मागील दोन महिन्यात अस्वस्थ करणाऱ्या दोन घटना आपण बघितल्या. एक म्हणजे मणिपूरमध्ये स्त्रियांच्यावर झालेले अत्याचार आणि दुसरी म्हणजे महाडमध्ये दरड कोसळल्यामुळे झालेली मनुष्यहानी.
एक आपत्ती मानवनिर्मित दुसरी अर्धी-मानवनिर्मित आणि अर्धी-नैसर्गिक अशी म्हणावी लागेल. मानसिक आरोग्याच्या दृष्टीने विचार करता अशा घटना वारंवार जगभरात अनेक ठिकाणी घडत असतात तेव्हा त्यांची ती मानसिक प्रतिक्रिया असते ती फार महत्त्वाची असते.
त्यांची जी त्या घटनेमध्ये अनुभवलेल्या व्यक्तींची मानसिक प्रतिक्रिया असते ती फार महत्त्वाची ठरते.
आपत्तीचा अनुभव प्रत्येक माणसाला येत नाही. पण ज्याने ती अनुभवली तो माणूस पूर्वीचा राहत नाही.
आपत्ती माणसाचं माणूसपण हिरावून घेते काही माणसांच्या बाबतीत आपत्तीमधून होणाऱ्या आघाताचा परिणाम आयुष्यभर टिकणार असतो. म्हणून त्याच्याकडे लक्ष द्यायला हवं.
कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत माणसाचं होत्याच नव्हतं होत. भूकंप, पूर, दुष्काळ अशी संकट बघता बघता माणसाला अस्थिर करून टाकतात. जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूने जगण्याचे संदर्भ बदलतात .
लैंगिक अत्याचार, शारीरिक इजा करतातच पण दूरगामी मानसिक आघातही करतात. याचे मानसिक परिणाम होतात. यातून मानसिक समस्या आणि मानसिक आजार दोन्ही सुरू होऊ शकतात.
इतर मानसिक आजार आणि आपत्तीतून तयार झालेले आघात यातील प्रमुख फरक असा की, आपत्तीतून होणाऱ्या आघातांमुळे मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारची लक्षणे दिसतात.
इतरही अनेक आघात असतात. पालकांचा मृत्यू, एका पालकांचं अचानक सोडून जाणं, शिक्षणासाठी म्हणून अचानक होस्टेलवर किंवा आई-वडिलांपासून लांब जावं लागणं.अशी अनेक कारणं त्यामागे असू शकतात.
फसवणुकीतून झालेला आघात (बिट्रेयल ट्रॉमा Betrayal Trauma) ) हा आघाताचा आणखी एक प्रकार आहे.
जोडीदाराच्या अनेक वर्षांपासूनच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल समजणं,
आपल्या पैशाचा आपल्याच जवळच्या व्यक्तीने न सांगता अपव्यय केला असल्याचा समजणं,
जवळच्या नात्यात असलेली आणि समाजमान्य नसलेले संबंध अचानक समाजासमोर येणं आणि त्याचा कुटुंबीयांना धक्का बसल्याचे जाणवणे…..इत्यादी
एकूण काय, तर अचानक काहीतरी घडणं आणि त्यामुळे एकूण आयुष्य अस्थिर होऊन जाणं याने आघात होतात.
माणूस काही लाख वर्षांच्या उत्क्रांतीमधून पुढे आला आहे आणि या सगळ्या काळात अनेक टप्प्यांमध्ये माणसा माणसाच्या मेंदूची जडणघडण झाली आहे, हे आपणास माहित आहे.
मानवी जमातीचा खूप मोठा काळ संकटांशी सामना करण्यात आणि स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी उपाय शोधण्यात गेला आहे. जगण्यात स्थैर्य असेल तर आपण अधिक काळ जिवंत राहू शकतो हे माणसाच्या लक्षात आलं आणि त्यानुसार मानवी मेंदू आणि एकूण शरीराची रचना होत गेली.
पण त्यामुळे होत असं की, जेव्हा आपत्ती येते तेव्हा माणूस पुन्हा स्वतःच्या आदीम स्वरूपात जातो. आपत्तीचा आघात मोठा असेल तर तो पुढेही कायम संकटात असल्याचा विचारात आणि भावनेत जगतो.
