वाईट प्रसंगासाठी तिच्या आईने श्रोता झालेलं हवं होतं. पण आई फक्त तिच्यापुढे कसं होणार ? आणि लोकांना काय वाटेल ? एवढीच काळजी करत बसायची. इतरांकडेही सतत तेच बोलायची. परिणामी तिच्यामध्ये आणि आईमध्ये एक नवीनच भिंत उभी राहिली होती. ती भिंत होती ‘परकेपणाची’ आणि त्यातूनच येणाऱ्या ‘एकाकीपणाची’.
स्वतःच खाजगी पण सांभाळण्यासाठी ‘एकटं राहणं’ आणि माणसांच्या गर्दीतही ‘एकाकीपणाने’ जीवनाला वेढून टाकणं यात मुळातच फरक आहे.
यातला दुसऱ्या प्रकारचा ‘एकटेपणा एकाकीपणा’ मनाचा. जगण्यातला अर्थच ज्याच्यामुळे हरवल्यासारखा वाटतो, असा.
आज वेगवेगळ्या कारणाने अनेकांची अशा ‘एकाकीपणाशी’ गाठ पडते आहे.
माझी एक पेशंट तिच्या ऑफिसमध्ये रुजू होऊन फक्त सहा महिने झाले होते. ती बदली होऊन ऑफिसमध्ये आली होती. आधीच्या सगळ्या कर्मचाऱ्यांचा इथे छान ग्रुप होता. तिच्या आधी तिथे ज्या ऑफिसर बाई होत्या त्या सगळ्यांनाच खूप आवडायच्या. तिच्या येण्यामुळे किंवा तिच्यामुळेच त्या आधीच्या ऑफिसर बाई व दुसरीकडे बदलून गेल्या असा काहीतरी सूर ऑफिसमध्ये होता. कामाव्यतिरिक्त तिच्याशी फारसं कोणी बोलायचं नाही. जेवणाच्या वेळातही त्यांच्यात जायला तिला खूप संकोच वाटायचा. या सगळ्या परिस्थितीत एक-दोन महिने ‘ती’ असं होणारच म्हणून शांत राहिली. पण सहा महिन्यानंतर मात्र ती रोज घरी येऊन नवऱ्याजवळ रडायची. ऑफिसमधल्या ‘एकटेपणामुळे’ ऑफिसला जायची वेळ आली की, तिला रडू यायला सुरू व्हायचं.
अशा अनेक स्त्रिया, अनेक ऑफिसमध्ये बघायला मिळतात. तशा त्या शाळेत, कॉलनी, भिशीग्रुप मध्ये सुद्धा सहज भेटतात. त्याला वयाचं काही बंधन नसतं.अशा प्रकारच्या ग्रुपचं फलित हा ‘एकाकीपणा’ असतो.
माणसाला आधार व्यक्तीकडूनच मिळू शकतो. ती व्यक्ती जोडीदार, मित्र, नातेवाईक किंवा कामाच्या ठिकाणावरील सहकारी असं कोणीही असू शकतं. मनातल्या गोष्टी सांगायला कधी तर रडू आल्यावर रडायला एक खांदा प्रत्येकाकडे असायला पाहिजे. आपल्या नातेसंबंधांवर आपण प्रयत्न केले,तर कधीतरी ज्यानं आपलं मुक्तपणे ऐकून घ्यावं असा कान आणि क्वचितच रडावसं वाटलं तर तीही मुभा देणारा खांदा आपल्याला असा खांदा नक्की मिळू शकतो…..किंबहुना आपणही दुसऱ्यासाठी तो होऊ शकतो.
शिवाय एकटेपणावर मात करण्यासाठी स्वतःची काळजी घेणे खूप महत्त्वाचं आहे. घरीच आहोत म्हणून वेळापत्रक नाही. शरीराच्या वेळापत्रकाच्या विपरीत रात्रभर जागायचं आणि दिवसा खूप उशिरापर्यंत झोपायचं, यातून ‘एकाकीपणात’ भर पडते.
त्यामुळे लवकर झोपणं आणि,लवकर उठणं, काही व्यायाम करणं, दिवसभरात काही ना काही कामानिमित्त बाहेर पडणं, सकस अन्न खाणं या गोष्टींना एक गोष्टींनी खूप फरक पडतो.
