लहान मुलांमधील एकाकीपणावर होमिओपॅथिक उपचार / Homoeopathic Treatment for Loneliness in Children

Dorctor Pic By Dr. Ajay HanmaneJuly 1, 2024 Behaviour problems Children Problems Mental Health Psychiatry

 

      लहान मुलांमधील एकाकीपणावर होमिओपॅथिक उपचार

एकटेपणा वाटणं ही आंतरिक भावना, वैयक्तिक भावना आहे. ही व्यक्त केल्याशिवाय समोरच्याला फारशी  कळणारी देखील नाही. प्रौढांना आपल्या भावना, त्यांची तीव्रता, व्यक्त करून दाखवता येते. त्यासाठी लागणारा शब्दांचा साठा त्यांच्याकडे असतो. पण आपल्याला काय वाटते हे न कळणारा आणि कळलं तरी ती व्यक्त न करता येणारा समाजात एक मोठा वर्ग आहे, आणि तो म्हणजे मुलं. 
मुलं म्हटल्यावर फक्त बालकं नाही, तर किशोरवयीन मुलांचाही त्या वर्गात अंतर्भाव होतो.
‘त्यांना काय होते एकट वाटायला ? सगळं आयतं मिळतंय ! आता परिस्थिती जशी आहे तशी आहे. यांना करमायला मी कुठून आणखी माणसं आणू ?’ असा सूर घरातल्या प्रौढांचा असतो.
मुलांच्या मनानं त्यांचे भावनिक प्रश्न मोठेच असतात. त्या भावनांना हाताळण्यासाठी लागणारी कौशल्यं त्यांच्यात तोपर्यंत विकसित झालेली नसतात. त्यामुळे त्यांच्या मानसिक प्रश्नांकडे गांभीर्यांन बघण्याची गरज आहे. काही अडचणीत सापडलेली, असुरक्षित (Vulnerable) मुलं सोडता, प्रत्येक मुलाच्या आयुष्यात किमान एक प्रौढ (Responsible Adult) असतोच. मग तरीसुद्धा बालकांना एकटेपणाशी सामना करण्याची वेळ खरंच येते का ?
सोसायटीच्या आवारात संध्याकाळी होणाऱ्या किलबिलाटात सर्वात वरचा आवाज असलेला पियूष आज आवारातल्या एका बाकावर उदासपणे बसलेला होता. चेहऱ्यावर निराश भाव. डोळे पाण्याने डबलेले. त्याचा नेहमीचा निरागस चेहरा आणि आत्ताचा हात निराश चेहरा काही वेगळच सांगत होता. मी बाकापाशी जाऊन पियुषचा एक गालगुच्चा घेतला. एरवी असे केल्यावर त्याच्याकडून काहीतरी मस्तीवाली प्रतिक्रिया मिळायची, पण आज ‘सॉरी’ आपल्याच तंद्रीत होती. त्याच्याजवळ असलेल्या रुबिक क्यूब एका मिनिटात सोडवून दाखवला तेव्हा कुठे तो बोलायला लागला. ” कोणीच नाहीये माझ्याशी खेळायला…… ख्रिसमसची सुट्टी लागलीय. सगळे मित्र तर कुठे कुठे फिरायला गेलेत. बाबांना सुट्टी नाही म्हणून मी घरीच.” म्हणजे खेळायला सवंगडी नाहीत, ही गोष्ट होती तर !
 पियूषसारखी परिस्थिती असणारी मुलं-मुली बऱ्याच अंशी एकटेपणाचा सामना करत असतात. घरात आजी-आजोबा, आई-बाबा, सगळे असतात, जे मागितलं ते लगेच हजर होतं, सगळ्या घराचा केंद्रबिंदू व्हायला मिळतं,  (Centre of Attraction) तरीही समवयस्कांची, भावंडांची उणीव या सगळ्या गोष्टी भरून गोष्टी करून भरून काढू शकत नाहीत.
 संदीप खरेंच्या एका गाण्यात ही गोष्ट समर्पकपणे मांडली आहे. ” ऑफिसला जाऊ नको, म्हणून आर्जवं करणारा छोटा मुलगा आईला सांगतो की, ” मी एकटाच असतो गं ! मला कोणी दादा-ताई पण नाहीये…..शाळा, सोसायटीतले मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांची मुलं असली, तरी या “बिझी”  आयुष्यात दोन दिवसांपेक्षा जास्त वेळ कोणाकडेच नसतो. मग राहिलेल्या वेळात त्यांच्याकडे असतो तो फक्त एकटेपणा.
