ऑफिसचं काम आवरून मी लिफ्टमध्ये शिरलो. त्याचवेळी नवीन ‘अपडेट’ आला म्हणून आशेने ‘डेटिंग ॲप’ उघडलं. तिचा मेसेज दिसतातच उत्कंठेने तो वाचला, “हाय ! तू खूपच चांगला आहेस. बट नॉट माय टाइप. आपण इथेच थांबू. …..”
पुढचं न वाचताच मी स्वतःवर प्रचंड वैतागलो, हताश झालो. इतके दिवस आम्ही चॅट वर गप्पा मारतोय, कितीतरी आवडीनिवडी जुळत आहेत म्हणून “लाईक्स ” देतोय तेव्हा मी “तिच्या टाईपचा” होतो. मात्र प्रत्यक्ष भेटल्यावर, माझे विरळ केस, डोक्यावर पडत चाललेले टक्कल पाहून तिला अचानक साक्षात्कार झाला की मी हिच्या टाईपचा नाही !!
“बाह्य रंगापेक्षा अंतरंग पहा” अशा शोभेच्या बोधवचनाचा “डीपी” ठेवणाऱ्या त्या ढोंगी, पाखंडी मुलीबाबतचा राग मनामध्ये काठोकाठ भरून आला.
अतिशय चरफडत मी बाईक वरून घरी चाललो, आणि नको असतानाही आरशात स्वतःच प्रतिबिंब दिसलचं.
दिवसागणिक गळणारे केस, मध्यभागी पडलेल्या टक्कल. शी !!!वयापेक्षा किती मोठा दिसतोय मी !
नोकरीच्या मुलाखतीला गेलो की, माझ्याकडे पाहून हा नापास झाला असेल बहुधा, नाहीतर ‘गॅप’ घेतली असेल, असाच ग्रह सगळे करून घेत असत. मला माझं प्रतिबिंब बघून माझ्या बाईकच्या आरशाचे तुकडे तुकडे करावेसे वाटले !!
कॉलेजच्या दुसऱ्या वर्षापासून केस गळायला सुरुवात झाली आणि तेव्हापासून “अंकल” ही उपाधी मला कायमचीच मिळाली. अधून मधून “गंजा,टकलू, ईद का चांद, चिवड्यात लाडू” असली विशेषण असतातच !!
“बाला” हा हिंदी सिनेमा तू पाहिलाच पाहिजेस, असा आगाऊ सल्लाही मिळत गेला. माझ्या गळणाऱ्या केसांवर “विनोद आणि चेष्टा करणं” हा तर मित्रांचा हक्क झाला होता.
तुझा तेलाचा,शाम्पूचा, सलूनचा, मसाजचा खर्च किती वाचत असेल ना !!!असले शेरे ऐकूवून माझ्या जखमेवर ते मीठ चोळत असत.
माझ्या वयाची मुलं झपाझप कशी स्वतःचे फोटो काढत असतात !! मला ते जीवघेणं संकट वाटतं. विरळ केसांमधला स्वतःचा चेहरा बघणं मला नकोस वाटतं.
ग्रुप फोटोत तर, मी उठून दिसतो. मग चेष्टा करायला इतरांना मोकळे रान मिळतं. आतल्या आत नुसताच उकळत राहतो !! पण मला ते धड व्यक्तही करता येत नाही.
एकही मुलगी माझ्याशी मैत्री करायला उत्सुक नाही. ऑनलाईन शोधायला गेलो तर, आत्ताच्या या मुलीसारख्या आधी गुलुगुलू गप्पा मारतात आणि टक्कल दिसल्यावर पळ काढतात.
तरी टक्कल कमीत कमी लक्षात येईल असेच फोटो शेअर करतो मी !! पण प्रत्यक्ष भेटीत नाही तर “फेसटाइम” मध्ये दिसून येतच.
“हे विरळ केस नेहमीच माझा घात करतात. जरा कुठे जुळून येते असं वाटलं तर “दुधात मीठाचा खडा पडावा तसेच सगळे फिस्कटत. नुसती मैत्री करण्यात ही टक्कल आड येतं तर लग्न करताना ती किती मोठा अडथळा निर्माण करत असेल”
या विचारांचा, किती ताण येतो ते आई-बाबांना कळत कसं नाही ?
