होमिओपॅथी शास्त्रीय उपचार पद्धती
होमिओपॅथीला आजही अनेक “फिजिशियनसचा“ विरोध आहे कारण शास्त्राकडे (सायन्स) कडे पाहण्याचा जो एक प्रचलित दृष्टिकोन आहे त्यापेक्षा होमिओपॅथीचा शास्त्रविषयक दृष्टिकोन वेगळा आहे.
होमिओपॅथीचा दृष्टिकोन हा कार्यकारणभावावर आधारित (Cause-Effect Relationship) आहे.
“आजार कशामुळे उद्भवला” याचा विचार मॉडर्न वैद्यकशास्त्रामध्ये केला जातो,
तर होमिओपॅथी इन्फेक्शन झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या प्रकृतीची संपूर्णपणे वर्णनात्मक चिकित्सा (personality) चा विचार करून चिकित्सा करते. संपूर्ण शरीरस्वभावाचं (Constitutional) आकलन करण्यावर भर देते.
औषधोपचार करताना “काय शोधायचं” ? आणि औषधांन “काय साधायचं” ? या दोन्ही बाबतीत होमिओपॅथी इतर वैद्यकशास्त्रांपेक्षा वेगळा विचार करते.
मनोकायिक संबंध — मॉडर्न मेडिसिन मध्ये ही आता ‘शारीरिक स्वरूपांच्या आजारातील मानसिक समस्यांचे स्थान अधिक आहे‘ हे स्वीकारलं गेलं आहे.
औषधविज्ञान आणि मानसशास्त्रानं गेल्या काही दशकात लक्षणीय लक्षणीय प्रगती केली आहे. परंतु शारीरिक आणि मानसिक समस्यांमधील नातं स्वीकारलं जाऊ लागलं आहे. अधिकाधिक आजार हे मनोकायिक किंवा सायकोसोमॅटिक धरतीचे मानले जातात.
या परस्परसंबंधांच शास्त्रीय विश्लेषण करणारी पद्धती अद्याप ठोसपणे विकसित झाली नाही.
शारीरिक आणि मानसिक लक्षणे परस्परावलंबी (Interdependent) असतात.
मनोविकारशास्त्रात मानसिक समस्यांचे शारीरिक लक्षणांमध्ये रूपांतर होतं असं मानलं जातं.
उदाहरणार्थ -थरथरणं, धडधडणं हुडहुडी भरणं किवा घाम फुटणं ही सगळी लक्षणे मानसिक अस्वस्थचे परिणाम म्हणण्यापेक्षा त्या अवस्थेत शरीर पातळीवर व्यक्त होणे असे म्हणता येईल.
मानसिक समस्यांचं स्थान होमिओपॅथीने दोन -अडीचशे वर्षांपूर्वीच ओळखून उपचार पद्धती आवश्यक ते महत्त्व दिलं आहे. म्हणून होमिओपॅथी हे काळाच्या पुढील शास्त्र असं म्हणायला हरकत नाही.
एखादा रोग निर्माण होण्यासाठी किंवा तो बळवण्यासाठी जेव्हा शरीरही मदत करतं तेव्हाच तो रोग उद्भवतो.
एकाच परिस्थितीत राहणाऱ्या सगळ्याच माणसांना व्यक्तींना तो आजार होत नाही. एकाच घरातली सगळे त्या आजाराने एकाच वेळी आजारी पडत नाहीत.(मोठे साथीचे रोग वगळता)
उन्हात जाऊन प्रत्येकाचे डोके दुखत नाही. दुखलं तरी सर्वांचे एकाच ठिकाणी दुखत नाही. आईस्क्रीम खाऊन खाऊन सर्वानाच सर्दी होत नाही आणि ज्यांना होते त्यांच्याही लक्षणांमध्ये विलक्षण फरक आढळतो.
एकाच परिस्थितीत आणि एकाच कारणामुळे उद्भवणाऱ्या या एकाच आजाराची ही विविधरूप का आहे? त्याचे उत्तर, स्वतःला शास्त्रीय म्हणून होणाऱ्या आणि होमिओपॅथी अशास्त्रीय ठरवणाऱ्या डॉक्टरांना अजून पर्यंत देता आलं नाही.
