सांधेदुखी आणि होमिओपॅथिक दृष्टिकोन / Arthritis and the Homoeopathic Approach

Dorctor Pic By Dr. Ajay HanmaneDecember 30, 2024 Anxiety Female Problems General Information Homeopathic and Cure Mental Health Mental Health Psychiatry Rheumatic Arthritis

 सांधेदुखी आणि होमिओपॅथिक दृष्टिकोन

माझ्याकडे सांधेदुखीची म्हातारी पेशंट आहे, जी गेली चार-पाच वर्षे अंथरुणाला खिळून राहिली होती. मुलं होती. मुली होत्या. पण प्रत्येक जण आपापल्या बिझी लाईफ (Busy Life) मध्ये म्हणजे आपापल्या धुंदीत होते. मुलींची लग्न करून दिलेली, पण जरा वाढलेल्या वयात. त्यामुळे पदरी पडलेली स्थळ ती ! गोड मानून घेण्यातच सारं आयुष्य खर्ची झालेलं. मुलांची लग्ने ही तशीच. मागच्या पानावरून पुढे चालू. तुटली नाहीत म्हणून क्रमशः होत राहिलेली !. म्हातारीचा मालक बराच आधी कधीतरी म्हातारीला सोडून गेलेला. तिने ज्या उमेदीने आणि (लुटू्पुटूच्या) उत्साहाने संसार करण्याचा प्रयत्न केला, त्याला विशेष कोणी तितक्याशा उत्साहाने ना साथ दिली ना साद  दिली होती. पण म्हातारी देवाची आराधना करत कुठल्याशा वेड्या आशेवर शेवटपर्यंत तग धरून होती. संसाराचं सुख नाही, पोरापोट्यांचा आधार नाही, सुख तर दूरचीच गोष्ट, काही कमावल्याचा आनंद नाही, सतत जीवाची घालमेल पण चेहऱ्यावर उत्साह……रक्तात साखर नाही, रक्तदाब नाही, तशी ठणठणीत पण सगळे संधी निकामी झालेले……..जुन्या वाड्याच्या दरवाजांसारखं आवाज करणारे……..कुरकुरणारे, पिडलेले, करकर आवाज करणारे…
कशासाठी बरंही म्हातारी जगली असेल इतकी वर्षे ? 
 का म्हणून जगवलं गेला असेल हीला देवाकडून ?
का नाही हीचं रोजच मरण जगता जगता जगणंच कायमच संपून गेलं ? 
या त्रस्त म्हातारीच्या शारीरिक त्रासात आणि मानसिक अवस्थेत एक वेगळेच साधर्म्य लक्षात आलं.
 दोन व्यक्तींना एकमेकांशी जोडून (सांधून) ठेवतं ते ‘नातं’ आणि दोन हाडांना एकमेकांशी जोडून ठेवतो तो ‘सांधा’ (Joint)
आणि या वृद्ध स्त्रीची सर्व नाती बिनकामाची निघाली, त्रासदायक होऊन बसली. आणि तसेच तिचे सांधे सांधे ठणकू लागले. निरुपयोगी होऊन बसले. ‘अति’ –  शास्त्रीय दृष्टिकोन बाळगणारी तज्ञ मंडळी मनाचा (असा) शारीरिक व्याधींशी संबंध लावल्यावर उपहासात्मक हसतात.त्यांना हे सारं खूपच अशास्त्रीय वाटतं.
पण वैद्यकीय व्यवसायात संवेदनशीलतेने काम केलं तर असे बऱ्याचदा लक्षात येते की, जसे वाढत्या वयातील सांधेदुखीला  ट्राॅमा (Trauma), तसेच इन्फेक्शन (Infection) , ऑटोइंम्युन (Auto-Immune), अनुवंशिकता इत्यादी कारणे असू शकतात. तसेच उतार वयातील सांधेदुखीला (आजाराला) वरील कारणांबरोबरच वजन, हार्मोनल, प्रॉब्लेम तसेच वा त्याहून अधिक प्रमाणात मानसिक ताण-तणाव जबाबदार असतात.
 त्या वृद्ध स्त्रीचे आयुष्यातले सर्व ‘सांधे’ कधीच निखळून पडले आणि शरीर सांध्याच्या दुखण्यातून कण्हत कण्हत बोलू लागले. 
  उतारा वयात अधिक मानसिक ताण -तणावांमध्ये ही दुखरी नाती जास्त त्रास देतात. नातं म्हटलं की अपेक्षा आल्या, अपेक्षांची पूर्तता-अपूर्णता आली. व्यक्त-अव्यक्त राग, लोभ आले, मनात खोलवर रूतून बसलेली एखादी वेदना आली, किल्मीषे आली..बरंच काही.
एकदा का ह्या भावनांची मनात मंडई भरू लागली की, मन:स्वास्थ्य बिघडलं म्हणून समजा …..
आणि सांधा बोलू लागतो..…..
तसं तर हे ‘अतार्किक’ वाटणार  लॉजिक (Logic) बऱ्याचशा आजारांना लागू पडतं, पण ‘सांधा आणि नातं ‘  यातील नव्याने लक्षात आलेल्या सारखेपणामुळे ते इथे अधिक संयुक्तिक ठरू शकतं.
उतारावयातील मानसिक ताण-तणाव तसे  दिसायला किरकोळ वाटतात पण ‘ ज्याचं जळतं ……..’ या पारंपरिक युक्तीचा आधार घेतला तर तसे ते तितकेसे सरळ साधे किरकोळ नसतात.
