आत्ममग्नता व होमिओपॅथी / Autism and Homoeopathy

Dorctor Pic By Dr. Ajay HanmaneJuly 29, 2024 Behaviour problems Children Problems Homeopathic and Cure Mental Health

                     आत्ममग्नता व होमिओपॅथी

आकाश पाच वर्षाचा झाला होता. दिसायला तो अतिशय गोंडस पण चेहऱ्यावर ओळखीचे भाव नव्हते. त्याचे आई-वडील माझ्याकडे घेऊन आले तेव्हा तो खुर्चीमध्ये शांतपणे बसून होता. आजूबाजूला त्याचे लक्ष नव्हते. त्याच्याविषयी चाललेल्या संभाषणातही त्याला अजिबात रस नव्हता. डोळ्यात ओळखीचे भाव नव्हते.
त्याची आई सांगत होती, ‘ तो घरी असाच बसून असतो. खेळायला बाहेर जात नाही. एकटाच त्याच्या खेळण्यांशी खेळत असतो. कधी कधी स्वतःभोवतीच गिरक्या घेतो. आमच्याशी तो फारसा मिसळत नाही. त्याच्या डोळ्यात आमच्याबद्दल ओळखंच नसते. जणू तो त्याच्या आईवर बाबांना ओळखतच नाही. ‘ 
  आकाशच्या आईच्या आवाजातील दुःख मला जाणवत होते. आपला मुलगा आपल्याला ओळख दाखवत नसेल, सामान्य मुलांप्रमाणे वागत नसेल, आपल्यातच किंवा निर्जीव खेळण्यातच रमत असेल, तर कोणत्याही आई-वडिलांना दुःख हे जाणवणारच.
आत्ममग्नता विकाराने ग्रस्त झालेल्या रुग्णांमध्ये बराच फरक असू शकतो. एका टोकाला काही व्यक्ती जवळजवळ अपंग झाल्याप्रमाणे असतात तर दुसऱ्या टोकाला काहींना वरचढ बुद्धिमत्तेची देणगी लावलेली असते. 
या सर्वांना सामाजिक संबंध टिकवायला आवश्यक गोष्टींची मोठी अडचण येते. इतरांच्या भावना ओळखणे व त्यांना योग्य प्रतिसाद देणे या गोष्टी त्यांना जमत नाहीत. त्यामुळे हे रुग्ण आपल्या परिसरातील व्यक्ती किंवा घटना यांना योग्य प्रतिसाद देत नाहीत. इतरांशी वैचारिक भावनात्मक देवाण-घेवाण करू शकत नाहीत. अशा तऱ्हेचा दोष असावा अशी शंका अगदी लहान वयातही येऊ शकते.
कोणतेही नॉर्मल मुल दोन ते तीन महिन्याचे झाले की, आपल्या आईला ओळखायला लागते. तिच्याकडे पाहून हसते.
पाच ते सहा महिन्याचे झाल्यावर ते आई-बाबा, घरातील व्यक्तींनाही ओळखते. हात पुढे काढून त्यांच्याकडे जायला बघते.
भूक लागल्यानंतर आईने जवळ घेण्यासाठी वेगळ्या आवाजात रडते. नवीन कोणी व्यक्तीने घेण्याचा प्रयत्न केला तर रडायला लागते. पण आपण त्याला घेण्यासाठी हात पुढे केल्यावर प्रतिसाद म्हणून तेही हात पुढे करते.
एक ते दोन वर्षाचे झाल्यावर बाहेर जाण्यासाठी हट्ट धरते. इतर लहान मुले दिसताच त्यांच्याशी खेळण्याचा प्रयत्न करते. अशा प्रकारे त्यांच्याही सामाजिक भावना वाढत जातात.
