तारुण्यपिटीका (मुरमे) व होमिओपॅथी / Acne & Homoeopathy

Dorctor Pic By Dr. Ajay HanmaneOctober 6, 2023 Homeopathic and Cure Skin & Cosmatology

तारुण्यपिटीका (मुरमे) व होमिओपॅथी

 

चेहऱ्यावरची त्वचा चांगली रहावी, यासाठी प्रत्येक जण अनेक प्रयत्न करीत असतो. यामध्ये विशेषता तरुण मुला-मुलींचे प्रमाण जास्त !!

चेहऱ्यावर तारुण्यपिटीका दिसायला लागली की, सगळेजण अस्वस्थ होतात आणि कमी करण्यासाठी कोणतेही उपचार करण्याची तयारी असते. अशावेळी उपचार बाजूला राहून विद्रुपता येते.

 

तारुण्यपिटीका यालाच “मुरमे” अथवा Acne Vulgaris असे म्हणतात. मुळात हा त्वचारोग असला तरी, त्याच्याकडे एक समस्या म्हणून बघितले जाते.

मुरमे ही त्वचेमधील पायलोशिबायसिस (Pilosebaceous Gland) या ग्रंथीमध्ये होणाऱ्या दाहामुळे उद्भवतात. मुरमांचे वैशिष्ट्य असे की, ते ठराविक जागांवर आणि शक्यतो तरुण वयात येतात.

  • जास्त करून या चेहऱ्यावरच्या, छातीच्या वरच्या भागात आणि पाठीवरच्या भागात आढळतात.

 

  • वेगवेगळी स्वरूपे हे मुरमांचे आणखी एक खास वैशिष्ट्य.

 

  • त्यामुळे त्वचेवर कधी सूज येते.

 

  • साधी सूज येते मॅक्युल (Macule), कधी फोड (Papule) येतात त्यातून तर कधी पू (Pustule) धरतो तर कधी द्रव (Cyst) तर कधी गाठी ( Nodules )  होतात.

 

तारुण्यपिटीका का तयार होतात?

अनेक कारणांपैकी प्रमुख चार कारणे आहेत.–

1) ग्रंथींची वाढ (Follicles) झपाट्याने होणे आणि त्यातील स्तरावामुळे त्यांची तोंडे बंद होणे.

2) स्त्रावाची (Sebum) अधिक प्रमाणात होणारी निर्मिती

3) जिवाणूंचे अस्तित्व (Propionibacterium Acne) या

4) सगळ्यांमुळे होणारे त्वचेमधील दाह.

 

कुमार वयातील मुला-मुलींमध्ये आणि तरुणांमध्ये टेस्टेस्टेरॉन (Testosterone) या हार्मोनचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे सिबम (Sebum) जास्त प्रमाणात तयार होऊन ग्रंथीतील छिद्र बुजली जातात.

त्यामुळे मुरमे तयार होऊन जंतूंची वाढ होते. याचा प्रभाव बाजूच्या त्वचेवर होतो त्वचा लालसर होते व नंतर त्यात पू (Pus) तयार होऊ शकतो.

टेस्टेस्टेरॉन (Testosterone) या हार्मोनचे प्रमाण कमी झाले की, मुरमांचे प्रमाण कमी होते.

काही मुलींमध्ये / स्त्रियांमध्ये पाळी येणे आधी ही मुरमे वाढतात.

 

मुरमे वाढीस चालना देणारे घटक —

1) त्वचेच्या आणि केसांसाठी वापरण्यात येणारी तेलकट औषधे,

 

2) सतत चेहरा घासून धुणे किंवा घासणे किंवा फार गरम पाण्याने किंवा साबणाने सुद्धा,

 

3) मानसिक ताण पडणे,

 

4) सतत चेहऱ्याला स्पर्श केल्याने,

 

5) घाम खूप येत असेल तर, तसेच

 

6) गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यास,

 

7) रसायने तेल यांच्या वापरामुळे.

 

मुरमे दोन प्रकारचे असू शकतात.

सौम्य आणि तीव्र प्रकारचे

 

अ) सौम्य प्रकार मध्ये त्या पांढऱ्या किंवा काळ्या ठिपक्यांप्रमाणे (white heads, Black heads) दिसतात.

 

ब) तीव्र प्रकारांमध्ये त्यांची संख्या जास्त असून त्या जास्त भाग व्यापतात. काही तारुण्यपिटिकांमध्ये सूज येऊन डाग राहतात त्यामुळे नैराश्य येऊ शकते.

