व्यर्थ चिंता आणि होमिओपॅथी
काही वर्षांपूर्वी मी माझ्या कुटुंबासमवेत तारकर्लीला गेलो होतो. तेथे पॅरासेलिंगचा अनुभव घेतला. खाली बोटीत माझीच माणसं गप्पा मारत बसली होती.
वर-वर गेल्यावर तिथली निरव शांतता प्रकर्षाने जाणवायला लागली. खालच्या सगळ्या आवाजांपासून दूर मी एकटा होतो. एकांत काय असतो हे त्या दिवशी मी काही मिनिटांसाठी अनुभवलं.
मी आणि मीच होतो तेथे काही काळ !!!
काही वेळा घरात कोणी नसताना, बसमध्ये शेवटच्या स्टॉपवर उतरण्याआधी, लोकलमध्ये लेडीजच्या डब्यात, शाळा-कॉलेजमध्ये एखाद्या दिवशी वर्गात एकटाच उरल्या एकटंच उरल्यावर, ऑफिसमध्ये उशिरापर्यंत काम करत थांबल्यावर, अशा नानाविध प्रसंगात असा एकांताचा, आजूबाजूला कोणी नसण्याचा अनुभव आपण कधी ना कधी निश्चितच घेतलेला असतो. हा शरीराशी संबंधित एकटेपणा असतो, याला आपण एकटं असणं (Being Alone) असे म्हणतो.
अशा प्रसंगात आपण भीती, असुरक्षितता या भावनांची अनुभूती घेतो. हे असंच शारीरिक एकटेपणाही अंगावर येतोचं.
कोरोना साथीतले दिवस आठवले की, किती विचित्र परिस्थिती होती ती. शेजारच्या घरात राहणारे तिथे होते खरे, पण जणू ती भिंत अशी काही अभेद्य होऊन बसली की, त्यांच्याशी संपर्क ही कठीण झाला होता. या काळात अनुभवलेल्या एकटेपणाचे कितीतरी किस्से आजच्या पिढीकडे आहेत.
अनेक इंग्रजी चित्रपटांमध्ये कोणत्यातरी संकटात अडकून एकटं राहण्याचे प्रसंग हीच चित्रपटांची कथा झाली आहे.
ना कोणाशी बोलणं, ना जगण्याची खात्री अशावेळी आस लागते ती फक्त एका सहवासाची !!
प्राचीन काळापासून माणसाच्या भावना जसजशा विकसित होत गेल्या तसतसं त्याचं नागरिकीकरण होत गेलं, समाज आणि समाजाचा सहवास खूप महत्त्वाचा होत गेला. माणूस हा सामाजिक प्राणी असल्याने लादले गेलेलं एकटेपण खूप काळापर्यंत लांबलं तर माणसाच्या मानसिक स्वास्थ्यावर त्याचा परिणाम होतो.
एखादा गुन्हा केल्यावर दिली जाणारी पहिली शिक्षा ही व्यक्ती आणि समाजातल्या लोकांचा सहवास तोडून त्याला एकटे ठेवणे हेच असते हीच असते, हे लक्षात घेता सहवासाचं महत्त्व अधोरेखित होतं.
एकटेपण नेहमीच सगळ्यांना डाचत असं नाही. आपल्या मनाची तयारी करून निश्चित अशा एखाद्या उद्दिष्टासाठी, काहीतरी नवीन अनुभूती घेण्यासाठी, जाणीवपूर्वक निवडलेलं एकटेपण हे एखादी नवनिर्मिती ही करून जातं. रोजच्या धबडग्यातून बाहेर पडून “सोलो ट्रिप” करण्याची संख्या हल्ली वरचेवर वाढताना दिसत आहे. तिथे भीती आणि असुरक्षिततेची जागा ही उत्सुकता, आनंद, नाविन्याची आस यासारख्या सकारात्मक भावनांनी घेतलेली असते.
