एक ऑक्टोबरला “आंतरराष्ट्रीय वृद्धांचा दिवस “ नुकताच साजरा केला गेला. वर्ल्ड बँक आणि युएन पॉप्युलेशन नुसार 2023 नंतरच्या पुढच्या 23 वर्षात भारतातल्या व्यक्ती सरासरी 75 वर्षे जगतील तर कुटुंबातील मुलांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी होईल.
या साऱ्यांचे वृद्धांवर होणारे परिणाम गंभीर असतील यासाठी गरज आहे ती “वृद्ध कल्याण शास्त्राच्या” अभ्यासाचे.
वृद्ध कल्याण शास्त्र म्हणजे वृद्धत्वाच्या प्रक्रियेचा आणि समस्यांचा जीवशास्त्रीय, वैद्यकीय, कायदा, मानसशास्त्रीय, समाजशास्त्रीय, अर्थ आणि राजकीय अशा सर्व दृष्टिकोनातून केलेला शास्त्रशुद्ध अभ्यास.
सध्या आजूबाजूला सहज अनुभवायला येणारे काही प्रसंग आपण पाहू.
घरात आजीसाठी केअर टेकर आहे. आजी सारखं तेच तेच प्रश्न विचारतात, असं त्यांचं म्हणणं आहे. खायला दिले तरी खायला दिले नाही, चहा प्यायला तरी प्यायलाच नाही, असे म्हणतात. केअरटेकर चिडते आहे म्हणून, मग आजीही मला केअर नको म्हणून अडून बसते.
दुसरी केअरटेकरआणायची तरी कशी ?
आणि दुसरी आली तर ती टिकेल याची काय खात्री?
खुब्याच्या सांध्याचे ऑपरेशन झाल्यानंतर फिजिओथेरपी अपरिहार्य असते. फिजिओथेरपिस्टने घरी येऊन व्यायाम सुरू केला की, आजोबा खूप दुखते म्हणून ओरडतात. पुढच्या वेळी तो आला की, मान वळवून पडून राहतात. व्यायामाला तयारच होत नाहीत. आपोआप सुधारणा होत नाही. मग नव्या समस्यांची सुरुवात होते.
विसरणे, माणसे न ओळखणे, दिशा न कळणे, असा त्रास एखाद्या वृद्धाला सतत होत असतो असे लक्षात आले म्हणून मानसोपचार तज्ञाची अपॉइंटमेंट घेण्यासाठी चौकशी करावी, तर लगेच अपॉइंटमेंट मिळत नाही. तोपर्यंत कसे करायचे हा प्रश्न आहे. फिजिशियन कडे तर 40 – 40 नंबर असतात. त्या वृद्धाचा नंबर येईपर्यंत त्याला काय होते आहे हे सांगायचे पुरेसे आठवतच नाही. डॉक्टरांनाही नीट माहिती मिळत नाही.
या अशा सर्व प्रसंगांमध्ये दोन गोष्टी समान आहेत, त्या म्हणजे रुग्ण वृद्ध आहेत आणि सेवा करणाऱ्या किंवा सल्ला देणाऱ्या व्यक्तीला असे का होते आहे हे समजून घेता येतेच असे नाही. या दोन्ही गोष्टी होतात कारण वृद्ध हा एक स्वतंत्र वेगळा गट आहे. त्याच्या स्वतःच्या काही मर्यादा आहेत. समस्या आहेत. त्यामागे काही प्रमाणात शास्त्रीय कारणे आहेत. आणि मुख्य म्हणजे याबद्दल सर्वच स्तरात असणारी अनभिज्ञता किंवा साध्या सरळ शब्दात सांगायचे तर अज्ञान !
वृद्ध पर्व येऊ घातले आहे, सावधान; असे म्हणण्याची वेळ आली आहे हे निश्चित !
