किडनी बिघडावर नक्की होमिओपॅथिक उपचार / Homoeopathic Treatment for Kidney Failure —

Dorctor Pic By Dr. Ajay HanmaneOctober 6, 2023 Homeopathic and Cure Kidney Problems

किडनी बिघडावर नक्की होमिओपॅथिक उपचार


किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. आज 20 ते 22 वर्षांच्या आतील तरुणांना देखील किडनीचे विकार दिसून येत आहेत.
      किडनी हा शरीरातील दूषित पदार्थ बाहेर टाकणारा अवयव असल्यामुळे त्याच्यावर अनेक रासायनिक रसायनांचा मारा झाल्यास मूत्रपिंडाचे गाळणे निकामी होणे (Filtration) म्हणजेच किडनीच्या कार्यामध्ये बिघाड होणे यात नवल ते काय ?
     हल्ली कोणत्याही डायलेसिस (Dialysis) सेंटर मध्ये जागा शिल्लक नसते. किडनी मधील बिघाड म्हणजे किडनी चे काम बंद होणे, किडनीचे काम कमी होणे ज्याला किडनी फेल्युअर (KIDNEY Failure)असे म्हणतात.
त्यावरील उपाय म्हणजे डायलेसिस (Dialysis) किंवा किडनी  ट्रान्सप्लांट (Kidney Transplant) इत्यादी.
एखाद्या वेळेस किंवा काही काळा पुरते डायलिसिस (Dialysis) करावयाचे असेल तर  तो खर्च आटोक्यात असतो. पण वारंवार डायलेसिस करावे लागते तेव्हा रुग्ण तसेच नातेवाईकांचा जीव अगदी मेटाकुटीस येतो. अशावेळी रुग्ण पर्याय शोधत असतात जो  म्हणजे होमिओपॅथी !!
     उशिरा का होईना होमिओपॅथी उपचार पद्धती ही किडनी बिघाड झालेल्या रुग्णांना एक आशेचा किरण आहे.
आतापर्यंतच्या अनुभवानुसार ज्या ज्यांनी ज्यांनी होमिओपॅथीची औषध उपचार सुरू केले त्यांना डायलेसिस पासून मुक्तता मिळाली किंवा त्यांचे डायलेसिस मधील अंतर वाढले.
     म्हणजे काय, किडनी बिघाड झालेल्या रुग्णांचे योग्य व अचूक होमिओपॅथीक औषधाने प्रतिकारशक्ती वाढते.
    त्यांच्या शरीरातील सिरम क्रिएटिन (Serum Creatinine) हा विषारी पदार्थ वाढला तरी देखील त्या रुग्णांना कोणताही त्रास होत नाही. हा होमिओपॅथी औषध घेणाऱ्या सर्व रुग्णांचा अनुभव आहे. निश्चितपणे  रुग्णांचे  आरोग्य सुधारून आयुष्य  वाढले जाते.
किडनी ही आपल्या पोटाच्या आतील भागात कमरेच्या मणकेच्या दोन्ही बाजूस बरगड्यांच्या तळामध्ये असणारी जोडी आहे, जी “घेवड्याच्या बी”च्या आकारासारखी दिसते. या अवयवाला भरपूर प्रमाणात रक्तपुरवठा होत असतो व त्यात असलेल्या लाखो सूक्ष्म गाळण्यांद्वारे रक्ताचे शुद्धीकरण होत असते. त्याद्वारे तयार झालेले मूत्र, मूत्रनलिकेद्वारे ओटीपोटात असलेल्या मूत्राशयात जमा होते. मूत्राशय भरल्यानंतर मूत्र विसर्जनाची ऐच्छिक क्रिया होते. साधारणपणे दिवसाला दोन ते तीन लिटर लघवी वातावरणानुसार शरीरातून बाहेर टाकले जाते.
किडनीचे कार्य
प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात प्रथिनांच्या विघटनाने युरिया व क्रिएटिनिन तयार होत असते. प्रत्येक तंदुरुस्त व्यक्तीमध्ये युरियाचे (Blood Urea)प्रमाण 20 ते 40 मिलिग्रॅम/ डे.ली. असते तर क्रियाटिनिंनचे प्रमाण एक मिलिग्रॅम/ डे.ली. राखले जाते.
    जेवढा युरिया / क्रिएटिनिन हा दूषित पदार्थ बनेल तेवढाच तो किडनी वाटे बाहेर टाकला जातो. ही क्रिया किडनी खराब झाल्यानंतर किंवा किडनीचे कार्य बिघडल्यानंतर शरीरामध्ये हळूहळू युरिया साठत जातो. हे दूषित विषारी पदार्थ प्रमाणापेक्षा जास्त वाढले की,
  • भूक मंदावणे,
  • उचक्या येणे,
  • उलट्या सुरू होणे,
  • अन्नावरील वासना जाणे,
  • अन्न दिसल्यावर मळमळ सुरू होणे.
  • तसेच पुढे पुढे विषारी पदार्थांचे प्रमाण जास्त वाढल्यावर
  • मेंदूवर परिणाम होऊ लागतो आणि
  • हळूहळू हाताला व संपूर्ण शरीराची कंपने सुरू होतात व
  • शेवटी हार्ट अटॅक येऊ शकतो.

