मुलांच्या आरोग्य आणि वर्तवणुक समस्यांवर होमिओपॅथी / Homoeopathy on Children’s Health and Behavioral Problems

Dorctor Pic By Dr. Ajay HanmaneSeptember 30, 2023 Behaviour problems Children Problems Homeopathic and Cure
मुलांच्या आरोग्य आणि वर्तवणुक समस्यांवर होमिओपॅथी.

लहान मुले म्हणजे देवाघरची फुले” असं म्हटलं जातं प्रत्येक पालकांना वाटत असते की, आपल्या बाळाची तब्बेत चांगली व्हावी,जोपासली जावी, ते निकोप सुदृढ व्हावे. त्याचे आरोग्य चांगले राहावे त्यासाठी ते सतत काही ना काहीतरी औषध उपचार करीत असतात.

त्यामध्ये होमिओपॅथिक वैद्यकीय पद्धतीला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली आहे. होमिओपॅथिक उपचार हे मुलांसाठी अत्यंत गुणकारी आहेत कारण ही औषधे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवून समुळ रोग नष्ट करतात.

त्याचप्रमाणे होमिओपॅथीक औषधे लहान बाळापासून ते पौगंड अवस्थेतील मुला-मुलींना त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून त्यांचा आजार मुळासकट नष्ट करण्याला मदत करते.

तसेच इतर अनेक रोगांशी लढा देण्यासाठी मदत करते किंबहुना असे म्हणता येईल इतर अनेक रोग होऊच नये याची काळजी घेतली जाते.

त्याचप्रमाणे होमिओपॅथिक औषधांचा आरोग्यावर कोणताही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही.

 

मुळातच लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने होमिओपॅथिक औषधांनी आजार जलद गतीने बरा होतो व मुळापासून जातो.

होमिओपॅथिक औषधांची चव ही गोड असल्यामुळे लहान मुले सहज व आवडीने खातात हे तर सर्वश्रुत आहे.

 

सध्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रामध्ये नवीन नवीन बदल आव्हाने येऊ घातले आहेत त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या कौटुंबिक जीवनात आणि पर्यायाने आपल्या स्वतःच्या आरोग्याच्या क्षेत्रात सुद्धा बऱ्याच बदलांना सामोरे जावे लागत आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

 

21 वे शतक हे सायन्स, टेलीकम्युनिकेशनचे आणि तंत्रज्ञानाचे- टेक्नॉलॉजीचे शतक असणार आहे. जेथे माणसाचे जीवन सुकर बनविण्यासाठी दैनंदिन जीवनात प्रत्येक क्षणाक्षणाला आपण तंत्रज्ञानाचा वापर करत असतो.

या वापरामुळे आपले जीवन जेवढे सुकर बनत चालले आहे. तेवढेच त्याचे दूरदर्शी परिणाम आपल्या आरोग्यावर दृष्टीस येत आहेत.अशा सर्व परिस्थितीमध्ये जन्माला येणारे बाळ देखील नक्कीच स्पेशल असणार, स्मार्ट असणार !!! याची झलक आपल्याला या शतकाच्या सरती शेवटी दिसत आहे.

आज जर मुलांमध्ये आढळणाऱ्या आजारांचा आपण विचार केला तर आपल्याला असे लक्षात येईल की,पूर्वी मुलांमध्ये सगळ्यात जास्त संसर्गजन्य आजारांचं प्रमाण होतं. जसे टॉन्सिलायटीस (Tonsilitis), ट्युबरकिलोसीस (Tuberculosis), निमोनिया (Pneumonia), विषमज्वर (Typhoid) ई.पण या संसर्गजन्य आजारांचे प्रमाण हळूहळू कमी होत गेले आणि त्यांची जागा अजंतू-संसर्गजन्य आजार म्हणजेच ऑटोईमम्युन डीसऑर्डर्स (AutoImmune Disorder) स्वयं-प्रतिकार विकार तसेच, मुलांच्या वर्तवणुकीत झालेले अयोग्य बदल आणि वेगवेगळ्या वस्तूंची ऍलर्जी,ऑटिसम(Autism)- स्वमग्नता,एडीएचडी(Attention Deficit Hyperactive Disorder) अस्थिर चंचल मुले अशा अतिगंभीर स्तरावरील आजारांनी घेतली आहे.

