परदेशातून सुट्टीसाठी आलेली विमल, तिच्या आईला दाखवायला घेऊन आली. ते वर्ष होतं 2019. आईच्या ब्लाऊजवर तिला रक्ताचे डाग दिसले होते.आईला विचारलं तेव्हा कळलं की, स्तनाग्रातून 2 ते 3 महिने रक्त येत होते. पण काहीच त्रास होत नाही म्हणून आईने कोणाला सांगितलं नव्हते. पूर्ण तपासणीअंती स्तनाच्या कर्करोगाचं निदान झालं. तो पहिल्याच पातळीचा (स्टेज वन)चा होता आणि पूर्ण उपचारा नंतर ती ठणठणीत आहे. गेली पाच वर्ष उत्तम जीवन जगत आहे. असे कितीतरी रुग्ण माझ्या पाहण्यात आहेत जे लवकर निदान झाल्यामुळे स्तनांच्या कर्करोगाच्या उपचारानंतर दहा ते पंधरा वर्षानंतर देखील आनंदाने आयुष्य जगत आहेत.
दहा वर्षापूर्वी मिस सोनाली यांना तपासलं होतं.एका नामांकित रुग्णालयातच ती काम करत होती. त्यावेळी ती मलेरियासाठी दुसऱ्या रुग्णालयात दाखल झाली होती. तेव्हा तिने डॉक्टरांना सांगितले की, तिला एका काखेत गाठ जाणवत आहे. आवश्यक चाचण्या केल्यानंतर ती स्तनाच्या कर्करोगाची गाठ असल्याचे समोर आलं. तिला त्रास होत नव्हता म्हणून तिनं तिच्या कामाच्या ठिकाणी कुठल्याही डॉक्टरला दाखवलं नव्हतं. स्तनाचा छोटा भाग काखेत असतो आणि त्यात सुद्धा कर्करोग होऊ शकतो.
अलीकडेच तीन चार रुग्ण असे बघायला मिळाले, ज्यांच्या ” स्तनांमध्ये पू झाला आहे ” अशी त्यांची तक्रार होती. त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना प्रतिजैविक (अँटिबायोटिक्स) औषधे देऊन झाली होती. तरी (इन्फेक्शन)जंतुसंसर्ग आटोक्यात येईना म्हणून त्या माझ्याकडे आल्या होत्या. स्तन संपूर्ण लाल झाले आहेत आणि खूप सूज आली आहे हे दिसत होतं. आणखी वेळ न घालवता तपासण्या करून घेतल्यावर या स्त्रिला “इन्फ्लमेंटरी” स्तन कर्करोगाचे निदान झालं.
या प्रकारचे कर्करोग खूप वेगानं वाढतात. कुठे गाठ आहे, हे हाताला लागतच नाही. सध्या केमोथेरेपी हेच त्यावर उत्तर आहे. नंतर शस्त्रक्रिया करता येते. मात्र प्रत्येक वेळी लाल झालेले आणि सूज असलेले स्तन म्हणजे ” इन्फेक्शन ” असं समजणं चुकीचं आहे.
औषधोपचारानंतर ही जंतुसंसर्ग बरा होत नसेल तर नक्कीच स्तन चिकित्सकाचा त्वरित सल्ला घेणं गरजेचं आहे. हे ” इन्फ्लमेंटरी ” स्तन कर्करोग खूप कमी प्रमाणात दिसतात, परंतु फारच धोकादायक असतात. म्हणून जागरूक राहायला हवं.
एक तरुण स्त्री-पेशंट जेव्हा माझ्याकडे आली तेव्हा तिला बाळ होऊन दीड वर्ष झालं होतं. तिने बाळाला स्तन्यपान करणे थांबवलं होतं, कारण बाळ झाल्यानंतर दोन-तीन महिन्यातच तिला उजव्या स्थानात गाठ जाणवत होती. पण घरचे सगळे म्हणाले की, ” दुधाची गाठ असेल, नको लक्ष देऊ. स्तन्यपान बंद केल्यानंतर ही गाठ जाईल.” पण स्तन्यपान बंद केल्यानंतर ही ती गाठ जाईना तेव्हा ती फॅमिली डॉक्टरकडे गेली होती.
