आधुनिक उपचार पद्धती आणि होमिओपॅथी उपचार पद्धती मधील फरक —
आधुनिक उपचार पद्धती ही आजारावर उपचार करते म्हणजे त्याच्या वरवरच्या लक्षणांवर.
शरीर प्रकृतीमध्ये काही बिघाड होतो तेव्हा त्याला एखादा “रोग” या नावाने ओळखतो.
उदाहरणार्थ –
मधुमेह-डायबिटीस असं नाव देतो. पण इन्सुलिन कमी होणं हे डायबिटीस चे कारण आहे की तो डायबिटीस चा परिणाम आहे? अनेकदा रोगाच्या कारणा संदर्भात काही अंदाज व्यक्त केले जातात, काही गृहीतके असतात. पण आधुनिक वैद्यकशास्त्रात आज जे “बरोबर” असतं, तेच उद्या ‘चुकीचे’ ठरू शकतं. मग उपचार कसे करायचे? तसेच हे उपचार खर्चिक असतात. त्याचे साईड इफेक्ट असतात. त्यांच्या मर्यादाही असतात.
उदाहरणार्थ –
साधी सर्दी घ्या — रुग्णाची वेगवेगळी लक्षणं असतात. या विविधतेचा विचार आधुनिक वैद्यकशास्त्रात होत नाही. इतकी वेगवेगळी लक्षण असतील तर सगळ्यांचं कारण एकच कसं असेल ? त्यावर एकच औषध कसं असेल ?
बरं एकच औषध असेल तर त्यामुळे सगळे रुग्ण बरे व्हायला हवेत. तसं होत नाही. कुणी चटकन बरं होतं, कोणाला बरेच दिवस लागतात. कुणाची सर्दी बरीच होत नाही. असं का होतं ?
डोकेदुखीवर जे औषध असेल ते घेतल्यावर प्रत्येकाची डोकेदुखी थांबते का? त्या डोकेदुखीची ही किती व्हरायटी- वेगवेगळ्या प्रकारची असते. आधुनिक उपचार पद्धती / ऍलोपथी मध्ये या विविधतेचा विचार केला जात नाही. तो फक्त होमिओपॅथिक शास्त्रामध्ये केला जातो.
एखाद्या व्यक्तीला डायबेटिस होतो म्हणजे काय? हा काय आजार आहे? स्वादुपिंडातून इन्सुलिनचं स्त्रवणं कमी होतं हे तर खरंच– पण कुठल्याही पुस्तकात ते कसं वाढवायचं हे दिलेलं नाही आहे.
रक्तातल्या साखरेचं प्रमाण फक्त नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला जातो म्हणजे फक्त लक्षणांवर लक्ष दिले जाते. त्याहीपेक्षा म्हणजे इन्सुलिन आणि रक्तातील साखर या दोन्हींचा “कार्यकारणभाव” सिद्ध झालेला नाही आहे. हे एक सिद्धांत आहे, गृहीतक आहे एवढंच.
केवळ लक्षणांवर उपचार केल्याने ती कमी होतात, पण तात्पुरती. मूळ आजार आतून वाढतच राहतो आणि अचानक कधीतरी एकदम गुंतागुंतीचा होऊन उद्भवतो.
ऍसिडिटी वर अँटॉसिड्स घेऊन लक्षणे सतत दाबून ठेवली जातात पण त्यातूनही पुढे अल्सर उद्भवतोच. म्हणजे आधुनिक उपचार पद्धतीत कुठेतरी काहीतरी कमी आहे.
तोच रोग- तीच परिस्थिती- तीच औषध- तोच डोस -पण रुग्णाचा प्रतिसाद मात्र सारखा नाही. असं का ? यातून आधुनिक उपचार पद्धतीच्या मर्यादा ध्यानात येतात.
आधुनिक उपचार पद्धती- “ऍलोपॅथी” ही सर्व आजार प्रतिकारशक्तीशी(Immunity) संबंधित असतात हे मान्य करते, पण उपचार मात्र त्या दिशेने करत नाहीत.
हा विचार फक्त होमिओपॅथित केला जातो. आपलं प्रत्येकाचं शरीर आजाराला जो प्रतिसाद देतं आणि औषधाला जो प्रतिसाद देतं त्या दोन्हीत फरक असतो. ऍलोपॅथी उपचार पद्धतीत या दोन्हीचा विचार केला जात नाही, तो होमिओपॅथी मध्ये केला जातो.
दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की, आधुनिक उपचार पद्धतीत एखाद्या अवयवातील बिघाडासाठी म्हणून जे औषध दिलं जातं- म्हणजे समजा किडनीसाठी जे औषध दिले जातं, ते फक्त किडनीवरच काम करत नसतं. रक्तातून ते सर्व शरीरवर पसरत असतं. त्याचा परिणाम होत असतो.
अगदी डोकेदुखी घेतलेली गोळी ही, फक्त डोक्यावर नव्हे तर सर्व अवयवांपर्यंत पोहोचत असते. यातूनच साईड इफेक्ट उद्भवतात. जरा वेगळ्या भाषेत सांगायचं तर हे “शॉवर फायर” सारखा आहे. मशीन गन घ्यायची आणि धडाधडा गोळ्या उडवायच्या, मरतील ते मरतील. आजारात शरीरातील फक्त 10℅ पेशींवर परिणाम झाला असला तरी ऍलोपॅथित 100% पेशींवर औषधाचा मारा केला जातो.
रुग्णा-रुग्णात जो विलक्षण फरक दिसतो, तो का ?
सतत त्याच त्या तपासण्या केल्या जातात- तेच ते निदान केले जाते, त्यावरचं तेच ते औषध दिले जाते, पण काही रुग्ण बरे होतात, काही बरे होत नाहीत, असं का होतं ?
आधुनिक उपचार पद्धतीतील एक डॉक्टर म्हणून सगळं बरोबर केलेलं असतं. पेशंटच्या दृष्टीने तो डॉक्टर सगळं बरोबर करीत असतो. पेशंटने ही चांगला डॉक्टर शोधलेला असतो. तो औषध वेळेवर घेत असतो. सगळे पथ्य पाळत असतो. तरीही तो बरा का होत नाही ? या सर्व प्रश्नांची उत्तरं होमिओपॅथी मध्ये मिळू शकतात.
सध्या जीवनशैलीतील बदलामुळे होमिओपॅथिक उपचार पद्धतीकडे रुग्णांचा कल वाढत चालला आहे. या उपचार पद्धतीत आजार मुळापासून बरा करण्याच्या प्रक्रियेवर भर दिला जातो. ऍलोपॅथी उपचार पद्धतीत विविध रोगांनुसार घ्याव्या लागणाऱ्या औषधांचे प्रमाण जास्त असते,परिणामी रुग्णांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो असे मत तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.
व्यक्तीनिहाय परिपूर्ण अभ्यास
ऍलोपॅथिक औषधांद्वारे रुग्णावर तात्काळ उपचार करणे शक्य होते अशी एक मान्यता आहे. मात्र एखादा रोग मुळापासून बरा करण्याचा करायचा असल्यास त्या रोगाच्या मुळापर्यंत जावे लागते.
होमिओपॅथिक उपचार पद्धती प्रामुख्याने व्यक्तीच्या आजाराच्या स्वरूपानुसार त्याच्या केस स्टडी चा परिपूर्ण अभ्यास करून उपचार करण्यात येतात.
या उपचार पद्धतीत शक्यतो एकच औषध दिले जाते.
होमिओपॅथिक डॉक्टरांनी सांगितलेल्या मर्यादेत हे औषध घेतल्यास त्याचे साईड इफेक्ट जाणवत नाहीत.
ऍलोपॅथिक उपचार मध्ये तात्काळ उपचारासाठी प्राधान्य दिले जाते.एकाच प्रकारच्या आजारासाठी सारखीच औषधे असतात. ऍलोपॅथिक औषधांचा वापर जास्त प्रमाणात सुरू आहे.जास्त प्रमाणातील प्रतिजैविके औषधांचे सेवन त्रासदायक.
एकाच वेळी तीन ते चार औषधे घ्यावे लागतात.
होमिओपॅथिक उपचारांमध्ये मुळापासून रोग बरा करण्यावर भर दिला जातो. व्यक्तीनिहाय औषधे असतात.
होमिओपॅथिक उपचार पद्धती जुनी, मात्र हळूहळू वाढत आहे.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अतिरिक्त औषधे घातक ठरू शकतात.
शक्यतो एकच औषध घ्यावे लागते.
सध्या जीवनशैलीतील बदलामुळे उच्च रक्तदाब मधुमेह हृदयविकार असे विविध आजार जास्त प्रमाणात वाढत आहेत या आजारांसोबत व्यक्तीला मानसिक आजारही बळावत आहेत.
होमिओपॅथी इतकी व्यक्तिनिष्ठ उपचार पद्धती दुसरी कुठलीही नाही.
