नक्कीच, अनुवंशिक आजारावर होमिओपॅथी मध्ये उपचार आहेत !!!
प्रत्येक दिवस नव्या आशेचा
आपल्या बाळाची वाढ व्यवस्थित व्हावी यासाठी प्रत्येक आई दक्ष असतेच. त्या संदर्भात जुन्या जाणत्या स्त्रिया आईला वेळोवेळी सल्लेही देत असतात. आजच्या काळात वैद्यकीय सहाय्य उपलब्ध असतेच. काही बाळांच्या वाढीबाबत समस्या निर्माण होतात त्या अनेक प्रकारच्या असू शकतात. त्यातील काहीशी अवघड समस्या असते ती बौद्धिक वाढीच्या संदर्भातील. अशी समस्या लक्षात यायला वेळही लागतो आणि ती लक्षात आली तरी स्वीकारणं कठीण असतं. अशा मुलांमध्ये आता गतिमंद आणि मतिमंद असा फरक केला जातो.
माझा एक पेशंट चार चार महिन्याचा झाला तेव्हा त्याच्या आई-वडिलांना प्रथम प्रश्न पडला की हा पालथा का पडत नाही? मग आईच्या लक्षात आलं की तो हाक मारल्यावर ही लक्ष देत नाही. बहुतेक वेळा गप्प, सुंद असतो. या संदर्भात जेव्हा इतरांशी आईने चौकशी सुरू केली तेव्हाही कोणी फारसं गांभीर्याने घेतले नाही. काही मुलांच्या बाबतीत हालचाली, बोलणं, उशिरा सुरू होत असतं असं त्यांना सांगितलं गेलं.
मात्र जसजसे दिवस जाऊ लागले तसतसं त्या अस्वस्थ होऊ लागल्या, कारण त्यांच्या मुलाला बऱ्याच शा गोष्टी कळत नव्हत्या. एक वर्षाचा होऊनी कसलीच प्रगती नव्हती. आई खेरीस तो इतरांना ओळखतही नव्हता, रांगत नव्हता, बसू शकत नव्हता,बसवलं तर हात टेकून बसून राहायचा, पण काही म्हणजे काहीच करायचा नाही,बोलणं तर दूरच राहिलं. दात येणे खूप उशीर आले.
जेव्हा डॉक्टरांकडे घेऊन गेले तेव्हा त्यांनी अंगात रक्त कमी आहे, हळूहळू वाढेल, सुधारणा होईल असे सांगितले. पण त्यांच्या उत्तरांनी आईचे समाधान झालं नाही, म्हणून ते एका न्यूरोलॉजिस्ट कडे घेऊन गेले. त्यांनी स्पष्ट सांगितले की, मुलाची बौद्धिक क्षमता कमी आहे. त्यावर तशी औषधे नाहीत. काही थेरपीज आहेत. बाकी मग, विशेष मुलांसाठी ज्या शाळा संस्था वगैरे असतात……… याच्या पुढचं बोलणं त्या आईच्या कानात शिरले नाही.
डोळ्यासमोर अंधार दिसत होता, आपला मुलगा गतिमंद आहे हे कटू सत्य आता थेटपणे त्यांच्यासमोर आले होते. मनावर खूपच दडपण आलं होतं. मुलाचं कसं होणार या चिंतेन काळीज पोखरलं जात होतं. कोणीतरी त्यांना मोठमोठे हॉस्पिटलमध्ये जायला सांगितलं, त्याच्या टेस्ट करावे लागतील, याशिवाय नेमकं काही सांगता येत नाही. टेस्ट करून ठरवूया असं ऐकूनच निराशेमुळे टेस्ट करणे टाळले.
आई असूनही त्यावेळी मुलाविषयी निराश झाली होती. घरातील सर्वांनाही आता हा आयुष्यभर असाच राहणार असं गृहीत धरलं होतं. कसलाच उत्साह वाटत नव्हता.
जेव्हा ते होमिओपॅथिक उपचार घेण्यासाठी आले तेव्हा त्यांनी आशा सोडलेली होती. पण एक शेवटचा प्रयत्न म्हणून ते होमिओपॅथिकडे आले होते.
