बिघडला “ताल’ संसाराचा “नादाने”, ll समतोल साधला होमिओपॅथीक उपचाराने ||
व्यसनाधीन लोक किंवा संसारात पडलेले संसारातील लोक असो, “कळते पण वळत नाही” ही म्हण अगदी चपखल लागू होते.
व्यसन मग ते कोणतेही असो सिगारेट, दारू,गांजा,अफू जे वैवाहिक जीवनावर आणि कामजीवनावरही विपरीत परिणाम केल्याशिवाय राहत नाही.
“कितीही ठरवलं किंवा ठरवलं तर मी लगेच व्यसन सोडू शकतो” असे अनेक व्यसनी लोकांचे ठाम म्हणणं असतं.
“एकच शेवटचा दम मारू, एक शेवटचा प्याला रिचवू आणि उद्यापासून सगळं सोडू” असे म्हणणाऱ्यांच्या आयुष्यात दुर्दैवाने ती सकाळ कधीच उजाडत नाही. त्यामुळेच वेगवेगळ्या व्यसनांचा कामेच्छेवर आणि लैंगिक क्षमतेवर ही अतिशय वाईट परिणाम होतो, जो दीर्घकाळ टिकतो.
दारूमुळे कामेच्छा बळावते, असा एक समज आहे. डॉक्टर विठ्ठल प्रभू यांनी “निरामय कामजीवन” या पुस्तकातल्या “सेक्स टॉनिक” या प्रकरणात असं लिहून ठेवले की, ” मद्यामुळे मनावरचं दडपण कमी होतं आणि त्यामुळे माणूस उल्हासित होतो; पण मद्य हे उद्दीपक नसून मेंदूतल्या उच्च केंद्रांचं अवदीपण करणारं पेय आहे. त्या मद्यामुळे संभोगाची इच्छा बळावते, मात्र,कृती मंदावते. मग त्यामुळे लिंगाचा ताठरपणावर वीर्यस्खलनाचे कार्य मंदावतं अस प्रयोगांती सिद्ध झालं आहे. अति मद्यसेवनामुळे तर नपुंसकत्व येतं.”
वयाच्या सोळाव्या वर्षी सिगारेट आणि दारू,गांजासह इतर व्यसनांना जवळ केलेल्या माझ्या एका पेशंटनं त्याच्या आयुष्यातील उमेदीचे एक तप दारूच्या व्यसनामध्ये अक्षरशः उध्वस्त केलं. त्याचा आपल्या वैवाहिक जीवनावर झालेला परिणाम त्याने सांगितला की, “माझ्या व्यसनांमुळे माझी बायको सतत ताणावाखाली असायची. मला वाटायचे की मी प्रमाणात घेतो. कितीतरी लोक व्यसनं करतात, त्यातलाच मी ही एक आहे. त्यामुळे दारू पिणं ही माझी समस्या आहे हे मान्य करायलाच मी तयार नव्हतो. त्यामुळे आपल्याबरोबर दुसरी व्यक्ती राहते व तिलाही मन आहे,भावना आहेत हे माझ्या मनातही नसायचं. एरवी नशेत असताना सेक्सची गरज भासायची नाही. शुद्धीत असताना मात्र माझ्या वेळेला मला ‘ते’ पाहिजे असायचं आणि बायको ‘नाही’ म्हणाली की, चिडचिड व्हायची. मग ‘तुला इच्छा होत नाही,कारण तुझं बाहेर काही भानगड आहे’ असं थेट तिच्या चारित्र्यावर हल्ला करून मी माझ्या इच्छा अक्षरशः ओरबाडून पूर्ण करून घ्यायचो. पुढे पूर्ण अल्कोहोलिक झाल्यावर मात्र दारू सोडून बाकीच्या शरीर गरजा जणू थिजून गेल्या होत्या.
बारा वर्षे नशेत घालवल्यावर केवळ नशीब बलवत्तर म्हणून मी “अल्कोहोलिक ॲनॉनिमस( Alcoholic Anonymous)च्या संपर्कात आलो आणि माझे व्यसन सुटलं. तो आज एक निरोगी आणि निर्व्यसनी आयुष्य जगत आहे. होमिओपॅथिक औषधाबरोबर योग्य मार्गदर्शनाने कुठलेही व्यसन पूर्णपणे सुटू शकतं हे त्याला मनोमन पटलं आहे.
