लैंगिक संसर्गावर होमिओपॅथिक उपचार / Homoeopathic Treatment of Sexually Transmitted Infections 

Dorctor Pic By Dr. Ajay HanmaneFebruary 3, 2024 Female Problems Homeopathic and Cure Sexual Problems

लैंगिक संसर्गावर होमिओपॅथिक उपचार

 

सेक्स संदर्भात एकूण समाज म्हणून आपल्यामध्ये शास्त्रीय माहितीचा खूपच अभाव आहे. वास्तविक ” एसटीडी “ ही  ” सेक्शुली ट्रान्समिटेड डिसीज (Sexually Transmitted Diseases)”  अर्थात वेगवेगळ्या लैंगिक आजारांना उद्देशून असलेली संज्ञा आहे.

 

लैंगिक आजार म्हटलं की, देखील आपली मजल ‘ एच आय व्ही ‘ च्या पुढे जात नाही. पण ‘ एच आय व्ही ‘ इतकेच गंभीर किंवा योग्य औषधोपचारांनी बरे होणारे इतर अनेक ” एसटीडी “आजार आहेत त्यांची माहिती लैंगिकदृष्ट्या सक्रिय असलेल्या प्रत्येक जोडप्यास असणं आवश्यक आहे.

विवाहबाह्य संबंधांचे प्रमाण वाढतंय का ?

मुळात विवाह बंधनात अडकल्यावर ही त्रयस्त व्यक्तीबद्दल आकर्षण वाटण्याची अनेक कारणे आहेत.

त्यामुळे होणारे संसाराची फरपट ही आपण हेही सर्वांना माहीत आहे.

 

मात्र विवाहबाह्य संबंधांची व्याप्ती केवळ जोडीदाराची फसवणूक इतकीच मर्यादित नसून, असुरक्षित लैंगिक संबंधांचे पर्यवसान वेगवेगळ्या लैंगिक आजारांमध्ये सेक्शुली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स (Sexually Transmitted Infectious)होऊ शकतं याची जाणीव किती लोकांना असते हा प्रश्न आहे.

 

त्यामुळेच विवाहबाह्य संबंध इतकाच महत्त्वाचा विषय हा त्यातून उद्भवणाऱ्या शारीरिक आजारांचा ठरतो.

 

माझ्याकडे येणाऱ्या एका पेशंटचे उदाहरण मी देत आहे. एक 30 ची घटस्फोटीत स्त्री उपचारांसाठी आली. ती लवकरच दुसरं लग्न करणार होती, पण तिला पाळी दरम्यान होणारा तीव्र स्वरूपाचा रक्तस्त्राव ही समस्या होती. वेगवेगळ्या औषधोपचारांनी ही तिचा आजार हा बरा होत नव्हता. तिला आतल्या अंगाला सूज येणारी पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज (Pelvic Inflammatory Disease) असल्याचं निदान झालं. तिच्या गर्भाशयात मोठ्या प्रमाणात जंतुसंसर्ग झाला होता. विशेष म्हणजे तिच्या घटस्फोटाला चार वर्षे झाली होती आणि दरम्यानच्या काळात तिचे अन्य कुठल्याही पुरुषाबरोबर शरीर संबंध आले नव्हते. त्यामुळे तिला झालेल्या जंतूसंसर्गाचे कारण उलगडत नव्हतं. पण ते तिच्या आधीच्या पतीच्या स्वैरलैंगिक वर्तनात असल्याचे लवकरच निदान झालं. तीनं घटस्पोट देण्याचं मुख्य कारण हे नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध हे होतं.

 

म्हणजे, ” कोणत्याही उपचारांची दिशा ठरवताना रुग्णाचा पूर्व इतिहास महत्त्वाचा ठरतो. या प्रकरणात पतीचे किमान तीन- चार स्त्रियांबरोबर संबंध होते. ही महत्त्वाची बाब रुग्णांनं सांगितली नव्हती.

बऱ्याचदा लैंगिक आजाराचा संसर्ग झाल्यावर काही काळ ती निद्रावस्थेत (Dormant) राहू शकतात. त्यामुळे असुरक्षित लैंगिक संबंध ठेवल्यावर पुढच्या काही दिवसात काही शारीरिक त्रास न झाल्यास लैंगिक आजाराची भीती संपली अशा परस्पर निष्कर्षावर येणं चुकीचं ठरतं.