डॉक्टर तपासत असताना तो मुलगा क्षणभर ही स्वस्थ नव्हता (Restless, Hyperactive). किरकिर करत होता,बेचैन होता. त्याच्याविषयी सांगण्याची गरज नव्हती कारण सगळी लक्षणे स्पष्ट दिसत होती.
डॉक्टरांनी विचारले की, विशेषतः गरोदरपणात काही त्रास झाला होता का? नेहमीची औषधी सोडून एखाद्या त्रासासाठी काही वेगळी औषधे घेतली होती का? वगैरे. …….
हे प्रश्न विचारण होमिओपॅथीत अतिशय आवश्यक मानलं जातं. काही वेळा उशिरा मूल होतं त्यावेळी त्यासाठी काही वेगळे उपचार घेतले होते का नाही हे पाहावं लागतं. गरोदरपणातील विशेष जाणवणारे ब्लड प्रेशर सारखे त्रास व त्यासाठी केले गेलेले उपाय लक्षात घ्यावे लागतात.
या बाळाच्या आईच्या बाबतीत गरोदरपणी अचानक उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू झाला होता, त्यामुळे ऍडमिट करावे लागले होते. औषध गोळ्या इत्यादी उपचाराने रक्तदाब नियंत्रणात आणायलाही बरेच दिवस लागले होते. मूळ आजार अनुवंशिकच असतो, पण गरोदरपणातील उच्च रक्त दाबामुळे बाळाच्या मेंदूच्या वाढीवर व कार्यक्षमतेवर परिणाम झाला असण्याची शक्यता होती. बाळंतपणानंतर ते उशिरा का होईना लक्षातही आलं, पण त्यावर आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये काही औषध नव्हती.
होमिओपॅथिक डॉक्टरांनी सांगितले की, काही अनुवंशिक आजार असतात ते पूर्णपणे बरे होणं शक्य नसतं. मात्र त्यांची लक्षणे आटोक्यात आणता येतात. काही सुधारणा निश्चित होऊ शकते. ही सगळी कल्पना देऊनच उपचार सुरू केले गेले.
सुरुवातीला काही फरक जाणवला नाही. पण एक ते दीड महिन्यानंतर मात्र हळूहळू बदल दिसू लागला. पहिली गोष्ट म्हणजे, तो रांगू लागला, हात न टेकता बसू लागला, हाक मारली की चटकन पाहू लागला. मग हळूहळू “पप्पा-मम्मी” असे शब्दही बोलू लागला.
खरं बघायला गेलं तर या गोष्टीही होमिओपॅथिक डॉक्टर साठी पुष्कळ मोलाच्या होत्या. त्याची प्रगती सुरू आहे. तो आता टीव्ही बघतो. बाहेर गेला तर आपलं घर ओळखू शकतो. आपल्या गाडीचा कलर ही ओळखतो.
या छोट्या छोट्या गोष्टी आई-वडिलांना आनंद देऊन जातात. आपला मुलगा चारचौघात आत्मविश्वासाने वावरू शकेल अशी त्यांना आशा वाटत आहे. तसं पाहायला गेलं तर इतरांच्या दृष्टीने फारशी प्रगती झाली असं म्हणता येणार नाही, पण आई-वडिलांच्या दृष्टीने तो पूर्वीचा आणि आत्ताचा मुलगा यांच्यामध्ये खूप म्हणजे खूपच फरक आहे. एकीकडे मुलांचं कसं होणार या चिंतेत दिवस घालवत घालवणारे आई-वडील आता मात्र दिवसेंदिवस मुलाची होणारे प्रगती पाहून येणारा प्रत्येक दिवस आनंदाचा आणि नव्या आशेचा असतो.
दुसऱ्या घटनेमध्ये होमिओपॅथीच्या औषधांचा उपयोग कसा काय झाला आहे आपण पाहूया.
माझ्या पेशंटच्या डिलिव्हरीच्या वेळी डॉक्टरांनी सांगितले की, पोटात पाणी कमी झाले त्यामुळे सिझेरियन करावं लागेल. जन्माला आल्या आल्या बाळ रडते, ते रडला नाही. काही सेकंदांनी रडला. त्यानंतर पहिले दोन-तीन दिवस व्यवस्थित होता. पण नंतर आईला दूध आलं नव्हतं, त्यामुळे त्याला दूध मिळालं नाही. मग डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पावडरच दूध दिलं पण तो घेईना. त्यामुळे एक दिवस उपाशी राहिला. त्यातून त्याला फिट आली आणि तो बेशुद्ध झाला. मग जवळजवळ वीस-बावीस दिवस त्याला काचेच्या पेटीत ठेवावं लागलं.
