निहार आणि गौरी दोघेही “कॉलेज स्वीट हार्ट्स”. चार-पाच वर्ष नात्यात राहिल्यानंतर, लग्नासंबंधीचा निर्णय घेण्याची वेळ आली, तेव्हा निहारला आनंदापेक्षाही चिंतेने, आणि ताणानं घेरलं. गौरी “स्व-जातीय” नसल्याने घरचे आपल्याला लग्नाला कधीच मान्यता देणार नाहीत, याची त्याला जणू खात्रीच होती आणि त्याच्या अपेक्षाप्रमाणेच झालं ही तसंच. त्याला घरच्यांकडून कडाडून विरोध झाला.
आता एक तर, घरच्यांच्या विरोधासमोर झुकायचं किंवा घरच्यांच्या मर्जीची पर्वा न करता गौरीशी लग्न करायचा, हे दोनच पर्याय उरले. मग त्याने दुसरा पर्याय निवडला, गौरीशी लग्न केलं आणि घरच्यांनी त्याला घरातून अक्षरशः बेदखल केलं. त्याच्याशी संबंध तोडले. आपले कुटुंबीय असं वागतील याची शक्यता असली तरी प्रत्यक्ष त्यांनीही ‘त्वरित कृती‘ केल्यानं तो हादरला.
त्यातच या नवविवाहित जोडप्याची पहिली रात्र आली. रक्ताच्या नातेवाईकांनी संबंध तोडल्यावर मनावर आलेला ताण (Tension) शरीरावर परिवर्तित झाला आणि पहिल्याच रात्री त्याला ‘लैंगिक ताठरतेची’ समस्या उद्भवली. यातून त्याला लैंगिक कामगिरीविषयी चिंता (Performance Anxiety) निर्माण झाली. अतिताणामुळे अन् “काम” (सेक्स) जमत नसल्याच्या सततच्या चिंतेमुळे त्याला मधुमेह जडला.
लग्नानंतर तीन वर्षांनी निहार आणि गौरी यांनी सायकियाट्रीस्ट आणि सेक्स थेरपीस्टकडे उपचारांसाठी गेले तेव्हा त्याची लैंगिक ताठरतेची समस्या कायम होतीच. शिवाय कामेच्छा ही कमी झाली होती. शरीर संबंधात सातत्याने येणाऱ्या अपयशामुळे, विफलतेमुळे घटस्फोट घेण्याचा ते दोघे विचार करत होते. सायकियाट्रीस्ट आणि सेक्स थेरपीस्ट ट्रीटमेंटने देखील यश आले नाही.
घटस्फोट घेण्यापूर्वी एकदा होमिओपॅथिक डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी त्यांच्या जवळच्या नातेवाईकाने, जो होमिओपॅथिक औषधाने बरा झाला होता, माझ्याकडे शेवटचा उपाय म्हणून पाठवले होते, म्हणून ते चैतन्य क्लिनिकमध्ये आले होते. त्यांच्या दृष्टीने उशीर झाला असला तरी, होमिओपॅथिक तज्ञाकडे जाण्याचा सूज्ञ निर्णय घेतल्याने त्यांना वेळेत उपचार मिळाले. आज ते सुखाचा संसार करत आहेत.
एका मानसोपचार तज्ञ डॉक्टरांनी सांगितलेला एक अनुभव असा की, ” हा एका नवविवाहित जोडप्यांचा प्रॉब्लेम नाही तर ताणाचे विविध प्रकार जोडप्यांच्या “कामजीवनावर” (सेक्स) मोठा परिणाम करीत असल्याचं त्यांनी सांगितलं.
“अवघड परिस्थितीमुळे सतत सतावणारी चिंता किंवा कसोटीची मानसिक अवस्था म्हणजे ताण”,अशी जागतिक आरोग्य संघटना ताणाची व्याख्या करते.
ताणाचं वैशिष्ट्य म्हणजे, ते डोळ्यांनी तो डोळ्यांनी दिसत नाही; पण तो त्या व्यक्तीला आतून पोखरच असतो.
