व्यर्थ चिंता आणि होमिओपॅथी /   Futile Anxiety and Homoeopathy

Dorctor Pic By Dr. Ajay HanmaneJanuary 11, 2025 Anxiety Female Problems General Information Homeopathic and Cure Mental Health Psychiatry Uncategorized

    व्यर्थ चिंता आणि होमिओपॅथी

काही वर्षांपूर्वी मी माझ्या कुटुंबासमवेत तारकर्लीला गेलो होतो. तेथे पॅरासेलिंगचा अनुभव घेतला. खाली बोटीत माझीच माणसं गप्पा मारत बसली होती.
 वर-वर गेल्यावर तिथली निरव शांतता प्रकर्षाने जाणवायला लागली. खालच्या सगळ्या आवाजांपासून दूर मी एकटा होतो. एकांत काय असतो हे त्या दिवशी मी काही मिनिटांसाठी अनुभवलं.
 मी आणि मीच होतो तेथे काही काळ !!!
काही वेळा घरात कोणी नसताना, बसमध्ये शेवटच्या स्टॉपवर उतरण्याआधी, लोकलमध्ये लेडीजच्या डब्यात, शाळा-कॉलेजमध्ये एखाद्या दिवशी वर्गात एकटाच उरल्या एकटंच उरल्यावर, ऑफिसमध्ये उशिरापर्यंत काम करत थांबल्यावर, अशा नानाविध प्रसंगात असा एकांताचा, आजूबाजूला कोणी नसण्याचा अनुभव आपण कधी ना कधी निश्चितच घेतलेला असतो. हा शरीराशी संबंधित एकटेपणा असतो, याला आपण एकटं असणं (Being Alone) असे म्हणतो.
अशा प्रसंगात आपण भीती, असुरक्षितता या भावनांची अनुभूती घेतो. हे असंच शारीरिक एकटेपणाही अंगावर येतोचं. 
कोरोना साथीतले दिवस आठवले की, किती विचित्र परिस्थिती होती ती. शेजारच्या घरात राहणारे तिथे होते खरे, पण जणू ती भिंत अशी काही अभेद्य होऊन बसली की, त्यांच्याशी संपर्क ही कठीण झाला होता. या काळात अनुभवलेल्या एकटेपणाचे कितीतरी किस्से आजच्या पिढीकडे आहेत.
 अनेक इंग्रजी चित्रपटांमध्ये कोणत्यातरी संकटात अडकून एकटं राहण्याचे प्रसंग   हीच चित्रपटांची कथा झाली आहे.
ना कोणाशी बोलणं, ना जगण्याची खात्री अशावेळी आस लागते ती फक्त एका सहवासाची !! 
प्राचीन काळापासून माणसाच्या भावना जसजशा विकसित होत गेल्या तसतसं त्याचं नागरिकीकरण होत गेलं, समाज आणि समाजाचा सहवास खूप महत्त्वाचा होत गेला. माणूस हा सामाजिक प्राणी असल्याने लादले गेलेलं एकटेपण खूप काळापर्यंत लांबलं तर माणसाच्या मानसिक स्वास्थ्यावर त्याचा परिणाम होतो.
एखादा गुन्हा केल्यावर दिली जाणारी पहिली शिक्षा ही व्यक्ती आणि समाजातल्या लोकांचा सहवास तोडून त्याला एकटे ठेवणे हेच असते हीच असते, हे लक्षात घेता सहवासाचं महत्त्व अधोरेखित होतं.
एकटेपण नेहमीच सगळ्यांना डाचत असं नाही. आपल्या मनाची तयारी करून निश्चित अशा एखाद्या उद्दिष्टासाठी, काहीतरी नवीन अनुभूती घेण्यासाठी, जाणीवपूर्वक निवडलेलं एकटेपण हे एखादी नवनिर्मिती ही करून जातं. रोजच्या धबडग्यातून बाहेर पडून “सोलो ट्रिप” करण्याची संख्या हल्ली वरचेवर वाढताना दिसत आहे. तिथे भीती आणि असुरक्षिततेची जागा ही उत्सुकता, आनंद, नाविन्याची आस यासारख्या सकारात्मक भावनांनी घेतलेली असते.
मध्यंतरी एक तरुण जोडपं, जे माझं पेशंट होतं, त्या तरूणीचा नवरा तिशीमध्येच कर्करोगाच्या आजारांनं अचानक मृत्यू पावला. हे इतकं अनपेक्षित होतं की, ‘त्याच्या बायकोला कोणीही एकटं ठेवेना. या नातेवाईकांच्या भावना निश्चित चांगल्या होत्या, पण दिवाळीच्या एके दिवशी तिने सगळ्यांना सांगितलं की, मला एक दोन दिवस एकटीलाच राहायचं आहे.’  नातेवाईक ही समंजस होते. सगळ्यांनी तिच्या म्हणण्याचा आदर ठेवत तिला तो अवकाश दिला. नवरा गेल्यापासून रोज लोकांना भेटल्यावर ती त्यांच्या मनातल्या  त्यांच्या आठवणी ऐकत होती, पण तिच्या मनातला तो आठवायला तिला उसंत, एकटेपणा मिळत नव्हता. तिने मागून घेतलेल्या एकटेपणाने तिला तो अवकाश मिळवून दिला.

