” बंटी फोन शिवाय ऐकतच नाही ! “/ “Bunty doesn’t listen without a Phone!”

Dorctor Pic By Dr. Ajay HanmaneNovember 4, 2023 Behaviour problems Children Problems Homeopathic and Cure Mental Health

” बंटी फोन शिवाय ऐकतच नाही ! “

 

मी मॉलमध्ये मित्रासोबत पिक्चर बघायला गेलो होतो. तो तिकीट घेऊन येईपर्यंत एकटाच बसलो होतो. नेहमीप्रमाणे रिकाम्या वेळाच काय करायचे याचा विचार करत होतो. अशा वेळेस आजूबाजूची माणसं डोक्याला मजेदार खुराक पुरवतात. मी या विचारात असतानाच मागून लहान मुलाचा जोरदार रागावलेला आवाज आला. मी आवाजाच्या दिशेने वळालो.

 

ऐसपई सोफ्यावर बसलेले एक पाच सहा वर्षाचे मुल हात पाय झाडून जोर-जोरात रडत होतं आणि त्याची आई त्याला काहीतरी समजवण्याचा प्रयत्न करत होती. मुलगा काही केलं ऐकत नव्हता. पण तणतण करणाऱ्या मुलाला समजवण्याचा आणि शांत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आईची असहायता स्पष्टपणे दिसत होती. पण संपूर्ण देह-बोलीतून आणि आवाजाच्या पोतावरून सहज दिसत होतं की, समजूतीच्या गोष्टी आई सांगण्याचा प्रयत्न करत होती.

 

तेवढ्यात मुलाचे वडील काहीतरी चमचमीत खाणं घेऊन तेथे आले. मुलाचा अवतार बघून त्यांनी फक्त शीतपेयाचा पेला त्याच्यापुढे केला. मुलांन अजून जोरात ओरडून त्यावर हात मारला आणि ते पेय आणता सांडता वाचलं. आता बाबा मुलाला एक जोरदार फटका मारणार अशी चिन्ह दिसत असतानाच आईने पुन्हा एकदा समजून तिच्या स्वरात काहीतरी सांगितलं. यावेळी सूचना वडिलांना होती. पलीकडे बसलेल्या मोठ्या मुलीकडे बोट दाखवत आईने स्वतःची बॅग उघडली आणि एक गुलाबी रंगाचा आयपॅड मुलाच्या हातात दिलं. पलीकडे बसलेल्या ताईप्रमाणे मलाही माझ्या करमणुकीचा स्क्रीन हवा म्हणून सुरू असलेला तो तमाशा एका क्षणात थांबला आणि सगळीकडे शांतता पसरली.

 

थोड्यावेळाने मुलगा स्क्रीन मध्ये गुंतलेला असतानाच आईने त्याला खाणं भरवलं. स्वतःही चार घास पोटात ढकलले आणि स्वतःचा फोन उघडला. वडील तेच करत शेजारी बसले होते. आता घरातले चौघे आपापल्या स्क्रीन कडे बघत होते.

 

नवीन उद्घाटन झालेल्या या मॉलच्या नक्षीदार सजविलेल्या भिंती, छतावरचे पाकळ्यांच्या आकाराचे दिवे, बसण्यासाठी ठेवलेले वैशिष्ट्यपूर्ण लाकडी बैठक व्यवस्था आणि खुर्च्या, विविध चित्र मूर्ती आणि भलीमोठ्या काचेच्या भिंतीतून दिसणारी रहदारीची वर्दळ, आजूबाजूला खेळणारी मुलं, मॉलमधील गाण्यांचा कार्यक्रम, दंगा अशा अनेक गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्षित करून ही चौघं आपापल्या जगात दंग होती.

जरा अधिक शोधक नजरेने पाहिल्यावर लक्षात आलं की, अशी अनेक कुटुंब माझ्या आजूबाजूला दिसत होती.

