होमिओपॅथी विषयी थोडेसे – भाग दोन / A Little About Homoeopathy – Part Two

Dorctor Pic By Dr. Ajay HanmaneJune 30, 2023 General Information Homeopathic and Cure
 होमिओपॅथी विषयी थोडेसे – भाग दोन

होमिओपॅथीचा ‘सम-सम-चिकित्सा‘ हा सिद्धांत हिप्पोक्रेट्सने फार वर्षांपूर्वी सांगितला होता. जर्मन डॉक्टर सॅम्युअल हॅनीमान यांनी तो वापरून या शास्त्राचा 1790 साली पाया रोवला. या शास्त्रामध्ये मनुष्याचा सखोल अभ्यास करून ते शरीर मन आणि त्याचा आत्मा ( Mind- Body & Soul Axis) या तीनही गोष्टींचा परस्पर सुसंवाद साधणारी अशी “चैतन्य शक्ती” (Vital Force) याद्वारे मनुष्याचे अस्तित्व गृहीत धरले आहे.

जर आजाराचे कारण अदृश्य चैतन्य शक्तीचा बिघाड न मानता कोणत्याही जड स्वरूपात (भौतिक- Material)  मानावयाचे ठरले तर अनेक आजारांचे कारण सापडू शकत नाही. त्यांना “कारण न सापडणारे आजार”  (Idiopathic) असे संबोधले जाते. पण त्यामुळे अनेक प्रश्न अनुत्तरीत राहतात.

कोरोनाच्या साथीनंतर ऑटोईम्युन ( Auto-Immune) आजारांचे प्रमाण खूपच वाढले आहे.

      उदाहरणार्थमलेरियाचा डास(ऍनाफिलिस) हा डास चावल्यानंतर प्रत्येकालाच मलेरिया होतोच असे नाही. त्याचप्रमाणे आपल्या आहारातून,श्वासोच्छ्वासातून अनेक विषाणू, जिवाणू, कृमी आपल्या शरीरात जात असतात.तरीसुद्धा सर्वच माणसे त्यापासून आजारी का पडत नाहीत? म्हणून हे मान्य करावे लागेल की मलेरियाचे जंतू किंवा टी.बी.चे जंतू हे आजाराचे मूळ कारण नसून बिघडलेली चैतन्य शक्ती (इम्युनिटी) हेच आजाराचे मूळ कारण आहे.

चैतन्य शक्तीच्या मार्गामध्ये, अंतर्गत किंवा बाह्य कारणांमुळे बिघाड झाला म्हणजे रूद्ध झालेली चैतन्य शक्ती, प्रकृतीनुसार शरीरातील कोणत्याही एक किंवा जास्त इंद्रियात अथवा अवयवात लक्षणे उत्पन्न करून आपल्याला नेहमीची कार्य बिघडल्याची जाणीव करून देते. बिघडलेली जीवनशक्ती सुरळीतपणे कार्य करणे (Harmony) हेच होमिओपॅथिक चिकित्सेचे मूळ तत्व ध्यानात ठेवून, एक समान लक्षणे असणाऱ्या औषधांचा तुलनात्मक दृष्टीने अभ्यास करणे आवश्यक ठरते.

होमिओपॅथिक चिकित्सकाच्या अंगी गुप्तहेरप्रमाणे चातुर्य असावे लागते.अगदी क्षुल्लक दिसणाऱ्या गोष्टीवरून गुन्ह्याचा तपास जसा लावतात, त्याप्रमाणे होमिओपॅथिक चिकित्सकाला फार सूक्ष्म दृष्टी ठेवावी लागते.

