होमिओपॅथीला गैरसमजांची बाधा; उपचार मात्र प्रभावी !/ Homoeopathy is Plagued by Misconceptions; But the Treatment is Effective!

Dorctor Pic By Dr. Ajay HanmaneSeptember 1, 2023 General Information Homeopathic and Cure

होमिओपॅथीला गैरसमजांची बाधा;  उपचार मात्र प्रभावी !!!

 

औषधी कोणत्याही पॅथीची असो ऍलोपथी,आयुर्वेद,होमिओपॅथी तरीही त्यांची निर्मिती ही निसर्गातील घटकांपासूनच झालेली असते आणि त्यांच्या निर्मितीमागील मूळ उद्देश हा एकच असतो.

फरक एवढाच की त्यांची परिणामकारकताही औषधांचे स्वरूप आणि व्यक्तीनुसार ठरत असते.

 

होमिओपॅथिक औषधेही वनस्पती, विविध रसायने अशा निसर्गातील विविध घटकांपासून तयार केली जातात. अत्यंत सूक्ष्म पातळीवर त्यातील घटक यासाठी वापरली जातात. उच्च दर्जा आणि अचूकता या औषधांची खासियत ठरते म्हणून ती तितकी परिणाम करत असतात.

 

होमिओपॅथिक औषधे किती प्रभावी याचा याबद्दल अनेक मतप्रवाह समाजात आहेत. औषधे घेऊनही एखादा आजार झाला किंवा उगाच जोखीम नको अशा असंख्य प्रश्नांमुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पण सर्व परिस्थितीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल होमिओपॅथी ही देखील एक मान्यताप्राप्त वैद्यक शाखा आहे. कोरोना संकटकात देखील ही औषधी अत्यंत प्रभावी ठरली आहेत.

मोठ्या प्रमाणावर संसर्ग होतो तेव्हा लक्षणे ही एकसारखीच दिसत असतात. त्यानुसार औषधांची निर्मितीचे सूत्र ठरलेले असते.

होमिओपॅथीचे वैशिष्ट्य म्हणजे, व्यक्ती, त्याला दिसणारी लक्षणे, त्याची शारीरिक आणि मानसिक स्थिती अशा स्थिती विविध बाबी लक्षात घेऊन औषधे तयार करून दिली जातात. ही औषधे तयार करताना रुग्णाच्या मन-शरीर आणि आत्मा या तिन्ही पातळीवर विचार केला जातो. शरीरात असंतुलित झालेल्या घटकांचे संतुलन करत अर्थात पेशींच्या पातळीवर ही औषधे कार्य करतात.

या औषधांमुळे कुठलाही अपाय होत नाही. त्यामुळे अन्य औषधांच्या बरोबरीने ही औषधे घेता येतात किंवा या औषधांची परिणामकारकता लक्षात घेऊन अन्य औषधे सुरू ठेवता किंवा बंद करता येतात.

साध्या फ्लूच्या आजारापासून ते संसर्गजन्य आजारापर्यंत प्रत्येक स्तरावर ही औषधी उपयुक्त ठरतात.

 

होमिओपॅथीची औषधे घेताना कांदा लसूण कॉफी वर्ज केली जाते, असे गृहीत धरले जाते. मात्र यापैकी काही ठराविक औषधांनाच पथ्य आहे. जेव्हाही पथ्य पाळायला सांगतात तेव्हाच ही पथ्य पाळावी. प्रत्येक औषधाच्या बाबतीत हा नियम लागू नाही.

 

प्रतिबंधात्मक उपाययोजना केली तरीही संसर्ग होण्याची शक्यता ही प्रत्येक पॅथी मध्ये असते म्हणजे, एखाद्या इमारतीत अग्निशमन यंत्रणा लावली म्हणजे आग लागणार नाही असे होत नाही. तर जेव्हा तसा प्रयत्न होईल त्यावेळी तात्काळ नियंत्रण आणून, तीव्रता कमी करता येते. ते या औषधांच्या बाबतीत देखील असेच असते. प्रतिबंधात्मक औषधेही काही ठराविक पातळीपर्यंत तुम्हाला संरक्षण देत असतात. त्यानंतर संसर्ग झाला तर मात्र औषधांचे स्वरूप बदलावे लागते.

 

प्रत्येक व्यक्तीची प्रकृती, रोगप्रतिकारकक्षमता, आहार-विहार ही वेगवेगळी असते. त्यामुळे होमिओपॅथीची औषधे देताना सर्व बाबींचा विचार करावा लागतो.

काही जुनाट व्याधी व्याधींमध्ये ऍलोपॅथीची औषधे सुरू असताना सोबत होमिओपॅथीची औषधेही घ्यायला हरकत नाही फक्त दोन्ही डोस एकाच वेळी घ्यायला नकोत. त्यात किमान 30 मिनिटांचे अंतर ठेवायला हवे.

 

 

डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ) HHF, ICR Kolhapur,
चैतन्य होम्योपैथिक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4
शाहुपुरी व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123
रविवारी बंद

 

 

कृपया पुढील लेख वाचा  —


Homoeopathy is plagued by misconceptions; But the treatment is Effective!!!

 

Allopathy, Ayurveda, Homoeopathy, medicines are made from natural ingredients and the basic purpose behind their creation is the same.

The only difference is that their effectiveness also depends on the nature of the medicine and the individual .

 

Homoeopathic medicines are also prepared from various natural ingredients such as plants, various chemicals. The ingredients are used at a very minute level for the high quality and precision that characterizes these medicines so they are effective.

There are many opinions in the society about how effective Homoeopathic medicines are. People are confused due to numerous questions about whether a disease occurred even after taking the medicine or not taking any risk at all . But in all situations one thing has to be remembered that Homoeopathy is also a recognized branch of medicine . These medicines have been very effective in the corona crisis as well.

When the infection is widespread, the symptoms are similar. Accordingly, the formulation of the medicine is decided.

 

The characteristic of Homoeopathy is that medicines are prepared keeping in mind various factors such as the person, his symptoms, his physical and mental condition . While preparing these medicines , the patient’s mind-body and soul are considered at all three levels. These medicines work at the cellular level by balancing the imbalanced elements in the body.

These medicines do not cause any harm. Therefore, these drugs can be taken along with other drugs or other drugs can be continued or discontinued keeping in mind the effectiveness of these drugs.

These medicines are useful at every level from simple flu to infectious diseases.

It is assumed that onion, garlic, coffee is avoided while taking Homoeopathic medicines . But only some of these medicines are prescribed. Follow this diet only whenever you are told to follow it. This rule does not apply to every drug.

 

In spite of preventive measures, the possibility of infection is present in every pathology , i.e., installing a fire-fighting system in a building does not mean that there will not be a fire. So when such an attempt is made, the intensity can be reduced by bringing immediate control. It is the same with these medicines. Preventive medicines also protect you up to a certain level. If infection occurs after that, however, the form of medicine has to be changed.

 

Each person’s health, immunity, diet is different. So all aspects have to be considered while giving Homoeopathy medicines.

In some chronic diseases, it is okay to take Homoeopathic medicines along with Allopathic medicines, but both doses should not be taken at the same time. There should be a gap of at least 30 minutes.

 

Dr Ajay Hanmane
M.D.(Homeo)HHF,ICR Kolhapur,
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4,
Bhaskar Plaza Vyapari Peth,
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
Mobile No. 7738667123
Sunday Closed.

Please Read Next Article