 

तयार होणाऱ्या मुरमांवरून त्यांची चार प्रकारे वर्गवारी केली जाते.

पहिल्या वर्गामध्ये कोमेडोंस (Comedons)

* दुसऱ्या वर्गांमध्ये त्याचबरोबर पुटकुळ्या येतात तर

* तिसऱ्या वर्गामध्ये पुटकुळ्यांमध्ये पु तयार होतो

चौथ्या वर्गात गाठी – पिशवी सारख्या आकाराच्या असतात.

 

त्यांना सतत हाताळणे आणि काढण्याचा प्रकार केला तर त्या त्वचा डागाळून घाव-व्रण राहण्याची शक्यता असते.

 

काही मुला-मुलींच्या चेहऱ्यावर काळे डाग दिसतात, याचे कारण म्हणजे मुरमे वाढू नये म्हणून जेव्हा ती फोडली जातात तेव्हा त्यातून जाड पिवळा बी सारखा पदार्थ बाहेर येतो. पण त्याचबरोबर मुळाशी असलेल्या रक्तवाहिन्या फुटून आज बाजूच्या त्वचेत रक्त साखळून काळे डाग पडतात.

 

मुरमांसाठी सहसा तपास करण्याची गरज नसते. मात्र वयाच्या 25 वर्षानंतर ही मुलीं अथवा स्त्रियांमध्ये त्रास कमी नाही झाला तर हार्मोन्स तपास, सोनोग्राफी करून, गरज लागली तर स्त्रीरोग तज्ञांकडून तपासणी करून घ्यावी लागते.

 

पिझ्झा, चॉकलेट, केक,पेस्ट्री यासारखे जंक फूड मुळे त्वचा नितळ रहात नाही.

 

संतुलित आहार,ताजी फळे, भाज्या आणि पुरेसे पाणी या सर्वांमुळे त्वचा आरोग्यदायी राहते.

 

नुसत्या जीवनसत्व, खनिजांच्या गोळ्या, घेऊन मुरमे कमी होत नाहीत तर आहारामध्ये अ, क, ड, ई या जीवनसत्व युक्त नैसर्गिक पदार्थांचा समावेश असायला हवा.

 

* जेव्हा एखाद्याला ताण-तणाव असतो तेव्हा त्याचाही परिणाम मुरमे वाढण्यावर होतो.

 

स्वतःला दोष देणाऱ्या, अंतर्मुख स्वभावाच्या हळव्या आणि उपेक्षीला गेलेल्या व्यक्तींच्या बाबतीत हे प्रकार प्रकर्षाने जाणवतात.

 

एका मध्यमवयीन स्त्री, या त्वचारोगाच्या उपचारासाठी आलेली असता, चौकशीअंती असे कळले की, नोकरी निमित्त तिचे पती बाहेर गावी असून, आपल्या दोन मुलांना वाढवणे हे तिला खूप त्रासाचे वाटत होते. ही मनाची ओढाताण त्यांच्या चेहऱ्यावर डाग निर्माण करू लागलेली. पतीच्या विरहाचे दुःख आणि काळजी ही भावना लक्षात घेऊन होमिओपॅथिक औषधाची निवड केली. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील डाग हळूहळू कमी होऊन, मुरमे येणे ही बंद झाले.

 

अशा प्रकारे होमिओपॅथिक चिकित्सा पद्धतीत प्राकृतिक औषधांची निवड केली जाते.

 

मुरमांवर वेळीच होमिओपॅथिक औषधोपचार सुरू केले तर त्यामुळे होणारे गुंतागुंतीचे त्रास म्हणजे त्वचा काळसर होणे, पु होणे, व्रण राहणे इत्यादी टाळले जातात.

तसेच पुढील महागड्या उपचार पद्धती लेसर ट्रीटमेंट टाळल्या जाऊ शकतात.

 

त्याचप्रमाणे, त्वचारोगामुळे निर्माण होणाऱ्या न्यूनगंड होमिओपॅथिक औषधांमुळे कमी होतो.

तसेच रुग्णाची प्रतिकारशक्ती वाढवून त्वचेबरोबरच मनस्वास्थ्य सुधारते. 

