भावनिक असंतुलनांच्या दुष्परिणांमावर प्रभावी होमिओपॅथिक उपचार / Effective Homoeopathic Treatment For Side Effects of Emotional Imbalances

Dorctor Pic By Dr. Ajay HanmaneJuly 22, 2024 Academic Problems Behaviour problems Children Problems General Information Homeopathic and Cure Mental Health Psychiatry Uncategorized

भावनिक असंतुलनांच्या दुष्परिणांमावर प्रभावी होमिओपॅथिक उपचार

रोहित वर्गातला लाजाळू पण हुशार मुलगा थोडासा चंचल, वेंधळा, पण अभ्यासात नेहमी चांगले मार्क मिळवणारा. पाचवीत आल्यापासून मात्र शाळेत जायला नको असायचं. अभ्यासातीलही त्याचा उत्साह कमी झाला होता.
पाचवीतल्या दोनही घटक चाचणीत त्याला मार्क खूप कमी मिळाले. तेव्हा मात्र त्याचे आई-वडील अस्वस्थ झाले. रोहितला घेऊन ते ” चैतन्य होमीओपॅथीक क्लिनिक ” मध्ये आले. तेव्हा त्याचा समज होता की त्याला स्मरणशक्ती वाढविण्याच्या औषधाची गरज आहे. पण जेव्हा रोहितशी मैत्री करून, त्याला विश्वासात घेऊन गप्पा मारल्या तेव्हा त्याच्या अभ्यासाच्या अधोगतीच रहस्य मला समजलं.
रोहित हुशार होता पण त्याला वर्गशिक्षकांचं लक्ष वेधून घ्यायला आवडत असे.पण त्याचा आत्मविश्वास मात्र कमी होता. त्यामुळे जरा जरी कोणी टीका केली व रागावले तर मात्र तो फार अस्वस्थ आणि नाउमेद व्हायचा.
चौथी पर्यंतच्या त्याच्या वर्गशिक्षिका या प्रेमळ होत्या.त्याचा स्वभाव ओळखून त्याला त्या सतत प्रोत्साहन द्यायच्या. पण पाचवीचे सर मात्र खूप कडक होते.एक दिवस त्यांनी रोहितच्या वेगळेपणावर, चंचलपणावर भर वर्गात त्याची टीका केली, तेव्हा त्याला ” मेल्याहूनही मेल्यासारखं “झालं. त्या सरांचा त्याने खूपच धसका घेतला की, त्याला वर्गात पाऊल टाकावेसे वाटेना. अभ्यासात लक्ष लागेना. त्यामुळे हळूहळू त्याचे मार्क कमी पडू लागले. वर्ग शिक्षकांबरोबर आणखीनच भीतीला सामोरे जावं लागलं. कुणालाही न सांगितलेला अपमानाचा हा प्रसंग  सांगितल्यावर मला कोड उमगलं !
त्याचा स्वभाव, त्याची मानसिक अवस्था, त्याची शारीरिक प्रकृती, तसेच झाल्या प्रसंगाचा त्याच्यावर झालेला परिणाम….या सगळ्यांचा अभ्यास करून त्याला होमिओपॅथिक औषध सुरू केलं. त्याबरोबर त्याच्या पालकांशी सविस्तर बोलून त्याचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रोत्साहन मिळावं, म्हणून योग्य ते मार्गदर्शन केलं. या सगळ्याचा परिणाम म्हणून तू पुढील वर्षाच्या परीक्षेत वर्गात पहिला आला.
गौतम वय वर्ष आठ. सध्या आईबरोबर राहतो. आई-वडिलांच्या घटस्फोटानंतर विलक्षण अबोल झाला.  एकटा राहत होता. अभ्यासातही मागे पडला.
श्रीवर्धन वय वर्ष सात. बॉम्बस्फोटांच्या बातम्यांची दृश्ये पाहिल्यापासून सतत भीतीच्या दर्पणाखाली असल्यासारखा वागतो. त्याला कसं समजावयाचं कळत नाही. “स्फोटांचे सगळे जग वाईट आहे”, असं त्याला वाटते. खूप असुरक्षित वाटते.
सारिका वय वर्ष 11.  या मुलीच्याही वागण्यात एकाएकी बदल झाला. उलटून बोलायला लागली. मोबाईल फोनच्या आकर्षणाच्या अधीन झाली