सध्या आपल्या आजूबाजूला, शहरात किंवा खेड्यात देखील जाणवणारी गोष्ट म्हणजे वृद्धांची संख्या ! त्यामध्ये खूप वाढ होत आहे आणि त्याचबरोबर आणखी एक गोष्ट लक्षात येते आहे ती म्हणजे, झपाट्याने कमी होणारी एकत्र कुटुंब पद्धती !
शहरात तर नाहीच, पण आता खेडेगावांमध्ये सुद्धा एकत्र कुटुंब पद्धती तेवढी परिणामकारक दिसत नाही. कुटुंब वेगळे झाले की, वृद्धांची काळजी घेण्याची जबाबदारी, हा प्रश्न निर्माण होतो. सध्या हे प्रश्न खूपच वाढत चालले आहेत. याची त्याची कारणेही अनेक आहेत; पुरेशी स्पष्ट आहेत. पण नुसती कारणे लक्षात घेऊन दिसून काही उपयोग नसतो, कारण त्यावर उपाय शोधला तरच त्याची निराकरण होते. आयुष्यमान वाढले म्हणून पिढ्याही वाढल्या. नातवंडेच काय, पण पतवंडेदेखील आपण पाहतो. पण आई-वडिलांची काळजी किंवा सेवा कोणी करायची ? हा प्रश्न येतोच. कारण काही कुटुंबात त्यांचा मुलगा किंवा मुलगी स्वतःच 60 ते 70 किंवा 80 वर्षाचे असतात.
दोन जीव एकत्र आल्यावर सुखदायी संसार सुरू होतो. पण सर्व जबाबदाऱ्या पार पडेपर्यंत संसार गाडी उताराला लागलेली असते. दोघांची वय वाढतात एकोप्याने सर्व चालू असताना जोडप्यातील एकाच आयुष्य संपणं आणि दुसरा मागे राहणं ओघानं आलंच.
खरं तर हे निसर्गचक्रच. मागे राहणारी “ती ” असेल तर पुनर्विवाहाचा विचार तिच्या मनात सहसा येतच नाही. तिच्याकडे स्वतःचा उत्पन्नाचा स्त्रोत नसला, तर तिची कुचंबणा होते हेही खरंच. आजारी पडल्यावर, आर्थिक चंणचण निर्माण झाल्यावर तिच्यापुढे प्रश्न उभे राहतात. शिवाय कुणाकडे मोकळेपणाने व्यक्त होण्यावर मर्यादा येतात. पण तरीही मी असं पाहिलंय की, घरकाम नातवंडांचा सांभाळ, स्वयंपाकपाणी यात अशा एकाकी राहिलेल्या स्त्रिया रममान होण्याचा प्रयत्न करतात. तिच्याही जीवनात कारुण्य असतंच. पण खूपदा मुलांना आईबद्दल अधिक जवळीक वाटते. सहानुभूती असते. त्यामुळे स्त्रीला काही प्रमाणात प्रेम हे अनुभवता येतं.
मागे राहणारा ” तो ” असेल तर मात्र अडचणी अनेक पटीने जास्त असतात. पत्नी गेल्यानंतर पुरुष एकदम खचून जातात. अगदी दैनंदिन प्रत्येक बाबतीत त्याला “ती ” च्या साथीची, तिच्या सल्ल्याची, तिची मदत घेण्याची आजवर सवय झालेली असल्यामुळे किंवा असेल किंवा कदाचित स्त्रिया पुरुषांपेक्षा मनानं खंबीर अधिक खंबीर असतील…. पण विधुर वृद्धांची अवस्था सहन होत नाही आणि सांगताही येत नाही, यापेक्षा वेगळी नसते.
काही जोडप्यांना एकुलता एक मुलगा किंवा मुलगी असते, जी लग्नानंतर तिच्या सासरी किंवा मुलगा किंवा मुलगी परदेशात किंवा बाहेरगावी नोकरीसाठी असतात. अशावेळी वृद्ध दांपत्यामधील एकाची तब्येत खराब असेल तर जीवन आणखीनच खडतर बनते. कारण औषधांचा खर्च व डॉक्टरांकडे वेळेत जाणे, औषधोपचार करणे, जेवणाच्या वेळा सांभाळणे अशा अनेक गोष्टींमध्ये अडचणी निर्माण होतात.
