“मासिक पाळी म्हणजे स्त्रियांसाठी दर महिन्याला न चुकता येणारा शरीर धर्म.
पौगंडावस्थेतल्या पहिल्या किंवा ऋतुमती (Menarche) होण्यापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत-मेन्यापॉज (Menopause) 35 ते 40 वर्ष पाळीचं ‘दुखणं’ बायका वागवत असतात.
‘दुखणं यासाठी कारण, आजच्या 21व्या शतकातही पाळीकडे उघडउघड किंवा पुढारलेपणाचा बुरखा पांघरत ‘विटाळ‘ म्हणून बघण्याची बहुसंख्य लोकांची मानसिकता शाबूत आहे.
त्यामुळे स्त्रीच्या कामेछेत, तसंच त्या जोडप्याच्या कामजीवनात कसे अडथळे निर्माण होतात ?, यावर चर्चा होणं अनिवार्य ठरतं. पण हा विषय “कामा” च्या अंगानं नाही, तर स्त्रियांच्या थेट आयुष्याशी, आरोग्याशी, मानसिकतेशी निगडित असल्याने महत्त्वाचा ठरतो.
स्त्रियांच्या मासिक पाळीचा कोणताही त्रास असेल, तर त्याचा मोठा परिणाम त्यांच्या एकूण कामजीवनावर (Sex-Life) होत असतो. त्यामुळे स्त्रियांची मासिक पाळी हा ‘विटाळाचा’ विषय न ठेवता, गरज भासेल तिथे उपचार (होमिओपॅथिक) घेणे आवश्यक ठरतं.
“हेवी पिरियड्स” ची पाळीच्या दरम्यान अतिरक्तस्त्राव (Metrorrhagia) ची समस्या घेऊन बायका आपल्याकडे (चैतन्य क्लिनिक मध्ये) आलेल्या एका जोडप्याविषयी अनुभव कथन करत आहे. दोन पाळींमध्ये कमी अंतर असणं, पाळी अनेक दिवस टिकणं, तसेच तीव्र रक्तस्त्राव अशी या स्त्रीची समस्या होती. त्यामुळे गेल्या सहा महिन्यात त्यांच्यात एकदाही शरीरसंबंध आला नव्हता. या जोडप्यांनं होमिओपॅथिक उपचार घेतल्याने त्या स्त्रीची पाळी नियमित झाली तसेच त्यांचं कामजीवन ही सुधारलं.
पण डॉक्टरांपर्यंत न पोहोचणाऱ्या हजारो स्त्रिया असतील, ज्यांना वैद्यकीय मदतीची, होमिओपॅथिक औषधांची गरज आहे.
‘पाळी’ हे बाईला मिळालेलं ‘दुखणं आहे आणि हा त्रास प्रत्येक बायांना निमूटपणे सहज करायचा असतो, यासारखे समज खोडून काढण्याची नितांत आवश्यकता आहे.
‘पाळीचं चक्र’ हे सरासरी 28 दिवसांचं असून प्रत्येक स्त्रीगणिक यात पाच ते सहा दिवसांची तफावत असू शकते. पण हे चक्र अनियमित होऊन पाळी लवकरात लवकर यायला लागते आणि त्याला तीव्र रक्तस्त्रावाची जोड मिळते तेव्हा त्या स्त्रीची गाठ ॲनिमिया या रक्तक्षयाशी पडते. “पाळीच्या दरम्यान तीव्र रक्तस्त्राची तक्रार घेऊन येणाऱ्या स्त्रियांमध्ये बऱ्याचदा, त्या पतीला शरीरसुख देऊ शकत नाहीत याचीच बोच असते”.
या स्त्रियांमध्ये हमखास दिसणारे लक्षण म्हणजे, “तीव्र स्वरूपाचा थकवा, अपुरी झोप, केस गळती आणि विसरभोळेपणा.”
आपल्या देशात 20 टक्क्यांपेक्षा कमी स्त्रियांना स्वतःचं हिमोग्लोबिन माहिती असेल.
रक्तक्षयामुळे जेव्हा जगण्यातलाच रस आटत चाललेला असतो, अशा बाईला शरीर संबंधांमध्ये किती रस असेल ? त्यामुळे मग पतीच्या दबावामुळे ती नाईलाजास्तव शय्यासोबत करते किंवा शक्य असेल तर शरीर संबंधच टाळते.
