मुलांमधील शाळेची भीती आणि होमिओपॅथी / School Phobia in Children and Homoeopathy

Dorctor Pic By Dr. Ajay HanmaneMarch 18, 2024 Anxiety Behaviour problems Children Problems General Information Homeopathic and Cure Mental Health Psychiatry

मुलांमधील शाळेची भीती आणि होमिओपॅथी

सकाळचे नऊ साडेनऊ वाजले होते. शाळेची वेळ जसजशी जवळ यायला लागली, तसतसा महेशचा अस्वस्थपणा वाढत होता. “आई, मला मळमळते. डोकं दुखते आहे. मला शाळेत जायचं नाही.” तो रडविल्या स्वरात म्हणाला.
नेहमी रोज शाळेच्या वेळेलाच तब्येत कशी बिघडते तुझी ? घरी राहिलास चांगला  चुणचुणीत असतोस परत ? आज तू शाळेत कसा जात नाहीस, हेच पाहते. आईने रागावले व फटका दिला.
जून मध्ये शाळा सुरू झाल्यानंतर जेमतेम तीन ते चार दिवसच महेश शाळेला गेला असेल. नंतर शाळेच्या वेळेत उलट्या, पोटदुखी, डोकेदुखी हा जणू रोजचाच नियम झाला होता. आई-वडिलांनी आधी समजावून, मग रागावून, शिक्षा करूनही पाहिलं. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.
महेशची समस्या होती शाळेची भीती स्कूल फोबिया (School Phobia) !! 
आपण सगळेच कधी ना कधी शाळेत जाताना घाबरलेलो असतो. पण काही वेळा मुलं काही विशिष्ट कारणांनी आपल्या आईवडिलांपासून घरापासून दूर शाळेत द्यायला घाबरतात. शाळेत जायची वेळ जवळ आली की, त्यांची भीती पराकोटीला पोहोचते. मग शारीरिक तक्रारी चालू होतात. डोकेदुखी, पोटदुखी, चक्कर येणं, उलट्या-जुलाब इत्यादी. मग जर मुलाला घरीच राहू दिल तर थोड्यावेळाने ही सगळी लक्षणं नाहीशी होतात. या समस्येलाच शाळेची भीती वाटणे असे म्हणतात.
अनेक वेळा ही समस्या अचानक चालू होते. आजारानंतर किंवा सुट्टीनंतर बऱ्याच दिवसांनी शाळेत जाताना किंवा नव्या शाळेत, नव्या वर्गात जाताना एखादं मूल अचानक घाबरायला लागतं. मुलांना विचारल्यास ती याची अनेक कारण सांगतात.
उदाहरणार्थ-
  • नवीन शिक्षकांची भीती वाटते.
  • अंधारात स्वच्छतागृहात जायची भीती वाटते किंवा वर्गातल्या मुलांकडून होणारा त्रास इत्यादी……
  • पण बरेचदा ही कारणे वरवरची, तात्कालीक स्वरूपाची असतात.
  • शाळेच्या भीतीच खरं कारण मुलांच्या मनातच खोलवर दडलेलं असतं.
  • मुलांचा स्वभाव, त्यांचं भावनिक असंतुलन, मुलं आणि पालक या नात्यातला तणाव, घरातलं वातावरण असे अनेक घटक या समस्येच्या मुळाशी असू शकतात.
मुलांच्या भावनिक  असंतुलनालाही अनेक कारणे असतात.
  •  पालकांकडून अवास्तव अपेक्षा, 
  • अति शिस्त,
  •  घरातील भांडणं,
  •  वाद, ताणतणाव,
  • अशा गोष्टींनी मुलं मनाने खूप असुरक्षित होतात.
शिवाय काही वेळा आपल्या भोवतालच्या वातावरणातल्या बदलांना सामोरे जाणं जुळवून घेणं मुलांना कठीण जातं. 
उदाहरणार्थ
  • आईला सोडून नवीन पाळणा घरात जाणं,
  • घरात नवीन भावंडांचा जन्म,
  • कधी कधी आई-वडिलांचे आजारपण,
  • जवळच्या व्यक्तीचा मृत्यू,
  • अशा अनेक कारणांनी मुलं भावनिक दृष्ट्या अस्वस्थ होऊन जातात. त्यांच्या मनात एक प्रकारची भीती काळजी निर्माण होऊ लागते. 
अशावेळी आई-वडिलांपासून दूर जाणं, मुलांना आणखीनच असुरक्षित करतं. मुलं शाळेत जायला घाबरते. कधी कधी ते आईला सोडून कुठे जायला कबूल होत नाही. त्यांच्या मनावरच्या ताणामुळे मग उलट्या-जुलाब अशा शारीरिक तक्रारी सुरू होतात.
मात्र पालकांना मुलांच्या या मन:स्थितीची अजिबात कल्पना नसते.आपलं मूल शाळा बुडविण्यासाठी ढोंग करते असे वाटून बरेच पालक मुलांना जबरदस्तीने शाळेत पाठवू पाहतात. कधी कधी समजावून, लालूच दाखवून तर कधी कधी शिक्षा करून, मारून मुटकून मुलांना  शाळेत नेण्याचा प्रयत्न होतो. पण पालकांच्या अशा दबावाने मूल अधिकच घाबरते,बिथरते.
अशावेळी मुलांना सर्वात जास्त गरज असते ती प्रेमाची, पाठिंबाची त्यांना समजून घेण्याची ! 
अशा समस्ये कडे दुर्लक्ष न करता होमिओपॅथिक तज्ञव्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली मुलांच्या भीतीचे खरं कारण शोधून त्यावर उपाय करणे गरजेचे असते. अशावेळी मुलांना आणि पालकांनाही समुपदेशनाची गरज असते.
काही मुलंही मनाने असुरक्षित असतात किंवा एकटेपणा दुर्लक्षित झाल्याची भावना असते. त्यामुळे सतत आई-वडिलांचे लक्ष वेधून घेण्यासाठीही ते चिडचिड करणं, हट्ट करणं असा त्यांचा स्वभाव होतो.
काहींना आईला सोडून जाण्याची इच्छा नसते. काही मुलं अतिशय संवेदनशील, प्रेमळ, हळव्या स्वभावाची असतात. पटकन रडणारी असतात. सतत कुणाच्या तरी सहवासाची त्यांना गरज असते. काही मुलांची शारीरिक किंवा मानसिक वाढ खुंटलेली असते. ती नवीन जागा, नवीन माणसे,  या ठिकाणी बावरून जातात. आपली टिंगल करतात म्हणून ते इतरांमध्ये जाणे टाळतात.
काही मुलं अतिशय अबोल, सहनशील असतात. घरातील वाद, अस्थिर वातावरण यामुळे ते घाबरून जातात. गर्दीत, अनोळखी ठिकाणी त्यांना हरवून जाण्याची भीती वाटते. अशा प्रकारे अनेक व्यक्तिमत्त्वाची मुलं आढळतात.
होमिओपॅथीमध्ये मुलांचा स्वभाव, त्याच्या आजूबाजूंचे वातावरण, ताण-तणाव यांचा अभ्यास करून अनेक उत्तम औषधे या समस्येवर असून ती अतिशय गुणकारी ठरतात. अर्थात ही औषधे तज्ञ व्यक्तींकडूनच घेणे योग्य ठरते.

डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ) HHF, ICR Kolhapur,
चैतन्य होमिओपॅथीक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4, HDFC बॅंकेजवळ,
शाहुपुरी व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123
रविवारी बंद  

कृपया पुढील लेख वाचा  —

————————————————————–

School Phobia in Children and Homoeopathy

It was nine thirty (9.30 a.m.) in the morning. As school time approached, Mahesh’s Anxiety was increasing. “Mom, I feel nauseous. I have a Headache. I don’t want to go to School.” He said in a sobbing voice.
Do you know how your health deteriorates every day at school time ? If you stay at home, you are in good spirits ? This is how you don’t go to school today. Mother got angry and hit.
After the school started in June, Mahesh would have gone to school for just three to four days. Later, vomiting, stomach ache, headache became a daily routine during school hours. Parents first explained, then got angry and even punished. But it was of no use.
Mahesh’s problem was School Phobia.
All of us are Afraid of going to School at one time or another. But sometimes Children are Afraid to go to School away from their parents for certain reasons. When the time to go to school approaches, their fears reach the limit. Then the physical complaints start. Headache, stomach ache, dizziness, vomiting-diarrhea etc….
Then if the child is allowed to stay at home, after a while all these symptoms disappear. This problem is called School Phobia.
Many times this problem starts suddenly. A child suddenly starts to Panic while going to school or going to a new school, a new class after many days after an illness or holiday. If you ask the children, they give many reasons for this.
For example,
  • They  are afraid of  New teachers
  • Fear of going to the toilet in the dark
  • or being bullied by kids in the classroom etc……
  • But most of the time these reasons are superficial, temporary in nature.
The real reason behind the fear of school is hidden deep in the Minds of Children.
Many factors such as –
  • Children’s temperament,
  • Their emotional imbalance,
  • Tension in the relationship between children and parents, &
  • The environment at home can be at the root of this problem.
There are many reasons for emotional imbalance in children.
  • Unrealistic expectations from parents,
  • Extreme discipline,
  • Domestic strife,
  • Argument, stress,
  • Such things make children very vulnerable in Mind.
Also, sometimes children find it difficult to adapt to the changes in their environment.
For example –
  • Leaving the mother and going to a new foster home,
  • Birth of new siblings in the house,
  • Sometimes illness of parents,
  • Death of a loved one,
  • Children become Emotionally disturbed due to many reasons.
  • A kind of fear and worry starts to arise in their Minds.
In such cases, alienation from parents makes children even more vulnerable. Children are afraid to go to School. Sometimes they don’t agree to leave their Mother. Due to stress on their Mind then physical complaints like vomiting and diarrhea start.
But parents have no idea about this state of Mind of Children. Many parents try to forcefully send their Children to School, thinking that their child is pretending to skip School. Sometimes they try to take the Children to School by explaining, showing lure and sometimes by punishing and beating them.
But with such pressure from the parents, the child becomes more Afraid. In that case, Children need love, support and understanding them the most !
Without ignoring such a problem, it is necessary to find the real cause of Children’s Fear and solve it under the guidance of Homoeopathic experts. In such cases, children and parents also need counselling.
Some children are also Emotionally vulnerable or Lonely and feel neglected. Therefore, even to get the attention of their parents, they become irritable and stubborn. Some do not want to leave their mother.
Some children are very sensitive, affectionate, touchy natured. They are quick to cry. They need someone’s company constantly. Some children have stunted Physical or Mental growth.
It is a new place, new people go to this place. They avoid going among others because they make fun of us. Some children are very stubborn and tolerant. Due to domestic disputes, unstable environment, they get scared. They are afraid of getting lost in a crowd, in an unfamiliar place. In this way children with many personalities are found.
In Homoeopathy, by studying the nature of children, their Environment, Stress, there are many good Medicines on this problem and they are very effective. Of course, it is advisable to take these Medicines only from experts.

Dr Ajay Hanmane
M.D.(Hom) HHF,ICR Kolhapur,
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4, Near HDFC Bank,
Bhaskar Plaza Vyapari Peth,
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
Mobile No. 7738667123
Sunday Closed.

Please Read Next Article