“लैंगिक आरोग्य हा शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा एक महत्त्वाचा पैलू आहे. त्यामुळे कामजीवन (सेक्स) बिघडलेलं असेल, तर त्याच जोडप्यातल्या एकाचा व दोघांचा मानसिक ताण जबाबदार असण्याची शक्यता फार मोठी असते. अनेक जोडपी अतिसंकोच्यामुळे एकमेकांशी या गोष्टींवर बोलत नाहीत. मात्र त्यामुळे समस्या वाढून विभक्त होण्यापर्यंत मजल गेल्याची अनेक उदाहरणं आहेत. त्यामुळे जोडप्यांना अशी समस्या असल्यास ती स्वीकारून वेळीच त्यावर होमिओपॅथिक तज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. ताणाचा थेट परिणाम वैवाहिक सह-जीवनावर कसा होतो आणि त्याचे योग्य नियोजन करत ते पूर्व पदावर कसं आणायचं हे आजच्या वेगवान आणि स्पर्धेच्या युगात आवश्यक ठरतं जे होमिओपॅथिक उपचार पद्धतीने शंभर टक्के शक्य आहे.”
एका शास्त्रीय संशोधनात, संशोधकांनी Chronic Stress & Sexual Function in Women या आपल्या अभ्याविषयातून स्त्रियांच्या लैंगिक कार्यावर तीव्रताणाचा कसा परिणाम होतो? याचा शोध घेतला. ताणाचा पुनरुत्पादनाच्या क्षमतेवर विपरीत परिणाम होतो याबद्दलच संशोधन याआधी झालं असलं तरी, ताणामुळे स्त्रीच्या लैंगिक प्रतिक्रियेवर नेमका कसा परिणाम होतो? याचा तपास करण्याचा संशोधकांचा मुख्य उद्देश होता.
त्यांच्या मते, “शरीरातील ताणाचं प्रमाण जितकं जास्त तितकं जननेंद्रियांच्या लैंगिक उद्दीपनाचं (Genital Sexual Arousal) प्रमाण कमी असतं.”
सतत तणावाखाली असलेल्या स्त्रियांमध्ये “कॉर्टिसोल( Cortisol)” या हार्मोन्सची पातळी जास्त असते, तसेच मानसिक अस्थिरतेचाही परिणाम कामेच्छा घटण्याबाबत होतो, असं या संशोधनातून स्पष्ट झालं आहे.
एक सेक्सोलॉजिस्टच्या मते, “समागमासाठी महत्त्वाची पूर्व अट म्हणजे त्यावेळी तुमची मनस्थिती पूर्णपणे शांत पाहिजे. कामाच्या वेळी (सेक्सच्या) मनात कसलीही भीती, काळजी चिंता असेल, घाई गडबड असेल तर लैंगिक कामगिरीवर त्याचा थेट परिणाम होतो. कारण मन चिंतेत असताना ते लैंगिकदृष्ट्या उत्तेजित होऊ शकत नाही. तसंच “ऑरगॅझम (Orgasam)” ही देखील अनुभवण्याची गोष्ट आहे. मन स्थिर नसेल तर ती अनुभूती पूर्णपणे येऊ शकत नाही. पुरुषांच्या संदर्भात कुठल्या ना कुठल्या कारणाने मन चिंतेत असेल किंवा सेक्सच्या बद्दल चिंता असली तर लैंगिक ताठरता येत नाही. आली तरी ती दीर्घकाळ टिकत नाही किंवा त्याचं पर्यवसान शीघ्रपतनात होते हे जोडप्याने समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे की, बऱ्याचदा त्यांच्या सगळ्या लैंगिक समस्यांचे मूळ हे ताणात असतं. “
लग्नानंतर संसारातल्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांचा म्हणून जो एक ताण असतो त्यामुळेही सेक्सची इच्छा मंदावत जाते असे “A Sexless Marriage” या कादंबरीतील कथेमधून लक्षात येते.
