केस गळणे व होमिओपॅथिक उपचार —
लांबसडक केस हे भारतीय स्त्रीचे भूषण आहे,त्याचप्रमाणे तिच्या आरोग्याचे प्रतीक सुद्धा!!
पुरुष असो वा स्त्री, लहान मूल असो वा मध्यमवयीनव्यक्ती या सर्वांचे व्यक्तिमत्व खुलवतात ते डोक्यावरची केस !!!
अंगावरील कुठल्याही भागावरील केस गळायला लागले की काळजी वाटायला लागते आणि जर डोक्यावरील केस गळत असतील तर चिंता ग्रासून टाकते.
त्वचा हा आपल्या शरीरातील सर्वात मोठा अवयव असून हातापायांची तळवे सोडून शरीराच्या सर्व भागांवर केस असतात. शरीरामध्ये एकूण पाच दशलक्ष केसांची फॉलिकल्स आहेत. त्यापैकी दोन टक्के डोक्यावर असतात.
केसांच्या जाडीवरून केसांचे प्रकार ठरविले जातात.
केस दोन प्रकारचे आहेत –
1) वेल्स (Vellus) हे बारीक जाडीचे आणि लांबीला छोटे असतात.
2) टर्मिनल (Terminal) हे जाड आणि वेल्स पेक्षा लांब असतात. हे केस डोक्यावर, दाढीच्या जागेवर, काखेत आणि पुरुषांच्या जाघेंत आढळतात. वेल्स हे केस स्त्रियांच्या चेहऱ्यावर आढळतात.
केसांची वाढ ही कालचक्र प्रमाणे असते. यामध्ये तीन टप्पे आहेत.
1) एनाजेन (Anagen) यामध्ये केसांची वाढ होत असते.
2) कॅटाजेन (Catagen)– यात केसांमध्ये बदल होत असतो.
3) टेलोजेन (Telogen)– यामध्ये केसांच्या दांड्यांमध्ये बदल होऊन केस गळायला लागतात.
दररोज साधारणपणे 100 केस गळतात. दररोज तीन पॉईंट पाच मिलीमीटर (3.5mm) केसांची वाढ होत असते. स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा थोड्या जास्त प्रमाणात वाढ होते कारण त्या वाढीवर हार्मोन्सचा प्रभाव असतो.
दाढी करणे व सूर्यकिरणे यांचा केसांच्या वाढीवर काही परिणाम होत नाही.
केस गळणे किंवा टक्कल पडणे याला एलोपेशिया (Alopecia) असे म्हणतात. शरीराच्या नेहमी केस असणाऱ्या भागातील केस कमी झाले की त्याला केस गळण्याचा रोग एलोपेशिया (Alopecia) झाला असे म्हटले जाते.
केस गळणे दोन प्रकारचे असते.
1) सिकाट्रिशियल (Cicatrical- Scaring) आणि
2) नॉन-सिकाट्रिशियल (Non-Cicatrical- Non-Scaring)
1) सिकाट्रिशियल (Cicatrical- Scaring)– यात केस गळण्यामध्ये केसांच्या फॉलिकल्सचा नाश होतो. त्यामुळे अशा प्रकारच्या केस गळण्यामध्ये केसांची वाढ होण्याची शक्यता नसते. याला महत्त्वाचे जबाबदार घटक –
• क्ष किरणांची जास्त मात्रा,
•भाजणे,
• जिवाणूंचा-जंतूंचा प्रादुर्भाव झाल्यामुळे उदाहरणार्थ- क्षयरोग, कुष्ठरोग गजकर्ण नायटा झाल्यावर
• विषाणूंच्या प्रभावामुळे
• त्वचारोग झाल्यामुळे
• कर्करोग पसरणारा
2) नॉन-सिकाट्रिशियल (Non-Cicatrical- Non-Scaring)– यामध्ये केसांचे फॉलिकल्स शाबूत राहतात, त्यामुळे गेलेले केस पुन्हा येऊ शकतात. याला काही महत्त्वाचे जबाबदार घटक आहेत –
•तीव्र तापामुळे उदाहरणार्थ विषमज्वर टायफाईड विषाणू
•जिवाणूंच्या प्रादुर्भावामुळे- गजकर्ण नायटा
• • रसायनिक किंवा औषधे कर्करोगावरील औषधे
• ग्रंथींचे रोग -थायरॉईड ग्रंथींचे रोग मधुमेह बळवल्यास
• बाळंतपणामध्ये व प्रसुतीनंतर
वेगवेगळया प्रकारच्या केस गळण्यांपैकी महत्त्वाची कारणे पुढील प्रमाणे-
* एलोपेशिया एरियाटा (Alopecia Areata) यालाच ‘चाई’ पडणे असे म्हणतात. या रोगामध्ये केस नाण्याच्या आकाराएवढा किंवा ठिगळ्यासारख्या भागातून गळालेले दिसतात. असा ठिगळासारखा (Patch) भाग शरीराच्या कुठल्याही भागात आढळतो. पण प्रामुख्याने तो डोक्यावरील त्वचेत आढळतो.स्त्री आणि पुरुषांमध्ये सारख्याच प्रमाणात आढळतो. हा त्रास एकाच घरातील काही सदस्यांना होऊ शकतो. प्रतिकारशक्तीमधील (Immune system) घटकांचा परिणाम म्हणून हा त्रास होतो.