अमित अगदी लहान असताना जवळच्या नातेवाईकाने त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. मुलगा असल्याने त्याबद्दल तो कोणालाच कधी काही सांगू शकला नाही. त्याच्याजागी एखादी मुलगी असती तर असं काही झालं होतं यावर लोकांनी किमान विश्वास तरी ठेवला असता. अमितवर झालेले लैंगिक अत्याचार इतके वेदनादायी होते की, तेव्हापासून तो शांतपणे झोपू शकलेला नाही. सतत भीतीच्या सावटातच जगतो. जग सुरक्षित नाही अशी त्याची पक्की समजूत झाली आहे.
आघातामध्ये सगळ्यात जास्त परिणाम मज्जासंस्थेच्या कामावर होतो. आपल्या मेंदूमध्ये भावनिक मेंदूची वेगळी जागा असते.
कोणत्याही संकटाच्या वेळी भावनिक मेंदूमधील अमीग्डाला (Amygdala) हा भाग उद्दीपित होतो आणि संकटांपासून वाचण्यासाठी शरीराची तयारी करतो. संकट संपलं की, अमीग्डाला (Amygdala) शांत होतो आणि आपण नेहमीच्या गोष्टी करू लागतो.
पण ज्यांनी आघात पोचलेला असतो त्यांचा भावनिक मेंदू (Emotional Brain) शांतच होत नाही. तो कायमच संकटाला सामोरे जाण्यासाठी तयार असतो.
विचार करा, मन कधी शांत झालं नाही तर काय होत असेल ? माणूस सतत जणू युद्धभूमीवर असतो.
आपल्या मेंदूची रचना अशी आहे की, भावनिक मेंदू उद्दीपित झालेला असतो तेव्हा विचार करणाऱ्या विवेकी मेंदू बंद पडतो. त्यामुळे परिस्थितीचा नीट अंदाज येत नाही. वास्तव नीट पाहिलं जात नाही.
चिकित्सा जमत नाही आपलं कोणं, लांबच कोणं हे समजत नाही. एक तर टोकाच्या प्रतिक्रिया दिला जातात दिल्या जातात किंवा अजिबातच प्रतिक्रिया दिल्या जात नाहीत.
प्रकाश, आवाज यांचा खूप त्रास होतो. त्रासदायक गोष्टी सतत डोळ्यासमोर येत राहतात. अमीग्डाला सतत उद्दीपित असल्याने कॉर्टिसोल नावाचं ताणाचं संप्रेरक सतत तयार होत राहतं असतं. मेंदू सतत लढा, पळा, थिजून जा (फाईट, फ्लाईट, फ्रिज) या यंत्रणेवर चालू राहतो.त्याचा इतर अवयवांच्या कामावर परिणाम होतो आणि त्या व्यक्तीला दमायला होतं.
तिथे सर्वात आधी युद्धाचा अनुभव घेतलेल्या सैनिकांचा उल्लेख करायला हवा. जगभरात असा अभ्यास आहे की, सैनिकांमध्ये आघातामुळे निर्माण होणाऱ्या मानसिक समस्या सगळ्यात जास्त दिसतात. पी.टी.एस.डी. चं (पोस्ट ट्रॉमॅटीक स्ट्रेस डिसऑर्डर) प्रमाण सैनिकांमध्ये जास्त आढळतं. युद्ध अनुभवलेली व्यक्ती जिवंतपणे अनेकदा मरणयातना अनुभवते. युद्ध संपलं तरी पुढे अनेक वर्ष सैनिकांचा मेंदू युद्धाचा अनुभव घेत असतो.
सैनिकांनंतर येतात शिस्तीच्या नावाखाली शिक्षा झालेली मुलं. शिस्तीच्या नावाखाली झालेल्या जबर शिक्षांबद्दल आपण अनेकदा पेपरमध्ये वाचतो. त्यात मूल कायमचं जायबंदी होतं किंवा त्याचा एखादा अवयव निकामी होतो. या मुलांच्या मनात कायमची भीती बसते, नवीन काहीही शिकणं त्यांना अवघड जातं.
वरती म्हटल्याप्रमाणे, मुल कायमं स्वतःचा बचाव करण्याच्या स्थितीत राहतं. काही मुलांना पुढे मानसिक समस्या आणि मानसिक आजार होतात.