 

स्क्रीनच्या प्रेमळ मिठीत सतत राहणारी मुलं नेहमीच आणि सगळीकडे दिसतात. अगदी लग्न समारंभात सुद्धा पळापळ करत खेळणारी मुलं कमीच. कोंडाळ करून आपापल्या स्क्रीनकडे बघणारी मुलं समारंभात आणि हाउसिंग सोसायटीच्या बागांमध्ये सुद्धा असतात“करोनामुळे अगदी हाताबाहेर गेलय सगळं…..” असे सांगणारे पालक  मला रोज भेटतात.

खरं सांगायचं तर , करोना आणि त्यानिमित्ताने झालेला झालेली ऑनलाइन शाळा, हे आधीपासूनच हाताबाहेर जाणाऱ्या त्रासाला असलेलं अजून एक निमित्त ठरलं.

 

“मोबाईलवर कार्टून लावलं नाही, तर हा जेवतच नाही,” हे अगदी एक वर्षाच्या बाळाबद्दलची लाडिक कौतुकमिश्रित तक्रार मी गेली दहा-पंधरा वर्ष वाढत्या प्रमाणात ऐकतो आहे “.

 

साधारणपणे 2010 च्या आसपास इंटरनेटला किंवा लॅपटॉपला सहज जोडलं जाणार “टॅब्लेट” नामक उपकरण सहज मिळायला लागलं, तेव्हा शाळेत जाणाऱ्या मुलांना ‘अभ्यासात मदत’ आणि ‘थोडं मनोरंजन’ म्हणून हे खेळणं मिळालं. ही पिढी आता वीस-पंचवीस वर्षांची झाली आहे आणि अन्नाचे पहिले घास स्क्रीनच्या साक्षीने घेतलेली बाळं आता दहावीत पोहोचत आहेत.

 

कुठलातरी चाळा सतत लागणं, हे काही मुलांसाठी नवीन नाही. एका जागी शांत बसायचा कमालीचा कंटाळा आणि सतत काहीतरी मजेदार, लक्षवेधक गोष्ट शोधणं, हा लहान आणि तरुण मेंदूचा गुण आहे आणि तो लक्षावधी वर्षापासून आहे.

 

फोन, टॅब्लेट, त्यापूर्वी टीव्ही, कॅसेट प्लेयर, व्हिडिओ, पुस्तक आणि आता त्याआधी सुद्धा काहीतरी मजेदार खेळणं हातात घेऊन मुलांनी लहानपण काढलं आहे. पण आत्ताच एवढा मोठा नवीन काय प्रश्न निर्माण झाला आहे ?

 

स्वतःच्या कुटुंबातल्या आणि स्वतः आजूबाजूच्या व्यक्तींशी बोलणं संवाद साधनं, मैत्री करणं, खेळणं, हा माणूस बनण्याचा महत्त्वाचा टप्पा आहे.

 

आजूबाजूच्या प्रत्यक्ष जगाची स्वतःला जोडून घेणे आणि सतत निर्माण होणाऱ्या शंका आणि प्रश्न सोडविण्यासाठी लागणाऱ्या विविध युक्त्या शिकणं, हा जन्मभराचा उद्योग आहे. लहानपणी आणि तरुणपणी हा उद्योग प्रचंड भरान सुरू असतो (आणि असा असायला हवा !).

 

घरात बसून राहणार, पटकन डोळ्याला डोळा न भिडवणार, लोकांना टाळणारं मूल हे काळजीच कारण असतं. आपल्या हातांचा वापर करून विविध कृती करणं, अन्नापासून यंत्रापर्यंतच्या वस्तू बनवणे, आणि लिखाणापासून संगीतापर्यंत सर्जनशीलतेचे प्रयत्न करणं, हा आपल्या हातांचा, मेंदूचा उपयोग, आपल्याला इतर प्राण्यांपासून वेगळं ठरवतो.

 

स्क्रीन आपल्याला या दोन महत्त्वाच्या मानवी गुणांपासून झपाट्याने दूर नेतो आहे, हे आपलं खरं दुखणं आहे. तरीही घरातील किंवा सभोवतालची माणसं नकोशी होणं किंवा त्याच्याशी फक्त जरुरीच्या कामापुरते संबंध ठेवणे हे फार कौतुकास्पद नसलं तरी भयंकर प्रकार आहे असं नाही ?.