काही पालक म्हणतातही, ” एकत्र खेळायला कोणी मिळालं तरी कुठे खेळतात ? मारामारी, भांडणच होतात !”
पण मग याला उत्तर, ” होऊ दे की भांडण !आपणही धडपडत, कधी मारत, कधी मार खात मोठे झालेला आहोत.”
असली कारणे देऊन मुलांना खेळायला जाऊ न देणारे पालक मुलांच्या एकटेपणावरचा तात्पुरता उपायही हिसकावून घेतात. लहान मुलांच्या एकटेपणाच्या कांगोऱ्यांपैकी ‘एकुलते एक ‘ हा सर्वात ओळखीचा आणि सर्वत्र आढळणारा प्रकार. यात भर पडते ती घटस्फोटांच्या वाढत्या प्रमाणाची.
पियूषचा मित्र असलेला निनाद शेजारच्या बिल्डिंगमध्ये राहायचा.  त्याच्या आई-बाबांचा घटस्फोट झालेला होता. आई ‘आय.टी.’कंपनीत इंजिनियर होती आणि तिला त्याच्या उच्च शिक्षणासाठी काम करणं, पैसा कमावणं भागच होतं. एक बाई घरी येऊन स्वयंपाक करून जायच्या आणि एक आजी निनादच्या सोबतीला असायच्या. पण या आजी काही पियूषच्या आजीसारख्या लाड नाही करायच्या. पियूषची आजी त्याला नवनवीन खाऊ घालून द्यायची, त्याचा डबा उघडून तपासून बघायची, डबा संपवला नसेल तर रागवायचीसुद्धा. पियूषला भारी कटकट वाटायची आजीची ! पण निनादला मात्र हे सगळं सुखावून जायचं, कारण त्याच्याकडे असे प्रेमाने वागवणारी रागवणारी आजी नव्हती. घरात ‘वर्ल्ड कप’ बघायला त्याच्यासोबत बसणारे बाबाही नव्हते.
घटस्फोट घेतलेल्या जोडीदारांचा विचार समाज निश्चितपणे करतो आणि त्यांना सहानुभूती मिळते. पण घटस्फोटीत नवरा- बायकोंच्या मुलांना येणारे एकटेपण तेवढे प्रकर्षानं सामोरे येत नाही. घटस्फोटासारखी  परिस्थिती जोडीदाराच्या मृत्यूमुळे येणाऱ्या एकल पालकत्वातही दिसते. एकल पालकत्व निभावणारा पालक (मग कारण घटस्फोट असो की मृत्यू ) स्वतःच्या घरातल्या आर्थिक, ऑफिसमधल्या आणि मुलांच्या जबाबदारीनं इतका दबून जातो की, त्याच्या मुलासाठी मुलाचा एकटेपणा हा विषय प्राधान्यक्रमात पार तळाला जातो.
मूल किशोरवयीन वयात असेल तर त्याला त्याच्याबरोबर असलेल्या पालकांचं दडपण, कुचंबांना, विवंचना सगळं जाणवत असतं. त्यामुळे त्यात भर पडायला नको म्हणून ती मुलं त्यांच्या एकटेपणाशी वेडंवाकड, स्वतःच लढत राहतात. आपल्याच कोषात जात राहतात   काही वेळेला चुकीच्या संगतीत अडकतात. एकल पालकत्वातलं मूल जर वाममार्गाला गेलं, तर लक्ष ठेवायला कोणी नव्हतं, धाक दाखवायला कोणी नव्हतं, म्हणून मूल त्या मार्गाने गेलं, असा निष्कर्ष काढला जातो.
 पण कित्येक वेळा मूलं एकटेपणा घालवण्याच्या नादात पुढे आलेला हात कोणाचा आहे हे न बघताच तो हातात घेतात आणि मग चुकीच्या रस्त्यावर जातात. याचाच फायदा घेत कित्येक मुलांना गुन्हेगारीच्या रस्त्यावर नेलं जातं.
मी जेव्हा विधीसंघर्षग्रस्त बालकांचे समुपदेशन  करायचो, (यापूर्वी या मुलांसाठी ‘बालगुन्हेगार’ ही संज्ञा वापरली जायची. आज त्यांना ‘विधीसंघर्षग्रस्त बालक’ असं म्हटलं जातं) तेव्हा अशा वाटेवर चालणाऱ्या खूप जणांना घरातील पोकळी जाणवत असल्यामुळे ते बाहेरच्या समाजातल्या ‘जबाबदार ‘ प्रौढांचा शोध घेत इथपर्यंत पोहोचले आहेत असं कळलं.