 

या आजच्या घडीला मुलांची पिढी ही जास्त हुशार आणि जास्त स्मार्ट जास्त हायपर ऍक्टिव्ह अशा पद्धतीची आहे. हे ऍक्टिव्ह असणं, स्वतःमध्येच रममान असणं हे नॉर्मलस्तराच्या पेक्षा जास्त असतं आणि आपल्या कुटुंबाला प्रश्न पडतो की यांना आवरायचे कसे? कारण त्यांची आकलन क्षमता ही वयाच्या मानाने जास्त आहे.

यामागील कारणांचा शोध घेणे आणि त्यावर योग्य वेळी योग्य उपचार करणे हे क्रमप्राप्त आहे. आत्ताच्या दैनंदिन जीवनामध्ये जवळपास प्रत्येक कुटुंबात आई वडील हे दोघेही नोकरी व्यवसायात मग्न असतात. कारण 21वे शतके स्पर्धेचे आणि चढाओढीचे आहे. या जीवघेण्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी जोडप्याला ही धडपड करावी लागणार हे निश्चित.

ही धावपळ / धडपड चालू असताना जर स्त्रीला समजले की, आपण आई होणार आहोत तर, त्या आईची मानसिकता काय असेल? याचा विचार करणे गरजेचे आहे.

जर हे मूल नियोजित असेल तर आईची मानसिकता ही संतुलित आरोग्यदायक असण्याची शक्यता जास्त आहे.

पण जर हे मूल नियोजित नसेल, त्यांच्या फॅमिली प्लॅनिंगनुसार नसेल तर तो तिला एक मानसिक धक्का असेल ! तर त्या जोडप्याला तो एक मानसिक धक्का असेल !

जिथे आनंदाचे वातावरण व्हायला पाहिजे तिथे त्या कुटुंबात चिंतेचे वातावरण निर्माण होते. खरंच आता आपण मुलाला जन्म द्यायला तयार आहोत का ?

माझे प्रमोशन, माझी नोकरी, आमची आर्थिक स्थिती, माझी स्वतंत्रता, माझी जबाबदारी, जन्म दिल्यानंतर आपण पालन पोषण योग्य प्रकारे करू शकू की नाही? ….वगैरे वगैरे अशा अनेक प्रश्नांनी ती आई किंवा आई आणि वडील दोघेही ग्रासले जातात. साहजिकच या सर्वांचा परिणाम गर्भाशयातील गर्भावर होणारच !

 

गर्भ ठेवावा की नको ही द्विधा मनस्थिती, विकल्प आणि त्यामुळे गर्भावर होणारे परिणाम घेऊनच जन्माला येणारे बाळ काहीतरी आजारपण विकृती निश्चितच घेऊन येते. यावर बरेच संशोधन झालेले आहे.

त्यामुळेच पूर्वापार गर्भधारणेची बातमी ऐकून सर्व कुटुंब आनंदीत होऊन गर्भसंस्काराची तयारी करायची. तिथे ही आजची स्त्री वेगवेगळ्या प्रश्नांनी, काळजीने ग्रासली गेलेली दिसते. मग आपण अंदाज बांधू शकतो की येणाऱ्या मुलांचे आरोग्य कसे असेल ?

 

पूर्वीच्या काळी गरोदर मातेला गर्भधारणा झाल्यापासून, “ती एक विशेष स्त्री बनली आहे. ती नेहमी खुश राहावी. तिचे आरोग्य, तिची मनस्थिती संतुलित, आनंददायी आणि प्रसन्न राहावी या उद्देशाने आपल्या घरी बरेच समारंभ पार पडायचे आणि गर्भधारणेचा कालावधी आनंदात आणि उत्साहात जायचा.”