अशाच काही वृद्ध जोडप्यांची उदाहरणं माझ्या डोळ्यापुढे आहेत. त्यांचे आयुष्य, त्यांचे अनुभव मी जवळून पाहिले आहेत. सारे कमी-अधिक प्रमाणात आर्थिक दृष्ट्या सधन, उच्चशिक्षित, नेहमी माणसांच्या सहवासात रमणारे आणि स्वतःशी समतोल राखणारे पाहीले आहेत.
पण नियतीचे फटकारे खरंच माणसांचा संसार उध्वस्त करतात, कारण उत्तम नोकरी, निवृत्त वेतन चांगलं, पत्नी सुविद्य तरीही ज्यांना आपत्य नाही किंवा ज्यांची मुलं त्यांच्याजवळ राहत नाहीत त्यांच्यासाठी उतार वयात मधुमेह, हृदयविकार सारखे मोठे आजारा असतील, एखादी किंवा दोघांपैकी एक जण अंथरुणावर खिळून असेल तर आणखीनच पंचायत होते. पुढील आयुष्याचा प्रवास हेलकावे खात, ठेचकाळत होतो, हे त्यांच्याकडे बघताना जाणवतं.
आयुष्याच्या प्रवासात जोडप्यातील एक कुणीतरी आधी जाणार हे ठरलेलं असतं किंवा वृद्धावस्था ही नैसर्गिक गोष्ट आहे ती याची मानसिक तयारी कोणी करत नाही. अभद्र कशाला बोलायचं ? म्हणून विषय टाळला जातो. परंतु वार्धक्यातलं, अगदी साठीनंतरचं एकाकी आयुष्यही अनेक जोडप्यांना अनेकदा सहन होत नाही. कारण आजकालचं इतरांचं व्यग्र जीवन !
माणसाला माणूस प्रत्यक्ष भेटत नाही. आभासी व, virtually भेटणंच जास्त होतं. त्यामुळे सहवासाची ओढ राहते. वृद्ध आणि त्यातही एकाकी माणसांकडे पाहायला खरंच फारसा वेळ नाही कुणाकडे. पण हा आताच्या तरुण पिढीचा दोष मानता येईल का ? वृद्धपिढी त्यांच्या तरुणपणी असंच वागली असू शकते. त्यासाठीच मग वृद्ध पिढीनं आपला भविष्याचा, पुढील आयुष्य कसं जगायचं, त्यासाठी आपली शारीरिक, मानसिक आर्थिक स्थिती कशी चांगली ठेवायची याचा विचार करायला हवा… नाही का?
मुळात समाजात हा एक मोठा गट आहे. त्यांचा विचार वेगळ्या दृष्टीने करण्याची गरज निर्माण झाली आहे. याची जाणीव स्वतः वृद्ध, समाज, राज्यकर्ते यापैकी कोणालाच नाही हे कटू सत्य आहे.
येणाऱ्या काळात या संख्येच्या वाढीमुळे प्रत्येकालाच आव्हानांचा सामना करावा लागणार आहे, हे जाणून घ्यायला हवे; पण म्हणजे नेमके काय करायला हवे ?
याचे कारण शोधले तर लक्षात येते की, ” वृद्ध “ घटकाचा स्वतंत्रपणे अभ्यास करणाऱ्या ” वृद्ध कल्याण शास्त्राची” माहितीच अनेकांना नाही.
शारीरिक, सामाजिक आणि मानसिक इत्यादी सर्वच बाबतीत ” वृद्ध ” हा समाजातला वेगळा घटक आहे. तो कसा आहे ? तसा का आहे ? याचा स्वतंत्रपणे विचार करण्याची आणि त्यानुसार समाजातल्या प्रत्येक घटकांने वागण्याची आवश्यकता आहे.
