भीतीचा बागलबुवा आणि होमिओपॅथी / Panic and Homoeopathy

Dorctor Pic By Dr. Ajay HanmaneMarch 11, 2024 Anxiety Behaviour problems Children Problems General Information Homeopathic and Cure Mental Health Psychiatry

 

भीतीचा बागलबुवा आणि होमिओपॅथी

“धीरज अरे पाण्यात उतरलास तर भीती जाईल तुझी ! बावळटासारखा काठावर किती वेळ उभे राहणार आहेस? “ असे बाबा त्याला रागवून म्हणाले.
सहा वर्षाच्या धीरजच्या मनात पाण्यात उतरण्याचे धाडस होत नव्हते. त्याने काल एका पिक्चरमध्ये एका मुलाला पडताना पाहिलं होतं. तेच दृश्य त्याच्या नजरेसमोर येत होतं. त्याचे बाबा आणि पोहायला शिकवणारे सर मात्र हट्टाला पेटले होते. शेवटी त्यांनी धीरजला उचलून सरळ पाण्यात टाकलं. काठाला पकडण्याच्या दुबळ्या प्रयत्नात धीरजच्या नाका-तोंडात पाणी जाऊन तो गुदमरला आणि पाण्याची भीती कमी होण्याऐवजी घट्ट होत गेली.
भीतीही आपल्या मनातील एक नैसर्गिक भावना आहे. आपल्या सगळ्यांनाच लहान वयात कोणत्या ना कोणत्या गोष्टींची भीती वाटत असते. अंधार, भूत, अनोळखी व्यक्ती,पोलीस, प्राणी (उदाहरणार्थ कुत्रा, वाघ, अस्वल) मोठा आवाज, चेटकिन, म्हातारी आशा अनेक गोष्टींना लहान मुलं घाबरतात.
लहान वयातील अफाट कल्पनाशक्ती पण तर्कशुद्ध विचार करण्याची अक्षमता यामुळे बऱ्याचदा राक्षस, दुष्ट दाढीवाला बुवा अशा गोष्टींची मुलांना भीती वाटते. त्या त्या वयात ही भीती स्वाभाविक असते किंबहुना काही गोष्टींची भीती वाटणं आवश्यक ही असते.
कारण ज्यांना कसलीच भीती नसते अशी मुलं चाकू, आगपेटी, धारदार वस्तू अशा अनेक धोकादायक  वस्तूंशी खेळून स्वतःला इजा करून घेतात किंवा समज आल्यावर ही भीती आपोआपच कमी होत जाते.
पण जेव्हा अति घाबरणं मुलांना मानसिकदृष्ट्या कमकुवत करतं त्यावेळेस मात्र उपचार करणं गरजेचं असतं. मुलांच्या मनात भीती निर्माण होण्याची अनेक कारणे असतात. पूर्वीचा एखादा अनुभव, उदाहरणार्थ इंजेक्शनमुळे डॉक्टरांची भीती वाटणे, आई पालीला घाबरते म्हणून मुलंही घाबरतात. कधी शिस्तीच्या नावाखाली आपणच मुलांना पोलिसांची किंवा दाढीवाल्या बुवांची भीती घातलेली असते.
कधी कधी भीतीच्या मुळाशी असुरक्षितता, राग, न्यूनगंड अशा अनेक गोष्टी घडलेल्या असतात.
उदाहरणार्थ –
आपल्या आईचं आपल्यावर प्रेम नाही या समाजातून मुलं आईपासून दूर जायला खूप घाबरतात. आईला सतत चिकटून राहण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी त्याला आईपासून जबरदस्तीने दूर केल्यास त्याची असुरक्षितता आणखीनच वाढते.