या केसचा विचार करता त्या स्त्रीबरोबर बरच तिच्या आधीच्या पतीने उपचार घेणे आवश्यक ठरतं .”

 

विवाहबाह्य शारीरिक संबंध टाळणे तर आवश्यक आहेत पण विवाहपूर्वी एकापेक्षा अधिक लैंगिक जोडीदार असल्यास लैंगिक आजारांच्या प्रादुर्भावाचा धोका बळावतो  हा मुद्दा अधोरेखित करणे गरजेचे आहे.

 

” एखाद्या व्यक्तीला लैंगिक आजार आहे की नाही हे बऱ्याचदा त्याच्या बाहेर रूपावरून कळत नाही. त्यामुळे लैंगिक संबंधाच्या वेळी निरोध वापरून अत्यावश्यक ठरतं. पण निरोध वापरल्याने केवळ जननेंद्रियांना थेट संपर्क टाळतो पण वेगवेगळ्या लैंगिक आजारांमध्ये जननेंद्रियान व्यक्तिरिक्त शरीराच्या अन्य भागात ही पुरळ येणं, मसं येणं, बुरशी सदृश्य जंतुसंसर्ग होण, अशी लक्षणे असतात आणि लैंगिक संबंध दरम्यान त्याचा प्रादुर्भाव दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतो. त्यामुळेच पूर्व लैंगिक पूर्व इतिहास माहीत नसलेल्या कोणाही त्रयस्थाबरोबर चे नैसर्गिक संबंध हे लैंगिक दुखण्याला आमंत्रण देणारे ठरू शकतात म्हणूनच संयम खबरदारी महत्त्वाची ठरते.”

 

जोडीदाराच्या एकनिष्ठतेवर आपला पूर्ण विश्वास असल्याने आपल्याला लैंगिक आजाराचा धोका नाही असं विवाहित त्यांना वाटत असलं तरी वस्तुस्थिती वेगळी असू शकते. हपिऀस (Herpis), Human Papilloma Virus (ह्यूमन पपिलोमा व्हायरस-एचपीव्ही) यासारख्या आजारांचे विषाणू अनेक वर्ष शरीरात निद्रित अवस्थेत राहू शकतात.हा मुद्दा एका वैद्यकीय पोर्टलवर अधोरेखित करण्यात आला आहे.

 

“एचपीव्ही “संदर्भात सध्या जनजागृती सुरू असून, बारा वर्षांपुढील मुला-मुलींना या विषाणूची लस देण्याचं आव्हान डॉक्टरांकडून करण्यात येत याचं मुख्य कारण म्हणजे एचपीव्ही  (HPV)विषाणूमुळे स्त्रियांना गर्भाशय मुखाचा कर्करोग होण्याची शक्यता असते.

 

माझ्याकडे अजून एका पेशंट बद्दल अनुभव मी नमूद करतो. त्या स्त्रीचे वय 58 वर्ष होतं. ओटी पोटात होणाऱ्या वेदना आणि रजोनिवृत्ती उलटून पाच एक वर्ष झाल्यानंतर योनीमार्गातून सुरू झालेला तीव्र स्वरूपाचा रक्तस्राव ही त्यांची मुख्य समस्या होती. त्यांना होत असलेल्या वेदनांमुळे त्यांची तपासणी करणे अवघड जात होते.

त्यांचं लग्न वयाच्या 14 वर्षे झालं होतं. तर मूल साधारण अठराव्या वर्षी झालं होतं. त्यांच्यात आणि पतीमध्ये साधारण दहा वर्षाच्या अंतर होतं. लग्न झालं तेव्हा त्यांचं वय लहान असल्यामुळे पहिला शरीर संबंध लग्नानंतर दोन एक वर्षांनी घडला होता. ही सगळी पार्श्वभूमी सांगण्याचे कारण म्हणजे वेगवेगळ्या तपासण्यांमधून त्यांना गर्भाशय मुखाचा कर्करोग झाल्याचं निदान झालं. त्याचं मूळ हे वयातल्या मोठ्या अंतरामुळे किंवा अन्य काही कारणांमुळे त्यांच्या पतीने केलेल्या विवाहबाह्य संबंधात होतं. त्यांना पतीकडून “एचपीव्ही “ ची लागण झाली होती.

 

दुसरीकडे या वयात डॉक्टर जननेंद्रियाची तपासणी करणार, याचा संकोच, लाज, भीती यामुळे होईल तोवर या स्त्रीने दुखणे अंगावरच काढलं होतं. परिणामी हा कर्करोग चांगलाच फोफावला होता आणि दुखणं त्यांच्या जीवावर भेटण्याची शक्यता निर्माण झाली होती.