पाळी आणि कामेच्छातील चढ-उतार यांचा परस्पर संबंध आहे. संकोच आणि हार्मोन्सची कमी झालेली पातळी त्यामुळे स्त्रीला पाळीच्या दरम्यान कामेच्छा कमी होते.
पण नंतर “इस्ट्रोजन” (Estrogen) हे हार्मोन वाढत जातं, तशी कामेच्छेतही वाढ होत जाते. पुढच्या पंधरवड्यात ‘ओव्हूलेशन’ पर्यंत (Ovulation स्त्रीबीज परिपक्व) होईपर्यंत कामेच्छा वाढत जाते तर पाळीनंतर साधारण तीन आठवड्यानंतर पुढील पाळीचे वेध सुरू होतात आणि कामेच्छा कमीत कमी होत जाते.
पाळीमुळे होणाऱ्या पोटदुखी, कंबर दुखी, मूड स्विंग्स (Mood Swings) यामुळे कामेच्छा कमी असते असा समज असला, तरी प्रत्यक्ष पाळी दरम्यान शरीर संबंध ठेवावेत का ? यावर मतमतांतर आहेत.
बऱ्याच पुस्तकांमध्ये पाळी सुरू असताना संभोग करू नये आणि “पाळी चालू असताना स्त्रीला शिवू नये” असं पूर्वी मानत असत.
आयुर्वेदातही ऋतूकाळात संभोग वर्ज मानलं आहे.
मात्र पाळी सुरू असताना संभोग केल्यास स्त्रीला किंवा पुरुषाला कोणताही त्रास होत नाही.
पाळीच्या दरम्यान संबंध ठेवायचे की नाही याचा निर्णय त्या स्त्रीवर सोपवायला हवा, असे डॉक्टर विठ्ठल प्रभू लिखित “संपूर्ण कामविज्ञान” या पुस्तकात विशद करण्यात आलं आहे.
“मासिक पाळी दरम्यान संभोग केल्यामुळे कोणताही आजार उद्भवत नाही. तरीही स्त्रीला पाळीच्या दरम्यान संभोग आवडत नसेल तर अजिबात करू नये. पोटदुखी, स्त्राव अस्वस्थता या कारणांमुळे स्त्रीला अशा काळात शरीर संबंध पसंत नसतो. पाळी दरम्यान संबंध ठेवायचे असल्यास जंतुसंसर्ग होऊ नये याची खबरदारी घ्यायलाच हवी. पण पाळीच्या दरम्यान ‘संबंध’ ठेवले तर चालू शकतात. पण जोडीदारांपैकी एकाला कुठलाही लैंगिक आजार असल्यास त्याचा दुसऱ्याला संसर्ग होण्याची शक्यता या काळात अधिक असते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या काळात समागम करताना पुरुषांनी कंडोम वा निरोध वापरायलाच हवा.”
पाळीच्या वेळी होणारी पोटदुखी, कंबरदुखी समागमामुळे खरच कमी होऊ शकते का ? तर , “Period of Sex:- Exploring the depths of desire during your cycle ” या पुस्तकात नमूद करण्यात आलंय की, ‘एनडॉर्फिन‘ (Endorphin) हे न्यूरो-केमिकल नैसर्गिक वेदनाशामकाचं काम करते. शरीरसंबंधाच्या दरम्यान ‘एनडॉर्फिन‘ स्त्रवत असल्याने पाळी दरम्यान भेडसावणाऱ्या अंगदुखीवर आराम मिळू शकतो. समागमातील शारीरिक हालचाली आणि भावनावेगामुळे स्नायू मोकळे होण्यास मदत होते. ह्यात ओटीपोट आणि योनीमार्गाचाही समावेश असतो. त्यामुळे पाळी दरम्यान पेटके (Cramps) येण्याची समस्या असेल तर, त्याची तीव्रता कमी होऊ शकते. ‘ ‘संबंध‘ दरम्यान जननेंद्रियांना रक्तपुरवठा अधिक होत असल्याने पाळीचा त्रास कमी होण्यास मदत होते. पाळीमुळे केवळ शारीरिक नाही तर संप्रेरकांच्या पातळीतील बदलांमुळे मानसिक स्थित्यंतरांनाही स्त्रियांना सामोरे जावं लागतं. या ‘मूड स्विंग्स’ वरही पाळीतील समागम हा उपाय ठरू शकतो. याचे कारण संबंधादरम्यान ‘ऑक्सिटोसीन'(Oxytocin) हे ‘लव हार्मोन’ देखील स्त्रवत असतं.