मध्यंतरी एक तरुण जोडपं, जे माझं पेशंट होतं, त्या तरूणीचा नवरा तिशीमध्येच कर्करोगाच्या आजारांनं अचानक मृत्यू पावला. हे इतकं अनपेक्षित होतं की, ‘त्याच्या बायकोला कोणीही एकटं ठेवेना. या नातेवाईकांच्या भावना निश्चित चांगल्या होत्या, पण दिवाळीच्या एके दिवशी तिने सगळ्यांना सांगितलं की, मला एक दोन दिवस एकटीलाच राहायचं आहे.’ नातेवाईक ही समंजस होते. सगळ्यांनी तिच्या म्हणण्याचा आदर ठेवत तिला तो अवकाश दिला. नवरा गेल्यापासून रोज लोकांना भेटल्यावर ती त्यांच्या मनातल्या त्यांच्या आठवणी ऐकत होती, पण तिच्या मनातला तो आठवायला तिला उसंत, एकटेपणा मिळत नव्हता. तिने मागून घेतलेल्या एकटेपणाने तिला तो अवकाश मिळवून दिला.
स्वतःचा अवकाश मिळविण्यासाठी मुद्दाम एकटं राहणं आणि मनाने एकाकी वाटणं या दोहोत फरक आहे.
पहिला प्रकार मनातला विचारांचा गुंता सोडवायला मदत करू शकतो. एकाकीपणा म्हणजे मात्र, “मनी मानवा व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते…. “
एकाकी पण ही मात्र मनाची स्थिती आहे, त्याचा तुमच्या शारीरिक एकटेपणाशी संबंध असेलच असं नाही.
उदाहरणार्थ – शेकडो फॅन्स असणाऱ्या आणि सहकाऱ्यांच्या गराड्यात वावरणाऱ्या एखाद्या कलाकाराचे एकाकीपण. एकदा एक प्रसिद्ध अभिनेता त्याच्या एका मुलाखतीत म्हणाला होता की, “मला जर मनातलं बोलायचं असेल माझा ताण कोणाशी तरी बोलून घालवायचा असेल तर मी आई-वडिलांकडे जाऊ शकत नाही, कारण त्यांना काय करावे कळणार नाही. उलट मला ताण आला आहे याचा त्यांनाच ताण येईल. मित्रांशी बोलायला बोललो, तर त्यांना एवढंच वाटेल की, यानं मला त्याचा प्रॉब्लेम सांगितला. त्यामुळे मी मनातलं कोणाकडे बोलतच नाही.” अर्थात ही गोष्ट फक्त या स्टार अभिनेत्याचीच नाही, तर अनेक व्यक्तींची सामान्यांची आहे.
अशा वेळेस विपश्यना सारखी मेडिटेशन, ध्यानधारणा याचबरोबर होमिओपॅथिक औषधांची जोड दिल्यास याच्यातून निश्चितपणे ताणमुक्ती होण्यास मदत मिळते.
एकाकीपण ही आता अनेक देशांची एक सामाजिक समस्या झाली आहे. त्यामुळेच जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) त्याची दखल घेत म्हटलं आहे की, ” रोज 15 सिगरेट ओढण्याने आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामाणपेक्षाही भयंकर दुष्परिणाम एकाकीपणामुळे व्यक्तीच्या आरोग्यावर होतो ! (Loneliness could be worse for health than smoking 15 cigarettes a day)”!!!
आपल्याला वाटत असेल की, करोनानं या एकटेपणाच्या समस्येची आपल्याला जाणीव करून दिली. पण वास्तव तस नाही. करोनाच्या आधीही एकाकीपणाची समस्या जगभरात पसरत चालली होती. करोनान त्यात आणखी भर टाकली एवढं मात्र खरं.
भारतातल्या गरिबी, बेकारी, भ्रष्टाचार, शहरं-गावांची दुरावस्था यासारख्या आपल्या रोजचं जगणं त्रासदायक करून टाकणाऱ्या समस्यांच्या वेढ्यात आपलं एकाकीपणाच्या या मानसिक-सामाजिक समस्येकडे दुर्लक्ष झाला असेल, पण जगातल्या अनेक देशांनी या समस्येकडे गंभीरपणे बाहेर सुरुवात केली आहे.
