प्रेम, लग्न,कामजीवन (Sex-Life) याबद्दल आपल्या मनात काही ठोकताळे असतात, समज असतात.
उदाहरणार्थ, वयात आलेलं मुल प्रेमात पडणार हे जसे गृहीत धरलं जातं, तसंच वयाची पन्नाशी-साठी उलटली की, शरीर भावना शरीरातून हद्दपार होणार, हे देखील अनेक ज्येष्ठ लोकांच्या मनात पक्कं ठाण मांडून बसलेले असत. पण असं खरंच असतं का ?
वाढत्या वयानुसार कामभावना- लैंगिक जीवन विजून जावी, लैंगिक भावना विझून जावी याला खरंच काही आधार आहे का ?
नसेल, तर मग ज्येष्ठांचं कामजीवन हा विषय समाज म्हणून आपण कायमच “ऑप्शन”ला का टाकत आलो आहोत ? हा मोठा प्रश्न आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या ताज्या अहवालानुसार, आज आपल्या देशात साठीच्या पुढील व्यक्तींची संख्या ही 13 कोटी च्या पुढे आहे. हे प्रमाण 2050 पर्यंत 35 कोटी पर्यंत पोहोचणार आहे. वृद्धांची इतकी मोठी संख्या असलेल्या समाजात ” सीनियर सेक्स “ विषयी असलेले सगळे गैरसमज दूर करत ज्येष्ठांनी आणि इतरांनी ज्येष्ठांच्या सहजीवनाकडे आणि कामेच्छेकडेही निकोप दृष्टिकोनातून बघण्याची गरज आहे.
माझ्याकडे समुपदेशनासाठी आलेल्या एका मध्यमवयीन जोडपे विषयी सांगतो, “ या जोडप्याच्या लग्नाला 27 वर्षे झाली होती. पतीचे वय 52, पत्नीचे वय 49 वर्षे होतं. त्यांना मोठी मुलं होती आणि शिक्षण-नोकरी निमित्त परगावी राहायची. त्यांचा नेमका प्रश्न काय आहे हे त्यांना स्वतःलाही मानता येत नव्हतं. एकमेकांविषयीच्या किरकोळ स्वरूपाच्या तक्रारी ते सांगत होते. त्यांना समुपदेशनामधून नेमकी काय माहिती हवी होती हे समजत नव्हतं. मी त्यांना त्यांच्या कामजीवनाविषयी विचारल्यानंतर बायको म्हणाली की, पाच खोल्यांच्या मोठ्या घरात गेल्या चार वर्षांपासून ते दोघं वेगवेगळ्या खोल्यांत राहतात. मुळात ते वेगवेगळ्या खोल्यांमध्ये का राहायला लागले, हे विचारल्यानंतर त्यांना कोणताच प्रसंग, भांडण किंवा अमुक घटना अशी आठवत नव्हती. कामजीवनाच सोडा, ते कोणतीच गोष्ट एकत्र जोडीने करत नव्हते. जेवण, टीव्ही बघणं, बाजारात बाहेर फिरायला जाणं, मित्रमैत्रिणींना भेटणं, अशा सर्व ठिकाणी ते एकेकटे जायचे. गेल्या अनेक दिवसांत एकमेकांशी कामाशिवाय ते बोलतही नव्हते. साधं भांडण करूनही त्यांना अनेक दिवस झाले होते. समुपदेशनाच्या तिसऱ्या सेशनमध्ये या बाईंनी सांगितलं की, त्यांना पतीपासून घटस्फोट हवा आहे कारण त्यांना आता या नीरस जीवनाचा कंटाळा आला आहे.”
वाढत्या वयानुसार लैंगिकदृष्ट्या सक्रिय राहण्याचे प्रमाण कमी होताना दिसत असलं तरी वयाची 80 पार केलेले 29% पुरुष आणि 25% स्त्रिया या लैंगिकदृष्ट्या सक्रिय असल्याचे अमेरिकेमध्ये झालेल्या संशोधनांमध्ये दिसून आलं आहे.
साठीनंतर ही शरीरसंबंधाचा आनंद घेणाऱ्या आणि त्यामुळे अपराधगंडानं पछाडलेला एका जोडप्याविषयी माझ्या मित्राने अनुभव सांगितला की, ” या जोडप्याचं वय पासष्टीच्या आसपास आहे. त्या दोघांमध्ये कामेच्छा उत्तम आहे. मुलगा- सून नोकरीवर आणि नातवंडं शाळेत गेले की सकाळच्या वेळेस त्यांना एकांत मिळतो. त्यावेळी ते संबंध ठेवतात. शरीरसंबंध या वयात ही हवेहवेसे वाटतात, हे नॉर्मल आहे का ? मुलाला-सुनेला कळलं तर काय ? अशी भीती त्यांच्या मनात होती.