थोडक्यात, पाळीच्या दरम्यान येणारा मानसिक थकवा, ताण हा यामुळे दूर होण्यास मदत होते असा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे.
40 च्या आसपास असणाऱ्या अनेक स्त्रियांना पाळीच्या समस्या भेडसावायला लागतात.
पाळीच्या समस्यांसाठी आलेल्या चाळीशीच्या स्त्रियांना, नवऱ्याबरोबर शेवटचा संबंध केव्हा आला होता ? असं विचारल्यावर “तसं तर आता आमच्यात काहीच राहिलं नाही आहे ?” असं अगदी सहज सांगतात. निरामय कामजीवन हे वैवाहिक नात्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतात हे स्त्रियांनाही समजून घ्यायला हवं.
पाळीच्या समस्यांमधील कारणांचा उलगडा करायचं झाल्यास पॉलिसीस्टिक ओव्हेरियन डिसीज (पीसीओडी) तसेच वाढलेले वजन ही कारणे बऱ्याचदा पाळीच्या समस्यांना कारणीभूत ठरतात.
रुग्णांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याचं आढळून आले आहे. पाळीच्या समस्यांमध्ये तीव्र रक्तस्त्राव वेदना याबरोबरच, भावनिक आंदोलनांसारखी मानसिक लक्षणे असतात याचा थेट परिणाम कामजीवनावर होतो.
बऱ्याचदा पाळीच्या समस्या या लग्नाआधीपासून असतात. पण काही झालं तरी शक्यतो डॉक्टरकडे जायचंच नाही, होईल तोवर दुखणं अंगावर काढायचं, अशी अनेक स्त्रियांची मानसिकता असते. हार्मोनशी संबंधित गोळ्या घेऊ नयेत असा समज असल्यामुळे उपचार घेण्याचे टाळलं जातं.
वास्तविक पाळीच्या समस्यांवर वेळीच उपचार घेणार उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असतं.
40 च्या आसपास पाळी अनियमित झाली तर, ही रजोनिवृत्तीपर्यंत लक्षणे असतील, असा परस्पर निष्कर्षावर न येता, पाळी चाळिशीच्या सुरुवातीला गेली तर या स्थितीला प्रीमॅच्युअर मेनपॉज (Premature Menopause) म्हणतात.
रजोनिवृत्तीचे सरासरी वय हे 48 -49 आहे. 40 च्या सुरुवातीलाच पाळी गेली, तर त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. तसेच हाड ठिसूळ होण्याचे शक्यता असते.
त्यामुळे कोणत्याही वयात, पाळीच्या समस्यांचं योग्य निदान आणि उपचार आवश्यक ठरतात.
पाळी नंतर साधारण दोन आठवड्यांनी “ओव्हूलेशनची” (Ovulation) प्रक्रिया होते. त्यामुळे ‘पाळीदरम्यान संबंध ठेवल्यास गर्भधारणा राहत नाही’, असा समज असला तरी, ठराविक परिस्थितीमध्ये गर्भधारणा राहू शकते असं ‘ Sex During Period ‘ या पुस्तकात नोंदवण्यात आले आहे.
पाळीच्या समस्यांवरील उपचाराविषयी सांगायचे झाल्यास, पाळीच्या समस्येचे योग्य निदान करणं गरजेचं असतं. काही वेळा सोनोग्राफी करून गर्भाशयात काही समस्या नाही आहे ना, हे तपासावं लागतं. सध्या उपचारांनी औषध उपचारांनी गर्भनिरोधक गोळ्यांनी पाळीचं चक्र नियमित करता येतं पण ते तात्कालीक राहू शकतं.
बऱ्याचदा ग्रामीण भागात, ‘पाळी दरम्यान त्रास होतोय’ या एका कारणामुळे अगदी पंचवीशी-तिशीतच गर्भाशय काढून टाकण्याच्या घटना सुरू आहेत, हे अत्यंत चुकीचे आहे.
