कर्णबधिरतेवर होमिओपॅथिक उपचार / Homoeopathic Treatment of Deafness

Dorctor Pic By Dr. Ajay HanmaneFebruary 19, 2024 Ear Problems General Information Homeopathic and Cure

कर्णबधिरतेवर होमिओपॅथिक उपचार

माझ्याकडे एक 47 वर्षीय महिला रुग्ण आली. गेल्या चार वर्षापासून ऐकू येत नाही ही त्यांची तक्रार. त्यांना इतर कुठलाही त्रास नव्हता. थोडेफार ऐकू यावे म्हणून त्यांनी श्रवणयंत्र सुद्धा वापरले. पण यंत्र लावल्यानंतर कानात घूं|घूं| असा आवाज, मधमाशीच्या आवाजासारखा आवाज येत असे. यंत्र काढले तरी हा घूं|घूं| आवाज कानात घोटाळतोय असे त्यांना सतत वाटू लागले. म्हणून मग त्या स्त्रीने यंत्र वापरणे बंद केले. निरनिराळे उपचार केले. कुणी सांगितले अमके-अमके थेंब कानात घाला, घातले , पण ऐकू येईना. या स्त्रीला संगीताची खूप आवड. म्हणजे त्या दिवसापासून तीन ते चार तास संगीत ऐकायच्या, गायच्या. त्यामुळे त्यांना वाटे की, आपल्याला संगीत ऐकायला मिळालं पाहिजे. डॉक्टर माझ्या कानाची कानांची, मनाची ही संगीतभूक भागविण्यासाठी मला कधी ऐकू येईल हो ?
त्या बाईंनी काकुळतिला येऊन मला प्रश्न विचारला.
मी म्हटलं, प्रयत्न करतो. बघूया !!
मी होमिओपॅथीची औषधे त्या बाईंना सुरू केली. औषध सुरू केल्यावर जस जशी ऐकण्यात सुधारणा होत गेली तसतसा औषधांच्या मात्रेमध्ये बदल करत गेलो अखेर त्या बाईंना व्यवस्थित ऐकू येऊ लागले त्या बाईंनी न विसरता न कंटाळाचा औषध घेतले कधी गरज वाटली तर तातडीने फोन करून विचारायच्या व्यवस्थित पूर्वीप्रमाणे ऐकू येऊ लागल्यावर मगच त्यांनी औषधे बंद केली.
कर्णबधिरता हा कुठल्याही वयात नकळत होणारा रोग आहे. यात कान दुखणे,पु होणे वगैरे लक्षणे असत नाहीत. परंतु हळूहळू बधिरता येत जाते.
पुष्कळ लहान मुलांच्या बाबतीत जन्मतःच मुलांच्या मेंदूत काही दोष आहे का, हे ओळखावे लागते. लहानांबरोबरच मोठ्या माणसांच्या बाबतीत ही हाक मारली असता ‘ओ ‘ न देणे, जवळपास आवाज आला असता त्याकडे लक्ष न वेधले जाणे,  यावरूनच त्या व्यक्तीच्या ऐकण्यात दोष आहे असे समजावे.कानाची ही बधिरता हळूहळू येत जाते.
थंडी व दलदलीच्या हवेत कमी ऐकू येते अशी तक्रार असलेली मुले कानात गुणगुणल्याचा किंवा गिळताना फडफडल्याचा आवाज ऐकू येत असल्याचे अनुभव सांगतात. काही वेळा कानात स्वतःच्या आवाजाचा प्रतिध्वनी ऐकू येतो. मध्यकर्णामध्ये सतत खाज सुटते. मोठ्या माणसांना आपल्या कानात पाणी साठले आहे किंवा काहीतरी कानात आहे, पडदा आडवा आला आहे असे भासते किंवा कान कोरडा व ओलसर असा भासतो. 
 पुष्कळदा वारंवार सर्दी होणाऱ्या मुलांमध्ये किंवा मोठ्या माणसांमध्ये हे विशेष करून आढळते. रोग बरेच दिवस रेंगाळत असतो. त्याकडे दुर्लक्ष केले जाते किंवा सांगीव औषधे घेतली जातात. तरीही उपयोग होत नाही व रोग वाढत जाऊन कर्णबधीरता येते.
पण माझ्या अनुभवानुसार होमिओपॅथीच्या औषधाने कर्णबधीरतेच्या वाढीस लागलेल्या वेगास आळा बसतो व योग्य होमिओपॅथिक औषधांनी कर्णबधिरता जाते, म्हणजे ऐकू येऊ लागते. कर्णबधिरता आली आहे हे लक्षात आल्यावर, ताबडतोब होमिओपॅथीक औषधे सुरू केल्यास लवकर गुण येतो. 
कर्णबधिरतेमध्ये  रोग्याला आपलाच आवाज जास्त प्रकर्षाने ऐकू येतो, तर काहींना ऐकायलाच येत नाही. कानात जणू दडे बसले आहेत असे विरुद्ध टोकाची लक्षणे अनुभवायला मिळतात. काहींना कानात टीप मारल्यासारख्या वेदना जानवतात तर काहींना जवळचे ऐकायलाच येत नाही. शांत झोपले असताना किंवा काम करताना सुद्धा भुंगा घोंगवल्यासारखा आवाज जाणवतो.
बऱ्याचदा म्हातारपणी आणि काही इंद्रियांचे कार्य कमी झाल्यामुळे ते इंद्रिय काम करीत नाही. या इंद्रियांपैकीच कान हे एक आहे.
लहान मुलांनाही कर्णबधिरता येऊ शकते. अगदी लहान असतानाच ऐकू न येण्याची तक्रार असेल तर ती लहान मुले लवकर बोलू शकत नाहीत, याचे कारण म्हणजे त्यांना ऐकू न आल्यामुळे शब्द, आवाज यांची भाषा त्यांना अवगत नसते. थोडेफार ऐकू येऊ लागल्यावर मुले हळूहळू बोलायला शिकतात म्हणजे अगदी लहान असताना मुलाला ऐकू येत नसेल तर डॉक्टरांना भेटून योग्य ती उपाययोजना करणे हिताचे आहे.
लहान मुलांमध्ये उद्भवणाऱ्या कर्णबधिरतेवरही होमिओपॅथिक औषधे परिणामकारक ठरली आहेत. 
कानाच्या अनेक व्याधींवर होमिओपॅथीमध्ये प्रभावी औषधे आहेत. वेगवेगळ्या वयोगटातील रुग्णांना ऋतूंनुसार जाणवणाऱ्या कानाच्या तक्रारीसाठी वेगवेगळ्या प्रकारची औषधे वापरता येतात हे या औषधांचे मोठेच वैशिष्ट्य आहे. 
डॉ अजय हनमाने