घरात हिंसाचार सहन करणार्या स्त्रियांनाही मानसिक आघातांना सामोरे जावे लागते. घरगुती हिंसाचार कोणत्या कायद्याखाली आणावा हा अनेक वर्षांपासून वादाचा मुद्दा आहे. कारण अनेकदा स्त्री ही आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या पूर्णपणे तिच्या नवऱ्यावर अवलंबून असते. पण केवळ कायदा करून कायद्याने पूर्ण प्रश्न सुटत नाही हे देखील आपण अनेकदा पाहतो.
55 वर्षांची अनुश्री गेल्या 30 वर्षांपासून घरगुती हिंसाचार सहन करत आहे. कधी कधी तो इतका त्रासदायक असायचा की, तिला दोन-दोन, तीन- तीन दिवस अंथरुणातून बाहेर उठायला उठता यायचं नाही. गेली अनेक वर्षे तिला शांत झोप लागलेली नाही. तसेच तिचे पोट कायम बिघडलेलं असतं. त्यावर कोणतेही उपचार केले तरी तिला उपयोग होत नाही. कारण मानसिक आघात हे त्यामागचं खरं कारण आहे. आघाताचे मनो-शारीरिक परिणाम (सायकोसोमेटिक)असे कोणत्याही स्वरूपात दिसू शकतात.
आधी म्हटल्याप्रमाणे, नैसर्गिक आपत्ती, जवळच्या व्यक्तींचा मृत्यू, जवळच्या व्यक्तींपासून विलग होणं, मोठी आर्थिक फसवणूक अशा अनेक कारणांनी मानसिक आघात होऊ शकतो. कोणत्याही मानसिक स्थितीची तीव्रता अधिक असेल तर त्याचं रूपांतर मानसिक आजारात होऊ शकतं. ‘आघात ‘ ही त्याला अपवाद नाही.
आघातानंतर तयार झालेला ताणं (पोस्ट ट्रॉमॅटीक स्ट्रेस डिसऑर्डर), तीव्र स्वरूपाचा ताणं, (अक्युट स्ट्रेस डिसऑर्डर) यामध्ये आघात स्वतः अनुभवलेला असतो, पाहिलेला असतो. जवळच्या व्यक्तीवर आघात झालेला असेल तरी असा ताणं येऊ शकतो. यात पुन्हा पुन्हा आघाताच्या स्मृती जाग्या होतात आणि तो आघात परत परत अनुभवास येतो.
मेंदूला स्मृती आणि प्रत्यक्ष अनुभव यातील फरक समजत नाही. स्मृती हाच आजाराचा स्त्रोत असतो आघाताच्या आठवणी केवळ मेंदूमध्ये नाही तर संपूर्ण शरीरामध्ये असतात म्हणून आघात झालेल्या व्यक्तीला
सतत अंगदुखीचा त्रास होतो.
आघातामुळे स्वतःची जाणीव विसरली जाते.
आपण कोण आहोत ?
आपल्याला नेमकं काय करायचं आहे ?
आपल्या नात्यांचा, आपल्या आयुष्यातील नेमकं स्थान काय ?
याचा गोंधळ होऊ लागतो. सतत भीती, चिंता, लाज वाटत राहते. झालेल्या आघाताबद्दल स्वतःला जबाबदार मानलं जातं.
काहीही चांगलं होऊ लागलं तर शंका येऊ लागते. आपल्या बाबतीत चांगलं घडू शकत नाही असं वाटू लागतं किंवा काहीतरी वाईट मुद्दाम घडवून आलं आहे. ती परिस्थिती ठेवली जाते आहेत वाईट मुद्दाम घडवून आहे ती परिस्थिती ठेवली जाते.
सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे अत्यंत त्रासदायक स्वप्न पडतात. त्यामुळे झोपण्याची किंवा रात्र येण्याची भीती वाटते.
आघाताच्या कहाण्या रात्रीच्या वेळी जास्त सांगितल्या जातात. मी पूर्वी एका पुनर्वसन केंद्रात काम करत होत असतात तेथे आघात झालेल्या व्यक्ती स्वतःबद्दल रात्रीच्या वेळी जास्त बोलायची. दिवसा हीच माणसं स्थिर आणि स्तब्ध दिसायची.