पण स्क्रीन वेगळं काय करतोय?

 

संपूर्ण जगभरात पसरलेल्या लोकांनी तुमची करमणूक करण्याचा विडा उचललेला आहे !

खाण्याचे पदार्थ बनविण्यापासून अगदी कागदी वस्तूंपर्यंत, दूर दूर प्रवास करण्यापासून नुसतं घरात फिरण्यापर्यंत, संगीतापासून नृत्यापर्यंत, हत्यारांपासून हस्ताक्षरांपर्यंत, बातम्यांमधून निसर्गापर्यंत आणि शृंगारापासून समाधी पर्यंत, जे हवं ते, जेंव्हा हवं तेंव्हा आणि जितकं हवं तितकं.

 

आता तुमच्या हातातल्या उपक्रमामध्ये 24 तास उपलब्ध आहे. तुम्ही जितका जास्त वेळ बघाल तितका त्या बनविण्याचा उदो उदो होतो. आणि जाहिरातींचे पैसे मिळतात. त्यामुळे जास्त चमकदार आणि चमत्कृत्तीपूर्ण व्हिडिओ बनत राहतात आणि तुम्हाला धरून ठेवतात.

 

मेंदू हा कोणत्याही गोष्टीचा सराव करून घेणारा अवयव असल्याने त्याला थोड्यावेळाने / दिवसांनी कंटाळा येतो आणि तो अजून जास्त काहीतरी मागतो. निवांत, बिनकामाचे क्षण त्याला सहनच होत नाहीत. दैनंदिन कामं आणि अभ्यास कमालीचा कंटाळावांना वाटायला लागतो. त्यामुळे तो टाळला जातो.

 

आपण हे चुकीचे उद्योग करतो आहे, याची थोड्या मोठ्या झालेल्या मुलांना स्वतःची जाणीव असते. अगदी स्पष्ट जाणीव असते. पण सतत नवं आणि मनोरंजन मागणाऱ्या मेंदूपुढे त्यांच्या इच्छाशक्तीचा सपशेल पराभव होतो.

 

सतत याच चक्रात अडकलेल्या इतर मुलांबरोबर त्यांचं जमतं. त्यामुळे या पलीकडे जग असतं, वेगळी माणसं / मुलं असतात त्याचं भान सुटून जातं. एक आभासी जगात मुलं पूर्णपणे हरवून जातात. त्यातून बाहेर काढायला बाहेर यायला ठाम नकार देतात.

 

करमणूक ही एक सकारात्मक भावना आहे. तिची गरज आहेच, यात शंका नाही. पण सतत करमणूक झाल्यामुळे नैसर्गिक नकारात्मक आणि मनाप्रमाणे न होणाऱ्या गोष्टी सहन करण्याची तसेच प्रमाणाच्या आतले नकारातले अनुभव पचवण्याची ताकद आणि सवय कमी होते. हा सततच्या करमणुकीचा परिणाम आहे, असं विश्लेषक मानतात. याचा पालकांनी जरूर खोलवर विचार केला पाहिजे.

 

हे सर्व चालू असताना आरोग्य आणि शिक्षण या दोन महत्त्वाच्या गोष्टींची आबाळ चालू होते आणि आयुष्यभर सुरू राहते. तूर्त आपल्या मुलांना यापासून कसं वाचवायचं यावर लक्ष केंद्रित होणं जरुरी आहे.

 

अगदी लहान बाळांपासून प्रत्येकाच्या हातात सतत फोन दिसणं, आता आपण गृहीत धरले आहे. सारखी स्वतःची करमणूक करून घेण्याची सवय, स्क्रीनच्या रूपाने हातीत विसावते आणि आयुष्यभर पाठ सोडत नाही यात फक्त ” काय करणार ? काळ बदललाय ” असं म्हणून किंवा फोन हातात दिल्याशिवाय आमचा बंटी ऐकतच नाही ! अशा लाडीक तक्रारी करून ही काही उपयोग होणार नाही.