इतकं सारं झालं हे, त्याच्या जन्माच्या वेळी पोटात असताना काही गुदमरल्यामुळे, उशिरा रडल्यामुळे, त्याच्या मेंदूच्या एका भागाला थोडी इजा झाली होती असं टेस्टमध्ये दिसून आलं. त्यावेळी त्याला काही तात्पुरती औषधे दिली गेली.
साधारणपणे तीन आठवड्यानंतर बाळ घरी आले. त्यानंतर तो तसा ठीक वाटत होता. त्याची वाढ ही व्यवस्थित होती. पण हळूहळू आई-वडिलांच्या लक्षात यायला लागलं की, त्याची हालचाल मंद आहे, तो लक्ष देत नाही आहे. जन्माच्या वेळी त्याला त्रास झाल्यानंतर तू घाबरला असेल असं काही समज आई-वडिलांचा झाला.
साधारणपणे दीड वर्षाचा झाला तेव्हा मात्र त्याला पुन्हा हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागले. त्यावेळी पण डॉक्टरांनी हेच सांगितलं की, मेंदूचा एक भाग दबला गेल्यामुळे परिणाम झाला आहे. तो इतर मुलांपेक्षा उशिरा चालू बोलू लागेल. आई-वडिलांना खूप वाईट वाटलं पण तरीही आशा होती की हळूहळू का होईना तो इतरांसारखा होईल. पण तसे झाले नाही त्याला फिटस येतच राहिल्या. उठण्याचा, चालण्याचा प्रयत्न करीत असे, पण फिट येऊन पडत असे. त्यामुळे त्याला जखमा होत असत. त्याच्या हालचाली अधिक अधिकच मंदावत गेल्या.
पुन्हा एकदा त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं. तिथे मात्र सिटीस्कॅन मध्ये काही प्रॉब्लेम दिसून आला नाही. डॉक्टर म्हणाले, मेंदूला मार लागला असावा असा फक्त अंदाज आहे. पण एक मात्र निश्चित तुमचा मुलगा स्लो म्हणजे गतिमंद आहे, मतिमंद नाही.
डॉक्टरांचे शब्द ऐकल्यावर आई-वडील सुंद झाले, कारण डॉक्टरांनी ते जाहीरच केलं होतं. शेवटी तो कसाही असला तरी त्यांचा मुलगा होता. भले गतिमंद असला तरी तो व्यवस्थित राहावा. निदान त्याची प्रकृती ठीक असावी अशी आई-वडिलांची इच्छा होती. पण त्याचं फिटस येणे काही थांबत नव्हतं. महिन्यातून एकदा तरी त्याला फिट यायची. दहा ते बारा मिनिटं तो आकडी बसल्यासारखं करायचा. मग बेशुद्ध पडायचा. पुन्हा दवाखान्यात न्यावं लागायचं. दोन-तीन दिवस ऍडमिट करावे लागायचे. सलाईन लावणं. वगैरे…
मग पुन्हा घरी आणायचं. जवळजवळ तीन वर्ष अशाच प्रकारे ट्रीटमेंट चालू होती. पण फरक काही पडत नव्हता. शुद्धीवर आल्यानंतर तो इतका व्यवस्थित असायचा की अगदी नॉर्मल वाटायचा. आई-वडिलांना टेन्शन असायचं ते त्याच्या अवेळी फिट्स येण्याचं !! हे असं चाललेलं होतं.
पण एकदा चालता चालता त्याचा पाय दुखावला आणि तो मटकन खालीच बसला. तो उठू शकेला नाही. यावेळी फिट आली नव्हती. हा काय प्रकार आहे म्हणून त्याला दुसऱ्या डॉक्टरांकडे घेऊन गेले. त्यांनी एक्स-रे, सोनोग्राफी,वगैरे सगळं केलं. मग निदान केले कि, त्याच्या मणक्यात प्रॉब्लेम आहे. म्हणजे मणक्यातून जो मज्जारज्जू जातो त्याच्या भोवती पाणी नाही….पण कसला तरी द्रव साचला आहे. त्यामुळे त्याला चालताना त्रास होतो. हा आणखीन एक मोठा धक्का आई-वडिलांना होता.
