लहान मुलांचे आजार आणि होमिओपॅथी / Childhood Diseases and Homoeopathy.

Dorctor Pic By Dr. Ajay HanmaneSeptember 22, 2023 Children Problems Homeopathic and Cure

लहान मुलांचे आजार आणि होमिओपॅथी.

 

 

लहान मुलांना विशेषता बाळांना आपल्याला काय होते हे सांगता येत नाही, त्यामुळे नेमकं काय कराव हे आईलाही समजत नाही.

 

लहान मुलांमध्ये प्रतिकार रोगप्रतिकारक शक्ती कमी असते त्यामुळे छोट्या गोष्टींमुळे ही आजार उद्भवू शकतात.

 

तसेच लहान मुलांचे आजार असंख्यच आहेत, तरीही सर्दी, खोकला, हलका ताप येणे, गॅसेस होणे, पोट दुखणं, शौचाला साफ न होणे, उलट्या जुलाब होणं, जंत होणे, कातडीवर रॅशेस येणे, कान दुखणं, कान वाहने, बाहेरच दूध न पचने, तसेच दात येताना होणार त्रास आणि बेड वेटिंग हे सर्वसाधारण आढळणारे आजार आहेत.

 

गोवर, कांजिण्या, बालदमा, अस्थिरता, हायपर ऍक्टिव्हनेस याही तक्रार उद्भवतात.

 

याशिवाय वर्तुणुकीतल्या समस्या असतात.किरकिर, चिडचिड करणं, हट्ट करणं, खूपच शांत असणं, लाजरेपणा इत्यादी.

 

होमिओपॅथीमध्ये सर्वसाधारण आजारांसाठी गुणकारी औषध आहेतच. तशीच स्वभाव वैशिष्ट्यानुसार आधारित औषधी आहेत.

 

कुठलेही साईड इफेक्ट नसल्याने बाळांसाठी ती पूर्णतः सुरक्षित ठरतात. रोग प्रतिकारक शक्ती वाढत असल्याने मुलांचे वारंवार आजारी पडणं कमी होतं. गोड गोळ्या असल्याने मुलं आनंदाने औषध घेतात.

मॉडर्न मेडिसिन च्या औषधांचा मारा झालेला नसल्याने होमिओपॅथिक औषधांचा मुलांमध्ये अधिकच वेगाने गुण येतो.

 

लहान मुलांच्या बाबतीत वरचेवर होणारा सर्दी खोकला ही नेहमीची तक्रार असते. हवामानात थोडा जरी बदल झाला किंवा खाण्यापिण्यात फरक झाला की, झालाच त्रास सुरू तर छाती भरणे, छातीतून घरघर आवाज येणे, श्वास घेताना त्रास होणे आणि त्यातून मुलांची किरकिर सुरू होणे याचा अनुभव बहुतेक पालकांना असतो.

 

दुखणं किरकोळ वाटलं तरी दुर्लक्ष करणं शक्य नसतं. विशेषतः श्वासाला अडथळा झाल्याने अनेकदा काळजी वाटते.

 

लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते. मुलांवर आपण संस्कार करू तशी ती घडत जातात, असे म्हटले जाते.

पण लहान मुल जन्मापासूनच काही दुखणं घेऊन जगात आलं तर त्याला जपायचं, वाढवायचे, घडवायचं कसं?

 

“मातीचा गोळा” ही उपमा झाली. मुळात तो आईच्या “पोटचा गोळा” असतो. त्यात सगळा जीव गुंतलेला असतो.

मूल जेव्हा बाल वयातच एखाद्या आजाराने त्रस्त होतं, तेव्हा आईच्या जीवाची काय हाल होतात !

बरं ते बिचारं मुलं, त्याला काय आणि किती त्रास होतोय -हेही सांगू शकत नसतं.

 

अशा असाध्य रोगांवर काही डॉक्टरांच्या मते जगात कोठेही उपाय नाहीत्या दुखण्यावर ही होमिओपथी मध्ये नक्कीच उपचार आहेत.

आधुनिक वैद्यक शास्त्रामध्ये प्रथम लक्षणांवरून रोगाचे निदान केलं जातं. मग त्या रोगांवरच औषध दिलं जातं. पण खूप साऱ्या टेस्ट निघाल्या आहेत . त्यातूनही काही निष्पन्न नाही झालं तर यातून आधुनिक वैद्यक शास्त्राच्या मर्यादा स्पष्ट होतात.