 

पण हे सुख 21व्या शतकात त्या मातेला लाभेल असं वाटत नाही !! कारण ती जर गर्भधारणेच्या कालावधीत तिच्या नोकरी, व्यवसाय, आर्थिक स्थिती, कुटुंबातील परस्परांशी असलेले संबंध ई. ने चिंतेत असेल तर अशा मानसिकतेचा निश्चितच परिणाम तिच्या पोटातील गर्भावर होत असतो.

अशा परिणामातूनही समजा, ईश्वरकृपेने निरोगी,सुदृढ बाळ जन्माला आले तर त्या बाळाला देखील 21व्या शतकातील परिस्थितीला तोंड द्यावं लागणार आहे.

त्याची पण जडणघडण ही कुटुंबातील लोकांच्या मायेच्या उबेखाली कमीप्रमाणात होऊन सायन्स आणि तंत्रज्ञानाच्या सानिध्यात जास्त होणार आहे.

 

अशावेळी अनेक प्रकारच्या मानसिक आजारांना ते मुल बळी पडू शकते . माया,आपुलकी,ओलावा,नातेसंबंध,प्रेम, काळजी या भावनांचा तुटवडा असल्यामुळे ही मुले निराशा, एकाकीपणा, निरुत्साह, चंचल,घाबरट, भित्रट किंवा रागीट, असंयमी आजारांनी गुरफटलेले असणार किंवा आत्महत्या प्रवृत्ती किंवा गुन्हेगारीप्रवृत्ती सारख्या टोकाच्या भूमिकासुद्धा घेण्याची शक्यता आहे.

 

याचे ज्वलंत उदाहरण आपण पाश्चिमात्य देशात बघत आहोतच पण त्याचे लोन आपल्या मोठ्या शहरांमध्ये देखील दिसू लागले आहे,  म्हणजे घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींनी रागवले किंवा मोबाईल सारख्या तंत्रज्ञानाच्या गोष्टी नाही दिल्या तर आत्महत्या केल्याची उदाहरणे आपल्याला ऐकायला मिळत आहेत.

 

लहानपणापासून मुलांच्या हातात वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक गॅझेट उपलब्ध झाल्यामुळे त्यांचा अतिवापर आणि त्यांच्या अतिआकर्षणामुळे जीवनात आलेला एकाकीपणा, दुरावलेले नातेसंबंध आणि मागितलेली वस्तू ताबडतोब मिळणे, इन्स्टंट ग्रर्टिफिकेशन व ती वस्तू नाही मिळाली तर मुलांच्या वागण्यामध्ये होणारे टोकाचे बदल या आणि अशाच बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीच्या मुलांच्या मानसिकतेला आपल्याला सामोरे जावे लागणार आहे.

 

पूर्वीचे पालक आपल्या मुलांना घडवताना प्रत्येक गोष्टीची जाणीव करून देत असत. ती गोष्ट गरजे शिवाय देत नसत किंवा स्पष्टपणे नकार कळवत. पण आजकालची पिढी / पालक आपल्याला ती गोष्ट मिळाली नाही, त्यामुळे आपण अनेक गोष्टींना वंचित राहिलो,असे वाटून आपल्या पाल्याला जाणीव करून देण्याऐवजी त्यांच्या प्रत्येक मागणीच पुरवठा केला जातोय, त्यांच्या चुकीवर पांघरून घातला जाते आणि त्याचे दुष्परिणाम हे मुलांच्या असंयमी, हट्ट वृत्तीला मोठे कारण बनले आहे.

 

या सर्व बाबींचा विचार केल्यास आपणाला असे लक्षात येईल की, 21 व्या शतकातील मुलांच्या आरोग्याच्या प्रश्नांसाठी आपण तेवढ्याच क्षमतेने तयार राहणे गरजेचे आहे

 

होमिओपॅथिक औषधे ही लहान मुलांच्या रोगाच्या लक्षणांवरून व त्यांच्या वागणुकीवरून दिली जातात. जसे की,

  • ती कशी वागतात ?
  • कशी उत्तरे देतात ?
  • कशाप्रकारे हालचाली करतात ?
  • त्यांची भूक, तहान, झोपेची पद्धत, झोपेत दात खाणे, किंचाळत उठणे, चालणे, नाक खाजवणे,
  • जिभेचा रंग,
  • नाक फुगवणे इत्यादी.
  • त्यांचे मानसिक, शारीरिक, भावनिक स्वरूप समजावून घेणे गरजेचे असते.