आयुर्वेद वात, कफ आणि पित्त या तीन गोष्टींमध्ये संपतो. होमिओपॅथित मात्र प्रत्येक रुग्णाच सर्वांगीण विश्लेषण करून मगच त्याचं औषध ठरवलं जातं. हे विश्लेषण बरोबर झालं की यशाची खात्री मिळते. माणूस कळला की उपचार समजला. हे म्हणजे नेमकं “वर्मावर बोट” ठेवण्यासारखा आहे.
एका अर्थी “सुपर स्पेशलायझेशन” आहे. होमिओपॅथी ही खूपच वेळ खाऊ पद्धत आहे असं बऱ्याच जणांना वाटतं,पण हा एक गैरसमज आहे.
होमिओपॅथिक शास्त्र हे त्याविषयीच्या खोलात गेल्याशिवाय कळूच शकत नाही. कित्येक आजारांमध्ये कुठल्याच तपासणीत काहीच निष्कर्ष निघत नाही. या ठिकाणी आधुनिक वैद्यकशास्त्र अडत. पण त्याच केसकडे एखाद्या वेगळ्या दृष्टिकोनातून होमिओपॅथी बघते आणि रुग्ण पूर्ण बरा होतो.
होमिओपॅथीच्या औषधाचा विविध आजारांवर खूप चांगला उपयोग होतो सर्दी -खोकल्यासारख्या सामान्य आजारांपासून कॅन्सर सारख्या अत्यंत गंभीर आजारावर अतिशय चांगले रिझल्ट देता येतात.
होमिओपॅथिक शास्त्राला काही मर्यादा नाहीत असं अजिबात नाही सर्व रोगांवर होमिओपॅथी हा रामबाण इलाज आहे असंही काही नाही.
आधुनिक उपचार पद्धतीमध्ये काही आजार असे असतात, त्यांच्यावर जी औषध असतात, ती बराच काळ घ्यावी लागतात. पण तशी ती दिली तर एडिक्श होऊन बसतं, म्हणजे यातून सुटकाच नाही. अशा विचित्र परिस्थितीमध्ये होमिओपॅथित मार्ग सापडू शकतो. गोळ्या हळूहळू कमी करत नंतर पूर्ण थांबवता ही येतात.
वैद्यकीय क्षेत्रात रुग्ण जेव्हा उपचारांसाठी डॉक्टरांकडे येतो, तेव्हा त्याला बरे वाटण्यामध्ये बरेच घटक महत्त्वाचे असतात– उदाहरणार्थ रुग्णाची डॉक्टरांवरील श्रद्धा, विश्वास, डॉक्टरांचे ज्ञान व अनुभव. तसेच सतत शिकत राहण्याची जिद्द, रुग्ण किती नियमितपणे उपचार घेतो, इत्यादी. कुठलेही विधान करताना अशा सर्व घटकांचा विचार करावा लागतो. म्हणूनच असे म्हणता येईल की, होमिओपॅथी ही एक शास्त्रीय व प्रभावशाली उपचार पद्धती आहे”.
डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ)
चैतन्य होम्योपैथिक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4
शाहुपुरी व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123
रविवारी बंद
कृपया पुढील लेख वाचा —
Modern Medicine treats the disease i.e. its superficial symptoms.
When there is a malfunction in the body, it is known as a “Disease“,
For example, it is called Diabetes. But is insulin deficiency the cause of diabetes or is it a result of diabetes? Often there are some guesses, some hypotheses regarding the cause of the disease. But in modern Medicine, what is “right” today may be “wrong” tomorrow. So how to treat ? Also these treatments are expensive. It has side effects. They also have limitations.
Take the common cold for example — the symptoms vary from patient to patient. This variety is not considered in Modern Medicine. If there are so many different symptoms, how can they all have the same cause? How about a single drug on that?
Well, if there is only one medicine, it should cure all patients. It doesn’t happen. Someone gets better quickly, someone takes many days. No one gets too cold. Why does this happen?
Does everyone’s Headache stop when they take their Headache Medicine? There are so many different types of Headaches. Allopathy does not consider this diversity. It is practiced only in Homoeopathic Medicine.
What does it mean when a person has diabetes? What is this disease ? It’s true that insulin secretion from the pancreas decreases — but no book tells you how to increase it. Only trying to control blood sugar means only paying attention to symptoms. Moreover, the “causality” of both insulin and blood sugar has not been proven. This is just a theory, a hypothesis.
Treating the symptoms alone will reduce them, but only temporarily. The original disease continues to grow from within and sometimes suddenly becomes very complicated.
Acidity is continuously suppressed by taking antacids, but it also leads to ulceration. So there is something missing somewhere in the modern treatment system.
Same disease-same condition-same drug-same dose-but the patient’s response is not the same. Why is that? This brings to mind the limitations of modern treatment methods.