मुल लहान असल्यापासूनच पालकांनी काही गोष्टींची जाणीवपूर्वक सवय लावली तर मोठेपणीही ते स्क्रीनचा वापर योग्य प्रमाणात करण्याची शक्यता वाढेल.

 

कळीचा मुद्दा म्हणजे व्यसन लागू नये यासाठी प्रथम काळजी घ्यायला पाहिजे.

 

तीन वर्षाच्या वयापर्यंत मुलांना स्क्रीन हातात न देणे हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे.  अगदी जेवताना सुद्धा नाही !!!

लाखो वर्ष, माणसाची मुलं इकडे तिकडे बघत, काऊ-चिऊच्या गोष्टी ऐकत,हे जेवण करत आहेत. त्यासाठी छोट्या मुलांना भरवणं हे “पटकन संपवणं” या गटातलं काम नसून ” यज्ञकर्म “ आहे याची पुन्हा एकदा जाणीव होणं गरजेचं आहे. शिवाय हा नियम घरात सर्वांना लागू पडतो. फक्त बाळाला नाही !

 

अभ्यासाच्या नावाखाली मुलांसमोर स्क्रीन ठेवून देणे आणि मुलं काहीतरी बघत बसली आहेत, यालाच अभ्यास म्हणणं बंद करावा लागेल.

 

बहुतेक मुलांना अभ्यास करताना सोबत लागते. शेजारी कुणी असेल तर धीर सुटत नाही आणि छोट्या अडचणी जिथल्या तिथे सुटल्या तर एकाग्रता टिकून राहते.

याच मुलांना अगदी लहानपणापासून अनुभव येणं ही चांगली सवय आहे.

 

लहान मुलांचा स्क्रीनचा वापर जवळपास 100% फक्त करमणुकीसाठी असतो. मुलं माहिती पूर्ण व्हिडिओ बघत असतील तरी ते करमणूक याच गटात येतं.

 

त्यामुळे इतर सर्व करमणुकीचा बळी देऊन फक्त स्क्रीन एवढं एकच माध्यम करमणुकीसाठी वापराण्यावर चाप लावायला लागतो.

अभ्यास, शारीरिक खेळ, व्यायाम, कला घरातलं काम हे सर्व व्यवस्थित पार पडल्यानंतरच 30 मिनिटांसाठी स्क्रीन हा करमणुकीसाठी वापरता येईल, अशी शिस्त वयाच्या तीन ते चार वर्षांपासूनच कटाक्षाने लावावी लागते.

 

घरातल्या सर्व प्रौढ आणि वयस्कर मंडळींना याचा सतत भान ठेवून मुलांना मदत करावी लागते डोळ्यादेखत आदर्श निर्माण करावा लागतो.
शाळेतून आल्यावर सर्व काम संपवून जेवणाच्या आधी थोडा वेळ करमणुकीसाठी स्क्रीन ही सवय खूप सोयीची आहे.
रात्रीच्या जेवणानंतर आवरावर, थोडा अभ्यास, गप्पाटप्पा आणि मग झोपण्याची वेळ ही रात्रीची सवय सुद्धा महत्त्वाची.

 

कोणत्याही परिस्थितीत स्क्रीन हा मुलांचा बरोबर झोपायचा सोबती म्हणून बिछान्यात शिरणार नाही हा नियम हवा म्हणजे रात्रीची झोप तर व्यवस्थित, आरोग्यपूर्ण होईलच.

शिवाय सकाळी डोळे उघडतात हातात परत स्क्रीन येणार नाही.

