होमिओपॅथीच्या प्रभावीपणाबद्दल सर्वसामान्यांच्या मनात सांशकता दिसून येते. त्याचबरोबर अनेक प्रकारचे प्रश्न, शंका अनेकांच्या मनात निर्माण होतात. अधून-मधून नियतकालिकांमध्ये होमिओपॅथी विरोधी लेख लिहिले जातात. त्यामुळे संदेह निर्माण होतो. त्यातून गैरसमज निर्माण होतात. अशा प्रकारे अनेक गैरसमजुतींना बळी पडलेली होमिओपॅथी ही अतिशय गुणकारी उपचार पद्धती आहे. अनेक जण काय सांगतात यापेक्षा वैयक्तिक अनुभूती- स्वानुभाव घेऊन ठरवावे.
होमिओपॅथी विषयी थोडेसे………… या लेखनमालेत या शंकेचे निरसन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
होमिओपॅथी हा “होमोसेपियन” (मानवप्राणी) आणि पॅथी (उपचार पद्धती) या शब्दांनी मिळून तयार झाला आहे. होमिओपॅथिक चिकित्सा पद्धती म्हणजे (सम-सम-चिकित्सा) समोपचार पद्धतीची उपचार पद्धती भारतात विसाव्या शतकात सुरू झाली.
महाराष्ट्राला या पद्धतीची खरी ओळख करून दिली ती राजश्री शाहू महाराजांनी 1898 सालच्या प्लेगच्या साथीत त्यांनी होमिओपॅथीचे सहाय्य घेतले. हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक होमिओपॅथिक दवाखाना कोल्हापूर येथे सुरू केला .
पूर्वीच्या मानाने आज या चिकित्सेकडे बघण्याची दृष्टी बदललेली आहे. (कोरोना साथीच्या रोगा नंतर होमिओपॅथी उपचार पद्धतीकडे लोक वळले आहेत.) याला अनेक कारणे आहेत. सर्व उपाय थकल्यावर का होईना बरेच लोक आता होमिओपॅथीकडे वळताना दिसतात व अशा अनेक रोगांच्या बाबतीत ही चिकित्सा हितावह ठरते, हा लोकांना अनुभव येऊ लागला आहे. माझ्या अनुभवाने आता खात्रीलायकपणे एक सांगता येते की, शल्यचिकित्सेच्या काही बाबी सोडल्या तर इतर चिकित्सांपेक्षा ही जास्त शास्त्रीय शास्त्रीय व उपयोगी आहे. दुर्दैवाने या चिकित्सेचे जाणकार फारच थोडे आहेत. जाहिरातबाजी करून लोकांना भुलवणारे, थोड्या माहितीने किंवा पुस्तके वाचून होमिओपॅथी करणारे आपल्याला समाजात सर्वत्र आढळतात.
अनेक ऍलोपॅथिक डॉक्टरांना सुद्धा होमिओपॅथीची उपयुक्तता पटू लागली आहे. रोगनिदान —
रोग्याला कोणता रोग झाला आहे ? हे समजण्याचा मुख्य मार्ग म्हणजे त्याच्या शरीरात झालेला बदल, फरक शरीराच्या नेहमीच्या कार्यात, इंद्रियांच्या संवेदनात, झालेला बदल, अशा प्रकारे रोगाचे निदान केल्याशिवाय योग्य औषधांची निवड करता येत नाही व त्याशिवाय औषध उपायोजना निरर्थक आहे असे ऍलोपॅथिक उपचार पद्धती मानते. फक्त लक्षणे समजून त्या लक्षणांप्रमाणे औषध योजना करणे ऍलोपथीच्या शास्त्राला मान्य नाही, पण प्रत्यक्षात बहुतेक उपचार लक्षणानुसार लक्षणांनुसार करण्यात येतात.
उदाहरणार्थ सूज आल्यास सूज कमी करण्याची गोळी, वेदना होत असल्यास वेदनाशामक गोळी, झोप न आल्यास झोपेचे औषध, तसेच निदाला निदानाला अनुसरून वेगळी औषधे, कारण ती निदानावर अवलंबून असणारी उपचार पद्धती असल्याने वेगवेगळी औषधे वापरली जातात. शिवाय अनेक रोगांचे निदान होण्यास काही दिवस लागतात तर काही वेळा रोगाचे निदान शेवटपर्यंत होत नाही, परंतु औषधे मात्र चालू असतात.
