टॉन्सिल्सवर होमिओपॅथिक उपचार
आपल्या श्वसन संस्थेचे नाक, घसा, श्वसननलिका व फुफ्फुसे हे मुख्य भाग आहेत. लहान मुलांमध्ये आढळणाऱ्या घशाच्या विकारांबद्दल माहिती करून घेणार आहोत.
श्वसन मार्गाला काही जिवाणूमुळे (बॅक्टेरियल इन्फेक्शन- Bacterial Infections) तसेच काही विषाणूमुळे (व्हायरल इन्फेक्शन्स-Viral Infection) जंतुसंसर्ग होतो. काही वेळा जीवाणू तसेच विषाणू या दोन्हींमुळे एकाच वेळेस जंतुसंसर्ग होतो. घशाच्या विकारांपैकी टॉन्सिल्सने जंतूसंसर्ग होणे (टॉन्सिलायटिस- Tonsillitis) हा लहान मुलांमध्ये सर्वात जास्त आढळणारा विकार आहे.
याची कारणे —
ॲडिनोव्हायरस (Adenovirus), ई.बी.व्हायरस (E.B.Virus) , स्ट्रेप्टोकोकस पायोजिनीस (Streptococcus Pyogenes) इत्यादी सूक्ष्मजीवजंतूमुळे (Micro-organisms) जंतुसंसर्ग होतो. धुरामुळे आणि प्रखर वायूंमुळे (Irritant Fumes), त्रासदायक वाफामुळे घसा दुखण्यास सुरुवात होते.
लक्षणे —
टॉन्सिल्सना सूज येणे,
घसा दुखणे,
अंग दुखणे,
डोकेदुखी ही लक्षणे प्रामुख्याने आढळतात. याशिवाय
नाक वाहणे,
मळमळणे,
खोकला येणे,
आवाज बसणे ही लक्षणे दिसतात.
सर्वसाधारणपणे तर विषाणूमुळे जंतुसंसर्ग झाला असेल तर आजाराची सुरुवात हळूहळू होते आणि टॉन्सिल्स, फॅरिंग्जला ( Pharynx) सूज येण्याबरोबर आवाज बसणे, खोकला येणे, ही लक्षणे आढळतात.
स्ट्रेप्टोकोकस इन्फेक्शन (Streptococcus Infection) असेल तर आजाराला एकदम अचानक सुरुवात होते. ताप खूप चढतो. मानेतील लसिका ग्रंथी म्हणजे (Lymph Nodes) वाढतात. टॉन्सिल्सना सूज येते व त्या वाढतात.
घशाच्या विकारात जर वेळेवर योग्य उपचार झाले नाहीत तर गुंतागुंत (Complications)वाढते. असे झाल्यास
कान वाहने,
सायनोसाइटिस (Sinusitis),
पॅरिटॉन्सिलर ऍब्सेस (Peritonsillar Abscess),ऱ्हू
मॅटीक फिव्हर (Rheumatic Fever) ,
ॲक्युट ग्लोमॅरुलर नेफरायटीस (Acute Glomerular Nephritis), हे विकार होण्याची शक्यता असते.
उपचार–
होमिओपॅथीमध्ये घशाचे विकार झालेल्या प्रत्येक मुलांमधील वैशिष्ट्यपूर्ण लक्षणानुसार औषध देऊन प्रभावी उपचार केले जातात.
टॉन्सिल्सना जंतूसंसर्ग झाल्यावर काही मुलांना द्रव पदार्थ घेताना त्रास होतो (Liquids) तर काहींना घनपदार्थ (Solid Food) गिळताना त्रास होतो.
काही मुलांमध्ये पडजीभ (Uvula) लांब होते,
काहींमध्ये सूज येऊन पडजीभ (Uvula) मोठी होते तर
काहींमध्ये व्रण येतो.
घशाच्या विकारात (Sore Throat) काही मुलांमध्ये घशात काहीतरी अडकल्यासारखे वाटते.
तर काहींचा घसा खवखवत असतो.
काहींना सुई पोचल्यासारखे वाटते.
काही मुलांना सतत खोकला येतो तर
काहींना एका विशिष्ट वेळेच्या अंतराने खोकला येतो.
काही मुलांमध्ये आईस्क्रीम, शीतपेय असे थंड पदार्थ घेतल्यानंतर टॉन्सिल्स वाढतात तर
काहींमध्ये थंड हवेत फिरल्यामुळे, गार वारा लागल्यामुळे घसा दुखायला सुरुवात होते.
काही मुलांना कोरडा खोकला येतो तर
काहींना खोकल्याबरोबर स्त्राव (Expectoration) बाहेर पडते. काहींमध्ये स्त्राव घट्ट असतो,
काहींमध्ये पातळ असतो. तर
काही मुलांमध्ये त्याची तार येते (Stringy Discharges).
टॉन्सिल्सना सूज येण्याबरोबर काही मुलांमध्ये आवाज बसतो, बोलायला त्रास होतो तर
काहींमध्ये आवाज घोगरा होतो.
घशाचे विकार झाल्यावर काहींना सकाळी उठल्यावर जास्त खोकला येतो, तर
काही मुलांना रात्री अंथरुणावर आडवी झाल्यावर लगेच खोकला सुरू होतो.
काही मुलांना वारंवार टॉन्सिल सुजण्याचे त्रास होतो, वरचेवर खोकला येत असतो व पूर्णपणे बरा होत नाही
. या आजारामुळे काही मुलांची शाळा काही वेळा बुडते. वारंवार जंतूसंसर्ग झाल्यामुळे अशक्तपणा येतो.
रोगाचे समूळ उच्चाटन करणे हे होमिओपॅथीचे उद्दिष्ट आहे.
होमिओपॅथीक औषधे घेतल्यानंतर लहान मुलांची प्रतिकारशक्ती (Immunity) वाढते.
वारंवार होणार खोकला, टॉन्सिल्सना येणारी वारंवार येणारी सूज हे विकार होमिओपॅथीमुळे पूर्णपणे बरे होतात.