आपल्या प्रत्येकाची इतरांशी नातं तयार करण्याची पद्धत अगदी लहानपणी तयार होते. आपल्या पालकांकडून ‘आघात ‘ शोषलेली मुलं भावनिक बंध (Emotional Bond) तयार करूच शकत नाहीत. कोणत्याही नात्याला ती घाबरतात. अशा लोकांना एकसंध विचार करता येत नाही. घटनांचे चुकीचे अर्थ काढले जातात. थिजलेपणं राहतं. वर्तमानातील कोणत्याच घटनेचा आनंद घेता येत नाही. तसेच वाईट घटनांना योग्य प्रमाणात प्रतिक्रिया देता येत नाही. नात्यावर परिणाम होतो. प्रेम काय आणि ताणं काय यात फरक कळत नाही. प्रेम हवंसं वाटतं पण त्याबरोबर ताणं येण्याची भीती वाटते माणसाचं व्यक्तिमत्व एकसंध राहत नाही.
आघाताशी संबंधित मानसिक समस्या असणाऱ्या व्यक्तींना समायोजनात खूप अडथळे येतात. ज्या व्यक्तीमुळे किंवा घटनेमध्ये आघात सहन करावा लागतो ती व्यक्ती किंवा घटना टाळली जाते. मनात सतत त्रासदायक विचार चालू राहतात. हाताशपणा दाटून राहतो. काही केलं तरी आयुष्य बदलणार नाही, असं वाटू लागतं.
आघाताची शारीरिक लक्षणं म्हणजे,
आघात झालेल्या व्यक्तीला आधाराची गरज असते. यात सगळ्यात महत्त्वाचे नियम असा की, जोपर्यंत ती व्यक्ती आघाताची कहाणी सांगायला तयार होत नाही तोपर्यंत तिला त्याबद्दल विचारू नये. जेव्हा ती व्यक्ती तयार होईल तेव्हा तिला हव्या त्या क्रमाने, हव्या त्या गतीने तिचं म्हणणं ऐकून घ्यावं. त्याने त्या व्यक्तीला मदत होते. उपचार करताना घटनेपेक्षा त्या घटनेला दिलेल्या भावनिक प्रतिक्रियेकडे अधिक लक्ष देणं दिलं जाणं महत्त्वाचं आहे. माणसाची भावना समजून घेणं महत्त्वाचं, त्याची कहाणी नंतर समजू शकते.
उदाहरणार्थ.एखाद्या स्त्रीवर बलात्कार झाला असेल तर त्याबद्दल पुन्हा पुन्हा बोलून त्रास अधिक वाढतो. म्हणून आधी उपचारांवर भर असावा. आपल्या न्यायव्यवस्थेत मात्र याची जाणीव असतेच असं नाही.
आघात सोसलेल्या व्यक्तीशी नातं निर्माण करायचं असेल तर आधी भावनिक नाते निर्माण करावं, मग स्पर्शाचा आधार द्यावा. अशा व्यक्तींचे शरीर अगदी छोट्या छोट्या गोष्टींना देखील खूप तीव्र प्रतिक्रिया देतं. म्हणून स्पर्शाने सुरुवात टाळावी. आघात झालेले व्यक्ती नैराश्य आलेल्या व्यक्तीसारखी वागते, जगते. त्यामुळे निदान चुकू शकतं आणि उपचारांना खूप वेळ लागू शकतो.म्हणून उपचार होमिओपॅथिक तज्ञ डॉक्टरकडून व्हायला हवेत आणि होमिओपॅथिक उपचार निश्चितपणे या आघातातून बाहेर काढू शकते.
आघातामध्ये संवेदना खूप कमी झाले असतील तर शांतपणे श्वास आत घेण्याचा सराव करायला सांगितला जातो. श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने उपयोग होतो. आघातामुळे काहींच्या संवेदना टोकाच्या वाढलेल्या असतात, अशावेळी उच्छ्वासाचा सराव करण्याने, त्यावर लक्ष केंद्रित केल्याने फायदा होतो. अशा उपचारांनी त्या व्यक्तीला वर्तमानात यायला मदत होते.
त्याचबरोबर होमिओपॅथिक औषधांमुळे वारंवार त्या स्थितीमधील संवेदना जागृत होण्याचे टाळून त्या व्यक्तीला वर्तमानातच राहण्यासाठी मदत मिळून त्या व्यक्तीची मानसिक आणि शारीरिक अवस्था पूर्णपणे सुधारली जाते.