* टेलोजन इफलुवियम (Telogen Effluvium) – त्वचेवरील केसांचे कालचक्र चालू असताना एनाजेन, कॅटाजेन, टेलोजेन या तीनही स्थितीतून जातात. त्वचेमध्ये असणाऱ्या केसांच्या फॉलिकल्स मध्ये एकाच वेळी वेगवेगळी स्थिती असते. काही केस त्यांना एनाजेनमध्ये तर काही टेलोजेनमध्ये. या रोगांमध्ये टेलोजेनचे प्रमाण वाढते त्यामुळे दररोज 300 केस गळतात. विषमज्वर, मलेरिया, डेंग्यू सारख्या तापामध्ये किंवा मानसिक ताणतणाव इत्यादी कारणांमुळे हा त्रास होतो.
* ट्रॅक्शन एलोपेशिया( Traction Alopecia) – केसांवर सतत खेचण्याचा तणाव पडल्यामुळे हा रोग होतो. केसांची ठेवण ठेवताना विशिष्ट प्रकारची पोनीटेल बांधताना केसांच्या दांड्यांवर ताण पडतो. हा त्रास मुलींमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. डोक्यावरची समोरील किंवा बाजूचे केस यामध्ये गळतात. केसांची रचना बदलणे योग्य असते.
* टक्कल पडणे (Common Baldness) टक्कल पडणे ही एक सर्वसाधारण प्रक्रिया आहे. अँड्रोजेनचा प्रभाव हा काही केसांच्या फॉलिकल्स वर होतो. हे अँड्रोजेन पुरुषांमध्ये अंडकोशातून तर स्त्रियांमध्ये बीजकोषांमधून आणि सुप्रारिनल ग्रंथीमधून तयार होतात.
टक्कल पडताना होणारा केसातील बदल म्हणजे टर्मिनल केसांची जागा हळूहळू बारीक केसांनी घेणे. ही प्रक्रिया वयात आल्यानंतर कधीही सुरू होते.
पुरुषांमध्ये 17 वर्षाच्या सुमारास तर स्त्रियांमध्ये 25 ते 30 वर्षांपर्यंत दिसायला लागते. केसांच्या फॉलिकल्सचा आकार कमी होतो व त्याचबरोबर एनाजेन आकार छोटा होतो आणि टेलोजेनचे गळण्याचे प्रमाण वाढते. यामध्ये डोक्यावरील मागील आणि दोन्ही बाजूचे केस यामधून सुटतात.
दोन्ही कानावरचे केस जायला लागले की, काही दिवसांनी डोक्यावरील मधल्या भागावरील (Vertex) केस गळतात आणि नंतर समोरचे केस गळतात.
स्त्रियांमध्ये समोरील आणि डोक्यावरील मधल्या भागावरील केसांवर पहिल्यांदा परिणाम होतो.त्यामुळे मधल्या भागा जवळील केस कमी होऊन ती जागा वाढल्यासारखी वाटते.
केस कोणत्या कारणामुळे गळाले हे पाहू-
उदाहरणार्थ — गजकर्ण,नायटा, जिवाणू जंतू हे कारण असेल तर त्याप्रमाणे उपचार करावे लागतात.