त्यांना या गोष्टी शुल्लक वाटतात. आई म्हणते, “अरे सगळ्या मुली बाह्यरूपाला महत्त्व देणाऱ्या नसतात. मी नाही का, केस गळतात हे दिसत असूनही तुझ्या बाबांशी लग्न केलं !! तुलाही मिळतील की.” आईचा हा आशावाद मनात प्रचंड राग करून गेला.
आईला वाटतं की, “मुली जणू हिच्याच काळात आहेत.आई-वडील जो मुलगा शोधतील त्याच्या गळ्यात माळ घालतील” !!
आत्ताच्या पिढीतल्या मुली इतक्या साध्या नाहीत कुठलीही उणीव नसलेल्या मुलातही त्या उणिवा शोधून काढतात; तर टक्कल पडणाऱ्या वा टक्कल पडलेल्या मुलाशी लग्न करणे ही तर खूप लांबची गोष्ट आहे. त्यामुळे आईसारखी एखादी मुलगी “हो” म्हणण्याची आशा फारच अंधुक आहे !
म्हणजे माझ्या वाट्याला येणार कोण? विचार करायला लागलो तर नको नको ते विचार मनामध्ये घोळत राहतात.
वाटायचं की, बाबांना तरी कळेल ही व्यथा. तरुण वयात प्रचंड केस गळण्याचा त्यांनी अनुभव घेतला आहे की !!
पण त्यांना विचारलं की ते म्हणतात, ” मी या गोष्टीला कधीच महत्त्व दिलं नाही याचा त्रास कशाला करून घ्यायचा?”
बाबांचा काळ वेगळा होता. पुरुषांच्या रूपाला महत्त्व द्यायचं नाही असे मानण्याचा तो काळ !
टक्कल असूनही बाबांना लग्न होताना कसलाच अडथळा आला नाही. आता मात्र बदललंय सगळं. मला बसतात तसे चटके बाबांना कधी बसलेच नाहीत. मग कसं कळणार त्यांना मी काय बघतोय ते ?
त्यांचं आपलं नेहमीचच पालुपद – “डोक्याच्या आत काय आहे ते महत्त्वाचं. बाहेर काय आहे ते नाही.”
पण हल्लीच्या काळात बाहेरचं आधी पाहतात. बाहेरचं पाहिल्याशिवाय आत मध्ये बघतच नाहीत !! मग आत खूप असुनही उपयोग काय ?
आई सुद्धा काहीतरी उदाहरण देत असते– म्हणते, “स्टीव्ह जॉब्स, अनुपम खेर अशा कितीतरी नामवंतानां टक्कल होतं आणि आहेच की ! पण लोकांनी त्यांना त्यांचं काम लक्षात ठेवलं, टक्कल नाही !!”
आई, “ही प्रसिद्ध माणसं आहेत. एक तर त्यांना टक्कल उतारव्यात पडलं की तरुणपणी हे माहीत नाही. आणि तरुणपणी टक्कल पडलं असलं, तरी असामान्य माणसांचं कुठलंही वैगुन्य त्यांच्या असामान्यत्वाखाली झाकलं जातं पण सामान्यांचं तसं होत नाही. त्यांचं वैगुन्यच असामान्य होतं !” हे मी सांगायचं प्रयत्न करतो पण ते तिच्यापर्यंत पोहोचत नाही किंवा ते कळत नाही.
सिग्नल लागला तसा रस्त्याच्या कडेला गाडी थांबवली. तेथेच एक सलून दिसत होतं. काचेच्या पारदर्शक दरवाज्यातून आत मधल्या खुर्चीवर बसलेल्या पुरुषांचे केस तिरकस कात्री धरून नजाकतीनं कापणारे केशकर्तनकार दिसत होते.
मनातली ठुसठुसणारी जखम भळाभळा वाहू लागली.
“ये रेशमी जुल्फे……
सलून मध्ये लावलेल्या हिंदी गाण्याची सूर मला इथपर्यंत ऐकू येत होते. ते कानांवर पडू लागले आणि सलूनच्या आत बसलेल्या पुरुषांमध्ये मला मीच दिसायला लागलो. मला आवडतो तसं “मेसी” हेअरकट करून मी बाहेर पडलोय आणि माझी प्रियसी माझ्या मऊ दाट केसांमधून हात फिरवून ते अजूनच विस्कटून टाकतेय……..!!!