भले तो शाळेत नाही जाऊ शकला तरी , निदान तो चालू शकला पाहिजे. पण आता त्याचं चालणं ही थांबलं होतं. साडेचार वर्षाचा पोरगा आता परत रांगायला लागला होता, बसवलं तर जमिनीवर पुढे हात धरून बसायचा, खुरडत सरकायचा. त्याची अवस्था बघून काळजाच अक्षरशः पाणी व्हायचं. बुद्धीची वाढ थोडी कमी आहे हे स्वीकारलं होतं. पण मुलाला हे काहीसं अपंगत्व आलं होतं याचं काय करायचं ? हे आई-वडिलांना सुचत नव्हतं.
मणक्याचे दुखणं निघालं, त्यावर सर्जरी करावी लागेल असं डॉक्टरांचं म्हणणं होतं, पण तरीही गॅरंटी देता येणार नाही, म्हणजे तो नशीबाचा भाग. मग कशाला करायची शस्त्रक्रिया ?वेगवेगळ्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेऊन सुद्धा काही उपयोग झाला नाही. कोणत्याच उपचार पद्धतीने फरक पडत नाही तर मग कशाला पैसे घालवायचे? म्हणून सगळीच औषधे बंद करून टाकली होती आई वडिलांनी.
शेवटी कोणीतरी त्यांना होमिओपॅथी विषयी सुचवले होते,पण होमिओपॅथीवर विश्वास नव्हता, पण नाईलाज होता. एक प्रयत्न म्हणून ते होमिओपॅथी उपचार सुरू करायला तयार झाले.
पण पहिले पाच-सहा महिने बिलकुल फरक पडला नव्हता. सहा महिन्यानंतर फरक जाणवायला लागला. फिट येणे कमी झालं. फिट यायची पण त्याची तीव्रता कमी होत गेली. त्यानंतर आई-वडिलांचा विश्वास होमिओपॅथी वरती बसायला लागला. हळूहळू फिट्स कमी झाल्या. फिट्स आल्या तरी तो सावध व्हायचा. हळूहळू त्याला शाळेत घातलं गेलं. आता तो इतर मुलांसारखाच खेळतो, बोलतो छान, अजूनही शिक्षणात कमी पडतो आहे. पण सगळे व्यवस्थित समजतं त्याला. आता तो चौदा वर्षाचा झाला आहे. खरंतर तो गतिमंद वगैरे असल्याचं अजिबात जाणवत नाही.
होमिओपॅथी मूळ त्यांचा मुलगा परत मिळाला. या आजाराला सीरींगो मायलिया असे म्हणतात. एक तरं ,या आजारावर आधुनिक औषध पद्धतीत औषधच नाही. शस्त्रक्रियेने 50% पेशंट्स मध्ये आराम मिळू शकतो, पण गॅरंटी नाही. शिवाय मणक्या मधला तो जो पदार्थ एकदा शस्त्रक्रियेने काढून टाकला तरी काही काळाने तो पुन्हा तसाच जमा होऊ शकतो.अशा परिस्थितीत होमिओपॅथीशिवाय कुठला पर्याय असू शकतो?
हे बोलायला आणि ऐकायला सोप आहे. रांगत चालणाऱ्या मुलाला पुन्हा पायावर उभ करणे, नॉर्मल करणं एक आव्हान होतं. पण होमिओपॅथी मुळे हे शक्य झाले आहे. तो पूर्ण बरा झालाय असे म्हणता येणार नाही. काही मर्यादा ह्या राहणारच, कारण पहिल्या चार-पाच वर्षात योग्य निदान झालं नाही. योग्य उपचार झाले नाहीत. त्यामुळे होमिओपॅथी कडून 100% रिझल्ट देता येणे शक्य नाही. त्याच्या शिक्षणाची बाबतीत काही मर्यादा येणं अपरिहार्य आहे. पण इतर बाबतीत तो सर्वसाधारण मुलांसारखा चालतो, बोलतो, हसतो, खेळतो, हेही काही कमी नाही.
मुख्य म्हणजे, त्याच कायमचं अपंगत्व होमिओपॅथीमुळे टाळू शकलो यापेक्षा आणखी समाधान कोणतं ?
डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ)
चैतन्य होम्योपैथिक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4
शाहुपुरी व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123
रविवारी बंद
कृपया पुढील लेख वाचा —
——————————————————————————————————————
English Translation–
Of course, Genetic Diseases are treated in Homoeopathy !!!
Every day is a new hope.
Every mother is careful to ensure the proper growth of her baby. In that regard, old knowledgeable, senior women also give advice to the mother from time to time. Medical assistance is readily available in today’s times. Some babies develop growth problems which can be of many types. One of the more difficult issues is that of intellectual growth. It takes time to realize such a problem and even if it is realized, it is difficult to accept. Such children are now differentiated as Mentally Challenged-Intellectually Disabled and Mentally Retarded.
When one of my patients was 4 months old, the first question his parents asked was why the baby is not doing it ? Then the mother noticed that he was not paying attention when she called him. Most of the time it is quiet. Even when mother started inquiring with others in this regard, no one took her seriously. They were told that in the case of some children, the movement, speech, starts late.
But as the days passed by, they started getting restless, because their son did not understand many things. After one year there was no progress. He didn’t even know others except his mother, he couldn’t crawl, he couldn’t sit, if he sat down, he would sit with his hands folded, but sometimes he didn’t want to do anything, he stayed away from talking. Teething came too late.
When taken to the doctor, he said that the blood in the body is low, it will gradually increase, it will improve. But the mother was not satisfied with his answers, so she took him to a Neurologist. He clearly stated that, the child’s intellectual capacity is low. There are no such drugs on it. There are some therapies. Besides, there are schools for special children and so on….
There was darkness before their eyes, the bitter truth that their son was गतिमंद – Mentally Challenged-Intellectually Disabled was now directly in front of them. There was a lot of pressure on parents mind. The thought of what will happen to the child was filled with worry.
Someone told him to go to a big hospital, he will have to be tested, nothing can be said for sure. After hearing that let’s decide by testing, I avoided testing due to frustration.
Despite being a mother, she was disappointed about the child at that time. Everyone in the house had now assumed that, this would be the case for the rest of their lives. There was no enthusiasm.
When he came to seek Homoeopathic treatment, he had given up hope. But as a last resort he came to Homoeopathy.
While the doctor was examining the boy, he was restless, hyperactive for a moment, grunting and restless. There was no need to tell about him because all the symptoms were obvious.
The doctor asked if there was any problem especially during the pregnancy. Were you taking any other medication for a problem other than your usual medication? Asking these questions is considered very essential in Homoeopathy.
Sometimes it is necessary to see if any other treatment was taken for the late child. Special problems like blood pressure during pregnancy and the measures taken for it have to be taken into account.
In the case of this baby’s mother, she had a sudden onset of hypertension during pregnancy, and had to be admitted. It took many days to bring the blood pressure under control with treatment like medicine pills etc. The underlying disease is Genetic, but high blood pressure during pregnancy may have affected the growth and performance of the baby’s brain. It was noticed later or later after childbirth, but there was no cure for it in modern medicine.
Homoeopathic doctor said that there are some Genetic diseases that cannot be completely cured. But their symptoms can be controlled. Some improvements may be warranted. Treatment was started with all these ideas.
At first there was no difference. But after one to one and a half months, a gradual change started to appear. The first thing he did was start crawling, sitting up straight, looking quickly when called. Then gradually he started saying the words “Papa-Mummy”.
In fact, these things were also of great value to the Homoeopathic doctor. It is progressing. He watches TV now. If you go outside, you can recognize your home. It recognizes the color of your car.
These little things make parents happy. They hope that their son will be able to walk confidently in society. If you look at it like that, it cannot be said that much progress has been made in the eyes of others, but in the eyes of the parents, there is a lot of difference between the child before and now.
On the one hand, parents spend their days worrying about how their children will turn out, but now, seeing the progress of their children day by day, every day is filled with joy and new hope.
Let us see how Homoeopathic medicines have been used in the second case.
At the time of my patient’s delivery, the doctor said that the water in the Mothers Uterus decreased, so a cesarean section would have to be performed. A baby cries after being born, it didn’t cry. Cried after a few seconds. After that the first two-three days were fine. But then the mother did not get milk, so he did not get milk. Then according to doctor’s advice, powdered milk was given but he did not take it. So he starved for a day. It gave him a fit- Convulsion and he unconscious.