लक्षात घ्या आपल्या दृष्टीने मुलांची भीती कितीही शुल्लक, हास्यास्पद असली तरी, मुलांच्या दृष्टीने अतिशय वास्तववादी असते. शिवाय आपल्याला ज्या गोष्टींची भीती वाटते ती गोष्ट जर आपले आई-वडीलच जबरदस्तीने आपल्याला करायला लावत असतील तर आपणही आई-वडीलांकडे सुरक्षित नाही, ही भावना मुलांना आणखीनच अस्वस्थ करते. कधी कधी पालकच चारचौघात आपल्या मुलांची भीती वाटण्याबद्दल त्यांची टिंगल करतात. या उपहासामुळे मनाने मुलं आणखीनच खचून जातात. असं घाबरलेलं मूल मनाने एकट, असहाय्य, केविलवानं असतं.
मुलांच्या या समस्येचा पालकाने अधिक संमंजसपणे विचार करण्याची गरज आहे. मुलांना आई-वडिलांकडे आपली भीती व्यक्त करताना लाज घेऊन भीती वाटली नाही पाहिजे.
 जेव्हा मूल आपल्या भीतीवर मात करण्याचा प्रयत्न करीत असते तेव्हा पालकांनी मुलाला धीराने व संयमाने पाठिंबा द्यायला हवा. “मी तुझ्याबरोबर आहे. मी तुला इजा होऊ देणार नाही.”, अशा आश्वासन मुलाला खूप आधार देऊन जातं. बऱ्याचदा मुलांना आपण भितो याचीच खूप लाज वाटते. अशा वेळी मुलांना पालकांचे चार शब्द किंवा मुलांना जवळ घेतल्याने त्यांना तो स्पर्श खूप आश्वासक वाटतो.
पौगंडावस्थेत मुला-मुलींना सार्वजनिक ठिकाणी जायची व लोकांना भेटण्याची भीती निर्माण होऊ शकते. आजूबाजूच्या लोकांचे आपल्याकडे बारकाईने लक्ष आहे. आपल्यातील (खरोखरीचा पण क्षुल्लक दोष) त्यांच्या लक्षात येईल व आपले हसे होईल, असे वाटत राहते. बोलताना अडखळणे किंवा तोतरे बोलणे, आपल्या चेहऱ्यावर लाजाळूपणा दिसणे, सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर करावा लागणे अशा गोष्टींची कमालीची भीती वाटते. लोकांना भेटण्यापेक्षा एकटेच राहणं बरं वाटते.
मुलं दहा ते बारा वर्षांची झाली की, आई-वडिलांची आरडाओरडा सुरू होतो.  ” किती गबाळा, काहीच आवरत नाहीस “,   चूक आपलीच असतें लहानपणापासून त्यांना सवयी न लावल्याने किंवा अतिलाडाने टापटिप-पणाची सवय त्यांच्या अंगवळणी पडत नाही.
सवय लावताना मुलांना ओरडू नये. सतत ओरडण्याने मुलांचा स्वभाव भित्रा  बनतो. चार-चौघांमध्ये तर मुलांवर अजिबात ओरडू नये. त्यांना खूप अपमनास्पद वाटते. मुलं वयाने जरी लहान असलं तरी त्याला आपल्यासारख्याच भावना, मान-अपमान असतो.
त्यांना सतत ” कोंडून ठेवणं, कोंडून ठेवीनं, घराबाहेर काढेनं “ असे धमकाऊ नये. त्यामुळे त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते. रागाने आतल्या आत घुसमटणारी मुलं लहानपणी एकदम गरीब आणि शांत वाटतात, पण मोठेपणी जेव्हा ती स्वतंत्र होतात तेव्हा त्यांचा दबलेला राग डोके वर काढतो आणि ती बंड करतात.
मुलांशी कितीही लहान असले तरी मित्रत्वाचे नाते ठेवले पाहिजे. त्यांच्या शाळेतील मित्रांबद्दल, शिक्षकांबद्दल त्यांची मते तुम्हाला सांगण्याइतपत त्यांना तुमचा विश्वास वाटला पाहिजे, तर तुम्ही त्यांचे उत्तम मित्र पण बनलात असे म्हणता येईल.