वाढत्या वयात नात्यातील ताण सहन करण्याची क्षमता जरा जास्त असते.  नातेसंबंधात खूपणाऱ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून हवे ते साध्य करून, पाहिजे ते पदरी पाडून घेण्याची धमक त्या वयात असते. तसेच एखाद्या बारीकशा समस्येकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याची (मानसिक) लवचिकता त्या वयात असते. उर्मी असते.
पण उतार वयात ही लवचिकता हळूहळू कमी होऊ लागते.(तशीच जशी सांध्याची लवचिकता वयाबरोबर कमी होत जाते) बारीकशी गोष्ट जी, तरुणपणी लक्षात देखील आली नव्हती, तीच उतारवयात मनामध्ये घर करून बसते. कितीही पुसून टाकायचा प्रयत्न केला तरी काहीतरी उरतंच आणि मनावरचा भार वाढत जातो. हळूहळू त्याचा ताण जाणव लागतो. ताण वाढत जातो आणि एखाद्या कमजोर क्षणी मन आपलं ताण शरीरावर टाकून देते.
.…..आणि सांधा बोलू लागतो.
जन्मानेच बांधली गेलेली नाती असोत वा नंतर जोडत गेलेली नाती असोत, त्यांचे सुरुवातीचे स्वरूप शेवटपर्यंत राहत नसते. ते कालानुरूप, परिस्थितीनुसार व प्रत्येकाच्या नातं जपण्याच्या वकुबानुसार बदलत जाते.
नात्यातील जवळीकतेमुळे वाढत गेलेल्या अपेक्षा, वाढत्या वयाबरोबर अपेक्षित असलेली पण थोडक्यात हुकलेली मॅच्युरिटी (Maturity) , येत गेलेल्या अनुभवामुळे बदलत जाणारे स्वभाव, नात्यातील चुकते न केलेले जुने हिशोब, हेवे-दावे, मनातील अढी, असूया, आकस अशा अनेक कारणांनी नाती दुखरी होत जातात. दसरा, दिवाळी, राखी पौर्णिमा इत्यादी सण नेहमीच येतात, सहकुटुंब ‘साजरे’ ही केले जातात. काही काळापूरती ‘गाडी’ सर्विसिंग’ (servicing) केल्याप्रमाणे स्मुथ (Smooth) चालते.
पण परत “कार्बोरेटर” (carburettor)  मध्ये “कचरा” अडकायचं तो अडकतोच.
नाती बदलतात.दुरावतात. दुखावतात. त्यातून जवळच्या माणसाचे आपल्या जवळ नसणे…. मग ते कधी नोकरी, शिक्षणामुळे असेल, लग्न झाल्यामुळे असेल किंवा टोकाची वेदना म्हणजे एखाद्याचा मृत्यू झाल्यामुळे असेल, घरातील आजारपणं व त्यामुळे होणारी शारीरीक, मानसिक व आर्थिक ओढाताण, इतर काही आर्थिक जबाबदाऱ्या, कुठल्यातरी प्रसंगात झालेले मानापमान, देण्या-घेण्यात झालेले उणे-अधिक (त्यात उणेच अधिक उणेच), प्रॉपर्टी मॅटर, त्यामुळे वाटणारी अवहेलना, उपेक्षा…..  या व अशा अनेक कारणांनी, अनेक बाजूनी नात्यात ताण निर्माण होत असतो आणि हळूहळू मनात घर करून बसतो.
आधी ही टेन्शन्स मनात घर करतात आणि नंतर आपणच ‘त्या’ घरात राहू लागतो. कालांतराने आयुष्यातील हे दुखरे ‘सांधे’, आपल्या शरीरातील हाडांच्या एकमेकांशी असलेल्या ‘नात्या’ वर परिणाम करतातच….कितीही नाकारा !
आणि हे सगळं इतकं आपल्या नकळत, आपल्या अंत:र्मनात होत असतं की, आपल्याला त्याचा पत्ता देखील नसतो. कुणी सहज म्हणून आपल्या तक्रारींचा मनाशी संबंध लावलाच तर आपण त्याला वेड्यात काढतो.
इतरत्र माहित नाही, पण आपण भारतीय ह्या नात्यांमध्ये खूप गुरफटलेले असतो. नाती हीच आपली स्ट्रेंथ- (Strength) आहे, असे आपण मानतो. पण म्हणूनच नाती हाच आपल्या विकनेस (weakness) होऊन बसतो, याकडे आपण सोयीस्कर कानाडोळा करतो. ह्याचाच फायदा घेऊन ” जो बीबीसे करे प्यार  अमुक-तमुक से कैसे  इन्कार”  यासारख्या जाहिराती आपल्यावर लादल्या जातात. “जोडूया अतूट नाती”, रिश्ता वही, सोच नयी”, इत्यादी टॅगलाईन्स Tag-lines तर आपल्या विकनेस weakness ला केंद्रबिंदू ठेवूनच लिहिल्या आहेत.
WhatsApp च्या माध्यमातून ही “नाती” या विषयावरून वारंवार आपलं काहीतरी” बौद्धिक”  घेतलं जातचं. कारण त्याच्या लेखकाला खात्री असते की नात्यावरचं भाषा असल्याने व्हायरल होणारचं. इतकी आपण नाती आपल्या केंद्रस्थानी मानतो. ती जपण्यासाठी जीवाचा आटापिटा करतो. कितीतरी एनर्जी (Energy) यात इन्व्हेस्ट (Invest) करतो, आणि पाहिजे ते ‘रिटर्न्स’ (Returns) मिळाले नाहीत ही कुरकुरीत बसतो.