स्वतःचा अवकाश मिळविण्यासाठी मुद्दाम एकटं राहणं आणि मनाने एकाकी वाटणं या दोहोत फरक आहे.

पहिला प्रकार मनातला विचारांचा गुंता सोडवायला मदत करू शकतो. एकाकीपणा म्हणजे मात्र, “मनी मानवा व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते…. “

एकाकी पण ही मात्र मनाची स्थिती आहे, त्याचा तुमच्या शारीरिक एकटेपणाशी संबंध असेलच असं नाही.

उदाहरणार्थ –  शेकडो फॅन्स असणाऱ्या आणि सहकाऱ्यांच्या गराड्यात वावरणाऱ्या एखाद्या कलाकाराचे एकाकीपण. एकदा एक प्रसिद्ध अभिनेता त्याच्या एका मुलाखतीत म्हणाला होता की, “मला जर मनातलं बोलायचं असेल माझा ताण कोणाशी तरी बोलून घालवायचा असेल तर मी आई-वडिलांकडे जाऊ शकत नाही, कारण त्यांना काय करावे कळणार नाही. उलट मला ताण आला आहे याचा त्यांनाच ताण येईल. मित्रांशी बोलायला बोललो, तर त्यांना एवढंच वाटेल की, यानं मला त्याचा प्रॉब्लेम सांगितला. त्यामुळे मी मनातलं कोणाकडे  बोलतच नाही.” अर्थात ही गोष्ट फक्त या स्टार अभिनेत्याचीच नाही, तर अनेक व्यक्तींची सामान्यांची आहे.
 अशा वेळेस  विपश्यना सारखी मेडिटेशन, ध्यानधारणा याचबरोबर होमिओपॅथिक औषधांची जोड दिल्यास याच्यातून निश्चितपणे ताणमुक्ती होण्यास मदत मिळते.
एकाकीपण ही आता अनेक देशांची एक सामाजिक समस्या झाली आहे. त्यामुळेच जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) त्याची दखल घेत म्हटलं  आहे की, ” रोज 15 सिगरेट ओढण्याने आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामाणपेक्षाही भयंकर दुष्परिणाम एकाकीपणामुळे व्यक्तीच्या आरोग्यावर होतो ! (Loneliness could be worse for health than smoking 15 cigarettes a day)”!!! 
आपल्याला वाटत असेल की, करोनानं या  एकटेपणाच्या समस्येची आपल्याला जाणीव करून दिली. पण वास्तव तस नाही. करोनाच्या आधीही एकाकीपणाची समस्या जगभरात पसरत चालली होती. करोनान त्यात आणखी भर टाकली एवढं मात्र खरं.
भारतातल्या गरिबी, बेकारी, भ्रष्टाचार, शहरं-गावांची दुरावस्था यासारख्या आपल्या रोजचं जगणं त्रासदायक करून टाकणाऱ्या समस्यांच्या वेढ्यात आपलं एकाकीपणाच्या या मानसिक-सामाजिक समस्येकडे दुर्लक्ष झाला असेल, पण जगातल्या अनेक देशांनी या समस्येकडे गंभीरपणे बाहेर सुरुवात केली आहे. 
आपण जर एकाकीपणाची व्याख्या पाहिली तर,” एकाकीपण म्हणजे तुम्ही समाजापासून विलग आहात याची जाणीव होणं. ही जाणीव बाहेरचे कोणी करून देत नाहीत, तर ती ज्याची त्यालाच होते.”  आता या व्याख्येकडे बघितलं, तर जे समस्येचे कारण आहे, त्यातून उपाय सापडू शकतो असे म्हणता येईल. म्हणजे ज्या व्यक्तीला एकाकीपण जाणवतं त्यालाच पुढाकार घेऊन त्यावर मात करण्यासाठी उपाय करावे लागतील.
