बाल दमा व होमिओपॅथी / Childhood Asthma and Homoeopathy

Dorctor Pic By Dr. Ajay HanmaneSeptember 16, 2023 Allergic Disorders Asthma Children Problems Homeopathic and Cure

              बाल दमा व होमिओपॅथी

 

नऊ वर्षाच्या अनुरागला त्याची आई दवाखान्यात घेऊन आली, तेव्हा त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्याचबरोबर खोकला आणि त्यामुळे आलेली अस्वस्थता, चिडचिडेपणा स्पष्टपणे दिसत होता. रात्री त्याला थोडा ताप आला होता व छातीत आवळल्यासारखे  वाटत होते. छातीत घरघर आवाज आणि घशात खवखव, दुखणे होते. चिकट, घट्ट अशी खोकून कफाची उलटी ही झाली होती. तपासले तेव्हा तापही होता आणि खोकल्याबरोबर श्वास घेण्यास त्रास होत होता.

त्याचा पहिला वाढदिवस होण्याआधीच दोन ते तीन वेळा हॉस्पिटलमध्ये भरती करावा लागलं होतं तेव्हा डॉक्टरांनी ब्रोंकाइटिस (Bronchitis) असे निदान केले होते याला सामान्य भाषेत बालकफ / बाल दमा असे म्हणतात, म्हणजे लहानपणापासून असणारा खोकल्याचा त्रास.

बऱ्याच मुलांना लहानपणापासून कफाची प्रवृत्ती असते.होमिओपॅथिक चिकित्सेनुसार ही एक ट्यूबर्क्युलर (Tubercular) रोगदोषाची अवस्था आहे.

अशा अवस्थेत लहान मुले, वातावरणातील होणारा किंचित बदल सहन करू शकत नाहीत व त्यांना खोकल्याच्या उबळीचा त्रास होतो. आधुनिक वैद्यक शास्त्रानुसार ही एक प्रकारची ऍलर्जी प्रक्रिया असते व “वाढत्या वयानुसार शारीरिक प्रतिकारशक्ती वाढते आणि हा त्रास हळूहळू कमी होतो” असा समज आहे.

हे जरी खरे असले तरी  वारंवार वापरल्या जाणाऱ्या (अँटीबायोटिक्सचा) प्रती-जैविकांचा वापर केल्यास प्रतिकारशक्ती कमी होऊन या त्रासाचे प्रमाण व स्वरूप दिवसेंदिवस वाढत जाते.

सर्वप्रथम श्वसन संस्थेच्या  उर्ध्वभागात (घसा व श्वसनलिका) येथे हा त्रास होतो. हळूहळू फुफुसाचा समावेश होऊन दम्याच्या स्वरूपात हा त्रास दिसून येतो.

सर्वप्रथम दमा म्हणजे काय ? आणि त्याची कारणे जाणून घेणे आवश्यक आहे – वारंवार येणारा श्वासावरोध ( श्वसनासाठी येणारा अडथळा)  व त्याचबरोबर सूक्ष्म श्वासनलिकांचे आकुंचन याला ‘दमा” म्हणतात.

सर्वसामान्यपणे असा समज आहे की, “दमा हा दम गेल्यावरच ठीक होतो”. त्यामुळे दम्याचे निदान झाल्यावर आई वडील घाबरून जातात. जर या त्रासासाठी होमिओपॅथिक उपचार सुरू केल्यास हा त्रास संपूर्णपणे बरा होऊ शकतो.

दमा या रोगाचे कारण निरनिराळ्या रुग्णांमध्ये निरनिराळे व काहींमध्ये तर निदान देखील होत नाही.

होमिओपॅथिक सिद्धांतानुसार खालील घटके दमा प्रवृत्तीस प्रोत्साहित करतात —

1) श्वसन नलिकांची आकुंचन (Bronchospasam) — सूक्ष्म  श्वासनलिकांचे आकुंचन झाले म्हणजे अगोदरच सूज आल्यामुळे कमी झालेला सूक्ष्मनलिकांचा आकार अधिक बारीक होतो. त्यामुळे श्वसनास अडचण होते आणि दम लागतो. पूर्ण पाहिजे तेवढी हवा फुफुसामध्ये शिरत नाही आणि बाहेरी पडत नाही त्यामुळे श्वसनाच्या हालचाली वेगात सुरू होतात.

2) अनुवंशिकता (Hereditary) —
विशेषतः बाल्यावस्थेत होणारा दमा हा इतर ऍलर्जीक आजार जसे ” हे फिव्हर (Hey Fever)” किंवा आर्टिकॅरीयाशी (Urticaria)संबंधित असू शकतो. दमा  वंशपरंपरेने मुलांनाही होऊ शकतो.

3) एलर्जी –
एलर्जी  म्हणजे वातावरणातील काही घटकांना शरीर अधिक संवेदनशील असते. या घटकांमध्ये

फुलांचे परागकण,

झाडांच्या बिया ,

पाळीव प्राण्यांचे केस ,

घरातील धूळ

आणि काही जेवणातील पदार्थ समाविष्ट आहेत. जेव्हा हे एखाद्या संवेदनशील घटकाच्या संपर्कात येतात तेव्हा ते लहान श्वसनलिकांमध्ये सूज व आकुंचन निर्माण करतात.

