जोडीदारा शिवायचं एकटे पण आणि होमिओपॅथी !! /  Alone without Partner and Homoeopathy !!

Dorctor Pic By Dr. Ajay HanmaneDecember 9, 2024 Anxiety Female Problems General Information Mental Health Psychiatry Sexual Problems Uncategorized

 

जोडीदारा शिवायचं एकटे पण आणि होमिओपॅथी !!

बालपण सरलं किशोर अवस्था सुरू होते. वयाच्या वेगवेगळ्या टप्यांपैकी किशोर अवस्थेबद्दल माणसाला सगळ्यात जास्त आकर्षण असतं. शरीरात होणारे बदल सोडता, या वयात विरुद्ध लिंगी व्यक्तींचं नव्याणं वाटणारं आकर्षण हेही त्या मागच कारणं असू शकतं. जोडीदार असण्याचं महत्त्व या वयापासून जे सुरू होते ते पार मरेपर्यंत टिकून राहतं. बाकीच्या नात्यांपेक्षा सर्वात जास्त काळ जोडीदारच आपल्याबरोबर राहतो. म्हणूनच तर त्याला ‘जीवनसाथी’ म्हंटल  जात असावं.
 या जोडीदाराच्या असण्या-नसण्याच्या व्यक्तीच्या आयुष्याच्या एकटेपणावर परिणाम होतोच.
 जसजशी किशोर अवस्था असते तसतश्या मित्रमैत्रिणी मागे पडतात. ‘हम आपके है कौन……मध्ये,  किशोर अवस्थेमध्ये ‘ये कौनसा मोड है उमर का’  या वळणावर जुन्या मित्र-मैत्रिणी, छंद, करिअर, या सगळ्यांपेक्षा महत्त्वाच्या अशा जोडीदाराची मन वाट पाहायला लागतं. ज्यांना आज जोडीदार मिळतो त्यांचे हात एकदम आकाशाला टेकतात. त्याच्याकडूनच व तिच्याकडून मिळणाऱ्या महत्त्वामुळे, होणाऱ्या स्तुतीमुळे मुला-मुलींचा आत्मविश्वास वाढतो. आपण कोणीतरी खास आहोत ही भावना वाढीस लागते.
त्याच्याविरुद्ध ज्यांना कोणी जोडीदार मिळत नाही, त्यांना आपल्यात काय कमी आहे, म्हणून आपल्याला कोणीच पसंत केले नाही, असे वाटत राहते.
किती मित्र-मैत्रिणी कुटुंबातील व्यक्तीबरोबर असल्या, तरी जोडीदाराअभावी येणारं एकटेपण खूप त्रासदायक असतं.
शरण्या,चार भावंडातली मोठी बहीण.  तिच्या विसाव्या वर्षी वडील वारले आणि घरातील सगळी जबाबदारी तिच्यावर पडली. आईला साथ देत  तिने लगेच एक नोकरी सुरू  केली. जसजसा काळ पुढे जात होतो, तसतशा तिच्या मैत्रिणींचे साखरपुडे, लग्न, बाळंतपण  होत गेली. चार भावंडांना मार्गी लावता लावता तीन पस्तिशी ओलांडली. योग्य वयात लग्न व्हायला पाहिजे तेव्हा तिच्या पाठच्या भावंडांच्या लग्नाची लगबग सुरू झाली.
