समस्या नियंत्रणाची / ENCOPRESIS

Dorctor Pic By Dr. Ajay HanmaneJune 11, 2024 Anxiety Behaviour problems Children Problems General Information Homeopathic and Cure Mental Health

 

समस्या नियंत्रणाची

विकास हा आठ वर्षाचा खट्याळ मुलगा, चळवळ्या, बंडखोर आणि मस्तीखोर ही !विकासबद्दल शाळेतील शिक्षकांकडून अनेक तक्रारी यायच्या. त्यातच एक नवीन तक्रारीची भर पडली. विकास हल्ली कपड्यातच नैसर्गिक विधी करायला लागला होता. शाळेतील शिक्षकांनी एक दोन वेळा हटकले परंतु त्याने साफ नकार दिला. आता तर मित्रांनाही त्याच्या शेजारी वर्गात बसण्याची घाण वाटायची.

आई-वडिलांनी विकासला समजावून पाहिले, रागावून, मारून, शिक्षा करूनही फरक पडेना तेव्हा ते होमिओपॅथिक उपचारासाठी ‘चैतन्य क्लिनिक’ मध्ये घेऊन आले.

ही समस्या होती मलोत्सर्गाच्या नियंत्रणाची याला शास्त्रीय भाषेत इन कॉपरेसिस (Encopresis) असे म्हणतात. ही समस्या प्रामुख्याने लहान मुलांमध्ये दिसून येते. या समस्येत नैसर्गिक विधीवर नियंत्रण करायला शिकलेले मुल,  पुन्हा एकदा वारंवार कपड्यांमध्ये मलविसर्जन करू लागते. कधी कधी आजारपणात जुलाब होत असताना अनियंत्रितपणे किंवा नकळत कपडे खराब होणे या गोष्टी या समस्येत येत नाहीत.
इन कॉपरेसिस (Encopresis) कपड्यांमध्ये मलविसर्जित करतात याला बऱ्याचदा विसर्जनाची भावनाच होत नाही. मग नकळत कपडे खराब झाल्यावर मूल ही गोष्ट इतरांपासून लपवायचा प्रयत्न करते किंवा सरळ सरळ अमान्यच करते. बऱ्याच वेळा पालकांना या समस्येची माहितीच नसते. त्यामुळे आपले मूल खेळताना किंवा शाळेत शाळेत लक्षात न आल्यामुळे असे वागते अशा समजुतीने ते मुलांना समजवतात. तरीही गोष्ट चालू राहिल्याने मुलांना शिक्षा करतात, मारतात.
इतरांच्यात त्यांना खूप मानहानी सहन करावी लागते. इतर मुले त्यांना चिडवतात, त्यांची हेटाळणी करतात व ही समस्या अधिक गुंतागुंतीची होत जाते.
साधारण एक ते तीन टक्के मुलांमध्येही समस्या आढळते. त्यामध्ये मुलांच्यात मुलींपेक्षा तीन पट प्रमाणात समस्या आढळते. ही समस्या मूलतः मलावरोधाच्या (कॉन्स्टिपेशन-Constipation) समस्येची निगडित असल्याचे आढळते. ज्या मुलांमध्ये बराच काळ मलावरोध असतो. त्यांच्या आतड्यात मळ कोरडा व घट्ट झाल्याने साठवून राहतो व हळूहळू मलविसर्जनाची भावना जाणवणे मंदावते. अशा मुलांमध्ये मग आतडी रुंदावतात आणि ढिली होतात आणि काही द्रवरुपी मळ नकळत बाहेर येऊ लागतो.
 विशेषतः –
  • अति गोड पदार्थ,
  • शीतपेय आणि
  • बाहेरच्या स्नॅक्सचे अति सेवन,
  • पुरेसे पाणी न पिणे,
  • आणि तंतुमय पदार्थ सेवन न करणे,
  • व्यायामाचा अभाव.
  • नियमित नैसर्गिक कृतीचा कृतींच्या सवयीचा अभाव
  • काही मानसिक समस्या
या गोष्टीत इन कॉपरेसिस (Encopresis) ही समस्या अधिक निगडित असल्याचे दिसून येते.
शिवाय या समस्येमुळे मुलाला हटाळणी, शिक्षा, अपमान, सहन करावा लागल्याने काही मानसिक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. म्हणून अशी उपाययोजना शारीरिक आणि मानसिक दोन्ही स्तरावर करणे गरजेचे ठरते.
यावर उपाययोजना करतात करताना पुढील गोष्टी लक्षात  घ्याव्या लागतात —
  • मुलांचा हट्ट संतुलित व पोषक असणे,
  •  योग्य प्रकारे नैसर्गिक विधीची सवय लावणे आवश्यक असते,
  •  मुलांना पुरेसा व्यायाम,खेळ शारीरिक चलन वलन असणे आवश्यक असते,
  • या समस्येबरोबर काही वेळाने मुलांमध्ये थायरॉईड ,मधुमेह व इतर पोटाचे आजार आढळतात . याचे निदान व उपचार करणे गरजेचे असते.
  • काही मुलांमध्ये या समस्येबरोबर अति चंचलता, वर्तणूक समस्या, बंडखोवृत्ती अशा मानसिक समस्याही आढळतात.
  • तसेच काही वेळा चुकीचे पालकत्व, घरातील सदोष वातावरण यामुळे ही अशा समस्या वाढतात.
अशावेळी तज्ञांचा सल्ला व समुपदेशन आवश्यक असते.
याशिवाय लक्षण साधम्याऀवरुन  विविध होमिओपॅथिक औषधे यावर उत्तम गुणकारी ठरतात.
तज्ञांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेणे हितावह ठरत नाही.

डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ) HHF, ICR Kolhapur,
चैतन्य होमिओपॅथीक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4, HDFC बॅंकेजवळ,
शाहुपुरी व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123
रविवारी बंद  

कृपया पुढील लेख वाचा  —

————————————————————–

ENCOPRESIS

Vikas is an eight-year-old mischievous boy, movement, rebel and fun ! There were many complaints from school teachers about the development. A new complaint was added to it. Vikas had recently started performing natural rituals in clothes. The school teachers reprimanded him a couple of times but he flatly refused. Now even his friends felt dirty sitting next to him in class.
When the parents explained Vikas, anger, beating and punishment did not make any difference, they brought him to ‘Chaitanya Clinic’ for Homoeopathic Treatment.
This was a problem of control of bowel movements, scientifically known as Encopresis. This problem is mainly seen in children.
In this problem, the child who has learned to control the natural ritual once again starts defecating in clothes.
Sometimes uncontrollable or inadvertent soiling of clothes during diarrhea does not come into this problem.
Encopresis causes stool to pass through clothing, often with no sensation of defecation. Then, when the clothes are unknowingly damaged, the child tries to hide it from others or simply rejects it. Many times parents are not aware of this problem. So they explain to children with the belief that their child behaves like this while playing or at school without being noticed. Still, as the story continues, the children are punished and beaten.
Among others they suffer a lot of defamation. Other children tease them, make fun of them and the problem becomes more complicated.
About one to three percent of children also have the problem. The problem is three times more common in boys than in girls. This problem is basically related to the problem of constipation.
In children who have chronic constipation, the stool becomes dry and hard and gets stored in the intestine and the sensation of defecation gradually slows down. In such children, the bowels then become dilated and loose, and some liquid stools begin to pass involuntarily.
In particular
  • Super sweet foods,
  • Soft drinks and
  • Excessive consumption of outside snacks,
  • Not drinking enough water, and
  •  Not consuming fibrous foods,
  • Lack of exercise.
  • Absence of habit of regular natural actions and actions
  • Some Mental Problems
Encopresis appears to be more involved in this.
Moreover, due to this problem, the child is likely to suffer some mental problems due to having to suffer removal, punishment, humiliation.
Therefore, it is necessary to take such measures at both physical and mental levels.
While taking measures for this, the following points have to be kept in Mind —
  • Children’s appetite should be balanced and nutritious,
  • It is necessary to practice natural rituals properly,
  • Children need adequate exercise, sports and physical activity.
  • Along with this problem, it is necessary to diagnose and treat Thyroid diabetes and other Stomach diseases in Children after some time.
  • Some Children also have Mental Problems such as Hyperactivity, Behavioral problems, Rebelliousness along with this problem.
  • Also, sometimes Wrong Parenting, Faulty Environment at home increases such problems.
In such cases expert advice and counseling is required.
Apart from this, various Homoeopathic Medicines are effective based on the symptoms.
It is not advisable to take any Medicine without expert advice.

Dr Ajay Hanmane
M.D.(Hom) HHF,ICR Kolhapur,
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4, Near HDFC Bank,
Bhaskar Plaza Vyapari Peth, Shahupuri
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
Mobile No. 7738667123
Sunday Closed.

Please Read Next Article-