आर्टिकॅरिया / पित्तगांध्या व होमिओपॅथी
“अंगावर पित्त उठले आहे” असे सांगणारे लोक बरेचदा आपल्या दैनंदिन जीवनात पाहायला मिळतात. यालाच आर्टिकॅरिया(Urticaria) असे म्हटले जाते. हा शब्दप्रयोग त्वचेवर उठणाऱ्या लालसर चट्ट्या संदर्भात वापरला जातो.
पित्त हे शरीराच्या कुठल्याही भागावर उठले जाते- चेहऱ्यावर, ओठांवर, गळ्यावर, जिभेवर इ. कुठेही उठू शकते. पित्तगांधीचा आकार वेगवेगळ्या स्वरूपात असतो, कधी तो हरभरा डाळी एवढा लहान असतो, तर कधी कधी छोट्या ताटली एवढे मोठे असतात.
पित्ताच्या चट्ट्यांना खाज उठत राहते. त्वचेमध्ये चावल्यासारखे सारखा त्रास होतो. त्याचा दाह होतो, जळजळायला लागते. त्वचेवर तांबूस पांढऱ्या रंगाचे वाटोळे चट्टे उठतात. उठलेल्या चट्ट्यांना फिकट किनार असते.
उठणाऱ्या पित्ताच्या चट्ट्यांचा त्रास काही मिनिटे ते काही तास राहतो. नंतर तो आपोआप नाहीसा होतो. कधी कधी काही आठवडे ते महिन्यांपर्यंत हा आजार राहतो. पित्ताचा उठलेला चट्टा मात्र 24 तासात कमी होतो. उठलेल्या जागी रोगाचे पूर्व चिन्ह काही दिसत नाही.
एखाद्या पदार्थाशी संपर्क आला आणि त्याचा त्वचेवरती परिणाम झाला तर असा त्रास होतो किंवा शरीरामधील प्रतिकारशक्ती मध्ये बदल घडायला लागले, तरीही पित्त उठण्याचा त्रास होतो. या त्रासात खाज सुरू होऊन त्वचेला सूज येते. ही खाज कधी सौंम्य स्वरूपाची तर कधी तीव्र स्वरूपाची असते. सतत खाजवल्यामुळे, अतिमानसिक ताण पडल्यास पित्ताचा त्रास वाढू शकतो.
पित्त उठण्याचे दोन प्रकार आहेत.
1) तात्कालीक कालावधी (Acute) कमी काळ राहणारे आणि
2) दीर्घ कालावधी (Chronic) म्हणजे दीर्घ काळ राहणारे.
1) तात्कालीक आर्टिकेरिया (Acute Urticaria) — हे सहा आठवड्यांपेक्षा कमी काळ राहतात. याला जबाबदार असणारी बरीच कारणे आहेत.
कमी काळ राहणारा हा पित्त उठण्याचा त्रास, कारण शोधून काढून त्यावर इलाज केला की बरा होतो पूर्ण बरा होतो.
2) क्रॉनिक आर्टिकेरिया (Chronic Urticaria) – दीर्घ कालावधी आर्टिकेरिया – दीर्घकाळ राहणारा हा पित्ताचा त्रास सहा आठवड्यांपेक्षा जास्त काळ राहतो. 50℅ लोकांमध्ये शरीरातील प्रतिकारशक्तीमध्ये झालेले बदल जबाबदार असतात. शरीरातील पेशींमध्ये होणारी “हिस्टामाईंनची (Histamine)” निर्मिती, हार्मोन्स मधील बदल– थायरॉईड सारख्या ग्रंथी, या दीर्घ कालावधी आर्टिकेरिया ला जबाबदार असतात. हा त्रास हळूहळू कमी होत जातो.
आर्टिकेरियासाठी शारीरिक कारणे सुद्धा जबाबदार आहेत, यापैकी मुख्य कारण म्हणजे डर्मोग्राफीजम (Dermographism). यामध्ये त्वचेवर खाजवल्यानंतर काही मिनिटातच चट्टे किंवा रेषा उठू लागतात. हे चट्टे किंवा रेषा खाजवलेल्या त्वचेवरतीच उठतात. त्याचप्रमाणे एखाद्या वस्तूचा दाब शरीरावर सतत राहिला तरीही काही वेळानंतर त्वचेवर पित्ताचे चट्टे उठतात.