खरं जबाबदारीतून पार पडल्यावर, तिलाही तिच्यावर मनापासून प्रेम करणारा जोडीदार हवा होता.पण भावंडांचे लग्न करण्याच्या नादात तिच्या लग्नाचा विचार कोणाच्या मनात आला नारा. सगळ्या भावंडांची  लग्न झाल्यावर आपण त्यांच्या संसारात अडथळा बनू ,आई किती दिवस पुरेल ? आपण पूर्णपणे एकटे पडू अशी भीती तीला सतत वाटायची. जरी ती बाकीच्या भावंडांच्या संसारात खुश राहीली तरी जोडीदाराच्या अभावी येणारं एकटेपणाची झालर त्या खुशीला होती. अशा जोडीदार न मिळालेल्या कितीतरी शरण्या आपल्या आजूबाजूला दिसतील.
जबाबदारीमुळे, पत्रिकेमुळे, शारीरिक व्यंगामुळे, शिक्षण, करियर अशा विविध गोष्टींमुळे जोडीदार न मिळणं, पर्यायाने लग्न लांबणीवर पडणं हे घडतं. आयुष्याच्या ज्या टप्प्यावर जोडीदाराचं सर्वात जास्त महत्त्व असतं, त्या टप्प्यावर तो नसला तर एकटेपणा तर येणारच ना !
 पूर्वी लग्नाच्या वेळी  मुलांमध्ये आणि मुलींमध्ये वयात अंतर जास्त असायचं. तेव्हा त्या नात्यांमध्ये आदर, भीती या भावना असायच्या. स्त्रियांचं जोडीदारावर अवलंबून राहणं जास्त असायचं.
आताच्या लग्नांमध्ये जोडप्यातलं वयाचं अंतर कमी असतं. त्यामुळे आधीची आदर, भीतीची जागा आता मैत्रीच्या नात्याने घेतली आहे. बाहेर झालेले अपमान, दुःख, नाकारलं जाणं, सगळे बिंनदिक्कत कोणाला सांगू शकत असू, तर जोडीदारच असतो.
मित्रपरिवार असतो, पण कुटुंब आणि लग्नव्यवस्थेनं तुम्हा दोघांना रोजच्या आयुष्यात एकत्र बांधलेले असतं. बाकी कोणापेक्षाही जोडीदार वेळेला उपस्थित असतो.
दुसरं म्हणजे तुमची शक्तिस्थानं, कमकुवत स्थानं, स्वप्नं जोडीदाराला नक्कीच माहीत असतात. त्यामुळे त्याचा पाठिंबा कधी जास्त अर्थपूर्ण असतो. तुमच्या कुटुंबातल्या मर्यादा आणि आतापर्यंत आयुष्यात झालेल्या गोष्टी एक वेळ पालकांना माहित नसतात, पण जोडीदाराला नक्की माहीत असतात. दुसरं कोणी मदतीला, समजून घ्यायला येवो न येवो जोडीदार हक्काचं ठिकाण असतं. अशा जोडीदारांच्या जाण्यांनं ही ‘सपोर्ट सिस्टीम’ संपून जाते आणि मागे राहिलेल्या जोडीदाराला  एकटेपणा देऊन जाते.