मी जेव्हा तिला तपासलं तेव्हा, उजवा हात तिला उचलता येईना. संपूर्ण तपासणी केल्यानंतर तिला कर्करोग आहे आणि तो काखेत पसरला हे लक्षात आलं. जसे ” इन्फ्लमेंटरी ” कर्करोग धोकादायक असतात. तसेच गरोदरपणात आणि बाळाला स्तन्यपान करताना होणारे कर्करोग ही धोकादायक असू शकतात. तेव्हा कुठल्याही गाठीचे निदान तातडीने होणे अतिशय आवश्यक आहे.
एका अस्थिरोग तज्ञाकडे माझा एक पेशंट गेला होता. ती त्यांच्याकडे पाठदुखीसाठी गेली होती आणि औषध देऊनही फायदा होत नव्हता.तपासण्या केल्यावर समजलं की, त्या पेशंटच्या स्तनाचा कर्करोग मणक्यामध्ये पसरला आहे. (Bone Metastasis) ही तिच्या कर्करोगाची खूपच पुढची अवस्था होती. 25 वर्षाच्या त्या पेशंटला स्तनांचा कर्करोग झाला. तिचे स्तन वाचवून शस्त्रक्रिया करण्यात आली. केमोथेरेपी पूर्ण घेतली होती. त्याचबरोबर तिने होमिओपॅथिक औषधे देखील सुरू ठेवली होती. दोन-तीन वर्षानंतर लग्न झालं. सगळं छान चाललं होतं. पण वयाच्या तीस वर्षानंतरही तिला मूल होईना म्हणून तिने कोणालाही न सांगता मूल होण्यासाठी उपचार सुरू केले. या उपचारात हार्मोन्सचा वापर केला जाऊ शकतो. तिच्यावर त्याचा परिणाम झाला आणि कर्करोग परत होऊन (Relapse) लिव्हर आणि फुफुसात पसरला.
काही वेळेला केमोथेरपी किंवा शस्त्रक्रिया केल्यानंतर देखील कर्करोग आटोक्यात येत नाही, अशा वेळेला होमिओपॅथी निश्चितपणे उपयोगी पडू शकते. होमिओपॅथिक औषध उपचारांमध्ये अशी औषधे आहेत की जे कर्करोगाचा वेग आटोक्यात आणू शकतात. तसेच एकदा आटोक्यात आलेला कर्करोग पूर्ण बरा करण्याच्या दृष्टीने होमिओपॅथीमध्ये निश्चितपणे औषध उपचार आहेत. काही वेळेस कर्करोग शरीरामध्ये भरपूर प्रमाणात पसरला असेल किंवा अंतिम टप्प्यांमध्ये कर्करोगाचा रुग्ण असेल तर त्यांचे वेदना, त्रास कमी करून पेशंटच जगणं, जीवन सुसह्य करता येतं.
म्हणजे त्यांना व्यवस्थित भूक लागायला लागते, त्यांच्या अंगातील प्रतिकारशक्ती वाढत जाते, त्यांच्या गाठी किंवा जखम असेल तर ती भरून यायला सुरू होते, हळूहळू, स्टेप बाय स्टेप त्यांच्या शरीराचे स्वास्थ्य सुधारत जातं.
पूर्ण आरोग्य प्रदान करण्याच्या दृष्टीने होमिओपॅथी मध्ये लक्षण समूहांचा साकल्ल्याने विचार करून मूळ कारणांवर उपचार केले जातात तेही कुठल्याही दुष्परिणामशिवाय.
होमिओपॅथिक उपचारांमुळे हाताश रुग्णांना दिलासा मिळतो. त्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक करून ते नॉर्मल, एवढेच नव्हे तर निश्चित,आनंदी आयुष्य जगू शकतील, असा यशस्वी प्रयत्न केला जातो.