अशी अनेक उदाहरणे आपल्या आजूबाजूला दिसू लागतात. या सर्व मुलांच्या अनेक समस्यांमध्ये होमिओपॅथिक औषधे योग्य प्रकारे मदत करू शकते. 
लहानपण हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. त्यात लहान मुलांचा बौद्धिक, मानसिक, भावनिक व शारीरिक विकास व्हायला हवा, म्हणजे पौगंड, तारुण्य व प्रौढावस्थेतील अनेक समस्या आपण टाळू शकतो. बऱ्याच पालकांना याची जाणीव नसते.
काही कारणांमुळे मुलं भावनिक दृष्ट्या विचलित किंवा अस्वस्थ असतात. तेव्हा त्याच्या अभ्यासावरही परिणाम होऊ शकतो.
उदाहरणार्थ –मानसोपचार तज्ञांनी केलेल्या विविध प्रयोगात असे दिसते की,  “ज्या मुलांच्या मनात दडपण किंवा अनामिक भीती जास्त प्रमाणात असते, ती मुलं गुंतागुंतीची बौद्धिक काम करताना नेहमीच्या बौद्धिक क्षमतेपेक्षा मागे पडतात. लहान मुलांना लिहायला किंवा वाचायला ज्या समस्या येतात त्याही काही प्रमाणात भावनिक असंतुलनामुळे निर्माण झालेल्या असतात. त्यामुळे पालकांनी लक्षात घेणे फार महत्त्वाचे आहे की, मुलांच्या शाळेतल्या अभ्यासाच्या समस्या नेहमीच एकाग्रता व सहन शक्तीच्या अभावी नसतात, तर इतर अनेक कारणांमुळे उद्भवू शकतात.”
उदाहरणार्थ खूपदा वयात येताना आपल्या शरीरात होणारे संप्रेरकांचे बदल (हार्मोन्स), आपल्या संपूर्ण शरीराबरोबर मज्जासंस्थेवर ही परिणाम करतात. त्यामुळे मुलांमध्ये चंचलता, विचलित मनोवृत्तीचा मानसिक स्थितीवर बदल होताना दिसतात.
प्राचीची समस्या थोडीफार अशीच होती. सहावीपर्यंत ती वर्गातली हुशार मुलगी होती. आवडीने अभ्यास करायची. सातवीत गेल्यावर मात्र आईला तिच्यात चांगलाच बदल जाणवायला लागला.नेहमी ती आपल्या विचारात हरवल्यासारखी वाटायला लागली. पुस्तक डोळ्यापुढे घेऊन खूप वेळ बसायची, पण आई अभ्यास घेऊ लागली की, एकही प्रश्नाचं उत्तर द्यायला येत नव्हतं. तिचा अभ्यास अपुरा व्हायला लागला. वर्ग शिक्षकांनी तक्रार केली, तिची  स्मरणशक्ती, एकाग्रता सगळंच विचलित व्हायला लागलं.
या समस्येच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा लक्षात आलं की, पोगंड अवस्थेत प्रवेश करणारी प्राची यामुळे तिच्यात बरेच बदल घडून येत होते. ती आता बारा वर्षाची मुलगी झाली होती. तेव्हा आईने तिला मासिक पाळी, शारीरिक बदल यांची माहिती दिली होती. पण शाळेतील मैत्रिणीकडून याविषयी भडक माहिती आणि बरीचशी चुकीची माहिती  यापूर्वी तिला मिळाली होती. त्यामुळे हल्ली ती सतत त्याच्याच विचार करून हरवून जायची. शरीरात होणारे बदल त्यामुळे मानसिक उत्तेजन, शारीरिक गोष्टींबद्दल वाढलेलं कुतूहल, मैत्रिणींबरोबर सारखे याच गोष्टींवर चर्चा, हास्य-विनोद यामुळे सध्या तिला अभ्यासात रस वाटत नव्हता. तिला बुद्धी वाढण्याचं टॉनिक द्यायची गरज नव्हती.
पौगंड अवस्थेबद्दलची माहिती, समुपदेशन आणि मानसिक स्वास्थ्यासाठी दिलेली होमीओपॅथीक औषधं त्यामुळे तिची समस्या लवकरात लवकर दूर झाली.
यावरून आपल्याला असे लक्षात येईल की, आपल्या मुलांच्या अभ्यासात येणाऱ्या अडचणी समजून घेण्यासाठी, त्यांची शारीरिक व मानसिक स्थिती जाणून फार महत्त्वाचं आहे. कधी कधी मुलांची शारीरिक समस्या ही त्यांच्या अभ्यासाच्या आड येऊ शकते.