आपण जास्त पाणी प्यायल्यास जास्त लघवी हे किडनीच्या नियमानुसार होते. पण जेवढी किडनीची क्षमता आहे तेवढीच लघवी होते त्यामुळे किडनीचे कार्यामध्ये बिघाड झाल्यास पाणी बाहेर टाकण्याचे प्रमाण कमी होते.

त्यामुळे रुग्णाच्या

  • तोंडावर सूज,
  • पायावर सूज,
  • फुफ्फुसात पाणी साठून दम व धाप लागते.
  • हृदय फेल होणे,
  • हृदयाला सूज येणे,
  • रक्तातील प्रथिनांचे प्रमाण कमी झाल्यामुळे पंडू रोग होणे इत्यादी त्रास होतात.

किडनी द्वारे शरीरातील सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फेट इत्यादी क्षारांचे नियमन केले जाते. किडनीच्या कार्यामध्ये बिघाड झाल्यावर या किडनीच्या नियमनात दोष निर्माण होऊन शरीरातील क्षारांची कमतरता किंवा अतिरेक होऊन हृदयक्रिया  बंद पडेपर्यंत दुष्परिणाम  दिसून येतात.

किडनीतील बिघाडामुळे शरीरातील ऍसिडचे नियमन होत नाही. लाल पेशी तयार बनण्यासाठी एरीथ्रोपोएटीन हार्मोन (Erythropoietin Harmon) तयार होण्याचे प्रमाण कमी झाल्याने ॲनिमिया (Anemia)होतो.

आधुनिक वैद्यक शास्त्रात किडनीमध्ये दोष निर्माण झाल्यास त्याला दुरुस्त व पुरवत करणारी औषधे नाहीत. अशाप्रसंगी शरीरातील दूषित पदार्थ बाहेर  टाकणे म्हणजे कृत्रिम किडनीचा वापर करणे याला डायलेसिस किंवा एखाद्या सशक्त व्यक्तीची किडनी ऑपरेशनने काढून घेऊन रोगी किडनीच्या ठिकाणी प्रस्थापित करणे होय.

पण डायलेसिस ही उपाययोजना  अनैसर्गिक असल्यामुळे  त्यास मर्यादा ह्या आहेतच.

किडनी बदलाने (Kidney Transplant) प्रश्न सुटला असे नसून शरीरात गुंतागुंत वाढण्याची शक्यता जास्त असते व ते सर्व सामान्यांना परवडणारे नाही.

किडनीचे कार्य बंद पडणे यामध्ये मधुमेह, रक्तदाब, किडनीचा कर्करोग, प्रोस्टेट ग्रंथीचा रोग इत्यादी  आजारांचे महत्वपूर्ण योगदान आहे.

जेव्हा किडनीमध्ये बिघाड झालेला रुग्ण जेव्हा होमिओपॅथिक तज्ञाकडे येतो तेव्हा त्याची सर्व बाजूंनी चिकित्सा केली जाते. त्याची मानसिक तसेच शारीरिक अवस्थेचे विश्लेषण केले जाते. रोगाचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला जातो.

जर कारण सापडले तर उपाय करता येतो.  होमिओपॅथी मध्ये कारणास अनुसरून अनेक औषधे आहेत, ज्यामुळे किडनीचे कार्य सुधारले जाते.

होमिओपॅथिक औषधांमुळे प्रतिकारशक्ती वाढवून रुग्णाच्या मूत्रपिंडास निरोगी स्थितीत आणता येऊ शकते.