प्रत्येक मुलाचे त्याचे एक स्वतःचे असे काल्पनिक जग असते. त्या जगामध्ये तो स्वतःच त्याचा निर्माता, दिग्दर्शक आणि कलाकार असतो. तो त्या रंगमंचाच्या त्या कलाविश्वाचा राजा असतो.

प्रत्येक मुलाच्या काल्पनिक विश्वात शिरकाव करून होमिओपॅथिक डॉक्टर मुलांच्या काल्पनिक दुनियेत प्रवेश करतो. त्यांच्या मनातील चाललेली हालचाल त्यांच्या मनात मनाची स्थिती, त्यांची सोबती, स्वप्ने, कल्पना, परिकथा, आवडते कार्यक्रम, खेळ, खेळणी, बाहुल्या, मोबाईल वरील गेम्स, छंद, कविता, त्यांची खाण्यापिण्याची आवड-निवड, आकलनक्षमता, इतर लोकांच्या मिसळणे याची पद्धत इत्यादी सर्व औषध निवडण्यासाठी जाणून घेणे गरजेचे असते.

 

पालकांच्या मनात निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांना होमिओपॅथी एक वरदान ठरणार आहे.

होमिओपॅथीमध्ये प्रत्येक मुलाच्या त्याच्या केसनुसार वेगवेगळा विचार केला जातो. त्या मुलाची मानसिकता समजून घेतली जाते.

  • त्याच्या नेमक्या समस्या काय आहेत ?
  • तो कशा पद्धतीने विचार करतो ?
  • त्याच्या इच्छा अपेक्षा काय आहे ?
  • त्याचे काल्पनिक जग, त्याचं स्वतःचं विश्व काय आहे ?
  • त्याची त्याच्या कुटुंबातील व्यक्तींशी, मित्रांशी, शाळेतील इतर विद्यार्थ्यांशी, शिक्षकांची नातेसंबंध कशी आहेत ?
  • हे आजारपण नेमकी कशामुळे चालू झालं ?
  • नेमकी कोणती भावना, प्रसंग या आजारांच्या सुरुवातीला कारणीभूत ठरली ?
  • आणि त्यावर त्या मुलाची काय प्रतिक्रिया होती ?

या सर्वांचा अगदी खोलवर विचार केला जातो आणि मगच त्याला अनुसरून औषध शोधले जाते.

अशा पद्धतीने त्या केसचा संपूर्ण सविस्तर अभ्यास करून शोधलेल्या औषधांचा परिणाम असा होतो की, ते मुलं म्हणजे ती केस त्यात सभोवतालच्या परिस्थितीमध्ये राहून त्याच परिस्थितीला एका वेगळ्या सकारात्मक दृष्टिकोनातून बघू लागते आणि त्याच परिस्थितीशी नातेसंबंधाची अगदी चांगल्या पद्धतीने जुळवून घेऊन, ॲडपटेशन,एका नव्या उमेदीने आपल्या आजारपणावर, आजारावर व बिघडलेल्या मानसिकतेवर मात करून आपल्या आयुष्य आनंद प्रसन्न आणि सकारात्मने सकारात्मकपणे जगू शकते.

 

होमिओपॅथीमध्ये अनेक प्रकारची प्रभावी औषधे आहेत, जी त्या प्रत्येक मुलांचा वैयक्तिकरित्या अभ्यास करून दिली जातात. आजार कोणताही असू दे पण त्यांचे व्यक्तिमत्त्व परीक्षण आणि त्यांची मानसिक अवस्था यांचा सखोल अभ्यास करूनच हे औषध दिले जाते.