उदाहरणार्थ लोहाची किंवा काही जीवनसत्त्वांची कमतरता, दृष्टीदोष- फळ्यावरचं न दिसणं, श्रवणदोष याचा त्यांच्या शाळेतल्या प्रगतीवर परिणाम होतो.
मुलांमधील अध्ययन क्षमता (लर्निंग डिसऑर्डर) ही त्यांच्या विकासातली अडथळा बनू शकते.
मुलांच्या शारीरिक समस्या दूर करून, काही अध्ययन समस्यासाठी मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने शिक्षण देणाऱ्या शाळेत घालणे अशा  मार्गाने अडथळे कमी करता येतात.
काही वेळा मुलांचा बौद्धिक बुद्ध्यांक अगदी सामान्य किंवा सरासरीपेक्षा थोडा कमी 90 पेक्षा थोडा कमी असेल तर वर्गात शिकविल्या जाणाऱ्या गोष्टींचं त्याला पटकन आकलन होत नाही. मग नाउमेद, निराश झालेला मुलगा अस्वस्थपणे हरवल्यासारखा वर्गात बसू लागतो. तर एखाद्या चुणचुणीत मुलगा पाच मिनिटात वर्गपाठ  पूर्ण करून इतरांच्या खोड्या काढायला लागतो किंवा वर्गात शिकविला जाणाऱ्या गोष्टी खूप सोप्या वाटल्याने त्यांना शाळेच्या अभ्यासाचा कंटाळा येतो, कधी कधी मुलांना एखादा विषय समजत नसेल शिक्षकांची भीती वाटत असेल, इतर मुलं त्याला काही कारणाने धमकावत चिडवत असतील तर अशा अनेक कारणांनी  मूल शाळेत जायचे टाळते किंवा अभ्यासात मागे पडते.
कधी कधी घरातले वाद-विवाद, चिडचिड करणारे, विनाकारण रागावणारे पालक, पालकांच्या स्वतःच्या मानसिक समस्या यामुळे ही मुलं भावनिक दृष्ट्या अस्वस्थ, असंतुलित होतात तर त्यांच्या शालेय प्रगतीवर परिणाम होतो.
पालक अगदी परीक्षेच्या काळात अशा मुलांना डॉक्टरकडे घेऊन येतात. त्यांना वाटते डॉक्टरने काहीतरी टॉनिक द्यावं आणि मुलांचा अभ्यास पटकन जादूसारखा सुधारावा. मुलांमध्ये बदल व्हावा. म्हणून पालक अधिर असतात.
औषधाने मुलांमध्ये खूप चांगले परिणाम दिसतात सकारात्मक बदल होतात पण हे होमिओपॅथिक औषधाने शक्य आहे.  होमिओपॅथीक औषधामुळे सकारात्मक बदल होतात पण मुलांच्या वातावरणातले बरेच प्रसंग समस्येला कारणीभूत असतात म्हणून औषधोपचारांबरोबर योग्य मार्गदर्शन आणि समुपदेशनाची जोड देणे आवश्यक असते. त्यामुळे समस्या लवकरात लवकर निवळू शकतात.
मुलांचे  शाळेतील वातावरण, शाळेतील ताणतणाव, गृहपाठ, परिस्थिती, दडपण वर्गातील मित्रांचा ताण इत्यादी अनेक बाबतीत मुलांना मैत्रीची गरज असते. काही मुलांना पालकांविषयी तसेच घरगुती समस्येविषयी बोलून मोकळ व्हायचं असतं. त्यातल्या काही समस्या गंभीर असतात. उदाहरणार्थ घटस्फोट, घरातलं आजारपण, या सगळ्यांचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
मुलांच्या समस्येवर, त्यांचा स्वभाव, त्यांची प्रकृती, घरातील वातावरण इत्यादींचा अभ्यास करून विविध होमिओपॅथीक  औषधे देता येतात. या औषधांनी मुलांचे मानसिक संतुलन सुधारतं व त्यांच्या भावनिक व वागणुकीतील  समस्यांमध्ये ही सुधारणा होते. त्यात मुलांची एकाग्रता व स्मरणशक्ती सुधारते. त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचावतो.
म्हणून पालकांनी मुलांच्या मानसिक स्वास्थ्याची काळजी घेणे व होमिओपॅथीक औषधे नियमित सुरू ठेवणे ही आजच्या काळाची महत्त्वाची गरज आहे.

डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ) HHF, ICR Kolhapur,
चैतन्य होमिओपॅथीक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4, HDFC बॅंकेजवळ,
शाहुपुरी, व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123
रविवारी बंद  

कृपया पुढील लेख वाचा  —

————————————————————-

Effective Homoeopathic Treatment For Side Effects of Emotional Imbalances

Rohit is a shy but smart boy in the class, a bit restless, blind, but always getting good marks in his studies. Since coming to the fifth standard, he did not want to go to school. His enthusiasm in studies was also reduced.
He got very low marks in both the five factor tests. But then his parents were upset. He came to “Chaitanya Homeopathic Clinic” with Rohit. He knew then that he needed a memory-enhancing drug. But when I befriended Rohit, took him into confidence and chatted, I understood the secret of his decline in studies.
Rohit was smart but he liked to get the attention of the class teacher. But his self-confidence was low. So even if someone criticized and got angry, he would get very upset and disappointed. His class teacher till 4th was loving. She recognized his nature and encouraged him constantly. But Pachavi’s head was very strict. One day he criticized Rohit in the class for his isolation and fickleness, when he felt “deader than dead”. He was so shocked by that sir that he didn’t want to step into the classroom. Not paying attention to studies. So gradually his marks started decreasing. Had to face more fear with class teachers. After telling this episode of humiliation that was not told to anyone, I got the code!
After studying his nature, his mental state, his physical condition, and the effect of the incident on him, he started homeopathic medicine. Along with that, by talking to his parents in detail, he should be encouraged to increase his confidence, so he gave appropriate guidance. As a result of all this, you came first in the class in the next year’s exam.
Gautam is eight years old. Currently lives with mother. After the divorce of his parents, Paradika Abol was born. Lived alone. He also fell behind in studies.
Srivardhan is seven years old. Ever since watching the news footage of the bombings, he acts as if he is constantly under a mirror of Fear. He does not know how to understand. “The whole world of explosions is bad”, he thinks. Feels very vulnerable.
Sarika age 11. This girl also suddenly changed her behavior. She turned and started talking. Surrendered to the addiction of mobile phones.
Many such examples are seen around us. Homoeopathic Medicines can effectively help in many of these Children’s problems.
Childhood is a very important stage. There should be intellectual, Mental, Emotional and Physical development of children, that means we can avoid many problems in adolescence, youth and adulthood. Many parents are not aware of this.
Children are Emotionally disturbed or upset due to some reasons.
Then his studies can also be affected. For example, various experiments conducted by psychiatrists show that “children who have high levels of Anxiety or Fear of anonymity fall behind normal intellectual ability when performing complex intellectual tasks. Problems with reading or writing in young children are also partly due to Emotional Imbalances.”
So it is very important for parents to note that their children’s study problems in school are not always due to lack of concentration and stamina, but can be caused by many other reasons.
For example, the changes in Hormones that occur in our bodies as we age often affect our entire body as well as our Nervous System. Because of this, restlessness, distracted attitude and change in Mental status are seen in children.
Prachi’s problem was somewhat similar. She was the smartest girl in the class till sixth grade. Love to study. But after going to seventh grade, Mother started to feel a good change in her. She always seemed to be lost in her thoughts. She used to sit with the book in front of her eyes for a long time, but when she started studying, she could not answer any question. Her studies became inadequate. The class teacher complained, her memory, concentration all began to deviate.