 

डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ) HHF,ICR Kolhapur,
चैतन्य होम्योपैथिक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4
शाहुपुरी व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123
रविवारी बंद  

कृपया पुढील लेख वाचा  —

————————————————————

 

Acne and Homoeopathy

 

Everyone makes many efforts to keep the skin on the face good . In this, the proportion of young boys and girls is high!!

When Acne scars appear on the face, everyone gets upset and ready to try any treatment to reduce them . In such cases , the treatment is sidelined and disfigurement occurs.

 

Puberty is called ” मुरमे  or Acne Vulgaris . Although it is basically a skin disease, it is seen as a problem .

Pimples are caused by inflammation of pilosebaceous glands in the skin. Acne are characterized by the fact that they appear in certain places and preferably at a young age.

It is mostly found on the face, upper chest and back .

Different forms are another special feature of ( मुरमे) Acne.

So the skin sometimes swells.

Macule is a simple inflammation , sometimes blisters (Papule) come from it, sometimes it contains pus (Pustule) , sometimes fluid (Cyst) and sometimes nodules (Nodules) .

Why are (मुरमे) Acne formed?

Among the many reasons, the main ones are four.

1) Growth of glands (Follicles) rapidly and their mouths are closed due to their layering.

2) Excessive production of Sebum

3) Presence of bacteria (Propionibacterium Acne).

4) Inflammation of the skin caused by everything.

 

Adolescent boys and girls and young people have high levels of Testosterone . Due to this, sebum (Sebum) is produced in excess and the pores in the gland are blocked .

Due to this, pimples are formed and germs grow. It affects the skin on the side, the skin becomes red and then pus may form in it.

When the amount of Testosterone decreases, the amount of warts decreases.

In some girls/women these warts develop before menstruation.

Factors that promote the growth of Acne —

 

1) Oily medicines used for skin and hair,

 

2) Constant washing or scrubbing of the face or even with very hot water or soap,

 

3) Mental stress,

 

4) Constantly touching the face,

 

5) If sweating profusely, well

 

6) If taking birth control pills,

 

7) Due to use of chemicals oil.

 

Acne can be of two types.

Mild and Severe types

A) In Mild form, they appear as white or black dots (white heads, black heads).

 

B) In Severe forms they are more numerous and cover more areas. Some pubes can become inflamed and scarred, which can lead to depression.

 

They are classified in four ways based on the Acne produced.

Comedons in the first category

* If Pustules occur simultaneously in other classes

* Pus is formed in pustules in the third class

  • In the fourth class there are Nodules – shaped like a bag.

 

If they are constantly handled and removed, they are likely to leave skin sores and ulcers .

 

Some Boys and Girls get dark spots on their faces, this is because when they are broken to prevent the growth of Acne, a thick yellow seed-like substance comes out. But at the same time , the blood vessels at the root burst and the blood flows into the side skin, causing black spots.

 

There is usually no need to investigate for Acne / Pimples.  However, after the age of 25 years, if the problem does not decrease in these girls or women, hormones should be investigated, sonography should be done, and if necessary, examination by a gynecologist should be done .

 

Junk food like pizza, chocolate, cake, pastry does not keep the skin smooth.

 

A balanced diet, fresh fruits, vegetables and adequate water all keep the skin healthy .

 

Acne is not reduced by just taking vitamins, mineral pills, but the diet should include natural foods containing vitamins A, C, D, E.

 

* When one is under stress, it also results in Acne breakouts.

 

* These types are strongly felt in the case of self-blaming, introverted, sensitive and neglected individuals .

 

A middle-aged woman, who came for the treatment of this skin disease, after inquiry came to know that her husband was out of town for work and she was finding it very difficult to raise her two children. This tension of Mind started creating scars on his face . Keeping in Mind the feeling of grief and worry of away from her husband, she chose Homeopathic medicine. Therefore, the spots on their face gradually reduced and the Acne stopped.

 

Thus natural medicines are chosen in Homoeopathic Medicine.

 

If Homeopathic treatment is started in time for purpura, the complications like blackening of the skin, pus, ulceration etc. are avoided.

Also, further expensive treatments can be avoided with laser treatment .

 

Similarly, Homeopathic medicines increased the confidence which was reduced due to Acne.

It also improves the skin along with Mental Health by increasing the Immunity of the patient.

 

Dr Ajay Hanmane
M.D.(Homeo)HHF,ICR Kolhapur,
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4,
Bhaskar Plaza Vyapari Peth,
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
Mobile No. 7738667123
Sunday Closed.

Please Read Next Article-