प्रत्यारोपण किडनी (Kidney Transplant) असल्यास होमिओपॅथिक औषधांमुळे शरीरांतर्गत स्वीकारण्यास मदत होते.

होमिओपॅथिक औषधांमुळे, प्रतिकारशक्ती वाढल्यामुळे मधुमेह तसेच रक्तदाब यांचे शरीरावरील दुष्परिणाम कमी होतात किंवा पूर्णपणे बरे होतात.

साध्या गाठी किंवा कर्करोगाच्या गाठींमुळे मूत्रपिंड निकामी होऊ शकते. होमिओपॅथी गाठ किंवा गाठींची वाढ कमी करते

काही प्राथमिक स्थितीतील कॅन्सर योग्य अचूक होमिओपॅथिक औषध व योग्य अचूक मात्रेमध्ये दिल्यास कर्करोग पूर्ण बरा झालेली असंख्य उदाहरणे आहेत.

सध्या मधुमेह- डायबिटीस हे एक किडनी बिघाडाचे महत्त्वाचे कारण आहे. अनेकांचा आधुनिक वैद्यक औषधाने मधुमेह आटोक्यात असतो तरीपण किडनी बिघडू शकते तेव्हा होमिओपॅथिक उपाय योजनेमुळे मधुमेह आटोक्यात येतो व शारीरिक अवयवांना संरक्षण मिळते.

जिथे किडनी फेल्युअर  झाले आहे पण डायलिसिस उपाय चालत नाही किंवा पैशाअभावी उपाय करणे शक्य नाही तेथे  रोग अत्यवस्थ स्थितीत पोहोचल्याने म्हणजे किडनीतील (नेफरॉन्स) गाळण क्षमता पूर्ण जागृत होण्याची शक्यता नसते तेथे देखील होमिओपॅथिक उपाययोजनांमुळे रक्तात वाढलेली युरिया/ क्रियाटिन पचविण्याची ताकद रुग्णांमध्ये वाढवत आहे असे दिसते.

सर्वच अवयवांना वाढलेल्या युरिया मुळे होणाऱ्या तक्रारीस सामोरे जाण्याची ताकद होमिओपॅथिक वाढवते असे दिसते.

प्राथमिक अवस्थेतील किडनी फेल्युअर( Primary Kidney Failure) च्या किडनीचे कार्य पूर्ववत झालेले आहे. काहींचे डायलिसिस पूर्ण वाचले असून काहींचे डायलिसिस चे प्रमाण कमी झाले आहे.

आणखी ज्यांचे  मूत्रपिंड  रोपण (Kidney Transplant) झाले आहे ते टिकविण्यासाठीचे पुढील ऍलोपॅथी उपाययोजना फार खर्चिक आहे अशा रुग्णांना किंवा इतर शारीरिक तक्रारींसाठी आधुनिक उपचार पद्धती शरीराला त्रासदायक ठरते, अशा रुग्णांना होमिओपॅथीमध्ये निश्चितपणे औषधे आहेत, जी रुग्णांचे प्रतिकारशक्ती पण वाढवते आणि त्यांचे आरोग्य ही टिकवते.

 

डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ)
चैतन्य होम्योपैथिक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4
शाहुपुरी व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123
रविवारी बंद  

कृपया पुढील लेख वाचा  —
——————————————————————————————————–

English Translation
Homoeopathic treatment for kidney failure —

The number of patients suffering from kidney disease is increasing.
  Today, young people between 20 and 22 years of age are also showing kidney disorders. Since the kidney is an organ that removes contaminants from the body, if it is affected by many chemical chemicals, what is the wonder that kidney filtration failure means failure in kidney function?

     Currently there is no space left in any dialysis center. Kidney failure is the cessation of kidney function, the reduction of kidney function is called kidney failure.

The solution is dialysis or kidney transplant etc.

If dialysis is to be done at some point or for a short period of time, the cost is manageable. But when dialysis has to be done repeatedly, the life of the patient as well as the relatives becomes very difficult & miserable..

    In such cases patients look for an alternative which is Homoeopathy !!   
  Of late, Homoeopathic treatment has been a ray of hope for kidney failure patients.
According to the experience so far, those who started Homoeopathic medicinal treatment got relief from dialysis or their intervals between dialysis increased. It means that the immunity of patients with kidney failure is increased with proper and accurate Homoeopathic medicine, even if serum creatinine, a toxic substance, increases in their body, those patients do not suffer any problem. This is the experience of all patients taking Homoeopathic medicine. Certainly improving the health of patients improves their life expectancy.