परंतु ऑटिझम असणाऱ्या मुलांकडून तसा प्रतिसाद मिळत नाही. उलट पक्षी आईने उचलल्यावर वेगळीकडे मूल वळते. आईच्या डोळ्याकडे पाहतच नाही.
वयाच्या दोन ते तीन वर्षे बोलणारी मुलं खूप वेळाने बोलायला लागतात आणि इतरांनी बोललेलं त्यांना समजू शकत नाही. या मुलांमध्ये बोलण्याची अडचण, संवाद साधण्यांमध्ये अडचणी, यामुळे बोलण्याची क्षमता खूप उशिरा निर्माण होते. कधी कधी होतही नाही. या आजाराची 50% मुलं थोडी बहुत बोलायला शिकतात, पण त्याच्यातही अनेक चुका दिसतात. त्यातही मुलं स्वतःचे म्हणणे इतरांना व्यवस्थितपणे सांगू शकत नाहीत.
 या मुलांमध्ये बौद्धिक वाढ खुंटलेली असते. ती मतिमंद असतात. फक्त 25% मुलांमध्ये बुद्धिमत्ता ही सामान्य असू शकते. त्यामुळे त्यांना हातद्वाराच्या साह्याने ही त्यांचे म्हणणे नीट सांगता येत नाही.
 संपूर्ण वाक्य बोलण्याऐवजी एखाद्या वस्तूचे नाव घेतात. इतर जे शब्द बोलतात ते ऑटिस्टिकमध्ये  परत परत उच्चारतात.
त्यांची दुसरी बाजू म्हणजे काहींना सर्वसामान्य मुलांइतकी किंवा अधिकच बुद्धिमत्ता असते. इतरांशी मिसळताना आणि हा मात्र स्वभाव कायम असाच असतो. अशा मुलांमध्ये काही वेळा आश्चर्यकारक गुण हे दिसून येतात. खूप मोठ्या संख्येच्या बेरजा ही मुलं क्षणार्धात करू शकतात. काहींना कित्येकांचे टेलिफोन नंबर पाठ असतात. अतिशय किचकट आकृती एकदा पाहून तशीच्या तशी काढणे हे त्यांना पटकन जमते. अशा लोकांमध्ये विलक्षण सामर्थ्य कसे येते हे  कोडेच असते. ही सिद्धी मिळण्याकरता त्यांनी कोणतेही प्रयत्न केलेले नसतात.
साधारणपणे चार ते पाच वर्षाच्या मुलांना इतरांच्या भावना ओळखून येऊ लागतात. आपण दुसऱ्यांच्या जागी असतो तर आपल्याला कसे वाटले असते ? याचा विचार चार वर्षाची मूल करू शकते.
ऑटस्टिक मुलांना अशा प्रकारचे विचार आणि भावना येत नसल्याने इतरांशी संभाषण आणि भावनिक देवाण-घेवाण कौशल्य असंत नाही.  अशा ज्या गोष्टी आपोआप कळणे अपेक्षित आहे त्या गोष्टी एक तर कळतच नाहीत किंवा ऑटिस्टिक मुलांना बऱ्याच प्रयत्नानंतर आणि विचार करूनच करू शकतात.
लहान मुलं खेळताना आपण कोणीतरी आहोत अशी भूमिका घेतात. उदाहरणार्थ- चोर शिपाई खेळत आपण चोर झालो आहोत दुसरी कोणीतरी शिपाई झाले असे मानून खेळ खेळला जातो किंवा कोणीतरी शिक्षक बनते तर दुसरी विद्यार्थी बनतात. हा मानण्याचा भाग खेळापुरता आहे, याचे भान मुलांना असते. ऑटिझमच्या मुलांना असे मानने जमतच नाही.