या इथे थोडसं आडवळण घेऊन उल्लेख करावासा वाटतो तो आमच्या होमिओपॅथीच्या लाडक्या आद्यप्रवर्तकाचा……. डॉक्टर सॅम्युअल हॅनीमान.(Dr Samuel Hahnemann)
या थोर संशोधकांने आम्हांला शेकडो औषधी दिलीच, तसेच ते वापरण्यासाठीची मार्गदर्शक तत्वेही दिली आहेत आणि यातच एक मोठी संकल्पना आम्हां होमिओपॅथीच्या डॉक्टरांना प्रत्यक्षात आणायला सांगितली……ती म्हणजे  Be an Unprejudiced Observer एक पूर्वग्रहविरहित निरीक्षक बना.
 होमिओपॅथिक शिक्षणं एक वेळ सोपं वाटेलही पण Unprejudiced Observer ! होता येणं हे अशक्याहूनही अशक्य आहे.
त्यातून असे आहे की दुसऱ्याच्या बाबतीत आपण पूर्वग्रहविरहित आहोत असा छाती ठोक दावा करता येतोही, पण स्वतःच्या बाबतीत तो कितीही स्वतःची छाती ठोकून केला तरी चुकीचा ठरू शकतो. इन फॅक्ट (In fact) ठरतोही ! मुख्यत्वे करून स्वतःच्या बाबतीत म्हणजेच आपल्या नातेसंबंधाच्याबाबतीत !!
कारण सर्व नाती ही बहुतांशी Prejudices  वरच आधारित असतात. अगदी आई गरीब, प्रेमळ, मनमिळावू आणि बाप तापट, तिरसट……ह्या व अशा कित्येक मनाच्या समजुती निव्वळ Prejudices असतात, कुणी कितीही नाकारले तरी,  एका बहिणीचा स्क्रू (Screw) ढिला आणि एक भाऊ अति चांगला तर दुसरा दुष्ट आणि स्वार्थी.
शेजारच्या वन्स शिष्ठ आणि आतल्या गाठीच्या त्यांना लांबची नणंद ‘आपण बरं, आपलं बरं’  अशी लांबून चांगली ! एक मास्तर खडूस आणि खवीस, लांब केसांची टीचर मात्र ‘लय भारी’……हे सगळे Prejudices नाहीत तर काय आहेत ?
यातले कितीतरी जस्ट कॅरीड फॉरवर्ड (Just Carried Forward) असतात, विनाकारण कुठून तरी  आपल्या डोक्यात घुसलेले व कोणीतरी कान फुंकून मेंदूत ठुसलेले. पण शेवटी पूर्वग्रहच असतात आणि खरंतर जो पर्यंत या साऱ्या (स्वतःच्या) नात्यात होमिओपॅथीचा डॉक्टर Unprejudiced Observer होत नाही, तोपर्यंत तू इतरांना यथोचित समजूनही घेऊ शकत नाही …….
Unprejudiced  व्हा असं सांगून आमचा आद्य गुरु आम्हाला स्वतःमध्ये काही बदल करून घ्या असे तर सुचवत नसेल ? ! म्हणजेच आधी आत्मपरीक्षण आलं आणि त्यातून होणारा आत्मक्लेश आला. ‘लोका सांगे’ ….. च्या चालीवरच आम्ही पुष्कळदा चालतो, आतून तसे कोरडे हा पाषाण असतो…. म्हणून हा आत्मक्लेश महत्त्वाचा. तोही इतका नको की आत्मनाशच जणू ! म्हणजे त्यावरही नियंत्रण आलं आणि हेच जमवून आणणे अवघड आहे.
आपण जर कधी आत्मपरीक्षणाला बसलोच तर स्वतःकडे पूर्ण क्रेडिट (Credit) घेतो. दुसऱ्याला दोषी ठरतो आणि स्वतः किंवा स्वतःवर इतकं काही ब्लेम (Blame) ओढवून घेतो की, त्यातून बाहेरच नाही येऊ शकत. या सर्वप्रथम प्रक्रियांचा संतुलित वापर करता येणे म्हणजे Unprejudiced होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू होणे.
हे आडवळण घेऊन सांगायचं कारण हे की, जर  प्रत्येकाने प्रत्येक नात्यात स्वतःला पूर्वग्रहविरहित करण्याचा किमान प्रयत्न जरी केला तरी मनावरचा अतिभार हलका व्हायला मदत होऊ शकेल.
काही बेसिक (Basic) प्रश्न स्वतःला विचारण्याची गरज आहे. असते.
  • माझंच काही चुकलं तर नसेल ना ?
  • माझ्या बोलण्याचा टोण (Tone) नक्की बरोबर होता ना ?
  • मी  व्यक्त करायला  (convey) गेलो एक आणि  व्यक्त  झालं (convey) भलतंच असं तर झालं नाही आहे ना ?
  • किंवा समोरच्याला जे सांगायचं होतं ते आणि मला तेच मला पूर्णपणे समजले का ?
  • मी दुसऱ्याच गोष्टीवरचा राग,तिरस्कार तिसऱ्यावर काढला नसेल ना ?
  • मी उगाचच कोणाच्या अतिप्रेमात आंधळा तर झालो नाही ना ?
  • की कोणाबद्दल जरा प्रमाणाबाहेर जास्तच राग धरून बसलो नाही ना ?
  • मी नको तिथे इतका आणि संवेदनशील होत नाहीए ना ? इत्यादी …….