झाडाला फुले येण्यासाठी फांद्यांवर पाणी मारायचे नसते तर ते मुळाशी जायला पाहिजे. म्हणजे त्वचेच्या खाली असणाऱ्या मेदग्रंथी, तेल ग्रंथी, केसांचे मूळ- फॉलिकल्स असतात, या ग्रंथीचे कार्य नीट चालू ठेवण्याचे काम जे औषध करू शकते ते औषध केसांची निगा राखू शकते व केसा खालील ग्रंथींची कार्यक्षमता वाढवते.
डोक्यावरील त्वचेच्या भागास कंगव्यामुळे व इतर कारणाने सतत ओरखडे उठून झालेला दाह, काही प्रतिजैविके घेतल्यानंतर, बी जीवनसत्व व ई जीवनसत्वाची कमतरता तसेच मानसिक धक्का,अति भीती, केसातील कोंडा, टक्कल पडण्याची अनुवंशिकता. इत्यादी अनेक गोष्टी होमिओपॅथिक चिकीत्सा करताना विचारात घ्याव्या लागतात.
होमिओपॅथी ही व्यक्तीनुरूप औषधांची निवड करत असल्यामुळे प्राकृतिक औषध निवडल्यावर ती बराच काळ चालू ठेवावी लागतात. ती ठरवण्यासाठी मनाची व शरीराची ठेवण, राहणीमान, सवयी, होऊन गेलेले आजार, लक्षणांमधील चढ-उतार, या सर्व बाबींची दखल घेऊन लायकोपोडियम, सेपिया, फॉस्फरस, थुजा इत्यादी औषधे वापरता येतात.
होमिओपॅथिक औषध निवडताना विशिष्ट तसेच दुर्मिळ,विचित्र लक्षणे विचारात घ्यावी लागतात, जसे कोंडा कणांच्या स्वरूपात आहे का? खपल्यांच्या स्वरूपात? तसेच खाज व दाह आहे का नाही? खपल्या काढताना केस गळणे व त्यातून चिकट स्त्राव, रक्त, पाझरणे, केसांबरोबर पाठीवर पुटकुळ्या फोड असतील, काही विशिष्ट आजारांनंतर केस गळणे सुरू होणे, डोक्याला सतत घाम येणे इत्यादी अशा प्रकारच्या लक्षणांवरून सुद्धा औषध निवडण्यासाठी होमिओपॅथिक शास्त्रामध्ये विविध औषधी उपलब्ध आहेत, ज्याच्या वापरामुळे केस गळणे थांबून व आलेले औदासिन्य व न्यूनगंड टाळता येते.
डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ)
चैतन्य होम्योपैथिक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4
शाहुपुरी व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123
रविवारी बंद
कृपया पुढील लेख वाचा —
Hair loss and Homoeopathic Treatment
Long hair is the jewel of an Indian woman, as well as the symbol of her health!!
Be it a Man or a Woman, a Child or a Middle-aged person, it is the hair on the head that reveals the personality of everyone!!!
When the hair starts falling on any part of the body, one feels worried and if the hair is falling on the head, then the worry overwhelms.
Skin is the largest organ in our body and hair is present on all parts of the body except the soles of the feet. There are a total of five million hair follicles in the body. Two percent of them are on the head.
Hair types are determined by the thickness of the hair.
There are two types of hair –
1) Vellus are thin in thickness and short in length.
2) Terminals are thicker and longer than Wales. These hairs are found on the head, beard area, armpits and in men’s pubes. Wales is the hair found on the face of women.
Hair growth is like a cycle. There are three stages in this.
1) Hair grows in Anagen.
2) Catagen– There is a change in the hair.
3) Telogen– In this, the hair shaft changes and hair starts falling out.
An average of 100 hairs fall out every day. Three point five millimeters (3.5mm) of hair grows every day. Females grow a little more than males because hormones influence that growth.
Shaving and sun exposure have no effect on hair growth.
Hair loss or baldness is called Alopecia. When the hair in the body where there is always hair is lost, it is called Alopecia.
There are two types of hair loss.