 

तुम्ही आजाराच्या पुढे राहिलात तर जिंकाल” हे नेहमी लक्षात ठेवा पण कोणतेही औषध स्वतःच्या मनाने घेऊ नका हे ही तितकेच महत्त्वाचे.

 

21व्या शतकात या तंत्रज्ञानाच्या युगात आजारांचं स्वरूप जरी बदलत जात असलं तरीही येऊ घातलेल्या आजारांशी मुकाबला करण्यासाठी होमिओपॅथी ही एक सक्षम, प्रभावी आणि शास्त्रीय उपचार पद्धती आहे यात काही शंकाच नाही. 

 

डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ) HHF,ICR Kolhapur,
चैतन्य होम्योपैथिक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4
शाहुपुरी व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123
रविवारी बंद

 

कृपया पुढील लेख वाचा  —


Homoeopathy on Children’s Health and Behavioral Problems.
 

It is said that ” children are the flowers of God’s house ” Every parent wants their child to be healthy, nurtured and healthy. They are constantly taking some or the other medicine to keep him healthy.Homoeopathic medicine has gained a lot of popularity in it. Homoeopathic treatment is very effective for children as these medicines fight diseases by boosting the body’s immunity.

 

Similarly , Homoeopathic medicines help children from babies to adolescents to eradicate their diseases by boosting their immune system.

 

It also helps to fight many other diseases in fact it can be said that many other diseases are taken care of.

 

Similarly , Homoeopathic medicines do not have any side effect on health .

 

Due to the lack of Immune System in children, Homoeopathic medicines cure the disease quickly and eradicate it.

 

It is well known that Homoeopathic medicines are easily and willingly consumed by children due to their sweet taste .

 

At present , new changes and challenges are coming in every sphere of life, just as everyone has to face many changes in their family life and alternatively in the field of their own health, it would not be wrong to say.

The 21st century is going to be the century of Science, Telecommunication and Technology . Where we are using technology every moment in our daily life to make human life easier.

 

This application has made our life so much easier. That’s how much its long-term effects are visible on our health . The baby born in all such situations will definitely be special, smart.!!  We see glimpses of this at the turn of the century.

 

If we think about the diseases found in children today, we will realize that in the past children had the highest incidence of infectious diseases. Like Tonsilitis, Tuberculosis, Pneumonia, Typhoid etc. But these infectious diseases have gradually decreased and replaced by non-infectious diseases i.e. Autoimmune Disorders as well as , inappropriate changes in Children’s Behavior and Allergies to different items, Autism  – self-absorbed, ADHD (Attention Deficit Hyperactive Disorder), unstable fickle children are taken by very serious diseases.

 

Today ‘s generation of kids is smarter and more hyper active. Being active, enjoying yourself is more than normal and your family wonders how to control them. Because their comprehension ability is more according to their age.

 

Finding the underlying cause and treating it at the right time is in order. In today’s daily life in almost every family both parents are engaged in work. Because the 21st century is one of competition and competition. It is certain that the couple will have to struggle to survive this deadly competition.

If a woman realizes that she is going to be a mother during this rush/struggle, what will be the mindset of that mother ? It is necessary to think about it.

 

If this child is planned, the mother’s Psyche is more likely to be balanced and healthy.

But if this child is not planned, not according to their family planning, then it will be a mental blow to her! So that couple will be a mental shock !

 

Where there should be an atmosphere of happiness, there is an atmosphere of anxiety in the family. Are we really ready to give birth to a child now ?

 

My promotion, my job, our Financial status, my Independence, my Responsibility, whether we will be able to properly nurture after giving birth? The Mother or both Mother and Father are plagued with many questions like ….etc. Of course, all this will affect the fetus in the womb!

 

A baby born with the ambivalence of whether to keep the pregnancy or not, the choice and the resulting effects on the fetus, will definitely carry some disease or deformity . A lot of research has been done on this.

 

That’s why all the family would get happy and prepare for pregnancy after hearing the news of pregnancy. There, today’s woman seems to be consumed by various questions and worries. So how can we predict the health of the children to come ?

 

In ancient times, since an expectant mother conceived, “she has become a special woman. She should always be happy. Many ceremonies were performed in our homes to keep her health, her mood balanced, pleasant and happy, and the period of pregnancy was full of joy and excitement.”

