रडणाऱ्या  बाळांसाठी होमिओपॅथीक उपचार / Homoeopathic Treatment For Crying Babies

Dorctor Pic By Dr. Ajay HanmaneApril 24, 2024 Anxiety Children Problems Homeopathic and Cure Mental Health

रडणाऱ्या  बाळांसाठी होमिओपॅथीक उपचार

“रडणारं बाळं”  खरे तर घरातल्या मंडळींपुढे जाणवणारा यक्ष प्रश्न आहे असे म्हणायला हरकत नाही. कारण एक तर बाळाला काही त्रास होत असल्यास ते रडते किंवा त्याला घरातल्या मंडळींनी उचलून घ्यावे, त्याच्याकडे लक्ष द्यावे म्हणूनही ते रडत असते. ही झाली बाळाच्या रडण्याची सर्वसाधारण दोन कारणे !
म्हणून तर मी याला ‘ व्यथा ‘ म्हणत आहे. कारण खरोखरच त्याला जो त्रास होत असतो तो खरे म्हणजे त्याची ‘व्यथाच‘ आहे असे म्हणायलाच हवे. कारण त्रास होत आहे हे दर्शविण्यासाठी फक्त रडणे हाच एक मार्ग बाळाजवळ असतो.
एक होमिओपॅथीक डॉक्टर म्हणून आपण त्याची निराकरण करणे गरजेचे आहे की जेणेकरून बाळ आणि बाळाच्या घरातील व्यक्ती या दोघांनाही सुखाची झोप लागेल.
प्रत्येक वेळी बाळाच्या रडण्याची कारणे वेगवेगळी असू शकतात. वर उल्लेख केल्याप्रमाणे सर्वसाधारण दोन प्रकारांत  बाळाचे रडणे मोडते.
एक तर काही त्रास होत असल्यास, वेदना होत असल्यास ते रडते. पण नेमके रडण्याचे कारण पुष्कळ वेळा समजणे खूप अवघड असते. काही सर्वसाधारण कारणे उदाहरणांसाठी देत आहे.
1. सवयीने रडणे –

काही वेळा बाळं सोयीप्रमाणे ठराविक वेळी रडत असतात. त्यासाठी काही विशिष्ट कारणांची गरज नसते.

2. भूक लागल्यावर-
बाळाला भूक लागल्यावर ते रडू लागते. अर्थातच जेव्हा बाळ भुकेने रडते तेव्हाच आईने बाळाला दूध देणे आवश्यक आहे. कधी कधी त्याला दूध अपुरे पडते व त्याचे पोट न भरण्यामुळे ते रडू लागते.
3. बाळाला शिशु झाल्यानंतर कपडे ओले राहिल्यामुळे अस्वस्थ होऊन बाळ रडू लागते.
4. बऱ्याचदा बाळाला आजूबाजूला माणसे असणे खूप गरजेचे वाटते.
त्यामुळे पाळण्यात बाळाला कधी कधी खूप एकटे- एकटे वाटल्याने ते रडू लागते.
5. बाळाला खूप गरम होत असल्यास किंवा थंडी वाजत असल्यास त्याला अस्वस्थ वाटून ते रडू लागते.
6. आपल्याकडे पुष्कळ वेळा बाळास घट्ट गुंडाळून ठेवण्याची सवय असते.
घरातील वडीलधारी मंडळी, आजी, पणजी इत्यादी व्यक्ती बाळाला खूप घट्ट गुंडाळून ठेवतात. त्यामुळे बाळाला खूप गरम होऊन किंवा अस्वस्थ वाटून ते रडू लागते
7. सर्दी झाल्यास बाळाचे नाक बंद होऊन त्याला श्वास घेण्यास अडचण होते व ते रडू लागते.
8. बाळाला डायपमध्ये खूप वेळ ठेवल्यास त्याला शू च्या जागेवर पुरळ येऊन ते त्याला त्रासदायक वाटू लागते व बाळ सतत रडू लागते.
9. पोटदुखी हे बाळाच्या रडण्याचे अगदी सर्वसाधारण कारण समजले जाते.