 

           लहान मुलांचे लसीकरण हे सर्वात महत्त्वाचं मानलं जातं ……… सर्रास केलं पण जातं. पण मुलांची प्रतिकारक्षमता मुळातच योग्य नसेल तर….. लसीकरणामुळे अशा- विशिष्ट- प्रकारचा लक्षण समूह तयार होतो. याचा अतिशय सखोल अभ्यास होमिओपॅथीमध्ये केलेला आहे.

 

हे आजार प्रचंड थकवा निर्माण करणारे, अगदी गलितात्र करणारे असतात. पण आधुनिक वैद्यकशास्त्राच्या कुठल्याही आजारांच्या व तपासण्याच्या चौकटीत ते बसत नाहीत. म्हणूनच जागतिक आरोग्य संघटनेने ही अशा आजारांचा अस्तित्व मान्य केलेलं आहे. अशा आजारांसाठी दिले जाणारे उपचार हे केवळ ट्रायल आणि एरर अशा पद्धतीने होतात. अशा आजारांवर होमिओपॅथी मध्ये उपचार आहेत. पण त्यांचं निदान आणि उपचार केवळ उच्चशिक्षित आणि निषणात होमिओपॅथिक डॉक्टरच करू शकतो.

 

होमिओपॅथीच परिपूर्ण ज्ञान असेल तर जीवघेणे आजार अगदी सहज आणि समूळ बरे करता येतात.

 

डॉ अजय हनमाने

M. D. (Hom)

चैतन्य होमिओपॅथिक क्लिनिक

भास्कर प्लाझा, F4

शाहूपुरी व्यापारी पेठ,

रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ, कोल्हापूर

मो. 7738667123

रविवारी बंद

 

कृपया पुढील लेख वाचा

 


Childhood Diseases and Homoeopathy.

 

 

Babies can’t tell us what happens to babies, so even mothers don’t know what to do.

 

Children have a weak immune system so little things can cause these diseases.

 

Also, the diseases of children are numerous, yet cold, cough, mild fever, gas, stomach ache, defecation, vomiting, diarrhoea, worms, skin rashes, earache, ear infections, indigestion of milk outside, as well Teething pain and bedwetting are common ailments.

 

Measles, chicken pox, childhood asthma, restlessness, hyperactivity are also reported.

 

Apart from this there are behavioral problems. Grumpy, irritable, stubborn, very quiet, shy etc.

 

Homoeopathy has effective medicines for common ailments. Similarly there are medicinal based on temperament characteristics.

 

They are completely safe for babies as there are no side effects. As immunity increases, children get sick less often. Children take the medicine happily as it is a sweet pill. Homoeopathic medicines are more effective in children as they are not affected by the medicines of modern medicine.

 

Cold cough is a common complaint in children. Most parents experience chest congestion, wheezing, difficulty breathing, and wheezing in children when there is a slight change in the weather or a change in food and drink.

 

Even if the pain seems minor, it is not possible to ignore it. In particular, difficulty breathing is often a cause for concern.

 

A child is a ball of clay, an idol is made as it should be shaped. It is said that they happen as we cultivate children .

But if a small child comes into the world with some pain from birth, how to protect, raise and develop him?

 

A “clod of clay” became the simile. It is basically the “tummy lump” of the mother. All life is involved in it. When the child is suffering from a disease at an early age, what happens to the mother’s life!

Well, those poor children, what and how much he is suffering – can’t even tell.

 

According to some doctors, there is no cure for such incurable diseases anywhere in the world . There is definitely a Homoeopathic treatment for that pain.

In modern medicine, the disease is diagnosed from the first symptoms. Then medicine is given only for those diseases. But many tests have been released. If nothing comes out of that too, this shows the limitations of modern medicine .

 

Immunization of children is considered to be the most important … widely practiced. But if the child’s immunity is not up to scratch, vaccination can cause a specific set of symptoms . It has been studied very thoroughly in homeopathy .

 

These diseases are very exhausting, even debilitating. But they do not fit into the framework of any disease and examination of modern medicine. That is why the World Health Organization has accepted the existence of such diseases. The treatment given for such diseases is only by trial and error . Such diseases are treated in Homoeopathy . But they can be diagnosed and treated only by a highly educated and experienced homeopathic doctor .

 

If Homoeopathy is perfect knowledge then life threatening diseases can be cured very easily and completely.

 

Dr. Ajay Hanmane

MD (Hom)

Chaitanya Homoeopathic Clinic

Bhaskar Plaza, F4

Shahupuri Traders Peth,

Near Railway Gate Bhaji Mandai, Kolhapur

Md. 7738667123

Closed on Sundays

 

Please read the following article–