ज्यांचे नवरे व्यसनी आहेत अशा स्त्रियांसाठी पुण्यातील “मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात” ‘सहचरी‘ हा स्वमदत गट आहे. ज्या घरात व्यसन असतं तिथं संवाद नसतो अशावेळी स्त्रियांची मोठ्या प्रमाणात घुसमट होते दारूच्या वासाची त्या बाईच्या डोक्यात तिडीक बसलेली असते त्यामुळे व्यसनमुक्ती केंद्रातून उपचार घेऊन आलेल्या नवऱ्याला ही त्या लगेच जवळ येऊ देत नाहीत अशा अशा स्त्रियांना त्यांची मानसिकता लक्षात घेऊन होमिओपॅथिक उपचाराची जोड दिल्यास त्यांचं बिघडलेलं नातं परत सुधारलं जातं आणि त्या स्त्रीची मानसिकता देखील पूर्णपणे बदलून निरोगी आयुष्य जगता येते.
दारूच्या व्यसनामुळे दरवर्षी जगभरात तीस लाख लोक मरण पावतात, तर वय वर्ष 20 ते 39 दरम्यान होणाऱ्या अकाली मृत्यूंमध्ये 14 टक्के मृत्यू मागे “अल्कोहोल” हे महत्त्वाचं कारण असतं असं जागतिक आरोग्य संघटनेची आकडेवारी सांगते.
दारूच्या अतिसेवनामुळे कामसमस्या उद्भवलेल्या अनेक रुग्णांवर ज्यांनी उपचार केले आहेत त्या डॉक्टरांचे मत असं आहे की, सुरुवातीला मद्यपानामुळे कामेच्छा बळवल्यासारखी वाटते, त्यामुळे शरीर संबंधापूर्वी दारू पिण्याची सवय जडते. पण पुढे पुढे थोड्या मद्याने काही होत नाही त्यामुळे पिण्याचे प्रमाण वाढवलं जातं, ज्याचा थेट परिणाम लैंगिक ताठरतेवर होतो. आपण प्रमाणात घेतोय असं बजावताना ते प्रमाण ओलांडलं जातं आणि मग अल्कोहोलवरचं अवलंबित्व वाढत जातं.
दारूच्या व्यसनांमुळे उद्भवलेल्या पुरुषांच्या कामसमस्यांवर संशोधन झाले आहे, त्यात संशोधनाच्या अभ्यासांती 72 ℅ टक्के लोकांना एक किंवा एकापेक्षा अधिक कामसमस्या असल्याचं आढळून आलं,यात शिघ्रपतन,मंद कामेच्छा आणि लैंगिक ताठरतेच्या समस्यांचे प्रमाण अधिक होतं.
एखादा रुग्ण किती प्रमाणात मद्याचं सेवन करत आहे, त्यानुसार त्याला उद्भवणाऱ्या कामसमस्यांचे स्वरूप ठरतं असं तो अहवाल सांगतो.
तंबाखू, सिगारेट आणि निकोटीनचा परिणाम लैंगिक ताठरतेवर आणि कामेच्छे होतो. दीर्घकालीन व्यसनांमुळे जुनाट खोकल्याची व्याधी जडू शकते याचा निश्चितच विपरीत परिणाम सहजीवनावर होतो.
निकोटीनचा ठराविक उग्रवास असतो आणि तो कितीही च्युइंगम चघळलं तरी जात नाही, त्यामुळे जोडीदाराला व्यसनी माणसाच्या जवळ जायची इच्छा होत नाही.
पुरुषांप्रमाणेच गेल्या काही वर्षात स्त्रियांमधलं व्यसनांचे प्रमाण ही वाढायला लागले आहे. सिगारेट आणि दारूचा परिणाम कामेच्छेवर आणि जननक्षमतेवर होतो.
निकोटीनच्या सेवनामुळे कमी वजनाची मुलं निपजतात. याशिवाय तंबाखू आणि अल्कोहोल या दोन्हींचा भुकेवर परिणाम होत असल्याने रक्तक्षयाची- ॲनिमिया समस्या बळावते.
लहान मुलांमधील वाढती स्वमग्नता- ऑटिझम किंवा वर्तन विषयक समस्यांच मूळ त्यांच्या पालकांच्या व्यसनाधीनतेशी निगडित असण्याची दाट शक्यता संशोधनाअंती लक्षात आली आहे.
धुम्रपानामुळे पुरुष आणि स्त्रिया दोघांच्याही शरीरात टेस्टोस्टेरॉन संप्रेरकाच्या पातळीवर हानिकारक परिणाम होतो. याचं कारण म्हणजे धूम्रपानामुळे त्या व्यक्तीच्या शरीरातील कार्बन मोनॉक्साईडचे प्रमाण वाढतं. त्यामुळे टेस्टोस्टेरॉन संप्रेरकाची निर्मिती कमी होते आणि कामेच्छा मंदावते.
सिगारेटमधल्या हानिकारक रसायनांमुळे पुरुषांमध्ये इरेकटाईल डिसफंक्शन (Erectile Dysfunction) तर स्त्रियांमध्ये कोरड्या योनी मार्गाची समस्या बळावते.