जोडीदाराची अनुपस्थिती किंवा त्याचे नसणं, यात कदाचित कुणी काही करू शकत नाही. पण पूर्ण असूनही सोबत नसेल, तर येणारे एकटेपणाला दूर करणं कुणाच्या हातात असतं ?

रामायणातल्या उर्मिलाच्या एकटेपणाबद्दल  अनेकदा बोललं तरी जातं, पण लक्ष्मणाचा एकटेपणा दुर्लक्षित राहतो. भावाप्रतीचे कर्तव्य म्हणून लक्ष्मण जसा लांब वनवासात गेला, तसा आजच्या युगातही कुटुंबाप्रतीचे कर्तव्य म्हणून किती तरी लक्ष्मण जोडीदाराला सोडून कामाच्या ठिकाणी निघून जातात. त्यात परप्रांतातून किंवा वेगळ्या जिल्ह्यातून मोठे शहरात आलेला कामगारांपासून ते परदेशी नोकऱ्यांसाठी केलेल्या मंडळींपर्यंत सगळेच येतात. पुरुषालाही जोडीदाराची भावनिक साथ गरजेची असते.
मनुष्यप्राण्यांसहित सर्व प्राणीमात्रांमध्ये जोडीदाराचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. जोडीदार आहे, तो जिवंतही आहे, तरी तो वर्षांनुवर्ष वेगळा राहणार, या गोष्टीचा कितीही कंटाळा येत असला, तरी कर्तव्यपोटी ते तसंच खेचत राहावं लागतं. भरपूर पैसा कमावूनही जोडीदार सोबत नसतण्याच दुःख, त्यातून येणारा एकटेपणा अशा जोडप्यांना असाह्य करतो. कर्तव्य आणि भावना यांत कर्तव्य जिंकले, तेव्हा ते एकटेपणा घेऊन येतं.
आणखी एका प्रसंगात जोडीदाराचा वियोग होतो – घटस्फोट. वाढत्या मतभेदांना कंटाळून जोडपं जेव्हा घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत येतं, त्या पुढच्या आयुष्यात (पुनर्विवाह झाला नाही तर) एकटेपणा येणार हे निश्चित असतं. मतभेदांच्या, भांडणाच्या कटकटीपेक्षा घटस्फोटामुळे मिळणारे स्वातंत्र्य सुरुवातीच्या काळात सुखावून जातही असेल, पण नंतर तो एकटेपणा जाणवल्याशिवाय राहत नाही.
 वरच्या सगळ्या परिस्थितीत एक तर जोडीदारच नाही किंवा शारीरिकरित्या तो सोबत नाही किंवा विभक्त  झालेला आहे. पण आणखी एका परीस्थितीत जोडीदारावर प्रेम आहे, ते एकत्र आहेत, त्यांच्यात मतभेदही नाहीत, पण तरीही एकटेपणा आहे, असही काहींच्या बाबतीत होतं
नवरा आहे, पण तो स्वतःच्या कामात किंवा स्वतःच्या विश्वात हरवलेला आहे. बऱ्याचदा व्यसनाधीनता ही समोरच्या जोडीदाराच्या एकटेपणाला कारणीभूत असते. दारूचं व्यसन असणाऱ्या नवऱ्याच्या बायकोला खमकं बनवून एकटीला संसार हाकावा लागतो. याची अनेक उदाहरणं आपल्या आजूबाजूला दिसतात.
करोनानंतरच्या काळात या नात्यातला एकटेपणाला कारणीभूत एक तळहाताएवढा पिटुकला खलनायकही आला आहे  -मोबाईल.
किती जोडप्यांच्या नात्याला हा मोबाईल कमकुवत करत असल्याचं विवाह समूपदेशन आणि होमिओपॅथीक उपचार करताना दिसून येतात. यात नवरा की बायको, असा भेदभाव नाही.  स्क्रीनचं व्यसन कोणालाही लागत आहे आणि ते दारूच्या व्यसनासारखं दिवसातल्या एका वेळेपूरतं मर्यादित नाही. अनेकदा मोबाईलच्या नादात आपल्या जोडीदारचा एकटेपणा आपल्यापर्यंत पोहोचतच नाही. परिस्थितीनुसार अपरिहार्य कारणांमधला एकटेपणा दूर करणं आपल्या हातात नसेल कदाचित, पण तो सोबत आहे, त्याची काळजी घेणे, त्याला वेळ देणं आणि प्रेम देणं, हे तर आपल्या हातात निश्चित आहे.
पालकांच्या आयुष्याच्या संध्याकाळी तरुण मुलं त्यांचं आयुष्य घडविण्यासाठी घरटं सोडून निघून जातात, आपापल्या विश्वात रमून जातात. अशा वेळी जुन्या आठवणी काढायला, एकमेकांच्या औषधोपचारांची काळजी घ्यायला, शरीराच्या कुरबुरी ऐकायला आणि अशारीरिक प्रेम द्यायला जोडीदारच लागतो.
आयुष्याच्या एका वळणावर कोणीतरी पुढे जाणार कोणीतरी मागे राहणार हे नक्की असलं, तरी जोडीदाराशिवाय म्हातारपण काढणं सोपं निश्चितच नाही. आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यांवर जोडीदाराची संगत न लाभणं त्या व्यक्तीसाठी एकटेपण देणारच ठरत असतं.
वर वर पाहता ‘ऑल इज वेल’ चा मुखवटा पांघरला, तरी कातरवेळी जवळच्या, आपल्या माणसाची साथ हवीहवीशी वाटते. कोंडमारा करणाऱ्या या एकटेपणाला डोळसपणे  भिडण्यासाठी  होमिओपॅथीची साथ मिळाली तर  एकटेपणाला निश्चितपणे  दुर करता येऊ शकतो.

डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ) HHF, ICR Kolhapur,
चैतन्य होमिओपॅथीक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4, HDFC बॅंकेजवळ,
शाहुपुरी, व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123
रविवारी बंद  

कृपया पुढील लेख वाचा  —

—————————————————————————————-

 Alone without Partner and Homoeopathy !!