उदाहरणार्थ घट्ट असलेले पायमोजे, कमरेचा पट्टा, कधी कधी शरीरावर थंड हवामानामुळे सुद्धा पित्त उठू शकते. त्याचप्रमाणे हवामान गरम झाल्यानंतर झाल्यावर, तसेच जलतरण तलावात सूर मारल्यावर काही जणांना पित्त उठण्याचा त्रास होऊ शकतो. याला कोलेनर्जीक आर्टिकॅरिया (Cholinergic Urticaria) असे म्हणतात. सूर्यप्रकाशाचा त्रास काही जणांना होतो. सूर्यकिरणांच्या त्वचेवरील परिणामामुळे त्यांना आर्टिकेरियाचा त्रास होतो.
काही वेळा उठलेले चट्टे लवकर कमी होतात, मात्र ती जागा काही वेळ दुखत राहते. चट्टे कमी झाले तरी त्याचे ब्रण काही वेळा राहतात. अशा वेळेस शिरेच्या दाहाचा (Vasculitis) विचार डॉक्टरांना करावा लागतो.
पित्त कसे उठते ?
शरीरामधील त्वचेमध्ये असणाऱ्या छोट्या छोट्या रक्तवाहिन्यानभोवती पेशींचे आवरण असते. या पेशींमधून छोट्या छोट्या जागांमधून रक्त बाहेर पडल्यावर रक्तवाहिन्यांच्या बाजूला असलेल्या त्वचेमधील इतर पेशींमधून “हिस्टामाईंन (Histamine)” हा स्त्राव बाहेर पडतो. त्यामुळे त्वचेवर चट्टे उठू लागतात. असे उठणारे चट्टे कधी सौम्य, तर कधी तीव्र स्वरूपाचे त्रास देणारे असतात. कधी कधी श्वासाचा त्रासही होतो आणि अशा वेळेस गंभीर स्वरूपाचा आजारी होऊ शकतो जो रुग्णाच्या जीवावर बेतु शकतो.
पित्त कशामुळे उठले याबाबतीत काहीवेळा कारण सहजपणे समजते. खाल्लेला अन्नपदार्थ, वापरलेले औषध किंवा कपडे यांचा संपर्क आला असेल तर चट्टा उठला हे लक्षात येते. कुठले पदार्थ किंवा नेहमी घेतली गेलेली औषधे हे लक्षात आले की कारणीभूत असणाऱ्या पदार्थांबाबत, औषधांबबाबत ढोबळ अंदाज करता येतो.
दीर्घकाळ राहणाऱ्या आर्टिकेरियाच्या बाबतीत तपास करणारे करणे गरजेचे असते. रुग्णाच्या तपशीलवार माहिती बरोबरच त्याच्या नातेवाईकांच्या आजाराचाही विचार केला जातो.
होमिओपॅथिक शासनानुसार या त्वचारोगाचे मूळ कारण शरीरातील रोगदोष (Miasm) हेच आहे. रुग्णामधील रोगदोषाचे वर्गीकरण, त्याच्या आजाराच्या लक्षण समूहानुसार केले जाते. या रोगदोषांपैकी पित्त उठण्याचे मुख्य कारण सायकोसिस(Sycosis) हा रोगदोष असून त्याच्यामुळे शरीरातील पेशींमधील संतुलन बिघडते व त्यानंतर शरीरातील इतर अवयवांच्या कार्यात बिघाड निर्माण होतो व पित्त उठणे स्वरूपात त्वचेवर दिसून येतो.
होमिओपॅथिक औषधे रुग्णांच्या स्वभाव गुणधर्मानुसार निवडली जातात. त्याचबरोबरीने रोगदोष घालविण्यासाठी विशिष्ट पद्धतीने औषधांची निवड करावी लागते.
