सर्वव्यापी चिंतेवर होमिओपॅथीची मात्रा / Homeopathic Treatment on Ubiquitous Anxiety

Dorctor Pic By Dr. Ajay HanmaneApril 5, 2025 Anxiety Female Problems General Information Homeopathic and Cure Mental Health Mental Health Psychiatry Sleep Disorders

 

सर्वव्यापी चिंतेवर होमिओपॅथीची मात्रा

“काळजी”  ही स्वाभाविक गोष्ट आहे. योग्य प्रमाणात काळजी वाटणे आवश्यक असून ती एक उपयुक्त भावना आहे. (युसट्रेस- Eustress) त्यामुळे आपली शारीरिक व मानसिक कार्यक्षमता योग्य प्रमाणातील काळजीमुळे वाढते. निरोगी मनात आलेल्या काळजीचा उपयोग करून घेऊन अनेक संकटांचा मुकाबला करता येतो. त्यामुळे ज्याची काळजी वाटते त्यासंबंधी नेमकी उपाययोजना ठरवून त्याप्रमाणे कार्यवाही सुरू करू शकतो.
वेळेवर काळजी घेण्याने आपण आजार टाळू शकतो, अपघातापासून बचाव, मोठ्या आर्थिक नुकसानीचे प्रसंग किंवा सामाजिक प्रतिष्ठा गमावण्याची शक्यता टाळू शकतो. कोणत्याही संकट परिस्थितीशी मुकाबला करण्याच्या तयारीला लढाई किंवा माघार, पलायण्याची तयारी म्हणतात.(Fight Or Flight Response) फाईट और फ्लाईट रिस्पॉन्स.
“चिंता “ हा लढाई किंवा माघारीच्या तयारीचा प्राथमिक भाग आहे. एकदा का लढाई किंवा पलायन याचा निर्णय झाला आणि कार्यवाही सुरू झाली की चिंतेचे कार्य संपते म्हणजे “चिंता “ नाहीशी होते.
परीक्षेच्या आधी वाटणारी “चिंता “, प्रश्नपत्रिका हातात पडल्यावर उत्तरे लिहिण्यास सुरुवात केल्याबरोबर नाहीशी होते. महत्त्वाच्या व्यक्तीला भेटण्यापूर्वी वाढणारी छातीतील धडधड त्या व्यक्तीला भेटल्यावर शमते. व्याख्यान देण्यापूर्वी नवख्या व्याख्यात्याला वाटणारी स्टेजवरील भीती (स्टेज फ्रॉईट) व्याख्यान्याच्या रोगात वाटेनाशी होते. हे निरोगी मानसिकतेचे लक्षण आहे.
जेव्हा चिंता “अतिरेकी “ होते तेव्हा तो आजार होतो त्याला “डिस्ट्रेस”(Distress) म्हणतात. आपल्या मेंदूतील व अनैच्छिक केंद्रांना अतिप्रमाणात चालना मिळते. (ब्रेन अँड ऍटोनाॅमिक नर्व्हस सिस्टीम) श्वास जलद होऊ लागतो.
  • छातीत धडधड वाढते.
  •  नाडीचे ठोके वाढतात.
  • हात-पाय थंड पडतात.
  •  घाम सुटतो.
  •  घशाला कोरड पडते. घशात काहीतरी अडकले आहे असे जाणवते, मळमळते,पोटात कसं तरी होत आहे, वारंवार लघवीला जाण्याची भावना होऊ लागते,
  •  चक्कर येते;पण गोल फिरण्याची भावना नसते. (गिडीनेस) अंधारी येते,
  • डोके दुखते,
  • भीती वाटते,
  • क्षुल्लक गोष्टीमुळे दचकायला होते,
  •  झोप उशीरा लागते
  • ,इत्यादी इत्यादी तक्रारी अतिचिंतेमुळे येऊ लागतात.
  •  रुग्णांचे या तक्रारींकडे लक्ष जाऊन “मला असे का होत आहे ?” अशी नवीन चिंता निर्माण होते.
“चिंता” ही मानसिक असली तरी कधी कधी त्याचे मूळ कारण शारीरिकव्याधी असू शकते. काही औषधांनी ” चिंता “ निर्माण होते. चहा,कॉफी इत्यादींचे अति प्रमाणात सेवन, दमा आटोक्यात येणाऱ्या औषधांचा परिणाम, झोप येणारी औषधे किंवा मद्यपान अचानक बंद झाले तरी मन खूप चिंतित बनते.
  • थायरॉईड ग्रंथीचे आजार,
  • रक्तातील साखर कमी होणे,
  •  अर्धशिशी,
  • काही फिट्सचे प्रकार,
  • डोक्याला इजा होणे,