तुम्ही थोडे उत्सुकता दाखवलीत, ऐकण्याची तयारी दाखवलीत, तर मुलांना खूप काही सांगायचं असतं. दर वेळेस त्यात काही महत्त्वाचं असतंच असं नाही. पण प्रौढांच्या मानानं मुलं नवनवीन अनुभव जास्त घेत असतात. त्यांचे नवनवीन नातेसंबंध निर्माण होत असतात. त्यामुळे चाललंय ते बरोबर चाललंय ना, हे समजण्यासाठी किंवा मनात निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी त्यांना एक श्रोता हवा असतो. तो स्वतः कधीही समवयस्कांपेक्षा जबाबदार प्रौढ असला, तर ते जास्त फायद्याचं असतं.
घरातल्या सदस्यांची संख्या किंवा मुलांचं मित्रमंडळ यावर आपलं नियंत्रण नसेल कदाचित; पण आपण आपल्या मुलांसाठी जबाबदार, प्रौढ, चांगले श्रोता होऊ शकतो का ?
ते फारसा अवघड नाहीये  खरं तर, पण कित्येक वेळा हातातला फोन व्हिलन बनतो ! विविध समाज माध्यमांवर एक फेरी मारायची म्हटलं, तरी 15 ते 20 मिनिटे जातात. आपल्यातला पालक आपल्याला एक बोचनी लावत  असतो. मुल काहीतरी सांगायला आलेलं होतं,पण आपण ‘रिल्स’ मध्ये बिझी होतो. समाज माध्यमांचं गारुड असं काही पसरला आहे की, आपण ही बोचणीही बोथट करून टाकतो.
परिस्थितीन कोणतेही फटके दिलेले नसताना, कुटुंबात सगळं आलवेल असतानासुद्धा आपण मोबाईलमध्ये बिझी असल्यामुळे मुलाला एकटेपणा जाणवत राहतो. अर्थात त्याच्या हातात स्वतःचा फोन येत नाही, तोपर्यंत ही परिस्थिती राहणार आहे; नंतर तोही याच वाटेवर जाणार आहे आणि मग कदाचित तो एकटेपणा तुम्हाला जाणवणार आहे. प्रत्येक परिणामामागे काहीतरी कृती असते किंवा असं म्हणता येईल की, तुम्ही जी कृती करतात त्याचा निकाल म्हणजे परिणाम असतो. 
आता आपण पुढील घरातील परिस्थिती पाहू या. या घरात तनया आणि साहिल दोन मुलं आहेत.या दोघांच्यात फक्त दोन वर्षाचा अंतर. आई पूर्ण वेळ गृहिणी, आजी-आजोबा घरात, आई नोकरी करत नसल्यामुळे मुलांना पुरेसा वेळ देत असायची. माझ्या मनात आलं की, इथं काही आपल्याला एकाकीपणा सापडणार नाही. पण बघितलं तर साहिल खूप चिडचिड करताना दिसला. घरात वस्तूंची आदळआपट करायचा. त्यांच्या घरात मला नेहमी टीव्हीच्या बाजूस एक मोठी शो-केस दिसली. शो-केसमध्ये भरपूर मेडल्स, बक्षीसं दिसत होती. थोडी चौकशी केल्यावर कळलं की, ही मेडल्स फक्त तनयाची आहेत. तनया दिसायला छान, वागायला नम्र, गोड आणि अभ्यासासह इतर कलांमध्येही निपुण. साहिल अभ्यासात जेमतेम होता. त्याला खेळणं सोडून कशातच विशेष रस नव्हता. तनया एखाद्या मेडल घेऊन आली रे आली की, बाबा म्हणायचे,“हा साहिल बदलला का गं बाळ असताना दवाखान्यात ? आपला मुलगा आहे असं वाटतच नाही! ” आठ-नऊ वर्षाच्या मुलाला तुम्ही सातत्याने अशी टोचणी लावत असाल, त्याच्याबरोबर भेदभाव करत असाल, तर त्या मुलाला अशा घरात सगळ्यांबरोबर राहून किती एकटेपणा वाटत असेल याची जाणीव असायला हवी.
