नियमनाचे पर्यायावर होमिओपॅथी / Homoeopathy as an alternative to  Regulation

Dorctor Pic By Dr. Ajay HanmaneOctober 21, 2024 Anxiety Female Problems General Information Homeopathic and Cure Mental Health Sexual Problems

         नियमनाचे पर्यायावर होमिओपॅथी

जय आणि राधा अगदी खुशीत होते. ध्यानीमनी नसताना जयला नवीन नोकरीच्या निमित्ताने लंडनला किमान पाच ते सहा वर्षांसाठी स्थायिक होण्याची संधी चालून आली होती. दोघांचे नवीनच लग्न झालं असल्यानं वय आणि उमेद दोन्ही त्यांच्या बाजूने होतं. पुढच्या  महिन्याभरातच तिकडे जायचं असल्याने दोघांची आणि दोघांच्याही घरच्यांची लगीनघाई सुरू होती; पण त्यांच्या आनंदावर अचानक विरजण पडलं, कारण राधाला दिवस गेले. वास्तविक ही त्यांच्यासाठी ‘गुड न्यूज’ असायला हवी होती; पण ती नियोजित गर्भधारणा नसल्यामुळे प्रश्न निर्माण करणारी ठरली होती.
 संततीनियमन हा विषय वाटतो तेवढा सोपा नाही. निरोध की गोळी, सुरक्षित काळातला समागम की त्रुटित संभोग, पुरुष नसबंदी की स्त्रियांची कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया असे यासाठीचे पर्याय आहेत……मात्र जोडप्याच्या वयानुसार, लग्नाला किती वर्ष झाली आहेत, तसंच त्या त्या वेळेच्या प्राधान्यक्रमानुसार कुटुंब नियोजनामागची भूमिका ही सतत बदलत असते. त्याबद्दल त्या भूमिकांमुळे काही वेळा गोंधळाची तर क्वचित तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. कुटुंबनियोजनासंदर्भात योग्य माहितीपेक्षा गैरसमजांचा भरणाच अधिक असल्यामुळे हा महत्त्वाचा विषय दुर्लक्षित राहतो.

 