एकदा एका खोकल्याचा रुग्ण तीन ते चार महिने इतर उपचार घेऊन माझ्याकडे (चैतन्य  क्लिनिकमध्ये) आला. या रुग्णाला खोकल्याच्या लक्षणांची चौकशी करताना कफाला काही विशिष्ट चव, वास वगैरे आहे का? असे विचारतात त्याने “नाही” पण कफ बाहेर पडताना जड वाटतो म्हणून सांगितले. कफाचा जडपणा हे असामान्य लक्षण आहे म्हणून त्याला महत्त्व देऊन औषधाची निवड केल्यावर, थोड्याच दिवसात तो रुग्ण बरा झाला. म्हणून होमिओपॅथिक चिकित्सेत औषधांपासून उत्पन्न होणारे लक्षणे व रोगापासून उत्पन्न होणारे लक्षणे यांचा समसमान संयोग करावा लागतो. अशा प्रकारे स्पष्ट लक्षणांपेक्षा एखाद्या क्षुल्लक वाटणारे लक्षणांना कसे महत्त्व देतात, हे यावरून दिसते.

लक्षणांचा व त्यांच्या वैशिष्ट्यांचा विचार करताना, मानसिक लक्षणांचा विचार करणे हे होमिओपॅथिक चिकित्सेचे दुसरे एक महत्त्वाचे अंग आहे. कित्येक वेळा आजारी माणसांची मानसिक लक्षणे स्पष्टपणे दिसतात, परंतु अनेक वेळा शिष्टाचार पाळण्याच्या बंधनांमुळे मोठ्या माणसांच्या बाबतीत अशा लक्षणांची माहिती त्यांच्या नातेवाईकांकडून काढून घ्यावी लागते. एरवी स्वभावाने थंड, शांत असणारी काही माणसे आजारपणात इतकी चिडखोर बनतात की सुश्रुषा करणाऱ्या लोकांना नकोसे होते, तर दुसरी काही आजारी माणसे यातना होत असताना सुद्धा थंड,शांत, असतात. काही माणसे आपले लक्षणे सांगून न थांबता इतर अनेक गोष्टी सुद्धा सुनावण्यास कमी करत नाहीत, तर काहीजण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सुद्धा धड नीट देत नाहीत.

लहान मुलांच्या बाबतीत शिष्टाचाराचे बंधन नसल्यामुळे त्यांची मानसिक अवस्था स्पष्टपणे दिसून येते. मानसिक लक्षणांवरच औषधांची निवड करणे कित्येकदा योग्य असते
उदाहरणार्थ एकदा एका चार वर्षाच्या मुलाला 102- 103 डिग्री फॅरेंगनेट ताप आला होता. तो मुलगा डॉक्टरला तर राहोच पण आपल्या आई-वडिलांना सुद्धा अंगाला हात लावून देण्यास राजी नव्हता. त्याच्याकडे पाहताच तो ओरडावयास लागायचा. अशा मुलास कसे तपासायचे? औषध कसे द्यायचे? असा नेहमीच्या डॉक्टरला पेच पडला. होमिओपॅथिक औषधे गोड असतात व तो ती औषधे आवडीने घेईल म्हणून मला बोलावण्यात आले. अर्थात मुलाने मलाही तपासू दिलेच नाही, पण मूल अंगाला हात लावण्याने किंवा पाहण्याने  चिडावयाचे ही दोन मानसिक लक्षणे औषधाची निवड करण्यास पुरेशी होती. औषध दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचा ताप तर कमी झालाच पण मुलगा इतका थंडावला की मला विना तक्रार तपासू दिले. एक ते दोन दिवसात त्याचा ताप पुर्ण उतरून तो  पूर्ववत खेळावयाला लागला.

होमिओपॅथिक औषधे मन:स्थिती पाहून दिल्याने कशी उपयोगी पडतात हे लक्षात आले असेल !!!

होमिओपॅथिक  चिकित्सकाकडे रुग्ण रोगाच्या प्राथमिक अवस्थेत कधीच येत नाही. अन्यत्रे औषधे घेऊन “बरे वाटेना”, असे झाले म्हणजे या पॅथीकडे रोगी वळतात. त्यामुळे रोगाच्या मूळ लक्षणात औषधांच्या दुष्परिणामांची भर पडून लक्षणे गुंतागुंतीची होतात. उपचारांनी हैराण झालेल्या रुग्णांना होमिओपॅथिक औषधांचा प्रभाव दिसण्यासाठी वेळ लागणे स्वाभाविक असते.