होमिओपॅथीमध्ये रोग निदानाबरोबरच रोग्याला असणारी सर्व लक्षणे बारकाईने पाहून, त्या सर्व लक्षणातील महत्त्वाची लक्षणे एकाच वेळी लक्षात घेऊन, त्या सर्व लक्षणांवर मिळून लागू पडणारे एकच औषधयोजना देण्यात येते.
निरनिराळ्याला लक्षणांसाठी निरनिराळी औषधे रोग्याला स्वतंत्र किंवा एकत्र मिसळून देत नाहीत. रोगाला जरी नाव देण्यात आले नाही तरी लक्षणांच्या समूहाला म्हणजे रोगाला लागू पडणारे औषध देण्यात येते, असे सर्वसाधारणपणे म्हणता येईल.
वास्तविक होमिओपॅथीमध्ये रोगाला औषध देत नाहीत तर रोग दूर करण्याकरता जीवनशक्तीचा( Vital Energy) जो प्रयत्न चालू असतो व ज्या प्रयत्नांचे स्वरूप निरनिराळ्या लक्षणांनी दिसते, त्या प्रकारची लक्षणे निर्माण करणाऱ्या औषधांची योजना करायची असते. म्हणजे विकारांचा लक्षणसमूह दूर करायचा असतो. असे विशिष्ट लक्षण समूह निर्माण करणारे समर्थ औषध, विशिष्ट पद्धतीने तयार करून फार सूक्ष्म प्रमाणात देण्यात येते.
होमिओपॅथीमध्ये विविध वनस्पती,क्षार, सोने-चांदी यासारखे धातू व दुधासारखा प्राणीज्य पदार्थांपासून अनेक प्रकारची औषधे बनवली जातात.
या विश्वामध्ये “ऊर्जशक्ती” (Energy) आहे, म्हणूनच प्रत्येक गोष्ट घडत आहे. ऊर्जेचा नियम सांगतो की, ऊर्जा तयार करता येत नाही किंवा तिचा नाशही होत नाही ती फक्त एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात रूपांतरित करता येते.
याच नियमाचा उपयोग करत होमिओपॅथीमध्ये औषधी पदार्थांचे प्रमाण कमी कमी करत, त्याच्या शक्तीला गतिमान बनवत त्या औषधी पदार्थांना शक्तिमान बनवलं जातं. त्या औषधी पदार्थांचे विघटन करून सबलीकरण (Potentisation) केलं जाते. त्यामुळे औषधांच्या मात्रा बनविताना त्यातील मूळ औषधाचे प्रमाण जरी कमी झालं तरी त्याची ऊर्जाशक्ती ही प्रत्येक वेळी वाढत जाते. घनस्वरूपातील औषधी पदार्थांचे सबलीकरणासाठी घर्षणपद्धती (Trituration) वापरली जाते द्रव्यपदार्थातील औषधीपदार्थांचे सबलीकरण्यासाठी धक्का पद्धती ( Succussion) पद्धत वापरली जाते. त्यातील औषधी पदार्थांची गुणधर्म टिकवून ठेवण्यासाठी लॅक्टोज साखरेचा ( Sugar of Milk)व सौम्य अल्कोहोल( Dilute Alcohol) वापरले जाते.
लॅक्टोज साखरेपासून बनविलेल्या साबुदाण्याच्या आकाराच्या गोळ्यांवर या औषधी द्रव्याचे थेंब टाकले जातात. या गोळ्या औषध आत शोषून घेऊन, त्याचे औषधी गुणधर्म कायम ठेवतात. त्यासाठी या गोळ्या उग्रवास,दमटपणा, सूर्यप्रकाश यापासून दूर ठेवल्यास त्यांचे औषधी गुणधर्म बराच काळ टिकून राहतात.
होमिओपॅथिक औषधांचा अभ्यास करण्याची पद्धत निराळी आहे. कोणत्याही नवीन औषधांचे गुणधर्म माहिती करून घेण्यासाठी जी अभ्यास पद्धत अवलंबली जाते त्याला प्रूव्हिंग (Prooving) म्हणतात. हे औषध विविध वयोगटातील उत्तम आरोग्य असणाऱ्या स्त्री-पुरुषांना ठराविक मात्रेमध्ये दिले जाते आणि त्यामुळे दिलेल्या सर्व लक्षणांची अत्यंत काटेकोरपणे सविस्तरपणे नोंद ठेवले जाते. या नोंदी केवळ शारीरिक लक्षणांबद्दलच नव्हे तर मानसिक बदल,भावना, जाणिवा ( Subjective & Objective Feelings), स्वप्ने इत्यादींच्या ही असतात. ही सर्व लक्षणे (शारीरिक व मानसिक) त्या औषधांची लक्षणे म्हणून ओळखली जातात.