Then he had to be kept in a Incubator for almost twenty-two days. All this happened, due to some suffocation while in the womb at the time of his birth, due to late crying, tests showed that a part of his brain was slightly damaged. At that time he was given some temporary medicines. Usually the baby comes home after three weeks.
He seemed fine after that. His growth was regular. But gradually parents started to notice that his movement is slow, he is not paying attention. The parents had some idea that you must have been scared after he suffered during birth.
However, he had to be admitted to the hospital again when he was about a year and a half old. At that time, the doctor said that the result was due to a part of the brain being injured. He starts talking later than other children. The parents felt very sad but still hoped that he would gradually become like others. But that didn’t happen, he continued to have fits. He used to try to get up and walk, but he used to fall into a fit. He used to get injured due to this. His movements became slower and slower.
Once again he had to be admitted to the hospital. There, however, no problem was seen in City Scan. The doctor said, it is only a guess that the brain may have been hit- injured. But one thing is certain, your son is slow, not mentally retarded. After listening to the words of the doctor, the parents were shocked because the doctor had already announced it.
After all he was their son anyway. Even if it is slow, it should be organized. At least his parents wanted him to be fine. But there was no stopping his fits. At least once a month he would have a fit. For ten to twelve minutes, he would sit like a figure. Then he would faint. Had to be taken to the hospital again. Had to admit for two-three days. Applying saline. Routine treatment etc…
Then bring it home again. The treatment continued like this for almost three years. But it didn’t matter. After regaining consciousness, he was so orderly that he seemed almost normal. Parents used to have tension because of his untimely fits! This is how it went.
But once while walking, his leg hurt and he sat down. He can’t get up. This time there was no fit. He was taken to another doctor to find out what it was. They did X-ray, sonography, etc. Then it was diagnosed that there is a problem in his spine. That is, there is no water collection surrounding the spinal cord that passes through the spine…but some kind of sticky- fluid has accumulated. It causes him difficulty in walking. This was another big shock to the parents.
Even if he cannot go to school, at least he should be able to walk. But now he stopped walking. The four-and-a-half-year-old boy had started to crawl again, if he was seated, he would sit on the ground holding his hands forward, crawling and crawling. Looking at his condition, he was literally worried. It was accepted that the growth of intelligence is a little less. But what to do if the child had some disability? Parents were confused, helpless & frustrated.
The back pain- new complained diagnosed, The doctor said that surgery would be required, but still no guarantee can be given, that is part of luck. So why do the surgery ? Even taking treatment from different doctors did not help. If the treatment doesn’t make a difference, then why spend the money? So parents stopped all medicines.
Finally someone suggested Homoeopathy to him, but they did not believe in Homoeopathy , but was helpless. As an attempt, he decided to start Homoeopathic treatment.
But for the first five-six months there was no difference at all. After six months, the difference started to be felt. Decreased fit. Fits used to come but their intensity decreased. After that, parents began to trust Homoeopathy. Gradually the fits subsided. Even if he had fits, he would be conscious, alert. Gradually he was admitted to school. Now he plays like other children, talks well, still falls short in education. But he understands everything well. Now he is fourteen years old. In fact, it doesn’t seem to be slow at all.
His son got back due to treatment of Homoeopathy. This disease is called Syringo Myelia. On the one hand, there is no medicine for this disease in modern medicine. Surgery can provide relief in 50% of patients, but is not guaranteed. Moreover, once the substance in the spine is surgically removed, it can accumulate again after some time. In such cases, what alternative can there be other than Homoeopathy?
It is easy to speak and listen. It was a challenge to get the crawling child back on his feet, normal. But Homoeopathy has made it possible.
It cannot be said that he has fully recovered. There will be some limitations because proper diagnosis is not done in the first four-five years. No proper treatment. So it is not possible to give 100% results from Homoeopathy.
It is inevitable that there will be some limitations in terms of his education. But in other respects he walks, talks, laughs, plays like normal children.
More importantly, what could be more satisfying than to avoid the same permanent disability with Homoeopathy ?
Dr Ajay Hanmane
M.D.(Homeo)
Chaitanya Clinic
1st Floor, F4,
Bhaskar Plaza Vyapari Peth,
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
Mobile No. 7738667123
Sunday Closed
Please Read Next Article–