होमिओपॅथीमध्ये अशी अनेक गुणकारी औषध आहेत त्यामुळे एकटेपणाच रूपांतर एकाकीपणात होत नाही किंवा एकाकीपणाचे बळी ठरू शकणार नाही. तसेच मन निरामय राहून वेळ सत्कारणी लागावा, अशा परिस्थितीला सामोर जाण्याची मनस्थिती निर्माण होऊ शकते. एकाकीपणावर मात करण्यासाठी होमिओपॅथिक औषधांबरोबरच काही वेळेस तुम्हाला थेरपीची मदत घ्यावी लागू शकते. “मी कुणाला नको आहे”, “माझ्या जगण्याला काही अर्थ नाही”, “माझ्यासाठी कुणाला वेळ नाही”,अशा प्रकारच्या सर्व धारणा या विवेकाच्या कसोटीवर तपासून बघण्याची बघावे लागतील, आणि अविवेकी धारणा विवेकनिष्ठधारणांमध्ये बदलण्याचं सामर्थ्य निश्चितपणे होमिओपॅथिक औषधांमध्ये आहे. त्यामुळे तुमचं तुम्हाला तुमच्या एकटेपणापासून सुटका मिळून तुमचं आयुष्य हवंहवसं वाटू लागेल.
कुटुंबातून आधार मिळाला नाही तरी विविध विषयांवर काम करणारे कितीतरी सपोर्ट ग्रुप किंवा संस्था आहेत. आपण त्यात सहभागी होऊ शकतो.
डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ) HHF, ICR Kolhapur,
चैतन्य होम्योपैथिक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4
शाहुपुरी व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123
रविवारी बंद
कृपया पुढील लेख वाचा —
—————————————————————————–
It was very natural for a daughter-in-law living in a joint family to feel that “Ulushi Khichdi Sajuk Toop, it is a great pleasure to be apart” “उलुशी खिचडी साजूक तूप, वेगळं राहायचं भारीच सुख ” , even more than that, it was generally in the 80s-90s that she felt the luxury of Living Alone without the Fear of Elders.
After that, the number of people moving to other cities for work increased. As a result ,Nuclear Family system started to increase. So many families got the luxury of living separately.
Looking at all these, Loneliness seems like a comfort or happiness. But we are a generation that has come out of the do-doing cycle, and in this long-running cycle, everyone has felt Lonely at one time or another. Corona is gone. Life came to the former post. Our journey continued. But this Loneliness remains the same.
The amount of Loneliness is so high that the World Health Organization (WHO) had to take notice of this and say that Loneliness is a new condition !
So now is the time to seriously consider it.
A patient’s daughter of mine recently moved to Canada for higher education. The girl, who was pampered by her mother, initially had a lot of trouble adjusting to everyone there. Even in India it does not come out much. It is good that her education is good ! . For that, college was only her world. Still she was left Alone in Canada.
Who should be trusted ?
Who to talk to ?
She could not decipher anything.
Talking about her Loneliness, she said that after leaving Kolhapur’s neighborhood, she started feeling Lonely in Canada as she usually did not see anyone on the streets.
There is a difference between being Alone and Loneliness .
When we are locked in our homes in Corona, we are Alone .
From society to friends and relatives, we had the option of staying in touch with everyone thanks to the grace of the internet.
So even though every family and individual has come home, it does not mean that they feel Lonely .
Even if the door of the house was opened in that girl’s life, there was no one to talk to.
Is she paying attention to food or not ? There was no one to see this. But parents and friends in India were connected to her because of the telecom revolution. So I didn’t feel Lonely or empty in my mind.
On the contrary, in the state of Loneliness , strong thoughts like “No one understands me”, “No one needs me”, “My presence or absence does not matter to anyone”, “I do not have a priority place in anyone’s life”. It is a very strong feeling.
A person is not necessarily Alone in a state of Loneliness . One can feel this ” Loneliness” even in a full house.
While counseling a patient, an eighteen-year-old boy described his loneliness by saying, “I feel so lonely at night that even though it’s bitterly cold, I sleep with the fan on loud… so that I can at least feel the existence of fresh air.”
It is from this sentence that the terrible intensity of his Loneliness is revealed.
Man is basically a social animal .
It has been in herds since prehistoric times. We humans are very much used to symbiosis . Therefore, being Alone is never suitable for a healthy mind. Therefore, Loneliness only affects the mind.
Suchita, a young woman in her thirties used to work in Pune and her husband lived with his parents in the city. She was not getting transfer and he was not willing to transfer to Pune. She felt very Lonely in the one BHK house. Her husband, who used to talk on the phone for an hour at first, now used to hang up after five to ten minutes. Then she began to feel the peace in the house. Once the power went out at night, she was suffocated for safety, with the doors and windows locked for safety and the darkness inside, the She experienced this fear that night. If something happens to us, who will help us in an unfamiliar place ? where to go ? This question made her wonder.
Many such Suchitas live apart from their spouses due to work and then this loneliness brings with it a kind of fear.
The situation at Mithila’s house was a little different. Her husband was working in a big company. He had been married for twenty years now. The children were in their own work. There was a woman for all the work in the house. Everyone used to leave for work at nine in the morning and no one had a fixed time to come back at night. Initially, she watched a lot of movies and web series. Later she lost interest in that too. The whole house used to be full because no one would be home all day to spend the day. Everyone used to call during the day to say something.