या कथेतील नायीका ही आपल्या संसारात दोन मुलांना मोठं करण्यात रमून गेलेली असते. काही निमित्ताने तिला अचानक आपण पतीपासून शारीरिकदृष्ट्या दुरावल्याची तीव्र जाणीव होते. याचंच पर्यवसान पती-पत्नीच्या दुराव्यात, विवाहबाह्य संबंधात, काही वेळा घटस्फोटात होत असेल का? असे प्रश्न तिला छळू लागतात. वय, घरातले व्याप आणि स्वतःकडे दुर्लक्ष करण्याच्या आपल्या सवयीमुळे आपण बेढब झालोय का ? त्यामुळे आपल्या पतीला आपल्याबद्दल आकर्षण वाटत नसेल का ? असे प्रश्न तिला छळत आहेत. पतीशी बोलायला हवे, मोकळेपणाने संवाद साधायला हवा हे तिला जाणवतं. पण सेक्सबद्दल स्वतःच्याच पतीशी बोलायला तिला कमालीचा संकोच वाटतोय. कारण मूलबाळ झाल्यावर आणि चाळीशी ओलांडल्यावर या विषयावर बोलायचं नाही असा पाश्चिमात्य समाजाचा जणू अलिखित नियम आहे.
संसारातल्या वेगवेगळ्या ताणांचे कसं व्यवस्थापन करायचं याची ही रंजक-शृंगारिक कथा आहे. थोड्याफार फरकाने आपल्याकडेही जोडप्यांची हीच स्थिती असल्याचे जाणवतं.
एका स्त्रीरोग तज्ञ आणि सेक्सथेरपीस्टच्या मते, ‘ताण हे जणू आपल्या जीवनाचं नाव आहे. फक्त आपण त्याचा आपल्या कामावर, नातेसंबंधावर, सह-जीवनावर किती परिणाम होऊ देतोय हे वारंवार पडताळून पाहायला हवं. जोडपी लैंगिक समस्यांच्या उपचारासाठी आल्यावर म्हणतात की, ‘आम्ही आक्रमक भांडत नाही…… पण “ती” असं का वागते ? ‘तो’ उलट का बोलला ? ‘ अशा छोट्या छोट्या गोष्टींवरून आमच्यात सतत वाद होतात. असे वाद घेऊन झोपायला गेल्यावर जवळीक साधता येत नाही. कारण मन शांत नसतं.’
कोरोना नंतरच्या काळात घरून काम करण्याच्या नवीन बदलामुळे अनेक घरांमध्ये पती-पत्नी दिवसभर सोबत असतात किंवा होते. त्यामुळे ही नात्यातला ताण वाढतोय हे अधोरेखित झाले आहे.
लक्षवेधी वर्षांच्या मानवी उत्क्रांतीचा विचार करता, पुरुषांनी आणि स्त्रियांनी एका छताखाली इतका वेळ बरोबर राहणं ही नवीन गोष्ट होती. आतापर्यंत आपल्याकडे एकत्र कुटुंब पद्धती होती सध्याच्या वर्तमानात प्रियकर, मित्र, समुपदेशक, आर्थिक सल्लागार अशा वेगवेगळ्या भूमिका जोडप्याला निभावाव्या लागतात. याचा भयंकर ताण निर्माण होतो. जोडीदाराच्या अपेक्षांचा डोंगर जितका मोठा तितका ताण जास्त. ताण हा शृंगारासाठी मारक असल्याचं असल्याने त्याचा विपरीत परिणाम कामजीवनावर होतो.
कोरोनामुळे अनेकांची आर्थिक घडी विस्कटली. आर्थिक चणचणीमुळे निर्माण होणारा ताण हाही कामजीवनाला मोठ्या प्रमाणात मारक ठरतो.