मुलांच्या भीती वाटण्यामागे इतरही मानसिक समस्या असू शकतात हे भान ठेवून तसेच जरुरी पडल्यास तज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात पालकांनी ही कमीपणा वाटू नये पालकांनाही कमीपणा वाटून घेऊ नये.

समुपदेशन व योग्य होमिओपॅथीक उपाय करून, भीतीच निराकरण करणं बऱ्याचदा शक्य असतं. होमिओपॅथीमध्ये अशा समस्यांवर अत्यंत गुणकारी औषध आहेत   जी अर्थातच तज्ञांच्या सल्याशिवाय घेणं  हिताचे नाही.

डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ) HHF, ICR Kolhapur,
चैतन्य होमिओपॅथीक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4, HDFC बॅंकेजवळ,
शाहुपुरी, व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल– 7738667123
रविवारी बंद  

कृपया पुढील लेख वाचा  —

————————————————————–

 

Panic and Homoeopathy

“Dheeraj, if you get into the water, you will be scared ! How long will you stand on the bank like a stupid ?” Father said to him angrily.

Six-year-old Dhiraj did not dare to enter the water. He had seen a boy fall in a movie yesterday. The same scene was coming before his eyes. But his Father and his Teacher, who taught him to swim, were on fire. Finally, they picked up Dheeraj and threw him directly into the water. In a feeble attempt to hold onto the edge, Dheeraj choked as water entered his nose and mouth and his Fear of water intensified instead of diminishing.

 

Fear is also a natural Emotion in our Mind. All of us are afraid of something or the other at a young age.

 

Children are afraid of the dark, ghosts, strangers, police, animals (eg dogs, tigers, bears), loud noises, Sorceress (चेटकिन), old Lady.

Children are often afraid of giants, evil bearded dragons due to their vast imagination but inability to think rationally at a young age. At that age this fear is natural, in fact it is necessary to be afraid of some things.

Because Children who do not have any Fear play with many dangerous objects like knives, matches, sharp objects and injure themselves or when they understand this Fear automatically decreases.

 

But when extreme Fear weakens children Mentally, treatment is necessary. There are many reasons why children develop fear.

 

A previous experience, such as being Afraid of the Doctor because of an injection, causes the Mother to be afraid of Lizard, so the Children are also Afraid. Sometimes, in the name of discipline, we make children afraid of the police or bearded boys.

Sometimes fear is rooted in many things like insecurity, anger, inferiority complex.

For example, in a society where our Mother does not love us, Children are very Afraid to go away from their Mother. They try to cling to their Mother constantly. In such a case, if he is forcibly removed from his Mother, his Vulnerability increases.

 

Note that children’s Fears, however superficial they may seem to us, are very Real to Children. Moreover, if our parents are forcing us to do the things we Fear, then we are not safe with our Parents, which makes Children even more uncomfortable. Sometimes it is the Parents themselves who mock their Children for being Afraid of, in front of many people. Due to this mockery, the children become more and more Depressed. Such a Frightened child is lonely, helpless, isolated.

 

Parents need to think more sensibly about this problem of children. There is no need for children to feel ashamed and afraid of expressing their Fears to their parents. When the child is trying to overcome his Fear, parents should support the child with patience and tolerance.

“I’m with you. I won’t let you get hurt.”, such reassurance is very supportive to the child. Often children are very ashamed of what they are afraid of. At such times, children feel the touch of the parents’ Kind words or holding the children close to them is very reassuring.

During Adolescence, boys and girls may develop Fear of going to public places and meeting people. People around you are paying close attention to you. We keep thinking that they will notice our (real but minor problem) and laugh at us. Stuttering or stuttering, looking shy on your face, having to use public restrooms, etc. Being alone is better than meeting people.

 

When the children are ten to twelve years old, parents start screaming. “What a mess, you don’t hold anything back.” The fault is our own, because they are not used to it from childhood or they are not accustomed to being pampered too much.

 

Children should not be yelled at while inculcating the habit. Constant shouting makes children timid. In Public meeting, children should not be yelled at at all. They feel very insulted. Although children are young in age, they have the same feelings, respect and humiliation as us.

 

They should not be, “constantly locked up, locked up, threatened, not allow you to enter into Home” ,this creates a sense of insecurity in them.
Introverted children may seem very poor and quiet as children, but as they become independent, their suppressed Anger rears its head and they rebel.
Be Friendly with Children no matter how small. If they trust you enough to tell you their opinions about their school friends, teachers, you can be said to be their best Friend.
Keeping in Mind that there may be other Psychological problems behind Children’s Fear and also seeking expert guidance if necessary, parents should not feel this shortcoming.
With Counseling and appropriate Homoeopathic remedies, it is often possible to resolve the Fear itself.
Homoeopathy has very effective medicines for such problems which of course should not be taken without expert advice.

Dr Ajay Hanmane
M.D.(Hom) HHF, ICR Kolhapur,
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4, Near HDFC Bank,
Bhaskar Plaza Vyapari Peth, Shahupuri
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
Mobile No. 7738667123
Sunday Closed.

Please Read Next Article-