पाणी न घालता एखादं रोपट जगू शकेल का ? मुलांनी या जगात तग धरून राहण्यासाठी, फुलण्यासाठी विनाशर्त प्रेम हे पाण्यासारखं काम करतं. या प्रकारचा भेदभाव पूर्वी फक्त मुलं-मुली असा होता, पण हल्लीच्या काळात मुलांनी सगळीकडेच यश मिळवलं पाहिजे याची इतकी क्रेझ आहे की, भावंडांपैकी असं यश मिळवणार मूल घरातलं ‘स्टार-कीड’ असतं. त्याला भरभरून प्रेम, प्रशंसा मिळते. दुसरं मिळ मूल प्रेम मिळवण्यासाठी धडपडत राहतं. त्याचे आदळआपट, राग, रडणं, हे एकटेपणा व्यक्त करण्यासाठीच असतं. असा भेदभाव त्वचेचा रंग, हुशारी, गुण, लिंगभेद यापैकी कशावरूनही होत असतो.
माझ्याकडे आलेल्या एका भावंडांच्या प्रकरणात घरातल्या आजीच्या मृत्यूनंतर काही महिन्यात लहान बहिणीचा जन्म झाला होता. कोणीतरी पसरवलं की, आजीच तिच्या रूपाने परत आली आहे. झालं … आता ती कुटुंबातल्या सगळ्यांची जीव की प्राण’  आहे. त्यामुळे मोठ्या भावाला कोणी भावच देत नाही . त्यांनं एकदा मला एकदा सांगितलं की, तो घरात पारदर्शक आहे. मी त्याला विचारलं, “पारदर्शक म्हणजे काय रे ?” त्यावर तो म्हणाला, “सगळे लोक मी समोर असलो,तरी माझ्या आरपार,पलीकडे उभ्या असलेल्या बहिणीशी बोलतात.” या मुलाचे बोलच त्याच्या एकटेपणातला भकासपणा किंवा गंभीरता दाखवून देतात.
एकटेपणा लहान मुलांनाही जाणवतो, पण त्याला पालकांकडून कधीच प्राधान्यक्रम दिला जात नाही.शिवाय एकटेपणा जाणवणारा मूल नेहमीच भावंड नसलेलं, एकटं असतं असं नाही. भरल्या घरातली लहान मुलंसुद्धा एकाकी असू शकतात. मुलांचं हे एकाकी पण त्यांच्या भविष्यावर नकारार्थी परिणाम करतं, हे लक्षात घेऊन पालकांनी आपल्या वागण्याचं गांभीर्यानं विचार करायला हवा.
मुलांच्या एकटेपणावर होमिओपॅथिक औषधांचा अत्यंत चांगला उपयोग होतो. त्याचबरोबर काही उपाय करणेही गरजेचे आहे.
पहिली गोष्ट म्हणजे यावर 100% असा काही हमखास उपाय नाही. प्रयत्न करणं मात्र आपल्या हातात आहे.
  • आपण सतत मुलांचा अभ्यास, शिस्त या विषयांवर बोलत असतो.
  • गरजेनुसार भूमिका बदलून आपण कधी प्रौढ जबाबदार प्रौढ, तर काही वेळेला आपल्या पाल्याएवढं मूल होऊ शकतो.
  • सारखंच गंभीर आणि शिस्तीचं वर्तन करून आपल्यालाही कंटाळा येतोच की !
  • खूप पालक घरात पसारा नको, गोंधळ नको, म्हणून मित्र-मैत्रिणींना घरी खेळायची परवानगी देत नाहीत.
  • मुलांसाठी घर आहे की,घरासाठी मुल ? होऊ दे की थोडा पसारा !
  • पण ‘बाहेर गेल्यावर मूल बिघडेल’, ‘बाकीची मुलं आपल्या ‘लेव्हल’ ची नाहीत’, ‘आपलं मूल या सगळ्यांमध्ये जाऊन  बिघडत चालला आहे’,अशा सगळ्या विचारांनी त्यांना खाली खेळायलासुद्धा पाठवलं जात नाही.
  • स्क्रीन पासून लांब मुलं किती आनंदाने आणि सर्जनशीलता वापरून खेळतात बघा तरी खरं !
परिस्थितीतून येणाऱ्या एकाकीपणाला डॉक्टरांच्याशी बोलल्यानंतर त्यावर उत्तर शोधता येऊ शकतं. पण तोपर्यंत फक्त आपण आपल्या पाल्याचे एकाकीपण कमी करण्याचा प्रयत्न करू या…….
त्याचबरोबर होमिओपॅथिक औषधांचा उपयोग करून घेऊन त्यांच्या आयुष्यात समाधान, प्रसन्नता, आरोग्यदायी आणि आनंददायी जीवन जगण्यास मदत करू या  ! 

डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ) HHF, ICR Kolhapur,
चैतन्य होमिओपॅथीक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4, HDFC बॅंकेजवळ,
शाहुपुरी व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123
रविवारी बंद  

कृपया पुढील लेख वाचा 

———————————————————–

Homoeopathic Treatment for Loneliness in Children

Loneliness is an internal feeling, a personal feeling. Without expressing it, the other person does not know much. Adults can express their feelings, their intensity. They have the necessary vocabulary for that. But there is a large section of society who do not know what they feel and cannot express it even if they do, and that is Children.
When we say Children, not only Children, but also Teenagers are included in that category.
“What happens to them to feel alone ? Everything is getting easily ! Now the situation is as it is. Where can I get more people to help them ?’
 
Such is the tone of the Adults in the house. Emotional issues are big in Children’s Minds. They have not yet developed the skills to deal with those Emotions. Therefore, their Mental problems need to be looked at seriously. Every child has at least one Responsible Adult in their life, except for Vulnerable Children. So do children really have time to deal with Loneliness ?
Piyush, the loudest voice in the evening chatter in the society’s premises, was sitting sullenly on a bench in the premises today. A disappointed expression on the face. Eyes watery. His usual innocent face and now the disappointed face said something different. I went to his bench and took a cheek from Piyush. He used to get some kind of funny reaction when he did that, but today ‘HE’ was in his own World. When I showed him how to solve the Rubik’s cube in a minute, he started talking. “There is no one to play with me… It’s Christmas vacation. All my friends have gone somewhere. Dad doesn’t have vacation, so I’m at home.” So there are no friends to play with, if this was the case !
Boys and Girls who have a situation like Piyush’s face Loneliness to a great extent. Grandparents, parents, all are present in the house, what is asked for is immediately present, they get to be the Centre of Attraction, still the lack of peers and siblings cannot be filled by doing things.
This story is aptly presented in a song by Sandeep Khare. “Don’t go to the office, so the little boy who cries says to his Mother, “I am alone ! I don’t even have any grandparent….. even if there are children from School, Society Friends, Relatives, nobody has time for more than two days in this “Busy” life. Then in the remaining time they have only loneliness.
Some parents also say, “Even if someone gets to play together, where do they play ? Fights and quarrels happen !”
But then the answer to this is, ” Let there be a fight !
We too have grown up struggling, sometimes hitting, sometimes being beaten.
Parents who do not allow their children to go out to play with real reasons also grab a temporary solution to the Loneliness of Children. Among the reasons of Loneliness of Children, ‘Lonely One’ is the most  Familiar and ubiquitous type. Added to this is the increasing rate of divorce.
Piyush’s friend Ninad lived in the neighboring building, his parents were divorced. Mother was an Engineer in an IT company and she had to work and earn money for his higher education. A woman used to come home and cook and a Grandmother used to accompany Ninad. But this Grandmother did not pamper Piyush like Ninad’s Grandmother. Piyush’s Grandmother used to feed him new food, open his box to check and even get angry if he didn’t finish the Tifin-Box. Piyush used to get irritate a lot on Grandmother ! But Ninad was happy with all this, because he didn’t have an Angry Grandmother to treat him with such love. There was no Father to sit with him to watch the ‘World Cup’ at home.
 Divorced spouses are certainly thought of by society and sympathize with them. But the Loneliness that comes to Children of Divorced husbands and wives is not so strong.
Divorce-like situations are also seen in single parenthood following the death of a spouse. A single parent (whether due to divorce or death) is so overwhelmed with household, office, and child responsibilities that the Child’s Loneliness becomes a low priority. If the child is a teenager at the time, he feels the pressure of the parents who are with him. So not to add to it, the Children continue to fight their Loneliness, struggling, on their own. They keep going into their own Shell and sometimes they get stuck in the wrong company.
 If a child in a single parentage went the left way, there was no one to Watch, no one to show Fear, so it is concluded that the child went that way. But many a times Children take the hand that comes forward without looking whose it belongs to and then go on the wrong path. Taking advantage of this, many Children are taken to the path of crime.
 When I used to counsel Children with Legal Conflicts , (earlier the term ‘juvenile delinquents’ ‘बालगुन्हेगार’)
was used for these children. Today they are called ‘Children with Legal Conflicts ‘विधीसंघर्षग्रस्त बालक’ . It is learned that the ‘Responsible’ adults from the outside society have reached here in search of them.
If you show a little curiosity, a willingness to listen, kids have a lot to say. Not every time there is something important in it. But compare with an Adult, Children take new experiences more. Their new relationships are formed. So they need an audience to understand whether things are going right or to get answers to questions that arise in their minds.
If he himself is ever a responsible adult than his peers, it is more rewarding.
 We may not have control over the number of family members or children’s circle of friends; But can we be responsible, mature, good listeners for our Children ?
It is not very difficult actually, but many times the phone becomes the villain ! It takes 15 to 20 minutes to go through various social media. Our inner parent is giving us a lesson. The boy had come to say something, but we were busy in ‘reels’. The attraction, magic of social media has spread to such an extent that we blunt this even.
Even when the situation is not giving any blows, even when everything is fine in the family, because we are busy on the mobile phone, the Child keeps feeling Lonely. Of course, this situation will remain until he does not get his Own Phone; Later he will also go the same way and then may be you will feel the Loneliness. For every result there is an action or it can be said that the result of the action you take is the result.
Now let us look at the situation in the next house. Tanaya and Sahil have two children in this house. They are only two years apart. Mother was a full-time housewife, Grandparents at home, mother not working, giving enough time to children. It occurred to me that we will not find solitude here.
But if you look at it, Sahil is seen getting very irritated. Clash of objects in the house. In their house I always saw a big show-case next to the TV. A lot of medals and prizes were seen in the show-case. After a little inquiry, it came to know that these medals belong to Tanya only. Tanya is good looking, humble in manner, sweet and skilled in other arts as well as studies. Sahil was barely in studies. He was not particularly interested in anything except playing. When Tanya came with a middle child, Dad used to say, “Did this Sahil change in the hospital when he was a baby ? It doesn’t feel like it’s our son !” One should be aware of how Lonely one feels living with everyone in such a house.
 Can a plant survive without water ? For Children to survive and flourish in this world, Unconditional Love is act like water, is what they expected. This kind of discrimination used to be only between Boys and Girls, but now a days there is such a craze that Children should achieve success everywhere, that the child who achieves such success among the siblings is the ‘star-kid’ of the family. He gets lots of Love and Appreciation. Another child struggles to find Love. His Conflict, Anger, Crying, is only to express Loneliness. Such discrimination is based on anything from Skin Color, Intelligence, Qualities, Gender.
In the case of a sibling who came to me, a younger sister was born a few months after the death of the Grandmother in the house. Someone spread that,  the Grandmother has returned in her form. Done… Now she is the ‘LOVEED Child’ (जीव की प्राण’) of everyone in the family. So no one cares for Elder Brother. He once told me that he is ‘Transparent’ in the house. I asked him, “What is Transparent ?” He said, “Even though I am in front of them, everyone is talking to my Sister who is standing across from me.”
The words of this Boy show the seriousness or seriousness of his Loneliness.
Loneliness is felt by Children too, but it is never made a priority by parents. Also, a Child who feels Lonely is not always Alone, without siblings. Even small Children in a crowded household can be Lonely. Keeping in Mind that this Loneliness of Children has a Negative impact on their future, parents should seriously consider their behavior.
 