Early childhood begins with adolescence. Among the different stages of age, adolescence is the most attractive to humans. Apart from the changes in the body, the renewed attraction of the opposite sex at this age can also be the reason behind it. The importance of having a partner starts at this age and continues till death. A partner stays with us longer than any other relationship. That is why he should be called ‘Life Partner’.
The presence or absence of this partner affects the loneliness of a person’s life.
As adolescence goes, friendships tend to fade away. In ‘Hum Aapke Hai Kaun…’, at the turn of ‘Yeh Kaunsa Mode Hai Umar Ka’ in the teenage phase, the Mind waits for a partner who is more important than old friends, hobbies, career.
The hands of those who get a partner today are raised to the sky. Due to the importance received from him and her, due to the praise given, the confidence of boys and girls increases. The feeling of being someone special grows.
Against him, those who do not find a partner, feel that what is lacking in them, that is why no one likes them.
No matter how many friends are with a family member, the loneliness of not having a partner is very painful.
Sharanya, the elder sister of four siblings. Her father died in her twenties and all the household responsibilities fell on her. She immediately started a job supporting her mother. As time progressed, her friends got engaged, married, and had children. Thirty-five yrs crossed while guiding the four siblings. When marriage should be done at the right age, the marriage of her younger siblings began. After passing through the real responsibility, she also wanted a partner who would love her deeply.
When all the siblings get married, we will become a hindrance in their life, how long will the mother last ? She was constantly afraid that she would be completely alone. Although she was happy in the world of the rest of her siblings, she was tinged with loneliness due to the lack of a partner. You will see many Sharanyas around us who have not got such a partner.
Due to various things like responsibility, pamphlets, physical sarcasm, education, career, etc., not getting a partner, alternatively marriage gets delayed. At the stage of life where the partner is most important, if he is not at that stage, loneliness will come !
Earlier, the age gap between boys and girls at the time of marriage was more. Then there were feelings of respect and fear in those relationships. Women used to be more dependent on their spouses.
In today’s marriages, the age gap between the couple is less. So the earlier Respect, fear has now been replaced by Friendship. Insults, sorrows, rejections, all can be told without any problem, it is the spouse. Friends are family, but family and marriage tie you both together in everyday life. A spouse is more present than anyone else.
Second, your partner definitely knows your strengths, weaknesses, dreams. So his support is sometimes more meaningful. Once the parents don’t know the limitations of your family and the things that happened so far in life, but the spouse definitely does.
Whether someone else comes to help or understand, the spouse has a rightful place. With the departure of such partners, this ‘Support System’ ends and leaves the partner left behind lonely.
Absence or non-existence of a spouse may not be something anyone can do about it. But if you are not with someone even though you are complete, who is in the hands to remove the coming loneliness ?
Urmila’s loneliness in Ramayana is often talked about, but Lakshmana’s loneliness remains neglected. Just as Lakshmana went into exile for a long time as a duty towards his brother, in today’s era too, many Lakshmana’s leave their spouses and go to the workplace as a duty towards the family.
Everyone comes in it, from workers who have come to the big cities from other provinces or different districts to those who have come for foreign jobs.
A man also needs emotional support from his partner. In all animals, including humans, the partner has a unique importance. There is a partner, he is alive, but he will be separated for years, no matter how much he gets tired of this, he has to keep pulling it out of duty.
Even after earning a lot of money, the pain of not being with a partner, the loneliness that comes from it makes such couples unbearable. When duty wins over duty and emotion, it brings loneliness.
Another scenario is separation of spouses – Divorce. When a couple comes to the decision of divorce due to growing differences, the next life (if not remarried) is sure to lead to loneliness. The freedom that comes with a divorce rather than the strife of differences and quarrels may be comforting in the beginning, but later it is not without feeling lonely.
In all the above situations one is not having a spouse or is physically unaccompanied or separated. But in another situation, the partner is in love, they are together, there are no differences between them, but still there is loneliness, it happens in the case of some. The husband is there, but he is lost in his own work or in his own world.
Addiction is often the cause of Loneliness in the other partner. The wife of the husband who is addicted to alcohol has to lead a life alone. There are many examples of this around us.
In the post-corona period, a palm-sized villain has also come to cause Loneliness in this relationship – the Mobile.

Marriage counseling and Homoeopathic Treatment show how many couples are weakened by this Mobile phone. There is no discrimination between husband and wife. Screen addiction can happen to anyone and it is not limited to one time of day like alcohol addiction. Often the loneliness of your partner does not reach you in the ringing of the mobile phone. It may not be in our hands to remove the loneliness due to unavoidable circumstances, but it is definitely in our hands to be with him, take care of him, give him time and love.

At the end of their parents’ lives, young children leave the nest to make their own lives, drifting off into their own worlds. At such a time, it is the partner who needs to reminisce, take care of each other’s medications, listen to the body’s murmurs and give non-physical love.
While it is certain that at one point in life someone will move forward and someone will stay behind, aging without a partner is certainly not easy. Not having the companionship of a partner at any stage of life means loneliness for that person.
On the surface, the mask of ‘All is Well’ is covered, but in times of need, one wants the support of one’s close friend. Loneliness can definitely be overcome with the help of Homoeopathy to face this crippling loneliness head on.

Dr Ajay Hanmane
M.D.(Hom) HHF, ICR Kolhapur,
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4, Near HDFC Bank,
Bhaskar Plaza Vyapari Peth, Shahupuri
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
Mobile No. 7738667123
Sunday Closed.

Please Read Next Article-