  • मेंदूचे व मनाचे अनेक विकार,
  • यामध्ये “चिंता” हे प्रमुख लक्षण असू शकते.
बहुतेक वेळा “चिंता “ निर्माण होण्याचे कारण परिस्थितीतून निर्माण झालेला तणाव हे असते. चिंतेवर मात करण्यासाठी उदाहरणार्थ  – परीक्षेची काळजी वाटत असल्यास अभ्यास करायलाच लागणे, बोलण्यात काही दोष असला (अडखळणे, तोतरे बोलणे, उच्चार स्पष्ट नसणे, फार भरभर बोलणे इत्यादी) तर बोलण्यात प्राविण्य मिळविण्यासाठी सतत प्रयत्न करणे हा ही प्रभावी मार्ग आहे.
 केवळ विचार आणि “चिंता” दूर होणार नाही उलट वेळ गेल्याने आणखी “चिंता” निर्माण होते. अनुवंशिकता आणि कौटुंबिक नैतिक मूल्य संस्कार यातून मनाचि कणखरता ठरते.
कणखर मन,  चिंतेचे रूपांतर काही उपयोगी मानसिक प्रतिसादात रूपांतर करू शकते.तसे न झाल्यास शारीरिक किंवा मानसिक अस्वास्थ्य आणि मानसिक विकार यांना आमंत्रण मिळते.
कधी कधी मानसिक ताण एवढा मोठा असतो की, “चिंता” ही अपरिहार्य असते. अतिरेकी चिंतेमुळे किंवा दीर्घकाळ चिंता टिकून राहिल्याने दैनंदिन जीवनात अनेक अडचणी निर्माण होतात. म्हणजे मनोविकाराची लागण झाली आहे असे मानता येईल.
मानसिक विकाराबद्दल समाजात बरेच गैरसमज प्रचलित आहेत. त्यामुळे मानसिक मनोरुग्णांचे नातेवाईक असा विकार लपवून ठेवताना दिसतात. त्यामुळे इतर शारीरिक विकाराप्रमाणे मानसिक विकाराचे निदान व उपचार लवकर होत नाही. उपचाराला विलंब झाल्यामुळे रुग्ण व नातेवाईक या दोघांना त्रास सहन करावा लागतो. मानसिक विकृतीची प्रमुख लक्षणे पुढीलपैकी असू शकतात.
••भास होणे,
••चुकीचा कल्पनांवर ठाम विश्वास असणे उदाहरणार्थ- कोणीतरी आपल्याला अपाय करणार आहे किंवा आपल्या मनाचा ताबा घेत आहे.
••दैनंदिन वागण्यात होणारे बदल उदाहरणार्थ-  झोप न लागणे किंवा जास्त लागणे, प्रमाणावर थकवा जाणवणे, इतरांची सतत मतभेद होत राहणे,
••सतत बदलणारा स्वभाव म्हणजे कधी कधी कमालीचा उत्साह तर कधीकधी पराकोटीची निराशा,
••स्वतःला विविध प्रकारे अपाय करून घेणे, मारून घेणे, कधी कधी आपल्या अंगावर प्राणी (साप) चढत आहेत असा भास होऊन त्या अवयवाला इजा करणे,
••अन्नग्रहणात विकार होणे म्हणजे अन्न घेणे टाळणे किंवा बकासुराप्रमाणे अन्न खाणे किंवा अन्न खाल्ल्यावर लगेच उलटी अथवा जुलाबाची औषध घेणे, त्या अन्नाचा निचरा करून टाकणे.
समाजात मानसिक विकृतींचे प्रमाण दखल घेण्याजोगे असून या विकारांबद्दल पुरेशी जागृती झालेले दिसत नाही.
“चिंता ” अतिरेकी झाली तर औषधोपचार करणे गरजेचे असते.  होमिओपॅथीमध्ये अत्यंत गुणकारी औषधे आहेत जी “अतिरेकी चिंता ” नाहीशी करते.
पद्माताई या बोलक्या स्वभावाच्या, हसऱ्या सतत उत्साही, उद्योगी, कुठल्याही सामाजिक कार्यक्रम असो किंवा शेजाऱ्यांना अडचण असो, या सर्व मदतीला तत्पर असायच्या. घरातील वातावरण व परिस्थिती बरी होती. मुलगा आणि मुलगी शिकाण्यासाठी बाहेर गावी ठिकाणी राहत होते. गेल्या सहा महिन्यापासून त्यांच्या सर्व गोष्टी बदलून गेल्या. हळूहळू चिंता वाढायला लागली. नंतर विनाकारण सतत बेचैन वाटायला लागले. सकाळी अंथरूनातून उठल्यापासून टेन्शनला सुरुवात व्हायची. एक ना अनेक गोष्टींचे विचार पण सर्व नकारात्मक. त्रास व्हायचा.
उदाहरणार्थ