  ज्या खेळात अनेक मुले भाग घेतात अशा खेळात ऑटिस्टिक मुले भाग घेऊ शकत नाहीत. एखादी गोष्ट परत परत तशीच करत राहतात. काही वस्तू विशिष्ट पद्धतीने ठेवल्या गेल्या पाहिजेत, असा त्यांचा आग्रह असतो. या मांडणीमध्ये अनेकदा विक्षिप्तपणा असतो. त्याचे कारण त्यांना सांगता येत नाही व इतरांना ते कळू शकत नाही.
या मुलांना वातावरणातील तोच तोच पणा आवडतो. बदल त्यांना आवडत नाही. एका विशिष्ट रस्त्याने ते घरी जाण्याचा किंवा शाळेत जाण्याचा त्याग्रह करतात. नवीन खेळणी, नवीन कपडे त्यांना नकोशी वाटतात. खोलीची रचना बदली तर ते अस्वस्थ  होतात. नवीन वातावरणात जाणे त्यांना आवडत नाही. तीच तीच कृती वारंवार करत राहतात. माणसांपेक्षा त्यांना वस्तूंमध्ये अधिक रस असतो. खेळताना का होईनाना दुसऱ्यांना चकवणे किंवा दाखवतोच असे न वागणे या गोष्टी त्यांना करता येत नाहीत.
बोलताना वाक्यातील शब्दांचे अर्थ संदर्भानुसार बदलतात ती संकल्पना समजू शकत नाहीत. ‘फार शहाणा दिसतोय’ याचा अर्थ ‘तो वेडेपणा करतोय  ‘ असा आहे, हे कळत नाही.ऑटिझमच्या असणाऱ्या व्यक्तींमध्ये खूप फरक असू शकतो. विकार मोठ्या प्रमाणात असलेल्या व्यक्ती बोलत नाहीत.
आजूबाजूला घडणाऱ्या घटनेची दखल घेत नाहीत असे दिसते. सतत मागेपुढे हलणे, रॉकिंग स्वतःभोवती गिरक्या घेणे, पक्षांच्या पंखाप्रमाणे हात पसरून पळणे अशा कृती त्यांना आवडतात. कधीकधी ही मुले अचानक आक्रमक होतात. फेकाफेकी किंवा तोडफोड करतात. काही मुले आपल्या केसांची बट आपल्या बोटांमध्ये गुंडाळत आणि सोडवत बसतात. बहुतेकांना त्यांचे विचार भाषेत प्रकट करता येत नाहीत.
हा आजार शारीरिक व बौद्धिक विकास होताना निर्माण झालेली समस्या असते. त्यामुळे त्याला परव्हेसिव डेव्हलपमेंटल डिसऑर्डर ( Pervasive Developmental Disorder) असेही म्हटले जाते. त्यांच्या मेंदूतील सामाजिक भावना जाणणारा व संवादासाठी कारणीभूत असणाऱ्या भागाची व्यवस्थित वाढ झालेली नसते.
आपल्या मेंदूत येणाऱ्या हजारो संवेदनांपैकी अनेक संवेदना गाळून टाकण्याची यंत्रणा असते. या यंत्रणांचे काम नीट न झाल्याने अशी सिद्धी प्राप्त होते की काय ? असे शास्त्रज्ञांना वाटते. आपल्या मेंदूची वाढ होत असताना काही दोष झाल्याने असे होत असावे.
मेंदूचे दोन प्रकारे वाढ होत असते.
  • हे एक पेशींची संख्या वाढते आणि
  • दोन पेशींमधील देवाण-घेवाण होण्याची यंत्रणा अधिकाधिक कार्यक्षम होत जाते