एरवी मात्र दमा, पोटदुखी, सर्दी, खोकला ताप एवढीच नव्हे तर साथीच्या आजारातही या औषधाने त्वरित आराम पडतो.

वास्तविक होमिओपॅथीचे उपचार, रुग्णांना त्वरित व योग्य प्रकारे आणि निश्चित स्वरूपी आराम देण्यासाठीच असतात. त्यामुळे प्रकृतीचे नुकसान तर होत नाही उलट प्रतिकारशक्तीत वाढ होते.

प्रत्येक मनुष्य हा वेगळा असतो, कारण व्यक्ती तितक्या प्रकृती आणि तितक्याच प्रवृत्ती. प्रत्येक मनुष्याची प्रकृती (फिजिकल कॉन्स्टिट्यूशन Physical Constitution),प्रवृत्ती (मेंटल मेकअप), अनुवंशिक जणूकातील दोष, (Heriditary – Miasms)  हे पूर्णपणे भिन्न असल्याने प्रत्येकाची संवेदनशीलता ( Susceptibility)  भिन्न असते. हे सर्व लक्षात घेऊन होमिओपॅथिक औषधांची मात्रा  ( Dose) ठरवावी लागते.

होमिओपॅथिक शास्त्रात रुग्णाच्या आजाराचा संपूर्णपणे विचार करून तो कोणत्या स्वरूपाचा साध्य-असाद्य  (Reversible- Irreversible) आहे यावरून औषधोपचारांची दिशा ठरविले जाते.

असाध्य रोगांमध्ये होमिओपॅथीची औषधेही आजार  शमविणे ( Palliation)  या दृष्टीने सुद्धा वापरली जातात.

इतर सर्व आजारांमध्ये, रुग्णाचा संपूर्ण विचार करून रोगाची कारणे शोधून, सर्व प्रकारच्या आजारांचे (जुने-नवे) समुळ उच्चाटन केले जाते.

होमिओपॅथिक चिकित्सा पद्धतीत शस्त्रक्रियांचा समावेश नाही, केवळ शस्त्रक्रियापूर्व आणि शस्त्रक्रियानंतरच्या काळातील उपचारांचा समावेश आहे.    

थोडक्यात, कला आणि शास्त्र (Art & Science) यांचा अनोखा संगम असलेली ही उपचार पद्धती डॉक्टर आणि रुग्ण  ( Inter- Personal) यांच्यात एक आगळा बंध निर्माण करून रुग्णाला स्वतःबद्दल जाणून घेण्याची प्रेरणा देणारी ही उपचार पद्धती आहे.

डॉ अजय हनमाने
एम. डी. (होमिओ)
चैतन्य होम्योपैथिक क्लिनीक
भास्कर प्लाझा- F4
शाहुपुरी व्यापारी पेठ
रेल्वे फाटक भाजी मंडई जवळ
कोल्हापूर- 416001
मोबाईल- 7738667123
रविवारी बंद

 

कृपया पुढील लेख वाचा  —

आधुनिक उपचार पद्धती  आणि होमिओपॅथी उपचार पद्धती मधील फरक


 A Little About Homoeopathy – Part Two

Homoeopathy’s theory of equal-equal-cure was propounded many years ago by Hippocrates. The German doctor Samuel Hahnemann laid the foundation of this science in 1790 using it. In this science, after studying the human being in depth, it is assumed that the existence of the human being is through the “Vital Force” which harmonizes all the three things i.e. Mind-Body & Soul Axis.

If the cause of illness is not considered to be a failure of the invisible vitality, but is considered to be in any material form, then the cause of many diseases cannot be found. They are called “Idiopathic diseases”. But it leaves many questions unanswered.

After the corona epidemic, the number of auto-immune diseases has increased significantly.

For example, not everyone gets malaria after being bitten by the malaria mosquito (Anaphylis). In the same way, many viruses, bacteria and worms enter our body through our food and breath. However, why don’t all people get sick from it? So it has to be accepted that Malaria germs or TB germs are not the root cause of disease but impaired immunity is the root cause of disease.