 

शाळा, शिकवणी या ठिकाणी पालकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन ई-मेल आणि व्हाट्सअपवर अभ्यास पाठवणं बंद करण्यासाठी दबाव आणण्याची वेळ आलेली आहे.
कामाचा  निरोप पालकांच्या फोनवर यावेत आणि शाळा किंवा अभ्यासाच्या निमित्ताने मुलांच्या हातात हे उपकरण पडणार नाही याची काळजी घेण्यासाठी शाळांवर हा दबाव गरजेचा आहे.
जागतिक साथीपूर्वी याच शाळा आणि शिकवण्या तंत्रज्ञान खूप कमी वापरत होत्या. याचं भान पुन्हा एकदा आणून देणे हे पालक-शिक्षक गटाचे महत्त्वाचे काम आहे.

 

सगळं काही WhatsApp वर पाठवून द्यायचं, मग पालक आणि मुलं आपापले बघून घेतील हे बंद होणे गरजेचे आहे.

“गेमिंग आणि फक्त आभासी जगात निर्माण होणाऱ्या नात्यांच्या जोरावर जगण्याचा प्रयत्न करणं “, हे दोन मोठे विषय, मोठ्या मुला-मुलींमध्ये निर्माण होत आहेत. बारा वर्षाच्या पर्यंतच्या मुलांची नीट समजुतीने आणि निॻहाने काळजी घेतल्यास ती मोठी होताना असे गंभीर प्रश्न निर्माण होणार नाहीत ,अशी आशा आणि विश्वास आहे.

 

मोबाईलच्या वापरामुळे मुलांच्या मानसिकतेत प्रचंड बदल झाले आहेत. त्यांच्या वर्तणुकीमध्ये आक्रसताळेपणा, हट्टीपणा, चिडचिडपणा, आक्रमकपणा, पालकांचे न ऐकणे, उलट बोलणे इत्यादीचे प्रमाण खूप वाढले आहे.

त्यांच्या स्क्रीन टाईम मध्ये, कार्टूनमध्ये जी आक्रमकता दाखविले जाते त्यामुळे त्यांची संवेदनशीलता कमी होऊन आक्रमकपणा अतिचंचलता, संयमीपणा कमी होऊन विध्वंसक वॄत्ती वाढीस लागली आहे.

नकारात्मक गोष्टी सहन न होणे आणि मनाप्रमाणे न होणाऱ्या गोष्टी पचवण्याची ताकद आणि सवयी कमी होत चालली आहे. या अशा अनेक प्रकारच्या मुलांच्या तक्रारीवरती होमिओपॅथी अत्यंत उपयोगी अशी उपचार पद्धती आहे.

होमिओपॅथिक चिकित्सा शास्त्रानुसार अशा मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करून निवडण्यात आलेले प्राकृतिक औषध या मुलांच्या वृत्तीमध्ये बदल घडवून आणते आणि व्यक्तिमत्त्वात निश्चित सुधारणा होते.

होमिओपॅथिक उपचार पद्धतीमुळे, प्रत्यक्ष जगात घट्टपणे पाय रोवून खऱ्या नात्यांची आणि कौशल्यांची मूळ खोलवर वाढवून आभासी जगात सहज संचार करता येईल व त्याचा योग्य तो पुरेपूर लाभ मिळवता येईल अशी मानसिकता होमिओपॅथिक औषधांमुळे निर्माण होणे शक्य आहे. आणि पालकांना त्यांच्या निकोप वाढीचा आनंद घेता येऊ शकेल.

डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ) HHF,ICR Kolhapur,
चैतन्य होम्योपैथिक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4, HDFC बॅंकेजवळ,
शाहुपुरी व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123
रविवारी बंद.

 

कृपया पुढील लेख वाचा  —

——————————————

“Bunty doesn’t listen without a Phone!”