त्यांचीही भीती अनाठायी आहे हे त्यांना समजावून सांगितलं. बऱ्याचदा अपराधगंडामुळे किंवा चुकीच्या समजुतीमुळे ज्येष्ठांमधील कामजीवननामध्ये खंड पडतो. वास्तविक सेक्समुळे डोपामाइन, ऑक्सिटॉसिन ही “हॅपी हार्मोन्स” स्त्रवतात. त्यामुळे आनंद मिळतो आणि सेक्सची अनुभूती घेणं ही एक कला आहे.”
“मुलांनी आपल्या ज्येष्ठ आई-वडिलांना गृहीत धरू धरू नये, त्यांच्या एकांताचा आदर करावा.” हा मुद्दा अधोरेखित करताना नामवंत सायकॉलॉजिस्ट सांगतात की, ” नातवंड मोठी झाली की, ती आजी-आजोबांच्या खोलीत झोपणार, हा बहुतेक घरामधला पायंडा असतो. पण स्वतःच्या एकांताचा विचार करताना, आपल्या आई-वडिलांच्या सहजीवनाचा एकांताचा विचार आणि आदर मुलांनी-सुनांनी करायला हवा. तसेच सेक्स म्हणजे फक्त संभोग, हा संकुचित विचार न करता, ज्येष्ठांनी शृंगार, प्रणय यांचा विचार करावा.”
डॉक्टर विठ्ठल प्रभू लिखित ” प्रश्नोत्तरी कामजीवन “ या पुस्तकात साठी-सत्तरीनंतर संभोग केल्यास प्रकृतीस अपाय होतो का ?
या प्रश्नाचे उत्तर देताना डॉक्टर प्रभू नमूद करतात की, संभोगामुळे कोणत्याही वयात प्रकृतीस अपाय होत नाही. उलट व्यायामाप्रमाणे शरीरास फायदा होतो. सुमारे 150 उष्मांकाचा व्यय होतो. रजोनिवृत्तीनतर स्त्रियांमध्ये योनीमार्ग कोरडा होण्याची समस्या उद्भवते. त्यावर जेलीसारख्या वंगणाचा वापर करण्याचा सल्ला डॉक्टर प्रभू देतात.
अमेरिकन यूरोलॉजिकल असोसिएशनच्या 2015 च्या वार्षिक अधिवेशनात कामजीवनाविषयी महत्त्वाचे निरीक्षण नोंदवलं गेलं. त्यानुसार कामजीवनात सक्रिय असलेल्या पुरुषांमध्ये आणि विशेषता जेष्ठांमध्ये प्रोस्टेट कर्करोगाचा धोका कमी असतो.
यशस्वी कामजीवनाचं रहस्य उलगडताना डॉक्टर प्रभू यांनी सांगितले आहे की, “वापर करा आणि किंवा घालवा (Use It Or Loose It) हे सूत्र कामजीवणालाही लागू पडतं,हे जोडप्यांनी समजून घ्यायला हवं. केवळ वय वाढलय किंवा लोक काय म्हणतील, या मानसिकतेमुळे शरीरसंबंध ठेवलेच नाही तर, सेक्सी इच्छा कमी होऊ शकते. अशी जोडपी फॉरेन ट्रिपा वगैरे करतात पण सेक्स मात्र करीत नाहीत.
आई-वडिलांना डे-केअर मध्ये ठेवणं किंवा शुद्ध मराठीत वृद्धाश्रमात ठेवणे याकडे अनेकदा शब्दशः ‘शाप’ म्हणून पाहिले जाते. यावर एका सीनियर सेक्सोलॉजिस्टने सांगितले आहे की, ” एकलवृद्धांचा विचार करता, घरात त्यांच्याशी कोणी प्रेमाचे दोन शब्द बोलत नाहीत की मायेचा स्पर्श कुणी करत नाही. अशावेळी वृद्धाश्रमात त्यांना समवयस्कर मित्र-मैत्रिणीची सोबत मिळाली तर त्यांचं उतारवय आनंददायी होऊ शकतं.”
“सेक्स इन द गोल्डन इयर्स” या पुस्तकात अधोरेखित करण्यात आलेला आणखी एक मुद्दा म्हणजे, ” काही ठराविक औषधांमुळे कामेच्छेत कमालीची घट होऊ शकते. अशावेळी कोणताही संकोच न करता डॉक्टरांच्या निदर्शनास ही गोष्ट आणून देत, औषध बदलून घ्यायला हवीत. “
डॉ अजय हनमाने
M. D. (Hom) ICR, HHF, Kolhapur
चैतन्य होमिओपॅथिक क्लिनिक
भास्कर प्लाझा, F4, HDFC बॅंकेजवळ,
शाहूपुरी व्यापारी पेठ, रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ कोल्हपूर
मो. 7738667123
रविवारी बंद
कृपया पुढील लेख वाचा—
We have certain ideas and beliefs about Love, Marriage, Sex-Life.
For example, just as it is assumed that a child who has reached puberty will fall in love, similarly, after the age of 50, Body Emotions will be banished from the body, it was also firmly established in the Minds of many elderly people. But is it really so ?