 

 

डॉक्टर विठ्ठल प्रभू लिखित “निरामय कामजीवन” या पुस्तकात, असुरक्षित शरीर संबंधातून संक्रमित होणाऱ्या लैंगिक आजारांमध्ये एचआयव्ही (HIV) हिपटायटिस बी (Hepatitis B)

गोनोऱ्हिया (Gonorrhoea), सिफिलिस (Syphilis),शॅंक्राईड (Chancroid) व्हेनेरियल वॉर्ट (Venerial Wart), हर्पिस जेनिटालिस (Herpis Gentiles) आणि बुरशीजन्य (Fungal Infection) संसर्गाचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे.

जननेंद्रियांवर होणाऱ्या जखमा,पस, लघवी दरम्यान होणारी जळजळ. जननेंद्रियांवर येणारी सूज, अन्य अवयवांवर येणाऱ्या गाठी, मसं, पुरळ ही बहुतेकदा आजारांची जंतू संसर्गाची लक्षणे असतात.

 

माझ्या एका ओळखीच्या ग्रामीण भागातल्या एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात, पॅथॉलॉजी विभागात कार्यरत असलेल्या डॉक्टरशी बोलण्याचा योग आला. त्यांच्या महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयाद्वारे परिसरातल्या शेकडो गावांना माफक दरात वैद्यकीय उपचार पुरवले जातात. त्या लॅब मध्ये दरमहा एचआयव्ही (HIV) हिपटायटिस बी (Hepatitis B) च्या सरासरी अडीच ते तीन हजार चाचण्या होतात. तर सिफिलिस दीड ते दोन हजार चाचण्या होतात. कोणत्याही शस्त्रक्रिये पूर्वी तसेच प्रसूतीपूर्वीही या गंभीर आजारांच्या चाचण्या होत असल्याने हा आकडा लक्षणीय असू शकतो असं गृहीत धरलं तर या चाचण्यांमधून प्रत्यक्ष आजाराचा निदान होणाऱ्या म्हणजेच “पॉझिटिव्ह” रुग्णांचे प्रमाण हे काळजी करण्यासारखं आहे.

जानेवारी ते ऑक्टोबर 2023 अशी चालू वर्षातील आकडेवारी त्यांनी संकलित करून दिली. त्यानुसार गेल्या दहा महिन्यात एका रुग्णालयात एचआयव्ही (HIV) हिपटायटिस बी (Hepatitis B)सिफिलिसच्या नवीन रुग्णांचं निदान 10℅ तेवढं होते.

एका खाजगी रुग्णालयातील ही आकडेवारी असेल तर सरकारी रुग्णालयातील आकडेवारी यापेक्षा निश्चित अधिक असणे शक्यता आहे.

आज लोकांमध्ये ” एसटीडी “ची भीती राहिलेली नाहीये, कारण गोनोऱ्हिया (Gonorrhoea), सिफिलिस (Syphilis) या लैंगिक आजारांवर प्रभावी औषध उपलब्ध आहेत. सिफिलिस (Syphilis) वर उपचार न केल्यास पुढच्या स्टेजमध्ये त्याचा हृदयावर, मेंदूवर परिणाम होत असला तरी वेळीच निदान झाल्यास काही दिवसांच्या प्रतिजैविकानं (अँटिबायोटिक) रोग्याला आराम मिळू शकतो. हपिऀस (Herpis), Human Papilloma Virus (ह्यूमन पपिलोमा व्हायरस-एचपीव्ही) एचआयव्ही (HIV) हिपटायटिस बी (Hepatitis B), हे विषाणूजन्य संसर्ग एकदा झाल्यास आयुष्यभर सोबत राहत असले तरी गंभीर आजारांवर उपचार उपलब्ध आहेत.

होमिओपॅथीमध्ये सुद्धा या सर्व लैंगिक आजारांवर अत्यंत गुणकारी औषध उपचार आहेत.

 

“ओपन मॅरेज आणि मुक्त नातेसंबंध” हा आजच्या युगाचा

ट्रेंड मांनला तरी स्वातंत्र्याबरोबर (Freedom) येणाऱ्या जबाबदारीचे (Responsibility) भान प्रत्येकाने ठेवण्याची गरज आहे.