होमिओपॅथीच्या तत्त्वाप्रमाणे एखादे औषध निरोगी माणसात जी लक्षणे उत्पन्न करू शकते, तेच आजारी माणसात,त्याच लक्षणांनाही बरे करू शकते.
उदाहरणार्थ बेलाडोणा नावाचे औषध, निरोगी माणसाने ठराविक मात्रेत घेतल्यास त्याला डोकेदुखीचा त्रास होतो म्हणजे आजारी माणसाची डोकेदुखीची लक्षणे त्या बेलाडोणा औषधाशी जुळली तर त्याचा डोकेदुखीचा त्रास बरा होतो. म्हणून ही औषधे दिल्यास सुदृढ व्यक्तीत विशिष्ट लक्षणे दिसू लागतात. ती लक्षणे निर्माण करणाऱ्या रोगांवर तोच पदार्थ औषध म्हणून काम करतो. हेच होमिओपॅथीचे प्रमुख तत्व बनले. अशा प्रत्येक औषधांचा असा शारीरिक व मानसिक स्तरावर बारीक-सारीक लक्षणांसह सखोल अभ्यास केला आहे. त्यामुळे होमिओपॅथिक औषधे सुदृढ माणसांवर केलेल्या प्रयोगातून निर्माण झालेली असतात. प्राण्यांवर किंवा प्रयोगशाळेत केलेल्या प्रयोगातून नव्हे.
आजमितीस या शास्त्रामध्ये 6000 पेक्षा जास्त औषधी उपलब्ध आहेत.
होमिओपॅथी मध्ये एखाद्या आजारात रुग्णाला कुठले औषध द्यावे, हे ठरविण्याची खास अभ्यास शैली आहे. लक्षणांचा अभ्यास हे होमिओपॅथिक चिकित्सेचे महत्त्वाचे अंग आहे. या अंगाचा विचार इतर कोणत्याच चिकित्सेत इतक्या चांगल्या रीतीने केलेला नाही. थंडी, ऊन, उष्णता, वारा, पाऊस, वेळ, शरीराची विशिष्ट अवस्था किंवा हालचाल अन्न- पेय इत्यादी अनेक गोष्टींमुळे बाह्यता एकच असलेल्या रोगातही निरनिराळ्या माणसांच्या वैयक्तिक लक्षणात फरक दिसून येतो.
या कमी-जास्त फरकांनाच लक्षणांचे वैशिष्ट्य असे म्हणतात. रोगाच्या लक्षणांशी ज्या विशिष्ट औषधांची लक्षणे समान असतील, अशाच औषधांची निवड अचूक ठरते.
उदाहरणार्थ – सर्वच मलेरियाच्या रुग्णांना विशिष्ट वेळेस थंडी भरून ताप येतो, काही जणांना थंडी बरोबरच तहान लागते, तर काहींना झोप अनावर होते, काहींना झोप अन भूक अनावर होते. अशा व्यक्तीसापेक्षा लक्षणांना अनन्य साधारण महत्त्व असते व त्यानुसार औषधांची निवड अचूकपणे करता येते.
होमिओपॅथिक चिकित्सा किती प्रभावी आहे हे आपण पुढील लेखात पाहू.
डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ)
चैतन्य होम्योपैथिक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4
शाहुपुरी व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123
रविवारी बंद
कृपया पुढील लेख वाचा —
There is a general skepticism about the effectiveness of homeopathy. At the same time, many kinds of questions and doubts arise in the minds of many people. From time to time articles against homeopathy are written in periodicals. It raises doubts. It creates misunderstandings. Thus, Homoeopathy is a very effective method of treatment, which is subject to many misconceptions. Rather than what many people say, you should decide based on your personal experience.
A little bit about Homeopathy………… this essay has made an honest attempt to clear this doubt.
Homoeopathy is a combination of the words “Homosapien” (human being) and pathi (method of treatment). Homoeopathic treatment started in India in the 20th century.
It was Rajshree Shahu Maharaj who introduced this method to Maharashtra during the plague of 1898 when he took the help of Homoeopathy. India’s first public homeopathic clinic was opened at Kolhapur.
The way of looking at this treatment today has changed from earlier respect. (People have turned to Homoeopathic treatment after the corona pandemic.) There are many reasons for this. After exhausting all the remedies, many people are now turning to Homoeopathy and people are starting to experience that this treatment is useful in many such diseases. From my experience I can now say with certainty that it is more scientific and useful than any other form of therapy, except for some aspects of surgery. Unfortunately, there are very few people who know about this treatment. We find everywhere in the society people who mislead people by advertising, practicing Homoeopathy with little information or reading books.