 एकाकीपणाची तीव्र भावना हे आत्महत्या मागील एक महत्त्वाचं कारण आहे, असं जपान सरकारच्या लक्षात आलं म्हणून त्यांनी “मिनिस्ट्री ऑफ लोनलीनेस” सारखं मंत्रालय सुरू केलं. त्याच्या पाठोपाठ ब्रिटिश सरकारनेही त्याच पद्धतीने एक मंत्रालय सुरू केलं.
जर एखादी व्यक्ती दीर्घकाळापर्यंत सामाजिक देवाणघेवाणी पासून दूर असेल आणि स्वतःला घरात बंद करून घेत असेल तर, तो केवळ एका व्यक्तीची मानसिक समस्या न मानता ते एक सामाजिक घटना आहे, असं जपानमध्ये मानतात कारण तो देश सामुदायिक जीवनाला महत्त्व देणारा देश आहे.
अशा प्रकारच्या एकाकीपणामुळे अपराधी वाटणं (गिल्ट) दुष्चिंता (एन्झायटी) अशा मानसिक आजारांची शक्यता वाढते. 
एका अहवालानुसार, एकाकीपणाचा सर्वात जास्त दर हा ब्राझील, तुर्कस्तान, भारत आणि सौदी अरेबिया या देशांत आहे.
वैयक्तिक आयुष्यात आलेली वेगवेगळी कारण  सोडता,जीवनात अचानक होणारे बदल, मानसिक आरोग्याच्या समस्या, स्व-आदराचा  अभाव आणि व्यक्तिमत्त्वातले काही घटक या एकाकीपणाला कारणीभूत असतात.
हा एकाकीपणा तीन प्रकार विभागण्यात येतो.
1)सर्वात पहिलं भावनिक एकाकीपण –  या व्यक्तींच्या आयुष्यात अर्थपूर्ण नातेसंबंधाचा अभाव असतो. मग ते वैवाहिक नातेसंबंध असोत की कौटुंबिक, मैत्रीसारखी सामाजिक नाती. त्यामुळे आपला आनंद, दुःख आणि इतर भावना त्यांना कोणालाच सांगता येत नाहीत.
2) दुसरा प्रकार, सामाजिक एकाकीपण– आधुनिक काळातल्या अनेक प्रसंगाबरोबरच मला इथे संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांनी सहन केलेला सामाजिक बहिष्कार आठवतो.
3)तिसऱ्या प्रकारामध्ये आपण एकटेच आहोत, आपल्याला कोणाशी काहीच देणं घेणं नाही, ही विरक्तीची भावना “अस्तित्वात्मक एकाकीपण ”  (Extensional Loneliness) आढळते.
एकंदर, एकाकीपणाच्या या जागतिक समस्येची व्याप्ती पाहता, मानसिक-सामाजिक समस्येवर होमिओपॅथिक  उपचार पद्धतीचा खूप उपयोग होऊ शकतो. आणि  या शास्त्रामध्ये अनेक  अत्यंत महत्त्वपूर्ण गुणकारी औषधे उपलब्ध आहेत, ज्याचा  उपयोगाने एकाकीपणांन ग्रासलेल्या व्यक्तींना मदत होऊ शकते, त्यांच्या एकाकीपणामुळे अपराधी वाटणं (गिल्ट) दुष्चिंता (एन्झायटी) वाटणं,  इत्यादी आजार कमी होऊन तसेच त्यांचे एकाकीपण कमी होऊन त्यांना परत सामाजिक प्रवाहात आणता येऊ शकतं.

डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ) HHF, ICR Kolhapur,
चैतन्य होम्योपैथिक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4, HDFC बॅंकेजवळ,
शाहुपुरी व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123, 904507723
रविवारी बंद  

