कानाच्या विकारांवर होमिओपॅथिक उपचार / Homoeopathic Treatment of Ear Disorders

Dorctor Pic By Dr. Ajay HanmaneFebruary 12, 2024 Children Problems Ear Problems General Information Homeopathic and Cure

कानाच्या विकारांवर होमिओपॅथिक उपचार

 

शरीर शास्त्रानुसार कानाचे तीन भाग आहेत.

A) बाहेरील भाग-एक्स्टर्नल इयर – (External Ear)

B) मध्य भाग-मिडल इयर (Middle Ear)

C) अंतर भाग-इंटरनल इयर (Internal Ear)

या तीनही भागांच्या रचनेनुसार त्यांची कार्य ही विशिष्ट आहेत व त्यानुसार त्यांना होणारे विकार व त्यांची लक्षणे.

कानाच्या संदर्भात खालील लक्षणांचा विचार सामान्यतः करणे आवश्यक आहे.

त्या लक्षणांच्या अभ्यासावरून कानाच्या कोणत्या भागामध्ये विकार झाला आहे  याचे निदान होते.कारण कानाची आतील यंत्रणा फार नाजूक असते व कानाचा व त्या यंत्रणेचा मेंदूशी अत्यंत जवळचा संबंध असल्याने आजाराचा विस्तार मेंदूकडे फायदा होण्याची शक्यता असते. वेळेत उपचार औषधी किंवा शस्त्रक्रिया न झाल्यास यंत्रणेला झालेल्या ईजेचा परिणाम रुग्णास आयुष्यभर भोगावा लागतो.

कानाच्या विकारांच्या योग्य निदानासाठी विशिष्ट प्रकारच्या तज्ञ तपासण्या व उपकरणांची आवश्यकता असते.

औषधी उपचारांनी बऱ्या होणाऱ्या कानांच्या विकारासंबंधी होमीओपॅथिक दृष्टिकोनातून आपण विचार करूया.

अ) बाह्यकान –

फरंक्युलोसिस (Furenculosis)-

बाह्यकानातील केसांच्या मुळातील जंतुसंस्कारामुळे होणारा अतिशय वेदनामय विकार. यामध्ये —

  • कानाच्या बाहेरील बाजू सूज येऊन लाल होणे,
  • गरम होणे तसेच
  • पू युक्त पुळ्या येणे

ही लक्षणे असतात. लक्षणांच्या अभ्यासानुसार होमिओपॅथिक औषधांचा अत्यंत चांगला उपयोग होतो.

ब) इतर त्वचा विकार –

डरम्याटायटीस (Dermatitis), एरिसिपॅलस (Erysipelas), ओटायटिस एक्स्टर्णा( Otitis Externa) , हरपिस (Herpes) यांचा इलाज मुख्य त्वचा विकारांच्या संदर्भात करणे आवश्यक असते. कारण त्यांच्या तात्पुरत्या शमनाने उपयोग नसतो. या विकारामागील कारणे स्थानिक नसून रुग्णाच्या सार्वत्रिक शरीरस्वास्थ्याशी संबंधित असतात व त्यासाठी स्थानिक स्वच्छते व्यतिरिक्त  स्वभाव गुणधर्मानुसार (कॉन्स्टिट्यूशनल Constitutional) औषध उपचाराची गरज असते. तात्कालीक स्थितीमध्ये (ॲक्युट) स्थितीत होमिओपॅथीमध्ये अत्यंत गुणकारी औषध आहेत. ज्यांची निवड लक्षणांच्या तौलनिक अभ्यासाद्वारे केली जाते.

ब) मध्ये कानातील विकार –

मध्यकानातील यंत्रणेचा ऐकण्याच्या क्रियेशी जवळचा संबंध असल्याने कर्णबधिरता होण्यापासून बचाव हे इलाजाचे मुख्य उद्देश असते.

  1. ॲक्युट ओटायटिस मीडिया (Acute Otitis Media)
  2. क्रॉनिक ओटायटिस मीडिया (Chronic Otitis Media)
  3. ॲक्युट मॅस्टाॅडाईटिस (Acute Mastoiditis)
  4. क्रॉनिक मॅस्टाॅडाईटिस (Chronic Mastoiditis)

या इत्यादी नावाप्रमाणे एकच आजाराच्या तीव्रता व कालावधीप्रमाणे या दोन भिन्न अवस्था आहेत.