लग्न झाल्यावर सुरुवातीला गर्भधारणा राहण्याची किंवा राहत नसल्याची चिंता असल्याने स्त्रियांना कामजीवनाचा आनंद घेता येत नाही. तर पस्तीशीनंतर कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण झाल्यानंतर सहजीवनावर लक्ष द्यायची त्यांची इच्छा असते. अशावेळी पाळीच्या समस्या उद्भवल्यास मनस्ताप होतो. तो टाळण्यासाठी वेळीच होमिओपॅथिक उपचार घ्यायला हवेत.
पाळीमध्ये समस्या असतील तर आरोग्याची घडी विस्कटल्याची शरीरांनं दिलेली ती एक सूचना आहे, हे स्त्रियांनी समजून घ्यायला हवं.
तसेच, पाळीमधलं कामजीवन हा आजही काळा पुढचा विषय भासत असला तरी याची सुरुवात पाळीला सकारात्मकपणे स्वीकारण्यातून होऊ शकते.
पाळीच्या कोणत्याही समस्यांसाठी दुर्लक्ष न करता होमिओपॅथिक उपचार घेतल्यास स्त्रियांची कामजीवनातली “अडचण ” पूर्णपणे नाहीशी होऊन सुखी कामजीवनातील समाधान अनुभवता येऊ शकते.
डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ) HHF, ICR Kolhapur,
चैतन्य होम्योपैथिक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4
शाहुपुरी व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123
रविवारी बंद
कृपया पुढील लेख वाचा —
” Menstruation is an indispensable body ritual for Women every month .
From the first period of Adolescence or Menarche to Menopause , Women are dealing with period ‘ Pain’ (दुखणं)for 35 to 40 years.
The reason for the Pain is that even in today’s 21st century, the Mentality of the majority of people is intact to look at Menstruation as ‘ Depraved ‘(विटाळ), covering it with a veil of openness or superiority.
Therefore, it becomes mandatory to discuss how obstacles arise in the Sex-Life of the woman, as well as in the Sex-Life of the couple . But this topic is important not because of “Sex” , but because it is directly related to Women’s Life, Health and Mentality.
If there is any problem in Women’s Menstrual Cycle, it has a major impact on their overall Sex-Life. Therefore, it is necessary to take treatment (Homoeopathic) wherever necessary, without keeping the Menstrual Cycle of women as a depraved ‘(विटाळ‘) subject.
Narrating the experience of a couple who came to us (at the Chaitanya Homoeopathic Clinic) with the wife suffering from Metrorrhagia during ” Heavy Periods” . The problem of this woman was short interval between two periods, periods lasting for several days and heavy bleeding. Therefore, they had not had intercourse even once in the last six months. After the couple took Homoeopathic treatment, the Woman’s periods became regular and her Sex-Life improved.
But there will be thousands of Women who do not reach Doctors, who need Medical help, Homoeopathic Treatment .
There is an urgent need to dispel the notion that ‘ Menstruation’ is a Woman’s ‘ Pain ‘ and every woman has to tolerate it without complaint.
The ‘ Menstrual Cycle’ is on average 28 days and every Woman can have a difference of five to six days . But when this cycle becomes irregular and Menstruation starts early and it is accompanied by heavy bleeding, the woman suffers from Anemia . ” Often, women who complain of heavy Menstrual bleeding, Fear that They cannot give pleasure to their husbands”.
The typical symptoms in these Women are, ” extreme fatigue, insufficient sleep, hair loss and forgetfulness. ”
Less than 20 % of Women in our country know their hemoglobin.
How much will such a Woman be interested in Sexual relations when she is losing interest in life due to anemia ?
Therefore, due to the pressure of her husband, she does have Sex with him or if possible avoids physical contact.
But then as the Hormone “Estrogen” increases, so does the libido. Libido increases in the next fortnight until ‘ Ovulation’ (the female Ovum matures), then about three weeks after the Period , the next Period begins and the Libido diminishes to a minimum.
Although it is believed that the Libido is low due to abdominal pain, waist pain, Mood Swings, due to Menstruation, should we have intercourse during the actual period ? There are differences of opinion on this.
Many books used to say that, intercourse should not be done while Menstruating and ” a woman should not be Touch while Menstruating” .
Even in Ayurveda, Sexual intercourse during the period is considered taboo.
However, intercourse during Menstruation does not cause any problem to either the woman or the man.
It has been explained in the book “Sampoorna Kama Vidnyana” “संपूर्ण कामविज्ञान” written by Dr. Vitthal Prabhu that, the decision whether to have Sex during Menstruation or not should be left to the woman .