ही आवश्यकता वृद्धांपासून ते डॉक्टर, वकील फिजोथेरपीस्ट, सायकॉलॉजिस्ट, नर्सेस, कर सल्लागार, प्रशिक्षक या कोणालाही तेवढ्या तीव्रतेने जाणवत नाही का ?
खरे तर प्रत्येक क्षेत्रातल्या व्यक्तीचे ग्राहक “वृद्ध” गटातील आहेत; पण सेवा पुरवणाऱ्या घटकांना वयामुळे त्यांच्या शरीरात, मेंदूवर काय परिणाम होतात, समाज-मत आणि मनाचा काय संबंध आहे, याबद्दल माहिती नाही, असे वाटते.
वृद्ध वैद्यकशास्त्र तज्ञांना सुद्धा (Geriatrician) वृद्ध कल्याण शास्त्र शास्त्राची स्पष्ट आणि पुरेशी जाणीव नाही. याचा अनुभव येतो आहे.
वृद्ध कल्याण शास्त्र शारीरिक, मानसिक याचबरोबर सामाजिक परिस्थिती आणि लोकहितासाठीच्या धोरणांचा, परिणामांचाही विचार करते. हे सर्व काम करताना परस्परसंवाद आणि करूणा यासारख्या सर्व शास्त्रांत उपयुक्त असणाऱ्या कौशल्यावर वृद्धकल्याण शास्त्र लक्ष केंद्रित करते.
मानसशास्त्र, समाजशास्त्र, शरीरशास्त्र, अर्थशास्त्र अशा प्रत्येक क्षेत्रातला अभ्यास वृद्ध कल्याण शास्त्रज्ञ होऊ शकतो.
वैद्यकीय क्षेत्र, मानसशास्त्र या विषयातील तज्ञ व्यक्ती आणि मार्गदर्शनाची गरज असणारे वृद्ध यांचे प्रमाण फार व्यस्त आहे. एकूणच आपल्याकडे लोकसंख्येच्या तुलनेत डॉक्टरांचे प्रमाण खूप कमी आहे, ही गोष्ट चिंताजनक आहे. याचा विचार करतात वृद्ध कल्याण शास्त्राच्या अभ्यासामुळे सर्व क्षेत्रातल्या लोकांना मदत होऊ शकते.
सरकारी धोरणांमध्ये वृद्ध कल्याण म्हणजे बस, रेल्वे तिकिटात सवलत किंवा वृद्धाश्रमांना उभारण्यासाठी सहाय्य या प्रकारचे उपाय योजले जातात. त्यापैकी बहुतेक वेळा सवलतींचा फायदा सधन वृद्ध घेऊ शकतात. गरीब आणि ग्रामीण भागात राहणारे किंवा जे हिंडू, फिरू शकत नाहीत ज्यांना औषध घेणे परवडत नाही, हॉस्पिटलचा खर्च आवाक्या बाहेर जातो आहे, यांच्यासाठी त्यांच्यासाठी काही नियोजनबद्ध उपाय सुचवले जात नाहीत.
पूर्ण भारतात अशा प्रकारचे शिक्षण अत्यंत मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहे. टाटा इन्स्टिट्यूट आणि तुरळक इतर तुरळक विद्यापीठे फक्त पदविका अभ्यासक्रम घेतात वृद्ध कल्याण संदर्भात जागरूकता निर्माण व्हावी म्हणून “आपल्यासाठी आपणच ” आणि “आनंद स्वर” ज्येष्ठांसाठी ही दोन पुस्तके नक्की वाचायला हरकत नाही.
वृद्धांच्या अनेक शारीरिक आणि मानसिक समस्या आपण थोडक्यात पाहिल्या. होमिओपॅथी उपचार पद्धती निश्चितपणे वृद्धांच्या समस्येवरती मात करू शकते.