 

  • कंदरीत यातून आपण स्वतःला एखाद्या समस्येमध्ये री लोकेट (Re-locate) करत असतो. एकदा का आपण आपलं लोकेशन (Location) सोडलं की तोच प्रॉब्लेम (problem) आपल्याला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघता येतो आणि दृष्टिकोन बदलला की मनावरील ताण कमी जाणवू लागतो.
अवघडलेलं नातं भले प्रवाही नाही झालं तरी त्याची बोच कमी होते.
नाती ओझी न होता इझी (Easy) वाटू लागतात.
अर्थात हे काही साधं सोपं काम नाहीए ……असं म्हणतात की, एका जन्मात शक्यही होणार नाही……. पण प्रयत्न करायला काय हरकत आहे जर त्यामुळे मनाला होणारा त्रास व पर्यायाने शरीराला भरावा लागणारा  भुर्दंड कमी होणार असेल तर !!! ? 
कोणी सांगावं ….आयुष्यातील “सांधे” जमतील तसेच सुस्थितीत ठेवता आले तर शरीरातील हाडांची एकमेकांशी असलेली “नाती”  देखील स्मुथ (Smooth) राहू शकतील !. 
प्रयत्न तरी करू या 
आणि दृष्टिकोन बदलून बघू या !!

डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ) HHF, ICR Kolhapur,
चैतन्य होमिओपॅथीक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4, HDFC बॅंकेजवळ,
शाहुपुरी व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123
रविवारी बंद  

कृपया पुढील लेख वाचा  —

————————————————————–

Arthritis and the Homoeopathic Approach

I have an old patient with Arthritis who was bedridden for the last four or five years. She has children, Sons as well a Daughters. But everyone was in their own Busy Life. Daughters are married, but at a slightly advanced age. So it is a place that has fallen ! The whole life was spent in accepting it as it is .Sons marriages are the same. Continued from previous page. They are not broken so they keep happening gradually !. The old woman’s owner had left her sometime long ago.
With the Hope and  Enthusiasm with which she tried to live the world, no one in particular supported or supported her with equal Enthusiasm. But the old woman worshiped God and held on to some crazy hope till the end.
There is no happiness in the world, no support from children, happiness is a distant thing, no joy of earning anything, constant struggle of life but Enthusiasm on the face… No sugar in the blood, no blood pressure, so stiff but all opportunities have failed… ..sounding like the doors of an old castle……..creaking, creaking, creaking…
Why did the old woman live for so many years ?
Why should she have been kept alive by God ?
Why not struggled life of every day end forever ?
A distinct similarity was noticed in the Physical Distress and Mental state of this suffering old woman.
A ‘Relationship’ is what binds two persons together and a ‘joint’ is what binds two bones together.
And all the relations of this old woman turned out to be useless, became annoying. And also her joints began to stiffen & useless.
 The scientific community laughs sarcastically when the Mind is associated with Physical ailments. They find it all very unscientific. But if you work sensitively in the medical profession, it is often noticed that, like the joint pain of growing age, Trauma, Infection, Auto-Immune, Genetics etc. can have causes. Along with the above reasons, Weight, Hormonal problems and even more Mental stress are responsible for joint pain (disease) in the elderly.
All the ‘joints’ of the old woman’s life were dislocated and the body began to moan due to joint pain.
More Mental stress in middle age – These painful relationships cause more stress in the stressors. Relationships are said to have expectations, fulfillment and non-fulfillment of expectations. There was unexpressed anger and greed, there was a deep-rooted pain in the heart, there was anger..so many things.
Once these feelings start filling the Mind, consider it because the Mental Health has deteriorated.
And JOINT begins to speak . . . .
While this seemingly Illogical’ logic applies to many diseases, it may be more compounded here due to the newly realized similarities between ‘joints and relationships’.
The Mental stress in the verse seems minor but if we go by the traditional trick of ‘ ज्याचं जळतं ……..’ .’, they are not so simple and minor.
With increasing age, the ability to bear relationship stress is slightly higher. At that age, there is a threat to achieve what you want, to achieve what you want, to ignore what is going on in the relationship. Also at that age there is (Mental) flexibility to look at a subtle problem from a different point of view. Hope is there.
But with advancing age, this flexibility gradually begins to diminish. No matter how much you try to erase something, something remains and the burden on the Mind increases. Gradually, its stress is felt. Stress builds up and at a weak moment the Mind releases its stress onto the body.
……and And JOINT begins to speak . . . .