“Sexual intercourse during Menstruation does not cause any disease. However, if a woman does not like Sexual intercourse during Menstruation, it should not be done at all. Because of abdominal pain, discharge discomfort, a woman does not like physical intercourse during such periods.
If intercourse is to be done during Menstruation, care must be taken to avoid infection. But if one of the partners has any Sexually Transmitted disease, the chance of infecting the other is more during this period. Therefore, as a precautionary measure, men should use condoms or abstinence during Sexual intercourse during this period.”
Abdominal pain during Menstruation , lower back pain can really be reduced by intercourse ? So, in the book ” Period of Sex:- Exploring the depths of desire during your cycle” it is mentioned that ‘ Endorphin ‘ works as a Neuro-Chemical natural pain reliever . As ‘ Endorphins ‘ are released during sexual intercourse, body pain experienced during Menstruation can be relieved. Physical activity and Emotional stimulation during intercourse help loosen the muscles. It also includes the abdomen and vagina . So if you have a problem with cramps during your period , its intensity can be reduced. As the blood supply to the genitals increases during intercourse , it helps in reducing Menstrual pain. Menstruation is not only physical but also Mental changes due to changes in Hormone levels. Menstrual intercourse can be a remedy for these ‘ Mood Swings’ as well. The reason for this is that ‘ Oxytocin’, the ‘ Love Hormone’ is also released during intercourse.
In short, it is claimed in this book that it helps to get rid of Mental fatigue and Stress during Menstruation .
Many Women around the age of 40 face Menstrual Problems.
Women in their forties who come for Menstrual Problems, when was the last time they had sex with their husbands ? When asked , “So now there is nothing left between us ?” They say that very ease & casually. Women also need to understand that Sex-Life plays an important role in Marital relationship.
When it comes to figuring out the causes of Menstrual problems , Polycystic Ovarian Disease (PCOD) and weight gain are the most common causes of Menstrual problems.
A high prevalence of Obesity has been observed in patients. Menstrual problems have Psychological symptoms like Emotional agitation along with severe bleeding pain which directly affects Sex Life .
Often, Menstrual problems are present before Marriage. But even if something happens, many Women have the mindset that they don’t have to go to the Doctor , but take the pain out if possible. Treatment is avoided due to the belief that Hormone-related pills should not be taken .
Timely treatment of real Menstrual problems is essential for good health.
If Menses become irregular around 40, without the mutual conclusion that these symptoms will last until Menopause , if menses begin in early forties, this condition is called Premature Menopause .
The average age of Menopause is 48-49. Menopause in the early 40s can increase the risk of Heart Disease. Also there is a possibility of Bone Brittleness- Osteoporosis.
Hence, at any age, proper diagnosis and treatment of Menstrual Problems is essential .
About two weeks after the Period , the process of ” Ovulation ” occurs. Therefore, although there is a belief that ‘ Sex during period does not result in Pregnancy’ , it has been recorded in the book ” Sex During Period “ that pregnancy can occur in certain circumstances.
If we talk about the treatment of Menstrual problems, it is necessary to properly diagnose the problem of Menstruation . Sometimes sonography has to be done to check if there is any problem in the uterus. At present, the Menstrual cycle can be regularized with medical treatment, birth control pills, but it can be temporary.
Often in rural areas, cases of Hysterectomies even in twenty-five-thirties for the sole reason of ‘ Menstrual Discomfort’ are very wrong.
After getting married, women are not able to enjoy working life because of the worry of getting pregnant or not . But after Thirty- Five they want to focus on cohabitation after family responsibilities are completed. In such a case, if there is a Menstrual problem, it causes Mental Anguish. Homoeopathic Treatment should be taken on time to avoid it.
Women should understand that if there are problems in Menstruation , it is a signal given by the body that the cycle of Health is Disturbed .
Also, although working life during Menstruation may still seem like a dark topic, it can start with a positive acceptance of Menstruation.
If Homoeopathic Treatment is taken regardless of any Menstrual problems, women can experience the Satisfaction of a Happy Sex-Life by completely eliminating the “Difficulty”(अडचण ) in Sex-Life.
Dr Ajay Hanmane
M.D.(Homeo)HHF, ICR Kolhapur,
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4,
Bhaskar Plaza Vyapari Peth,
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
Mobile No. 7738667123
Sunday Closed.
Please Read Next Article–
ReplyForward
|