या विकाराचे मुख्य कारण म्हणजे नाक व घशाच्या विकारांमुळे युस्टेशियन (Estuation Tube) नलिकाद्वारे होणाऱ्या जंतुसंसर्गाचा विस्तार. त्यामुळे मुख्य कारणांचा टॉन्सिलिटीस, ॲडेनाॅयटीस, सायनुसायटीस या आजारांचा इलाज केल्याशिवाय पर्याय नसतो.

याची मुख्य लक्षणे म्हणजे

  • कानदुखी,
  • ताप,
  • कानातून स्त्राव येणे,
  • घाण येणे,
  • ऐकायला कमी येणे,
  • कानात विविध प्रकारचे आवाज येणे,
  • चक्कर येणे,
  • खाज येणे इ.

या आजारांच्या लक्षणांबरोबर रुग्णाच्या वैयक्तिक प्रकृती व संवेदनशीलतेनुसार इतर लक्षणे येतात.

उदाहरणार्थ,

  • हवेचा त्रास,
  • थंडी वाजणे,
  • उष्णता जाणवणे,
  • तहानेतील बदल,
  • लक्षणे वाढण्याची वेळ,
  • शरीर स्थितीप्रमाणे होणारे बदल,
  • गरम गार शेकण्याने होणारे बदल

इत्यादीच्या अभ्यासांती योग्य औषधाची निवड करता येते. त्यामुळे संसर्ग लवकरात लवकर काबुत आणून कानातील यंत्रणेवरील दूरगामी परिणाम वाचविता येतात.

होमिओपॅथीमध्ये या आजारांसाठी सुद्धा अत्यंत गुणकारी गुणकारी औषधे असून ती (ॲक्युट) तात्कालीक अवस्थेमध्येही उपयोगी पडतात.नंतरचा इलाज (कॉन्स्टिट्यूशनल Constitutional) प्रकृती स्वभावानुसार शोधले गेलेले औषध उपयोगी पडते, कारण आजाराचे स्वरूप जुनाट होण्यास शारीरिक तसेच मानसिक अवस्था कारणीभूत असते ठरते.

क) आंतरकानातील विकार-

लॅब्रेन्थाइटिस (Labyrinthitis) मध्यकानातील संसर्ग आंतरकानात शिरल्यामुळे लॅब्रेन्थाइनला सूज येते. त्या मध्ये

  • स्त्राव, घाण होऊन पू होण्याची शक्यता असते.
  • यामध्ये चक्कर येणे,
  • तोल जाणे,
  • उलट्या होणे,
  • डोळे भिरभिरणे व
  • कर्णबधिरता येणे

ही लक्षणे असतात.

याची त्वरित तपासणी व इलाज अत्यावश्यक असतो, कारण लक्षणांची तीव्रता व रुग्णाची भेदरलेली स्थिती, लक्षणांच्या तौलनीक अभ्यासानुसार होमिओपॅथीमध्ये विविध गुणकारी औषधांचा उपयोग होतो.

मिनिअर्स डिसीज (Meniere’s Disease) 

यामध्ये अंतर कानातील पोकळीतील इंडो लिंफ (Endo Lymph) मधील दबाव यंत्रणेतील फरकामुळे होतो हा आजार होतो. यामध्ये रुग्णाला चक्कर येऊन तीव्र उलट्या व अचानक झटके येतात. स्वस्थ व अजिबात हालचाल न करता पडून राहण्याशिवाय पर्याय नसतो.याचा अवधी काही तास ते काही दिवस राहतो व नंतर मधला कालावधी पूर्णतः लक्षण विरहित असतो. पण याची कारणे सहसा रुग्णाच्या प्रकृती दोषात असतात व सहसा मानसिक ताणाचा अंमल आजाराच्या तीव्रतेला कारणीभूत असतो. तेव्हा कारणांचा अभ्यास करूनच त्याचा इलाज करणे इष्ट ठरते.

डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ) HHF, ICR Kolhapur,
चैतन्य होम्योपैथिक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4
शाहुपुरी व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123
रविवारी बंद  

कृपया पुढील लेख वाचा  —

———————————————–

Homoeopathic Treatment of Ear Disorders

 

According to anatomy, the ear has three parts.

A) External Ear 

B) Middle part

C)  Internal Ear 

According to the structure of these three parts, their functions are specific and accordingly the disorders and their symptoms.

The following symptoms should generally be considered in relation to the Ear.

By studying those symptoms, it is diagnosed which part of the Ear has a disorder. Because the internal system of the Ear is very delicate and since the Ear and that system are very closely related to the brain, there is a possibility that the disease will spread to the brain. If the treatment is not done in time with drugs or surgery, the patient has to suffer the effects of Injury for the rest of his life.

Proper diagnosis of ear disorders requires specialized tests and equipment.

Let us consider from the Homoeopathic point of view Ear disorders that can be cured by Medicinal Treatment.

a) External ear –

Furenculosis-

A very painful disorder caused by infection of the root of the hair in the outer Ear. Symptoms include

  • Swelling,
  • Redness,
  • Heat, and
  • Pus-filled pustules on the outside of the ear.

According to the study of the symptoms, Homoeopathic Medicines are very useful.

b) Other skin disorders –

Dermatitis, Erysipelas, Otitis Externa, Herpes need to be treated in relation to the main Skin disorders. Because their temporary mitigation is useless. The causes behind this disorder are not local but are related to the general health of the patient and for this, apart from local hygiene, Constitutional medicine treatment is needed. Homoeopathy has very effective medicines in acute conditions. Which are selected by comparative study of symptoms.

b) Ear disorders in –

Since the Middle Ear system is closely related to the function of hearing, prevention of deafness is the main goal of treatment.

  1. Acute Otitis Media
  2. Chronic Otitis Media
  3. Acute Mastoiditis
  4. Chronic Mastoiditis

These are two different stages as the severity and duration of the same disease as the name etc.

The main cause of this disorder is the extension of infection through the Eustachian tube due to disorders of the Nose and Throat. Therefore, there is no alternative without treating the main causes of Tonsillitis, Adenitis, Sinusitis.

Its Main symptoms are

  • Earache,
  • Fever,
  • Discharge from the ear,
  • Dirtiness,
  • Hearing loss,
  • Various types of ringing in the ear,
  • Dizziness,
  • Itching etc.

Along with the symptoms of these diseases, there are other symptoms depending on the individual nature and sensitivity of the patient.

For example –

  • Air pollution,
  • Chill,
  • Feel the heat,
  • Changes in thirst,
  • Time of onset of symptoms,
  • Changes in body position,
  • Changes caused by hot roasting

After studying etc., the right medicine can be selected. Therefore, early treatment of the infection can prevent far-reaching effects on the Ear system.

In Homoeopathy, there are very effective medicines for these diseases and they are useful in the (acute) immediate condition. Later treatment Constitutional. The medicine found according to Nature is useful, because Physical and Mental conditions cause Chronic Nature of the disease.

c) Inner ear disorders-

Labyrinthitis-

Inflammation of the Labyrinthine due to infection in the Middle Ear entering the Inner Ear. There is a possibility of

  • Discharge,
  • Dirt and
  • Pus in it.

Symptoms include

  • Dizziness,
  • Loss of balance,
  • Vomiting,
  • Blurred vision and
  • Deafness.

Prompt diagnosis and treatment is essential, as Homoeopathy uses various effective medicines depending on the severity of the symptoms and the patient’s condition, comparative study of the symptoms.

Meniere’s Disease –

This disease is caused by a difference in the pressure mechanism between the Endo Lymph  in the cavity of the Ear. In this, the patient gets dizzy with severe vomiting and sudden seizures. There is no option but to lie down healthy and motionless. It lasts for a few hours to a few days and then the intervening period is completely symptom-free. But the reasons for this are usually in the patient’s condition and usually the effect of Mental Stress is responsible for the severity of the disease. Then it is desirable to treat it only after studying the causes.

Dr Ajay Hanmane
M.D.(Hom)HHF,ICR Kolhapur,
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4,
Bhaskar Plaza Vyapari Peth,
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
Mobile No. 7738667123
Sunday Closed.

Please Read Next Article-