          Kidneys are a pair in the inside of your abdomen on either side of your lumbar spine at the base of your ribs, which look like a “cattle seed”. This organ gets a lot of blood supply and the blood is purified by millions of microscopic filters in it. The urine produced by it is stored in the bladder in the abdomen through the urethra. After the bladder fills, urination is voluntary. Normally two to three liters of urine is excreted from the body per day depending on the environment.

Kidney Function –

Urea and creatinine are produced by the breakdown of proteins in the body of every person. Urea content in every fit person is 20 to 40 mg/day. If there is, the amount of creatinine is one milligram/day. is maintained. As much as urea/creatinine becomes a contaminant, it is excreted through the kidneys.

   This action leads to gradual accumulation of urea in the body after kidney damage or kidney failure. If these contaminated toxins increase in quantity,
  • loss of appetite,
  • hiccups, onset of vomiting,
  • loss of food cravings,
  • onset of nausea at the sight of food.
  •       Also, when the amount of toxic substances increases further, the brain starts to be affected and

gradually the hand and the whole body start to vibrate and eventually a heart attack may occur.

If you drink more water, more urine is the rule of the kidneys. But urine is only as much as the kidney has capacity, so in case of kidney failure, the amount of water is reduced.

Due to this, the patient has

  • swelling on the mouth,
  • swelling on the feet, water accumulation in the lungs and
  • shortness of breath.
  • Heart failure, swelling of the heart,       
  •  Anemia (Pandu disease) due to decrease in protein in the blood etc.The body’s salts like sodium, potassium, calcium, phosphate etc. are regulated by the kidneys. When the function of the kidneys is impaired, the regulation of these kidneys becomes defective and the side effects appear until the heart stops due to lack or excess of salts in the body.Due to kidney failure, acid in the body is not regulated.

     The production of Erythropoietin Hormone to produce red blood cells decreases, the  Anemia  occurs.

In modern medicine, there are no drugs that can repair and provide for kidney failure. In such cases, the removal of contaminants from the body means the use of an artificial kidney such as dialysis, or the surgical removal of a healthy person’s kidney and replacement of the diseased kidney.

  But since dialysis is an unnatural solution, it has limitations.

Kidney replacement does not solve the problem but there are more chances of complications in the body and it is not affordable for common people.

Diseases like diabetes, High blood pressure, Kidney cancer, Prostate gland disease etc. are important contributors to kidney failure.

When a patient with kidney failure comes to a  Homoeopathic specialist, he is treated from all angles. His Mental as well as Physical condition is analyzed to find out the cause of the disease. If the cause is found, it can be treated. Homoeopathy has several medicines that target the cause, thereby improving kidney function.

                   Homoeopathic medicines can boost the immune system and restore the patient’s kidneys to a healthy state.
    In case of kidney transplant, Homoeopathic medicines help the body to accept it.
Due to Homoeopathic medicines, the side effects of diabetes and blood pressure on the body are reduced or completely cured due to increased immunity.
  Simple tumors or cancerous tumors can cause kidney failure. Homoeopathy reduces the growth of tumor or tumors or nodules. There are numerous examples of complete cure of certain primary stage cancers with the right Homoeopathic medicine in the right dosage.
     Currently Diabetes- is an important cause of kidney failure. Although many people have their diabetes under control with modern medicine, when the kidneys can fail.
Homoeopathic remedy  can control diabetes and protect the body organs. Even where there is kidney failure but dialysis treatment is not working or due to lack of money.
     It is not possible to do the treatment because the disease has reached an advanced stage i.e. it is not possible to fully awaken the filtration capacity of the kidney (nephrons).

        Homoeopathic remedies seem to increase the power of digesting urea / creatinine in the blood in the patients. Homoeopathy seems to increase the ability of all organs to cope with complaints caused by increased urea.

Kidney function of primary kidney failure is restored. Some have completed dialysis and some have reduced the amount of dialysis.

Also, for those patients who have kidney transplants where further allopathic treatment is too expensive or for other physical ailments where modern treatment is painful for the body, Homoeopathy definitely has medicines, which also boosts the immunity of the patients and preserves their health.

Dr Ajay Hanmane
M.D.(Homeo)
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4,
Bhaskar Plaza Vyapari Peth,
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
Mobile No. 7738667123
Sunday Closed

 

Please Read Next Article-