याशिवाय दीर्घकाळ धूम्रपान केल्याने शीघ्रपतना सोबतच वंध्यत्वाची समस्या ही उद्भवते.
अयोग्य जीवनशैली हे देखील आजच्या काळातील भयंकर असं व्यसन असून त्याचाही कामेच्छेवर आणि एकूण आरोग्यावरच विपरीत परिणाम होतोय असं निरीक्षणात आलेलं आहे.
मोठ्या प्रमाणात वाढणाऱ्या वजनामुळे- ओबेसिटी, निर्व्यसनी लोकांमध्ये नॉन-अल्कोहोलिक-फॅटी-लिव्हर या आजाराचे प्रमाण वाढत आहे. यामुळे लिव्हर सिरॉसिसचा (Liver Cirrhosis) धोका वाढत असून यकृत प्रत्यारोपण(Liver Transplant) करण्याची वेळ अनेक रुग्णांवर येत आहे.
सतत बाहेरच खाणं, व्यायामाचा संपूर्ण अभाव त्यामुळे उद्भवणारा मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार यांचा थेट परिणाम सहजीवनावर आणि कामेच्छेवर होताना दिसत आहे.
अति प्रमाणात मद्यसेवनामुळे लैंगिक ताठरतेची समस्या उद्भवते, तर अफू सारख्या अमली पदार्थांच्या सेवनामुळे पुरुषांमध्ये विलंबित वीर्यपतनाची (Delayed Ejaculation) व्याधी सुरू होते.
सिगारेट, दारू इतकीच अलीकडच्या काळात गांजाला पसंती आणि प्रतिष्ठा दोन्ही वाढल्याचं अतिशय दारुण चित्र आहे. कोकेन,गांजा, भांग चरस आणि हशिश या द्रव्यांमुळे गुंगी येते, भ्रम निर्माण होतो. शरीरातील टेस्टोस्टेरॉन संप्रेरक कमी होतं आणि कालांतराने नपुंसकत्व (Impotency) येतं.
पुरुषांच्या या सगळ्या समस्यांचा थेट परिणाम त्यांच्या बायकोवर होत असतो. त्यातून नात्यातील गुंतागुंत अधिकच वाढत जाते.
आज सगळ्यांच्या आयुष्यात वेगवेगळ्या गोष्टींमुळे ताण-तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याला व्यसनांची जोड दिली तर क्षणिक सुखासाठी कर्करोग हृदयविकारासह अनेक मोठ्या व्याधीना आपणहून निमंत्रण देण्यासारखी स्थिती आहे.
दुसरीकडे सहजीवनातून “काम” नेहमीसाठी हद्दपार करणारं हे एकूण वर्तन आहे. त्यामुळे स्वतःसाठी आणि जोडीदारासाठी ही व्यसनांचे जीवघेणे “नाद” वेळीच सोडून संसाराचा बिघडलेला “ताल” होमिओपॅथीच्या औषधांमुळे निश्चितपणे समतोल साधला जातो व व्यसनाधीनतेमुळे स्त्री आणि पुरुषांच्या लैंगिक समस्येवर पूर्णपणे मात करता येते. होमिओपॅथिक उपचारांमुळे निरोगी कामजीवनाचा आनंद अनुभवणे शक्य आहे.
डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ)
चैतन्य होम्योपैथिक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4
शाहुपुरी व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123
रविवारी बंद
कृपया पुढील लेख वाचा –
बिघडला “ताल’ संसाराचा “नादाने”, ll समतोल साधला होमिओपॅथीक उपचाराने ||
Whether it is addicts or worldly people who have fallen into samsara, the saying “knows but does not turn” applies very aptly.
Addiction , whether it is cigarettes, alcohol, ganja, opium, does not remain without adverse effects on married life and work life .
Many addicts assert that ” no matter how much I decide or decide, I can quit addiction immediately” .
Unfortunately, that morning never dawns in the life of those who say ” let’s take one last breath, pour one last glass and leave everything from tomorrow” . That is why different addictions have a very bad effect on libido and sexual ability , which lasts for a long time.
There is a belief that alcohol increases libido . Dr. Vitthal Prabhu in the chapter ” Sex Tonic ” in his book “Niramaya Kamajivan ” wrote that, “Alcohol depresses the mind and makes a person happy; but alcohol is not a stimulant but a drink that illuminates the higher centers of the brain. It causes the desire for sexual intercourse.” It strengthens, however, the action slows down. So it has been proven in experiments that the function of ejaculation slows down the erection of the penis. Excessive alcohol consumption causes impotence.”