माझ्याकडे एक एक जोडपे नियमित औषध घेत होते. या कुटुंबाची आर्थिक स्थिती ही उत्तम होती. दरम्यानच्या काळात औषधाने आरोग्य उत्तम स्थितीत राहिल्याने औषध बंद केले. पण कोरोना काळात त्या कुटुंबात,त्या पुरुषाला, व्यवसायात मोठं नुकसान आल्यानं व्यवसाय बंद करून फिरतीची नोकरी पत्करावी लागली. त्यामुळे दोघेही प्रचंड तणावग्रस्त होते. त्याचा परिणाम म्हणजे, नवऱ्याची रक्तातील साखर खूप वाढली आणि त्याची कामे इच्छाही घटली.
” ताण हा जसा मानसिक असतो, तसाच बऱ्याचदा शारीरिक असतो. जी जोडपी सतत बाहेरच जेवतात, त्यांचे शरीर सदैव ताणाखाली असतं. त्याचा थेट परिणाम त्यांच्या पचनशक्तीवर, झोपेवर आणि एकूण शारीरिक तंदुरुस्तीवर होतो. आपण वाचन कुठल्या प्रकारचे करतो ?, स्क्रीन टाईम किती आहे ? झोपण्याच्या क्षणापर्यंत टी.व्ही., मोबाईल बघतो का ? याचाही शारीरिक, मानसिक आणि लैंगिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो, असं अनेक सेक्सथेरपीस्ट यांनी निरीक्षण नोंदवलं आहे.”
माझ्याकडे एक 35 च्या तरुणाची केस आहे. तो माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तरुण असून त्याला ‘कमी कामेच्छा आणि लैंगिक ताठरता न राहण्याची’ समस्या होती. सततच्या ताणामुळे पुरेशी झोप न होणं, दिवसातून बऱ्याचदा कॉफी, धूम्रपान, आठवड्यातून चार-पाच वेळा मद्यपान आणि शून्य व्यायाम, हा त्याचा रोजचा एकूणच दिनक्रम होता.
हे समजून घेणे गरजेचे आहे की, शरीरात जोश नसेल, सतत थकवा जाणवत असेल, पुरेसा व्यायाम आणि विश्रांती होत नसेल आणि वर त्याला व्यसनांची जोड असेल तर कामजीवन उत्तम राहावं अशी अपेक्षा करणं अत्यंत चुकीचं ठरतं.
कारण लैंगिक आरोग्य हा शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा एक महत्त्वाचा पैलू आहे.
होमिओपॅथिक उपचारांचा विचार करता, आधी आपण ताणाखाली आहोत. आपली जीवनशैली तणावग्रस्त आहे. हे मान्य करायला हवं. संसारातल्या करिअरच्या बाकी सगळ्या आशा-आकांक्षा प्रमाणेच उत्तम “काम(सेक्स)” ही देखील एक गरज आहे. ज्या व्यक्तीचं काम जीवन सुरळीत असते, तो इतर गोष्टीतही आनंदी-समाधानी असतो. त्यामुळे ताणाचा परिणाम सहज जीवनात सहज जीवनावर होतोय हे जाणवत असल्यास होमपेथिक उपचार घ्यायला हवेत.
ताणामुळे लैंगिक समस्या उद्भवल्या असल्यास योगा, प्राणायाम या व्यायाम प्रकारांमुळे मन शांत होण्यास, तणाव कमी करण्यास फायदा होतो, पण त्याचबरोबर होमिओपॅथिक उपचारांची जोड देणे ही अत्यंत आवश्यक आहे.
संसार म्हटलं की, कधी नातेवाईकांमुळे, नोकरी व्यवसायातल्या चढ-उतारांमुळे, तर कधी कधी परिस्थितीजन्य कारणांमुळे, चिंता-ताण असणार हे गृहीत धरायला हवं आणि या ताणाचे व्यवस्थापन करायला शिकायला हवं. जे होमिओपॅथीने शक्य आहे.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, त्या ताणाच ओझं सतत बाळगण्याने बाळगल्याने ते कमी होणार नाही, हे समजून घ्यायला हवं. यासाठी गरज आहे ती,जोडीदाराचा विचार करण्याची, शांतपणे जगण्याची आणि एकूणच आयुष्याकडे रसिकतेने बघण्याची !!!