In the path of the Chaitanya Shakti, due to internal or external causes, the disordered Chaitanya Shakti, according to Prakriti -constitution, produces symptoms in any one or more organs or organs of the body, making us aware of the disturbance of its normal function. Keeping in mind the basic principle of Homoeopathic treatment which is harmony of impaired vitality, it is necessary to study drugs with similar symptoms in a comparative perspective.

A Homoeopathic doctor needs to be as smart as a detective. Just like investigating a crime from something that seems trivial, a Homoeopathic doctor needs to have a very subtle vision.

Once a cough patient came to me (Chaitanya Clinic) with other treatment for three to four months. When inquiring about cough symptoms in this patient, does the sputum have a particular taste, smell, etc.? They answered him “no” but he felt heavy when coming out of the phlegm. Heaviness of phlegm being an unusual symptom, after selecting the remedy, the patient recovered within a few days.

Therefore, in Homoeopathic treatment, there is an equal combination of the symptoms arising from the drugs and the symptoms arising from the disease.

Thus, it shows, how a seemingly insignificant symptom is given more importance than the obvious one.

Another important aspect of Homoeopathic treatment is to consider psychological symptoms while considering symptoms and their characteristics. Sometimes the mental symptoms of sick people are clearly visible, but many times due to the constraints of etiquette, in the case of older people, information about such symptoms is withheld from their relatives. Some people, who are cold and calm by nature, become so irritable during illness that the caregivers do not want them, while other sick people are cold, calm, even when they are suffering. Some people don’t stop telling their symptoms and don’t slow down to tell many other things, while some people don’t even answer the questions asked properly.

In the case of children, their mental state is clearly visible due to lack of etiquette. It is often appropriate to choose drugs based on psychological symptoms

For example, a four-year-old boy once had a fever of 102-103 degrees Fahrenheit. The boy was not willing to let the doctor but even his parents touch his body. He used to scream at the sight of him. How to check such a child? How to give medicine? The usual doctor was confused. I was called as Homoeopathic medicines are sweet and he would take them willingly. Of course, the child did not allow me to examine it either, but these two psychological symptoms of being irritated by touching or looking at the child’s body were enough to choose the drug. The next day after giving the medicine his fever went down but the boy was so cold that I was allowed to examine him without complaint. In one to two days his fever subsided and he started playing again.

You may have noticed how Homoeopathic medicines are useful when given according to mood.

A patient never comes to a Homoeopathic physician in the initial stage of the disease. Patients turn to this pathology when they “don’t feel better” with other medicines. Therefore, the symptoms become complicated by adding the side effects of the drugs to the original symptom of the disease. It is natural that Homoeopathic medicines take time for patients who are shocked by the treatment to see the effect.

However, not only asthma, stomach ache, cold, cough, fever, but also epidemic diseases get instant relief with this medicine. 

True Homoeopathic treatment is all about providing quick and proper and definite relief to the patients. It does not cause damage to health but increases immunity.

Every human being is different, because individuals have the same nature and the same instincts. The susceptibility of each person is different as the physical constitution, mental make-up, hereditary defects, (Hereditary – Miasms) are completely different. Dose of Homoeopathic medicines has to be decided keeping all this in mind.

In Homoeopathic science, by considering the patient’s disease in its entirety, the direction of medication is determined based on its reversible-irreversible nature.

Homeopathic medicines are also used for palliation in incurable diseases.

In all other diseases, all types of diseases (old and new) are completely eradicated by considering the patient as a whole and finding the causes of the disease.

Homeopathic treatment does not involve surgery, only preoperative and post-operative treatment.    

In short, this treatment method which is a unique confluence of art and science (Art & Science) is a treatment method that inspires the patient to know about himself by creating a close bond between the doctor and the patient (Interpersonal).

Dr. Ajay Hanmane
M. D. (Homeo)
Chaitanya Homeopathic Clinic
Bhaskar Plaza- F4
Shahupuri Traders Peth
Railway Gate Near Bhaji Mandai
Kolhapur- 416001
Mobile- 7738667123
Sunday Closed

Please Read Next Article-

Difference between modern treatment and Homoeopathy treatment