Modern medicine – “Allopathy” accepts that all diseases are related to immunity, but does not treat it in that direction.
This thought is only done Homoeopathically. Everyone’s body is different in how it responds to illness and how it responds to medicine. Both of these are not considered in allopathy treatment, they are in Homoeopathy.
Another important thing is that in Modern Medicine, the medicine given for an organ failure – say the medicine given for the kidney, does not work only on the kidney. It spreads throughout the body through the blood. It has an effect.
Even a Headache pill reaches all the organs, not just the head. This is what causes the side effects. In other words, it is like a “shower fire”. Take a Machine Gun and fire bullets, those who will die will die. Although only 10℅ of the body’s cells are affected in the disease, in allopathy 100% of the cells are affected by the drug.
Why the extraordinary difference seen in patients? The same tests are done continuously – the same diagnosis is made, the same medicine is given, but why is it that some patients get better, some don’t?
As a Doctor in Modern Medicine, everything is done right. From the patient’s point of view, that doctor is doing everything right. A patient has found a good doctor. He takes the medicine on time. Everyone is following the diet. Why doesn’t he get better though? All these questions can be answered in Homoeopathy.
Currently, due to lifestyle changes, patients are increasingly turning to Homoeopathic treatment. In this method of treatment, emphasis is placed on the process of curing the disease from the root. Expert doctors have expressed the opinion that in allopathy treatment method, the quantity of medicines required for various diseases is high, as a result of which the health of the patients can be adversely affected.
Perfect study by individual
There is a belief that the patient can be cured immediately by Allopathic Medicines. But if you want to cure a disease from the root, you have to go to the root of that disease. Homoeopathic treatment methods are mainly treated according to the nature of the disease of the person by studying his case study thoroughly.
In this treatment regimen, a single drug is usually given.
No side effects are experienced if this medicine is taken within the limits prescribed by the Homoeopathic doctor.
In Allopathic Treatment, priority is given to immediate treatment. There are similar medicines for the same type of disease. The use of Allopathic Medicines is increasing. The use of high doses of antibiotics is troublesome.
Three to four medicines have to be taken at the same time.
Homoeopathic treatment focuses on curing the disease from the root. Medicines are individualized.
Homoeopathic Treatment Method is old but slowly growing.
Additional medicines without doctor’s advice can be dangerous.
It is possible to take only one medicine.
Currently, various diseases like high blood pressure, diabetes, heart disease are increasing due to lifestyle changes, along with these diseases, mental diseases are also increasing.
There is no other method of treatment that is as subjective as Homoeopathy. Ayurveda ends in three things: Vata, Kapha and Pitta.
Homoeopath, however, after comprehensive analysis of each patient, his medicine is decided. Success is assured if this analysis is done correctly. When a man knows, he understands the treatment. This is exactly like putting a “finger on the Tender Spot”.
This “individualism” is the “strength” of Homoeopathy. This kind of analysis is not done in any other science, therefore it is not easy to practice Homoeopathy. It is a very difficult task. It is the most intelligent work !!!
There is “super specialization” in a sense. Many people think that Homoeopathy is a very time-consuming method, but this is a misconception.
Homoeopathic science cannot be understood without going deep into it. In many diseases, no test leads to any conclusion. This is where Modern Medicine comes into play. But homeopathy looks at the same case from a different point of view and the patient gets completely cured. Homeopathic medicine is very effective in treating various diseases from simple diseases like common cold to very serious diseases like cancer.
It is not that Homoeopathy has no limitations and it is not that Homoeopathy is a panacea for all diseases.
In the modern treatment system, there are some diseases, the drugs that are prescribed for them need to be taken for a long time. But if you give it like that, you become addicted, so there is no escape from it. Homoeopathy can find a way out in such strange situations. The pills can be reduced gradually and then stopped completely.
In the medical field, when a patient comes to a doctor for treatment, many factors are important in making him feel better — for example, the patient’s faith in the doctor, trust, knowledge and experience of the doctor.
Also the commitment to continuous learning, how regularly the patient receives treatment, etc. All such factors have to be considered while making any statement.
Hence it can be said that Homoeopathy is a scientific and effective method of treatment.
Dr. Ajay Hanmane
M. D. (Homeo)
Chaitanya Homoeopathic Clinic
Bhaskar Plaza- F4
Shahupuri Vyapari Peth
Near Railway Gate bHAJI Mandai
Kolhapur- 416001
Mobile- 7738667123
Sunday Closed.
Please Read Next Article–
Hereditary Diseases and Homoeopathic Treatment