आघातामध्ये मेंदू पूर्ण बदलतो. तो सतत जागृत असतो. त्यामुळे त्याला शांत करणं गरजेचं असतं. अशावेळी ध्यान उपयोगी पडतं. त्याने शरीराचे शिथिलिकरण होण्यास मदत मिळते.
आघातामुळे सुरू झालेल्या मानसिक त्रासासाठी काही उपचार वापरले जाणारे उपचार खालील प्रमाणे :-
1) कला, संगीत, नाटक यांचा ही उपचारांमध्ये उत्तम उपयोग होऊ शकतो. कारण कोणतीही कला भावनांवर अतिशय प्रभावीपणे काम करू शकते.
2) रंग आणि संगती यांचा उपयोग ही प्रभावीपणे होतो.
3) योग साधनेचा उपयोग होऊ शकतो. योग साधनेमुळे शरीर आणि मन शांत होऊन त्यात एकसूत्रता आणता येते.
इतर कोणत्याही आजाराप्रमाणे इथेही औषधोपचार महत्वाचे ठरतात. होमिओपॅथिक उपचारांमुळे आघाताचे परिणाम निश्चितपणे कमी केले जातात. त्याचबरोबर त्या व्यक्तीचे परिस्थितीबद्दलचं आणि स्वतःबद्दलचं मूल्यमापन बदलण्याचे काम केलं जातं आणि शरीर आणि मन शांत होऊन आरोग्यदायी जीवन पूर्वीपणे निश्चितपणे जगता येऊ शकते.
कोणतीही नैसर्गिक आपत्ती, मोठा अपघात किंवा दंगल झाली तर आपल्याकडे आर्थिक नुकसान भरपाईचा विचार पहिल्यांदा केला जातो. पण मेंदू, मन, शरीरावर झालेल्या आघातांवर आवश्यक असणारे दीर्घकालीन उपचार मात्र मिळत नाहीत. त्यासाठी दीर्घकालीन उपचारांची गरज असते त्यामध्ये होमिओपॅथी ही फार फायदेशीर ठरू शकते.
अगदी बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी ‘पोक्सो ‘ सारखा कायदा आला, तसंच आर्थिक मदतीची तरतूद झाली. पण त्या बालकावर झालेल्या मानसिक आघातासाठी उपचारांची गरज असते हा विचार क्वचितच केला जातो.
कोरोनाच्या काळात कित्येकांना आपल्या घरातल्या व्यक्तींच्या मृत्यूचे आघात सोसावे लागले. त्यांनी मानसिक उपचार घेतले असतीलच असं नाही. पण त्याचे परिणाम अनेक वर्ष राहू शकतात. त्यामुळे कोणत्या अघटीत घडलेल्या घटनेवर आर्थिक आणि राजकीय दृष्टिकोनातून न पाहता मानसिक आरोग्याच्या दृष्टीने ही त्याचा विचार व्हायला हवा. अशा घटनांच्या, आघाताच्या परिणामांमधुन होमिओपॅथिक औषध उपचारपद्धती निश्चित बाहेर काढू शकते.
डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ) HHF, ICR Kolhapur,
चैतन्य होम्योपैथिक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4, HDFC बॅंकेजवळ
शाहुपुरी व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123
रविवारी बंद
कृपया पुढील लेख वाचा —
We have seen two disturbing incidents in the last two months. One is the violence against women in Manipur and the other is the loss of life due to landslides in Mahad.
One disaster man-made the other Half-man-made and half-natural . From a Mental health point of view, when such events happen frequently in many places around the world, their Mental Reaction is very important.
The Psychological reaction of the people who experienced them in that event becomes very important.
Not everyone experiences Disaster. But the person who experienced it does not remain the same.
A Disaster takes away the Humanity of a person. In the case of some people, the impact of a disaster can last a lifetime. So you should pay attention to him.
In any natural calamity there was no human presence. Disasters such as earthquakes, floods and droughts destabilize people. The death of a loved one changes the context of living.
Sexual abuse not only causes Physical harm but also causes far-reaching Psychological trauma . This has Psychological consequences. This can lead to both Psychological problems and Mental illness .