Many allopathic doctors have also come to appreciate the benefits of Homoeopathy. Prognosis —
Allopathic treatment considers that the main way to understand what disease a patient has is the change in his body, the difference in the normal functioning of the body, the sensation of the senses, thus without diagnosing the disease, it is not possible to choose the right medicine and without it the medicine is useless. It is not acceptable to the science of allopathy to prescribe medicine according to the symptoms only, but in reality most of the treatments are done according to the symptoms.
For example, an anti-swelling pill for swelling, an analgesic pill for pain, a sleeping pill for insomnia, and different medications for sleep, as it is a diagnosis-dependent treatment method. Moreover, many diseases take days to be diagnosed and sometimes the disease is not diagnosed till the end, but the medicines are continued.
In Homoeopathy, along with the diagnosis, after looking closely at all the symptoms of the patient, taking into account the important symptoms of all those symptoms at the same time, a single medicine plan is given which is applicable to all those symptoms. Different drugs for different symptoms are not given to the patient separately or in combination. Although the disease is not given a name, it can generally be said that the group of symptoms i.e. the medicine applicable to the disease is given.
Actually, in Homoeopathy, one does not give medicine to the disease, but to remove the disease, the effort of vital energy is going on and the form of the effort is seen in various symptoms, the medicines that create the symptoms have to be planned. It means to eliminate the symptoms of disorders. A drug capable of producing such a specific set of symptoms is prepared in a specific manner and administered in very minute amounts.
In Homoeopathy, many types of medicines are prepared from various plants, salts, metals like gold and silver and animal substances like milk.
There is “Energy” in this universe, that’s why everything is happening. The law of energy states that energy can neither be created nor destroyed, it can only be transformed from one form to another.
Using this principle, Homoeopathy works by reducing the quantity of medicinal substances and making them potent by increasing its potency. Potentiation is done by breaking down those medicinal substances. Therefore, even if the amount of the original drug is reduced while making the quantity of medicine, its energy strength increases every time. Trituration method is used for preparation of medicinal substances in solid form. Succusion method is used for preparation of medicinal substances in liquid form. Lactose sugar (Sugar of Milk) and Dilute Alcohol (Dilute Alcohol) are used to preserve the medicinal properties of it.
Drops of this medicine are placed on sago-shaped tablets made from lactose sugar. These tablets absorb the medicine inside, retaining its medicinal properties. For that, if these pills are kept away from heat, humidity, sunlight, their medicinal properties will last for a long time.
The method of studying Homoeopathic medicines is unique. The study method followed to find out the properties of any new drug is called proving. This medicine is administered to men and women in good health of various ages in fixed doses and all the symptoms given are carefully recorded in detail. These records are not only about physical symptoms but also about mental changes, feelings, sensations (Subjective & Objective Feelings), dreams etc. All these symptoms (physical and mental) are known as symptoms of that medicine.
According to the principle of Homoeopathy, a medicine that can produce symptoms in a healthy person can cure the same symptoms in a sick person.
For example, a medicine called belladonna, if taken in a certain amount by a healthy person, gives him headache, so if the headache symptoms of a sick person are matched with that belladonna medicine, his headache will be cured. Therefore, given these drugs, a healthy person will show specific symptoms. The same substance acts as a medicine against the diseases that cause those symptoms. This became the main principle of homeopathy. Each such medicine has been thoroughly studied with detailed symptoms on both physical and mental levels. Therefore, Homoeopathic medicines are developed through experiments on healthy people. Not from animal or laboratory experiments.
Today there are more than 6000 medicines available in this science.
Homoeopathy is a special style of study to determine which medicine to give to a patient for a disease. Symptoms are an important part of Homoeopathic treatment. No other treatment has considered this organ so well. Due to cold, heat, heat, wind, rain, time, specific body condition or movement, food and drink, etc., even in diseases with the same appearance, the individual symptoms of different people are different.
These more or less differences are called the characteristics of the symptoms. The selection of the specific drugs whose symptoms are similar to the symptoms of the disease is correct.
For example – all malaria patients have chills and fever at certain times, some are thirsty along with chills, some are sleepless, some are sleepless and hungry. In such a person the symptoms have a unique general significance and accordingly the medicine can be selected accurately.
In the next article we will see how effective homeopathic treatment is !!!
Dr Ajay Hanmane
M.D.(Homeo)
Chaitanya Clinic
1st Floor, F4,
Bhaskar Plaza Vyapari Peth,
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
Mobile No. 7738667123
Sunday Closed
Please Read Next Article-