‘पी– पी– पी–पी’ पाठच्या गाड्यांचे कर्कश हॉर्न वाजायला लागले. तसा मी भानावर आलो. ग्रीन सिग्नलनं माझ्या सुंदर स्वप्नाचा चुरडा केला होता.
ऑफिसमध्ये असताना कामाच्या गडबडीत नको ते विचार मनाच्या तळाशी ढकलले जातात. पण जरा कुठे एकटेपणा मिळाला की, भात्यातल्या बाणांसारखं सपकन वरून येऊन खुपतात. त्यांचं टोचणे असह्य होतं.
मी बाईक चालू केली घर जवळ येऊ लागलं. बिल्डिंगपाशी पोहोचताना एक भिकारी समोर आला.
अस्वच्छ…ओंगळ… पण केस मात्र भरघोस !! काय दैवगती आहे !! ज्याला निगा राखता येत नाही, त्याला भरघोस केस आणि मी मात्र येथे एक एक केस मोजत बसलोय. !!
मी रागाने त्याच्याकडे पाहिलं. तो बाजूला झाला. पण निघून जाताना चमत्कारीक हसला. हा नक्की माझ्या गळालेल्या केसांकडे बघून हसतोय !! आता भिकारीही माझी चेष्टा करायला लागलेत……माझा अगदी तिळपापड झाला.
“काय रे, काय बीनसलंय ? घरी गेल्यावर आईने माझ्या चेहऱ्याकडे पाहतच विचारलं.
“दुसरं काय असणार? तुम्ही दिलेल्या देणगीचे प्रताप !! आपल्या फॅमिलीतच आहे ना, तरुण वयात टक्कल पडण्याची अनुवंशिकता. “
कोंडलेली वाफ भसकन् बाहेर यावी, तसा माझा राग उफाळून आला.
‘अरे, आता काय करायचं बाकी ठेवले आम्ही ? सगळ्या हेअर ट्रीटमेंट झाल्या. औषधं, क्रीम, डायट्स, हेअर ट्रान्सप्लांट … कमी का झालं ? कितीतरी डॉक्टरांच्या वाऱ्या झाल्या पण फरक पडत नाही, त्याला काय करणार ?
तू सुद्धा दिवसरात्र गळालेले केसच डोक्यात घेऊन बसतोस. जरा काही मनासारखं नाही झालं की त्याचा संबंध टकलाशी जोडतोस. अरे नेहमीच्या जीवनत त्यापेक्षा इतर कितीतरी गोष्टी महत्त्वाच्या असतात !! ‘ असं आई म्हणाली.
मी म्हणालो, “वा !! असले सदोष जीन्स तुम्ही माझ्याकडे संक्रमित केलेत म्हणजे दोष तुमचा आणि जबाबदार धरता मला. माझा काहीही दोष नसताना मी नाहक भरडला जातोय हे तुम्हाला कळत नाही का ? आणि वर तू आणि बाबा सारखे प्रवचन देत बसता…… असं बरंच काही श्री सांगत होता सांगता सांगता त्याच्या चेहऱ्यावरून नकळत अश्रू ओघळायला लागले होते”.
28 वर्षाचा हा धडधाकट तरुण माझ्यासमोर अत्यंत हताशपणे आपली केसांबद्दलची व्यथा व्यक्त करत होता. जेव्हा एखाद्याला तरुणपणातच टक्कल पडतं आणि ” वरलीया रंगा ” भुलणाऱ्या तरुणी प्रत्यक्ष भेटल्यावर जेव्हा त्याला थेट नकार देतात,अशांचं भवितव्य खरच प्रश्न आणखीत होऊन जातं. बाकी सगळं उत्तम असूनही केवळ टक्कल आहे म्हणून मित्रमंडळींकडून हसं होणं, वा टोचून बोललं जाणं, खिल्ली उडवणं आणि लग्नाच्या बाजारातही तर सतत नाकारत जात असेल तर ? तरुण त्या तरुणाच दुःखही हेच होतं. त्याच्या कळा कोण समजून घेणार ?