Homoeopathic Medicines are very useful for Loneliness in Children. At the same time, it is necessary to take some measures.
  • First thing is that there is no 100% guaranteed solution. But it is in our hands to try.
  • We are constantly talking about Children’s Education and Discipline.
  • By changing roles according to need, sometimes we can become a responsible adult, and sometimes we can be a child as much as our child.
  • We also get tired of the same Serious and Disciplined Behavior !
  • Many parents don’t allow friends to play at home because they don’t want thigs are Mess in the house. Is there a house for children or a child for the house ? Let it be spread a little !
But with all these thoughts, ‘the child will deteriorate after going out’, ‘the rest of the children are not of their ‘Level’, ‘our child is deteriorating in all these’, they are not even sent to play downstairs.
  • Look at how happily and creatively children play far away from the screen !
The Loneliness caused by the situation can be answered after talking to the Doctor. But till then, let’s just try to reduce the Loneliness of our Child…….
 
 Also, let’s help him live a Contented, Happy, Healthy and Happy Life by using Homoeopathic Medicines !

Dr Ajay Hanmane
M.D.(Hom) HHF, ICR Kolhapur,
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4, Near HDFC Bank,
Bhaskar Plaza Vyapari Peth,
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
Mobile No. 7738667123
Sunday Closed.

Please Read Next Article-