ही दृष्टी बदलण्याची शक्ती होमिओपॅथिक उपचारांमध्ये निश्चितपणे आहे. ज्याने आपला ताण आटोक्यात राहू शकतो आणि कामजीवन आनंदमय होऊ शकतं.
डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ) HHF,ICR Kolhapur,
चैतन्य होम्योपैथिक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4
शाहुपुरी व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123
रविवारी बंद
कृपया पुढील लेख वाचा –—
Both Nihar and Gauri are “College Sweet Hearts”. After being in a relationship for four-five years, when the time came to take a decision regarding marriage, Nihar was more worried and stressed than happy. He seemed to be sure that, the family would never approve of his marriage as Gauri was not a “self-caste” and it happened exactly as he expected. He was strongly opposed by his family.
Now, there are only two options left, either to bow down to the opposition of the family or to marry Gauri regardless of the family’s wishes. Then he chose another option, married Gauri and was literally thrown out of the house by the family. broke up with him. Although there was a possibility that his family members would act like this, he was shocked that they also took ‘quick action ‘.
It was the first night of this newly married couple. The tension on the mind when the blood relatives broke up turned on the body and on the first night he developed the problem of ‘Sexual Erection’ . This caused him to develop Anxiety about Sexual Performance . Due to excessive Stress and constant worry about not being able to “Sex”, he developed diabetes .
Three years after their marriage, when Nihar and Gauri went to see a Psychiatrist and Sex Therapist for treatment, his Erectile problems persisted. Also the Libido was reduced. Both of them were thinking of getting a divorce due to the failure of their relationship . Psychiatrist and Sex Therapist treatment were also unsuccessful .
He came to Chaitanya Clinic once as a last resort he was referred to me by his close relative who was cured by Homoeopathic Medicine to consult a Homoeopathic Doctor before divorce. Though it was too late for him, he got treatment in time by making a wise decision to go to aHomoeopathic specialist . Today they are living a happy life .
An experience shared by a psychiatrist says, “It is not a newly married couple’s problem but various types of stress are having a big impact on the couple’s “work life” (sex) .
Stress is defined by the World Health Organization as “the mental state of constant worry or test caused by a difficult situation” .
The characteristic of stress is that it is not visible to the naked eye; But it is a puddle inside that person.
“Sexual health is an important aspect of Physical and Mental Health. If the Sex life is impaired because of it, it is very likely that one or both partners in the same couple are responsible for stress. Many couples do not talk about these things because of too much Anxiety. There are many examples of it going as far as it goes. So if couples have such problems, it is important to admit it and consult aHomoeopathic specialist on time. How stress directly affects marital co-existence and how to manage it with proper planning becomes essential in today’s fast paced and competitive era. Which is 100 percent possible with Homoeopathic Treatment .”
In a scientific study, the researchers, in their study Chronic Stress & Sexual Function in Women, how does stress affect the Sexual Function of women ? Searched for it. Although research has previously shown that stress adversely affects Reproductive Capacity , how exactly does stress affect a woman’s sexual response ? The main objective of the researchers was to investigate this.
According to him, ” The higher the amount of Stress in the body, the lower the amount of Genital Sexual arousal.”
It is clear from this research that in women under constant Stress, the level of the hormone “cortisol ” is high, and Mental instability also results in decreased libido .
According to a Sexologist, “an important pre-condition for intercourse is that your state of Mind should be completely Calm at that time. Any Fear, Worry, Anxiety, haste in the Mind during sex has a direct effect on Sexual performance. Because when the Mind is Anxious, it can become sexually aroused.” No. “Orgasam” is also something to be experienced. If the Mind is not steady, the feeling cannot come fully. If the Mind is worried about men for any reason or is worried about Sex, Sexual erection cannot be achieved. It is very important for couples to understand that often all their Sexual problems are rooted in stress.”
From the story of the novel “A Sexless Marriage” it is noticed that the desire for Sex slows down due to the Stress due to different responsibilities in the world after marriage.