या औषध उपचारामुळे ते गुणवत्तापूर्ण आयुष्य जगू शकतात. समस्या योग्य रीतीने हाताळू शकतात आणि आणि त्यांची दैनंदिन कार्ये, त्यांची स्वतःची मानसिक, शारीरिक स्थिती उत्तम राहून कार्यक्षम राहू शकतात म्हणजे एका अर्थाने ” विनविन सिच्युएशन आहे “.
डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ) HHF, ICR Kolhapur,
चैतन्य होमिओपॅथीक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4, HDFC बॅंकेजवळ,
शाहुपुरी व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123
रविवारी बंद
कृपया पुढील लेख वाचा —–
The “International Day of Older Persons” was recently observed on October 1. According to the World Bank and UN Population, in the next 23 years after 2023, individuals in India will live an average of 75 years, while the number of children in families will decrease drastically.
The impact of all these on the elderly is serious and requires the study of ” Elderly Welfare Science” .
Gerontology is the scientific study of aging processes and problems from Biological, Medical, Legal, Psychological, Sociological, Economic and Political perspectives.
We will see some events that are easily experienced around us now.
There is a care taker for the grandmother in the house. He says that he asks the same questions like his grandmother. It is said that even if you give food, you don’t give food, and even if you drink tea, you don’t drink it. Caretaker gets angry, then grandma also stops me because I don’t want to take care.
How to bring another ?
And if another comes, how sure will it last ?
Physiotherapy is indispensable after Hip joint surgery. When the physiotherapist comes home and starts the exercises, the grandfather cries out because of the pain. The next time he comes, he turns his head and lies down. They are not ready to exercise. There is no automatic improvement. Then new problems begin.
If an elderly person notices that forgetfulness, not recognizing people, not knowing directions, is a constant problem, he should inquire for an appointment with a psychiatrist, if he does not get an appointment immediately. Until then, the question is how to do it. Physicians have 40 – 40 numbers. He doesn’t remember enough to tell the old man what’s going on until he gets his number. Even doctors are not well informed.
All these cases have two things in common, that the patient is elderly and the person serving or advising may not be able to understand why this is happening. Both of these things happen because the elderly are a separate and distinct group. It has some limitations of its own. There are problems. There are some scientific reasons behind it. And the main thing is ignorance at all levels or in simple words ignorance!
The old age is approaching, beware; It’s definitely time to say that!
Currently, the thing that can be felt around us, in the city or even in the village, is the number of old people! There is a lot of increase in it and at the same time one more thing is noticed which is that the joint family system is rapidly decreasing!
Not only in the city, but now even in the villages, the joint family system does not seem to be effective. When the family gets separated, the question of taking care of the elderly arises. Currently these questions are increasing a lot. There are many reasons for this; are clear enough. But just looking at the causes is of no use, because it is solved only by finding a solution.
As life expectancy increased, generations also increased. We see not only grandchildren, but also great-grandfathers. But who cares or serves the parents? This question comes. Because in some families their son or daughter themselves are 60 to 70 or 80 years old.
When two lives come together, a happy life begins. But until all the responsibilities are fulfilled, the world is in a downward spiral. As both of them grow older, while everything is going on in harmony, one life in the couple ends and the other stays behind.
In fact, this is a natural cycle. If “She” is left behind, the thought of remarriage does not usually cross her mind. It is true that if she does not have her own source of income, she becomes depressed. When she gets sick, when financial crisis arises, questions arise before her. Moreover, there are limits to one’s freedom of expression. But still I have seen that such lonely women try to be happy in housework, taking care of grandchildren, cooking water. She also has compassion in her life. But often children feel closer to their mothers. There is sympathy. Therefore, a woman can experience some degree of love.
But if it is “He” who stays behind, the difficulties are many times more. After the wife leaves, men are very tired. It is because he is or has always been accustomed to seek “She’s” companionship, her advice, her help in every day-to-day matter, or perhaps women are stronger in mind than men…. But the condition of the old widower is unbearable and cannot be said to be different.