At the age of sixteen, one of my patient, who was addicted to cigarettes and other addictions including alcohol and marijuana, literally destroyed a hope in his life in alcoholism. Regarding its impact on his marriage, he said, “My wife was under constant stress due to my addictions. I thought I was taking in moderation. There are many people who are addicted and I am one of them. So I was not ready to admit that drinking was my problem. . So I didn’t even think that another person lives with me and she also has a mind and feelings. I don’t feel the need for sex when I’m drunk. But when I’m sober, I want ‘IT’ and when my wife says ‘NO’ , I get irritated. Then ‘ I used to literally scratch and fulfill my desires by directly attacking her character saying ‘You don’t want, because there is something outside of you.’
After spending 12 years as an alcoholic, it was only by luck that I came in contact with Alcoholic Anonymous and got rid of my addiction with help of Homoeopathic Medicine & proper counselling. Today he is living a healthy and drug free life.
‘Sahachari ‘(‘सहचरी‘) is a self-help group for women whose husbands are addicts at “मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात” (“Muktangan Addiction Mukti Kendra “) in Pune. In the house where there is addiction, there is no communication, there is a lot of intrusion of women, the smell of alcohol is sitting in the head of that woman, so she does not allow her husband who comes for treatment from the addiction treatment center to come close to her immediately. is improved and the mindset of the woman can also be completely changed to lead a healthy life.
According to the World Health Organization, alcohol is the leading cause of 14 percent of premature deaths between the ages of 20 and 39, accounting for three million deaths worldwide each year.
Doctors who have treated many patients with erectile dysfunction due to excessive consumption of alcohol are of the opinion that initially drinking alcohol seems to increase the libido, so the habit of drinking alcohol before intercourse becomes ingrained . But a little bit of alcohol doesn’t do anything, so the amount of drinking is increased, which has a direct effect on erectile dysfunction . When we pretend we are drinking, we exceed that limit and become dependent on alcohol.
Research on male erectile dysfunction caused by alcohol addiction found that 72℅ percent of men had one or more erectile dysfunction , including premature ejaculation, low libido, and erectile dysfunction.
He reports that depending on the amount of alcohol a patient is consuming, the nature of the functional problems he or she may experience will vary.
Tobacco, cigarettes and nicotine affect sexual erection and libido . Long-term addictions can lead to chronic cough, which definitely has an adverse effect on the symbiosis.
Nicotine has a fixed habit and does not go away no matter how much gum is chewed , so the partner does not want to go near the addict.
Like men, the rate of addiction among women has started increasing in the last few years. Cigarettes and alcohol affect libido and fertility .
Low birth weight babies are born due to nicotine consumption. Apart from this, both tobacco and alcohol affect the appetite, thus increasing the problem of anemia .
Research has shown that the prevalence of autism or behavioral problems in young children is highly likely to be linked to their parents’ addictions .
Smoking has a harmful effect on the level of testosterone hormone in the body of both men and women. This is because smoking increases the amount of carbon monoxide in the person’s body. It reduces the production of testosterone hormone and slows down the libido.
Harmful chemicals in cigarettes cause erectile dysfunction in men and dry vagina in women .
Apart from this, long term smoking causes problems of infertility along with premature ejaculation .
Improper lifestyle is also a terrible addiction of today and it has been observed that it has an adverse effect on libido and overall health .
Due to massive weight gain – obesity, in addicts
Non-alcoholic fatty liver disease is on the rise. Due to this, the risk of liver cirrhosis is increasing and the time for liver transplant is approaching for many patients.
Constant eating out, complete lack of exercise, resulting in diabetes, high blood pressure, heart disease are seen to have a direct impact on symbiosis and libido .
Excessive consumption of alcohol leads to erectile dysfunction , while the use of drugs like opium causes delayed ejaculation in men .
Just like cigarettes and alcohol , cannabis has seen a dramatic rise in both popularity and prestige in recent times. Substances like cocaine, ganja, hemp hashish and hashish cause intoxication and hallucinations . The testosterone hormone in the body decreases and with time impotence occurs .
All these problems of men directly affect their wives. It increases the complexity of the relationship .
Today, everyone’s life is under a lot of stress due to various things. If you add addictions to it, it is like inviting many major diseases including cancer, heart disease for temporary happiness .
On the other hand, it is the total behavior that banishes “work” forever from symbiosis. Therefore, leaving the deadly “नाद” of addictions for yourself and your partner, the disturbed “ताल” “rhythm” of the world is definitely Balanced by Homoeopathic medicines and the sexual problems of men and women can be completely overcome due to addiction .
Homeopathic treatment makes it possible to enjoy a healthy Sexual life .
Dr Ajay Hanmane
M.D.(Homeo)
Chaitanya Homoeopathic Clinic
1st Floor, F4,
Bhaskar Plaza Vyapari Peth,
Near Panch Bunglow Bhaji Mandai
Kolhapur, 416001
Mobile No. 7738667123
Sunday Closed
Please read the following article –