 

नियमाने येत असणारी भांडीवाली बाई येण्यास पाच ते दहा मिनिटे उशीर झाला तर त्यांची बेचैनी वाढायची.

ती आली नाही तर काय होईल ?

मला सर्व करावा लागणार ?

कधी जमणार सगळं काम ?

इत्यादी विचारांनी बेचैनी होई.

पूर्वी कधी न रागावणाऱ्या पद्माताई किरकोळ गोष्टींवर चिडचिड करायला लागल्या.

नवऱ्याने समजावण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावरती चिडू लागल्या. मुलांच्या तब्येतीची विनाकारण काळजी वाटायला लागली.

  • त्यांचे कोणत्याच गोष्टीत लक्ष लागत नव्हते.
  •  थोड्याशा आवाजाला जोरात दचकणे, त्यामुळे छातीत धडधड वाढायची, कोणाबद्दल काही वाईट बातमी ऐकायला मिळाली तर चिंतेचा अतिरेकच व्हायचा.
  • सततच्या विनाकारण चिंतेमुळे रात्रीची झोप बिघडली,
  • जेवणावरील भावना कमी झाली,
  • चक्कर येणे,
  • हाता-पायाला कंप सुटणे अशी शारीरिक लक्षणे जाणवायला लागली.
तपासणीमध्ये कुठलाही शारीरिक आजार न आढळल्यामुळे फॅमिली डॉक्टरने ” चैतन्य होमिओपॅथिक क्लिनिक ” मध्ये होमिओपॅथिक औषध घेण्याचा सल्ला देऊन माझ्याकडे पाठवले.
पद्माताईंची शारीरिक तपासणी, रक्ताची तपासणी पूर्णतः नॉर्मल होत्या. त्यांच्याशी चर्चा करून व चौकशी करून असे लक्षात आले की, त्यांना कोणताही शारीरिकार नव्हता. त्यांना चिंतेच्या आजाराने ग्रासले होते. तशी चिंता करण्याची परिस्थितीही नव्हती. पण त्यांना त्यांचे  विचार थांबवता येत नव्हते, म्हणून त्यांची चिंता सर्व गोष्टींबद्दल होती, याला “सर्वव्यापी चिंतेचा आजार ” म्हणतात म्हणजे “जनरलाईज्ड एन्झाईटी डिसऑर्डर “.
आपल्या आजूबाजूला नियमित घडणाऱ्या गोष्टींबद्दल ” अवास्तव चिंता “ वाटणे या हे आजाराचे प्रमुख लक्षण असते. समजत असूनही रुग्णाला त्याच्या विचारांवर ताबा ठेवता येत नाही. म्हणजे “कळतं आहे पण वळत नाही “ अशी स्थिती निर्माण होते. आपली विचार व भावना यांचा आपल्या शरीराशी अति जवळचा संबंध असतो. कारण दोन्हींचे नियमन (कंट्रोल) हे मेंदूतून होत असते.
या आजारातील मानसिक लक्षणे म्हणजे प्रत्येक गोष्टीबद्दल वाटणारी अनाठायी चिंता, सतत काहीतरी विपरीत घडणार आहे असे विचार व त्याबद्दलची चिंता व तणाव याला “अँटीसिपेटरी एन्झायटी”  म्हणतात.
फक्त चिंता करू नको याला सल्ला दिल्याने किंवा समजून सांगितल्याने यामध्ये काही फरक पडत नाही, तर समुपदेशन, व्यायाम, योगासनाबरोबर होमीओपॅथिक औषध उपचार करणे गरजेचे असते.
होमीओपॅथिक औषधांमुळे पद्माताईंच्या लक्षणात सुधारणा व्हायला लागली. चिंता कमी व्हायला लागल्या, त्याचबरोबर शारीरिक लक्षणे कमी झाली. दोन ते तीन महिन्यांच्या औषधोपचाराने  त्यांचे बरेचसे जीवनमान पूर्वपदावर आले होते. याच का त्या पद्माताईं ?  इतका त्यांच्यात फरक पडला, असे शेजारी देखील पद्मावतीच्या नवऱ्याला सांगू लागले.
होमिओपॅथिक औषधांनी निश्चितपणे आराम मिळतो. होमिओपॅथिक औषधांचा प्रभाव दिसण्यासाठी रुग्णाने काही वेळ देणे आवश्यक आहे.
प्रत्येक मनुष्याची प्रकृती, प्रवृत्ती, संवेदनशीलता ही भिन्न असते. तसेच अनुवंशीय जनुकातील दोषी भिन्न असतात. हे सर्व लक्षात घेऊन होमिओपॅथिक औषधांची मात्रा ठरवावी लागते.
होमिओपॅथिक औषधांमुळे रुग्णाच्या विचारांमध्ये निश्चितपणे बदल होतो. नकारात्मक विचार नाहीसे होऊन सकारात्मक विचार रूग्ण करू लागतात. त्यामुळे तो शारीरिक तसेच मानसिक दृष्ट्या सुदृढ बनतो. अशी शक्ती होमिओपॅथिक औषध प्रणालीमध्ये निश्चित आहे.

डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ) HHF, ICR Kolhapur,
चैतन्य होमिओपॅथीक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4, HDFC बॅंकेजवळ,
शाहुपुरी, व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123, 9404507723
रविवारी बंद

कृपया पुढील लेख वाचा  —

————————————————————

Homeopathic Treatment on Ubiquitous Anxiety

“Worry” is a natural thing. An appropriate amount of concern is necessary and is a useful Emotion. (Eustress) So our Physical and Mental performance increases due to proper amount of care. Many difficulties can be combated by using the care that comes from a Healthy Mind. So one can start taking action by deciding the exact measures regarding the concern.
Timely care can help us avoid illness, prevent accidents, avoid the possibility of major financial loss or loss of social status. Preparedness to deal with any crisis situation is called fight or flight response.
“Anxiety” is a primary part of preparing for battle or retreat. Once the Fight-or-Flight decision is made and the Action is initiated, the Anxiety function ends, meaning the Anxiety disappears.
The “Anxiety” felt before the exam disappears as soon as the question paper is in hand and the answers are started. The palpitation before meeting an important person subsides after meeting that person. The stage fright experienced by a new lecturer before giving a lecture (stage fright) is absent in lecture disease. This is a sign of a Healthy Mind.
When the Anxiety becomes “Excessive” the illness is called “Distress”. Our brain and involuntary centers are overstimulated. (Brain and Autonomic Nervous System).
  • Breathing becomes fast.
  • Palpitations in the chest increase.
  • The pulse increases.
  • Hands and Feet get cold.
  • Sweating.
  • Throat becomes dry. Feeling of something stuck in the throat, nausea, feeling of something in the stomach, frequent urge to urinate,
  • Dizziness; but no feeling of spinning. (giddiness) comes darkness,
  • Headache,
  • Afraid,
  • Trivial things make you cringe.
  • Sleep starts late, etc.

complaints start due to Excessive Anxiety.