The heroine of this story is busy raising two children in her life. For some reason she suddenly feels strongly that she is physically separated from her husband. Will this result in estrangement of husband and wife, extramarital affairs, divorce at times ? Such questions begin to torment her. Are we worn out by age, busyness at home and our habit of neglecting ourselves ? Does your husband not feel attracted towards you ? Such questions are tormenting her. She realizes that she should talk to her husband, communicate freely. But she is extremely hesitant to talk about sex with her own husband. Because there is an unwritten rule of western society that after having children and crossing forty, you should not talk about this topic.
This is a funny story about how to manage different stresses in the world. With a slight difference, we also feel the same condition of couples .
According to a Gynecologist and Sex therapist , ‘Stress is like the name of our life. We just need to check again and again how much we are allowing it to affect our Work, Relationship, Co-life. When couples come to treatment for Sexual problems, they say, ‘We don’t fight aggressively…but why is “she” acting like this ? Why did ‘he‘ say the opposite ? We constantly argue over such small things. After going to bed with such arguments, intimacy cannot be achieved. Because the mind is not calm.’
In the Post-Corona era, the new shift to working from home has seen husbands and wives together all day in many households. Therefore, it has been highlighted that the tension in this relationship is increasing .
Considering the remarkable years of human evolution, men and women living together under one roof for so long was a novelty. Till now we had joint family system, now a couple has to play different roles like Lover, Friend, Counselor, Financial advisor. This creates terrible stress. The higher the mountain of expectations of the partner, the greater the stress. As stress is a killer for beauty, it has an adverse effect on work life.
Due to Corona, many people’s finances have been disrupted. The Stress caused by the Financial crisis is also a major threat to the Sex life .
I had a couple on regular medication. The financial condition of this family was good. In the meantime the drug was discontinued as the patient remained in good health. But in that family, that man had to close down his business and take up a traveling job due to a big loss in the business during the Corona period. So both were very stressed. As a result, the husband’s blood sugar spiked and his desire to work decreased.
“Stress is as much Mental as it is Physical. Couples who eat out all the time, their bodies are always under Stress. It directly affects their digestion, sleep and overall physical well-being. What kind of reading do we do ? How much screen time ? Bedtime.” Many Sex therapists have observed that do you watch T.V., mobile phones till the moment ? This also has an adverse effect on Physical, Mental and Sexual Health.”
I have a case of a 35 year old man. He is an IT young man who was suffering from ‘Low Libido and Erectile Dysfunction’ . Lack of sleep due to constant stress, coffee several times a day, smoking, drinking four to five times a week and Zero Exercise, was his overall daily routine .
It is important to understand that if the body lacks vigor, is constantly tired, does not get enough exercise and rest, and has addictions, then it is very wrong to expect a good work life.
Because Sexual Health is an important aspect of Physical and Mental Health .
When it comes to Homoeopathic remedies, first we are stressed. Our lifestyle is stressful. This should be accepted. Like all other career aspirations in the world, good “Sex” is also a necessity. A person whose Sex-life is smooth is also happy in other things. Therefore, if you feel that stress is affecting your life easily, you should take Homoeopathic treatment .
If Sexual problems are caused due to Stress , Yoga, Pranayama exercises are beneficial to calm the Mind and reduce Stress, but at the same time adding Homoeopathic treatment is very necessary.
In life, sometimes due to relatives, ups and downs in job and business, and sometimes due to situational reasons, we should assume that there will be Stress and Anxiety and we should learn to manage this Stress . Which is possible with Homoeopathy.
Most importantly, we need to understand that carrying the same burden over and over will not reduce it. For this, it is necessary to think of the spouse, to live peacefully and to look at life in general with interest !!!
Homoeopathic remedies definitely have this vision-changing power. Which can keep your stress under control and make your Sex-life happy.
Dr Ajay Hanmane
M.D.(Homeo)HHF,ICR Kolhapur,
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4,
Bhaskar Plaza Vyapari Peth,
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
Mobile No. 7738667123
Sunday Closed.
Please Read Next Article–
ReplyForward
|
ReplyForward
|