A key difference between other Mental illnesses and Trauma from a Disaster is that Trauma from a Disaster causes both Psychological and Physical symptoms.
There are many other traumas. Death of parents, sudden abandonment of one parent, sudden need to go to hostel or away from parents for education. There can be many reasons behind it.
Betrayal trauma is another type of trauma.
Realizing about your partner’s extramarital affairs for many years,
realizing that your money has been squandered by someone close to you without telling
you, intimate and non-social relationships suddenly coming to the fore and feeling shocked by the family…..etc . Total life destabilization causes trauma .
You know that Man has evolved over a few hundred thousand years and during this time the human brain has evolved in many stages.
A long time of the Human race has been spent in dealing with crises and finding solutions to keep ourselves alive. Man realized that if there is stability in life, we can live longer and accordingly the Human Brain and the whole body was designed.
But because of this, when disaster strikes, man reverts to his original form. If the impact of the calamity is great, he lives in the thought and feeling of being in constant trouble.
Amit was Sexually abused by a close relative when he was very young. Being a boy, he could never tell anyone about it. Had there been a girl in his place, people would have at least believed that something like this had happened. The Sexual Assault on Amit was so painful that he has not been able to sleep peacefully ever since. Lives in constant fear. He is convinced that the world is not safe.
In concussions, the work of the Nervous System is most affected. Our Brain have a separate Emotional Brain space.
During any crisis, the Amygdala in the Emotional brain is stimulated and prepares the body to survive the crisis. Once the crisis is over, the Amygdala calms down and we resume normal activities.
But the Emotional Brain of those who are Traumatized does not calm down. He is always ready to face a crisis.
Think what will happen if the Mind never calms down ? Man is constantly on the battlefield.
Our brain is designed in such a way that when the Emotional Brain is stimulated, the rational thinking brain shuts down. Therefore, the situation cannot be predicted properly. Reality is not seen properly.
Can’t get treatment, don’t understand who you are, who you are for a long time. Either extreme reactions are given or no reaction is given at all.
Light and noise are very disturbing. Disturbing things keep coming in front of the eyes. As the Amygdala is constantly stimulated, the Stress Hormone Cortisol is continuously produced. The Brain is constantly on the Fight, Flight, Freeze mechanism. It affects the functioning of other organs and makes the person tired.
Who suffers more from trauma?
First of all, the soldiers who experienced war should be mentioned there. There are studies across the world which show that Mental Health problems caused by Trauma are the most common among soldiers. PTSD (Post Traumatic Stress Disorder) is more common in soldiers. A person who has experienced war often experiences death while alive. Even after the war ends, the soldiers’ brains continue to experience the war for many years.
After the soldiers come the children punished in the name of discipline. We often read in the papers about harsh punishments given in the name of discipline. In it, the child becomes permanently disabled or one of his organs fails. These children have constant fear, they find it difficult to learn anything new.
As stated above, the child is always in a position to defend himself. Some children later develop Psychological problems and Mental illnesses.
Women who suffer domestic violence also face Psychological trauma. Domestic violence has been a point of contention for many years. Because often a woman is financially and socially completely dependent on her husband. But we also often see that law alone does not solve the entire problem.
Anushree, 55, has been suffering from Domestic violence for the past 30 years. Sometimes it was so painful that she could not get out of bed for two or three days. She has not had a peaceful sleep for many years. Also, her stomach is always upset. No treatment can help her. Because Mental Trauma is the real reason behind it. The PsychoSomatic effects of Trauma can appear in any form.
As mentioned earlier, Mental Trauma can occur due to many reasons such as natural calamities, death of loved ones, separation from loved ones, major financial fraud. If the intensity of any Mental condition is more, it can turn into a Mental illness. ‘ Trauma ‘ is no exception.
In Post-Traumatic Stress Disorder, acute stress disorder, the trauma is experienced and witnessed. Even if a close person has been Traumatized, such Stress can occur. It involves reliving the Trauma and reliving the Trauma over and over again.
The brain does not understand the difference between Memory and Actual Experience. Memory is the source of disease. Trauma memories are not only in the brain but throughout the body, so the Traumatized person suffers from constant body pain. A sense of self is forgotten through trauma.
Who are we ?
What exactly do you want to do ?
What is the exact place of our relationships in our lives ?
Constant fear, anxiety, shame.