आपण जर एकाकीपणाची व्याख्या पाहिली तर,” एकाकीपण म्हणजे तुम्ही समाजापासून विलग आहात याची जाणीव होणं. ही जाणीव बाहेरचे कोणी करून देत नाहीत, तर ती ज्याची त्यालाच होते.” आता या व्याख्येकडे बघितलं, तर जे समस्येचे कारण आहे, त्यातून उपाय सापडू शकतो असे म्हणता येईल. म्हणजे ज्या व्यक्तीला एकाकीपण जाणवतं त्यालाच पुढाकार घेऊन त्यावर मात करण्यासाठी उपाय करावे लागतील.
एकाकीपणाची तीव्र भावना हे आत्महत्या मागील एक महत्त्वाचं कारण आहे, असं जपान सरकारच्या लक्षात आलं म्हणून त्यांनी “मिनिस्ट्री ऑफ लोनलीनेस” सारखं मंत्रालय सुरू केलं. त्याच्या पाठोपाठ ब्रिटिश सरकारनेही त्याच पद्धतीने एक मंत्रालय सुरू केलं.
जर एखादी व्यक्ती दीर्घकाळापर्यंत सामाजिक देवाणघेवाणी पासून दूर असेल आणि स्वतःला घरात बंद करून घेत असेल तर, तो केवळ एका व्यक्तीची मानसिक समस्या न मानता ते एक सामाजिक घटना आहे, असं जपानमध्ये मानतात कारण तो देश सामुदायिक जीवनाला महत्त्व देणारा देश आहे.
अशा प्रकारच्या एकाकीपणामुळे अपराधी वाटणं (गिल्ट) दुष्चिंता (एन्झायटी) अशा मानसिक आजारांची शक्यता वाढते.
एका अहवालानुसार, एकाकीपणाचा सर्वात जास्त दर हा ब्राझील, तुर्कस्तान, भारत आणि सौदी अरेबिया या देशांत आहे.
वैयक्तिक आयुष्यात आलेली वेगवेगळी कारण सोडता,जीवनात अचानक होणारे बदल, मानसिक आरोग्याच्या समस्या, स्व-आदराचा अभाव आणि व्यक्तिमत्त्वातले काही घटक या एकाकीपणाला कारणीभूत असतात.
हा एकाकीपणा तीन प्रकार विभागण्यात येतो.
1)सर्वात पहिलं भावनिक एकाकीपण – या व्यक्तींच्या आयुष्यात अर्थपूर्ण नातेसंबंधाचा अभाव असतो. मग ते वैवाहिक नातेसंबंध असोत की कौटुंबिक, मैत्रीसारखी सामाजिक नाती. त्यामुळे आपला आनंद, दुःख आणि इतर भावना त्यांना कोणालाच सांगता येत नाहीत.
2) दुसरा प्रकार, सामाजिक एकाकीपण– आधुनिक काळातल्या अनेक प्रसंगाबरोबरच मला इथे संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांनी सहन केलेला सामाजिक बहिष्कार आठवतो.
3)तिसऱ्या प्रकारामध्ये आपण एकटेच आहोत, आपल्याला कोणाशी काहीच देणं घेणं नाही, ही विरक्तीची भावना “अस्तित्वात्मक एकाकीपण ” (Extensional Loneliness) आढळते.
एकंदर, एकाकीपणाच्या या जागतिक समस्येची व्याप्ती पाहता, मानसिक-सामाजिक समस्येवर होमिओपॅथिक उपचार पद्धतीचा खूप उपयोग होऊ शकतो. आणि या शास्त्रामध्ये अनेक अत्यंत महत्त्वपूर्ण गुणकारी औषधे उपलब्ध आहेत, ज्याचा उपयोगाने एकाकीपणांन ग्रासलेल्या व्यक्तींना मदत होऊ शकते, त्यांच्या एकाकीपणामुळे अपराधी वाटणं (गिल्ट) दुष्चिंता (एन्झायटी) वाटणं, इत्यादी आजार कमी होऊन तसेच त्यांचे एकाकीपण कमी होऊन त्यांना परत सामाजिक प्रवाहात आणता येऊ शकतं.
डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ) HHF, ICR Kolhapur,
चैतन्य होम्योपैथिक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4, HDFC बॅंकेजवळ,
शाहुपुरी व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123, 904507723
रविवारी बंद
कृपया पुढील लेख वाचा –—