पूर्ण विश्वासाने आणि नियमितपणे औषध सुरू ठेवली तर पॉझिटिव्ह रिझल्ट नक्कीच मिळतात.
देशामध्ये स्तन कर्करोगाचं प्रमाण वाढत चाललं आहे. स्त्रियांना होणाऱ्या कर्करोगांमध्ये सर्वाधिक प्रमाण स्तन-कर्करोगाचं आहे. दरवर्षी भारतात दोन लाखापेक्षा अधिक स्तनांच्या कर्करोगाचे नवीन रुग्ण सापडतात आणि त्या 30℅ रुग्ण 40 वर्षाच्या खालच्या वयाचे असतात.
अजूनही आपल्याकडे कर्करोगाच्या ॲडव्हान्स्ड स्टेज मधल्या रुग्ण स्त्रिया अधिक प्रमाणात दिसतात. तसंच भारतात दिसणारे स्तन कर्करोग हे झपाट्याने वाढणारे असू शकतात.
यात लक्षात घेण्यासारखा मुद्दा हा आहे की, यातल्या बहुतेक स्त्रियांना आपल्या स्तनांमध्ये गाठ आहे हे माहीत असतं. पण त्रास होत नाही म्हणून त्या कोणत्याही डॉक्टरला दाखवत नाहीत. मग गाठ मोठी होत जाते. स्तनातील सर्वच गाठी कर्करोगाच्या नसतात. परंतु संपूर्ण तपासणीनंतर गाठ कशाची आहे याचे निदान होणं महत्त्वाचं असतं.
अशावेळी जास्त वाट न बघता ताबडतोब डॉक्टरांना दाखवायला हवं आणि चाचण्या करायला हव्यात.
साधारणपणे प्रथम डॉक्टरांकडून तपासणी (क्लीनिकल एक्झामिनेशन), मग मेमोग्राफी आणि नंतर बायोप्सी या पद्धतीने निदान केलं जातं (ट्रिपल असेसमेंट).
कर्करोग म्हटल्यावर त्या रोगाचं रुग्णाचं आणि कुटुंबीयांचे मनोबल खच्ची होतं. मलाच का ? …..याचं दुःख.
पुढच्या तपासण्या, उपचार, केस गळणे, उलट्या होणं, वजन कमी होणं, केमोथेरेपी यांची भीती वाटते. खर्च आपल्यामुळे कुटुंबाला त्रास होतोय, हे सर्व चित्र डोळ्यासमोर येऊन स्त्रिया हातबल होतात.
पण हाच महत्त्वाचा टप्पा असतो. तुम्ही सकारात्मक राहून, धीरानं उपचार घेतले तर मानसिक त्रास कमी होईल. परिणामी उपचारांचा अधिक चांगला परिणाम होऊ शकेल हे लक्षात ठेवायला हवं. प्रत्येक रुग्णासाठी उपचार वेगवेगळ्या असतात त्यात शस्त्रक्रिया,केमोथेरपी, रेडिएशन, हार्मोन थेरपी असू शकते.त्याचबरोबर होमिओपॅथिक उपचार देखील तुम्हाला चांगल्या प्रकारे मदत करू शकतात.
कर्करोग प्राथमिक अवस्थेत लक्षात आला तर, अनेक रुग्णांमध्ये स्तन काढायची गरज लागत नाही. स्तन कसे वाचवता येईल याचा यावर डॉक्टरांचा भर असतो.
कधी कधी गाठ मोठी असेल तर आधी केमोथेरेपी देऊन गाठ लहान झाल्यानंतर मग स्तन वाचवल जातं.
तसंच उत्तम ” ब्रेस्ट री कन्स्ट्रक्शन ” ही करता येतं. ही शस्त्रक्रिया म्हणजे कर्करोगाच्या शस्त्रक्रिया बरोबरच प्लास्टिक सर्जरी करून स्तनाची गोलाई पुर्ववत करणं. यात बऱ्याच प्रकारच्या शस्त्रक्रिया करता येतात. याला ” लोकल फ्लॅप ” असे म्हटले जाते.