“निमशहरी आणि ग्रामीण भागात कुटुंब नियोजन ही संकल्पनाच अस्तित्वात नसल्यासारखी स्थिती आहे. लग्नानंतर बहुतेक जोडप्यांना पहिल्या तीन-चार महिन्यातच गर्भधारणा राहते. यामागे गर्भनिरोधकांविषयीचे अज्ञान, दुर्लक्ष किंवा  घरच्यांचा आग्रह यापैकी कुठलंही कारण असतं. आज सहज अवलंबता येतील असे गर्भनिरोधकांचे पर्याय उपलब्ध असतानाही क्वचितच जोडपी या संदर्भात सल्ला घ्यायला दवाखान्यात येतात.”
लग्नानंतर काही वर्ष कुटुंबनियोजन केलं, तर नंतर गर्भधारणा व्हायला अडचणी येतात, हा एक मोठा गैरसमज समाजात आहे.
“गर्भनिरोधकाविषयी अनेक गैरसमज आहेत. विशेषतः स्त्रियांनी गोळ्या घेतल्या तर त्यांच्या शरीराचं नुकसान होतं आणि नंतर मूल हवा असेल तर तेव्हाही गर्भधारणा राहण्यात अडचणी येतात, असे परस्पर सल्ले दिले जातात.
या उलट ज्या स्त्रियांची पाळी अनियमित आहे त्यांच्या मासिक पाळीचे चक्र सुधारायला गोळ्यांमुळे मदत होते. तसंच पाळी दरम्यान तीव्र स्वरूपात रक्तस्त्राव होत असल्यास तोही आटोक्यात येऊन रक्तातलं हिमोग्लोबिन वाढतं. गोळ्यांव्यतिरिक्त आज इंजेक्शनचा ही पर्याय उपलब्ध असून, एकदा इंजेक्शन घेतलं की तीन महिन्यांपर्यंत गर्भधारणा राहत नाही. तुमच्या प्रकृतीनुसार कोणत्या स्वरूपाची गोळी, इंजेक्शन घ्यायचं याचा सल्ला डॉक्टरांकडून अवश्य घ्यावा. प्रकृतीच्या किंवा अन्य काही कारणांनी गोळी नको असेल तर कॉपर टी (तांबी),  इंप्लांट्स   यांसारख्या अन्य पर्यायांचा विचार करता येतो.
जोडप्यांनी आणि विशेषतः स्त्रियांनी हे समजून घ्यायला हवं, की दर गर्भधारणा राहील का, ही भीती मनातून गेली तर समागमातील समाधान वाढू शकते. “
गोळ्या घेऊन देखील स्त्रियांची मासिक पाळीची तक्रार चालूच राहिली किंवा रक्तस्राव आटोक्यात येत नसेल तर होमिओपॅथीमध्ये अनेक गुणकारी औषध आहेत ज्याच्यामुळे पाळीचं चक्र सुधारते, पाळी नियमित होते, रक्तस्त्राव आटोक्यात येतो आणि हिमोग्लोबिन आपोआपच वाढतं आणि औषधांचे कोणतेही दुष्परिणाम शरीरावर होत नाहीत.
स्त्रियांच्या गर्भनिरोधक गोळ्यांसंदर्भात एक मजेशीर गोष्ट निरीक्षणालाआली, ती  म्हणजे गर्भनिरोधक गोळ्यांचा शोध हा वास्तविक अनियमित मासिक पाळीचा त्रास असणाऱ्या स्त्रियांचं मासिक चक्र नियमित करण्याच्या उद्देशाने लावण्यात आला होता; पण या गोळ्यांच्या चाचण्या सुरू असताना संशोधकांच्या असं लक्षात आलं, की या गोळ्या घेणाऱ्या स्त्रियांना गर्भधारणा न राहण्याचा ‘साईड इफेक्ट’ मिळत आहे. हे समजताच ही गोळी अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय झाली. अमेरिकेमध्ये या गोळीला मान्यता देतानाही पाळीच्या समस्यांवरील औषध म्हणून तिला मान्यता दिली गेली होती. त्यामुळे त्यावर्षी पाळीच्या समस्या असलेल्या स्त्रियांचे प्रमाण नेहमीपेक्षा ‘अचानक’ वाढलं. त्यानंतर तीन वर्षांनी (1960 मध्ये) गर्भनिरोधक म्हणून या औषधाला मान्यता देण्यात आली.
पुढच्या काही वर्षात “ओरल कॉन्ट्रासेप्टिव पिल्स” (Oral Contraceptive Pills) हा अमेरिकेतला सर्वात लोकप्रिय गर्भनिरोधक पर्याय ठरला.
पुरुषांच्या बाबतीत विचार करता निरोध (कंडोम) हे प्रभावी गर्भनिरोधक ठरतं; पण  त्याच्यामुळे पुरेसं समाधान मिळत नाही, अशी बऱ्याचदा पुरुषांची तक्रार असते.
पण सेक्सोलॉजिस्ट यांच्या मते, ” कंडोमनं समाधान मिळत नाही, यात तथ्य नाही. उलट लग्नानंतर पहिल्या काही दिवसात अतिसंवेदनशीलतेमुळे शीघ्रपतन होत असेल, तर कंडोममुळे समागमाचा कालावधी वाढवता येतो. ऑरगॅझम चा आनंद हा अंतिमतः मेंदूत नोंदवला जात असतो, हे समजून घ्यायला हवं.”
पण काही पुरुषांच्यामध्ये शीघ्रपतनाचा आजार वयोमानानुसार वाढत जातो. अशावेळी होमिओपॅथिक औषधांचा उपचार अत्यंत उपयोगी ठरतो. यामुळे शीघ्रपतनाची समस्या नाहीशी होऊन समागमाचा आनंद पूर्वीप्रमाणे घेता येतो.
जोडप्यामध्ये दोघांनाही कोणतही गर्भनिरोधक साधन वापरायचं नसेल तर अपूर्ण संभोग पद्धतीचा वापर प्रचलित आहे. यालाच ‘त्रुटीत संभोग’  असंही म्हणतात. यामध्ये संभोग अर्धवट करत वीर्य बाहेर टाकण्याची क्रिया पुरुष करतात.