When we tried to get to the root of the problem, we realized that Prachi, entering the Adolescence stage, was undergoing many changes in her. She was now a twelve year old girl. Then the Mother had informed her about menstruation, physical changes. But she had previously received a lot of misinformation about it from a school friend. So now she used to get lost thinking about him all the time. Due to Mental stimulation due to changes in body, increased curiosity about physical things, discussions on the same things with friends, laughter and jokes, she was not interested in studies at present. She didn’t need to be given a brain tonic.
Adolescent information, counseling and Homoeopathic Medicines for Mental Health helped to resolve her problem quickly.
From this we will realize that, in order to understand the difficulties faced by our children in their studies, it is very important to know their Physical and Mental condition. Sometimes physical problems of children can hinder their studies.
For example deficiency of iron or certain vitamins, visual impairment – inability to see the board, hearing impairment affects their progress in school.
A Learning disorder in children can become a hindrance to their development.
By addressing children’s physical problems, barriers can be reduced by placing children in schools that provide differentiated instruction for certain academic problems.
Sometimes a child with a normal or slightly below average IQ of a little less than 90 does not quickly grasp what is being taught in the classroom. Then the despondent, disillusioned boy begins to sit in the classroom feeling uncomfortably lost.
So a certain child completes the lesson in five minutes and starts playing pranks on others, or because the things taught in the class are too easy, they get bored of school studies, sometimes the children do not understand a subject and are afraid of the teacher, if other children are threatening and teasing them for some reason, etc. A child avoids going to school or falls behind in studies due to reasons.
Sometimes arguments at home, irritable, angry parents, parents’ own Mental problems make these children Emotionally disturbed, unbalanced and affect their school progress.
Parents bring such children to doctors even during exams. They think the doctor should give some tonic and magically improve the children’s studies. Children should change. So parents are adamant.
Medicine shows very good results in children and positive changes are possible but this is possible with Homoeopathic Medicine. Homeopathic Medicine can bring about positive changes but many factors in the child’s environment are the cause of the problem so proper guidance and counseling should be added along with the Medicine. So the problem can be solved as soon as possible.
Children need friendship in many ways like school environment, school stress, homework, surrounding, pressure from class friends etc. Some children want to feel free to talk about their parents and domestic problems. Some of these problems are serious. For example, divorce, illness at home, all these can affect the Mental Health of children.
Various Homeopathic Medicines can be given by studying the problem of children, their nature, their condition, home environment etc. These drugs improve Mental balance in children and improve their Emotional and Behavioral problems. It improves concentration and memory of children. Hence their educational progress graph rises.
Therefore, parents should take care of their children’s Mental Health and continue taking Homeopathic Medicines regularly.

Dr Ajay Hanmane
M.D.(Hom) HHF, ICR Kolhapur,
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4, Near HDFC Bank,
Bhaskar Plaza Vyapari Peth, Shahupuri
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
Mobile No. 7738667123
Sunday Closed.

Please Read Next Article-