 

But I don’t think that mother will get this happiness in 21st century !! Because if during pregnancy her Job, Business, Financial status, Family Relationships etc. If she is worried, such a Mentality is definitely affecting the fetus in her womb.

 

Even if a healthy, strong baby is born from such a result, that baby will also have to face the conditions of 21st century.

Its formation is going to be less under the influence of family people and more in the vicinity of Science and Technology.

 

In such a case, the child may fall victim to many types of mental diseases . Due to the lack of affection, moisture, relationship, love, care, these children are likely to be depressed, lonely, discouraged, fickle, fearful, timid or angry, incontinent diseases or even take extreme roles like suicidal tendencies or criminal tendencies.

 

We are seeing a vivid example of this in the West, but its loan has also started to appear in our big cities, that is, we are hearing examples of young chidden committing suicide if they get angry or don’t give technology things like Mobile Phones etc. by elderly people in family.

 

Due to the availability of various Electronic Gadgets in the hands of children since childhood, their overuse and over-attraction, loneliness in life, broken relationships and immediate availability of desired items, instant gratification and extreme changes in children’s behavior if they are not received, we have to deal with many different types of child mentality. 

Earlier parents used to make sense of everything while raising their children. They do not give without necessity or clearly refuse. But today’s generation/parents we have not got that thing, so we are deprived of many things, instead of making our children aware, their every demand is catered for, their mistakes are covered and its side effects have become a big reason for children’s intemperate, stubborn attitude. .

 

Considering all these factors, we realize that we need to be equally prepared for the challenges of child health in the 21st century.

Homoeopathic medicines are given to children based on their symptoms and behavior . such as,

  • How does she behave ?
  • How do you answer ?
  • How do they move ?
  • Their hunger, thirst, sleep patterns, teeth grinding in sleep, waking up screaming, walking, nose scratching,
  • tongue color,
  • Nose blowing etc.
  • It is necessary to understand their mental, physical and emotional nature .

Every child has his own fantasy world. In that world he is his own producer, director and actor. He is the king of the art world of that stage .

By entering the imaginary world of every child, the Homoeopathic doctor enters the imaginary world of children. The movement in their mind, their state of mind, their companions, dreams, imaginations, fairy tales, favorite shows, sports, toys, dolls, mobile games, hobbies, poetry, their food preferences, perceptiveness, the way they mix with other people, etc. It is necessary to know to choose medicine.

 

Homoeopathy will be a boon to all the questions that arise in the mind of parents.

Homoeopathy treats each child differently according to his case. The mentality of that child is understood.

  • What are his exact problems ?
  • How does he think ?
  • What is his desire and expectation ?
  • What is his imaginary world, his own universe ?
  • How is his relationship with his family members, friends, other students at school, teachers ?
  • What exactly started this disease ?
  • What exactly is the feeling, event that caused these diseases at the beginning ?
  • And what was the boy’s reaction to that ?
  • All these are considered very deeply and only then the medicine is discovered accordingly.

The result of the medicines discovered after studying the case in such a detailed manner is that the children, that is, the case in its surroundings, begin to look at the same situation from a different positive point of view, and by adjusting the relationship with the same situation in a better way, adaptation, with a new hope on their illness, By overcoming illness and mental disorders, we can live our lives happily and positively.

Homoeopathy has many types of effective medicines, which are studied individually for each child. Whatever the disease may be, this medicine is given only after a thorough study of their personality and mental state.

Always remember ” if you stay ahead of the disease you will win” but equally important not to take any medicine by oneself without consult.

Even though the Nature of Diseases is changing in this technological age in 21st Century, there is no doubt that Homoeopathy is a Competent, Effective and Scientific method of treatment to combat the Impending Diseases.

 

Dr Ajay Hanmane
M.D.(Homeo), HHF, ICR Kolhapur,
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4,
Bhaskar Plaza Vyapari Peth,
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
Mobile No. 7738667123
Sunday Closed.

Please Read Next Article