Relationships, whether born at birth or acquired later, do not last forever. It changes over time, according to the situation and according to the way of maintaining the relationship of each person. Relationships become painful due to many reasons such as increased expectations due to the closeness of the relationship, maturity expected with increasing age but briefly missed, character changing due to the experience, old calculations that have not been done in the relationship, envy-claims, Hate in the mind, Jealousy, Malice, Grudges. Festivals like Dussehra, Diwali, Rakhi Poornima etc. always come, family ‘celebrations’ are done. For time being, like after a Car servicing everything runs Smoothly.
But again “Garbage” gets stuck in “carburetor” 
Relationships changes. Distance in Relationship. It means not having a close person near you…. Whether it is due to job, education, marriage or due to extreme pain i.e. death of someone, illness at home and the resulting Physical, Mental and Financial burden, some other financial responsibilities, in some circumstances. Disrespect, lack of giving and receiving (in which less is more, more is less), property matters, disdain, neglect….. due to these and many other reasons, tension is created in the relationship from many sides and gradually settles in the mind.
First these tensions make a house in the Mind and then we start living in ‘that’ house. Over time, these pains in life affect the ‘joints’, the ‘relationship’ of the bones in our body….No matter how much you deny it !
And all this happens so much without our knowledge, that we don’t even have an address for it. If someone easily associates our grievances with the Mind, we drive him crazy.
I don’t know elsewhere, but we Indians are very wrapped up in these Relationships. We believe that Relationship is our Strength. But that’s why the Relationship becomes our Weakness, we conveniently turn a blind eye to it. Taking advantage of this, ads like ” जो बीबीसे करे प्यार  अमुक-तमुक से कैसे  इन्कार”  are forced upon us. Tag-lines such as ,“जोडूया अतूट नाती”, Rishta Wahi, Soch Nayi”,रिश्ता वही, सोच नयी”, etc. Tag-lines are written keeping our Weakness as the center.
Through WhatsApp, this “Relationship” was often taken from the topic of “Intellectual” because its author was sure. There is a language about Relationships that will go viral. So much so that we consider Relationships as our center. We try our best to preserve them. We invest so much Energy in it, and we feel sad that we did not get the desired ‘Returns’.
Here we want to mention with a little digression our dear pioneer of Homeopathy…. Dr. Samuel Hahnemann.
These great researchers not only gave us hundreds of medicines, but also gave us guidelines for their use, and in this one big concept we asked Homoeopathic Doctors to implement…that is to be an Unprejudiced Observer !
Homeopathic education may seem easy at one time but Unprejudiced Observer ! It is more than impossible to happen.
It follows that although you can confidently claim to be unprejudiced in the case of others, no matter how much you brag about yourself, you may be wrong. In fact In fact is also determined ! Mainly in your own case, that is, in your Relationship !!
Because all Relationships are mostly based on prejudices. Even the mother is poor, loving, agreeable and the father is passionate, stubborn……These and many such beliefs are pure prejudices, no matter how much one denies, one sister’s screw is loose and one brother is too good and the other is evil and selfish.
Neighbor’s Aunty Egoistic  and reserved (वन्स शिष्ठ आणि आतल्या गाठीच्या) , Distant DIL(लांबची नणंद) IS SELFISH & think about herself only ! A Male teacher with a dark complexion is खडूस आणि खवीस, a Female teacher with long hair is ‘Lay Bhari’…‘लय भारी’ .
What are all these if not Prejudices ?
Many of them are Just Carried Forward, entered into our heads from somewhere for no reason and someone blew their ears into our brains. But in the end there are prejudices and in fact unless the Homeopathic Doctor is an Unprejudiced Observer in all these (own) relationships, you cannot even understand others reasonably…….
By telling us to be unprejudiced, isn’t our Master Guru suggesting us to make some changes in ourselves ? !
That is, Introspection came first and Self-Suffering  (आत्मक्लेश) came from it. We often walk on the path of लोका सांगे’ ….. च्या , it is suggesting & advising everyone but not ready to change oneself …. So this need of Change Oneself-Self-Suffering  (आत्मक्लेश) is important. He also does not want it so much that it is like self-destruction ! That means it also got control and this is difficult to gather.
If we ever sit for Introspection, we take full credit to ourselves. Blames others and puts so much blame on himself or herself that he/she can’t get out of it. Being able to use these first processes in a balanced way is the beginning of the movement towards being Unprejudiced.
The reason for this is that if everyone makes at least an effort to be unprejudiced in every relationship, it can help ease the burden on the mind.