विशेषत: संध्याकाळच्या वेळेस पोटात गॅस धरल्याने मूल सर्वसाधारणपणे रडू लागते. त्यामुळे घरातील जेष्ठ मंडळी ‘बाळाला पोटावर शेकत जा ‘  वगैरे सल्ले देत अअसतात. ही सर्व मुले सर्व साधारण संध्याकाळी रडतात.

10. कानदुखी, सहसा सर्दीमुळे बाळाचा कान दुखू लागतो आणि त्यामुळे बाळ रडू लागते.
11. अन्य काही जंतू संसर्ग ताप असल्यास बाळाला अस्वस्थ वाटून रडू लागते.
 ही सर्व कारणे सर्वसाधारण बाळाची रडण्याची कारणे समजली जातात.
पण काही विशिष्ट आजार असल्यास गंभीर आजार असल्यास मात्र बाळ अगदी असहायपणे रडू लागते.
 बाळाच्या रडण्याची काही विशिष्ट कारणे असू शकतात.
1. उदाहरणार्थ
मेंदूला मार लागल्यास,
गंभीर स्वरुपात दुखापत झाल्यास,
मेंदूला सूज आल्यास (Meningitis) बाळ अतिशय केविलवाणे रडू लागते. यामध्ये बाळाला उलट्याहून मानेला जडपणा येतो, बाळाला फिट्सही येतात.
2. कधी कधी बाळाला होणाऱ्या शू च्या त्रासामुळे बाळ रडू लागते.
उदाहरणार्थ – (फायमोसिस) या प्रकारात बाळाला शू व्यवस्थित होत नाही किंवा अर्धवट होते आणि त्यामुळे बाळ रडू लागते.
3. बाळाला गंभीर आजार असल्यास उदाहरणार्थफिट येणे वगैरे या प्रकारात बाळ रडू लागते.
4. बाळाला कावीळ झाल्यास त्याची रक्तातील बिलीरुबीनची पातळी वाढूनही बाळ रडू लागते.
खरे पाहता जन्मल्यावर बाळ रडते; पण हे मात्र नैसर्गिक आहे कारण रडल्यावर त्याला लागणारा प्राणवायू हा फुफ्फुसात ओढला जातो आणि बाळाला जन्मल्यानंतरचा पहिला श्वास तिथूनच चालू होतो.
ही सर्व झाली बाळाच्या रडण्याची कारणे ! म्हणूनच मी याला ‘व्यथा’ असे नाव दिले आहे. कारण या छोट्या जीवाच्या दृष्टीने इतक्या किरकोळ गोष्टी पण ‘व्यथे’सारख्याच भासतात.
होमिओपॅथीक शास्त्रात मात्र लहानग्यांसाठी पुष्कळ वेगवेगळी  गुणकारी औषधे आहेत.
काही बाळं  ही रात्रभर रडून त्रास देते, दिवसभर ते शांत झोपून असते. तर काही बाळें दात येण्याच्या आधी रडू लागतात. त्यावेळी होणारे जुलाब, ताप इत्यादी गोष्टीमुळे बाळं हैराण होऊन रडू लागते.
काही बाळं मुलत: शांत स्वभावाचे असतात. खूप हळव्या स्वभावाचे, भीत्रे, बुजऱ्या स्वभावाचे असतात.
काही बाळं सतत  रडत  असतात, विशेषतः कान दुखीने त्रस्त असतात. त्यामुळे अशावेळी बाळ रडू लागते.
त्याचप्रमाणे अनेकही इतर औषधे बाळाच्या लक्षणानुरूप देता येतील. पण अर्थातच त्याची शारीरिक लक्षणे, स्वभाव या सर्वांचा एकत्रित विचार करून विशिष्ट लक्षणानुरुप औषधे देता येतील.  अशी अनेक औषधे बाळाच्या विविध विकारात देता येतात.
थोडक्यात काय लहानग्यांची ‘व्यथा’ समजून घेऊन इलाज करणे महत्त्वाचे ! तेही अतिशय हळुवारपणे !
होमिओपॅथीच्या गोड गोड  गोळ्या बाळाला देऊन आपण त्यांचा त्रास कमी करण्यात नक्कीच मदत करू शकतो.

डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ) HHF, ICR Kolhapur,
चैतन्य होमिओपॅथीक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4, HDFC बॅंकेजवळ,
शाहुपुरी, व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123
रविवारी बंद

कृपया पुढील लेख वाचा  —


 

Homoeopathic Treatment For Crying Babies

It goes without saying that “Crying Babies” is actually a Big question faced by the household. Because either the baby cries if he is in trouble or he cries to be picked up by the family members and to be looked after. These are the two common causes of Baby Crying !
That’s why I call it ‘Pain’ (‘ व्यथा ‘). Because really what he is suffering from is really his ‘Pain’.  Because crying is the only way babies have to show that they are in trouble.
As a Homoeopathic Doctor we need to fix it so that both the baby and the person in the baby’s household get a good night’s sleep.
Every time the Baby cries, the reasons can be different. As mentioned above, Baby crying generally falls into two categories.
If one is in trouble, if it is in ‘Pain’. , it cries. But the exact cause of crying is often very difficult to understand. Some general reasons are given as examples.
1. Habitual Crying
Sometimes babies cry at certain times out of habit. It does not need any specific reasons.
2. When Hungry
When a Baby is hungry, it starts crying. Of course, the Mother should feed the Baby only when the Baby cries from hunger. Sometimes he gets insufficient milk and starts crying because his stomach is not full.
3. After the Baby is born, the baby starts crying because the clothes are wet.
4. Often a Baby needs people around. So sometimes the Baby feels very lonely in the cradle and starts crying.
5. If the baby is too hot or too cold, he feels uncomfortable and starts crying.
6. We often have a habit of keeping the Baby tightly wrapped.
Family elders, grandmothers, great-grandmothers etc. wrap the Baby very tightly. So the Baby starts crying because he is overheated or uncomfortable
7. In case of cold, the Baby’s nose gets blocked and it becomes difficult to breathe and it starts crying.
8. If the Baby is kept in diaper for a long time, he will get a rash on the genital area and it will start to bother him and the baby will start crying continuously.
9. Stomach ache is considered to be the most common cause of Baby crying.
Gas in the stomach, especially in the evening, causes the child to generally cry. That is why the elders in the house give advice like ‘Roast the baby on its stomach’. All these children cry every normal evening.
10. Ear pain, usually due to a cold, the Baby’s ear hurts and the Baby starts crying.
11. If there is some other germ infection fever the Baby starts crying because of discomfort.
All these reasons are considered to be common causes of Baby crying.
But if there is a certain disease or severe disease, the Baby starts crying helplessly.
There may be specific reasons why a Baby cries.
1. For example,
if the brain has trauma,
if there is a serious injury,
if the brain is inflamed (Meningitis), the Baby starts crying very loudly. In this, the Baby gets heaviness in the neck due to vomiting, the baby also gets fits.
2. Sometimes the Baby starts crying because of the discomfort of the passing urine.
For example, in this type (phimosis), the Baby’s does not pass urine properly or partially, and this causes the baby to cry.
3. If the baby has a serious illness like convulsions etc. the Baby starts crying.
4. If a Baby is jaundiced, the Baby starts crying despite the increased level of bilirubin in the blood.
In fact, a Baby cries when it is born; But this is natural because the gas it needs when it cries is drawn into the lungs and the first breath after birth is taken from there.
All these are the reasons for the Baby’s crying ! That’s why I named it ‘Pain’. Because in the eyes of this little organism, even such small things seem like ‘Pain’.
Homoeopathy, however, has many different effective remedies for Children.
Some Babies cry all night and sleep soundly all day. Some Babies start crying before teething. Due to diarrhea, fever etc. happening at that time, Babies start crying in shock.
Some Babies are naturally calm. They are very sensitive, cowardly and stupid. Constantly crying Babies are babies especially suffering from ear pain. So at that time the Baby starts crying.
Similarly, many other medicines can be given as per the Baby’s symptoms. But of course, considering all his Physical symptoms and nature together, Medicines can be given according to specific symptoms. Many such Medicines can be given in various disorders of the Baby.
In short, it is important to understand and treat Children’s ‘Pain’ ! Very gently !.
We can certainly help ease the’ Pain of Babies by giving them sweet Homoeopathic pills.

Dr Ajay Hanmane
M.D.(Hom) HHF, ICR Kolhapur,
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4, Near HDFC Bank,
Bhaskar Plaza Vyapari Peth, Shahupuri
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
Mobile No. 7738667123
Sunday Closed.

Please Read Next Article-