कृपया पुढील लेख वाचा  –

————————————————————–

      Futile Anxiety and Homoeopathy

A few years ago I went to Tarkarli with my family. Experienced parasailing there. My people were chatting in the boat below.
After going up and down, the absolute silence was felt strongly. I was alone, away from all the sounds below. That day I experienced for a few minutes what solitude is.
It was me and me there for a while !!!
Sometimes when there is no one at home, before getting off at the last stop in the bus, in the ladies compartment in the local, after being left alone in the class one day in the school-college, after working late in the office, we have definitely experienced such loneliness, no one around in such various situations. This loneliness related to the body is what we call Being Alone.
In such situations, we experience feelings of fear, insecurity. This same physical loneliness also came on the body.
I remember the days with Corona, what a strange situation it was. It was true that the people living in the neighboring house were there, but it was as if the wall had become impenetrable, making contact with them difficult. Today’s generation has many stories of loneliness experienced during this period.
In many English films, the story of being stuck in some kind of crisis and being alone has become the story of the films.
Neither talk to anyone, nor the assurance of life, in such a situation, the desire is only for a companionship !!
Since ancient times, as man’s feelings have evolved, he has become more civilized, society and association with society has become very important.
Human being a social animal, the imposed isolation if prolonged for a long time affects the mental health of the human being. The importance of association is highlighted by the fact that the first punishment given after committing a crime is to cut off the association of the individual and the people of the society and keep him alone.
Loneliness does not always affect everyone. Solitude, consciously chosen by preparing our Mind for a definite goal, to experience something new, is an innovation. Taking a “solo trip” out of the daily grind seems to be on the rise these days. There, fear and insecurity are replaced by positive emotions like curiosity, joy, and hope for innovation.
Meanwhile, a young couple who was my patient, the young woman’s husband died suddenly of cancer in her thirties. It was so unexpected that no one would leave his wife alone. The feelings of these relatives were definitely good, but one day on Diwali she told everyone that I want to be alone for a couple of days.’ Relatives are sensible. Everyone respected what she said and gave her that space. After meeting people every day since her husband left, she was listening to their memories in their minds, but she could not find the time and solitude to remember them in her mind. The solitude she pursued gave her that space.
There is a difference between deliberately being alone to get your own space and being lonely at heart.
The first type can help untangle the Mind. Loneliness is, however,  ” मनी मानवा व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते…. “
Loneliness is a state of Mind, not necessarily related to your Physical Loneliness.
For example – the Loneliness of an artist who has hundreds of fans and is surrounded by colleagues. Once a famous actor said in one of his interviews, “If I want to vent my stress to someone, I can’t go to my parents, because they won’t know what to do. Instead, they will be stressed because I am stressed.” If I talk to friends, they will only think that he told me his problem. So I don’t talk to anyone.” Of course, this story is not only about this star actor, but about many people.
At such times, meditation like Vipassana, Dhyanadharana along with Homoeopathic Medicines will definitely help in stress relief.
Loneliness has now become a social problem in many countries. That is why the World Health Organization (WHO) has taken notice of it and said, “Loneliness could be worse for health than smoking 15 cigarettes a day”!!!
You might think that Corona has made us aware of this problem of Loneliness. But the reality is not like that. Even before Corona, the problem of Loneliness was spreading all over the world. It is true that Corona added more to it.
We may have neglected this Mental-Social problem of Loneliness in the midst of the problems that make our daily life difficult like poverty, unemployment, corruption, and the state of cities and villages in India, but many countries in the world have seriously started to address this problem.
If you look at the definition of loneliness, “Loneliness is the realization that you are isolated from society. This realization is not made by outsiders, but by oneself.” Now looking at this definition, it can be said that the solution can be found from the cause of the problem. It means that the person who feels lonely has to take initiative and take measures to overcome it.
The Japanese government realized that the intense feeling of Loneliness is an important reason behind suicide, so they started a ministry like “Ministry of Loneliness”. Following him, the British government also started a ministry in the same manner.
If a person is withdrawn from social interaction for a long period of time and shuts himself in the house, it is considered a social phenomenon rather than just an individual’s mental problem, in Japan because it is a country that values ​​community life.
This kind of Loneliness increases the chances of Mental illnesses like guilt and anxiety.
According to one report, countries with the highest rates of Loneliness are Brazil, Turkey, India and Saudi Arabia.
Apart from various reasons in personal life, sudden changes in life, Mental health problems, lack of self-esteem and some personality factors contribute to loneliness.
This Loneliness is divided into three types.
1) The first is Emotional Loneliness – these individuals lack meaningful relationships in their lives. Be it marital relationship or social relationship like family, friendship. So they cannot share their happiness, sadness and other feelings to anyone.
2) The second type, Social Isolation – Along with many instances in modern times I am reminded here of the social ostracism endured by Sant Dnyaneshwar and his siblings.
3) In the third type, we are alone, we have nothing to do with anyone, this feeling of alienation is found “Extensional Loneliness”. (“अस्तित्वात्मक एकाकीपण “)
Overall, given the extent of this global problem of Loneliness, Homoeopathic Treatment of psycho-social problems can be very useful. And there are many very important Medicines available in this science, which can help lonely people, reduce guilt, anxiety, etc., and bring them back into the social flow.

Dr Ajay Hanmane
M.D.(Hom) HHF,ICR Kolhapur,
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4,Near HDFC Bank,
Bhaskar Plaza Vyapari Peth,
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
Mobile No. 7738667123, 904507723
Sunday Closed.

Please Read Next Article-