गर्भनिरोधक म्हणून ही पद्धत कशी सुरक्षित नाही, हे ‘कामविज्ञान या पुस्तकात नमूद करण्यात आलं आहे, की जेव्हा मनुष्याला संतती नियमनासाठी कोणतीही साधन उपलब्ध नव्हती, तेव्हा किंवा आजही साधनांच्या अभावी जोडपी अपूर्ण संभोग पद्धतीचा वापर करतात. ही क्रिया बिनपैशांची व केव्हाही करता येण्याजोगी असली, तरी त्यामुळे गर्भधारणा राहण्याचा धोका असतोच, कारण वीर्यपथनापूर्वी उत्तेजित अवस्थेत लिंगावर जो स्त्राव जमा होतो त्यातही शुक्राणू असतात. प्रत्यक्ष समागमावेळी हे शुक्राणू गर्भाशयात जाऊ शकतात. गर्भसंभवासाठी एकाच शुक्राणूची आवश्यकता असल्यानं त्यांनाही गर्वसंभव होण्याचा धोका असतो.
“सुरक्षित काळातील संभोग”  ही पद्धतसुद्धा गर्भधारणा टाळण्यासाठी पुरेशी सुरक्षित नसते, असं सेक्स थेरपीस्ट आणि स्त्रीरोग तज्ञ यांनी स्पष्ट केलं आहे.
“लग्नाला एखादं वर्ष झालं आणि मुलाचा आग्रह नसूनही गर्भधारणा राहिली तरी चालेल असे विचार असलेल्या जोडप्यांना या पद्धतीचा अवलंब करता येतो. यामध्ये पाळीनंतरच्या काही दिवसांत आणि पुढची पाळी येण्याआधी काही दिवसात गर्भनिरोधकांशिवाय समागम केला जातो.
“ओव्हूलेशन” चा काळ वगळता इतर वेळा संभोग करता येतो. अनियमित पाळी असलेल्या स्त्रियांमध्ये ओव्हूलेशनचा निश्चित काळ कळत नसल्यानं ही पद्धत अवलंबता येत नाही. मात्र, अगदी नियमित पाळी असलेल्या स्त्रियांमध्येही गर्भधारणा राहण्याची शक्यता असते. कारण शुक्राणू हे योनी मार्गात सात दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतात.”
इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव गोळ्यांचा वापरही गेल्या काही वर्षात वाढला आहे. “खरं तर आणीबाणीच्या वेळी या गोळ्या वापरायला हव्यात. टीव्हीवरच्या जाहिरातींमुळे हे गर्भनिरोधकांनाचं नियमित साधन आहे, अशी अनेकांची धारणा झालेली आहे. या गोळ्या वारंवार घेतल्या तर त्याचा स्त्रियांच्या प्रकृतीवर थेट परिणाम होऊ शकतो, पाळीचं चक्र बिघडू शकतं  आणि नको असलेली गर्भधारणा ही राहू शकते. हे सगळे धोके जोडप्यानी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे डॉक्टरांशी सल्लामसलत केल्याशिवाय थेट या गोळ्या घेऊ नयेत.
 कुटुंब पूर्ण झालेल्या जोडप्यांना पुरुष नसबंदी किंवा स्त्रियांची यासंदर्भातली शस्त्रक्रिया हे  गर्भनिरोधकाचे दोन प्रभावी उपचार उपल उपलब्ध असतात.
याविषयी साधारण माहिती असली तरी अनेक कुटुंबांमध्ये ही जबाबदारी ही पुरुष स्त्रियांवरच ढकलतात अशी स्थिती आहे.
वास्तविक स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांची नसबंदीची शस्त्रक्रिया ही अतिशय सुटसुटीत असते बिनटाक्याची ही शस्त्रक्रिया अवघ्या अर्ध्या तासात पार पडते. त्यामुळे अधिकाधिक पुरुषांनी कुटुंब नियोजनाच्या या प्रभावी साधनाचा तो गांभीर्याने विचार करायला हवा.
वंशसातत्य ही कुठल्याही सजीवाची मूलभूत प्रेरणा असली, तरी माणूस सेक्स केवळ गर्भधारणेसाठी करत नाही.
आता गर्भ निरोधकांमध्ये असंख्य पर्याय उपलब्ध झाले आहेत.  त्यामुळे केवळ अज्ञानामुळे या महत्त्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं, याची जाणीव प्रत्येक जोडप्याने ठेवायला हवी.
नवीन लग्न झालेली जोडपी कुटुंबनियोजन  संततीनियमन याबाबतीत उदासीन असतात. पण त्यामुळे लग्नानंतर शारीरिक संबंधांमध्ये ताण वाढू शकतो. त्यामुळे काही वेळा अनियोजित गर्भधारणेला सामोरे जावे लागते. म्हणून संततीनियमन हा विषय जोडप्यांमध्ये आधीच चर्चिल जाणं आणि त्यासाठी अनुभवी डॉक्टरांशी सल्लामसलत करणं आवश्यक आहे.
शारीरिक संबंधांमधील ताण-तणाव तसेच  शारीरिक संबंधाच्या वेळी होणारा त्रास, वेदना, त्याविषयी असणारी उदासीनता, अनिच्छा, शिग्रपतन तसेच स्त्री आणि पुरुषांच्या लैंगिक समस्या इत्यादी काम जीवनाविषयी असलेल्या तक्रारींवर होमिओपॅथी शास्त्रामध्ये अनेक गुणकारी औषधे उपलब्ध आहेत.
कामजीवनातले हे ताणेबाणे डॉक्टरांशी संवाद आणि सल्ला वेळीच घेऊन, त्याच बरोबर  होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच होमिओपॅथिक औषध घ्यायला हवे.

डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ) HHF, ICR Kolhapur,
चैतन्य होमिओपॅथीक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4, HDFC बॅंकेजवळ,
शाहुपुरी व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123
रविवारी बंद  

कृपया पुढील लेख वाचा  —

———————————————————-

Homoeopathy as an alternative to  Regulation

Jay and Radha were very happy. Suddenly an opportunity arose for Jay to settle down in London for at least five to six years due to a new job. As both were newly married, both age and hope were on their side. As they had to go there within the next month, both of them and their families were in a hurry; But their happiness suddenly faded, as Radha got pregnant. Actually this should have been ‘Good News’ for them; But it turned out to be a problem as it was not a planned pregnancy.
Family planning is not as simple as it seems. The options are Contraception or the Pills, Safe time Intercourse or Coitus Interruptus, Male Sterilization or Family Planning surgery for Women…but the role of Family Planning is constantly changing depending on the age of the couple, how many years they have been married, and their priorities at that time.  Because of that, those roles can sometimes lead to confusion and rarely tension. Due to the fact that there are more misconceptions than correct information about family planning, this important topic remains neglected.
“Family planning is a non-existent concept in semi-urban and rural areas. Most couples conceive within the first three-four months after marriage. This is due to ignorance of Contraceptives, neglect or family insistence. Today, despite the availability of easily accessible Contraceptive options, very few couples come to the hospital for consultation in this regard.”
There is a big misconception in the society that if family planning is done a few years after marriage, then there will be difficulties in getting pregnant.
“There are many misconceptions about birth control. In particular, women are advised that if they take the pill, it will harm them and, if they want to have a baby later, they will have trouble conceiving. On the contrary, the pill can help improve the Menstrual Cycle of women who have irregular periods. Also, If there is severe bleeding during Menstruation, it also comes under control and the hemoglobin in the blood increases. Today, apart from pills, this option of injection is available, once an injection is taken, pregnancy does not last for three months. You must consult a Doctor about the type of pill or injection to take according to your condition. Due to Prakriti-Poor Health or something else if the pill is not desired for reasons other options like copper-T , Implants can be considered.
Couples and especially women should understand that if the fear of getting pregnant is removed from the mind, the satisfaction of intercourse can increase.