एखाद्याला होणाऱ्या आजारात त्याच्या शरीरातील विविध क्रियांमध्ये होणाऱ्या असंतुलनाचा मोठा वाटा असतो. शरीरातल्या क्रियांमध्ये जेव्हा असंतुलन होऊ लागते तेव्हापासूनच शरीर त्याची लक्षणे दाखवू लागते.
उदा.अचानक अस्वस्थ वाटणं, तोंडाला कोरड पडणं, एकदम गरम होणं, भूक मंदावणे इ. वास्तविक हीच खरी आजाराची सुरुवात असते.
पण त्याचवेळी शरीरातील नेमक्या कुठल्या क्रियेत असंतुलन झाले आहे हे शोधण्यासाठी कुठलीही तपासणी / टेस्ट आधुनिक वैद्यकशास्त्रात आजपर्यंत उपलब्ध नाही. त्याचं कारण असं की, त्या प्राथमिक अवस्थेत शरीरात निर्माण होणाऱ्या बदलांचे प्रमाण अतिशय सूक्ष्म असतं आणि ते बघण्याचं तंत्र आधुनिक वैद्यकशास्त्राकडे नाही, ही त्यांची मर्यादा आहे.
पण केवळ बघता येत नाही, त्यासाठीची टेस्ट नाही म्हणून शरीर क्रियांमधील या सूक्ष्म असंतुलनाच व त्यातून उद्भवणाऱ्या लक्षणांचं अस्तित्व नाकारणं, हे नक्कीच शास्त्रीय नाही.
कोणताही आजार बरा करायचा झाला तर सुरुवात ज्यातून होते त्या शरीरात होणाऱ्या अतिसूक्ष्म बदलांवर उपचार करायला हवा. म्हणून उपचारांसाठी औषध सुद्धा अतिसूक्ष्म प्रमाणात हवं.
होमिओपॅथिक औषधांमधील औषधी द्रव्यांचा अत्यल्प प्रमाण व त्यातील गुणात्मक बदल बघता न येणे ही तथाकथित शास्त्राची तंत्राची मर्यादा आहे. केवळ बघता येत नाही म्हणून होमिओपॅथिक औषधांचा अस्तित्व नाकारणं हेही नक्कीच शास्त्रीय नाही.
अंतर्मनाची अमर्यादशक्ती ही संकल्पना संपूर्णतः म्हणून वैज्ञानिक आहे. अंतर्मनाला स्वयंसूचना देऊन ती जागृत करता येते, तिचा प्रभाव स्पष्ट दिसून येतो हे सिद्ध झालं आहे. इच्छाशक्तीच्या जोरावर अशक्य भासणारी गोष्ट शक्य होते, हे वास्तवात सिद्ध होताना दिसते. एखाद्या असाद्य रोगाच्या अंतिम अवस्थेतही काही रुग्ण “इच्छाशक्तीच्या” जोरावर बरे होतात, असे त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर्स ही मान्य करतात.
भावनांमध्ये शक्ती असते हे ही शास्त्रीय मानसशास्त्रीय सत्य आहे. तीव्र स्वरूपाच्या भावनांमधील शक्ती शरीरपातळीवर ही दिसू शकते.
रागात शक्ति असते, प्रेमात शक्ती असते, श्रद्धेत बोल असतं हे जर शारीरिक-मानसिक पातळीवर व्यक्तही होत असतं. डॉक्टर हॅनीमान यांच्या प्राणशक्ती या संकल्पनेला ती केवळ दिसत नाही, मोजता येत नाही या कारणावरून अशास्त्रीय ठरवणं योग्य ठरणार नाही.
होमिओपॅथी मध्ये ही आत्मशक्ती वाढविण्याचा प्रयत्न केला जातो. होमिओपॅथिक औषधांची सूक्ष्म मात्रा ही शारीरिक किंवा भौतिक स्तरावर कार्य न करता चैतन्यपातळीवर कार्यरत असते व ते कार्य औषधांच्या उपयुक्त परिणामातून सातत्याने स्पष्ट व सिद्ध होत आहे.
फक्त लक्षणांवर लक्ष केंद्रित न करता रुग्णाची रोगनिवारण शक्ती वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवणारी होमिओपॅथी अशास्त्रीय ठरवणे हे नक्कीच शास्त्रीय ठरणार नाही.
डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ)
चैतन्य होम्योपैथिक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4
शाहुपुरी व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123
रविवारी बंद
कृपया पुढील लेख वाचा –
Homeopathy is still opposed by many “ physicians “ because the scientific view of Homoeopathy is different from the prevailing view of science.
The approach of Homoeopathy is based on cause-effect relationship .
” What causes disease” is considered in Modern Medicine ,
After the infection, Homoeopathy treats the person’s condition completely by considering the descriptive treatment (personality) . Emphasizes on understanding the whole body nature (Constitutional) .
” What to look for” while taking medication? And ” what to achieve ” with drugs? In both these respects , Homoeopathy differs from other forms of medicine .
Psychiatric Correlations – In Modern Medicine it is now accepted that ‘ psychological problems are more likely to occur in diseases of physical forms ‘.
Pharmacology and psychology have made significant advances in the last few decades. But the relationship between physical and Mental problems is beginning to be accepted. More and more illnesses are considered to be psychological or psychosomatic in nature.
Methodology for scientific analysis of these correlations has not yet been solidly developed.
Physical and Mental symptoms are interdependent .
In Psychiatry, mental problems are believed to translate into physical symptoms .
For example, shaking, palpitations, sweating or sweating are all symptoms rather than the result of mental discomfort, but can be said to be expressed at the physical level in that state .
Homoeopathy has recognized the location of mental problems two to two and a half hundred years ago and has given importance to the treatment method. Therefore, there is no problem in saying that Homoeopathy is a science ahead of time .
A disease occurs only when the body also helps to cause or aggravate it .
Not all people living in the same situation get that disease. Not everyone in the same house gets sick with that disease at the same time. Even if it hurts, not everyone hurts in the same place.
Not everyone gets a cold after eating ice cream, and even those who do have remarkably varied symptoms.
Why this variety of the same disease arising under the same conditions and from the same cause ? The answer has not yet been given to doctors who call themselves scientific and consider Homoeopathy unscientific.
Imbalance in various functions of the body plays a major role in the disease that occurs to a person . The body starts showing its symptoms only when there is an imbalance in the functions of the body.
E.g. Sudden discomfort, dry mouth, extreme heat, loss of appetite etc. In fact, this is the beginning of the real disease. But at the same time , no examination/test is available in Modern Medicine to find out exactly which function of the body is imbalanced .
The reason is that the amount of changes that occur in the body in that initial stage is very subtle and Modern Medicine does not have the technology to see it, which is its limitation.
But because it cannot be seen, there is no test for it, it is certainly not scientific to deny the existence of these subtle imbalances in body functions and the symptoms arising from them.
If we want to cure any disease, we have to treat the very subtle changes in the body from where it starts. Therefore, for the treatment, the drug is also required in very small amount.
The limitation of the technique of the so-called science is the small amount of medicinal substances in Homoeopathic Medicines and not being able to see qualitative changes in them. It is certainly not scientific to deny the existence of Homoeopathic Medicines just because they cannot be seen.
The concept of the infinite power of the Mind is purely scientific. It has been proven that the inner mind can be awakened by self-suggestion, its effect is evident. Reality seems to prove that the seemingly impossible can be achieved through sheer force of will. Doctors treating them admit that even in the terminal stages of a terminal illness, some patients recover by ” willpower “.
It is a Classical Psychological truth that Emotions have power. The power of intense Emotions can manifest itself on the physical level.
There is power in anger, there is power in love, there is speech in faith, if it is expressed on the physical and mental level as well. It would not be right to call Dr. Hahnemann’s concept of life force unscientific on the grounds that it cannot be seen or measured.
Homoeopathy tries to increase this self power . Micro doses of Homoeopathic medicines work on the consciousness level without working on the physical or physical level and that work is consistently evident and proved by the beneficial effects of the medicines.
It would certainly be unscientific to call Homoeopathy unscientific as it aims to improve the patient’s immune system without focusing only on symptoms.
Dr Ajay Hanmane
M.D.(Homeo)
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4,
Bhaskar Plaza Vyapari Peth,
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
Mobile No. 7738667123
Sunday Closed
Please Read Next Article —