या शस्त्रक्रियेमुळे स्त्रीत्वाची भावना जपता येते. या उपचाराबरोबर आणि उपचारानंतर देखील होमिओपॅथिक उपचार पद्धती चालू ठेवणं अत्यंत गरजेचे आहे कारण ही चालू ठेवल्यामुळे रिकरन्स परत गाठ उद्भवणे किंवा तो कर्करोग इतरत्र पसरणे या गोष्टीला निश्चितपणे अटकाव होऊ शकतो.
केमोथेरपी चालू असताना होमिओपॅथिक औषध उपचारांचा इतका चांगला परिणाम होतो की, पेशंटला केमोथेरपीचे साईड इफेक्ट्स तसेच उपचार घेताना होणारा त्रास बऱ्याच अंशी कमी होतो. त्याचबरोबर कर्करोगासारखा आजार वाढण्याचे, पसरण्याचे प्रमाण देखील कमी होतं.
कर्करोगाच्या उपचारानंतर होमिओपॅथिक औषध काही वर्ष निदान तीन ते पाच वर्षापर्यंत चालू ठेवणे गरजेचे आहे. कारण तोपर्यंत जर तुम्हाला कोणताच त्रास झाला नाही किंवा कर्करोगाची गाठ परत उद्भवली नाही तर तुम्ही पूर्णपणे बरे झाला असे मेडिकल शास्त्रानुसार म्हणता येईल.
शस्त्रक्रियेनंतर पूर्ण स्तन काढायला लागले तरी त्यावर उपाय आहेत.” ब्रेस्ट प्राॅस्थेसिस” ” फ्लॅप सर्जरी “, “ब्रेस्ट इम्प्लन्ट “ आदी गोष्टींचा यात समावेश होतो.
सगळ्यात महत्त्वाचं की, आपल्याला स्तनामध्ये गाठ आहे हे लवकरात लवकर लक्षात यायला हवं. हल्ली असं दिसू लागलं आहे की, अनेक स्त्रिया गाठ 1 ते 2 सेंटीमीटर असेल तेव्हा येतात. त्यापैकी जवळपास सर्व प्रकरणात त्यांचं निदान आणि उपचार होऊन स्तन आणि आयुष्य दोन्ही निश्चित वाचवता येतं.
गाठ आहे किंवा स्तनाग्रामधून रक्तस्त्राव होतोय हे लवकर समजण्यासाठी स्तनाची स्व-तपासणी म्हणजेच ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन (बीएसई) शिकून घेऊन ती नियमित करणे आवश्यक आहे. इंटरनेटवर सुद्धा ही तपासणी कशी करायची याची पूर्ण माहिती उपलब्ध आहे.
ही स्व-तपासणी प्रत्येक स्त्रीने वयाच्या 18 वर्षापासून आयुष्यभर करायला हवी. महिन्यातून ही तपासणी एकदाच करायची असते. त्यासाठी पाच मिनिटे द्यायला हवीत. ती स्वतः करायची कशी हे ते शिकून घ्या आणि आजूबाजूंच्या स्त्रियांनाही ” बीएसई “कशी करायची ते शिकवा.
कोणत्याही कर्करोगाचे उपचार खर्चिक असतात, त्यामुळे प्रत्येकानं आपल्याला योग्य ठरेल असा वैद्यकीय विमा जरूर घ्यायलाच हवा.
ऑक्टोबर महिना स्तनांच्या कर्करोगाबद्दल जनजागृती करण्यासाठीचा मानला जातो.
यानिमित्ताने सांगायचा मुद्दा हाच की, स्तनांच्या बाबतीतल्या कोणत्याही समस्येकडे दुर्लक्ष करू नका.
लक्षणे जाणवली तर दुर्लक्ष न करता थेट जाऊन ब्रेस्ट-सोनोग्राफी करा म्हणजे काही करणं गरजेचं आहे किंवा नाही ते तरी तुम्हाला समजेल.
मला काही होत नाहीये तर मी कशाला डॉक्टरांकडे जाऊ? असं करू नका.