 

If women continue to complain of menstruation or bleeding is not controlled even after taking pills, there are many effective Medicines in Homoeopathy which improve the Menstrual cycle, Regular Menstruation, bleeding is controlled and hemoglobin increases automatically and the medicine does not have any side effects on the body.
An interesting thing to note about female birth control pills is that birth control pills were originally invented to regulate the menstrual cycle of women with irregular periods; But during the trials of these pills, the researchers realized that the women taking these pills were getting the ‘Side Effect’ of not being able to conceive. As soon as this was realized, this pill became very popular within a short period of time. While the pill was approved in the US, it was also approved as a medicine for menstrual problems. Therefore, the number of women with menstrual problems increased ‘suddenly’ than usual that year. Three years later (in 1960), the drug was approved as a contraceptive. Over the next few years, Oral Contraceptive Pills became the most popular birth control option in America.
Condoms are an effective contraceptive for men; But men often complain that it does not give them enough satisfaction.
But according to the sexologist, “It is not true that condoms do not give satisfaction. On the contrary, if premature ejaculation occurs due to hypersensitivity in the first few days after marriage, condoms can increase the duration of intercourse. We should understand that the pleasure of orgasm is ultimately registered in the brain.”
But in some men, the disease of premature ejaculation increases with age. In such cases, Homoeopathic treatment is very helpful. Due to this, the problem of premature ejaculation disappears and sexual intercourse can be enjoyed as before.
In a couple, if neither of them wants to use any contraceptive method, the use of Coitus Interruptus is prevalent. This is also called ‘faulty intercourse’. It is mentioned in the book ‘Kama Vidnayana’ ‘कामविज्ञान that when man did not have any means for progeny control, then or even today due to the lack of means, couples use Coitus Interruptus method. Although this procedure is free and can be performed at any time, it carries the risk of pregnancy, because the discharge that accumulates on the penis in the arousal state before ejaculation also contains sperm. During actual sexual intercourse, these sperm can enter the uterus. Since only one sperm is required for conception, they are also at risk of infertility.
Even “Safe timed Sex” is not safe enough to prevent pregnancy, Sex Therapists and Gynecologists have explained.
“Couples who have been married for a year and are still trying to get pregnant can use this method. It involves having intercourse without contraception a few days after your period and a few days before your next period. You can have intercourse at other times except during ovulation.
This method cannot be used in Menstruating Women as the exact time of Ovulation is not known.
However, even in Regular Menstruating Women there is a possibility of pregnancy as sperm can survive in the vaginal tract for up to seven days.”
The use of Emergency Contraceptive Pills has also increased over the years. “Actually, these pills should be used in emergencies. TV commercials have led many people to believe that these pills are a regular method of contraception. Repeated use of these pills can directly affect women’s health, disrupt menstrual cycles, and lead to unwanted pregnancies. It is very important for the couple to understand all the risks, so these pills should not be taken directly without consulting a Doctor.
Vasectomy or Tubectomy surgery are two effective methods of contraception available to married couples.
Although there is general knowledge about this, in many families, men push this responsibility on women.
In fact, compared to women, sterilization surgery for men is very easy. This surgery is done in just half an hour. So more and more men should consider this effective family planning tool seriously.
Although procreation is the basic motivation of any living being, humans do not engage in sex only for procreation.
Now there are numerous options available in contraceptives. Therefore, every couple should be aware that neglecting this important issue can be costly due to ignorance alone.
Newly married couples are indifferent about family planning and birth control. But it can increase stress in physical relations after marriage. So sometimes unplanned pregnancy has to be faced. Therefore, the topic of Birth Control should be discussed in advance among couples and for this it is necessary to consult an experienced doctor.
There are many effective medicines available in Homoeopathy for complaints related to Sex-Life such as Stress and Tension in Sexual Intercourse, pain during sexual intercourse, Depression, Reluctance, Impotence and sexual problems of Men and Women.
These stressors in Sex-Life should be discussed and consulted with the Doctor on time and at the same time Homoeopathic Medicine should be taken only on the advice of the Homoeopathic Doctor.

Dr Ajay Hanmane
M.D.(Hom) HHF,ICR Kolhapur,
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4, Near HDFC Bank,
Bhaskar Plaza Vyapari Peth,
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
Mobile No. 7738667123
Sunday Closed.

Please Read Next Article-