तुम्ही ‘ओपन रिलेशन ‘मध्ये असाल तर दर तीन महिन्यांनी “एसटीडी स्क्रीनिंग चाचणी ” करायलाच हवी.

याशिवाय कुठल्याही नवीन जोडीदाराबरोबर शारीरिक जवळीक साधण्यापूर्वी दोघांनीही चाचणी करून घेऊन, दोघांमध्ये कोणते लैंगिक संसर्ग नाही आहेत ना ! याची खात्री करून घेणे गरजेचे आहे.

सरकारी रुग्णालयांबरोबरच,आता खाजगी लॅब मध्ये ही या चाचण्या केल्या जातात.

याशिवाय असुरक्षित लैंगिक संबंध आल्यास त्वरित तज्ञ डॉक्टरांकडे जावं.

” एचपीव्ही ” सह (Human Papilloma Virus- ह्यूमन पपिलोमा व्हायरस) अनेक लैंगिक संसर्गावर आज लस उपलब्ध असून “मुक्त नाते संबंधात ” असणाऱ्या प्रत्येकाने त्या घेणे आवश्यक आहे,असं मेडिकल शास्त्र म्हणते.

 

एका कथासंग्रहातल्या “अनोळखी” या कथेची नायिका असलेली ‘आजी ‘अमेरिकेतील नातीच्या स्वैर वर्तनाविषयी चिंतन करताना म्हणते,

” मुक्त आयुष्य जगण्याच्या या कल्पना कोणत्या ?

स्वातंत्र्याच्या, मजेच्या की उपभोगाच्या !!

हे सुख, आनंद म्हणायचं तरी कसलं !!

केवळ शरीराशी संबंध असणार ?

एकमेकांना आजमावायचे ते या शरीराच्या माध्यमातून, ना त्यातून निर्माण होणाऱ्या कसल्याही नात्यांची शाश्वती, ना मागे उरणारे बंध…..

आयुष्य आपलं, आपल्याच मालकीचं असतं खरं; पण त्याच्याशी इतकं स्वातंत्र्य घेऊन खेळता येतं ?

तेवढा आपला आपल्या आयुष्यावर तरी अधिकार असतो का ?”

लैंगिक सुखाच्या क्षणिक मोहापाई एवढं आयुष्य पणाला लावण्यापूर्वी प्रत्येकाने थांबून विचार करायला हवा आणि हा विचार करण्याची सद्बुद्धी निश्चितपणे देण्याची ताकद होमिओपॅथिक औषधांमध्ये आहे.

 

असुरक्षित संबंधातून निर्माण होणारे लैंगिक आजारांवर अत्यंत गुणकारी अशी होमिओपॅथिक औषधे आहेत. त्या उपचारांमुळे रुग्णांची शारीरिक तसेच मानसिक स्थिती पूर्णपणे आरोग्यदायी होऊन प्रतिकारशक्ती वाढते.

त्याचप्रमाणे जंतुसंसर्गामुळे झालेले दुष्परिणाम देखील निश्चितपणे पूर्णपणे बरे होऊ शकतात.

 

लैंगिक आजार बरे झाल्यानंतरही अनेकदा रुग्ण वेगवेगळ्या समस्या समस्यांनी परिणामांनी त्रस्त असतो. तसेच जननेंद्रियावर गाठी, मसं, जनायटल वॉर्ट किंवा शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी वॉर्ट उठणे,चामखीळ उठणे तसेच विषाणूजन्य संसर्ग- एकदा झाल्यास आयुष्यभर सोबत राहत राहतात यावर देखील उत्कृष्ट गुणकारी होमपेथिक औषधे उपचार आहेत.

 

लैंगिक संसर्ग म्हणजे ‘एचआयव्ही-एड्स’, या आपल्या मर्यादित ज्ञानापलीकडेही स्वैरलैंगिक संबंधातून पसरू शकणारे अनेक आजार आहेत. त्यांचे वेळीच निदान झाल्यानंतर व होमिओपॅथिक उपचारांमुळे पुढील गुंतागुंत टाळणं सहज शक्य आहे.

 

क्षणिक मोहाच्या प्रसंगी लैंगिक संसर्गाबद्दल भान मनात असणं आणि त्या दृष्टीने योग्य ती काळजी घेणे आवश्यकच ठरतं, कारण “एकाचा मोह “ त्याच्यासह जोडीदाराच्या वेदनेचे कारण म्हणू शकतो. पण काळजी घेतल्यास, त्याचबरोबर होमिओपॅथिक उपचार घेतल्यास जोडीदाराबरोबर आनंदाने, समाधानाने लैंगिक संबंध पुन्हा ठेवता येणे सहज शक्य होतं. 

डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ) HHF, ICR Kolhapur,
चैतन्य होम्योपैथिक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4, HDFC बॅंकेजवळ,
शाहुपुरी व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123
रविवारी बंद

कृपया पुढील लेख वाचा  —

—————————————————–

Homoeopathic Treatment of Sexually Transmitted Infections

 

We, as a society as a whole, lack Scientific knowledge when it comes to Sex. Actually ” STD” is a term referring to “Sexually Transmitted Diseases”.

 

When we say Sexual Disease, our floor does not go ahead of ‘ HIV ‘. But every Sexually active couple should know that there are many other STDs that are as serious as HIV or can be cured with proper medication.

Is the rate of extramarital affairs increasing ?

Basically, there are many reasons to feel attracted towards this afflicted person after getting married.

We all know that this is the chaos of the world.

 

However, the extent of Extramarital Affairs is not limited to cheating on the spouse, unprotected sex leads to various “Sexually Transmitted  Infectious”. The question is how many people are aware that it can happen.

 

That is why Extramarital Affairs are as important as the physical ailments that arise from them.

 

I am giving an example of a patient who comes to me. A 30-year-old divorced woman came for treatment. She was about to marry again soon, but her heavy Menstrual Bleeding was a problem. Her disease was not cured by different medicines. She was diagnosed with Pelvic Inflammatory Disease . Her uterus was heavily infected. Interestingly, it had been four years since her divorce and during that time she had not had physical relations with any other man. Therefore, the cause of her bacterial infection was not revealed. But it was soon diagnosed as her previous husband’s  homosexual behavior . The main reason for giving Divorce was the husband’s Extramarital Affairs.

 

That is, “The previous history of the patient is important while deciding the direction of any treatment. In this case, the husband had relations with at least three to four women. This important fact was not mentioned by the patient.

Often, after being infected with a Sexually Transmitted Disease, they can remain dormant for some time. Therefore, it is wrong to come to a mutual conclusion that the fear of Venereal disease is over if there is no physical discomfort in the next few days after having unprotected Sex.

Considering this case, it is necessary to treat the woman as much as her ex-husband.”

 

It is important to avoid extramarital sexual relations, but it is important to emphasize that having more than one Sexual partner before marriage increases the risk of contracting Sexually Transmitted Disease.

 

“It is often not known whether a person has a Sexually Transmitted Disease, or not from its external appearance. Therefore, it is essential to use abstinence during Sexual Intercourse. But using abstinence only avoids direct contact with the genitals, but in different Sexual diseases, the genitals are characterized by rashes, warts, fungus in other parts of the body. A similar infection has similar symptoms and can be passed on to another person during intercourse. This is why natural intercourse with a triad with no known prior Sexual history can invite painful intercourse, which is why abstinence is important.”

 

Although married people feel that they are not at risk of Sexually Transmitted Disease, because they have full faith in the fidelity of their partner, the living situation may be different. Viruses of diseases like Herpes, Human Papilloma Virus (HPV) can remain dormant in the body for many years. This issue has been highlighted on a medical portal.

 

Public awareness regarding “HPV” is currently ongoing, and the main reason why doctors are challenging to give this virus vaccine to boys and girls after the age of twelve is that women are likely to develop cervical cancer due to HPV virus.

 

Let me mention one more experience I had with a patient. The age of the woman was 58 years. Her main problems were Lower abdominal pain and severe vaginal bleeding that started five years after Menopause. The pain they were experiencing made it difficult to examine them.

He got married at the age of 14. The child was born at the age of eighteen. There was a gap of about ten years between her and her husband. Since they were young at the time of marriage, the first sexual intercourse took place two and half years after marriage. The reason for telling all this background is that she was diagnosed with cervical cancer after various tests. Its origin lies in the extra-marital affair of her husband due to the great age gap or some other reason. She was infected with “HPV” from her husband.

 

On the other hand, at this age, the doctor will examine the genitals, because of hesitation, shame and fear, this woman took out the pain on her body. As a result, the Cancer had spread well and the pain was likely to kill him.

 

 

In the book “Niramaya Kamajivan” “निरामय कामजीवन”written by Dr. Vitthal Prabhu, among the Sexually Transmitted Disease, transmitted through unprotected sex are HIV, Hepatitis B.