तुमच्या समस्येचं कारण शोधा. स्तनांच्या सर्व समस्यांवर डॉक्टरांचा सल्ला घ्या. कर्करोग लवकर लक्षात येऊन पूर्ण उपचार झाले, तर होमिओपॅथिक उपचाराने तुम्ही पूर्ण बऱ्या होऊ शकता.
स्तनांच्या समस्यांबद्दल जागरूक व्हा आणि सकारात्मक राहून होमिओपॅथिक उपचार घेऊन उत्तम आयुष्य जगा !
डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ) HHF, ICR Kolhapur,
चैतन्य होम्योपैथिक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4
शाहुपुरी व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123
रविवारी बंद
कृपया पुढील लेख वाचा —
Vimal, who had come for a holiday from abroad, brought her mother to show her. The year was 2019. She saw blood stains on the mother’s blouse. When the mother asked, she came to know that the nipple was bleeding for 2 to 3 months. But mother did not tell anyone because there was no problem. After a thorough examination, a diagnosis of Breast Cancer was made. It was stage one and after complete treatment, she is stiff. Living a good life for the last five years. I have seen many patients who are living happily even ten to fifteen years after breast cancer treatment due to early diagnosis.
Miss Sonali was examined ten years ago. She was working in a reputed hospital. At that time she was admitted to another hospital for malaria. Then she told the doctor that she was feeling a lump in one of her armpits. After the necessary tests, it was revealed that it was a breast cancer Tumor. As she was not suffering, she did not see any doctor at her work place. The small part of the breast is in the armpit and can also get cancer.
Recently, three or four patients were seen who complained of “pus in the breasts” . His doctor had given him antibiotics . However, she came to me because the infection was not under control. The breasts were red and very swollen . Without further without wasting time investigated, the woman was diagnosed with “Inflammatory” Breast Cancer .
This type of Cancer grows very fast. It does not matter where the knot is. Chemotherapy is currently the answer. Then surgery can be done. However , it is wrong to think that red and swollen breasts mean “Infection”.
If the infection does not get better after medication, it is definitely necessary to consult a breast doctor immediately. These ” inflammatory “ breast cancers are rare, but very dangerous. So you have to be aware.
When a young female patient came to me, she had given birth for a year and a half. She had stopped breastfeeding the baby because she felt a lump in the right side just two-three months after the baby was born. But everyone in the house said, “There will be lump of milk, don’t pay attention. After stopping breastfeeding, this lump will go away.” But after stopping breastfeeding, when the lump did not go away, she went to the family doctor.
When I checked her, she could not lift her right arm. After a thorough examination, it was discovered that she had cancer and it had spread to her armpit. As “Inflammatory” cancers are dangerous. Cancers that occur during pregnancy and breastfeeding can also be dangerous. It is very important to diagnose any tumor immediately.
A patient of mine went to an Orthopedic Doctor. She had gone to them for back pain and medication was not helping. On examination, it was found that the patient’s breast Cancer had spread to the spine. (Bone Metastasis) was a very advanced stage of her Cancer. The 25-year-old patient developed Breast Cancer . She underwent breast saving surgery. Chemotherapy was completed. At the same time, she also continued to take Homoeopathic Medicines. After two-three years, the marriage took place. Everything was going well. But even after the age of thirty, she was unable to have a child, so she started fertility treatment without telling anyone. Hormones can be used in this treatment. She was affected and the Cancer relapsed and spread to her liver and lungs.
Sometimes Homoeopathy can definitely help when Cancer does not go away even after chemotherapy or surgery. Homoeopathic medicines that can slow the progression of cancer. Also, Homoeopathy definitely has drug treatments to cure Cancer once it is under control. Sometimes, if the Cancer has spread extensively in the body or if there is a Cancer patient in the final stages, the patient’s life can be made bearable by reducing their pain and suffering.
That is, they start to have proper appetite, their immunity increases, their tumors or wounds, if any, begin to heal, gradually, step by step, their body health improves.
In order to provide complete health, Homoeopathy treats the root causes by treating symptom clusters without any side effects.