जेव्हा तो माझ्याकडे होमिओपॅथिक उपचारासाठी आला त्याचे हे सर्व दुःख, व्यथा, हताशपणा ऐकून घेतल्यावरती त्याच्या प्रकृती व पर्सनॅलिटीचा विचार करून होमिओपॅथिक औषध सुरू केले आणि थोडं समुपदेशनही केले.
त्याला मी सांगितले,
“जी गोष्ट आपण बदलू शकत नाही तिच्याबद्दलचा त्रागा करण्यात अर्थ नाही. ती आहे तशी खळखळ न करता स्वीकारणं यातच शहाणपणा आहे. ती स्वीकारायला आपण जितका अधिक वेळ लावू तेवढा अधिक आपल्याला त्याचा त्रास होईल. तुझ्या बाबांना केस गळायचा त्रास झाला नाही याचं कारण हेच आहे की, त्यांनी लवकर गोष्ट स्वीकारली. आपला दोष स्विकारला. फार पूर्वीपासून स्वतःच्या मनावर त्यांनी हे बिंबवलं होतं आणि हेच मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय. तसेच अनेक पुस्तकांमध्येही तुला हेच लिहून ठेवलेलं दिसेल”.
काही दिवसानंतर श्रीच्या लक्षात आलं की, जेव्हा तो आरशासमोर उभा राहिला होता. त्याने बरेच दिवस स्वतःचे प्रतिबिंबपण आरशात पाहिलं नव्हतं.
“आपल्याला जे वाटतं तसं आरशात आपण स्वतःच प्रतिबिंब पाहत नसतो, तर जे आपल्याला पाहायचं असतं तेच पहायचं असतं म्हणजे त्याला फक्त टक्कल पाहायचं असतं, म्हणून तेच दिसतं….. इतर काहीच दिसत नाही !!
जेव्हा त्याच्या प्रतिबिंबाकडे तो निरखून पाहू लागला तेव्हा त्याच्या लक्षात आलं त्याचे डोळे पाणीदार आहेत, नाक सरळ आहे, बांधा सुदृढ आहे, गौरवर्णीय आहे आणि मुख्य म्हणजे त्याच्याकडे विचार करणारा आणि स्वतःतबदल घडवून आणणारा मेंदू आहे. याचा अर्थ माझ्या ते सगळे जीन्स सदोष नाहीत.”
होमिओपॅथिक औषध सुरू केल्यानंतरच्या एक दोन आठवड्यामध्ये त्याच्या मानसिकतेमध्ये अमुलाग्र बदल झाला होता. केस गळण्याचे प्रमाण जाणवणे इतपत कमी झालं होतं. त्याच्यामध्ये आत्मविश्वास वाढला होता. आणि स्वतःबद्दलचं मत परिवर्तन झालं होतं.
दोन महिन्यांच्या अंतरानंतर केस गळणे थांबल्यामुळे त्याचं टेन्शन बरेच कमी झालं होतं. गळालेले केस उगवण्यास सुरुवात होईल याच्याबद्दल मी त्याला धीर दिला, आश्वस्थ केले.
तेव्हा त्याने मला सांगितलं की, आता माझ्याकडे ज्या डेट्स प्रपोजल मेसेज, लग्नासाठी जी प्रपोजल येतात त्या मुलींना मी “माझा टाईप” काय आहे हे स्पष्ट सांगतो.
त्यांना सांगतो, ” डोक्यावर भरगोस केस असलेली व्यक्ती आत्मविश्वास पूर्ण असणे यात काही नवल नाही. पण दर दिवशी डोक्यावरचे केस गळत असूनही आत्मविश्वास बाळगणाऱ्या एखाद्या मुलाला तू कधी भेटली आहेस का? नसशील,तर तसा प्रयत्न करणाऱ्या मुलांमधील मी एक आहे. तू उत्सुक आहेस का माझ्याशी मैत्री करायला ?” असा उलटा मेसेज मी त्यांना पाठवतो आणि डॉक्टर, खरोखरच मला एका मुलीने सशर्त स्वीकारलं आहे आणि माझ्या प्रपोजला होकार कळवला आहे.
त्याच्या चेहऱ्यावरचे आश्वासक हसणं मला खूप काही समाधान देऊन गेलं.
हीच होमिओपॅथीची खरी किमया आहे.
होमिओपॅथी फक्त आतूनच नाही तर बाहेरूही सुंदर बनवते यात काही शंका नाही.
डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ) HHF,ICR Kolhapur,
चैतन्य होम्योपैथिक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4
शाहुपुरी व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123
रविवारी बंद
कृपया पुढील लेख वाचा —
After completing the office work, I entered the elevator. At the same time, as the new ‘update’ came, Hope opened the ‘ Dating App’ . As soon as he saw her message, he eagerly read, ” Hi! You are very nice. But not my Type. Let’s stop here. …”
As soon as I didn’t read the next one, I was very upset with myself, I was disappointed . I was “Her Type” when we were chatting on chat for so long, giving ” Likes ” because of so many mutual interests. But after meeting her in person, she suddenly realized that I am not “Her Type” after seeing my sparse hair, baldness falling on my head!!
Anger at that hypocritical girl who kept “DP” with the decorative motto “Look inside rather than Outside” welled up inside.
I rode my bike home in a daze, and caught a glimpse of myself in the mirror when I didn’t want to .
Daily shedding of hair, central baldness. I look older than my age!
When I went to a job interview, it must have been a failure, otherwise I would have taken a ‘gap’, everyone used to do the same. I wanted to smash my bike mirror looking at my reflection!!
My hair started falling out in my second year of college and from then on I got the title ” Uncle” forever. Occasionally “Ganja, Taklu, Eid Ka Chand, Chivadyat Ladoo”-“गंजा,टकलू, ईद का चांद, चिवड्यात लाडू” are real adjectives!!
It was also advised in advance that you must watch the Hindi movie “Bala” . My friends were allowed to ” joke and make fun” of my hair loss.
How much will your oil, shampoo, salon, massage cost!!! Hearing such remarks, they used to rub my wound well.
How children of my age are taking pictures of themselves in a hurry !! I consider it a life-threatening crisis. I don’t want to see my face with sparse hair.
In the group photo, I stand up. Then others get free rein to make fun . It just keeps boiling inside !! But I can’t even express that feeling.
No girl wants to be friends with me. If you go to search online, like this girl now, they chat first and run away when they see bald .
However, I share the photo so that the baldness will be noticed at least! ! But not in real meeting but in “Facetime” .
“This sparse hair always haunts me. If I think it fits a bit, it’s like putting a grain of salt in the milk and everyone is flabbergasted. If this baldness is a hindrance in mere friendship, how much more will it be a hindrance in marriage.”
How can parents not understand the stress of these thoughts?
They value these things. Mother says, “Oh not all girls value looks. Didn’t I, I married your dad despite his hair falling out !! You will too.” This optimism of the mother was greatly angered.
The mother thinks, “Girls are in her era. Parents will put a necklace around the neck of the boy they find” !!
Girls of today’s generation are not so simple, they find faults in any boy who has no faults; So marrying a balding or balding boy is a long shot. So the hope of a girl like mother saying “yes” is very dim!
So who will come to my share? If you start to think, unwanted thoughts keep mixing in your mind.
I thought that even Father would understand this pain. He has experienced massive hair loss at a young age!!
But when asked, they say, ” Why should I bother when I have never given importance to this?”
Father‘s time was different. That time to believe that the appearance of men is not important!
Even though he was bald, there was no obstacle for Father to get married. But now everything has changed. Dad never liked the way I like it. Then how will they know what I see?
His usual motto – “It’s what’s inside the head that counts. Not what’s outside.”
But nowadays they look outside first. You can’t see inside without looking outside!! So what is the use of having a lot inside?
Mother also gives an example–says, “So many celebrities like Steve Jobs, Anupam Kher were and are bald! But people remembered them for their work, not baldness!!”
Mom, “These are famous people. For one thing, they don’t know if they’re bald in youth. And even if they’re bald in youth, any vaiguna (वैगुन्य) of abnormal men is covered by their abnormality, but ordinary people don’t. Their vaiguna (वैगुन्यच) is abnormal!” I try to say this but it doesn’t reach her or she doesn’t understand it.
As soon as the signal was heard, the car stopped on the side of the road. There was a saloon. Through the transparent glass door, a barber could be seen cutting the hair of the men sitting on the middle chair with slanting scissors.
The throbbing wound in the heart began to flow.
“ये रेशमी जुल्फे…….”