1) Cicatricial (Cicatricial- Scaring) and
2) Non-Cicatricial (Non-Cicatricial- Non-Scaring)
1) Cicatricial-Scaring– It involves destruction of hair follicles in hair loss. So there is no chance of hair growth in this type of hair loss. Important factors responsible for this are –
• High doses of X-rays,
roasting,
• Due to bacterial infection eg- Tuberculosis, Leprosy After Eczema, Ringworm
• Due to the effect of Viruses
• Due to Dermatitis
• Cancer spreads
2) Non-Cicatricial- Non-Scaring– In this the hair follicles remain intact, so lost hair can grow back. There are some important factors responsible for this –
• Due to severe fever eg. typhoid virus
•Due to bacterial infection- Eczema, Ringworm
• Chemicals or drugs Cancer drugs
• Diseases of the glands – Diseases of the thyroid glands if diabetes is aggravated
• During childbirth and after delivery
Among the different types of hair loss, the important causes are as follows-
* Alopecia Aerate —- is called ‘Hair Loss’. In this disease, the hair appears to fall out in coin-sized or patch-like areas. Such patches are found in any part of the body. But mainly it is found in the scalp. It is found equally in men and women. This problem can happen to some members of the same household. This problem occurs as a result of factors in the immune system.
* Telogen Effluvium – During the cycle of hair on the skin, it goes through all the three stages of anagen, catagen, telogen. Hair follicles in the skin have different positions at the same time. Some hairs are in anagen and some in telogen. In these diseases, the amount of telogen increases, resulting in the loss of 300 hairs per day. This disorder is caused by fever like typhoid fever, malaria, dengue or due to mental stress etc.
* Traction Alopecia – This disease is caused due to constant pulling tension on the hair. Certain types of ponytails put stress on the hair shaft while maintaining the hair. This problem is more common in girls. The hair on the front or sides of the head falls out. It is good to change the structure of the hair.
* Common Baldness –Baldness is a common process. Androgens affect some hair follicles. These androgens are produced by the testicles in males and the testicles and suprarenal glands in females.
The hair change that occurs during baldness is the gradual replacement of terminal hair by fine hair. This process starts anytime after puberty. It starts appearing around 17 years in men and 25 to 30 years in women. The size of the hair follicles decreases and at the same time the anagen size shortens and the rate of telogen shedding increases. In this, the hair on the back and both sides of the head is removed.
When the hair on both the ears starts to fall, after a few days the hair on the middle part of the head (Vertex) falls out and then the frontal hair falls out.
In women, the hair on the front and the middle of the head is first affected. This results in thinning of the hair near the middle, making it look like it has grown.
Let’s look at the cause of hair loss – For example– dandruff, nits, bacteria, if it is the cause, it needs to be treated accordingly.
If a tree does not want to hit the branches to produce flowers, it must go to the roots. That is, there are glands, oil glands, hair follicles under the skin, the medicine that can do the job of keeping these glands functioning properly, the medicine can take care of the hair and increase the efficiency of the glands under the hair.
Scalp inflammation due to constant scratching due to combing and other causes, after taking some antibiotics, vitamin B and vitamin E deficiency as well as mental shock, extreme fear, dandruff, baldness genetics. etc. many things have to be considered while doing Homoeopathic treatment.
Since Homoeopathy is individualized medicine selection, once natural medicine is chosen, it has to be continued for a long time. Medicines such as Lycopodium, Sepia, Phosphorus, Thuja etc. can be used to determine it by taking into account all these aspects of mind and body condition, living conditions, habits, past illnesses, fluctuations in symptoms.
When choosing a Homoeopathic remedy, specific as well as rare, peculiar symptoms need to be considered, such as is the dandruff in the form of particles? In the form of scales? Is there itching and inflammation?
There are various medicines available in Homoeopathic science to choose medicine for symptoms such as hair fall and sticky discharge from it, blood, oozing, blisters on the back along with hair, hair loss after certain diseases, constant sweating of the head etc. And depression and depression can be avoided.
Dr. Ajay Hanmane
M. D. (Homeo)
Chaitanya Homeopathic Clinic
Bhaskar Plaza- F4
Shahupuri Traders Peth
Near Railway Gate Bhaji Mandai
Kolhapur- 416001
Mobile- 7738667123
Sunday Closed
Please Read Next Article-
Skin Diseases and Homeopathy — Part One