 

    I went to the mall with a friend to see a picture. He was sitting alone till he came with the ticket. As usual, I was thinking about what to do in my free time. At such times , the surrounding people provide funny doses to the head . While I was thinking this, a very angry voice of a small boy came from behind. I turned towards the sound.
    A five -six-year-old boy sitting on the sofa was crying loudly and his mother was trying to explain something to him . The boy did not listen. But the helplessness of the mother trying to explain and calm the raging child was palpable. But the whole point was easily seen from the speech and tone of voice, that the mother was trying to convey understanding .
     Just then the boy’s father came there with some sparkling food. Seeing the boy’s avatar (अवतार), he just placed a glass of cold drink in front of him. The boys shouted even louder and slapped it and spilled the drink. Now when there was a sign that the father was going to give the child a heavy blow , the mother once again said something in her understanding voice. At this time, the instructions were to the father . Pointing to the older girl (sister) sitting across from her, the mother opened her own bag and handed the child a pink iPad.
Like sister, who was sitting on the other side, I too wanted a screen for my entertainment. After a while, while the boy was engrossed in the screen, the mother fed him. sHe also pushed four grains food into her stomach and opened her own phone. Father was sitting next to him doing the same. Now the four in the house were looking at their screens .
  This newly opened mall is completely oblivious to the ornately decorated walls, petal-shaped lights on the ceiling, unique wooden seating arrangement and chairs, various pictorial sculptures and the rush of traffic, children playing around, mall song shows, riots, etc. All four were in their own world.
   Looking a little more inquisitively, I realized that there were many such families around me !!!
   Children are seen everywhere and always in the loving embrace of the screen. Even in wedding ceremonies, there are very few children who run around and play. There are also children staring at their screens at functions and in the gardens of housing societies.
    Every day I meet parents who say that “everything has gone out of hand due to Corona….” To tell you the truth, the Corona virus and the online school that was created due to it, became another excuse for the problem that was already getting out of hand.
 
  “If you don’t put a cartoon on the mobile, it won’t eat,” is the loving complaint mixed with admiration of even a one-year-old baby that I’ve been hearing more and more over the last ten-fifteen years .
 Generally around 2010, when a device called a “tablet” that could easily be connected to the internet or a laptop became readily available, school-going children got this toy as a ‘ study aid ‘ and ‘ a bit of entertainment ‘. This generation is now twenty to twenty-five years old , and babies whose first morsel of food is witnessed by the screen are now reaching their tenth grade.
     Some kids are not new to having some sort of constant activity. Boredom of sitting still and constantly looking for something fun, interesting is a trait of the young and young brain and has been for millions of years. Children have lost their childhood. But what is the big new question that has arisen just now ?
   Talking to one’s own family and surroundings, communication tools, making friends, playing, is an important stage of becoming a human being.

 

   Associating yourself with the real world around you and learning various tricks to solve the ever-present doubts and questions is a life-long enterprise. In childhood and youth, the industry is very crowded (and it should be!).
    A child who stays at home, does not make eye contact quickly, and avoids people is a cause for concern.
    The use of our hands , our brains, sets us apart from other animals, using our hands to perform a variety of activities, making things from food to machines, and to creative endeavors from writing to music.
 
   Our real pain is that the screen is rapidly taking us away from these two essential human qualities. Still, to be unwanted by the people in the house or surroundings or to associate with him only for necessary work is not very admirable, but not very terrible ? But what is the screen doing differently?
 People from all over the world are here to entertain you !
  From making food to paper goods, from traveling far and wide to just walking around the house, from music to dance, from weapons to handwriting, from news to nature and from makeup to tombs (समाधी), whatever you want, whenever you want and as much as you want. Now available 24 hours in your hand initiative.
    The longer you watch, the easier it is to make. And advertising pays. So more brilliant and miraculous videos keep on making and keep you hooked. Since the brain is an organ that gets used to anything, it gets bored after a while / days and asks for more. He can’t stand idle moments. Daily tasks and studies start to feel extremely boring. So it is avoided.
A little older children are self-aware that we are doing this wrong business. There is a very clear awareness. But their will is easily defeated by a brain that constantly demands novelty and entertainment.