Homoeopathic treatment brings relief to desperate patients. A successful attempt is made to make their outlook on life positive so that they can live a normal, not just a normal, but a certain, happy life.
If the medicine is continued with full faith and regularly, positive results are sure to come.
The incidence of Breast Cancer is increasing in the country. Breast Cancer is the most common type of cancer in women. Every year more than two lakh new cases of breast cancer are diagnosed in India and 30℅ of them are below 40 years of age.
We still see more women in advanced stage of cancer. Also, Breast Cancer in India may be on the rise.
The point to note is that most of these women are aware that they have a lump in their breasts. But they don’t see any doctor as they don’t feel any pain. Then the tumor becomes bigger. Not all breast lumps are cancerous. But it is important to diagnose what the tumor is after a thorough examination.
In such a case, one should immediately see the doctor without waiting and get the tests done.
Diagnosis is usually made by a doctor first ( clinical examination), then mammography and then biopsy (triple assessment).
When cancer is mentioned, the morale of the patient and the family of that disease is depressed. why me ? …..sadness of this.
Fear of further tests, treatments, hair loss, vomiting, weight loss, chemotherapy. The family is suffering because of the expenses, all these pictures come before the eyes and women become weak.
But this is the important stage. If you stay positive and take the treatment patiently, the mental suffering will decrease. It should be kept in mind that the resulting treatment may have a better effect. Treatment is different for each patient and may include surgery, chemotherapy, radiation, hormone therapy. Homoeopathic treatment can also help you better.
If the cancer is detected at an early stage, many patients do not need a mastectomy. Doctors focus on how to save the breast.
Sometimes, if the tumor is large, the breast can be saved after the tumor is reduced by giving chemotherapy first.
Also a good “Breast Reconstruction” can be done. This surgery is to improve the roundness of the breast by performing plastic surgery along with cancer surgery . Many types of surgeries can be performed in it. This is called a “local flap” . The feeling of femininity can be preserved due to this surgery. It is very important to continue the Homoeopathic treatment along with and after this treatment as this can definitely stop the recurrence or spread of the cancer .
Homeopathic medicine treatment is so effective during chemotherapy that the side effects of chemotherapy as well as the pain during the treatment are reduced to a large extent. At the same time, the rate of growth and spread of diseases like cancer is also reduced.
Homoeopathic medicine should be continued for at least three to five years after cancer treatment. Because by that time if you do not have any problem or the cancerous tumor does not reoccur, then according to medical science it can be said that you are completely cured.
Even if it is a complete mastectomy after surgery, there are solutions. These include “Breast Prosthesis”, “Flap Surgery”, “Breast Implant” .
Most importantly, you should notice a lump in the breast as soon as possible. Now it seems that many women come when the lump is 1 to 2 cm. In almost all of these cases, their diagnosis and treatment can definitely save both breast and life.
Breast self-examination (BSE) should be learned and performed regularly in order to know early whether there is a lump or nipple bleeding. Complete information on how to do this check is also available on the internet.
This self-examination should be done by every woman from the age of 18 throughout her life. This check should be done once in a month. Five minutes should be given for it. Learn how to do it yourself and teach the women around you how to do “BSE” .
Treatment for any cancer is expensive, so everyone should have a medical insurance that is right for them.
The month of October is considered to raise awareness about Breast Cancer
The point to be made is that do not ignore any Breast Problem.
If you feel the symptoms, do not ignore and go straight for breast-sonography so that you will know if something needs to be done or not.
Why should I go to the doctor if nothing is wrong with me ? Don’t do that.
Find the cause of your problem . Consult a doctor for all breast problems. If the cancer is detected early and treated completely, you can be completely cured with Homoeopathic Treatment.
Be aware of breast problems and live a better life with Homoeopathic Treatment by staying positive!
Dr Ajay Hanmane
M.D.(Homeo)HHF,ICR Kolhapur,
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4,
Bhaskar Plaza Vyapari Peth,
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
Mobile No. 7738667123
Sunday Closed.
Please Read Next Article-