But how are you ?
Did you eat ?
No one had time to ask this?.
She didn’t leave the house much until the kids were older, so there were no hobbies. She used to share that it would have been better to have a family together. At least the mother-in-law would have stayed awake at home. Children-husband would be busy with their work and phone even on holidays. The loneliness of Mithila’s mind increased to such an extent that she lost interest in food, drink, TV, people. Her Loneliness brought Depression in her life.
The word loneliness itself does not come alone, but it often brings the rationalism first and then the psychological connotations of Depression, Loneliness, Fear, and Anxiety with it.
Raveena ,35 Yrs, was a smart and smart lady, right from school. After graduating from IIT, she went abroad. It was then that the parents had gone back for the marriage. But she avoided marriage as it would hinder her career, so we will see later. Later left. No matter how successful you are, your body does not stop talking about your needs. Now she felt the pull of motherhood along with her partner. But she couldn’t find a partner who was equal to her, who could live up to her expectations. There was so much work all day long that she would actually immerse herself in work out of Fear of Loneliness.
But how long would this last ?
How will our future be ?
Will our life be lonely ?
These thoughts kept bothering her. She used to be jealous of her friends, who were earning a handsome salary, running after their children. Because of this constant overthinking, her Loneliness came with Anxiety.
Is not having a partner the only cause of Loneliness ?
One of my patients returned home after a divorce. Her marriage experience was so bad that she didn’t feel any sadness about the marriage breakup or not having a partner. Why did you come back to after she came home ? Although no one said so to her face, she did not feel accepted. She was happy in her career. But at home she was not getting the love and affection she wanted like before. And it made her Lonely. Love, Compassion, Appreciation, Empathy are all basic human Psychological needs. Its fulfillment is necessary for Mental Health. Although these needs are met in the society, there is more need and expectation to be met from the home. That was exactly what she was not getting.
She needed a mother’s loving and patient hand on her back, an appreciative pat on the back for her work, to come out of her previous life . Her mother wanted to be a listener for the bad things that happened to her in her daily life. But how can mother only be in front of her ? And what will people think ? That’s all I used to worry about. He used to say the same thing to others. As a result, a new wall was erected between her and her mother. It was a wall of alienation and the Loneliness that comes from it.
There is a fundamental difference between being alone to maintain one’s own privacy and living alone in a crowd of people.
Another type of loneliness is loneliness of the Mind. The meaning of life seems to be lost due to it.
Today, many people face such Loneliness due to different reasons.
One of my patients had only been in her office for six months. She was transferred and came to the office. All the previous employees were a great group here. All the female officers who were there before her liked her very much. There was some rumor in office that the previous officer lady had changed due to her arrival or because of her. Apart from work, she doesn’t have much to talk to. She was very hesitant to go among them even during meal time. In all these situations , she remained silent for one or two months as it was bound to happen. But after six months, she used to come home and cry to her husband every day. Due to the Loneliness in the office, when it was time to go to the office, she would start crying.
Many such women are seen in many offices. They also meet easily in school, colony, Bhishi group. It has no age limit. The result of such groups is Loneliness.
A person can get Aadhaar only from a person. That person can be anyone like spouse, friend, relative or work colleague. Everyone should have a shoulder to cry on when they feel like crying. If we put effort into our relationships, sometimes we can find an ear that freely listens to us and a shoulder that lets us cry if we rarely feel like it…..in fact we can be that for someone else.
Also self-care is very important to overcome Loneliness. There is no schedule as we are at home. Being up all night and sleeping too late during the day, contrary to the body’s schedule, adds to the Loneliness.
So sleeping early and waking up early, doing some exercise, going out for some work during the day, eating healthy food makes a big difference.
Homoeopathy has many such effective Medicines so that Loneliness does not turn into Loneliness or become a victim of Loneliness. Also, a state of Mind can arise to face such a situation where the Mind should be free and time should be appreciated. In addition to Homoeopathic Medicines, you may need therapy at times to overcome Loneliness. “I don’t want anyone”, “my life has no meaning”, “no one has time for me”, all such notions have to be put to the test of sanity, and Homoeopathic medicines definitely have the power to transform Irrational notions into Rational ones. So you will start wanting to get rid of your Loneliness and live your life.
Even if you don’t get support from family, there are many support groups or organizations that work on various topics. We can participate in it.
Dr Ajay Hanmane
M.D.(Hom)HHF,ICR Kolhapur,
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4,
Bhaskar Plaza Vyapari Peth,
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
Mobile No. 7738667123
Sunday Closed.
Please Read Next Article-
ReplyForward
|