4)भावनावेश ( Emotions) – 
अस्थमा /दमा असलेल्या संवेदनशील  मुलांमध्ये

क्रोध,

चिंता ,

निराशा ,

भीती हे सर्व अस्थमाचे झटके वाढविण्यास कारणीभूत ठरतात. परिचित सामाजिक घटनांमध्ये अवेळी भीतीची स्थिती निर्माण होऊन दम्याचा झटका उत्तेजित होतो.

5) संक्रमण (Infection)उर्ध्वश्वसनमार्गामार्गात कुठलेही संक्रमण किंवा सर्दी अस्थमाग्रस्त रोगांमध्ये अस्थमाच्या झटक्याला कारणीभूत ठरू शकते.

6) इतर घटके –
अचानक थंड हवेत जाणे,

अनावश्यक शारीरिक व्यायाम,

शेल-फिश,

चॉकलेट्स

किंवा अंडी यासारखे इतर खाण्याच्या वस्तूंशिवाय

बीटा- ब्लॉकर्स, ऍस्पिरिन इत्यादी औषधांचे सेवन समाविष्ट आहे.

अशा या दमा आरोग्याच्या उपचारदृष्टीने होमिओपॅथिक चिकित्साशास्त्रात    रुग्ण-इतिहास औषधी निवडीसाठी अतिशय महत्त्वाचारतो. यासाठी होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सूक्ष्म निरीक्षणाची आवश्यकता असते.

औषध निवडीसाठी आवश्यक असलेली माहिती लहान मुले व्यवस्थितरितीने देऊ शकत नाही, त्यामुळे यात आई-वडिलांचा सहभाग हा महत्त्वाचा ठरतो. आपल्या लहान मुलाला बाल-कफ अथवा बाल दमा असेल तर योग्य उपचारासाठी आई-वडिलांनी खालील गोष्टी होमिओपॅथिक तज्ञाला सांगणे आवश्यक आहे.

सर्वप्रथम रुग्ण-इतिहास देताना हा त्रास किती दिवसांपासून आहे ?, श्वास घेण्याचा त्रास केव्हा वाढतो ?

वेळ- पहाटे,

सकाळी,

रात्री,

मध्यरात्री,

थंड हवेत गेल्यावर,

थंड पदार्थांच्या सेवनानंतर दमा सुरू होतो का ?

उन्हाळा, हिवाळा, दमट हवामान, वातावरणात होणारा बदल यापैकी केव्हा रुग्णाचा दम्याचा त्रास होतो ?

जेवणानंतर किंवा जेवणाआधी दम्याचा त्रास सुरू होतो का ?

दम्या सोबतच त्वचेसंबंधित इतर रोग, खोकला येणे, हातापायाला मुंग्या येणे, शरीर निळे पडणे, मळमळ ,उलटी, डोकेदुखी हगवण, शरीरावर पुरळ येणे, घशात तसेच  छातीत जळजळ यासारखे इतर त्रास असतात का ?

2)  रुग्णपूर्व इतिहास –
मुलाला लसीकरणानंतर दम्याचा त्रास सुरू झाला का ?
पूर्वी कुठला त्वचा रोग झाला होता का ? व त्यानंतर दमा सुरू झाला का ?

3) कौटुंबिक इतिहास –
काही गोष्टी ह्या आपल्याला टाळता येत नाही. त्याचप्रमाणे वंशपरंपरेने येणाऱ्या व्याधी टाळता येत नाहीत.
कुटुंबात कोणाला दम्याचा त्रास असेल किंवा ऍलर्जीक संवेदनशीलता जर कुटुंबातील एकापेक्षा अधिक समस्या सदस्यांमध्ये असेल तरी अनुवंशिकपूर्वतीचे सूचक आहे. त्यामुळे बाल्यावस्थेत होणारा दमा हा अनुवंशिक असू शकतो  याचा विचार औषध निवडीसाठी महत्त्वपूर्ण ठरतो.

या व्यतिरिक्त रुग्णाची ठेवण त्याची मानसिक स्थिती, स्वभाव, आवड-निवड या सर्व गोष्टींचा एकत्रित विचार करून होमिओपॅथिक शास्त्रात चिकित्सा शास्त्रात आयुष्याची निवड केली जाते.

दम्यासाठी  अनेक गुणकारी औषधे होमिओपॅथिक उपचार पद्धतीत  उपयोगात आणली जातात.

या औषधांची मात्रा आणि निवड रोगाचा संपूर्ण इतिहास जाणून घेतल्यानंतरच करता येतो. म्हणून ही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यावी घ्यावीत. औषधोपचारांसोबतच आई-वडिलांचा उपचारात सहभाग असणे गरजेचे आहे. 

औषधांसोबतच आई-वडिलांचे प्रेम मुलांचे पुढील आयुष्य स्वास्थ्यपूर्ण बनविण्यात मोलाची भूमिका वठवीत असतात हे लक्षात असू द्यावे.

डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ),HHF,ICR Kolhapur
चैतन्य होम्योपैथिक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4, HDFC बॅंकेजवळ,
शाहुपुरी व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123
रविवारी बंद

कृपया पुढील लेख वाचा –

 


Childhood Asthma and Homoeopathy

When nine-year-old Anurag was brought to the hospital by his mother, he was having trouble breathing. At the same time, the cough and the restlessness and irritability caused by it were clearly visible. At night he had a slight fever and felt a tightness in his chest. There was wheezing in the chest and sore throat. There was a sticky, tight cough and vomiting of phlegm. On examination there was also fever and difficulty in breathing with cough.
Before his first birthday he had to be admitted to the hospital two to three times when doctors diagnosed him with bronchitis, commonly known as child cough/childhood asthma.
Many children have a tendency to expectorate from childhood. According to homeopathic medicine, this is a tubercular condition. In such a state, children cannot tolerate the slightest change in the environment and suffer from coughing spasms. According to modern medicine, it is a type of allergic process and it is believed that “the physical immunity increases with increasing age and this problem gradually decreases”.

Although this is true, the number and nature of this problem increases day by day with the use of frequently used antibiotics (antibiotics).

First of all, this problem occurs in the upper part of the respiratory system (throat and trachea). This problem appears in the form of asthma gradually involving the lungs.

First of all it is necessary to know what is asthma and its causesRecurrent shortness of breath (obstruction to breathing) along with narrowing of the microscopic airways is called ‘asthma’.

It is a common belief that “asthma gets better when breath goes away”(दमा हा दम गेल्यावरच ठीक होतो) . So parents get scared when asthma is diagnosed. If Homoeopathic treatment is started for this disorder then this disorder can be completely cured.

The cause of Asthma varies from patient to patient and in some it is not even diagnosed. According to Homoeopathic Theory the following factors promote asthmatic tendencies —
1) Bronchospasm — Constriction of the bronchioles means narrowing of the smaller bronchioles due to preexisting inflammation. This causes difficulty in breathing and shortness of breath. Not enough air enters and exits the lungs, so respiratory movements begin to speed up.

2) Hereditary —
Asthma, especially in infancy, may be associated with other allergic diseases such as “Hey Fever” or Urticaria. Asthma can also be hereditary in children.

3) Allergy –
Allergy means that the body is more sensitive to certain elements in the environment. These factors include

flower pollen,

plant seeds,

pet hair, house dust,

and some food particles. When these come in contact with a sensitizing agent, they cause inflammation and constriction of the small airways.

4) Emotions –
Anger,

anxiety,

frustration,

fear all contribute to exacerbation of asthma attacks in sensitive and children with asthma/asthma.

Familiar social events trigger an asthma attack by creating a state of untimely fear.

5) Infection  — Any infection or cold in upper respiratory tract can cause asthma attack in asthmatic diseases.

6) Other Factors –
Sudden exposure to cold air, unnecessary physical exercise, consumption of other food items like

shell-fish,

chocolates

or eggs including beta-blockers, aspirin etc.

Asthma is treated in Homoeopathic medicine

Patient history is very important for drug selection. This requires close observation by a Homoeopathic physician.

Children are unable to properly provide the information required for drug selection, so parental involvement becomes important. Parents should mention the following to the Homoeopathic specialist for proper treatment if their child is suffering from infantile cough or infantile asthma.

First of all, when giving patient history, how long has this problem been present?,

When does breathing problem increase ?

Time- early morning, morning, night, midnight, after exposure to cold air, does asthma start after eating cold food?

When does the patient suffer from asthma during summer, winter, humid weather, change in environment?

Does asthma attack after meal or before meal?

Along with asthma, are there other problems like skin diseases, cough, tingling in limbs, body turning blue, nausea, vomiting, headache, rashes on body, sore throat and heartburn?

2) Past history –
Did the child develop asthma after vaccination?
Did you have any skin disease before?

And then asthma started?

3) Family History –
Some things we cannot avoid. Similarly, hereditary diseases cannot be avoided.
A family history of asthma or allergic sensitivity is indicative of a genetic predisposition if more than one family member has the problem. Therefore, the consideration that Childhood Asthma may be genetic is important for drug selection.

Apart from this, the patient’s condition, his mental condition, temperament, preferences are taken into consideration in Homoeopathic medicine.

Many effective medicines like Calcarea phos, Medorinum, Tuberculinum etc. are used in Homoeopathic treatment for asthma.

The dosage and selection of these drugs can be done only after knowing the complete history of the disease.

Therefore, these medicines should be taken only as per the doctor’s advice.

It is important to involve parents in the treatment along with medication. Also, it should be remembered that along with medicines, parents’ love plays an important role in making the future life of children healthy.

Dr Ajay Hanmane
M.D.(Homeo)HHF,ICR Kolhapur
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4, Near HDFC Bank,
Bhaskar Plaza Vyapari Peth,
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
Mobile No. 7738667123
Sunday Closed

 

Please Read Next Article-