 

    He gets along with other children who are constantly stuck in the same cycle. Therefore, there is a world beyond this, there are different people / children, the consciousness of it goes away. Children get completely lost in a virtual world. They refuse to come out to get out of it.
  Entertainment is a positive emotion . There is no doubt that it is needed . But constant entertainment reduces the power and habit of tolerating natural negative and unpleasant things and digesting negative experiences within the norm.
Analysts believe that this is the result of constant entertainment. Parents must think deeply about this.
     While all this is going on , health and education are the two most important things that go on and on throughout life. For now , it is important to focus on how to protect our children from this.
    We now take it for granted that phones are constantly seen in everyone’s hands, from very young babies. The habit of self-entertainment, rests in the hand in the form of a screen and does not leave the back for the rest of the life, just saying “What will you do ? Time has changed” or not listening to our bunty without handing over the phone !
    It will do no good to complain like this. If parents consciously inculcate some things in the habit of children from a young age, the chances of them using the screen appropriately will increase as well.
 The key point is to first take care not to get addicted .
The most important step is to keep children off screens until the age of threeNot even while eating !!

 

     For millions of years, the children of man have been eating this meal, looking around, listening to the stories of the cow-chiu (काऊ-चिऊच्या). For this, it is necessary to realize once again that feeding young children is not a “quick finish” (“पटकन संपवणं”) task but a “sacrifice” (” यज्ञकर्म “) . Moreover , this rule applies to everyone in the house. Not just the baby !
    Placing a screen in front of children in the name of study and children are sitting watching something, we have to stop calling it study.
   Most of the children are accompanied while studying. If there is someone around, patience is not lost and concentration is maintained if small problems are solved here and there.
   It is a good habit for these children to experience from a very young age.
   Almost 100% of children’s screen use is for entertainment. Even if kids are watching videos full of information, they fall under this category of entertainment.
    So, by sacrificing all other entertainment, only one medium like screen starts to be CONTROLLED for entertainment.
    The discipline that the screen can be used for entertainment for 30 minutes only. after the study, physical games, exercise, art work at home is done properly, should be carefully implemented from the age of three to four years.
   All the adults and elders in the house have to constantly be aware of this and help the children and create role models.
   The screen habit is very convenient after finishing all the work after school and for some entertainment before dinner.
   An hour after dinner, a little study, chat and then bedtime is also an important night habit.
    Under no circumstances should the screen enter the bed as a sleeping companion for children, so that the night’s sleep will be sound and healthy.
    Moreover , the eyes open in the morning and the screen will not return to the hands .
       Time has come for parents to take the initiative in schools and education to stop sending studies on e-mail and WhatsApp.
    This pressure is needed on schools to ensure that work messages are sent to parents’ phones and that these devices are not in the hands of children for school or study purposes.
    Before the global pandemic, these same schools and schools used technology very little. It is an important task of the parent-teacher group to bring awareness of this once again.
      Sending everything on WhatsApp, then parents and children will take care of themselves is needs to be closed.
“Gaming and trying to survive only on virtual world relationships” are two major issues that are emerging in older boys and girls. The hope is that if children up to the age of twelve are taken care of with proper understanding and care, they will not develop such serious issues as they grow up.” have faith
    Due to the use of mobile phones, there has been a huge change in the mentality of children. There is a lot of increase in their behavior like aggressiveness, stubbornness, irritability, aggressiveness, not listening to parents, talking back etc.
    In their screen time, the aggression shown in cartoons has reduced their sensitivity and increased aggression, hyperactivity, and destructive behavior.
    The strength and habit of not tolerating negative things and digesting things that do not agree with the mind is diminishing. HomOeopathy is a very useful method of treatment for these many types of children’s complaints .
HomOeopathic According to medical science, the natural medicine selected after studying the personality of such children brings about a change in the attitude of these children and there is a definite improvement in the personality.
With homOeopathic treatment , it is possible to create a mindset where real relationships and skills can be deeply & firmly rooted in the real world, and easily communicated in the virtual world and reaping the full benefits it deserves. And parents can enjoy their healing growth.

 

Dr Ajay Hanmane
M.D.(Homeo)HHF,ICR Kolhapur,
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4, Near HDFC Bank,
Bhaskar Plaza Vyapari Peth,
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
Mobile No. 7738667123
Sunday Closed.

Please Read Next Article