पित्त उठणे हा जरी त्रासदायक त्वचारोग असला तरी होमिओपॅथिक चिकित्सा पद्धतीने हा आजार संपूर्णपणे बरा होतो हे आता सिद्ध झालेले आहे.
डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ)
चैतन्य होम्योपैथिक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4
शाहुपुरी व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123
रविवारी बंद
कृपया पुढील लेख वाचा –
It is very common in our daily life to see people saying ” I have a rash “. This is called Urticaria . This term is used to refer to a red rash on the skin .
Bile is raised on any part of the body – face, lips, throat, tongue etc. Can arise anywhere. Pittagandhi (पित्तगांधीचा) comes in different sizes, sometimes as small as gram dal and sometimes as big as small plates .
Gallstones are itchy . It hurts like a bite in the skin. It gets inflamed, starts burning . Reddish white spots appear on the skin. Raised scars have pale edges.
The pain of raised gallstones lasts for a few minutes to a few hours . Then it disappears automatically. Sometimes the disease lasts for weeks to months. Raised pitta scar, however, subsides within 24 hours. There are no early signs of the disease in the raised area.
If a substance comes in contact with it and affects the skin, or when the body’s immune system changes, it still causes pitta. In this problem, itching starts and the skin becomes inflamed . This itching is sometimes mild and sometimes severe . Due to constant scratching, excessive stress can aggravate pitta.
There are two types of pitta rising.
1) Short- lived and acute
2) Chronic means lasting for a long time.
1) Acute Urticaria — These last for less than six weeks. There are many reasons responsible for this.
2) Chronic Urticaria – Long Duration Urticaria – Chronic urticaria lasts for more than six weeks. In 50℅ people, changes in body immunity are responsible. Production of ” Histamine” in body cells, changes in hormones – glands like thyroid , are responsible for long term urticaria . This pain gradually decreases.
Physiological causes are also responsible for urticaria , chief of which is Dermographism . In this, scars or lines start appearing on the skin within a few minutes of scratching. These scars or lines rise above the scratched skin. Similarly, even if the pressure of an object remains constant on the body, pitta scars will appear on the skin after some time.
For example tight socks, waist belt, sometimes cold weather on the body can also cause bile. Likewise, some people may experience biliousness after the weather warms up, as well as after taking a dip in a swimming pool. This is called Cholinergic Urticaria . Some people suffer from sunburn. Due to the effect of sun rays on the skin, they suffer from urticaria .
Sometimes the raised scars subside quickly, but the area remains sore for some time. Even if the scars are reduced, the rash sometimes remains. In such cases, doctors have to consider vasculitis .
How does bile arise ?
Small blood vessels in the skin of the body are surrounded by a sheath of cells. When blood escapes from these cells through small spaces, other cells in the skin next to the blood vessels release ” Histamine” . Due to this, scars start to appear on the skin. These raised scars are sometimes mild and sometimes severe . Sometimes there is difficulty in breathing and in such cases it can lead to serious illness which can lead to death of the patient.
Sometimes the cause of pitta is easily understood. A rash can be noticed if it comes into contact with food eaten, medicine used or clothing . A rough estimate can be made of the causative substances and drugs by noting which substances or medicines are taken regularly.
In cases of long-standing urticaria, an investigation is necessary. Along with the detailed information of the patient, the illness of his relatives is also considered.
According to the homeopathic regime, the root cause of this skin disease is the disease (Miasam) in the body. Classification of disease in a patient is done according to the symptom group of his disease . Among these diseases, the main cause of bile rising is sycosis (Sycosis ) is a disease and due to it the balance in the cells of the body is disturbed and then the functioning of other organs of the body is disturbed and it is seen on the skin in the form of bile rising.
Homeopathic medicines are selected according to the temperament of the patients. At the same time, drugs have to be selected in a specific way to remove the disease.
Although gallstones are a troublesome skin disease , it has now been proven that homeopathic treatment can cure the disease completely .
Dr Ajay Hanmane
M.D.(Homeo)
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4,
Bhaskar Plaza Vyapari Peth,
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
Mobile No. 7738667123
Sunday Closed
Please read the following article –