Some couples have an only son or daughter, who after her marriage, at In-laws place or son or daughter is abroad or out of town for a job. In such a case, if one of the elderly couple is in poor health, life becomes even more difficult, miserable. Because the cost of medicines and going to the doctor on time, taking medicine, maintaining meal times, etc., create problems in many things.
Examples of such elderly couples are before my eyes. I have seen their life, their experiences closely. All are seen to be more or less financially prosperous, highly educated, always enjoying the company of people and maintaining balance with themselves.
But the rebuke of destiny really destroys people’s lives, because those who have a good job, a good pension, a good wife, but who do not have an emergency or who do not have children living with them, will have major diseases like diabetes, heart disease at a later age, even more so if one or both of them are bedridden. There was a Problem to handle situation. Looking at them, it is felt that the journey of the next life is going through hell.
No one mentally prepares for the fact that one of the couple is destined to go first in the journey of life or that old age is a natural thing. Why talk rude? So the topic is avoided. But the lonely life in old age, even after marriage, is often unbearable for many couples. Because of the busy life of others these days!
Man does not meet man in person. Meeting virtually is more. Therefore, the attraction of association remains. No one really has much time to look after old and lonely people. But can this be considered the fault of the young generation ? The older generation may have behaved the same way in their youth. That’s why the older generation should think about their future, how to live their next life, how to keep their physical, mental and financial condition in good condition… Isn’t it?
What about the Elderly?
Basically this is a big group in the society. There is a need to think about them in a different way. It is a bitter truth that none of the elders, the society, the rulers are aware of this.
It should be known that everyone will have to face challenges due to the increase in this number in the coming time; But what exactly should be done?
The reason for this is that many people are not aware of the “Elderly Welfare Science” which studies the “Elderly” component separately.
“Elderly” is a distinct element in the society in all Physical, Social and Mental aspects. how is he Why is that ? It needs to be thought of separately and each section of the society should act accordingly.
Doesn’t this requirement feel so acutely from the Elderly to Doctors, Lawyers, Physiotherapists, Psychologists, Nurses, Tax advisors, Coaches?
In fact, consumers in every sector belong to the ” Elderly” group; But service providers feel that they are not aware of the effects of age on their bodies, brains, and the relationship between society and mind.
Even Geriatricians do not have a clear and adequate understanding of Geriatrics . It is experienced.
In this background, an attempt has been made to give a very brief introduction to Elderly Welfare . At the same time , Homoeopathy is definitely effective in all these diseases.
Elderly welfare science considers Physical, Mental as well as social conditions and policies and outcomes for public welfare . While doing all this, geriatrics focuses on skills that are useful in all sciences, such as interaction and kindness.
Studies in any field such as Psychology, Sociology, Physiology, Economics can become an Geriatric Welfare Scientist .
The number of experts in the medical field, psychology and the elderly in need of guidance is very busy. Overall we have a very low proportion of doctors compared to the population, which is alarming. It is thought that the study of Elder Welfare Science can help people in all walks of life.
Government policies include measures for the welfare of the Elderly, such as concessions on bus and train tickets or assistance in setting up old age homes. Most of the time the rich elderly can take advantage of the discounts. For those living in poor and rural areas or those who are Hindus, unable to walk, unable to afford medicine, hospital expenses are out of reach, no planned solutions are suggested for them.
This type of education is very limited in India as a whole. Tata institutes and few other universities conduct only degree courses to create awareness about elderly welfare , “आपल्यासाठी आपणच ” आणि ” आनंद स्वर ” are definitely two books for senior citizens to read.
We have briefly seen many Physical and Mental problems of the elderly. Homoeopathy Treatment can definitely overcome the problem of old age.
With Homoeopathic Treatment they can live a quality life. Able to deal with problems properly and perform their daily tasks, their own mental, physical well-being and remain functional is in a sense a “win-win situation”.
Dr Ajay Hanmane
M.D.(Hom)HHF,ICR Kolhapur,
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4, Near HDFC Bank,
Bhaskar Plaza Vyapari Peth,
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
Mobile No. 7738667123
Sunday Closed.
Please Read Next Article–