Gonorrhoea, Syphilis, Chancroid, Venereal wart, Herpes Genitalis and Fungal infection are mainly included.

Genital lesions, pus, burning during urination. Swelling on the genitals, tumors on other organs, warts, rashes are often symptoms of bacterial infection.

 

I happened to speak to a doctor working in the pathology department of a private medical college in a rural area of ​​my acquaintance. A hospital attached to his college provides medical treatment to hundreds of villages in the area at a modest cost. An average of two and a half to three thousand tests for HIV and Hepatitis B are conducted in that lab every month. While Syphilis, one and a half to two thousand tests are done. Considering that this number can be significant as tests for these serious diseases are carried out before any surgery and also before delivery, the number of patients who are actually diagnosed with the disease, i.e. “Positive” from these tests, is a matter of concern.

He compiled the statistics for the current year from January to October 2023. Accordingly, in the last ten months in one hospital, the diagnosis of new patients of HIV, Hepatitis B , Syphilis was 10℅.

If this is the figure in a private hospital, the figure in a Government Hospital is likely to be definitely higher.

Today, people are no longer afraid of ” STD “, because effective drugs are available for Sexually Transmitted Disease, such as Gonorrhea and Syphilis . If Syphilis is not treated, it affects the Heart and Brain in the next stage, but if it is diagnosed on time, the patient can get relief with a few days of antibiotics. Herpes, Human Papilloma Virus (HPV), HIV, Hepatitis B , this viral infection can last a lifetime, but treatment is available for serious diseases.

Homoeopathy also has very effective drug treatment for all these Sexually Transmitted Disease.

 

“Open Marriage and Open Relationships” {“ओपन मॅरेज आणि मुक्त नातेसंबंध”} of Today’s Era

Regardless of the trend , everyone needs to be aware of the Responsibility (जबाबदारी) that comes with freedom (स्वातंत्र्य).

If you are in an ‘ open relationship ‘ then you must have an ” STD Screening Test” every three months.

Apart from this, before having Physical Intimacy with any new partner, both of them should be tested to make sure that there are no Sexually Transmitted Infections between them ! It is necessary to ensure this.

Apart from Government Hospitals, these tests are now conducted in Private Labs.

In addition, in case of unprotected sex, one should immediately go to a specialist doctor.

Medical science says that vaccines are available against many Sexually Transmitted Infections including HPV (Human Papilloma Virus) and everyone who is in ” Open Relationship ” should take them.

 

‘ Aji (Grand Mother)’, the heroine of the story “The Stranger” in a collection of stories, reflects on the arbitrary behavior of her grandson in America and says,

“What are these ideas of living a free life?

Freedom, fun or enjoyment !!

How can you say happiness and joy !!

Will only be related to the body ?

They used to test each other through this body, neither the permanence of any relationship arising from it, nor the bonds left behind…..

It is true that life belongs to us; But can he be played with so much freedom ?

Do we have that much right over our lives ?”

Everyone should stop and think before risking so much life for the momentary luxuries of Sexual Pleasure, and Homoeopathic Medicines certainly have the wisdom to think.

 

Homoeopathic Medicines are very effective in treating Sexually Transmitted Diseases. Due to these treatments, the Physical and Mental condition of the patients becomes completely healthy and the immunity increases.

Likewise, the side effects caused by the infection can definitely be cured completely.

 

Even after curing the Venerial Disease, the patient often suffers from various problems and consequences. There are also excellent Homoeopathic remedies for General warts, Genital warts or Tumors at different places on the body,  and viral infections – once they stay with you for life.

 

Beyond our limited knowledge of the Sexually Transmitted Disease ‘HIV-AIDS’, there are many diseases that can be spread through Homo-Sexual Intercourse.
After their timely diagnosis and Homoeopathic treatment, further complications can easily be avoided.

 

In case of temporary temptation, it is necessary to be aware of Sexually Transmitted Infections and take proper care in this regard, because “One’s Temptation” can cause the pain of the partner along with it. But if care is taken, along with Homoeopathic Treatment, it is possible to resume Sexual Relations Happily and Contentedly with the Life-Partner.

 

Dr Ajay Hanmane
M.D.(Hom) HHF, ICR Kolhapur,
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4, Near HDFC Bank,
Bhaskar Plaza Vyapari Peth,
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
Mobile No. 7738667123
Sunday Closed.

Please Read Next Article-