There are some basic questions to ask yourself.

  • There is Is there anything wrong with me ?
  • Tone of my speech was correct right ?
  • I went to convey one and the convey was done by accident, didn’t it happen ?
  • Or did I fully understand what the other person had to say and I did ?
  • Didn’t I take out my anger and hatred on the third thing ?
  • Didn’t I just get blinded by someone’s extreme love ?
  • Have you not held too much anger towards someone ? Aren’t I being so sensitive? Etc. . . . .

 

Overall, we re-locate ourselves in a problem. Once we leave our location, we can look at the same problem from different points of view and when the point of view changes, the stress on the Mind starts to feel less.
Even if a difficult relationship does not flow, its pain is reduced.
Relationships start to feel Easy without being Burden.
Of course, this is not an easy task….it is said that it will not be possible in one life….but what is the point of trying if it will reduce the pain of the Mind and in turn the burden of the body ? !!! 
Someone should say …. If the “Joints” of life can be kept in good condition, the “Relationship” of the Bones in the Body can also remain Smooth !.
Let’s try
And let’s Change the Approach !!

Dr Ajay Hanmane
M.D.(Hom) HHF,ICR Kolhapur,
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4, Near HDFC Bank,
Bhaskar Plaza Vyapari Peth,
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
Mobile No. 7738667123
Sunday Closed.

Please Read Next Article-