Self-responsible for injury.
When anything goes well, doubts start to arise. It seems that nothing good can happen to us or that something bad has happened on purpose.
That situation is kept. Evil is deliberately created. That situation is kept. The most important symptom is very disturbing dreams. So there is fear of sleeping or night.
Stories of trauma are often told at night. I used to work at a rehab center where Traumatized people talked a lot about themselves at night. During the day, the same people looked still and stoic.
The way each of us relates to others is formed at an early age. Children who have been ‘Traumatized’ by their parents cannot form an Emotional Bond. She is afraid of any relationship. Such people cannot think coherently. Events are misinterpreted. The cold remains. No present event can be enjoyed. Also not able to react properly to bad events. Relationships are affected. There is no difference between Love and Tension/ Stress. Wants Love but is afraid of Tension with it. Man’s personality is not consistent. Individuals with Trauma-related Mental Health problems experience significant barriers to adjustment. A person or event that causes Trauma is avoided. Disturbing thoughts continue in the Mind. Frustration lingers. It seems that life will not change even if you do something.
Physical symptoms of trauma, such as,
vomiting,
persistent body aches,
and upset stomach, may be persistent and prolonged stress.
If a child constantly complains of a stomach ache and has no physical cause, it is possible that the child has suffered a trauma that the parents are unaware of.
A Traumatized person needs support. The most important rule is not to ask about the Trauma until the person is ready to tell the story. When that person is ready, listen to her in the order she wants, at the speed she wants. He helped that person. In treatment, it is important to pay more attention to the Emotional response to the event than to the event itself. It is important to understand the Feeling of a person, his story can be understood later.
For example, if a woman has been raped, talking about it over and over increases the suffering. So the focus should be on treatment first. However, our judicial system is not aware of this.
If you want to build a relationship with a Traumatized person, build an Emotional relationship first, then provide tactile support. The body of such persons reacts very strongly to even the smallest things. So start with touching should be avoided. A Traumatized person behaves and lives like a Depressed person. So the diagnosis can be wrong and the treatment can take a long time. So the treatment should be done by a Homoeopathic specialist doctor and Homoeopathic Treatment can definitely get rid of this Trauma.
If Sensation/ Feelings is severely reduced during trauma, calm breathing exercises are recommended. Focusing on the breath helps. Some people are Hyper-sensitized by Trauma, in which case practicing breathing, focusing on it, can help. Such treatments help the person to come to the present. At the same time, Homoeopathic Medicines help the person to stay in the present by avoiding repeated awakenings of the sensations in the state and completely improve the Mental and Physical state of the person.
Trauma completely changes the Brain. He is constantly awake. So it is necessary to pacify him. In such cases, meditation comes in handy. It helps in relaxation of the body.
Some of the treatments used for Trauma-induced Mental disorders are as follows:-
1) Art, music and drama can be of great use in this treatment. Because any art can work on Emotions very effectively.
2) Color and harmony are used effectively.
3) Yoga Sadhana can be used. Yoga sadhana can calm the body and mind and bring harmony to it.
Like any other disease, medication is important here. Homoeopathic Treatment definitely reduces the effects of Trauma. At the same time, work is done to change the person’s evaluation of the situation and self, and one can live a Healthy Life with peace of Mind and Body as before.
In case of any natural calamity, major accident or riot, the first thing that comes to Mind is financial compensation. But the long-term treatment needed for brain, mind and body injuries is not available. Homoeopathy can be very beneficial in cases where long-term treatment is required.
Even a law like ‘POCSO’ was introduced to prevent child sexual abuse and financial assistance was also provided. But the need for treatment for the Trauma inflicted on the child is rarely considered.
During the Corona period, many people had to bear the shock of the death of their family members. It is not that they have undergone mental treatment. But its effects can last for many years. Therefore, it should be considered from the point of view of mental health rather than from economic and political point of view.
अशा घटनांच्या, आघाताच्या परिणामांमधुन होमिओपॅथिक औषध उपचारपद्धती निश्चित बाहेर काढू शकते.
Dr Ajay Hanmane
M.D.(Hom)HHF,ICR Kolhapur,
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4, Near HDFC Bank
Bhaskar Plaza Vyapari Peth,
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
Mobile No. 7738667123
Sunday Closed.
Please Read Next Article-