Till now I could hear the tune of a Hindi song playing in the saloon. They began to fall on ears and I began to see myself among the men sitting inside the saloon. I’m out with the “Messy” haircut I like and my girlfriend is running her hand through my soft thick hair to mess it up even more……..!!!
‘P– p– p–p’ the shrill horns of the back cars started sounding. That’s how I came to my senses. The green signal had crushed my beautiful dream.
While in the office, unwanted thoughts are pushed to the bottom of the mind in the hustle and bustle of work. But when you get a little bit of loneliness, they come and shoot from above like arrows in the rice field. His sting was unbearable.
I started the bike and started approaching home. On reaching the building, a beggar came in front.
Unhygienic…Nasty… But the hair is full!! What a blessing!! A lot of hair for someone who can’t take care of it and I’m sitting here counting one hair at a time. !!
I looked at him angrily. He stepped aside. But the miraculous smiled as he left. This is definitely laughing at my lost hair!! Now even the beggars started making fun of me…I got really nervous.
“What the hell, what happened ? After going home, my mother asked looking at my face.
“What else will there be ? The glory of your gift!! It runs in your family, doesn’t it, the Genetics of baldness at a young age.”
My anger erupted like pent-up steam.
‘Oh, what are we left to do now ? All hair treatments were done. Medicines, creams, diets, hair transplants… It’s not enough ? What to do when treatment from many doctors took but it is not beneficial ?
You also sit with lost hair on your head day and night. If something doesn’t go your way, you associate it with the bald head. Oh, there are so many other things that are important in normal life!! ‘ said the mother.
I said, “Wow!! You have passed on these Defective Genes to me, so it is your fault and you are holding me responsible. Don’t you know that I am getting rich without any fault of mine? And on top of that, you and baba are lecturing like a Sadguru …. .. Shri was saying so many things that tears were starting to flow down his face without realizing it”.
This dashing 28-year-old was desperately expressing his hair woes to me. When one goes bald at a young age and is rejected outright by young women who forget “Varliya Ranga” (” वरलीया रंगा “) when they meet him in person, his fate becomes even more questionable. Being laughed at by friends, teased, mocked, and even rejected in the marriage market just because you are bald, despite everything else being great? This was also the sorrow of the young man. Who will understand his keys?
When he came to me for Homoeopathic treatment, after listening to all his pain, suffering, despair, I started Homoeopathic medicine considering his condition and personality and also did some counselling .
I told him,
“There’s no point in fussing over something you can’t change. It’s wise to just accept it as it is. The longer we wait to accept it, the more it will bother us. The reason your dad didn’t suffer from hair loss is because , he quickly accepted the thing. Accepted his fault. He had impressed it on himself long ago and this is what I am trying to tell you. Also you will find it written in many books”.
After a few days Shri realized that when he was standing in front of the mirror. He had not seen his own reflection in the mirror for a long time.
“In the mirror we don’t see what we think we see, but what we want to see. He only wants to see the bald head, so that’s what he sees…..nothing else!!
When he started looking at his reflection, his Noticed that his Eyes are watery (पाणीदार) , his Nose is straight(सरळ)his frame is strong, glorious (बांधा सुदृढ,गौरवर्णीय) and most importantly, he has a brain that thinks and changes itself. That means I don’t have all those faulty genes.”
Within a week or two after starting the Homoeopathic medicine, there was a drastic change in his mentality. The amount of hair loss was reduced so much . He had grown in confidence . And his opinion about himself had changed.
After a gap of two months, his hair loss had stopped and his tension had reduced a lot. I reassured him that the lost hair would start growing back.
Then he told me that now I clearly tell the girls that I am ” My Type” in the date proposal messages, marriage proposals that I receive .
Tell them, “It’s not surprising that a person with a full head of hair is full of confidence. But have you ever met a boy who is confident even though his head is falling out every day? If not, I’m one of those boys who try. Are you curious about me ?” To be friends?” I send them such a reverse message and doctor, indeed a girl has conditionally accepted me and agreed to my proposal.
The reassuring smile on his face gave me a lot of satisfaction .
Dr Ajay Hanmane
M.D.(Homeo) HHF, ICR Kolhapur,
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4,
Bhaskar Plaza Vyapari Peth,
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
Mobile No. 7738667123
Sunday Closed.
Please Read Next Article —