Is there really any basis for the desire to lose Sex Life with increasing age ?
If not, then why have we as a society always put the subject of Sex-Life of seniors as an “Option” ? This is a big question.
According to the latest report of the United Nations, the number of people above 60 years in our country today is more than 13 crores. This number will reach 35 crores by 2050. In a society with such a large number of Elderly people, there is a need for Seniors and others to look at the cohabitation and libido of seniors from a positive point of view, removing all misconceptions about “Senior Sex”.
About a middle-aged couple who came to me for counselling, “The couple had been married for 27 years. The husband was 52 and the wife was 49. They had grown-up children and lived abroad for education and work. They could not even believe what their real problem was. They were talking about minor complaints about each other. They didn’t understand exactly what information they wanted from the counselling. After I asked them about their Sexual-Life, the wife said that for the last four years they have been living in different rooms in a big five-room house. Basically, why did they start living in different rooms ? , after asking this, he did not remember any incident, fight or any incident. They did not do anything together as a couple, let alone work life. They used to go alone to eat, watch TV, go out to the market, meet friends. “They didn’t even talk except for work. It had been several days since they had a simple fight. In the third session of counselling, the woman said that, she wanted a divorce from her husband as she was tired of this monotonous life.”
Although the rate of being sexually active seems to decrease with increasing age, 29% of men and 25% of women over the age of 80 are sexually active in the United States.
A friend of mine shared his experience of a couple who enjoyed sex and was haunted by guilt, “The couple is around sixty-five. They both have a good libido. They get alone time in the morning when the son-daughter-in-law is at work and the grandchildren go to school. That’s when they have Sex.” They were afraid that physical relations are desirable at this age, is it normal ? What if the son-in-law finds out ?
Explained to them that their fear is also unfounded. Oftentimes there is a break in work life among seniors due to guilt or misperception. Real Sex releases Dopamine, Oxytocin, the “Happy Hormones”. It brings pleasure and the feeling of sex is an art.”
Children should not take their elderly parents for granted, respect their privacy. Highlighting this point, a renowned psychologist says, ” When the grandchild grows up, she /he will sleep in the room of their grandparents, it is a ROUTINE in most of the houses. But while thinking about their own privacy, the Son-daughter-in-law should think about privacy and respect the cohabitation of their parents. Also Sex is only intercourse, without this narrow thinking, seniors should think about grooming, romance.”
Dr. Vitthal Prabhu’s book “Questioning Kamajivan” in the book “Is sexual intercourse after 60-70 harmful to healthy ?”
Answering this question, Dr. Prabhu mentions that, “Sexual intercourse does not harm health at any age. On the contrary, it benefits the body like exercise. About 150 calories are expended. Vaginal dryness is a problem in women after menopause. Doctor Prabhu suggests using a jelly-like lubricant on it.”
An important observation about work life was made at the 2015 annual meeting of the American Urological Association. Accordingly, the risk of prostate cancer is lower in men who are active in the work life and especially in the Elderly.
While revealing the secret of a successful work life, Dr. Prabhu has said that, “Use It Or Loose It” formula applies to Sex-Life as well, couples should understand. Not only because of age or what people say, but because of the mentality of having Sex. , Sexual desire may decrease. Such couples do foreign trips etc. but do not have Sex.
Actually after retirement there is free time. Therefore, couples should strive to preserve the charm of romance. It can also overcome depression-loneliness. Various studies have shown that couples with a good work life have lower rates of Heart disease, Diabetes, Prostate gland disorders, and Cervical Cancer.
There is no need to go out every time if there is equality in the relationship between the concerned. Try changing the environment a bit, and sometimes change the Sex-Positions. Most importantly change this perception that we are old !! “
Keeping parents in daycare or old age homes in pure Marathi is often seen as a literal curse (‘शाप’). On this, a senior Sexologist has said, “Considering the single elderly, no one speaks two words of love to them at home or no one touches them with love. In such a case, if they are accompanied by friends of the same age in the old age home, their aging can be pleasant.”
It is said that, human beings can be sexually active until their last breath, but the prejudices of the congregation in the “Golden Years” and what the children would say make them forget to enjoy a simple social life, let alone a Sex-Life. That is why children should help their parents to keep the “Romance Charm” alive. Actually experiencing sex at any age is an art. Therefore, not only the relationship between husband and wife becomes closer, but also one can get rid of many serious diseases.
Another point highlighted in the book “Sex in the Golden Years” is that, ” certain medications can cause a drastic drop in libido. In such a case the matter should be brought to the attention of the doctor without any hesitation and the medicine should be changed. “
Dr. Ajay Hanmane
M.D.(Hom) HHF,ICR Kolhapur,
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4,Near HDFC Bank,
Bhaskar Plaza Vyapari Peth,
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
Mobile No. 7738667123
Sunday Closed.
Please read the following article—