Patients look at these complaints and ask, “Why is this happening to me ?” Such a new concern arises.
Although “Anxiety “ is psychological, sometimes its root cause can be physical. Some drugs cause ” Anxiety “.
Excessive consumption of tea, coffee, etc., effects of anti-asthma drugs, sleeping drugs or sudden cessation of alcohol can cause the Mind to become very Anxious.
  • Thyroid disease,
  • Low blood sugar,
  • Migraine
  • Some types of fits,
  • Head injury,
  • Many disorders of Brain and Mind,
  • “Anxiety” can be a major symptom in this.
Most of the time, the cause of “Anxiety “ is stress from a situation. For example, if you are worried about an exam, studying is an effective way to overcome Anxiety.
Not only will the thoughts and “Worries” go away, but more “Worries” will be created as time passes. Heredity and inculcation of Family moral values ​​lead to Mental toughness.
A strong Mind can transform Anxiety into some useful Mental response. Failure to do so invites Physical or Mental ill health and Mental disorders. Sometimes the stress is so great that “Anxiety” is inevitable.
Excessive Anxiety or Chronic Anxiety causes many difficulties in daily life. That means it can be considered that he has been infected with Psychosis.
There are many misconceptions prevalent in society about Mental disorders. Therefore, the relatives of Mental Psychopaths are seen hiding such a disorder. Therefore, diagnosis and treatment of Mental disorder is not quick like other physical disorders. Due to delay in treatment, both patient and relatives suffer.
Major symptoms of Mental disorders may include the following.
••Feeling,
••Strong belief in false ideas eg – someone is going to
harm you or is taking over your mind.
••Changes in daily behavior eg- lack of or excessive sleepiness, excessive fatigue, constant disagreement with others,
••Constantly changing nature means sometimes extreme excitement and sometimes extreme despondency,
••Harming oneself in various ways, killing oneself, sometimes feeling as if animals (snakes) are climbing on one’s body and injuring that organ,
••Disordered eating means avoiding food or eating food like bakasura or vomiting or laxatives immediately after eating food. Taking, draining that food.
The amount of Mental disorders in the society is noticeable and there is not enough awareness about these disorders.
If “Anxiety” becomes excessive, it is necessary to take medication. Homeopathy has highly effective Medicines that eliminate Excessive Anxiety.
Padmatai was talkative, always smiling, energetic, enterprising, ready to help any social event or neighbor’s problem. The atmosphere and conditions in the house were good. The Son and Daughter lived outside the Town to study.
Everything has changed in the last six months. Gradually Anxiety started to increase. Then started feeling restless without any reason. The tension used to start from the moment of getting out of bed in the morning.
Thoughts of one or many things but all negative. There was trouble.
For example, if the lady-worker who used to come regularly was delayed by five to ten minutes, her Anxiety would increase.
  • What will happen if she does not come ?
  • Do I have to do everything ?
  • When will all the work be done ?
  • Thoughts like that made me restless.
Padmatai, who was never angry before, started to get irritated over minor things.
When the husband tried to explain, she got angry with him. Children’s health started to be worried for no reason.
  • They were not paying attention to anything.
  • Loud gasping at the slightest sound,
  • Palpitation in the chest,
  • Excessive Anxiety on hearing bad news about someone.
  • Due to constant unexplained Anxiety, physical symptoms such as
  • Disturbed night sleep,
  • Loss of appetite for food,
  • Dizziness,
  • Tremors in hands and feet began to occur.
As the examination did not reveal any physical ailment, the family doctor referred me to “Chaitanya Homeopathic Clinic” for Homeopathic Treatment.
Padmatai’s physical examination, blood tests were completely normal. After discussing and questioning him, it was realized that he had no physical body. He was suffering from Anxiety Disorder.
There was no need to worry. But they couldn’t stop their thoughts, so they worried about everything, called “Generalized Anxiety Disorder”.
A major symptom of the disease is feeling unreasonably anxious about things that happen regularly around us. Despite understanding, the patient cannot control his thoughts. That means “knows but does not turn” situation arises.
Our thoughts and feelings are closely related to our body. Because both of them are controlled by the brain.
The mental symptoms of this disease are excessive worry about everything, constant thoughts of something bad happening, and Anxiety and Stress about it called “Anticipatory Anxiety”.
Just being advised or told not to worry does not make any difference, but Homoeopathic Medicine along with counselling, exercise, yoga is necessary.
Padmatai’s symptoms began to improve with Homoeopathic Medicines. The Anxiety began to subside, along with the physical symptoms. After two to three months of Medication, most of his quality of life returned to normal.
Is that Padmatai ? What Aa Change !! Neighbors also started telling Padmatai’s husband that there was such a difference between them.
Homeopathic Medicines definitely provide relief. The patient needs to allow some time for Homoeopathic Medicines to take effect.
Every human being has a different nature, tendency, sensitivity. Also the genetic culprits are different. Keeping all this in Mind, the dosage of Homoeopathic Medicines has to be decided.
Homoeopathic Medicines definitely change the thinking of the patient. Negative thoughts disappear and positive thoughts begin to form. So he becomes Physically as well as Mentally strong. Such a power is fixed in the Homoeopathic system of Medicine.

Dr Ajay Hanmane
M.D.(Hom) HHF, ICR Kolhapur,
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4, Near HDFC Bank,
Bhaskar Plaza Vyapari Peth, Shahupuri
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
Mobile No. 7738667123, 9404507723
Sunday Closed.

Please Read Next Article-