 

 ही देवाण-घेवाण विद्युत रासायनिक पद्धतीने होत असते. विविध मेंदूच्या पेशी काही रासायनिक रेणू तयार करतात. पेशीही रेणू स्त्रवतात. हे रेणू दुसऱ्या पेशीच्या आवरणाशी पोहोचल्यावर तेथे विजेची घनता अथवा ऋणता बदलते. या बदलामुळे यात दुसऱ्या पेशीत काही रासायनिक बदल सुरू होतात. या यंत्रणेत पुरेशी परिपक्वता येत नाही, म्हणून ऑटिझम होत असावा. कदाचित अनुवंशिकतेशी अनुवंशिकतेचाही भाग असावा.
एखाद्या मुलाला ऑटिझम असल्यास इतर भावना नाहीत. ऑटिझम भावांनाही ऑटिझम होण्याची शक्यता वाढलेली असते. 
आपल्या गुणसूत्रात एक्स (X)मुळाक्षरांनी ओळखले जाणारे एक गुणसूत्र असते. स्त्रियांमध्ये एक्स (X) गुणसूत्रांची जोडी असते, म्हणजे एक्स एक्स (XX)  अशी गुणसूत्रे असतात, पुरुषात तर एक एक्स  (X) असते तर दुसरे वाय (Y)हे गुणसूत्र असते. माता-पिता यांच्यापैकी कोणाच्याही एका एक्स (X) गुणसूत्रात झालेल्या बदलामुळे इम्युलेशन (Emulation) मुळात फ्रजाईल सिंड्रोम एक्स सिंड्रोम (Fragile  X Syndrome) अशी परिस्थिती निर्माण होते. 
या फ्रजाईल  एक्स सिंड्रोम (Fragile X Syndrome)  असणाऱ्या मुलात काही दोष निर्माण होऊ शकतात, यात ऑटिझम हा एक असू शकतो. गर्भवती मातेला जर्मन मिझल्स (German Measles) किंवा सायटोमेगॅलो व्हायरस ( Cytomegaly Virus) विषाणूची लागण झाल्यास गर्भाला होणारा अपायांपैकी ऑटिझम हा एक अपाय आहे.
काही व्यक्तींच्या त्वचेवर न्यूरोफायब्रोमा (Neurofibroma) नावाच्या गाठी येतात तर काहींच्या चेहऱ्यावर गाठी सदृश्य विकार येतात.
ट्यूबेरस सिंड्रोम या मुलांमध्ये ऑटिझमचे प्रमाण जास्त असते. लहान मुलांना ताप आल्यास फिट्स येऊ शकतात. त्यांना फेब्राइल  कनव्हल्जन्स (Febrile Convulsions)म्हणतात. अशांना ऑटिझम असण्याची शक्यता जास्त असते. त्यांच्या मेंदूत रचनात्मक आणि क्रियात्मक दोष होतात. परंतु दोषामागचे कारण अद्याप कळलेले नाही.
आपल्या मेंदूचा फ्रंटल लोब हा महत्त्वाचा भाग आहे. विचार, निर्णय घेणे,  चारित्र्य संवर्धन करणे, तर्क करणे, आयुष्यात मूल्ये समजणे व ती पाळणे, अशी कामे येथे होतात. या फ्रंटल लोब मध्ये दोष असल्याने ऑटिझम होत असावा.
ऑटिझम प्रमाणे आणखी काही आजार या प्रकारात मोडतात.
रेट्स  डिऑर्डर (Rett’s Disorder) नावाचा आजार प्रामुख्याने मुलींमध्ये जाणवतो. यामध्ये पहिले सहा महिने बाळाची वाढ व्यवस्थित होते व नंतर हळूहळू त्यांच्या मेंदूची वाढ कमी होते व वरील लक्षणे जाणवायला लागतात.
चाइल्डहूड डिसइटिग्रेशन डिसऑर्डर (Childhood Disintegration Disorder) यामध्ये वयाच्या दोन वर्षापर्यंत व्यवस्थित वाढ होते व त्यानंतर समस्या सुरू होतात व निर्माण झालेल्या क्षमताई हळूहळू कमी होतात.
ऑटिझमच्या एका प्रकाराला “अस्पर्जर्स सिंड्रोम” (Asperger’s Syndrome) म्हणतात. या प्रकारात सामाजिक अस्तित्वाला मोठी बाधा येते. या रुग्णांची बुद्धी सामान्य माणसांपेक्षा विशेषता प्रगल्भता पावते. तरीदेखील दुसऱ्या माणसाचा मनात काय चाललंय याची कल्पना त्यांना येत नाही. त्यामुळे त्यांना दुसऱ्याच्या भावनांची कदर नाही नाही असे इतरांना वाटते. एकच गोष्ट परत परत करणे यात अस्पर्जर्स सिंड्रोमच्या (Asperger’s Syndrome)  व्यक्तींना खूप प्रगती करता येते.
दुर्दैवाने अजून फार प्रभावी उपचार या आजारासाठी उपलब्ध नाहीत. परंतु होमिओपॅथिमध्ये तज्ञांच्या सहाय्याने औषधे दिल्यास त्यांच्यामध्ये काही क्षमता निर्माण करता येते. 
काही होमिओपॅथिक औषधे निश्चितपणे या आजारासाठी उपयोगी पडतात. या मुलांचे शिक्षण काळजीपूर्वक करणे फार महत्त्वाचे ठरू शकते. ज्या मुलांची बुद्धिमत्ता चांगली असते त्यांना शाळेतही पाठवता येते, परंतु त्यांच्यासाठी वेगळ्या शाळांची आवश्यकता असते.
काही पालकांना या मुलांच्या तक्रारीमुळे चिंता, उदासीनता दिसायला लागते परंतु परिस्थितीचा स्वीकार करण्यासाठी तयार राहणे गरजेचे आहे. मग पालकांच्या मदतीनेच मुलांसाठी प्रयत्न करता येऊ शकतात.
होमिओपॅथिक औषधाने  त्यांच्या आयुष्यात काहीतरी आनंद निर्माण करणे सहज शक्य आहे. 

डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ) HHF, ICR Kolhapur,
चैतन्य होमिओपॅथीक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4, HDFC बॅंकेजवळ,
शाहुपुरी व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123
रविवारी बंद  

कृपया पुढील लेख वाचा  —

————————————————————-

        Autism and Homoeopathy

 

Akash was five years old. He looked very cute but his face was not familiar. He was sitting quietly in a chair when his parents brought him to me. He was not paying attention around. He was not at all interested in the conversation about him. There was no familiarity in the eyes.
His mother was saying, ‘He is sitting at home like this. Not going out to play. Alone playing with his toys. Sometimes it revolves around itself. He doesn’t mix well with us. There is no recognition of us in his eyes. It’s like he doesn’t know his father over his mother. ‘
I could feel the sadness in Akash’s mother’s voice. If your child does not recognize you, does not behave like normal children, is only interested in himself or in lifeless play, any parent will feel sad.
Patients suffering from obsessive-compulsive disorder can vary greatly. At one extreme some individuals are almost crippled while at the other extreme some are gifted with superior intelligence.
All of them have great difficulty in maintaining social relations. They are not able to recognize the feelings of others and respond appropriately to them. Therefore, these patients do not respond appropriately to people or events in their environment. Cannot exchange thoughts and emotions with others. Suspicion of such a defect can arise even at a young age.
Any normal baby starts to recognize its mother when it is two to three months old. Smiles at her.
After five to six months, it recognizes its parents and household members. She/he looks towards them with her /his hand out.
After getting hungry, the mother cries in a different voice to be close. If a new person tries to take it, it starts crying. But when we reach out to receive it, it also reaches out in response.
After one to two years of age, it insists on going outside. Tries to play with other babies as soon as they appear. In this way their social feelings also increase.
But children with autism do not get such a response. On the other hand, when the mother picks up the bird, the child turns to the other side. He does not look into his mother’s eyes.
Children who speak at the age of two to three years begin to speak very slowly and cannot understand what others have said. Difficulty in speaking, communication difficulties in these children, due to which the ability to speak develops very late. Sometimes it doesn’t. 50% of children with this disease learn to speak a little more, but they also make many mistakes. Even so, children cannot express themselves properly to others.
These children have stunted intellectual growth. They are retarded. Intelligence may be normal in only 25% of children. Therefore, they cannot say their words properly with the help of hands.
Names an object instead of speaking a complete sentence. The autistic repeats the words that others speak and back.
The other side of them is that some have intelligence equal to or more than normal children. Mixing with others and this nature is always the same.
Such children sometimes show surprising qualities. Children can do very large sums in an instant. Some have phone numbers of many. They can quickly draw a very complicated figure after seeing it. It is a mystery how such people get such extraordinary powers. They have not made any effort to achieve this achievement.
Generally, children between the ages of four and five begin to recognize the emotions of others. How would you feel if you were in someone else’s place? A four-year-old child can think of it.
Since autistic children do not have these kinds of thoughts and feelings, communication and emotional exchange skills with others are not impaired. Things that are expected to be learned automatically are either not learned or can be learned by autistic children only after much effort and thought.
Children pretend to be someone when they play. For example– while playing thief soldier, the game is played by pretending that someone else has become a soldier, or someone becomes a teacher while another becomes a student. Children are aware that this believing part is for play. Autistic children do not have this understanding.
Autistic children may not participate in sports that many children participate in. They keep doing the same thing over and over again. They insist that certain things should be kept in a certain way. There is often an eccentricity to this arrangement. They cannot tell the reason for it and others cannot know it. These kids love the same atmosphere.
They don’t like change. They insist going home or going to school on a particular road. They don’t want new toys, new clothes. If the design of the room changes, they become uncomfortable. They don’t like going to new environment. They keep doing the same thing over and over again. They have more interest in objects than humans. They cannot do things like teasing others or showing off while playing.