एम. डी. (होमिओ) HHF, ICR Kolhapur,
चैतन्य होम्योपैथिक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4, HDFC बॅंकेजवळ,
शाहुपुरी व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123
रविवारी बंद

कृपया पुढील लेख वाचा —

Homoeopathic Treatment of Deafness

A 47-year-old female patient came to me. Their complaint is that they have not heard from the last four years. They had no other problems. She also used Hearing Aids to hear a little. But after applying the device, I snort in the ear Such a sound sounded like the sound of a bee. Even if the device is removed, this ghu | ghu | ghu |,  He constantly felt that the voice was ringing in his ears. So then the woman stopped using the device. Various treatments were done. Someone told me to put some drops in my ears, I put them on, but I couldn’t hear. This woman is very fond of music. That means in a day she used to listen to music and sing for three to four hours. So she thought she should get to listen to music.
Doctor, when will I be able to hear this musical hunger of my Ears and Mind ?
That woman came and asked me a question desperately (काकुळतिला येऊन).
I said, I try. Let’s see !!
I started Homoeopathic Medicines to that woman. After starting the medicine, as the hearing improved, we changed the doses of the medicine. Finally, the woman began to hear properly. The woman did not forget to take the medicine for boredom. If she felt the need, she could call immediately to ask, and then she stopped the medicine.
Deafness is a disease that occurs unknowingly, without realizing at any age. There are no symptoms like ear pain, swelling etc. But gradually it becomes deaf.
In the case of many young children, it is necessary to identify whether there is a defect in the brain at birth. In the case of children as well as adults, not giving  reply ‘O’(‘ओ ‘ न देणे) when this call is made, not paying attention to it when the sound is nearby, should be considered as a defect in the hearing of the person. This deafness of the ear comes gradually.
Children who complain of hearing loss in cold and marshy air report hearing humming in the ears or gurgling noises when swallowing. Sometimes one hears the echo of one’s own voice in the ear. Constant itching in the middle ear. Older people may have fluid or something stuck in their ear, the eardrum feels like it’s torn, or the ear feels dry and moist.
It is especially common in children or older adults who often have frequent colds. The disease lingers for many days. It is ignored or side effects are taken. Still it is not useful and the disease progresses and causes deafness.
But according to my experience Homoeopathic Medicine slows down the rate of deafness and with proper Homoeopathic Medicine deafness is reversed i.e. hearing starts. As soon as hearing loss is noticed, Homoeopathic Medicines are started immediately.
In Deafness, the patient can hear his own voice more loudly, while some cannot hear it at all. The opposite extreme symptoms are experienced as if stones are in the ears. For some, it causes a sharp pain in the ear, while for others, it is almost impossible to hear. Even while sleeping peacefully or while working, the noise is felt like a humming noise.
Often due to old age and loss of function of some senses, that sense does not work. Ear is one of these senses.
Even young children can develop deafness. If there is a complaint of hearing loss at a very young age, those children may not be able to speak early, the reason being that they are not aware of the language of words and sounds due to their hearing loss. Children learn to speak gradually as they begin to hear a little, so if a child is unable to hear at a very young age, it is advisable to see a doctor and take appropriate measures.
Homoeopathic Medicines have also been effective in treating Deafness in children.
Homoeopathy has effective Medicines for many ear diseases. A great feature of these Medicines is that patients of different ages can use different types of Medicines for seasonal ear complaints.

Dr Ajay Hanmane
M.D.(Hom) HHF,ICR Kolhapur,
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4, Near HDFC Bank,
Bhaskar Plaza Vyapari Peth,
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
Mobile No. 7738667123
Sunday Closed.

Please Read Next Article-