While speaking, they cannot understand the concept that the meaning of words in a sentence changes depending on the context. ‘Looking very smart’ doesn’t mean ‘he’s acting crazy’. People with autism can vary greatly.
Individuals with the disorder largely do not speak. They don’t seem to be paying attention to what is happening around them. They love actions such as moving back and forth, rocking, wheeling around themselves, running with arms outstretched like a bird’s wings. Sometimes these children suddenly become aggressive. Throwing or vandalizing. Some children sit around twisting and untangling the ends of their hair between their fingers. Most of them cannot express their thoughts in language.
This disease is a problem arising during physical and intellectual development. So it is also called Pervasive Developmental Disorder. The part of their brain that perceives social emotions and is responsible for communication is not properly developed.
Our brain has a mechanism to filter out many of the thousands of sensations that come our way. Is this achievement achieved because these systems are not working properly? Scientists think so. This may be due to some defect while our brain is growing.
The brain grows in two ways.
  • It increases the number of cells and
  • The exchange mechanism between the two cells becomes more and more efficient
This exchange is done electrochemically. Different brain cells produce certain chemical molecules. Cells also secrete molecules. When these molecules reach the cell membrane of another cell, the charge density or negativity changes. This change initiates some chemical changes in the second cell. This mechanism may not mature enough, hence autism. Perhaps genetics has a part to play with genetics.
If a child has autism, there is no other emotion. Autism siblings are also more likely to develop autism.
Our chromosome contains a chromosome known by the letter X. Females have a pair of X chromosomes, that is XX, while males have one X and the other is Y. Due to the change in one of the X chromosomes of either of the parents, Emulation  basically creates a situation called Fragile X Syndrome.
A child with Fragile X Syndrome may develop some defects, autism may be one of them.
Autism is one of the dangers to the fetus if the pregnant mother is infected with German Measles or Cytomegaly Virus.
Some people develop tumors called Neurofibroma on the skin, while others develop tumor-like disorders on the face.
Children with tuberous syndrome have a higher prevalence of autism.
Babies can have fits if they have a fever. They are called febrile convulsions. They are more likely to have autism.
They have structural and functional defects in the brain. But the reason behind the defect is still unknown.
The frontal lobe is an important part of our brain. Thinking, decision making, character development, reasoning, understanding values ​​in life and following them are done here. Defects in this frontal lobe may lead to autism.
Other diseases like autism fall into this category.
A disease called Rett’s Disorder is mainly felt in girls. In this, the growth of the baby is normal for the first six months and then gradually the growth of the brain slows down and the above symptoms start to appear.
Childhood Disintegration Disorder – In this there is regular growth till the age of two years and then the problems start and the developed abilities gradually decrease.
One type of autism is called “Asperger’s Syndrome”. In this type, social existence is greatly hampered. The intelligence of these patients is characteristically profound compared to normal people. However, they have no idea what is going on in the other person’s mind. Because of this, others feel that they don’t value other people’s feelings. Individuals with Asperger’s Syndrome can make great progress in repeating a single thing.
Unfortunately, there are still no very effective treatments available for this disease.
But in Homoeopathy, if the medicines are given with the help of a specialist, they can create some potential in them.
Some Homoeopathic medicines are definitely helpful for this disease. Careful education of these children can be very important.
Children with good intelligence can also be sent to school, but they need separate schools. Some parents feel anxious and depressed due to the complaints of these children, but it is necessary to be ready to accept the situation. Then efforts can be made for children only with the help of parents.
Homeopathic medicines can easily bring some happiness in their life.

Dr Ajay Hanmane
M.D.(Hom) HHF,ICR Kolhapur,
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4,Near HDFC Bank,
Bhaskar Plaza Vyapari Peth,
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
Mobile No. 7738667123
Sunday Closed.

Please Read Next Article-